Skip to main content

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/03/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

वाचने 66086
प्रतिक्रिया 339

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख एका अर्थाने टिप्पणी आणि एका अर्थाने टीकानिदर्शकच आहे. पण तो इतक्या सहज येताना दिसत नाही मिपावर. असो. मी तुम्हाला सांगून बघितलं. तुम्हाला चूक स्वीकारायची नसेलच तर मी काय बापडा करणार? चालू द्यात तुमचं. कोणाला नाकात बोटं घालू नकोस रे प्लीज. असं म्हटल्यावर त्याने जर नाक वर करून म्हटलं, 'यात काय घाण आहे?' किंवा 'तो घालतो ते' तर आपण काय बोलणार?

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटलंच असंच उत्तर येणार म्हणून. खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा यावर काहीही भाष्य न करता, खांग्रेस असा उल्लेख करणे ही माझी चूक झालेली आहे असा निर्णय घेऊन मोकळे पण झालात! आणि नाकात बोट घालण्याबद्दल म्हणायचं तर, तुम्ही ज्याला नाकात बोट घालणे असे समजत आहात, अगदी तशीच भूतकाळातील ३ उदाहरणे दिली. तेव्हाही आणि आताही तुम्हाला त्यात वावगे वाटले नाही. पण 'खांग्रेस' असा उल्लेख वाचल्यावर मात्र लगेच त्याची तुलना नाकात बोट घालण्याशी केलीत. चालायचंच. सिलेक्टिव्ह ओपिनिअन हे व्यवच्छेदक लक्षण असल्यावर दुसरं काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा यावर काहीही भाष्य न करता, खांग्रेस असा उल्लेख करणे ही माझी चूक झालेली आहे असा निर्णय घेऊन मोकळे पण झालात!
'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल. माझा मुद्दा असा आहे की जिथे सर्वसामान्य नामाचा वापर अपेक्षित असतो तिथेही असले तिरकस उल्लेख करण्याची प्रवृत्ती चर्चेची पातळी खाली नेणारी आहे. संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल, पण मिपासारख्या फोरमवर ती रूढ आहे असं समजून तो शब्द सतत वापरणं योग्य नाही. इतकंच. तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा.

In reply to by राजेश घासकडवी

'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल. माझा मुद्दा असा आहे की जिथे सर्वसामान्य नामाचा वापर अपेक्षित असतो तिथेही असले तिरकस उल्लेख करण्याची प्रवृत्ती चर्चेची पातळी खाली नेणारी आहे.
तिरकस उल्लेख फक्त खांग्रेसचा होत नाही, इतरही पक्षांचाही असा उल्लेख अनेकवेळा झालेला आहे. आजतगायत त्यावर कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता. तुम्हीही आजतगायत इतर कोणत्याही पक्षांचा असा तिरकस उल्लेख पाहून आक्षेप घेतलेला नव्हता. काल मात्र खांग्रेस असा उल्लेख वाचून तुमचं पित्त खवळलं. तुम्ही कदाचित सर्व पक्षांच्या तिरकस उल्लेखाला आक्षेप घेतला असता तर त्यात काहीतरी अर्थ होता. परंतु फक्त खांग्रेस या उल्लेखाबाबत तुमचा आक्षेप दिसतो. इतर पक्षांबद्दल असे लिहिले तर तुमचा विरोध दिसत नाही. इतर पक्षांबद्दल जेव्हा असा उल्लेख झाला तेव्हा मात्र चर्चेची पातळी खाली गेल्याचा भास तुम्हाला झाला नाही. अर्थात तुमचे खांग्रेसबद्दलचे ममत्व आणि भाजप/संघ/हिंदू संघटना इ. बद्दलचा राग माहित आहे. त्यामुळेच असे सिलेक्टिव्ह आक्षेप येतात.
संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल, पण मिपासारख्या फोरमवर ती रूढ आहे असं समजून तो शब्द सतत वापरणं योग्य नाही. इतकंच.
आता इथे संघ कोठून आला? संघाच्या शिबिरात कधी आणि किती वेळा गेला होतात? तिथली भाषा माहिती आहे का? विषय कोणताही असला तरी त्यात संघाला आणणे हे काही महाभागांना व्यवस्थित जमते. पुण्यात कुमार सप्तर्षी नावाचे एक "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" (म्हणजे नक्की कसे आहेत ते लक्षात आलं असेलच) आहेत. ते अनेकवेळा बर्‍याच मराठी वाहिन्यांच्या चर्चासत्रात असतात. चर्चेसाठी कोणताही विषय असला तरी ते तो विषय नथुराम, संघ आणि गांधीजी या दिशेने नेतातच. इथेही तसेच झालेले दिसतेय. आणि अजून एक. मिपासारख्या फोरमवर काय रूढ आहे आणि काय नाही हे मिपाचे संपादक ठरवतील. आपण ते कष्ट घेऊ नयेत.
तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा.
बापरे! खांग्रेस शब्दावर इतका पराकोटीचा संताप? आणि मला थेट आत्मपरीक्षणाचा सल्ला? खरं तर आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आत्मपरीक्षणाची खरी गरज तुम्हालाच आहे. बादवे, तुम्ही मुद्दा अजिबात स्पष्ट केलेला नाही. "खांग्रेस" या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे याचे तुम्ही अजूनही उत्तर दिलेले नाही (आणि तरीसुद्धा आक्षेप घेणे सुरूच आहे). आणि इतर पक्षांच्या अशाच उल्लेखाबद्दल तुम्ही आजतगायत का मौन पाळले त्याचेही उत्तर नाही. या गोष्टी स्पष्ट न करता असे निघून जाऊ नका. या गोष्टी स्पष्ट करा आणि मग जायचे तिकडे जा.

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्याकडे आता काही मुद्देच नसल्याने असा प्रतिसाद येणारच होता. एनीवे, स्पष्टीकरणाची अजूनही वाट पहात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू एंटरटेनर आहात मिपावर. पडलो तरी नाक वर. माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.

In reply to by प्रचेतस

माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय. ऑ..?? भक्तांमुळे थेट नेत्यावर आणि विचारधारेशी फाटाफुट?

In reply to by मोदक

असे नमुनेदार भक्त असल्यावर इतर काय होणार? जसा राजा तशी प्रजा. मी तशा प्रजेचा भाग बनू इच्छित नाही.

In reply to by प्रचेतस

गुरुजींसारखे लोक पाहिले की च्यायला, यासारख्या लोकांबरोबर आपण गृप होतोय याची लाज वाटते. पण माझं मूळ समर्थन श्रीगुरुजींमुळे नव्हतं हे आठवतं. मग मूग गिळून बसतो. श्रीगुर्जींवरून सगळ्यांबद्दल मत बनवू नये ही इतर लोकांना विनंती. इथेच वेगळ्या धाग्यावर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेवरून शिवाजीबद्दल मत नका बनवू.

In reply to by अनुप ढेरे

गुरुजींसारखे लोक पाहिले की च्यायला, यासारख्या लोकांबरोबर आपण गृप होतोय याची लाज वाटते. पण माझं मूळ समर्थन श्रीगुरुजींमुळे नव्हतं हे आठवतं. मग मूग गिळून बसतो. श्रीगुर्जींवरून सगळ्यांबद्दल मत बनवू नये ही इतर लोकांना विनंती.
तुम्हाला कशामुळे लाज वाटावी आणि कशाचा अभिमान वाटावा हा तुमचा प्रश्न आहे. माझ्यामुळे तुम्हाला लाज वाटत असली तर असू देत. मला फरक पडत नाही.

In reply to by प्रचेतस

मी येथे गुरूजींचे समर्थन करत नाहीये किंबहुना त्यांच्या व कपिलमुनींच्या जुगलबंदीच्यावेळी गुरूजींना बहुतांश वेळा कानपिचक्याही दिल्या आहेत. परंतु, येथे गुरूजींना "कानफाट्या" ठरवले जात आहे हे माझे निरीक्षण आहे. सुरूवात कशी झाली ते बघा. गुरूजींनी नेहमीप्रमाणे "खांग्रेस" असा उल्लेख केला. त्यावर घासकडवींनी तो मुद्दा पकडून असे का होत असावे असे विचारले. तसेच "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" (फेकू, भाजपेयी, नमोरूग्ण, भक्त वगैरे शब्द त्यांच्या चष्म्यातून नेहमीच्या सवयीप्रमाणे गाळले गेले असावेत*) येथे त्यांनी नेहमीप्रमाणे संदिग्ध विधान करत गुरूजींवर टीकास्त्र सोडून सरसकट भाजपविरोधींची पाठराखण केली. नंतर पुढच्या प्रतिसादांमध्ये घासकडवींनी सल्ले देताना पुन्हा "संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल" असे लिहिणे हे अकारण विषयांतरच आहेच. त्यावरही "तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा." असेही लिहिले. (या प्रतिसादामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा ओढून ताणून संबंध जोडून हिंदूंना शिव्या न दिल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले*) येथे व्हिक्टीम गुरूजी असो अथवा कोणीही असो सुरूवातीला (योग्य) आरोप करताना सिलेक्टिव्ह आरोप करायचे आणि त्याने उत्तर दिले की मानभावीपणा करत सल्ले देण्याच्या नावाखाली पुन्हा नवीन नवीन आरोप करत शेवटी त्यांना आरोपी ठरवायचेच्च आणि हे सर्व प्रकार करताना दुसर्‍या (किंवा विरूद्ध) पार्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. त्यावर कोणी काही बोललेच तर "ते तसलेच आहेत मग तुम्ही तसले का होता" अशी समर्थने तयात असतातच. हे समर्थन वरकरणी योग्य वाटेल परंतु एका बाजुने सगळे नियम धाब्यावर बसवून विखारी टीका होत असताना दुसर्‍या बाजुने सर्व नियम पाळावेत व एखादाही शब्द चुकू नये ही अपेक्षा चुकीची वाटते (..आणि गुरूजींसारख्यांकडून अशी अपेक्षा करणे किंवा असे नियम पाळले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.) त्यामुळे या प्रकरणात गुरूजींना संपूर्ण दोष देता येणार नाही. खांग्रेस हा उल्लेख नको होता हे ही मान्य परंतु असे सल्ले देतानाही मूळ अजेंडा राबवला जातोच जातो* ********************************************************** हे झाले या मुद्द्याबद्दल. आता माझे थोडेसे.. भारतात २०१४ साली भाजपाचे सरकार आले. मोदींनी सुरूवातीपासून विविध देशांना भेटी देण्याचा आणि अनेक नवीन नवीन योजनांच्या अंमलबजावणीचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री अपेक्षेपेक्षा चांगले काम करत आहेत आणि ट्वीटर / फेसबुक मुळे त्याचा प्रसारही होत आहे, मात्र "अच्छे दिन" हे निवडणूकीआधीचे अ‍ॅग्रेसीव्ह मार्केटिंग मोदी सरकारवर थोड्याफार प्रमाणावर उलटले आहे हे ही खरे आहे. (याचीही कारणे आहेत त्याबद्दल दुसरीकडे कोठेतरी चर्चा करूया) तर अशा परिस्थितीमध्ये सिलेक्टीव्ह गोष्टींचे भांडवल करून देशामध्ये असहिष्णुता पसरत आहे, अल्पसंख्यांकांची गळचेपी होत आहे, अशा हाकाट्या उठणे, सवंग पत्रकारिता, बिनबुडाचे आरोप होणे वगैरे गोष्टी नियमीतपणे होत आहेत. मोदी सरकारच्या विरोधासाठी पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राची मदत मागणे वगैरे निंद्य गोष्टीही होत आहेतच. मात्र सध्या एकंदर मराठी संस्थळांवरती जे सुरू आहे तेही निंद्यच आहे. नियमीतपणे मोदी सरकार, भाजपा यांच्यावर प्रछन्न आरोप करणारे लेख लिहिले जात आहेत. कोणताही विषय ओढून ताणून मोदी, भाजपावर आणला जात आहे आणि हे करणार्‍यांचा प्रतिवाद केला की मुद्दे मांडणारे पळ काढतात. अशा परिस्थितीमध्ये हा बुद्धीभेद करणारे एखादा विशिष्ट अजेंडा राबवण्यासाठी विशेष करार करत असावेत* ही शंका आल्याशिवायही रहात नाही. ..आणि या सगळ्याला वैतागलेले, न्यूट्रल राहणारे किंवा माझ्यासारखे राजकारणी विषयांपासून लांब रहाणारे लोकही प्रतिसाद देत आहेत कारण हे सो कॉल्ड विचारवंत "प्रतिवाद झाले नाही तर आम्ही जिंकलो, आणि प्रतिवाद झालाच तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" अशी सोयीस्कर दुटप्पी भुमीका निलाजरेपणाने घेत आहेत. मोदी सरकार म्हणजे जणू फॅसीस्ट सरकार अवतरले आहे आणि आता भारताचे काही खरे नाही असे गैरसमज पसरवण्यातही यांचा मोठा सहभाग आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी योग्य मुद्दे मांडून प्रतिवाद केला की "बघा बघा आम्हाला बोलू दिले जात नाही" किंवा "भक्त टोळीने धावून आले" असा कांगावा केला जातो. त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच! ********************************************************************** *ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. कोणी अभ्यासपूर्वक लेख लिहून चुका दाखवल्यास मी त्या निरीक्षणांवर विचार करण्यास तयार आहे.** **असे लिहिणे म्हणजेच "मी पुराव्याशिवाय आरोप करतो, तुम्ही निर्दोष असाल तर पुरावे देवून सिद्ध करा" हे ही बुद्धीभेदाचे आणखी एक लक्षण. येथे फक्त उदाहरणादाखल लिहिले आहे. तेही बुद्धिभेदाच्या प्रतिसादमॉडेल नुसार. (या प्रतिसादाचा उद्देश "कसेहीकरून माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणे" हा नाहीये तर मला आकलन झालेली परिस्थिती विषद करणे हा आहे - काही चुकत असल्यास अवश्य प्रतिसादावे)

In reply to by शलभ

त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच! हे आपण सर्व आयडी साठी म्हणत आहात का फ़क्त श्रीगुरुजी ह्यांचे सरसकटीकरण होऊ नये असे सुचवता आहात?? (genuniely विचारतोय कृपया गैरसमज करून घेऊ नका ही विनंती) दोन पैसे माझे ही, श्रीगुरुजींचे नाव "कानफाट्या" ठेवले असेलही काही आयडी ने पण ते का ठेवले गेले हे मुळ शोधणे गरजेचे नसेल का?? हा विचार प्लीज एकदा कराल मोदक दादा, बुलेट ट्रेन सुटल्यागत गुरूजी एकच बाजुने बोलतात , नाही राजकीय निष्ठां असावी जरूर अन त्यांनी ती ठेवली म्हणून त्यांचा राग करायचे कारण नाही किंवा त्यांचे सरसकटीकरण सुद्धा होऊ नये हा मुद्दा मान्य, पण मुळात वेगळेच होते. ते एखादा मुद्दा मांडतात अन तोच यूनिवर्सल सत्य असल्यासारखे खिंड लढवत बसतात. उदाहरण द्यायचे झालेच तर अगदी काल मी डॉक्टर खरे ह्यांच्याशी एका मुद्द्यावर बोलत होतो, दोघांनी आपापली बाजु मांडली अन एकमत होऊ शकत नाही हे जाणल्यावर "बघा विचार करा काही उणे अधिक बोललो असलो तर क्षमा करा" म्हणून रजा घेतली. खरे सांगतो डॉक्टरांबद्दल अगोदरच असलेला टन भर आदर 10 हजार टन झाला देवा. असो, तर त्या मुद्द्यात् मी "एका वर्षांनंतर" ह्या धाग्यात सोन्याबापु नामक आयडी ने दिलेली तुरीच्या डाळी संबंधी माहीती वाचा असा सल्ला डॉक्टरांना दिला होता, तेच उदाहरण इथेही लागु होते आहे, त्या धाग्यावर "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा गुरुजींनी चकार शब्दाने सुद्धा आपला मुद्दा करेक्ट करण्याबद्दल बोलले नाहीत, उलटपक्षी , जमाखोरी करणारे व्यापारीच कसे "चतुर" आहेत ही चक्क सारवासारव केली, ह्यातून काय दिसते?? तर आपली बाजु जर कोणी तांत्रिक अन शास्त्रशुद्ध रीतीने खोडली (वैयक्तिक ण होता) तरीही आपण लिहिलेले तेच ब्रह्मवाक्य ही वृत्ती दिसते, दूसरे उदाहरण सुद्धा त्याच धाग्यात सापड़ते जिथे मार्मिक गोडसे ह्या आयडी ने तेल उद्योग वगैरे वर उत्तम प्रतिसाद दिले होते (गोडसे मोदी/भाजप विरोधी आहेत का हे मला माहीती नाही पण मला वाचताना त्यांचा तर्क पटला होता) त्याला सुद्धा शेवटपर्यंत गोलगोल उत्तरे दिली गेली. कपिलमुनी वाला एपिसोड आपण स्वतः उल्लेखला आहे तरीही आपणाला त्याचे डिटेल्स माहीती आहेत म्हणून मी त्याची लांबड लावणे टाळतो इथे. ढेरे अन प्रचेतस ह्यांची वकिली करायचे मला कारण नाही अजिबात आपली बाजु मांडायला त्यांचे ते किंवा श्रीगुरुजी सुद्धा समर्थ आहेतच, फ़क्त तुमच्या डिटेल प्रतिसादात एक समतोल सकारात्मकता दिसली म्हणून बोलु धजावलो, गुरुजींचे सरसकटीकरण होते हे मान्य, ते गुरुजींचेच काय कुठल्याही आयडीचे होऊ नये हे तर 10000 वेळा मान्य करतो मी. पण जर ते त्यांचेच कर्मफल असेल (फ़क्त गुरुजीच् नाही तर इतरही काही आयडी) अन त्यांना जाणतेपणी कोर्टात म्हणतात तसे पुरे होशोहवास में ते चालत असेल हवे असेल तर त्याचा प्रतिवाद करणे किंवा ते झेलणे हे ही त्यांचेच प्राक्तन होय , त्यात तुम्ही आम्ही किंवा इतर कोणी काही करू शकणार नाही असे वाटते. शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो. अन माझे अप्रस्तुत 4 चे 400 झालेले शब्द संपवतो विनंती विशेष :- आता माझे सरसकटीकरण होणार नाही अशी अपेक्षा अन प्रार्थना करतोय :D

In reply to by नाना स्कॉच

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा थोडा गैरसमज झाला आहे (बहुदा मी पुरेसे स्पष्ट लिहिले नाही त्यामुळे.)
त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच!
हे मी प्रचेतस यांच्या "माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय." या वाक्याला उद्देशून लिहिले आहे. गुरूजींचे नांव कानफाट्या पडले आहे किंवा त्यांना तसे ठरवले जाते आणि त्याला ते स्वतः कारणीभूत आहेत हे माझेही मत आहे किंबहुना मिपावरच कोठेतरी "एखाद्या मुद्द्यामध्ये किंवा पक्षाची बाजू घेताना योग्य ठिकाणी थांबायचे मनावर घ्या" असा सल्लाही मी कुठेतरी दिला आहे - आत्ता ती लिंक सापडत नाहीये. (आणि तसे नसल्यास हा सल्ला मनावर घ्या हो गुरूजी) शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो +१११ अशी सकारात्मकता यापूर्वीही अनेक आयडींकडून दिसली आहे आणि गुरूजींना या मुद्द्यावर सुधारणा करणे आवश्यक आहे हे ही खरेच!

In reply to by मोदक

एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो
भक्त आणि समर्थक यांत हाच तो फरक ! एका क्ष आयडी सोबत बराच काळ डोक फोडल्या वर मला कळाला , की यांच्यामागे बाँब फुटला तरी हे मी नाही पाहिला त्यामुळे फुटलाच नाही अशी भूमिका घेतात. त्यामुळे तिथे थांबलो . संवाद किंवा चर्चेमधून विचारांची देवाण घेवाण अपेक्षित असते. समोरच्याचा तर्कशुद्ध बोलण मान्य करणे हे विवेकबुद्धी शाबूत असण्याचा लक्षण आहे. हा चिखल फक्त "दोन्ही" बाजूकडून रेटून बोला यामुळे झाला आहे. हे त्या टीव्हीवरच्या वांझोट्या चर्चेसारखा झालाय. त्यामुळे समोरचा समजूनच घेत नाही तर व्यर्थ चर्चेचा उपयोग नाही. बाकी अशा चर्चा काही प्रमाणात ठीक पण सध्या मिपा उघडला की तेवढच दिसता . सध्या राजकीय व्यासपीठ झालाय.

In reply to by नाना स्कॉच

असो, तर त्या मुद्द्यात् मी "एका वर्षांनंतर" ह्या धाग्यात सोन्याबापु नामक आयडी ने दिलेली तुरीच्या डाळी संबंधी माहीती वाचा असा सल्ला डॉक्टरांना दिला होता, तेच उदाहरण इथेही लागु होते आहे, त्या धाग्यावर "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा गुरुजींनी चकार शब्दाने सुद्धा आपला मुद्दा करेक्ट करण्याबद्दल बोलले नाहीत, उलटपक्षी , जमाखोरी करणारे व्यापारीच कसे "चतुर" आहेत ही चक्क सारवासारव केली, ह्यातून काय दिसते?? तर आपली बाजु जर कोणी तांत्रिक अन शास्त्रशुद्ध रीतीने खोडली (वैयक्तिक ण होता) तरीही आपण लिहिलेले तेच ब्रह्मवाक्य ही वृत्ती दिसते,
बापरे! "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" हे केव्हा सिद्ध झाले? गेली २-३ वर्षे खूप कमी पडलेला पाऊस आणि त्यामुळे कमी झालेले डाळींचे उत्पादन यांचा डाळीचे भाव वाढण्यामागे काहीच संबंध नव्हता का? त्या धाग्यावर मी अनेक प्रतिसादातून सविस्तर उत्तरे दिली होती. अर्थात डाळीच्या भाववाढीमागे निसर्गनिर्मित कारणे नसून फक्त मानवनिर्मित कारणे आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
दूसरे उदाहरण सुद्धा त्याच धाग्यात सापड़ते जिथे मार्मिक गोडसे ह्या आयडी ने तेल उद्योग वगैरे वर उत्तम प्रतिसाद दिले होते (गोडसे मोदी/भाजप विरोधी आहेत का हे मला माहीती नाही पण मला वाचताना त्यांचा तर्क पटला होता) त्याला सुद्धा शेवटपर्यंत गोलगोल उत्तरे दिली गेली. कपिलमुनी वाला एपिसोड आपण स्वतः उल्लेखला आहे तरीही आपणाला त्याचे डिटेल्स माहीती आहेत म्हणून मी त्याची लांबड लावणे टाळतो इथे.
मी काय गोलगोल उत्तरे दिली? गोलगोल उदाहरणांची उदाहरणे देता का? जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक सविस्तर प्रतिसादातून अनेक संदर्भ व आकडेवारी दिलेली आहे. हे सर्व गोलगोल वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. बादवे, मी प्रतिसाद देताना प्रतिसादात जिथेजिथे शक्य आहे तिथे संदर्भ, आकडेवारी व लिंक्स द्यायचा प्रयत्न करतो.

In reply to by श्रीगुरुजी

जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक सविस्तर प्रतिसादातून अनेक संदर्भ व आकडेवारी दिलेली आहे. हे सर्व गोलगोल वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
अजिबात गोलगोल वाटत नाही, उलट तुम्ही दिलेली ही आकडेवारी सरकार पेट्रोलियम उत्पादनांवर अनुदान देते हा तुमचा दावा फोल ठरवतेय. अनुदान देतेय,परंतू ते 'निगेटिव्ह' प्रकारात मोडते. तुम्हीच दिलेले उदाहरण बघू. Following is an example of diesel price build up in Delhi. Import Crude basket price : Rs 42.67/Lit Refinery Gate Price : Rs 43.73/Lit OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान) Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit Dealer commision : Rs 1.09 Following is an example of diesel price build up in Delhi. Import Crude basket price : Rs 42.67/Lit Refinery Gate Price : Rs 43.73/Lit OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान) Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit Dealer commision : Rs 1.09 Add TAXES : Rs 9.40/Lit FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit इथे सरळसरळ पेट्रोलवर दिलेले अनुदान हे पेट्रोलवर लावलेल्या करापेक्षा अधिक आहे, ह्यालाच निगेटिव्ह अनुदान म्हणतात. त्या धाग्यावर बापूसाहेबांच्या विनंतीला मान देवून ह्या विषयावर चर्चा मी तेथेच थांबवली होती. इथे विषय निघाला म्हणून खुलासा केला.

In reply to by मार्मिक गोडसे

मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर प्रतिसाद देऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती दिली होती. वर चोप्य केलेला भाग एका सविस्तर प्रतिसादाचा मधलाच थोडासा भाग आहे. पूर्ण प्रतिसाद खूप मोठा आहे. त्या मोठ्या प्रतिसादाच्या आधी आणि नंतरही अनेक प्रतिसाद दिले आहेत. ते सर्व वाचले तर जास्त स्पष्ट होईल. एनीवे, सर्वच प्रतिसाद तुम्हाला गोलगोल वाटत असतील तर माझा नाईलाज आहे.

In reply to by मोदक

तुझे म्हणणे पूर्णतया मान्य. मला राजकीय चर्चांत अजिबात रस नसतो आणि राजकारणाबद्दल माझे ज्ञान पण अगाध आहे हे तुलाही माहीतच आहे पण हा जो सरळसरळ गदारोळ चाललाय तो कुठेतरी थांबावा असे मनापासून वाटते. मिपा म्हणजे जणू राजकीय आखाडाच झालाय. विरोधकांचेही चुकत असेल, नव्हे चुकते आहेच पण त्यांचे तर कामच आहे टीका करुन स्वतःची पोळी भाजून घेणे. पण ह्या सापळ्यात मोदीसमर्थकांनी का अडकावे? बाकी श्रीगुरुजींसारख्या अजेंडावादी (अंध)भक्तांमुळे मी स्वतः भाजपपासून दूर जातोय हे मात्र खरे. इति लेखनसीमा.

In reply to by प्रचेतस

मोदी समर्थकांबाबत माझे असे निरीक्षण आहे की, २००२ पासून झालेला अन्याय. पैशाच्या मोहाने विकले गेलेले न्यूज चॅनल, पत्रकार यांनी सतत केलेली अनाठायी टीका वगैरे गोष्टींचा राग असणे साहजिक आहे. २०१४ मध्ये तो राग मतपेटीतून व्यक्त झालाही आहे. काँग्रेसवरचा राग ओसरू नये याची सोय काँग्रेसवालेच करत आहेत. त्यामुळे ती आग विझत नाहीये. एकंदर असे आहे की विरोधक प्रछन्न आरोप करत आहेत आणि मोदीभक्त त्यांच्या पातळीवर उतरून उत्तरे देत आहेत. हे सगळीकडेच सुरू आहे. ..आणि सापळा असला तरी हा सापळा काँग्रेस व डाव्यांनाच नक्की भोवणार आहे. रच्याकने - राजकारणाच्या धाग्यामध्ये मीही उतरत नाही. पण मोदी सरकार मध्ये फॅसीझमची लक्षणे दिसणे, येताजाता हिंदू धर्माला शिव्या देणे, मोदी सरकार काम करत असतानाही कै च्या कै आकडे मांडून सरकारच्या कार्यक्षमतेवर फालतू प्रश्न करून अजेंडा राबवणारे निष्कर्ष काढणे वगैरे प्रकार न पटल्याने मी प्रत्युत्तरे देत आहे. :)

In reply to by मोदक

या प्रतिसादाचा उद्देश "कसेहीकरून माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणे" हा नाहीये तर मला आकलन झालेली परिस्थिती विषद करणे हा आहे - काही चुकत असल्यास अवश्य प्रतिसादावे
हा समंजसपणा बाळगल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
(फेकू, भाजपेयी, नमोरूग्ण, भक्त वगैरे शब्द त्यांच्या चष्म्यातून नेहमीच्या सवयीप्रमाणे गाळले गेले असावेत*)
या व्हॉटअबाउट्रीची गरज नव्हती. हे शब्द पक्षाचा साधा उल्लेख करताना नाही, तर मोदीसमर्थकांवर टिप्पणी करताना वापरले जातात. माझा आक्षेप 'टिप्पणी करायची नसतानाही, केवळ कॉंग्रेस वि. भाजपा असा उल्लेख करतानाही शब्दाचं विकृतीकरण करण्याची गरज नव्हती.' इतकाच होता.
या प्रतिसादामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा ओढून ताणून संबंध जोडून हिंदूंना शिव्या न दिल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले*
कानफाट्या ठरवू नये असं सांगताना वरील विधान किती पूर्वग्रहदूषित, कानफाट्या ठरवणारं आहे हे तुमच्या लक्षात आलं का? मी हिंदू धर्माला शिव्या दिल्या आहेत असं किती वेळा झालं आहे? मिपावर मी सव्वाशे लेख लिहिलेले आहेत. ती यादी तपासून पाहा. त्यात काही ठिकाणी अनेकांची टिंगल केलेली आहे. माझ्या पंच्याण्णव टक्के लिखाणात धर्माचा काहीही संंबंध नसतो. तसंच मी बायबलला अनेक वेळा शिव्या घातलेल्या आहेत. असं असूनही मला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणणं चुकीचं आहे. याबद्दल तुमच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मोदी समर्थक जे मिपाकर आहेत त्यांना वाट्टेल ती विशेषण लावा हरकत नाही हरकत आहे पक्षाला नावे ठेवली तर ती विकृती ठरते. असा प्रकार आहे तर पण पक्ष हा शेवटी कार्यकर्ते नेते व समर्थक ह्या हाडामासाच्या माणसांचा बनला आहे , त्यांच्या शिवाय पक्षाला अस्तित्व नाही त्यांची मुल्ये विचारधारा माणसेच बनवतात व पायदळी सुद्धा माणसेच बनवतात खान्ग्रेज हा उल्लेख जेव्हा पक्षाचा झाला तो ह्या पक्षातील सध्याचे नेतृत्व कार्यकर्ते नेते ह्यांच्या कार्यशैलीवर आघात होता. गुरुजींचा येथे टार्गेट केले गेले. माझे त्यांच्याशी वाजपेयी ह्यांच्या कंदाहर असो किंवा इतर प्रसंगी चुका झाल्या ह्या मुद्यावरून मतभेद झाले होते, पण एरवी एखादा आयडी नेहमी पुरावे संधर्भ देऊन विस्तृत लेख व प्रतिसाद देतो अश्या आयडी ला जाणीवपूर्वक कॉर्नर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली

In reply to by राजेश घासकडवी

दांभीकपणा आणि कांगावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद आहे. राजकीय पक्षावर टिप्पणी करताना असो अथवा साधा उल्लेख करताना असो, पक्षनामाचा असा उल्लेख करणे हे चूकच आहे. येथे तुम्ही नुसते निरीक्षण नोंदवले असते किंवा थेट सल्ला दिला असता तरीही ठीक मात्र "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" हे सर्टिफिकेट कोणत्या आधारावर दिले? (येथे एखादा धागा वाचून आणि एक दोन आयडींचे वरवरचे प्रतिसाद वाचून निष्कर्ष काढला असल्यास तसे सांगावे) तुम्हाला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणण्याबद्दल.. "मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले, ते वास्तविकतेला धरून असेलच असे नाही आणि ते सर्वसाधारण निरीक्षणांवर अवलंबून आहे" या प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि स्पष्ट शब्दात तो "उदाहरणार्थ आहे" असेही नोंदवले आहे. अगदी असाच प्रतिसाद तुम्ही इतरत्र दिला आहे. मग हा प्रतिसाद तुमच्या बाबतीत आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया अकारण आक्रस्ताळी आणि विनाकारण आकांडतांडव करणारी का आहे..? तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत काहीही अभ्यास न करता व्यक्त होणार आणि कैच्याकै निष्कर्ष काढणार, पण आणखी कोणीतरी त्याच प्रकारे व्यक्त होत एखादी शक्यता वर्तवली तर तुम्ही थेट दिलगिरीची अपेक्षा करणार हा सोयीस्कर दुटप्पीपणा आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? मी केवळ उदाहरण देण्यासाठी असे पहिल्यांदा केले तर तुमची इतकी टोकाची प्रतिक्रिया आली. मग इतरांच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही तितकेच संवेदनशील असावे ही अपेक्षा अगदीच अवास्तव आहे का? ..आणि दिलगिरी संदर्भातच, "सध्याच्या भारत सरकारच्या कारकिर्दीत फॅसीस्ट सरकारच्या विविध लक्षणांपैकी अनेक लक्षणांची तीव्रता वाढली आहे" हा चुकीचा निष्कर्ष कोणताही अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसताना सार्वजनिकरीत्या व्यक्त करून वाचकांची दिशाभूल करण्याबद्दल तुम्ही सर्व वाचकांची माफी का मागू नये? किंवा "एखाद्या चर्चेची पातळी खाली नेणारी तिरकस भाषा वापरणे ही संघस्वयंसेवकांची सर्वमान्य प्रवृत्ती आहे" या वाक्याबद्दल तुम्ही येथील संघस्वयंसेवकांची माफी का मागू नये? सव्वाशे लेख आहेत. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तुम्हाला आणखी हवी असली तर आणखी शोधून देतो. तुमची चूक झाली असेल तर विनाशर्त दिलगिरी व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.

In reply to by मोदक

माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची निरीक्षणं या पातळीवरच शेवटी येतंय तर. कशानेच काहीच सिद्ध होत नाही. मी म्हणतो तुमचं चुकीचं आहे, तुम्ही म्हणता माझं चुकीचं आहे. इथेच थांबू. तूतूमैमैवर जाण्याऐवजी दुसऱ्या काहीतरी गमतीदार विषयावर बोलू.

In reply to by प्रचेतस

तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू एंटरटेनर आहात मिपावर. पडलो तरी नाक वर.
मी पडलो? कमाल आहे. अहो, जे पडलेत तेच काहीही स्पष्टीकरण न देता निघून गेलेत कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. आधी विषय त्यांनी स्वत:हून उकरून काढला. खांग्रेस हा शब्द म्हणे तुच्छतापूर्वक आहे आणि असा शब्द वापरणे म्हणजे नाकात बोट घालण्यासारखं घाण आहे म्हणे. मी २-३ वेळा त्यांना विचारलं की या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे, तर त्यावर उत्तर नाही. उलट मलाच आत्मपरीक्षण करायचा सल्ला दिला. हेही विचारलं की इतर पक्षांचा असा तिरकस उल्लेख झाल्यावर तो का तुम्हाला नाकात बोट घातल्यासारखा वाटला नाही असा दुटप्पीपणा का? त्यावरही उत्तर न देता काढता पाय घेतला. त्यांचे खांग्रेसविषयीचे ममत्व आणि विशेषतः भाजप/मोदी/संघ इ. विषयीचा राग यातून असा दुटप्पीपणा येतो. चालायचंच.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक कसं नाही ते सांगा ना जरा, अता उद्या कोणी तुमच्या आयडीचं विडंबन 'शीगुरुजी' असं केलं तर तुम्हाला ते तुच्छतादर्शक वाटेल का आनंदाने मिरवून घ्यावेसे वाटेल? (व्यक्तिगत घेऊ नका, मी केवळ उदाहरण म्हणून दिलंय) दुसऱ्याने दगड मारला म्हणून तुम्हीही दगडच मारणार का त्यांनी दगड मारू नये म्हणून प्रयत्न करणार? सांगा ना प्लीजच...

In reply to by प्रचेतस

अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक कसं नाही ते सांगा ना जरा,
कमाल आहे. खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक आहे असा जावईशोध घासकडवींनी लावला. तो कसा तुच्छतापूर्वक आहे ते सांगा असे २-३ वेळा विचारल्यावर त्यावर एक अक्षरही उत्तर न देता "आत्मपरीक्षण करा", "संघाच्या शिबिरात अशी भाषा चालत असेल" असे पूर्णपणे विषयांतर करून त्यांनी काढता पाय घेतला. आणि आता हा शब्द कसा तुच्छतापूर्वक आहे हे तसा जावईशोध लावणार्‍यांना न विचारता उलट तुम्ही मलाच विचारत आहात हा शब्द कसा तुच्छतादर्शक नाही हे सांगा. हा जावईशोध घासकडवींचा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
अता उद्या कोणी तुमच्या आयडीचं विडंबन 'शीगुरुजी' असं केलं तर तुम्हाला ते तुच्छतादर्शक वाटेल का आनंदाने मिरवून घ्यावेसे वाटेल? (व्यक्तिगत घेऊ नका, मी केवळ उदाहरण म्हणून दिलंय)
मला काहीही वाटणार नाही.
दुसऱ्याने दगड मारला म्हणून तुम्हीही दगडच मारणार का त्यांनी दगड मारू नये म्हणून प्रयत्न करणार? सांगा ना प्लीजच...
ज्यांना कायम विनाकारण इतरांना दगड मारून पळून जायची सवय असते त्यांना शेवटी दगडानेच उत्तर द्यावे लागते.

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक नसेल तर तुम्ही सरळ सरळ काँग्रेस का लिहित नाही? हे असे लिहिण्यामुळे मेन हिरो नाचत असताना बाजुचा एक्स्ट्रॉ भाव खाऊन गेल्यासारखे होते. तुमचा मुख्य मुद्दा कितीही योग्य असला तरी अशा उल्लेखामुळे तो बाजुला पडतो आहे. (उदा.) आता खांग्रेसची तुमच्या लेखी व्युत्पत्ती (पैसे) खाणारे ते खांग्रेस अशी असली तरी वरती हिंदू-मुसलमान वाद असल्यासारखी मोडतोड केली गेलीच ना? आता तरी प्रचेतस सरांचा मुद्दा लक्षात येतो आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

घासकडवी हे नाव सारखं सारखं येतं आहे म्हणून नाईलाजाने लेखनसीमा आवरती घ्यावी लागलेली आहे.
खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक आहे असा जावईशोध घासकडवींनी लावला. तो कसा तुच्छतापूर्वक आहे ते सांगा असे २-३ वेळा विचारल्यावर त्यावर एक अक्षरही उत्तर न देता "आत्मपरीक्षण करा", "संघाच्या शिबिरात अशी भाषा चालत असेल" असे पूर्णपणे विषयांतर करून त्यांनी काढता पाय घेतला.
हे विधान म्हणजे सिलेक्टिव्ह रीडिंग की दाबून खोटेपणा करणं हे कळत नाही. त्यांना मी ताबडतोब उत्तर दिलं होतं.
'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल.
या वाक्यात मी खांग्रेस किंवा खान्ग्रेस हा शब्द तुच्छेतेने कसा वापरला जातो हे दाखवलं होतं. आता हा वापर तुच्छतेचा नाहीच असंही कोणी म्हणेल. पण मला तो तुच्छतेचा कसा वाटतो हे मी लिहिलेलं होतं.

In reply to by राजेश घासकडवी

काँग्रेस पक्ष विशिष्ट लोकांचे लांगूलचालन करतो हे वारंवार सिद्ध झालेले आहे. बाकी आपण निवडणूक आयोगाचे (काँग्रेस सरकारच्या राजवटीत नेमणूक झाल्याने पक्षनिष्ठ असे) निरीक्षक असावेत व मिपावर कोण काय बोलतंय याबाबत अहवाल तयार करणारे कारकून असावेत अशी शंका निर्माण होते आहे. आपल्याला वाटली तर वाटू दे की. खांग्रेस म्हणायला कुणाला बंदी आहे का?

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवी, तुमची खरोखरच कमाल आहे. तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाला अजूनही उत्तर दिलेले नाही. खांग्रेस हा शब्द का तुच्छतापूर्ण आहे हे तुम्हाला २-३ वेळा विचारले तेव्हा त्याचे कोणतेही सरळ व स्पष्ट उत्तर न देता "खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल." असे स्वत:च ठरवून मोकळे झालात. म्हणजे मला काय म्हणायचे हे मी अजिबात सांगितले नाही तरी ते तुम्हीच स्वतःच्या मनाने ठरविणार, हा अर्थ मी नाकारणार असेही तुम्ही स्वतःच गृहीत धरणार, विचारले नसतानाही शहाजोगपणे दुसर्‍यांना आत्मपरीक्षण करण्याचे सल्ले देणार, विषयाचा दुरूनही संबंध नसताना संघाला विषयात आणून मनातील मळमळ ओकून टाकणार आणि कोणी काही विचारण्याचा आतच लेखनसीमा म्हणून निघून जाणार. वा!

In reply to by राजेश घासकडवी

मिपावर असलेले भाषण्/लेखन स्वातंत्र्य हे मिपाचे एक वैशिष्ठ्य आहे. इथे राजकारण-समाजकारणाच्या बद्दलच्या चर्चेत भाजपा, काँग्रेस, संघ, समाजवाद, आणि अर्थातच कम्युनिस्ट या सर्वांच्या बाजूने लिहीणारे दिसतील.

In reply to by राजेश घासकडवी

अतिवापरामुळे खांग्रेस शब्द युजर डिक्शनरीत साठवला गेला आणि ऑटोकरेक्ट झालं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही :-)

विवेक ठाकूर, >> जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इतकी लांबलचक न्यायीक प्रक्रीया झाली ति विचारांची फाईट नव्हती काय ? काश्मीरमधे निवडणुका, वेगवेगळ्या मंचावर चर्चा, मिडीयाबाजी, संयुक्त राष्ट्राच्या सभांमधले दाखले हे सर्व वैचारीक संघर्षच आहेत ना ?

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर? अफजलनं उघड देशद्रोह केला होता त्यामुळे त्याला झालेली सजा निर्विवादपणे योग्य आहे. तिथे विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचा प्रश्नच येत नाही. माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. प्रिंट मिडीया आणि व्यक्तीची मुलाखत यात कमालीचा फरक आहे. मुलाखतीतून त्या व्यक्तीचं नेमकं म्हणणं सरळ तुमच्यासमोर येतं आणि तुम्ही तुमचं मत बनवू शकता. या हेतूनं मी कन्हैयाच्या मुलाखतीचा धागा दिला होता. कन्हैयानं राजद्रोह म्हणजे देशद्रोह नाही असं म्हटलंय आणि त्या अनुषंगानं सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे. लेखकानं हा धागा काढून बिजेपीच्या मानसिकतेतचंच (सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह) उत्तम प्रदर्शन केलंय. इतक्या उघड गोष्टीवर इथे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याप्रमाणे `चपला घाला' असा तद्दन निर्बुद्ध प्रतिसाद आलायं तो ही बिजेपीच्या `देश सोडा' इतक्याच लायकीचा आहे. पण हे कळायला किमान समज असण्याची गरज आहे. तद्वत, आपल्याकडे काहीही मटेरियल नसलं की इथे `सायकॅट्रीस्ट' हा तितकाच निर्बुद्ध पण आवडीचा प्रतिसाद दिला जातो. त्यातून प्रतिसादक स्वतःची झालेली मानसिक कोंडी दर्शवतोयं आणि ते त्याच्या मनोरूग्णतेचं दर्शक आहे ही त्याच्या आकलनापलिकडची गोष्ट असते. बहुदा असे प्रतिसाद देणारे मनोरुग्ण स्वतःच्या अनुभवातून असा सल्ला देत असावेत. अर्थात, त्यांचे प्रतिसाद पाहिले की त्यांचा वकूब कळतो. अशा प्रतिसादांना उत्तर देण्यात अर्थ नसतो. तरीही असा प्रतिसाद कुणाला पुन्हा आला तर त्याला प्रतिसादकाच्या रूग्ण मानसिकतेची कल्पना यावी म्हणून हा प्रपंच!

In reply to by विवेक ठाकूर

कन्हैयानं राजद्रोह म्हणजे देशद्रोह नाही असं म्हटलंय आणि त्या अनुषंगानं सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे.
लेखकानं हा धागा काढून बिजेपीच्या मानसिकतेतचंच (सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह) उत्तम प्रदर्शन केलंय.
मुळात कन्हैय्याला भाजपला विरोध केला म्हणून अटक झालेली नाहीय्ये. जेएनयु मध्ये अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात जो कार्यक्रम केला व त्यात वेगवेगळ्या २९ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे सर्व माहिती असूनसुद्धा त्याने भाजपला विरोध केला म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न अखंड सुरू आहे. सध्याच्या सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असे कोणीही म्हणत नाही. विनाकारण खोटेनाटे उठवू नका.

In reply to by श्रीगुरुजी

त्यानं देशद्रोह केला किंवा नाही हे न्यायप्रविष्ट आहे पण तो मोदीविरोधी बोलतो म्हणून तुम्ही असला भंपक धागा काढून त्याला अफजलशी इक्वेट केलायं . त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न आता अंगाशी आल्यावर तुम्ही विषय बेअर चार्जेसवर नेतायं .

In reply to by विवेक ठाकूर

परत तेच! मूळच्या प्रतिसादावर तब्बल ७८ तासानंतर प्रतिसाद! आणि तेच तुणतुणं परत. त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न माझ्या अंगाशी आला? किती गोड गैरसमज आहे तुमचा! जरा स्वतः काढलेला धागा आणि या धाग्यावरील स्वतःचे प्रतिसाद व त्यावर इतरांनी दिलेली सडेतोड उत्तरे नीट वाचा. कन्हैय्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न तुमच्याच अंगाशी आला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही किती प्राणपणानं सत्ताधाऱ्यांचा फसलेल्या गाडा एखाद्या नोकरदारानी मालकाची खिदमत करावी तसा रात्रंदिवस ओढतायं ते पाहा . त्यानं त्यांचं तर काही भलं होणार नाही पण तुम्ही एकांगी आहात हे नक्की झालंय त्यामुळे यापुढे तुमचे प्रतिसाद सुद्धा कोण आणि कितपत वाचेल याची शंका आहे

In reply to by विवेक ठाकूर

एकांगी तर तुम्हीच आहात. प्रत्येक धाग्यावर (कन्हैय्याचा उदो उदो करणारा धागा, स्त्रियांच्या ऑर्गॅझमवर तुम्ही उधळलेली मुक्ताफळे आणि त्यावर अनेक स्त्री सभासदांनीच तुमचा घेतलेला सडेतोड समाचार, हा धागा, पूर्वीचे तुमचे केजरीवालांचा उदोउदो करणारे धागे इ.) तुमचा सर्वांनी मनसोक्त समाचार घेतलाय. तरीही तुमचा अट्टाहास कायम आहे. कन्हैय्याचे भूतकाळातील सर्व प्रताप आता सार्वजनिक होत आहेत व अशा विकृत व्यक्तीचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटण्याऐवजी अजूनही हिरीरीने त्याचे समर्थन सुरूच आहे. माझे प्रतिसाद वाचा असे मी तुम्हाला चांदीच्या वाटीत अक्षता घेऊन आमंत्रण दिलेले नाही. वाचायचे का नाहीत हे इतरांनी ठरवावे. त्यांच्या वतीने तुम्ही वकिली करून नका. तुम्हाला वाचायचे नसतील तर नका वाचू. हू केअर्स?

ते जर असे म्हणत असतील तर त्यांना असे विचारावेसे वाटते कि,कसे करणार ते विचारांचा मुकाबला विचाराने??? म्हणजे काही योजना आहे का त्यांच्याकडे ??? त्या योजना उपयोगात आणता येतील काय??

In reply to by मूकवाचक

अरे व्वा... ही घ्या ब्रेकिंग न्युज सनसनीखेज खुलासा..!!! गुजरात २००२ हत्याकांडानंतर वाजपेयींनी मोदींना फटकारले. मोदींनी हात पकडून आणि मान झुकवून माफी मागितली.

विठा.. तुम्हाला कन्हैया (पुर्वी केजरीवाल) प्रांजळ आणि अजुन काय न काय वाटतो तिथेवर ठिक आहे. पण
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!).
इथे अफजल गुरु --> मोदींना विरोध मोदीभक्तासाठी मोदींना विरोध --> देशद्रोह म्हणुन मोदीभक्तासाठी अफजल गुरु --> देशद्रोही ?????? मी कितीदाही हे वाचलं तरी तुम्ही इतका डोक्यावर पडल्यासारखा युक्तिवाद कराल ह्यावर विश्वास बसत नाही. तुम्हीच म्हणताय की अफजल देशद्रोही होताच. काय होतंय काय नक्की तुम्हाला?

In reply to by पिलीयन रायडर

किंवा मग लेखकाचा चष्मा घालून वाचतायं. अफजल आणि कन्हैया ही तुलना गैर आहे हे अनेकदा सांगून झालंय. आणि असली फडतूस विडबनं टाकून कन्हैयाला देशद्रोही ठरवणं चूक आहे इतकाच माझा मुद्दा आहे.

In reply to by विवेक ठाकूर

हो का? मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का? आता हा प्रतिसाद समस्त सदस्यांनी वाचा म्हणजे लेखकाचा धागा काढण्याचा उद्देश कळेल. आणि मी म्हणतोयं ते बरोबर आहे याची प्रचिती मनोरुग्ण आणि निर्बुद्ध चपलावाल्यांना येईल. जो मोदी विरोधी तो देशद्रोही!

In reply to by विवेक ठाकूर

आता हा प्रतिसाद समस्त सदस्यांनी वाचा म्हणजे लेखकाचा धागा काढण्याचा उद्देश कळेल. आणि मी म्हणतोयं ते बरोबर आहे याची प्रचिती मनोरुग्ण आणि निर्बुद्ध चपलावाल्यांना येईल.
धागा काढण्याचा उद्देश संबंधितांना बरोब्बर समजला आही. म्हणून तर असे बिथरल्यासारखे प्रतिसाद येत आहेत.
जो मोदी विरोधी तो देशद्रोही!
गोबेल्सच्या शिकवणु़कीला अनुसरून असत्याचा प्रोपागंडा सुरू आहे.

In reply to by विवेक ठाकूर

आणि मी म्हणतोयं ते बरोबर आहे याची प्रचिती मनोरुग्ण आणि निर्बुद्ध चपलावाल्यांना येईल.
व्यक्तिगत टिकेने मुद्याचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by विवेक ठाकूर

अनुल्लेखाने मारणे /दुर्लक्ष करणे हा प्रकार माहित आहे काय तुम्हाला क्षीरसागर ? तुमच्या दृष्टीने हे विडंबन फडतूस आहे ना ? मग प्रतिवाद का करत बसला आहात ? तुच्या दृष्टीने जे फडतूस बोलणे आहे,अशा बोलण्याचा प्रतिवाद करताना तुम्ही सुद्धा तसेच बोलता आहात हे ध्यानात येत नाही का तुमच्या ? शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार वाटतो हा. धाग्याच्या संदर्भात अवांतर होईल पण आध्यात्माच्या क्षेत्रात पहिली पायरी असते … let it go. तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता. हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ?

In reply to by lakhu risbud

तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता. हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ? लगता है लखुभाई रिसबुड जी नये आये है.

In reply to by विवेक ठाकूर

आम्ही राव गाढ़वच राहिलो. ठाकुर साहेब कधिपासून सांगून राहिले, या धाग्यावर, कान्हा देशद्रोही नाय नाय त्रिवार नाय. आम्ही लेकाचे ऐकतच नाय. कोर्टाने जामिन देताना पण सांगितले की जामिन मिळाला म्हणजे निर्दोष सुटका न्हाय. विवेक ठाकुर म्हणजे रामशास्त्री, त्यांनी निक्काल लावला म्हणजे लावला. ते येडं अनुपम खेर काय बरळुण गेलं टीवीवर, सालं टचिंग होत पण आता काय फायदा, कन्हैया निर्दोष हाय ना.

In reply to by भंकस बाबा

देशात नवीन कायदा झालाय का भंकसबाबा? आजवर आम्ही समजत होतो की गुन्हा सिद्ध होईस्तोवर आरोपीस निर्दोष समजावे असं न्यायाचं तत्त्व आहे. अभी उल्टा हुई गवा का? ऐसा कैसा हुवा च्यामारी?? ee

In reply to by तर्राट जोकर

@ तजो ,कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच! साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता? माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची, हां फ़क्त भगवा रंग आहे म्हणुन त्याची कोणी टिनपाटाने टिंगल करावी काय? अशीच टिंगल निळ्या, पांढऱ्या वा हिरव्या रंगाची झाली असती तर या रंगाच्या समर्थकानी खपवून घेतली असती काय? बाकी या धाग्याला इतके प्रतिसाद बघुन खरच गंमत वाटली. आमच्या विठाना अभिव्यक्तिस्वातंत्र कन्हैयासाठी अभिप्रेत आहे, पण विडंबन करण्याचा दुसर्याचा हक्क् ते त्यांच्या सोयींने डावलत आहेत. आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत. तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे!

In reply to by भंकस बाबा

कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच! >> हौ डू यु नो दॅट? साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता? >> तुम्ही तो रवीशकुमारच्या मुलाखतीत जे बोलला त्यावर विश्वास ठेवत नसाल तर तो तुमचा प्रश्न. तुम्ही विश्वास न ठेवल्याने सत्य बदलत नाही. अर्थात सत्य समोर येईलच असेही नाही. अगदी न्यायालयात सुद्धा. माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची, >> ह्याच्यासाठी त्याला उचलून आत टाकावे, वकिलांनी त्याल मनसोक्त धुवावे, त्याच्यावर देशद्रोह्याची केस चालावी हे तुम्हाला मान्य आहे तर. आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत. >> करिम टुंडा माहित आहे का? आज बाइज्जत बरी केलंय त्याला कोर्टाने. तुम्ही कोर्टाच्या निकालाचा याबाबतीत आदर कराल काय? करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय? मुद्दा आरोप सिद्ध होइस्तोवर आरोपीस निष्पाप मानले पाहिजे ह्या न्यायाच्या तत्त्वाचा आहे. तुम्ही भटकल, अबु बद्दल म्हणताय मी तर साध्वी प्रज्ञा, पुरोहित, समीर गायकवाड ह्यांना न्यायालयाने निकाल देईपर्यंत निष्पापच मानेल. तुम्ही तुमच्या लॉजिकने त्यांना देशद्रोही मानणार का? तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे! >> नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे असे बोलणारे मिपावर दिसले नाहीत अजूनतरी. दिसले तर शिकवेन हो. आधी ज्यांना गरज आहे त्यांना शिकवू कि नको? समतापूर्ण उपदेश असावा.

In reply to by तर्राट जोकर

त जो साहेब दहशतवादी मग तो कोणत्याही रंगाचा असो तो देशद्रोहीच असतो. आज केवळ अब्दुल करीम टुंडा सुटला तो सज्जड पूर्व नाही म्हणून याचे कारण आपली न्यायालाये निष्पक्षपाती आहेत म्हणून. वातानुकुलीत खुर्चीत बसून दहशत वाद्यांबद्दल सहानुभूती दाखवणे सोपे आहे.प्रत्यक्ष एखाद्या दहशतवाद्याला गुन्हा करताना पहिले तरीही त्याच्या विरुद्ध प्रत्यक्ष साक्ष द्यायला कोणीही माणूस जीवाच्या भीतीने पुढे येत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला केवळ परिस्थितीजन्य पुरावा गोळा करण्यात तुमच्या पोलिसांची इतकी उर्जा खर्च होते.शिवाय या दहशतवाद्यांना खटला लढायला आपला शेजारी देश भरपूर पैसे पुरवायला तयार असतोच. त्यातून १९९०-२००० च्या दशकात नक्की माहिती असलेल्या दहशतवाद्याला ठार केले तरीही लष्करातील अधिकार्यांना आज खोट्या चकमकीत मारले म्हणून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची सर्व समान्य माणसाना कल्पना नसते. दहशतवाद्याला पकडले तरीही पूरावा नाही म्हणून तो लगेच जामिनावर सुटतो आणि ताबडतोब लष्करी सैनिकांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. मारले तर खोट्या चकमकीची चौकशी आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा. रवींद्र पाटील नावाचा एक पोलिस केवळ सत्याला चिकटून आपले विधान न बदलल्यामुळे कफल्लक आणि बेवारस अवस्थेत मेला याची आपल्याला जाण आहे का? ती जर असेल तर मला अधिक काही सांगायची गरज नाही आणि ती नसेल तर बोलणेच खुंटले.

In reply to by सुबोध खरे

न्यायालये अशी निष्पक्ष असली तरीही अफझल गुरूची फाशी हि न्यायालयीन हत्या आहे अशा घोषणा जनेवि मध्ये दिल्या जातात आणि त्याला व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशी गोंडस नावे दिली जातात हे संतापजनक आहे.

In reply to by सुबोध खरे

अहो ह्यांची चित भी मेरी और पट भी मेरी अशी वृत्ती आहे,सोडलं नाही तर न्यायालयीन हत्या आणि सोडलं तर बघा आम्ही म्हणत नव्हतो कि निर्दोष आहोत।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ओ साहेब, उगा ताणू नका. मी कधी म्हटलं की अफझलगुरुची फाशी न्यायालयीन हत्या आहे? चितभीमेरी पटभीमेरी चे पेटंट मिपावरचे एक सन्माननीय सदस्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही.

In reply to by तर्राट जोकर

माझा प्रतिसाद हा कन्हैय्या नावाच्या बाहुलीला नाचवणाऱ्या लोकांना उद्देशून होता,म्हणजे खांग्रेसी कम्युनिस्ट वैगरे वैगरे, पण तो तुम्ही अंगावर घेतला 'कन्हैय्या ला सपोर्ट करण्याच्या नादात तुम्ही आता एक से एक अतिरेक्यांच समर्थन करू ऱ्हायले ब्वा। :अब्दुल करीम टूंडा हा तोच ना ज्याने आल्या आल्या दुखणं काढून सरकारी रुग्णालयातून पेस मेकर ची शस्त्रक्रिया केली होती तेही फुकटात.आता काही दिवसात दाऊद येईल त्यालाही इथेच मरायचं आहे तेव्हा तुम्ही त्याचंही असंच समर्थनं करणार का।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुम्ही बंदूक ताणलेली आहे, डोळ्यात शिकारीची नशा आहे, हात ट्रीगर दाबायला शिवशिवतायत. अशावेळेस काहीही हललं तरी हरिण समजून मारायची तुमची तयारी आहे. शिकारीसाठी शुभेच्छा! न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्‍यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्‍यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.