Skip to main content

स्यूडो सेक्यूलर्स अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 25/02/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच. सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही. १. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा. २. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात. ३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा. ४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला. ५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्‍या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्‍यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला. ६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले. ८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली. ९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात. १०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.

वाचने 32188
प्रतिक्रिया 200

प्रतिक्रिया

In reply to by प्रतापराव

पण दोन्हीही पक्षांना घरी पाठवणे हे आगीतून फुफाट्यात पटण्यासारखं असू शकतं कारण अजून तरी तिसरा समर्थ राष्ट्रीय पर्याय आलेला नाही. प्रादेशिक पक्षांच्या हातात देशाची धुरा सोपवणं आत्मघातकी ठरेल.

In reply to by प्रतापराव

प्रतापराव थोड़े गणित चुकता आहात. टक्केवारीचे नव्हे तर उपद्र्वमुल्याचे. मुस्लिम जर 30 % च्या वर असतील तर उपद्रवमूल्य कमालीचे भयंकर असते. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात राहून पहा. रच्याकने, ते फ्रान्सला,ब्रिटनला, जपानला,चीनला,मियांमारला काय भाजपा सांगायला गेले होते. राशियाचे नाव मुद्दामहुन् घेतलेले नाही. त्यांनी ते भोगलेले आहे, बाकीचे वरील देश प्रतिबंधक उपाय योजत आहेत. पण ते कितिसे पुरे पडणार?

In reply to by भंकस बाबा

इतर देशातिल परिस्थितिंची कारणे मला ठाउक नाहित. भारताबाबत मात्र आधि काश्मिर, पंजाब इथल्याच आतंकाच्या बातम्या एकायचो. मात्र बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला. महाराष्ट्र तर सर्वात सेफ राज्य होते. पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.

In reply to by प्रतापराव

पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
+१

In reply to by प्रतापराव

बाबरी मशिदीच्या पतनानंतर धर्मान्ध मुस्लिमानि दंगलीला सुरुवात केली. सुरवातीला इतर धर्मियानी मार खाल्ला. अचानक जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीचे सत्य लोकासमोर आले त्यानंतर हिन्दुनि हत्यार उपसले. आमच्या तथाकथित शांत मुंबईत पाकिस्तान क्रिकेट जिंकल्यावर फटाके फोडले जात. भेंडीबाजार, नागपाड़ा, डोंगरी, बेहरामपाड़ा हे ते विभाग. हिन्दू त्याला उत्तर देत नसत म्हणुन सर्व शांत! 92च्या दंगलीनंतर बाळासाहेबानी आवाज दिला की हे फटाके वाजवणारे देशद्रोही तेव्हा काही प्रमाणात जल्लोष बंद झाला. आजपण पाकिस्तानच्या मैचेस येथील काही भागात आवडिने बघितल्या जातात. तुम्ही पुण्यातल्या सदाशिव पेठेत रहाता काय हो?

In reply to by भंकस बाबा

काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन सारा समुदाय कसा दोषि ठरेल. पण अति धर्मांधपणामुळे बाबरी मस्जिद प्रकरणानंतर फटाक्यांचे दिवस जाउन माझ्या शांतताप्रिय महाराष्ट्राच्या नशिबि बाँम्बब्लास्टचे दिवस आले.हे मंदिर मस्जिद प्रकरण कोर्टावर सोडायला हवे होते नको ते होउन बसले.समाजाची मानसिक फाळणी झाली ही भावि पिढ्यांना काय भोगावे लागणार ते राम जाणो...

In reply to by प्रतापराव

कबुल, पण त्या आधी पण मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले होते. दंगली झाल्या होत्या. महाराष्ट्राचे माहीत नाही पण मुम्बई कधीच शांत नव्हती. दाउदचे दुश्मन जे हिन्दू होते ते पोलिसांच्या चकमकीत मारले गेले वा गैंगवॉर मधे मारले गेले. हां काही योगायोग नाही.

In reply to by भंकस बाबा

आपली माहिती चुकीची आहे. २००६ ला वेस्टर्न लाइनला बाँम्बब्लास्ट झाला होता.आणि १९९८ ला बाँम्ब निकामी करण्यात आला होता.१९९२ आधिची आमची मुंबइ छान होति हो.

In reply to by प्रतापराव

शिवडी, कुर्ला , घाटकोपर, कांजुरमार्ग, हे सर्व 1991च्या आधी आहेत. दंगलीबाबत प्रतापराव तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मी हे अधिकारवाणीने बोलत आहे कारण माझे आजोबा पोलिसमधे होते. भेंडीबाजार, इममवाड़ा, डोंगरी, नागपाड़ा, मोहमदअली रोड, भायखला हे त्यावेळी अंत्यंत सवेंदनशील भाग होते. बेहरामपाड़ा , मालवणी, हे भाग मिनी पाकिस्तान म्हणुन ओळखले जात. एखाद्या जुन्या जाणत्या माणसाला विचारा, जास्तकरुन या भागात रहाणाऱ्या.

In reply to by भंकस बाबा

दंगली तर स्वातंत्र्यपुर्व काळापासुन होतायत. विषय बाँम्बब्लास्टचा सुरू आहे.१९९२ नंतर महाराष्ट्राची रया गेली. सकाळी कामावर गेलेला माणुस रात्री परत येइल की याची खात्री राहिली नाही. ही सारी मंदिर-मस्जिद वादाची देण आहे.धार्मिक तेढ वाढवणारे सुरक्षाव्यवस्थेच्या गराड्यात मजेत राहिले सर्वसामान्याच्या नशिबी मात्र हाल.आले.

In reply to by प्रतापराव

पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
हेच बोल्तो. हिंदू दहशतवाद कुठाय कुठाय म्हणून लोक विचारत असतात. बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते.

In reply to by अनुप ढेरे

वर्षाचे बावन्न आठवडे शुक्रवारी रस्त्यावर नमाज अदा करून रहदारी बंद करने हां देखिल दहशतवादच्.

In reply to by भंकस बाबा

हा त्रास आहे हे मात्र खरे.पण ह्याला मी दहशतवाद नाहि म्हणु शकणार.रस्त्यावरचे नमाज, गरबे, उत्सव, विसर्जन मिरवणुका हे सारे बंद करुन टाकले पाहीजे.

In reply to by प्रतापराव

परत एकदा सांगतो नमाजाच्या वेळी पूर्ण रस्ता बंद केला जातो. अगदी एम्बुलैंस असेल तरी तो उघडला जात नाही. मी पैजेवर सांगू शकतो तुम्ही नेहमी हिंदू बहुल भागातच राहिलेले आहात.

In reply to by अनुप ढेरे

चिराबाझार, भेंडीबाजार, मोहमदअलि रोड ,नागपाड़ा , बेहरामपाड़ा या भागात रहाणारे आहेत काय? इथे राहणारी व्यक्ति दहशतवाद काय होता हे सांगू शकेल. मी भूतकालात बोललो कारण 92च्या दंगलीनंतर मुस्लिमाना कळून चुकले की बूमरैंग उलटु शकते. त्यामुळे समाजविघाटक शक्तिनि दंगल नाही तर बॉम्ब स्फोटाचा आसरा घेतला. म्हणजे स्फोट करणारे मुस्लिम असतील तर आपले तथाकथित सेक्युलर आंतकाला धर्म नसतो असे बरळायला मोकळे झाले. काही हिन्दू अतिरेकी संगठनानी सुड उगवला पण ते प्रमाण किती टक्के? पण त्याचे कोंग्रेस व् जनता दलवाल्याणी भगवा दहशतवाद म्हणुन भांडवल केले. आज पण मालदाला झालेल्या हिंसाचाराबद्दल हे सेकुलर ब्र काढत नाही आहेत.

In reply to by भंकस बाबा

काही हिन्दू अतिरेकी संगठनानी सुड उगवला पण ते प्रमाण किती टक्के?
उदाहरण? (१) अतिरेकी असलेल्या (अतिरेकी समजल्या जाणार्‍या नव्हे, तर ज्या हिंदू संघटना अतिरेकी/दहशतवादी कृत्ये करतात हे सिद्ध झाले आहे अशा) संघटनांची नावे? (२) त्यांनी केलेल्या अतिरेकी/दहशतवादी कृत्यांचे संदर्भ?

In reply to by श्रीगुरुजी

अजून १. (३) हिंदू दहशतवाद्यांची नावे (म्हणजे ज्यांच्यावर नुसते आरोप आहेत अशी नावे नकोत, तर न्यायालयात ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप सिद्ध झाले आहेत अशांची नावे)?

In reply to by श्रीगुरुजी

हे केवळ प्रतापरावांच्या समाधानासाठी म्हटले आहे.ते मानायला तयारच नाही की मुस्लिम दहशतवाद असू शकतो , मी आता हां शब्द वापरला तरी ते सर्वधर्मसम्भावाचे तुनतुने वाजवायचे सोड़तील का?

In reply to by भंकस बाबा

समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे.
या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल अजून लागलेला नाही. परंतु निधर्मांध या प्रकरणांच्या वारंवार उल्लेख करून हिंदू दहशतवाद, हिंदू अतिरेकी, हे बॉम्बस्फोट हिंदू दहशतवाद्यांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे तद्दन खोटे संदर्भ देऊन मुस्लिम दहशतवादाला बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी मडगावमध्ये तथाकथित हिंदू दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला होता म्हणे. काही काळापूर्वीच त्या खटल्याचा निकाल लागलेला असून त्यातील सर्व आरोप निर्दोष सुटलेले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अहो मी हे प्रतापरावाना बोलते करण्यासाठी करत आहे. ते कबुल करतील व् चर्चेला पुढे येतील मग मी मुस्लिम दहश्तवाद्यानि केलेले नरसंहार दाखवले असते. पण त्यांनी सापळा ओळखला व् चर्चेतुंन सपशेल बाजुला झाले. इथे आपण समविचारी वाद घालत आहोत. पाकिस्तानात होण्यार्या स्फोटात नाव मुस्लिम असतात म्हणुन हे भारतीय समधर्मसम्भाववाले चेकाळत नाहीत. तिथे जर सुरेश ,रमेश, जनार्दन असते तर यानी काय गदारोळ माजवला असता. शिवाय पाकिस्तानात हे अल्पसंख्यक नाहीशे झाले असते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही कुठल्या बाजूला आहात ते आधी ठरवा. लांडग्याला जर लांडगा म्हटले तर ती व्यक्ति पुरोगामी होते काय? मग ते अफझल गुरु समर्थन व देशविरोधी नारे देणारे आपसुक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्त बनतात. मुस्लिमविरोध हां मुख्य मुद्दा नाही तर हे जे धर्मवेड त्यांच्यात पसरत चालले आहे त्याला आक्षेप आहे. शिक्षणाने बदल होतात असे म्हणतात, कुठे आहेत या समाजात बदल? इसिसमधे सामिल होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण जे समोर आलेले आहेत ते बऱ्यापैकी शिकलेले आहेत. याबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. तुमचा पुरोगामी. नाव भंकस असले तरी, ही भंकस नाही.

In reply to by अनुप ढेरे

@ अनुप ढेरे बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते. मान्य आहे. परंतु "शाहबानो प्रकरणानंतर" बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करताना बहुसंख्यान्कांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हा संदेश राजकारण्यांना मिळाला हे या घटनेचे फल स्वरूप आहे. यापेक्षा त्याकडे फार लक्ष देऊ नये.

In reply to by प्रतापराव

मात्र बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला. महाराष्ट्र तर सर्वात सेफ राज्य होते. पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
चूक. श्रीराम जन्मस्थान पाडून त्यावर उभा केलेला बाबरीचा ढाचा १९९२ मध्ये पाडला नसता तरी भारतात दहशतवाद पसरलाच असता. १९९२ ते २००२ या काळातील दहशतवादासाठी बाबरी हे एक निमित्त म्हणून वापरले गेले. २००२ पासून गुजरात दंगल हे निमित्त म्हणून वापरले जात आहे. भविष्यात एक नवीन निमित्त असू शकते. १९७८ मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर अमेरिकेने पाकिस्तानला मदत देऊन रशियाविरूद्ध लढण्यासाठी भरपूर आर्थिक मदत, शस्त्रास्त्रे व राजकीय मदत देऊन मुजाहिद व तालिबान्यांची निर्मिती केली. तालिबानी व मुजाहिद अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्याविरूद्ध १९८९ पर्यंत सशस्त्र लढा देत होते. १९८९ मध्ये अफगाणिस्तानमधून रशियाने सैन्य काढून घेतल्यावर काही हे मुजाहिद बेकार झाले. त्यांच्यासाठी लढण्याचे फारसे कामच राहिले नाही. दरम्यानच्या काळात पाकिस्तानमध्ये लाखोंच्या संख्येने निर्वासित अफगाणी तरूण व मुले आली होती. पाकिस्तानने १९९०-९१ पासून या सर्वांना काश्मिरचे निमित्त करून भारताच्या दिशेने वळविले. याची सुरूवात १९९० मध्ये तत्कालीन काश्मिरचे मुख्यमंत्री यांच्या रूबिया सईद या मुलीचे अपहरण करून झाली. तिला सोडविण्यासाठी तुरूंगातील ५ अतिरेक्यांना सोडण्यात आले. या यशामुळे पाकिस्तान पुरस्कृत मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या. बॉम्ब्सचा वापर भारतात १९९० पूर्वीही होत होता. परंतु १९९० पासून भारतात तो मोठ्या प्रमाणावर वाढला कारण बॉम्बस्फोट करणारे प्रशिक्षित अतिरेकी अफगाणिस्तानमधील युद्ध संपल्याने १९९० पासून भारताकडे वळले. तात्पर्य, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला हा निष्कर्ष चुकीचा असून १९८९ नंतर अफगाण सुद्ध संपले व त्यामुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी अफगाण युद्ध संपल्यामुळे १९९० पासून भारतात सर्वत्र कारवाया सुरू केल्या.

कृपया कोणाकडे पेशवेकाळातील विश्रामबागवाडा या वाड्याचे त्याकाळातील महत्व काय होते याविषयी माहीती आहे का

औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर का पाडले याची एक कथा मध्यंतरी पुरोगाम्यांनी फेसबुकवर सोडली होती. कथा काही अशी आहे, औरंग्या सरदारांचा लवाजमा घेऊनचालला होता. वाटेत काशी विश्वनाथ लागलं. हिंदू सरदारांनी देवदर्शनाची परवानगी मागितली. पुरोगामी औरंग्याने ती दिली.दर्शन घेऊन परतलेल्या सरदार व त्यांच्या बायकांमध्ये एका सरदाराची बायको नव्हती.शोधघेतल्यावर ती विश्वनाथ मंदिराच्या तळघरात सापडली. तीच्यावर पुजार्याने बलात्कार केला होता. चिडलेल्या औरंगजेबाने मंदिर नष्ट केलं व पुजार्याला शिक्षा दिली.आता गम्मत अशी की ही कथा आवरण कादंबरीमध्ये एस. एल.भैरप्पा यांनी कम्युनिस्ट मुस्लिम अनुनयासाठी कशी कथा रंगवतील हे दाखवायला रचली आहे. याच खोट्या कथेच्या पुढे त्यांनी औरंगजेबाने पाडलेल्या हिंदू मंदिरांची संख्या त्यांच्या स्थानासहित दिली आहे. पन पुरोगाम्यांनी फक्त हवी तेवढीच कथा सोशल मिडीयावर सोडली.या साठी पुरोगाम्यांची मी एवढीच व्याख्या करेन - मुस्लिमप्रेम व हिंदूद्वेषाचा पु झालेला मनोरोगी म्हनजे पुरोगामी.

एकदा पुरोगामी शब्दाची व्याख्या ठरवा राव. मला पुरोगामी म्हटले की ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, शाहू, फुले, आगरकर, आंबेडकर हे सारे आठवतात. आजच्या आपल्या सामाजिक सुधारणा ही या सार्‍या महामानवांची देणगी आहे. आपल्याला न पटणारे विचार असणार्‍या लोकांसाठी पुरोगामी शब्द वापरून या शब्दाचा अर्थच बदलला जात आहे.

In reply to by सतिश गावडे

पुरोगामी या शब्दाची व्याख्या काय यापेक्षा कोणाला पुरोगामी व कोणाला प्रतिगामी ठरविले आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रात नेहमीच समाजवादी पक्ष, राजद, काँग्रेस इ. पक्षांचा पुरोगामी असा उल्लेख होतो. दिल्लीत जंतरमंतर वर पुरोगामी पक्षांनी सरकारविरूद्ध धरणे धरले. त्यात राजद, समाजवादी, संजद, माकप, भाकप इ. पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता हे अनेकवेळा वाचलेले आहे. तसेच मुंबईत सप, जनता दल, भाकप, माकप, शेकाप इ. पुरोगामी पक्षांनी सरकारविरूद्ध मोर्चा काढला अशीही बातमी अनेकवेळा येते. तस्मात पुरोगामी म्हणजे भाजप व शिवसेना वगळता इतर सर्व पक्ष व त्यांचे नेते (यात मुलायम, लालू इ. चाही समावेश होतो).

In reply to by श्रीगुरुजी

असे असेल तर या शब्दाचा चुकीचा वापर होतोय. तो बंद करायच्या ऐवजी लोक हा "नवा" अर्थ पुढे रुढ करू पाहत आहेत. कारण ते जसे या नव-पुरोगाम्यांसाठी सोयीचे आहे तसेच त्यांच्या विरोधकांसाठीही तो शब्द सोयीचा आहे.

स्यूडो सेक्यूलर बाटगे पुरोगामी यांबद्दल मी ते म्हटले आहे . शाहू, फुले, आगरकर, आंबेडकर हे खरे समाज सुधारक , खऱ्या अर्थाने पुरोगामी होते यांनी कधीही हिंदू मुस्लिम यांमधे भेदभाव करून स्वतच्या स्वार्थासाठी राजकारण केले नाही .माझा आक्षेप बनावट खोट्या पुरोगाम्यानवर आहे जे वस्तुस्थिती ग्रुहीत न धरता वेगळ्याच मार्गाने गोष्टीला फाटे देतात यांचे समाजाशी, देशाशी काहीही देणेघेण नसते .

In reply to by viraj thale

"स्यूडो" किंवा "खोटा" हे शब्द तुम्ही मी आक्षेप घेतल्यानंतर आता वापरलेत. तुमच्या मुळ प्रतिसादात हे शब्द नाहीत. तिथे पुरोगामी हाच शब्द आहे. :)

तुम्हमी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावू शकता . तस बघायला गेल तर तुमच्या मतानुसार जे जे लोक स्वतला पुरोगामी म्हणवतात किंवा तसा आव आणतात ते प्रत्येक वेळेला खरेच असतात ,सत्याची बाजू घेतात अस तुम्हाला म्हणायचे आहे का मग ते वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदूंच्या विरोधात खोटी कथा उभी करून त्याना खोटे पाडणे असो वा देशविघातक ,आतंकवादी लोकांची बाजू घेऊन raw ,ib अशा संघटनांना खोटे ठरवणे ,देशाच्या सुरक्षेस धोका उत्पन्न करणे असो .

In reply to by viraj thale

जरा लक्ष देवून वाचत जा की दादा. जरा विरोधी मत दिसले की लगेच आखाडयात उतरायचे काय? माझा आक्षेप फक्त पुरोगामी शब्दाच्या चुकीच्या वापराला आहे. याउप्पर माझे कशाबद्दल काहीही मत नाही.

भाऊ माझे बी तेच मत आहे की . पुरोगामी शब्दाला स्यूडो सेक्यूलर लोकांनीच बदनाम करून ठेवले आहे .

अनुप ढेरे, आपला इथला प्रतिसाद वाचला. तुम्ही म्हणताय :
>> बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते.
माझं मत थोडंसं वेगळं आहे. बाबरी नावाची कोणतीही मशीद अस्तित्वात नसतांना ती पाडल्याची अफवा उठवणारे पुरोगामी दहशतवाद प्रसारक आहेत. प्रत्यक्षात दहशतवादी नाहीत, पण दहशतवादास खतपाणी घालणारे आहेत. आ.न., -गा.पै.

आता खर्‍या सेक्युलर ची व्यवच्छेदक लक्षणे सांगा. एक चुकीचा प्रश्न...सेक्युलर की कम्युनल हा राजीव साने यांचा लेख या अनुषंगाने जरुर वाचा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

या लेखातील "जे इस्लामोफोबियाला मुख्य मुद्दा बनवतात, ते हिंदुत्ववादी! " या वाक्यातच सर्व लेखाचे सार आहे. बाकी काही वाचायची गरजच नाही. लेखकाची एकंदरीत विचारसरणी या एका वाक्यात अत्यंत स्पष्टपणे दृग्गोचर झाली आहे.

In reply to by तर्राट जोकर

बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना वाचायचे त्यांना वाचु दे ही वृत्तीही नाही! कोणी वाचुन मत प्रदर्शन करू धजला तर त्याला सिक्युलर वगैरे शेलकी विशेषणे दगडं मारल्याप्रमाणे मारायची! असो! कुठलीही गोष्ट वाचायची नाही असे म्हणले तरी न वाचता कश्यावरही टिका कशी काय करायला जमते राव लोकांना? किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे! नाही तर मग प्रोजेक्टरच्या कॉमेंट मधे बल्या होतो मोठा! अवांतर :- कॉमनसेन्स खतरे में है!!!

In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे, अनकॉमन म्हणले की "endangered" म्हणायला हवा नुसता खतरे में है नाही चालणार मराठीत काय म्हणावे बरं ह्म्म्म "लुप्तप्राय"

In reply to by नाना स्कॉच

किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे!
वाह. माझ्या पुस्तकाने भरलेल्या कपाटातील पुस्तकांपैकी निम्म्याहून अधिक पुस्तके धार्मिक, अध्यात्मिक, देव, आत्मा, पुनर्जन्म वगैरेंबद्दल आहेत. त्यामुळे माझी ही पुस्तके पाहणारे मला हा प्रश्न आवर्जून विचारतात, "तू तर नास्तिक आहे मग ही पुस्तकं तुझ्याकडे कशी काय?" तेव्हा मी हेच उत्तर देतो. मी ज्या गोष्टीला विरोध करतो ती गोष्ट विरोध करण्याआधी मी समजून घ्यायला हवी आणि त्यासाठी मला त्याचा अभ्यास करायला हवा. मागे मिपावर मी पुनर्जन्मावरील चर्चेत मी विरोधी मत मांडल्यावर "तुमचा याबद्दल काही अभ्यास आहे का?" असा प्रश्न मला विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर म्हणून मी पुनर्जन्माच्या बाजूने मत मांडणारे जे जे ग्रंथ अभ्यासले होते त्यांची यादी दिली. आणि तरीही मी विरोधी मत का मांडत आहे हे ही लिहिले. बहुतेकांना पुनर्जन्म ही संकल्पना भगवदगीतेतील "आत्मा" संकल्पनेवरून माहिती असते. क्वचित कुणीतरी हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" वाचलेले असते. पण बहुतेक वेळा हे इथेच थांबते. माझी यादी बरीच मोठी होती. :)

In reply to by नाना स्कॉच

बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना वाचायचे त्यांना वाचु दे ही वृत्तीही नाही! कोणी वाचुन मत प्रदर्शन करू धजला तर त्याला सिक्युलर वगैरे शेलकी विशेषणे दगडं मारल्याप्रमाणे मारायची! असो! कुठलीही गोष्ट वाचायची नाही असे म्हणले तरी न वाचता कश्यावरही टिका कशी काय करायला जमते राव लोकांना? किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे!
सबूर नानासाहेब सबूर. त्या दुसर्‍या नानासाहेबांसारखी एकदम निष्कर्षावर उडी मारलीत. मी लेख पूर्ण वाचला नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? हे कशावरून तुम्ही ठरविले? संपूर्ण लेख व त्याखालील ४ प्रतिसाद वाचल्यानंतरच मी प्रतिसाद लिहिला आहे. "जे इस्लामोफोबियाला मुख्य मुद्दा बनवतात, ते हिंदुत्ववादी! " या वाक्यातच सर्व लेखाचे सार आहे असे मी लिहिले ते सुरवातीपासून शेवटपर्यंत लेख वाचल्यानंतरच. त्यामुळेच हे वाक्य वाचल्यानंतर खरं तर पुढे वाचायची गरज नाही हे लिहिले. पण मी लेख पूर्ण न वाचतात मत बनविले असा निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे सुद्धा झालात. आणि ज्यांना हा लेख वाचायचा आहे त्यांनी तो वाचू नये हे मी कधी आणि कोठे सांगितले? कोणीतरी कसला तरी "पुरोगामी" लेख लिहिणार, दुसराच एक जण हा लेख वाचा म्हणून संदर्भ देणार आणि लेख वाचून मतप्रदर्शन केले की तिसराच त्या मतांना तर्कहीन नावे ठेवणार. हा काय प्रकार आहे? तेव्हा एकदम उडी मारून निष्कर्ष काढू नका (निदान माझ्याबाबतीत तरी). आता लेखाबद्दल अजून टिप्पणी. "इस्लामोफोबिया हा जे मुख मुद्दा बनवितात ते हिंदुत्ववादी" अशी एक नवीन "पुरोगामी" व्याख्या लेख वाचून समजली. हिंदुत्ववादी म्हणजे शाळेत रामायण/महाभारत/गीता शिकवा असे सांगणारे, शाळेत सूर्यनमस्कार/योगासने शिकवा असे सांगणारे, धर्मावर आधारीत अन्यायकारक वेगळे कायदे करू नका असे सांगणारे, हिंदू देवदेवतांची विटंबना करू नका असे सांगणारे अशी आमची इतके दिवस समजूत होती. परंतु हे करणारे ते हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी म्हणजे इस्लामोफोबिया हा जे मुख मुद्दा बनवितात ते अशी नवीन "पुरोगामी" व्याख्या या लेखातून समजली. आणि त्यामुळेच फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड इ. देश हिंदुत्ववादी आहेत व डोनाल्ड ट्रंप हा देखील हिंदुत्ववादी आहे हे देखील लक्षात आले.
अवांतर :- कॉमनसेन्स खतरे में है!!!
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर या वाक्यातील सत्यता दृग्गोचर झाली.

In reply to by तर्राट जोकर

अपेक्षित प्रतिसाद! बाकी काही वाचायची गरजच नाही. हीच ती विचारसरणी. बाकी काही बोलायची गरजच नाही.
हा पण अपेक्षित प्रतिसाद. खाली सविस्तर लिहिले आहे, त्यामुळे वेगळे उत्तर देत नाही. अवांतर - भाजपच्या जातीयवादी राजकारणावरचा लेख पूर्ण झाला का?

In reply to by तर्राट जोकर

आता यात कसला आलाय उतावीळपणा? हा लेख लिहिणार असे तुम्ही सांगून बरेच दिवस झाले. म्हणून म्हटलं की आठवण करून द्यावी. आम्हाला अजून किती दिवस/महिने/वर्षे वाट बघायला लावणार?

In reply to by श्रीगुरुजी

काय आहे की मी तुमच्यासारखा प्रतिक्रियावादी नाही. उठसूठ एखादा आवडत नाही म्हणून बिनबुडाचे आरोप करत नाही, मग फाटलेलं शिवता शिवल्या जात नाही हे माहित आहे. म्हणुन व्यवस्थित अभ्यास करतो आणि पुरावे काढतो. तूर्तास ताजी ताजी बातमी घ्या. आता ह्याला प्रतिक्रियावाद म्हणू नका फक्त. हा शुद्ध अवसरवाद आहे. 55

In reply to by तर्राट जोकर

मग ते लिहा लेखात सगळं. त्याचीच तर वाट बघतोय. अर्थात लेख लिहिण्यासाठी समर्पक मुद्दे नसल्यामुळे लेख लिहिता येत नसेल तर तसं सांगा. आम्ही समजून घेऊ.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही समजून घेण्यासाठी मला काही सांगायची गरज वाटत नाही. तुमचं तुम्हीच समजून घेतलंय. मग काय गरज? इथे तथाकथित अभ्यासू किसपाडू प्रतिसादांचा विचार आधी करायला लागतो. नाहीतर हजारी धागे निघतात. बाजू सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. तुमच्यासारखे बिना-पुराव्याची प्रतिसादाची आगगाडी मला जमत नाही. एवढं समजतंय का बघा. बाकी किती शिल्लक आहे ते बघूच वेळ आल्यावर. रच्याकने, ती लिंक दिलीय, इग्नोर मारली का?

In reply to by तर्राट जोकर

बघितली की लिंक. त्यात काही विशेष नाही. असे अनेकपक्षांचे अनेकजण यापूर्वी बोललेले आहेत. जसे जेएनयूतील विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसेच यांनाही ते नको का? ज्याप्रमाणे देशद्रोही घोषणा दिल्याने देशद्रोह होत नाही, त्याचप्रमाणे अशा भाषणांनी काहीही होत नाही. समजा या भाषणाने जर काही गुन्हा झाला असेल तर उत्तरप्रदेश सरकारने तसा गुन्हा दाखल करून न्यायालयात जावे. समजा उत्तरप्रदेश सरकार दुर्लक्ष करीत असेल तर कॉंग्रेस किंवा इतर कोणीही अशा भाषणाविरूद्ध न्यायालयात जाऊ शकते. तस्मात असल्या फुसक्या लिंककडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.
तुमच्यासारखे बिना-पुराव्याची प्रतिसादाची आगगाडी मला जमत नाही.
आगगाडी सोडा. बिना-पुराव्याची एखादी बोगी असली तरी ती दाखवा.

In reply to by तर्राट जोकर

आता इथे कोपरा कोठून आला? तुम्ही जी काही लिंक दिली आहे त्यात काही विशेष नाही हे दिसतेच आहे. आणि बिन-पुराव्याची आगगाडी म्हणालात म्हणून तर आगगाडीची निदान एखादी बोगी तरी दाखवा असे विचारले.

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा हे अरुण माहूर दलित होते. पण यांच्या बद्दल मायावती किंवा अरविंद केजरीवाल किंवा राजीव गांधी आणि त्यांचे चेले चमचे तत्सम कोणालाच "दलिताची" हत्या झाली म्हणून पुळका कसा आला नाही. का तो "दलित" असला तरी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता म्हणून. इथे "रोहित वेमुला"च्या दलित असण्याबद्दल शंका असूनही त्याचे जोरदार राजकारण केले गेले कारण ते "सोयीस्कर" होते आणि त्यात मिपा वरील निधर्मान्धानी हि हात धुवून घेतले. या दुटप्पी पणा ची शिसारी येते. http://indianexpress.com/article/india/india-news-india/vhp-leader-murd… बरं हि खाजवून खरुज आपणच काढलेली आहे. फक्त त्यातील सोयीस्कर तेवढा दुवा आपण निवडलात

In reply to by सुबोध खरे

हो आणि या गोष्टीला आता चार दिवस होऊन गेले आहेत. कार्य बहुल्यामुळे या सर्व लोकांना जर तेंव्हा जमले नसेल तर आता जायला हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

हे अरुण माहूर दलित होते. पण यांच्या बद्दल मायावती किंवा अरविंद केजरीवाल किंवा राजीव गांधी आणि त्यांचे चेले चमचे तत्सम कोणालाच "दलिताची" हत्या झाली म्हणून पुळका कसा आला नाही. का तो "दलित" असला तरी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता म्हणून.
जे जे संघ, विहिंप, भाजप, बजरंग दल, अभाविप इ. "फॅसिस्ट" संघटनांशी संबंधित असतात ते ते सर्वथा त्याज्य असतात. ते मेले तर कशाला दु:ख करायचे? उलट एखादा "फॅसिस्ट" गेला म्हणून आनंदोत्सवच करायला हवा. कर्नाटकातील प्रशांत पुजारी, केरळ्मधील सुजित, उ.प्र. मधील अरूण माहूर, पुण्यातील राठोड नावाचा कचरा गोळा करणारा अशा अनेकांचे गेल्या ३-४ महिन्यात खून झाले. पुजारी, माहूर, राठोड इ. खुनातील आरोपी मुस्लिम होते. यवतमाळमधील नमाजानंतर मशिदीबाहेर ३ पोलिसांना भोसकणारा मुस्लिम होता. या ढोंग्यांनी या खुनाबद्दल, यवतमाळमधील हल्ल्याबद्दल आजतगायत एक चकार शब्दाने प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा "असहिष्णुतेचे बळी" असा आरडाओरडा करून कोणी पुरस्कारही परत केलेले नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा. चर्चा कुणाशी करावी एवढं कळतं मला. तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. तुम्हाला हरवणं कठीण आहे. तुम्ही जिंकले. (बघा, तुमच्या खात्यात पुढचे इन्स्टालमेंट आले असेल भाजपाकडून. आम्हाला च्यायला त्या ब्लॅकमनीचीच वाट पाहणे नशीबी. १०० दिवसांत आणणार होते, नाहीतर फाषी द्या म्हणले होते. विसरुन जातेत लोक. असो.)

In reply to by तर्राट जोकर

हा हा हा. चर्चा कुणाशी करावी एवढं कळतं मला. तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. तुम्हाला हरवणं कठीण आहे. तुम्ही जिंकले.
आधीच्याप्रमाणे ही पण पद्धत आवडली.
(बघा, तुमच्या खात्यात पुढचे इन्स्टालमेंट आले असेल भाजपाकडून. आम्हाला च्यायला त्या ब्लॅकमनीचीच वाट पाहणे नशीबी. १०० दिवसांत आणणार होते, नाहीतर फाषी द्या म्हणले होते. विसरुन जातेत लोक. असो.)
वा! आमच्य खात्यात भाजपकडून इन्स्टॉलमेंट? आता काय बोलायचं? आणि ते काळ्या पैशाबद्दल लिहिताना १५ लाखांचा उल्लेख राहिला की.