Skip to main content

सोसायटीबाबत तार्किक , कायदेशीर सल्ला हवा --

लेखक मन१ यांनी गुरुवार, 03/03/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात. जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो. एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं. पण अचानक एक इमेल आलाय. "मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा. मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ???? हा इ मेल :- (मला जरा इ मेलचा सूरही खटकला. पण तो अवांतर होइल मुद्दा.) Dear Members, There has been repeated incidents of very serious nature due to Bachelors/Singles/Spinsters occupying flats on rental basis in our society. As such, the managing committee have decided to restrict renting/subletting flats to only families(having max. 4 members) and not to bachelors/singles/spinsters. This is effective from 01April2016. Please follow the guidelines to rent a flat/shop given below; 1. Do not rent or sub-let flats to bachelors/spinsters 2. Flat owners must submit the required documents from tenants and request permission of managing committee before confirming to tenant to move and occupy your flat on rental basis 3. Tenants to carry police NOC, lease agreement & photo , vehicle registration certificate as applicable while moving to flat in Ozone Springs Society 4. Flat owners are responsible for any incident due to tenants not respecting society rules causing nuisance to society’s peaceful and happy living. Please note that: If any clarification or question, the members are requested to present it in Special General Body meeting on 5Mar2016 by permission of Chairperson. हे सगळं कायदेशीर आहे ? ह्याबाबत्तीत कायदा काय म्हणतो ? आणि ह्यात सरावलेले वकील कुणास ठाउक आहेत का ? किम्वा सोसायटीच्या बाय लॉज् चा नेमका कुनाचा अभ्यास/अनुभव आहे का ? . . नम्र विनंती १-- बॅचलर्सनी राहणे चूक्च आहे; ते गोंधळच घाल्तात ; किंवा अजिबात घलत नाहित; वगैरे मुद्दे सध्या इथे नकोत. तुमची जी काही मतं असतील; ती सगळी मान्य आहेत; त्यांचा आदरही आहे. ह्या धाग्याचा उद्देश कायदेशीर मार्ग , उपाय शोधणे हा आहे. बाकी सामाजिक मुद्दे नेहमीच डिबेटेबल असतात; आणि मिपासारख्या जिंदादिल स्थळावर शतकी धागेही निघत राहतात त्यावर. तर विनंती हीच की तो मुद्दा इथे नको. . . नम्र विनंती २-- ह्या प्रकाराचा थेट माझ्याशी संबंध नाहिये. मी सपत्नीक स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो . मी भाडेकरुही नाही आणि अविवाहितही नाही. . . मला एक बातमी सापडली ह्यासंबंधित :- http://www.punemirror.in/pune/cover-story/Housing-societies-must-mingle…

वाचने 23583
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

धन्यवाद चौरासाहेब. त्यालेखात शेवटी बायलॉजसंबंधी असेही म्हटले आहे, की बायलॉज, (दुय्यम उपनिबंधकांनी मान्य केले असले किंवा नसले तरी) हे कधीही कायद्याच्या विरुद्ध असू शकत नाही व बायलॉजपे़क्षा कायदा श्रेष्ठ असतो व असे बायलॉज हे कायद्याच्या विरुद्ध असून,सभासदांना लुटण्याचे एक साधन आहे. हेच मी वरील एका उपप्रतिसादात निवार्‍याच्या संदर्भात लिहिले होते..
भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो.

काही ठिकाणी मुलाचे आई वडिल येतात. भाडेकराराची नोंदणी ही त्यांच्या नावावर होते. त्यानंतर आईवडिल निघून जातात व मुलगा आपल्या मित्रांसह तिथे राहतो. उपद्रवी वर्तन केले तरच प्रश्न निर्माण होतो.

सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद/विधिमंडळ सदस्य यांची तुलना करावीशी वाटते. सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात नंतर कायदे चांगले बनवतात आणि त्याउप्पर भारी पळवाटा शोधतात. बाकी कमिटीवाले म्हणून 'मजा' असते ती वेगळीच.

In reply to by वैभव जाधव

तुलना इथेच थांबत नाही... "सोसायटीच्या निवडणूकीत निवडून आलात ना* ? आता सोसायटीची काय असतील नसतील ती दुखणी कमिटीने काढावी. आम्ही आराम करायला आणि कमिटीवर टीका करायला मोकळे झालो." हे सोसायटी सभासद आणि मतदार जनतेमधले महत्वाचे साम्यही विसरू नका :) * या निवडणूकीतले मतदानाचे प्रमाण संसद/विधिमंडळ निवडणूकीपेक्षा फार वेगळे नसते, हे पण एक अजून साम्य ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कमिटीवर काम करताना अगदी हलकट वृतीच्या सभासदांबरोबर संबन्ध आलेला होता. इतका की घरात अशांती माजू लागली. कित्येक वेळा पदरमोड ही करावी लागते. इतर क्रेडीट को ओप सोसा प्रमाणे इथी फायदा काहीही नाही. किमान सदस्यानी कृतज्ञ असावे ही अपेक्षा देखील फोल ठरते.

In reply to by चौकटराजा

पदरमोड एक गोष्ट झाली. बराच वेळ आणि एनर्जी पण द्यायला लागते. आणि एव्हढं करून कोणी चांगला म्हणणारा माई का लाल / लाली काही सापडत नाही :) मी आमच्या सोसायटीच्या पहिल्या कमिटीत होतो. गेलं वर्ष ऑफिस नंतरचा वेळ फक्त कमिटी एके कमिटी केली. पण पब्लिकला तरीही प्रॉब्लेमंच आहे. तीनदा तर मारामारी पर्यंत वेळ आली - कारण काय तर एका लिफ्ट मधला बल्ब पहाटे ५-५:३० ला बंद झाला, एकदा डीजीची बॅटरी फुगल्यामुळे डीजी बंद पडला, एकदा लिफ्ट हँग झाली. आता हे काय मी केलंय का? मेंटेनंस देतो म्हणजे कमिटीवर उपकार करतोय अश्या थाटात बोलत असतं पब्लिक. सगळ्या गोष्टींची एएमसी आहे आणि रेग्युलर मेंटेनंस ते करतात. एकदा तर लोक मागेच लागले - "सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया". आता साप काय मी पाळले आहेत आणि सोसायटीत आणून सोडतोय का? कुछ करो म्हणजे काय? आणि मेल वर मेल. कोणी भेटला की तोच विषय. वैताग दिला पब्लिकने. आज नवे कार्यकर्ते घेणार आहेत कमिटी. उद्यापासून सुटलो एकदाचा. सगळ्यात भारी तर ते कमिटी सदस्य जे काम काहीच करत नाहीत पण मिटींग मधे सगळ्यात पुढे. लोकांना वाटेल की हेच सगळं करत आहेत काय. एकाच सोसायटीत रहायला असल्यामुळे त्यांची "असलियत" (हिंदी पिच्चरने फॅमस केलेला शब्द :) ) सांगताही येत नाही.

In reply to by नाव आडनाव

"सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया".
मुंगुस पाळो बोलनेका. . बाकी दंगाकाकूधागा काढायला हा एकदम भारी इश्श्यु आहे.

In reply to by एस

मग काय तर. माझ्या डोक्यात आत्तापासूनच उपायांची पुंगी वाजायलीय. डोळ्यासमोर शिरीदेवी, मल्लिकापासून आमरसपुरीपर्यंत सगळ्यांचे हिरवे डोळे दिसायलेत. प्रसांतभैय्या कुछ तो करो. साप का जहर और सोसायटीका कहर ये दंगाधागा लिखोच.

In reply to by अभ्या..

मुंगुस पाळो कितना अवघड हय. मुंगुस पाळो, उसको खाऊ पिऊ घालो, रात के वेळमे सोसायटीमे सोडो. आजारी पड गया तो औषधपाणी करो :) त्यापेक्षा आम्ही थायमेट टाकलं. साप गायब. बाकी साप आणि मुंगसाने "मॅटर सेटल" केला तर? (म्हणजे जीयो और जीने दो) :) बाजूच्या एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड ने टँकर वाल्याबरोबर सेटिंग केलं होतं. गार्डने पाणी कमी भरायचं आणि टँकर वाल्याने त्याला चहा पाण्याचे द्यायचे :) लिहितो भावा. आज कमिटीचं भूत एकदा उतरलं की लिहितो. धिगाणा धागा होइल :)

In reply to by नाव आडनाव

थायमेट ने सापं गेले?? पेस्ट कंट्रोलचे थायमेट ना? नेलकटरने अर्नॉल्ड घाबरला असे वाटले ते. ;) एनी वे. गेले तर जाउदे. तू धागा काढच

In reply to by अभ्या..

बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर घेउन आला आणि एका गार्ड्ने टाकलं. गेले म्हणजे नंतर दिसले नाहीत. आता ते थायमेटने गेले की नाही माहित नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही झालेलं असू शकतं. पण प्राब्ळम सॉल्व्ह्ड :)

In reply to by चौकटराजा

एकंदरीत सर्व कमिटी मेम्बर्स आणि फ्लॅट धारकांचा हा समअनुभव आहे. मी वसईमध्ये ९४ फ्लॅट्सच्या सोसायटीत राहतो. आधिची मॅनेजिंग कमिटी ही अत्यंत कामचुकार होती. घोटाळे केले नसले तरी सोसायटी फंडचा निष्कारण अपव्यय केला. मोठ्या प्रयासाने सोसायटी मेम्बर्सनी ती कमिटी बरखास्त केली. पुन्हा झालेल्या सोसायटीच्या निवडणूकीत बहूमतांनी निवडून आलो आणि सेक्रेटरी पदावर आलो. काही जणांनी सोसायटीला 'अच्छे दिन' आल्याची प्रतिक्रिया दिल्या, पण माझे 'बुरे दिन' चालू झाल्याचा साक्षात्कार व्हायला किमान एक महिनाही लागला नाही. काही कमिटी मेम्बर्सचा 'कुछ तो कर दिखाने" चा उत्साह लवकरच मावळायला लागला. कामं आम्ही बर्‍यापैकी केली जसे की सीसीटीवी, आगप्रतिबंधक उपकरणे, इन्व्हर्टर, सिमेंट, वेल्डींगची कामे वैगेरे. पण त्याची विशेष अशी पावती लोकांकडून कधीही मिळाली नाही. उलट कामाचा व्याप मात्र वाढत राहिला ज्याचा ताप माझ्या कुटुंबियाना होऊ लागला. लोकांच्या मते सेक्रेटरी म्हणजे एक चलता फिरता कस्टमर केअर. वेळीअवेळी द्याव्या लागणार्‍या डाॅक्यूमेंट्स, एनओसी, चेकवर सह्या. कधीही किरकोळ तक्रारी घेऊन उगवणारे शेजारी. मी घरी नसलो तर त्यांच्या तक्रारींची एक्नोलेजमेंट माझ्या घरच्यांकडुन मागणे. जो वेळ कुटुंब, करियरला किंवा घरातली कोळाष्टके काढण्यास दिला पाहिजे तो वेळ सोसायटीची गटारे काढण्यास जाऊ लागला. आपण 'बिन पगारी फुल अधिकारी' झालो आहोत ही भावना मनात बळावयास लागली. सिक्यूरिटी गार्डने चारचौघात आपल्याला सलाम ठोकण्यापलिकडे पदाचा विशेष काही फायदा नाही. इतर ठिकाणी पैशे खाणारे खात असतील पण मी कधी असा प्रकार केला नाही. (प्रामाणिकपणा नाही तर असे पैशे मला पचत नाही हा पुर्वानुभव) अशामध्येच सोसायटीत काही बरे-वाईट झाले तर सरकार कमिटीलाच जबाबदार ठरविते याची बरीचशी उदाहरणे ऐकण्यात आणि पाहण्यात आली. विनाकारण जेलमध्ये जाणे परवडणारे नसल्याने एका शुल्लक कारणावरून राजीनामा देऊन पुर्वीसारखे आझादीचे जीवन जगतोय. ——— येथे विषय भटकविल्याबद्दल धागाकर्त्याची मी माफी मागतो. पण येणार्‍या सोसायटीच्या एजीएममध्ये 'नायजेरीयन नको' चा ठराव आम्ही पास करून घेणार आहोत.

आतापर्यंतच्या माझ्या प्रतिसादावरून मी नक्की सभासदांच्या बाजूचा आहे की कमिटीच्या असा प्रशन पडू शकेल. पण मी कायद्याच्या बाजूचा आहे हे स्पष्ट करतो. कारण सोसायटीची स्थापनाच मुळी एक कायदा अस्तित्वात आहे म्हणून होत असते सबब आपला शेजार्‍याशी संबन्ध प्रथम कायद्याचा आहे मग संस्कृतिचा, माणूसकीचा. आता कायदा बॅचलर बाबत काय म्हणतो ? तर अनेक निकालानंतर असे दिसते की आपला भाडेकरू कोण असावा याचा अधिकार कमेटी पेक्षा पोलिसाना अधिक आहे. त्यानी व्हेरीफिकेशन दिले असेल तर आपण गैरवर्तणूक झाल्यानंतरच बॅचलर ना काढू शकतो. ते सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करूनच.अशी गैरवर्तणूक कायद्यात गैर म्हणून गणली गेलेली असली पाहिजे. उगीच भाडेकरू चेअरमनला रागाने काही म्हणाला तर ती गैरवर्तणूक ठरेलच असे नाही. ड्रग ट्रॅफिक, ह्युमन ट्रेफिक, हे धंदे कुटुम्ब चालविणारा माणूस करीतच नाही असे १०१ टक्के प्रमेय असते का ?

मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे.तुमच्या तालुक्याची जी हौझिंग फेडरेशन आहे ती संपूर्ण मदत करते.आणि २०११/१३ साली आलेल्या बायलॅाजमध्ये पूर्ण नियमावली दिली आहे. # कोणाला भाड्याने देता येत नाही: एखाद्या विरुद्ध फौजदारी खटला असेल तर नोंदणी केलेला करारसुद्धा अवैध ( invalid,nullify ) ठरतो आणि त्याला ताबडतोब जागा खाली करावी लागते.परंतू केवळ अविवाहित असणेवर केवळ अशक्य आहे.पूर्ण दिवाणी खटले कज्जाचा निर्णय आल्याशिवाय नाही.

मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे
जुणी ईमारत पाडून नविन बान्धायची आहे. ते बायलॉज वाचले आहेत. माझ्या माहीतीप्रमाण सोसायटीला बिल्डिंग रिनोवेशनला द्यायचे अधिकार आहेत. कोणी प्रत्यक्श ह्या प्रोसेसमधून गेले असतील तर माहीती पाहीजे आहे. अर्थात माझा प्रश्न ह्या धाग्यावर चालत असेल तर. अन्यथा दूसरा घागा काढतो.

ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण कदाचित येथे लागू होईल. ट्रेनच्या डब्यात खूप गर्दी असते. ट्रेन फलाटावर थांबली असता बाहेरून चढणार्‍यांचा प्रयत्न करणार्‍यांना आतले लोक प्रतिबंध करत असतात. त्यांचा विरोध मोडून काही लोक आत घुसण्यात यशस्वी ठरतात. आता आत आल्यावर ते बाहेरच्यांना मदत करण्याऐवजी आतल्या इतर लोकांप्रमाणे बाहेरच्यांना आत यायला प्रतिबंध करू लागतात. आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.

आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.
कायदा काय सांगतो ह्यावर चर्चा चालू होती. शेजारी कसा असावा ज्याचे खाणे, दिसणे... ई.. मुळे मी खुष होइल ह्यावर नव्हती.