एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके !
मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत.
अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई
जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई ।
इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे. त्याला एका बाजूला संपूर्ण आध्यामिक रंग आहे आणि दुसर्या बाजूला इष्कबाजीचा तुफानी जल्लोष आहे.
प्रेससी स्वतःला सजवून सवरुन प्रियकराकडे गेली, पण जेंव्हा त्याचा चेहरा पाहिला तेंव्हा ती आपला चेहरा विसरुन गेली ! याचा सूफी़ अर्थ असा की प्रकृती तिचं सजवलेलं व्यक्तीमत्व घेऊन पुरुषाला भेटायला गेली आणि त्याचा कोणताही चेहरा नसलेली अनंतता पाहून त्यातच सामावून गेली. कशामुळे? तर केवळ त्याच्या एका नजर भेटीनं !
प्रियकराशी नजर भेट काय की दिगंत आकाशाशी नजर भेट काय, अंतीम परिणाम एकच : एकरुपता!
छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
ही अगम बात दोतर्फा आहे. नजरेशी नजर मिळाल्यावर खरं तर बातच संपते, शब्दांचं कामच उरत नाही. एक अंगोपांग व्यापणारी शांतता उरते. त्या संवादाला खुसरो `अगम बात' म्हणतो ! शांततेचा शांततेशी झालेला अपूर्व संवाद.
प्रेम भटीका मधवा पिलाइके,
मतवाली कर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
नैनांशी नैन मिळायचा आवकाश, प्रेमाची मधुरता मतवाली करते. आणि ही गोष्ट सुद्धा दोन्ही प्रेमात एकसमान आहे. प्रेयसी मतवाली होते तसा साधकही मस्त होतो. ओशो म्हणतात : ` परमात्मा एक मैखाना है, जिसने उसे पिया, सदाके लिए मतवाला हो जाता है' |
गोरी गोरी बैंया, हरी हरी चुरियां
बैंया पकर हर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसीचे गोरे बाहू आणि हिरवा चुडा...त्यानं फक्त तिला बाहू धरुन स्वतःकडे ओढलं आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची सिमा संपली. हिरवा रंग प्रकृती दर्शवतो आणि गोरे बाहू तीच्या स्त्रीत्वाची साक्ष देतात. ज्या क्षणी प्रकृती पुरुषात मिसळते त्या क्षणी क़यामत ओढवते. एक अथांग निराकारता पुन्हा प्रकृतीच्या प्रकटीकरणाचा माहौल बनवते.
बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवा
अपनीसी रंगदिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसी म्हणते, माझ्या रंगरसिया मी तुझ्यावर कुर्बान आहे कारण तुझ्या नजरेनं, तू मला तुझ्या रंगात रंगवून टाकलयंस! आध्यात्मिक अर्थानं, साधक जेंव्हा आकाशाला भेटतो तेंव्हा तो सुद्धा आकाश होऊन जातो. आकाशाचा आणि त्याचा रंग एक होतो.
खु़सरो निजा़मके बल बल जाइये
मोहे सुहागन किनी रे, मोसे नैना मिलाइके |
या ओळींना तर अनेक रंग लाभले आहेत. जी प्रेयसी स्वतःला प्रियकराप्रती समर्पित करते ती सुहागन होते. खरं तर ती स्वतःतून प्रियकराला आकारात बांधायचा प्रयत्न करते. आध्यात्मिक अर्थानं साधक स्वतःचं व्यक्तिमत्त्व संपवून, स्त्रैण अर्थानं सुहागन होतो आणि स्वतःलाच पुनर्जन्म देतो... तो द्विज होतो.
बात अगम केहे दीनी रे मोसे नैना मिलाइके |
____________________________________________________
ही अफाट रचना अबिदा परवीन आणि राहत फतेहअली खाननी अशी काय धमाल गायली आहे की तुम्ही केंव्हाही ऐका, ती तुम्हाला मस्त करेल. अबिदा स्वतः सूफी गायिका आहे आणि राहत, उस्ताद नुसरत फतेहअली खानचा पुतण्या आहे. सुफीज़ममधे प्रत्येक आवाज अल्लाचा आवाज मानला गेलायं त्यामुळे अबिदाच्या आवाजाला कसलंही बंधन नाही. तिचं गाणं संपूर्ण इश्वर शरण आहे त्यामुळे ती प्रकटीकरणाचं केवळ एक माध्यम बनून गाते. राहतचा आवाज त्याच्या नांवाला साजेसा म्हणजे हृदयाला शांत करणारा आहे. त्याच्या आवाजाचा गोडवा केवळ मिस्टिकल आहे. इस्लाममधे निराकाराला समर्पण ही एकमेव साधना मानली गेलीये. तस्मात, राहत जेंव्हा गातो तेंव्हा अनंत स्पेसमधे तो विलीन झालेला असतो, उरतो तो फक्त त्याच्या आवाजाचा गोडवा. त्यानं नुसतर साहेबांची गायकी सहीसही उचलून तिला स्वतःचा रंग देण्याचं असंभव काम केलंय.
एकीकडे अबिदाच्या खर्जाची अदिम दरी तर दुसरीकडे त्या दरीच्या अथांगतेला लिलया पार करणारं राहतच्या आवजाचं जीवघेणं चांदणं अशी ही अनोखी मैफिल जमलीये.
या दोघा दिग्गजांनी खु़सरोचा क़लाम आपल्या प्रतिभेनं रंगवलायं. त्यात नवी शायरी गुंफली आहे आणि ती सुद्धा तितकीच सहज पण दिलकश आहे.
इथे सगळी वेरिएशन्स देत नाही, तुम्हाला ती ऐकतांनाच मजा येईल पण हे एक कडवं कमाल आहे :
खुसरो रैन सुहागकी, जो मैं जागी पी के संग,
ऐसी बाजी़ प्रेमकी, जो मैं खेली पी के संग,
जीत गयी तो पिया मोरे, जो मैं हारी पी के संग |
काय कमाल अंदाज़ आहे शायरीचा. अशी सुहागरात जी मी प्रियकरा बरोबर जागवली. अशी प्रेमाची शर्त जी प्रियकराशी लावली...की मी जिंकले तर तू माझा आणि हरले तर मी तुझी!
छाप तिलक सब छीनी रे, मोसे नैना मिलाइके |
.
वाचने
8063
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रकृती परमात्मा ओशो सूफियाना
मी तर अबिदा परवीनच्या मन
निगाह-ए-दरवाईशां ऐका...
In reply to मी तर अबिदा परवीनच्या मन by प्रमोद देर्देकर
सुंदर रसग्रहण!
मला समजलेला गाण्याचा अर्थ जरा
मोसे नैना मिलाइके !
In reply to मला समजलेला गाण्याचा अर्थ जरा by आदूबाळ
अध्यात्म हे टेशन माझ्या
In reply to मोसे नैना मिलाइके ! by विवेक ठाकूर
खुसरोचं काव्य स्त्रैण तर आहेच
In reply to अध्यात्म हे टेशन माझ्या by आदूबाळ
आदूदादू, विठाकाका आध्यात्मिक
In reply to अध्यात्म हे टेशन माझ्या by आदूबाळ
ते दोर मी केव्हाच कापून
In reply to आदूदादू, विठाकाका आध्यात्मिक by सूड
तरीही किती चिकाटीने समजवतायेत
In reply to ते दोर मी केव्हाच कापून by आदूबाळ
सर आपल ते....
In reply to ते दोर मी केव्हाच कापून by आदूबाळ
विठांशी सहमत - बहुतांश सूफी
In reply to मोसे नैना मिलाइके ! by विवेक ठाकूर
ह्या काव्याचा जनक खुसरो आहे हे माहीत नव्हतं
+१
In reply to ह्या काव्याचा जनक खुसरो आहे हे माहीत नव्हतं by अभिजितमोहोळकर
हे गाणं अनेक गायकांनी अनेक वेळा गायलं आहे
In reply to ह्या काव्याचा जनक खुसरो आहे हे माहीत नव्हतं by अभिजितमोहोळकर
//एखादी कलाकृती किती
In reply to हे गाणं अनेक गायकांनी अनेक वेळा गायलं आहे by विवेक ठाकूर
हाहा!
In reply to //एखादी कलाकृती किती by जयंत कुलकर्णी
चुकून 'रामोशान्' वाचलं =))
In reply to हाहा! by पैसा
ते सुद्धा बरोबरच्च आसेल !
In reply to चुकून 'रामोशान्' वाचलं =)) by सूड
काय सुंदर कलाकृती आहे
+१
In reply to काय सुंदर कलाकृती आहे by अर्धवटराव
नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर
सहमत.. विठा तुमचा सूफी वर
In reply to नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर by मोदक
थोडे धाडस
दुरुस्ती:कायाविरहित
In reply to थोडे धाडस by राही
+१
In reply to थोडे धाडस by राही
+१
In reply to थोडे धाडस by राही
+१
In reply to थोडे धाडस by राही
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
In reply to थोडे धाडस by राही
शब्द निर्देश अनुभवाचा करतात
In reply to बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके | by विवेक ठाकूर
जे लिहीतो तो माझा अनुभव आहे
In reply to शब्द निर्देश अनुभवाचा करतात by भाऊंचे भाऊ
हम्म पटतय
In reply to जे लिहीतो तो माझा अनुभव आहे by विवेक ठाकूर
थोडक्यात*
In reply to हम्म पटतय by भाऊंचे भाऊ
सत्य एकच आहे, अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत.
In reply to हम्म पटतय by भाऊंचे भाऊ
शब्दावर कुणाची मालकी नसते.
In reply to सत्य एकच आहे, अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत. by विवेक ठाकूर
अगम-निगम
In reply to बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके | by विवेक ठाकूर
मस्त लेख आणि चर्चा. चांगली
माझ्याकडे एक असंच छापातिलक