Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/06/2016 - 12:58
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
  • Log in or register to post comments
  • 65789 views

प्रतिक्रिया

Submitted by अर्धवटराव on Mon, 03/07/2016 - 11:22

In reply to बरचसं पटलं. by राजेश घासकडवी

Permalink

सध्याच्या परिस्थितीत आंतरजालावर घडणं मला फार कठीण वाटतं.

अहो, म्हणुनच अशा चर्चा जास्त जोरकसपणे मांडायच्या ना. इन फॅक्ट, मिपावर जे अनेक उपक्रम चालतात, त्यात गेल्या काहि वर्षातल्या सर्वात सफल/असफल योजनांवर चर्चा घडवुन आणण्याचा उपक्रम झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/07/2016 - 12:47

In reply to आंबेडकर, मुस्लीम अन by राजेश घासकडवी

Permalink

पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं

पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते.
सहमत. ज्या राज्यात खांग्रेस वि. भाजप असा सरळ सामना आहे (म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, हि.प्र., उत्तराखंड, गुजरात), तिथे भाजपला फारशी भीति नाही. परंतु इतर राज्यातील पूर्णपणे परस्परविरोधी असलेले पक्ष आपले अस्तित्व गमाविण्याच्या भीतिने एकत्र येत आहेत (उदा. बिहार) आणि तिथे भाजपला जड जाणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 03/07/2016 - 17:23

In reply to पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं by श्रीगुरुजी

Permalink

खांग्रेस वि. भाजप

खांग्रेस वि. भाजप
इतक्या साध्या प्रतिसादातही इतकं तुच्छतेने थुंकल्यासारखं 'खांग्रेस' म्हणणं आवश्यक आहे का? मिपाच्या बिल्डिंगीबाहेर उगीच पचाक्कन पिंक टाकल्यासारखं वाटतं. मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही. अशा उल्लेखांमुळे चर्चा खालच्या पातळीवर गेली तर त्यात नवल ते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 03/07/2016 - 17:47

In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी

Permalink

शब्दाशब्दांतून दिसणारा

शब्दाशब्दांतून दिसणारा किळसवाणा द्वेष ही काँग्रेस/आप/विचारवंत/पुरोगामी/डावे यांच्या विरोधकांची स्पष्ट ओळख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 03/07/2016 - 18:07

In reply to शब्दाशब्दांतून दिसणारा by तर्राट जोकर

Permalink

कमॉन! एवढं सेन्सिटिव का

कमॉन! एवढं सेन्सिटिव का व्हायचं? थोडी थट्टा केली तर किळसवाणा द्वेष डायरेक्ट? भक्त, नमोरुग्ण, इंटरनेट हिंदू आदी शब्दांची रेलचेल असते की बर्‍याच ठिकाणी. ती लोक स्पोर्टिंगली घेतात. मौत का सौदागर वगैरे बाजूला ठेऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 03/07/2016 - 18:30

In reply to कमॉन! एवढं सेन्सिटिव का by अनुप ढेरे

Permalink

सेन्सिटीव तर खांग्रेस

सेन्सिटीव तर खांग्रेस म्हणणारे असतात. साध्या शब्दांतून व्यक्त होण्यापेक्षा कैक अधिक विखार भरलेला असतो तेव्हा असे होते. तसेच थट्टा माझी थोडीच करतंय कोणी जे मी सेन्सिटीव होऊ. बाकी भक्त, नमोरुग्ण, इण्टरनेट हिंदू हे शब्द बिन्डोक भाजपसमर्थकांसाठी आहेत. भाजपला नव्हे. बाकी, 'मौत का सौदागर' एवढी टिप्पणी हाताशी असायला बरी असते.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 03/07/2016 - 18:49

In reply to कमॉन! एवढं सेन्सिटिव का by अनुप ढेरे

Permalink

अहो ही थोडी थट्टा नाही. मला

अहो ही थोडी थट्टा नाही. मला वाटतं हे भाषेला लागलेलं वळण आहे. जेव्हा थट्टा करताना म्हटलं जातं तेव्हा कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. पण 'कॉंग्रेस विरुद्ध भाजपा' असा साधा सरळ उल्लेख येण्याऐवजी असलं का येतं? ती इतकी भिनलेली सवय आहे की आपोआपच कॉंग्रेसऐवजी खांग्रेस असंच टंकलं जातं. त्यामुळे ती सवय बदला असं सांगावंसं वाटतं. काही जणांना नाकात बोटं घालण्याची सवय असते, ते लोकांना गलिच्छ वाटू शकतं. म्हणून आपलं असं प्रतिक्षिप्त क्रियेने काही झालेलं दिसलं की सांगावं लागतं. अशा अनावश्यक पिचकाऱ्यांनी उगीच भिंती घाण होण्यापलिकडे काहीही साध्य होत नाही. आता त्यांनी जर अत्यंत विचार करून मुद्दाम खांग्रेस असं लिहिलं असलं तर गोष्ट वेगळी. पण या विचारपूर्वक तुच्छतेमागची त्यांची नक्की कारणं काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 03/07/2016 - 18:35

In reply to शब्दाशब्दांतून दिसणारा by तर्राट जोकर

Permalink

बरं, ते असू दे.

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ तर्राट जोकर - Mon, 07/03/2016 - 12:26 अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! >> विद्यमान पंतप्रधानांनाही ???
यातून काय सिद्ध होतं? उत्सुकता म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 03/07/2016 - 18:44

In reply to बरं, ते असू दे. by बोका-ए-आझम

Permalink

१. विद्यमान पंतप्रधानांना

१. विद्यमान पंतप्रधानांना सेल्फी घेण्याची सवय आहे. १. सेल्फी घेणे हा मनोविकार आहे ह्यातलं कोणतं विधान चूक वा खोटं वा ताणलेलं आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 03/07/2016 - 18:50

In reply to १. विद्यमान पंतप्रधानांना by तर्राट जोकर

Permalink

ज्जे बात!

शब्दाशब्दांतून दिसणारा तर्राट जोकर - Mon, 07/03/2016 - 17:47 शब्दाशब्दांतून दिसणारा किळसवाणा द्वेष ही काँग्रेस/आप/विचारवंत/पुरोगामी/डावे यांच्या विरोधकांची स्पष्ट ओळख आहे.
हेच तुम्हालाही लागू पडतं. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 03/07/2016 - 18:56

In reply to ज्जे बात! by बोका-ए-आझम

Permalink

आता इथला साधासा उपरोध

आता इथला साधासा उपरोध तुम्हाला कळत नाही असा प्रश्न विचारु का? बाकी, किळस ह्या शब्दाबद्दलची तुमची समज वेगळी असण्याची शक्यता मान्य करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 03/07/2016 - 19:06

In reply to आता इथला साधासा उपरोध by तर्राट जोकर

Permalink

उपरोध!

बरं!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 03/07/2016 - 19:40

In reply to उपरोध! by बोका-ए-आझम

Permalink

बोका सेठ

बोका सेठ आपला तो उपरोध दुसर्याची ती किळस हे हि समजू नये तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 03/07/2016 - 21:38

In reply to बोका सेठ by सुबोध खरे

Permalink

हेच विधान तुम्हालाही लागू

हेच विधान तुम्हालाही लागू पडतं हे बोकाशेठचं विधान तुम्हाला मान्य आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Mon, 03/07/2016 - 19:13

In reply to १. विद्यमान पंतप्रधानांना by तर्राट जोकर

Permalink

दोन्ही.

दोन्ही.
एका दिवसात कमीतकमी तीन सेल्फी काढणे. पण, हे फोटो कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट न करणे
आपले पंतप्रधान फक्त कुणी बाहेरचे त्यांच्या बरोबरीचे असतील तर सेल्फी काढताना दिसतात. कधीतरी सेल्फी घेणे मनोविकार नाही. उगाच ओढूनताणून संबध जोडायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 03/07/2016 - 19:15

In reply to दोन्ही. by शलभ

Permalink

+१११

आणि दाखवून दिलं की why so serious असं म्हणायचं. असो. चालायचंच.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 03/07/2016 - 23:15

In reply to १. विद्यमान पंतप्रधानांना by तर्राट जोकर

Permalink

काही सेल्फि

कदाचीत तुमच्या म्हणण्यानुसार हे मनोविकाराचे बळी असावेत... Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Mon, 03/07/2016 - 19:57

In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी

Permalink

मनावर नका घेऊ कॅाग्रेस हा

मनावर नका घेऊ कॅाग्रेस हा शब्द आमच्याकडे शिवी म्हणून पण वापरायला लागलेत लोक आणि तरीसुद्धा सगळे लोकप्रतिनीधी कॅाग्रेस किंवा राकॅाचेच असतातत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/07/2016 - 20:33

In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी

Permalink

इतक्या साध्या प्रतिसादातही

इतक्या साध्या प्रतिसादातही इतकं तुच्छतेने थुंकल्यासारखं 'खांग्रेस' म्हणणं आवश्यक आहे का? मिपाच्या बिल्डिंगीबाहेर उगीच पचाक्कन पिंक टाकल्यासारखं वाटतं. मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही.
(१) खांग्रेस म्हणणे म्हणजे काँग्रेसचा तुच्छ उल्लेख कशावरून? (२) याच संकेतस्थळावर भाजपचा उल्लेख अनेकवेळा "भारतीय जुमला पार्टी", "शेटजी भटजींचा पक्ष" असा उल्लेख झालेला आहे. असे उल्लेख तुच्छ समजावे का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/07/2016 - 20:57

In reply to इतक्या साध्या प्रतिसादातही by श्रीगुरुजी

Permalink

(३) डाव्या पक्षांचा उल्लेख

(३) डाव्या पक्षांचा उल्लेख याच संकेतस्थळावर "वाममार्गी" असा द्व्यर्थी करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही उल्लेख भ्रष्टवादी काँग्रेस असा झालेला आहे. याबद्दल आपले काय मत आहे? भाजप, डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस इ. चा उल्लेख वर लिहिल्याप्रमाणे केल्यावर आजतगायत कोणीही (तुम्ही सुद्धा), काहीही आणि कधीही आक्षेप घेतलेला नाही. मग आजच खांग्रेस हा उल्लेख का खटकला?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 03/07/2016 - 21:05

In reply to इतक्या साध्या प्रतिसादातही by श्रीगुरुजी

Permalink

भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख

भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख एका अर्थाने टिप्पणी आणि एका अर्थाने टीकानिदर्शकच आहे. पण तो इतक्या सहज येताना दिसत नाही मिपावर. असो. मी तुम्हाला सांगून बघितलं. तुम्हाला चूक स्वीकारायची नसेलच तर मी काय बापडा करणार? चालू द्यात तुमचं. कोणाला नाकात बोटं घालू नकोस रे प्लीज. असं म्हटल्यावर त्याने जर नाक वर करून म्हटलं, 'यात काय घाण आहे?' किंवा 'तो घालतो ते' तर आपण काय बोलणार?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/07/2016 - 21:14

In reply to भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख by राजेश घासकडवी

Permalink

मला वाटलंच असंच उत्तर येणार

मला वाटलंच असंच उत्तर येणार म्हणून. खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा यावर काहीही भाष्य न करता, खांग्रेस असा उल्लेख करणे ही माझी चूक झालेली आहे असा निर्णय घेऊन मोकळे पण झालात! आणि नाकात बोट घालण्याबद्दल म्हणायचं तर, तुम्ही ज्याला नाकात बोट घालणे असे समजत आहात, अगदी तशीच भूतकाळातील ३ उदाहरणे दिली. तेव्हाही आणि आताही तुम्हाला त्यात वावगे वाटले नाही. पण 'खांग्रेस' असा उल्लेख वाचल्यावर मात्र लगेच त्याची तुलना नाकात बोट घालण्याशी केलीत. चालायचंच. सिलेक्टिव्ह ओपिनिअन हे व्यवच्छेदक लक्षण असल्यावर दुसरं काय होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/08/2016 - 06:10

In reply to मला वाटलंच असंच उत्तर येणार by श्रीगुरुजी

Permalink

खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा

खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा यावर काहीही भाष्य न करता, खांग्रेस असा उल्लेख करणे ही माझी चूक झालेली आहे असा निर्णय घेऊन मोकळे पण झालात!
'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल. माझा मुद्दा असा आहे की जिथे सर्वसामान्य नामाचा वापर अपेक्षित असतो तिथेही असले तिरकस उल्लेख करण्याची प्रवृत्ती चर्चेची पातळी खाली नेणारी आहे. संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल, पण मिपासारख्या फोरमवर ती रूढ आहे असं समजून तो शब्द सतत वापरणं योग्य नाही. इतकंच. तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 15:17

In reply to खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा by राजेश घासकडवी

Permalink

'खान-्ग्रेस म्हणजे

'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल. माझा मुद्दा असा आहे की जिथे सर्वसामान्य नामाचा वापर अपेक्षित असतो तिथेही असले तिरकस उल्लेख करण्याची प्रवृत्ती चर्चेची पातळी खाली नेणारी आहे.
तिरकस उल्लेख फक्त खांग्रेसचा होत नाही, इतरही पक्षांचाही असा उल्लेख अनेकवेळा झालेला आहे. आजतगायत त्यावर कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता. तुम्हीही आजतगायत इतर कोणत्याही पक्षांचा असा तिरकस उल्लेख पाहून आक्षेप घेतलेला नव्हता. काल मात्र खांग्रेस असा उल्लेख वाचून तुमचं पित्त खवळलं. तुम्ही कदाचित सर्व पक्षांच्या तिरकस उल्लेखाला आक्षेप घेतला असता तर त्यात काहीतरी अर्थ होता. परंतु फक्त खांग्रेस या उल्लेखाबाबत तुमचा आक्षेप दिसतो. इतर पक्षांबद्दल असे लिहिले तर तुमचा विरोध दिसत नाही. इतर पक्षांबद्दल जेव्हा असा उल्लेख झाला तेव्हा मात्र चर्चेची पातळी खाली गेल्याचा भास तुम्हाला झाला नाही. अर्थात तुमचे खांग्रेसबद्दलचे ममत्व आणि भाजप/संघ/हिंदू संघटना इ. बद्दलचा राग माहित आहे. त्यामुळेच असे सिलेक्टिव्ह आक्षेप येतात.
संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल, पण मिपासारख्या फोरमवर ती रूढ आहे असं समजून तो शब्द सतत वापरणं योग्य नाही. इतकंच.
आता इथे संघ कोठून आला? संघाच्या शिबिरात कधी आणि किती वेळा गेला होतात? तिथली भाषा माहिती आहे का? विषय कोणताही असला तरी त्यात संघाला आणणे हे काही महाभागांना व्यवस्थित जमते. पुण्यात कुमार सप्तर्षी नावाचे एक "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" (म्हणजे नक्की कसे आहेत ते लक्षात आलं असेलच) आहेत. ते अनेकवेळा बर्‍याच मराठी वाहिन्यांच्या चर्चासत्रात असतात. चर्चेसाठी कोणताही विषय असला तरी ते तो विषय नथुराम, संघ आणि गांधीजी या दिशेने नेतातच. इथेही तसेच झालेले दिसतेय. आणि अजून एक. मिपासारख्या फोरमवर काय रूढ आहे आणि काय नाही हे मिपाचे संपादक ठरवतील. आपण ते कष्ट घेऊ नयेत.
तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा.
बापरे! खांग्रेस शब्दावर इतका पराकोटीचा संताप? आणि मला थेट आत्मपरीक्षणाचा सल्ला? खरं तर आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आत्मपरीक्षणाची खरी गरज तुम्हालाच आहे. बादवे, तुम्ही मुद्दा अजिबात स्पष्ट केलेला नाही. "खांग्रेस" या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे याचे तुम्ही अजूनही उत्तर दिलेले नाही (आणि तरीसुद्धा आक्षेप घेणे सुरूच आहे). आणि इतर पक्षांच्या अशाच उल्लेखाबद्दल तुम्ही आजतगायत का मौन पाळले त्याचेही उत्तर नाही. या गोष्टी स्पष्ट न करता असे निघून जाऊ नका. या गोष्टी स्पष्ट करा आणि मग जायचे तिकडे जा.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 03/08/2016 - 18:28

In reply to 'खान-्ग्रेस म्हणजे by श्रीगुरुजी

Permalink

एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे

एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे तुमचंच बरोबर असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 20:23

In reply to एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे by राजेश घासकडवी

Permalink

तुमच्याकडे आता काही मुद्देच

तुमच्याकडे आता काही मुद्देच नसल्याने असा प्रतिसाद येणारच होता. एनीवे, स्पष्टीकरणाची अजूनही वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/08/2016 - 20:56

In reply to तुमच्याकडे आता काही मुद्देच by श्रीगुरुजी

Permalink

तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू

तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू एंटरटेनर आहात मिपावर. पडलो तरी नाक वर. माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 03/08/2016 - 21:05

In reply to तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू by प्रचेतस

Permalink

माझ्यासारखा भाजपाचा कट्टर

माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय. ऑ..?? भक्तांमुळे थेट नेत्यावर आणि विचारधारेशी फाटाफुट?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/08/2016 - 21:17

In reply to माझ्यासारखा भाजपाचा कट्टर by मोदक

Permalink

असे नमुनेदार भक्त असल्यावर

असे नमुनेदार भक्त असल्यावर इतर काय होणार? जसा राजा तशी प्रजा. मी तशा प्रजेचा भाग बनू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 03/08/2016 - 21:49

In reply to असे नमुनेदार भक्त असल्यावर by प्रचेतस

Permalink

अगदी

गुरुजींसारखे लोक पाहिले की च्यायला, यासारख्या लोकांबरोबर आपण गृप होतोय याची लाज वाटते. पण माझं मूळ समर्थन श्रीगुरुजींमुळे नव्हतं हे आठवतं. मग मूग गिळून बसतो. श्रीगुर्जींवरून सगळ्यांबद्दल मत बनवू नये ही इतर लोकांना विनंती. इथेच वेगळ्या धाग्यावर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेवरून शिवाजीबद्दल मत नका बनवू.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 23:01

In reply to अगदी by अनुप ढेरे

Permalink

गुरुजींसारखे लोक पाहिले की

गुरुजींसारखे लोक पाहिले की च्यायला, यासारख्या लोकांबरोबर आपण गृप होतोय याची लाज वाटते. पण माझं मूळ समर्थन श्रीगुरुजींमुळे नव्हतं हे आठवतं. मग मूग गिळून बसतो. श्रीगुर्जींवरून सगळ्यांबद्दल मत बनवू नये ही इतर लोकांना विनंती.
तुम्हाला कशामुळे लाज वाटावी आणि कशाचा अभिमान वाटावा हा तुमचा प्रश्न आहे. माझ्यामुळे तुम्हाला लाज वाटत असली तर असू देत. मला फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 03/09/2016 - 12:20

In reply to असे नमुनेदार भक्त असल्यावर by प्रचेतस

Permalink

मी येथे गुरूजींचे समर्थन करत

मी येथे गुरूजींचे समर्थन करत नाहीये किंबहुना त्यांच्या व कपिलमुनींच्या जुगलबंदीच्यावेळी गुरूजींना बहुतांश वेळा कानपिचक्याही दिल्या आहेत. परंतु, येथे गुरूजींना "कानफाट्या" ठरवले जात आहे हे माझे निरीक्षण आहे. सुरूवात कशी झाली ते बघा. गुरूजींनी नेहमीप्रमाणे "खांग्रेस" असा उल्लेख केला. त्यावर घासकडवींनी तो मुद्दा पकडून असे का होत असावे असे विचारले. तसेच "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" (फेकू, भाजपेयी, नमोरूग्ण, भक्त वगैरे शब्द त्यांच्या चष्म्यातून नेहमीच्या सवयीप्रमाणे गाळले गेले असावेत*) येथे त्यांनी नेहमीप्रमाणे संदिग्ध विधान करत गुरूजींवर टीकास्त्र सोडून सरसकट भाजपविरोधींची पाठराखण केली. नंतर पुढच्या प्रतिसादांमध्ये घासकडवींनी सल्ले देताना पुन्हा "संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल" असे लिहिणे हे अकारण विषयांतरच आहेच. त्यावरही "तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा." असेही लिहिले. (या प्रतिसादामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा ओढून ताणून संबंध जोडून हिंदूंना शिव्या न दिल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले*) येथे व्हिक्टीम गुरूजी असो अथवा कोणीही असो सुरूवातीला (योग्य) आरोप करताना सिलेक्टिव्ह आरोप करायचे आणि त्याने उत्तर दिले की मानभावीपणा करत सल्ले देण्याच्या नावाखाली पुन्हा नवीन नवीन आरोप करत शेवटी त्यांना आरोपी ठरवायचेच्च आणि हे सर्व प्रकार करताना दुसर्‍या (किंवा विरूद्ध) पार्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. त्यावर कोणी काही बोललेच तर "ते तसलेच आहेत मग तुम्ही तसले का होता" अशी समर्थने तयात असतातच. हे समर्थन वरकरणी योग्य वाटेल परंतु एका बाजुने सगळे नियम धाब्यावर बसवून विखारी टीका होत असताना दुसर्‍या बाजुने सर्व नियम पाळावेत व एखादाही शब्द चुकू नये ही अपेक्षा चुकीची वाटते (..आणि गुरूजींसारख्यांकडून अशी अपेक्षा करणे किंवा असे नियम पाळले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.) त्यामुळे या प्रकरणात गुरूजींना संपूर्ण दोष देता येणार नाही. खांग्रेस हा उल्लेख नको होता हे ही मान्य परंतु असे सल्ले देतानाही मूळ अजेंडा राबवला जातोच जातो* ********************************************************** हे झाले या मुद्द्याबद्दल. आता माझे थोडेसे.. भारतात २०१४ साली भाजपाचे सरकार आले. मोदींनी सुरूवातीपासून विविध देशांना भेटी देण्याचा आणि अनेक नवीन नवीन योजनांच्या अंमलबजावणीचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री अपेक्षेपेक्षा चांगले काम करत आहेत आणि ट्वीटर / फेसबुक मुळे त्याचा प्रसारही होत आहे, मात्र "अच्छे दिन" हे निवडणूकीआधीचे अ‍ॅग्रेसीव्ह मार्केटिंग मोदी सरकारवर थोड्याफार प्रमाणावर उलटले आहे हे ही खरे आहे. (याचीही कारणे आहेत त्याबद्दल दुसरीकडे कोठेतरी चर्चा करूया) तर अशा परिस्थितीमध्ये सिलेक्टीव्ह गोष्टींचे भांडवल करून देशामध्ये असहिष्णुता पसरत आहे, अल्पसंख्यांकांची गळचेपी होत आहे, अशा हाकाट्या उठणे, सवंग पत्रकारिता, बिनबुडाचे आरोप होणे वगैरे गोष्टी नियमीतपणे होत आहेत. मोदी सरकारच्या विरोधासाठी पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राची मदत मागणे वगैरे निंद्य गोष्टीही होत आहेतच. मात्र सध्या एकंदर मराठी संस्थळांवरती जे सुरू आहे तेही निंद्यच आहे. नियमीतपणे मोदी सरकार, भाजपा यांच्यावर प्रछन्न आरोप करणारे लेख लिहिले जात आहेत. कोणताही विषय ओढून ताणून मोदी, भाजपावर आणला जात आहे आणि हे करणार्‍यांचा प्रतिवाद केला की मुद्दे मांडणारे पळ काढतात. अशा परिस्थितीमध्ये हा बुद्धीभेद करणारे एखादा विशिष्ट अजेंडा राबवण्यासाठी विशेष करार करत असावेत* ही शंका आल्याशिवायही रहात नाही. ..आणि या सगळ्याला वैतागलेले, न्यूट्रल राहणारे किंवा माझ्यासारखे राजकारणी विषयांपासून लांब रहाणारे लोकही प्रतिसाद देत आहेत कारण हे सो कॉल्ड विचारवंत "प्रतिवाद झाले नाही तर आम्ही जिंकलो, आणि प्रतिवाद झालाच तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" अशी सोयीस्कर दुटप्पी भुमीका निलाजरेपणाने घेत आहेत. मोदी सरकार म्हणजे जणू फॅसीस्ट सरकार अवतरले आहे आणि आता भारताचे काही खरे नाही असे गैरसमज पसरवण्यातही यांचा मोठा सहभाग आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी योग्य मुद्दे मांडून प्रतिवाद केला की "बघा बघा आम्हाला बोलू दिले जात नाही" किंवा "भक्त टोळीने धावून आले" असा कांगावा केला जातो. त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच! ********************************************************************** *ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. कोणी अभ्यासपूर्वक लेख लिहून चुका दाखवल्यास मी त्या निरीक्षणांवर विचार करण्यास तयार आहे.** **असे लिहिणे म्हणजेच "मी पुराव्याशिवाय आरोप करतो, तुम्ही निर्दोष असाल तर पुरावे देवून सिद्ध करा" हे ही बुद्धीभेदाचे आणखी एक लक्षण. येथे फक्त उदाहरणादाखल लिहिले आहे. तेही बुद्धिभेदाच्या प्रतिसादमॉडेल नुसार. (या प्रतिसादाचा उद्देश "कसेहीकरून माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणे" हा नाहीये तर मला आकलन झालेली परिस्थिती विषद करणे हा आहे - काही चुकत असल्यास अवश्य प्रतिसादावे)
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Wed, 03/09/2016 - 13:08

In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक

Permalink

+१११११११११ शतप्रतिशत सहमत..:)

+१११११११११ शतप्रतिशत सहमत..:)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/09/2016 - 15:29

In reply to +१११११११११ शतप्रतिशत सहमत..:) by शलभ

Permalink

त्यामुळे केवळ एका आयडीवरून

त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच! हे आपण सर्व आयडी साठी म्हणत आहात का फ़क्त श्रीगुरुजी ह्यांचे सरसकटीकरण होऊ नये असे सुचवता आहात?? (genuniely विचारतोय कृपया गैरसमज करून घेऊ नका ही विनंती) दोन पैसे माझे ही, श्रीगुरुजींचे नाव "कानफाट्या" ठेवले असेलही काही आयडी ने पण ते का ठेवले गेले हे मुळ शोधणे गरजेचे नसेल का?? हा विचार प्लीज एकदा कराल मोदक दादा, बुलेट ट्रेन सुटल्यागत गुरूजी एकच बाजुने बोलतात , नाही राजकीय निष्ठां असावी जरूर अन त्यांनी ती ठेवली म्हणून त्यांचा राग करायचे कारण नाही किंवा त्यांचे सरसकटीकरण सुद्धा होऊ नये हा मुद्दा मान्य, पण मुळात वेगळेच होते. ते एखादा मुद्दा मांडतात अन तोच यूनिवर्सल सत्य असल्यासारखे खिंड लढवत बसतात. उदाहरण द्यायचे झालेच तर अगदी काल मी डॉक्टर खरे ह्यांच्याशी एका मुद्द्यावर बोलत होतो, दोघांनी आपापली बाजु मांडली अन एकमत होऊ शकत नाही हे जाणल्यावर "बघा विचार करा काही उणे अधिक बोललो असलो तर क्षमा करा" म्हणून रजा घेतली. खरे सांगतो डॉक्टरांबद्दल अगोदरच असलेला टन भर आदर 10 हजार टन झाला देवा. असो, तर त्या मुद्द्यात् मी "एका वर्षांनंतर" ह्या धाग्यात सोन्याबापु नामक आयडी ने दिलेली तुरीच्या डाळी संबंधी माहीती वाचा असा सल्ला डॉक्टरांना दिला होता, तेच उदाहरण इथेही लागु होते आहे, त्या धाग्यावर "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा गुरुजींनी चकार शब्दाने सुद्धा आपला मुद्दा करेक्ट करण्याबद्दल बोलले नाहीत, उलटपक्षी , जमाखोरी करणारे व्यापारीच कसे "चतुर" आहेत ही चक्क सारवासारव केली, ह्यातून काय दिसते?? तर आपली बाजु जर कोणी तांत्रिक अन शास्त्रशुद्ध रीतीने खोडली (वैयक्तिक ण होता) तरीही आपण लिहिलेले तेच ब्रह्मवाक्य ही वृत्ती दिसते, दूसरे उदाहरण सुद्धा त्याच धाग्यात सापड़ते जिथे मार्मिक गोडसे ह्या आयडी ने तेल उद्योग वगैरे वर उत्तम प्रतिसाद दिले होते (गोडसे मोदी/भाजप विरोधी आहेत का हे मला माहीती नाही पण मला वाचताना त्यांचा तर्क पटला होता) त्याला सुद्धा शेवटपर्यंत गोलगोल उत्तरे दिली गेली. कपिलमुनी वाला एपिसोड आपण स्वतः उल्लेखला आहे तरीही आपणाला त्याचे डिटेल्स माहीती आहेत म्हणून मी त्याची लांबड लावणे टाळतो इथे. ढेरे अन प्रचेतस ह्यांची वकिली करायचे मला कारण नाही अजिबात आपली बाजु मांडायला त्यांचे ते किंवा श्रीगुरुजी सुद्धा समर्थ आहेतच, फ़क्त तुमच्या डिटेल प्रतिसादात एक समतोल सकारात्मकता दिसली म्हणून बोलु धजावलो, गुरुजींचे सरसकटीकरण होते हे मान्य, ते गुरुजींचेच काय कुठल्याही आयडीचे होऊ नये हे तर 10000 वेळा मान्य करतो मी. पण जर ते त्यांचेच कर्मफल असेल (फ़क्त गुरुजीच् नाही तर इतरही काही आयडी) अन त्यांना जाणतेपणी कोर्टात म्हणतात तसे पुरे होशोहवास में ते चालत असेल हवे असेल तर त्याचा प्रतिवाद करणे किंवा ते झेलणे हे ही त्यांचेच प्राक्तन होय , त्यात तुम्ही आम्ही किंवा इतर कोणी काही करू शकणार नाही असे वाटते. शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो. अन माझे अप्रस्तुत 4 चे 400 झालेले शब्द संपवतो विनंती विशेष :- आता माझे सरसकटीकरण होणार नाही अशी अपेक्षा अन प्रार्थना करतोय :D
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 03/09/2016 - 15:57

In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच

Permalink

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा थोडा गैरसमज झाला आहे (बहुदा मी पुरेसे स्पष्ट लिहिले नाही त्यामुळे.)
त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच!
हे मी प्रचेतस यांच्या "माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय." या वाक्याला उद्देशून लिहिले आहे. गुरूजींचे नांव कानफाट्या पडले आहे किंवा त्यांना तसे ठरवले जाते आणि त्याला ते स्वतः कारणीभूत आहेत हे माझेही मत आहे किंबहुना मिपावरच कोठेतरी "एखाद्या मुद्द्यामध्ये किंवा पक्षाची बाजू घेताना योग्य ठिकाणी थांबायचे मनावर घ्या" असा सल्लाही मी कुठेतरी दिला आहे - आत्ता ती लिंक सापडत नाहीये. (आणि तसे नसल्यास हा सल्ला मनावर घ्या हो गुरूजी) शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो +१११ अशी सकारात्मकता यापूर्वीही अनेक आयडींकडून दिसली आहे आणि गुरूजींना या मुद्द्यावर सुधारणा करणे आवश्यक आहे हे ही खरेच!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 03/09/2016 - 19:03

In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा by मोदक

Permalink

+१००

एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो
भक्त आणि समर्थक यांत हाच तो फरक ! एका क्ष आयडी सोबत बराच काळ डोक फोडल्या वर मला कळाला , की यांच्यामागे बाँब फुटला तरी हे मी नाही पाहिला त्यामुळे फुटलाच नाही अशी भूमिका घेतात. त्यामुळे तिथे थांबलो . संवाद किंवा चर्चेमधून विचारांची देवाण घेवाण अपेक्षित असते. समोरच्याचा तर्कशुद्ध बोलण मान्य करणे हे विवेकबुद्धी शाबूत असण्याचा लक्षण आहे. हा चिखल फक्त "दोन्ही" बाजूकडून रेटून बोला यामुळे झाला आहे. हे त्या टीव्हीवरच्या वांझोट्या चर्चेसारखा झालाय. त्यामुळे समोरचा समजूनच घेत नाही तर व्यर्थ चर्चेचा उपयोग नाही. बाकी अशा चर्चा काही प्रमाणात ठीक पण सध्या मिपा उघडला की तेवढच दिसता . सध्या राजकीय व्यासपीठ झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 03/10/2016 - 00:10

In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच

Permalink

कपिलमुनी वाला एपिसोड

बेक्कार हसलो राव !!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/10/2016 - 19:11

In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच

Permalink

असो, तर त्या मुद्द्यात् मी

असो, तर त्या मुद्द्यात् मी "एका वर्षांनंतर" ह्या धाग्यात सोन्याबापु नामक आयडी ने दिलेली तुरीच्या डाळी संबंधी माहीती वाचा असा सल्ला डॉक्टरांना दिला होता, तेच उदाहरण इथेही लागु होते आहे, त्या धाग्यावर "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा गुरुजींनी चकार शब्दाने सुद्धा आपला मुद्दा करेक्ट करण्याबद्दल बोलले नाहीत, उलटपक्षी , जमाखोरी करणारे व्यापारीच कसे "चतुर" आहेत ही चक्क सारवासारव केली, ह्यातून काय दिसते?? तर आपली बाजु जर कोणी तांत्रिक अन शास्त्रशुद्ध रीतीने खोडली (वैयक्तिक ण होता) तरीही आपण लिहिलेले तेच ब्रह्मवाक्य ही वृत्ती दिसते,
बापरे! "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" हे केव्हा सिद्ध झाले? गेली २-३ वर्षे खूप कमी पडलेला पाऊस आणि त्यामुळे कमी झालेले डाळींचे उत्पादन यांचा डाळीचे भाव वाढण्यामागे काहीच संबंध नव्हता का? त्या धाग्यावर मी अनेक प्रतिसादातून सविस्तर उत्तरे दिली होती. अर्थात डाळीच्या भाववाढीमागे निसर्गनिर्मित कारणे नसून फक्त मानवनिर्मित कारणे आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
दूसरे उदाहरण सुद्धा त्याच धाग्यात सापड़ते जिथे मार्मिक गोडसे ह्या आयडी ने तेल उद्योग वगैरे वर उत्तम प्रतिसाद दिले होते (गोडसे मोदी/भाजप विरोधी आहेत का हे मला माहीती नाही पण मला वाचताना त्यांचा तर्क पटला होता) त्याला सुद्धा शेवटपर्यंत गोलगोल उत्तरे दिली गेली. कपिलमुनी वाला एपिसोड आपण स्वतः उल्लेखला आहे तरीही आपणाला त्याचे डिटेल्स माहीती आहेत म्हणून मी त्याची लांबड लावणे टाळतो इथे.
मी काय गोलगोल उत्तरे दिली? गोलगोल उदाहरणांची उदाहरणे देता का? जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक सविस्तर प्रतिसादातून अनेक संदर्भ व आकडेवारी दिलेली आहे. हे सर्व गोलगोल वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. बादवे, मी प्रतिसाद देताना प्रतिसादात जिथेजिथे शक्य आहे तिथे संदर्भ, आकडेवारी व लिंक्स द्यायचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 03/12/2016 - 15:07

In reply to असो, तर त्या मुद्द्यात् मी by श्रीगुरुजी

Permalink

जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक

जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक सविस्तर प्रतिसादातून अनेक संदर्भ व आकडेवारी दिलेली आहे. हे सर्व गोलगोल वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
अजिबात गोलगोल वाटत नाही, उलट तुम्ही दिलेली ही आकडेवारी सरकार पेट्रोलियम उत्पादनांवर अनुदान देते हा तुमचा दावा फोल ठरवतेय. अनुदान देतेय,परंतू ते 'निगेटिव्ह' प्रकारात मोडते. तुम्हीच दिलेले उदाहरण बघू. Following is an example of diesel price build up in Delhi. Import Crude basket price : Rs 42.67/Lit Refinery Gate Price : Rs 43.73/Lit OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान) Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit Dealer commision : Rs 1.09 Following is an example of diesel price build up in Delhi. Import Crude basket price : Rs 42.67/Lit Refinery Gate Price : Rs 43.73/Lit OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान) Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit Dealer commision : Rs 1.09 Add TAXES : Rs 9.40/Lit FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit इथे सरळसरळ पेट्रोलवर दिलेले अनुदान हे पेट्रोलवर लावलेल्या करापेक्षा अधिक आहे, ह्यालाच निगेटिव्ह अनुदान म्हणतात. त्या धाग्यावर बापूसाहेबांच्या विनंतीला मान देवून ह्या विषयावर चर्चा मी तेथेच थांबवली होती. इथे विषय निघाला म्हणून खुलासा केला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 03/12/2016 - 16:56

In reply to जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक by मार्मिक गोडसे

Permalink

मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर

मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर प्रतिसाद देऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती दिली होती. वर चोप्य केलेला भाग एका सविस्तर प्रतिसादाचा मधलाच थोडासा भाग आहे. पूर्ण प्रतिसाद खूप मोठा आहे. त्या मोठ्या प्रतिसादाच्या आधी आणि नंतरही अनेक प्रतिसाद दिले आहेत. ते सर्व वाचले तर जास्त स्पष्ट होईल. एनीवे, सर्वच प्रतिसाद तुम्हाला गोलगोल वाटत असतील तर माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 03/12/2016 - 17:11

In reply to मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर by श्रीगुरुजी

Permalink

अजिबात गोलगोल वाटत नाही,

अजिबात गोलगोल वाटत नाही,
हे तुम्ही वाचले नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 03/12/2016 - 17:33

In reply to अजिबात गोलगोल वाटत नाही, by मार्मिक गोडसे

Permalink

ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे

ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे हा शब्द नानासाहेबांचा होता, तुमचा नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 03/12/2016 - 17:42

In reply to ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे by श्रीगुरुजी

Permalink

ओ गुरूजी.. नवीन मुद्द्यांकडे

ओ गुरूजी.. नवीन मुद्द्यांकडे वळा प्लीज. एखादा नवीन लेख लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/09/2016 - 16:08

In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक

Permalink

तुझे म्हणणे पूर्णतया मान्य.

तुझे म्हणणे पूर्णतया मान्य. मला राजकीय चर्चांत अजिबात रस नसतो आणि राजकारणाबद्दल माझे ज्ञान पण अगाध आहे हे तुलाही माहीतच आहे पण हा जो सरळसरळ गदारोळ चाललाय तो कुठेतरी थांबावा असे मनापासून वाटते. मिपा म्हणजे जणू राजकीय आखाडाच झालाय. विरोधकांचेही चुकत असेल, नव्हे चुकते आहेच पण त्यांचे तर कामच आहे टीका करुन स्वतःची पोळी भाजून घेणे. पण ह्या सापळ्यात मोदीसमर्थकांनी का अडकावे? बाकी श्रीगुरुजींसारख्या अजेंडावादी (अंध)भक्तांमुळे मी स्वतः भाजपपासून दूर जातोय हे मात्र खरे. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 03/09/2016 - 16:31

In reply to तुझे म्हणणे पूर्णतया मान्य. by प्रचेतस

Permalink

मोदी समर्थकांबाबत माझे असे

मोदी समर्थकांबाबत माझे असे निरीक्षण आहे की, २००२ पासून झालेला अन्याय. पैशाच्या मोहाने विकले गेलेले न्यूज चॅनल, पत्रकार यांनी सतत केलेली अनाठायी टीका वगैरे गोष्टींचा राग असणे साहजिक आहे. २०१४ मध्ये तो राग मतपेटीतून व्यक्त झालाही आहे. काँग्रेसवरचा राग ओसरू नये याची सोय काँग्रेसवालेच करत आहेत. त्यामुळे ती आग विझत नाहीये. एकंदर असे आहे की विरोधक प्रछन्न आरोप करत आहेत आणि मोदीभक्त त्यांच्या पातळीवर उतरून उत्तरे देत आहेत. हे सगळीकडेच सुरू आहे. ..आणि सापळा असला तरी हा सापळा काँग्रेस व डाव्यांनाच नक्की भोवणार आहे. रच्याकने - राजकारणाच्या धाग्यामध्ये मीही उतरत नाही. पण मोदी सरकार मध्ये फॅसीझमची लक्षणे दिसणे, येताजाता हिंदू धर्माला शिव्या देणे, मोदी सरकार काम करत असतानाही कै च्या कै आकडे मांडून सरकारच्या कार्यक्षमतेवर फालतू प्रश्न करून अजेंडा राबवणारे निष्कर्ष काढणे वगैरे प्रकार न पटल्याने मी प्रत्युत्तरे देत आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/09/2016 - 18:56

In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक

Permalink

या प्रतिसादाचा उद्देश

या प्रतिसादाचा उद्देश "कसेहीकरून माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणे" हा नाहीये तर मला आकलन झालेली परिस्थिती विषद करणे हा आहे - काही चुकत असल्यास अवश्य प्रतिसादावे
हा समंजसपणा बाळगल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
(फेकू, भाजपेयी, नमोरूग्ण, भक्त वगैरे शब्द त्यांच्या चष्म्यातून नेहमीच्या सवयीप्रमाणे गाळले गेले असावेत*)
या व्हॉटअबाउट्रीची गरज नव्हती. हे शब्द पक्षाचा साधा उल्लेख करताना नाही, तर मोदीसमर्थकांवर टिप्पणी करताना वापरले जातात. माझा आक्षेप 'टिप्पणी करायची नसतानाही, केवळ कॉंग्रेस वि. भाजपा असा उल्लेख करतानाही शब्दाचं विकृतीकरण करण्याची गरज नव्हती.' इतकाच होता.
या प्रतिसादामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा ओढून ताणून संबंध जोडून हिंदूंना शिव्या न दिल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले*
कानफाट्या ठरवू नये असं सांगताना वरील विधान किती पूर्वग्रहदूषित, कानफाट्या ठरवणारं आहे हे तुमच्या लक्षात आलं का? मी हिंदू धर्माला शिव्या दिल्या आहेत असं किती वेळा झालं आहे? मिपावर मी सव्वाशे लेख लिहिलेले आहेत. ती यादी तपासून पाहा. त्यात काही ठिकाणी अनेकांची टिंगल केलेली आहे. माझ्या पंच्याण्णव टक्के लिखाणात धर्माचा काहीही संंबंध नसतो. तसंच मी बायबलला अनेक वेळा शिव्या घातलेल्या आहेत. असं असूनही मला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणणं चुकीचं आहे. याबद्दल तुमच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 03/10/2016 - 04:13

In reply to या प्रतिसादाचा उद्देश by राजेश घासकडवी

Permalink

मोदी समर्थक जे मिपाकर आहेत

मोदी समर्थक जे मिपाकर आहेत त्यांना वाट्टेल ती विशेषण लावा हरकत नाही हरकत आहे पक्षाला नावे ठेवली तर ती विकृती ठरते. असा प्रकार आहे तर पण पक्ष हा शेवटी कार्यकर्ते नेते व समर्थक ह्या हाडामासाच्या माणसांचा बनला आहे , त्यांच्या शिवाय पक्षाला अस्तित्व नाही त्यांची मुल्ये विचारधारा माणसेच बनवतात व पायदळी सुद्धा माणसेच बनवतात खान्ग्रेज हा उल्लेख जेव्हा पक्षाचा झाला तो ह्या पक्षातील सध्याचे नेतृत्व कार्यकर्ते नेते ह्यांच्या कार्यशैलीवर आघात होता. गुरुजींचा येथे टार्गेट केले गेले. माझे त्यांच्याशी वाजपेयी ह्यांच्या कंदाहर असो किंवा इतर प्रसंगी चुका झाल्या ह्या मुद्यावरून मतभेद झाले होते, पण एरवी एखादा आयडी नेहमी पुरावे संधर्भ देऊन विस्तृत लेख व प्रतिसाद देतो अश्या आयडी ला जाणीवपूर्वक कॉर्नर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 03/11/2016 - 18:44

In reply to या प्रतिसादाचा उद्देश by राजेश घासकडवी

Permalink

दांभीकपणा आणि कांगावा याचे

दांभीकपणा आणि कांगावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद आहे. राजकीय पक्षावर टिप्पणी करताना असो अथवा साधा उल्लेख करताना असो, पक्षनामाचा असा उल्लेख करणे हे चूकच आहे. येथे तुम्ही नुसते निरीक्षण नोंदवले असते किंवा थेट सल्ला दिला असता तरीही ठीक मात्र "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" हे सर्टिफिकेट कोणत्या आधारावर दिले? (येथे एखादा धागा वाचून आणि एक दोन आयडींचे वरवरचे प्रतिसाद वाचून निष्कर्ष काढला असल्यास तसे सांगावे) तुम्हाला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणण्याबद्दल.. "मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले, ते वास्तविकतेला धरून असेलच असे नाही आणि ते सर्वसाधारण निरीक्षणांवर अवलंबून आहे" या प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि स्पष्ट शब्दात तो "उदाहरणार्थ आहे" असेही नोंदवले आहे. अगदी असाच प्रतिसाद तुम्ही इतरत्र दिला आहे. मग हा प्रतिसाद तुमच्या बाबतीत आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया अकारण आक्रस्ताळी आणि विनाकारण आकांडतांडव करणारी का आहे..? तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत काहीही अभ्यास न करता व्यक्त होणार आणि कैच्याकै निष्कर्ष काढणार, पण आणखी कोणीतरी त्याच प्रकारे व्यक्त होत एखादी शक्यता वर्तवली तर तुम्ही थेट दिलगिरीची अपेक्षा करणार हा सोयीस्कर दुटप्पीपणा आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? मी केवळ उदाहरण देण्यासाठी असे पहिल्यांदा केले तर तुमची इतकी टोकाची प्रतिक्रिया आली. मग इतरांच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही तितकेच संवेदनशील असावे ही अपेक्षा अगदीच अवास्तव आहे का? ..आणि दिलगिरी संदर्भातच, "सध्याच्या भारत सरकारच्या कारकिर्दीत फॅसीस्ट सरकारच्या विविध लक्षणांपैकी अनेक लक्षणांची तीव्रता वाढली आहे" हा चुकीचा निष्कर्ष कोणताही अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसताना सार्वजनिकरीत्या व्यक्त करून वाचकांची दिशाभूल करण्याबद्दल तुम्ही सर्व वाचकांची माफी का मागू नये? किंवा "एखाद्या चर्चेची पातळी खाली नेणारी तिरकस भाषा वापरणे ही संघस्वयंसेवकांची सर्वमान्य प्रवृत्ती आहे" या वाक्याबद्दल तुम्ही येथील संघस्वयंसेवकांची माफी का मागू नये? सव्वाशे लेख आहेत. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तुम्हाला आणखी हवी असली तर आणखी शोधून देतो. तुमची चूक झाली असेल तर विनाशर्त दिलगिरी व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 03/11/2016 - 20:01

In reply to दांभीकपणा आणि कांगावा याचे by मोदक

Permalink

माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची

माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची निरीक्षणं या पातळीवरच शेवटी येतंय तर. कशानेच काहीच सिद्ध होत नाही. मी म्हणतो तुमचं चुकीचं आहे, तुम्ही म्हणता माझं चुकीचं आहे. इथेच थांबू. तूतूमैमैवर जाण्याऐवजी दुसऱ्या काहीतरी गमतीदार विषयावर बोलू.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 03/11/2016 - 20:30

In reply to माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची by राजेश घासकडवी

Permalink

इथेच थांबू. सहमत. :)

इथेच थांबू. सहमत. :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com