✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले

म
मदनबाण यांनी
Fri, 02/26/2016 - 00:06  ·  लेख
लेख
माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे. प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता. जालना स्टेशनवर तपोवन मधे सहकुटुंब चढलो ते मुंबइच्या परतीच्या प्रवासासाठी,आरक्षित केलेल्या जागी काही मंडळी आधीच ठाण मांडुन बसली होती ! त्यांना उठवण्याचे अवघड सोपस्कार सुरु करावे लागले,आमची आसन व्यवस्था दरवाजाला लागुन असलेल्या बर्थपासुनच होती, त्यामुळे आमच्या मागुन चढणार्‍यांचा देखील खोलंबा होत चालला होता. एक बाई मोबल्यावर बोलत होती,आम्ही तिला ही आमची आरक्षित जागा आहे ते वारंवार सांगुन देखील ती बाई फोनवर बिजी होती, शेवटी एकदाची ती तोंड वाकडं करुन हलली. पण त्या नंतर जो प्रकार पाहिला आणि अनुभवला तो किळसवाणा आणि घाण वाटणारा होता. आमच्या सिटवर आणि आजुबाजुच्या सीटवर मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी झुरळे फिरुन होती ! एखाध्या मुंगांच्या वारुळात काडी फिरवुन ते विस्कटावे व त्यानंतर चवताळलेल्या मुंग्या जश्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याच प्रमाणे अनेक झुरळे तिथे फिरत होती,फक्त ती आरामात फिरत होती हाच काय तो फरक असावा ! आमच्या आधी आमच्या आरक्षित बर्थवर लोक या अवस्थेत कसे काय बसुन होते ? याचे मला नवल वाटले आणि किळस सुद्धा.... मग मी, माझे तिर्थरुप कसे बसे आधीच्या लोकांना उठवुन सामान ठेवुन तिथे बसावे कसे या विवंचनेत पडलो... सामान लावे पर्यंत मी हातात चप्पल घालुन किमान १०-१२ झुरळे तरी मारली असावीत. मी, माझे तिर्थरुप, माझी बायडी मिळुन बर्थवर बसता यावे म्हणुन झुरळे मारत होतो आणि बोगीतली माणंस हा चाललेला तमाशा आवडीने पाहत होती. क्षणभर असे वाटले की झालं आता एक पण झुरळ यायचे नाही म्हणुन बर्थवर बसलो... काही क्षणातच माझी नजर माझ्या पिल्लाकडे गेली, तर तिच्या कानात झुरळ जाईल इतपत ते तिच्या अंगावर चढले,तर तेव्हढ्यात माझ्या मातोश्रींच्या साडीवर ही एक मिशीदार प्राणी वळवळ करताना दिसला आणि माझा संताप ! संताप ! झाला... आता पुढचा प्रवास कसा करावा ? काय करावे ? स्वतःच्याच आरक्षित बर्थ असुन त्यावर बुड टेकवण्याचे सुद्धा वांदे झाले होते ! तेव्हढ्यात माझ्या तिर्थरुपांना आधी प्रवास केलेल्या ट्रेन मधली कुठलीशी जाहिरात आठवली, जिच्यावर कुठलासा नंबर लिहिला होता...इथे ट्रेन धावर होती पण आम्हाला आमच्याच सीटवर बसता येइना, वडिलांना तो त्यांनी पाहिलेला नंबर आठवेना ! शेवटी मी मोबल्यावरुन माहिती शोधण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला. http://www.coms.indianrailways.gov.in/criscm/common/complaint_registration.seam ही लिंक सापडली आणि त्यावर विचारलेली माहिती दिली आणि फॉर्म सेव्ह केला.अजुन काय करता येइल ? असे विचार करुन चालत्या ट्रेन मधे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा सुद्धा भरवसा नव्हता, तिथे अजुन हाती काही लागते का ? याचा शोध सुरु ठेवला... आणि 8121281212 हा नंबर जालावर सापडला , मग मी माझ्या मोबाईलवरुन आणि तिर्थरुपांच्या मोबाईल वरुन या नंबरवर मेसेज केला. एका ओळीत कसा बसा त्या गर्दीत उभे राहुन मेसेज केला आणि हा घटनाक्रम कायअप्पावर ग्रुप मध्ये कळवला, मला काही घडेल याची काडीमात्र अपेक्षा नव्हती. माज्या मेसेजचा रिप्लाय म्हणुन इन इनव्हिस्टीगेशन असा रिप्लाय आला जो बउधा ऑटोमेटेड असावा. पण काही वेळातच माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि तो रेल्वेकडुनच होता. नक्की काय झाल असा दाक्षिणात्य टोन मधुन हिंदीतुन विचारणा केली गेली, मी जमेल तसे सांगितले...माझ्या पिल्लाच्या कानात जाईल इतपर झुरळे आहेत असे सांगितल्यावर अय्ययो असा काळजी युक्त स्वर ऐकायला मला मिळाला. { या बाईचे नाव मी विचारले होते, पण आता विसरलो आहे.} माझे नाव इतर माहिती आणि पुढे औरंगाबाद { संभाजीनगर } येणार आहे असे तिला कळवले. ठीक आहे माणसे येतील असे तिने मला कळवले आणि कोण आले नाही तर याच नंबरवर कॉल करा { ज्या नंबर वरुन मला फोन आला होता त्या} असे त्या महिलेने सांगितले. काही काळाने औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन आले,आणि गाणी थांबताच आमच्या खिडकी समोर माणुस उभा ठाकला ! P1 चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले P2 विचार करु लागला... मग... P3 स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला. p4 P5 P6 स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले ! - - - - - - काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्‍याने कैद केले ! P7 P8 P9 P10 P11 P12 हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो.... रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते... संदर्भ धागे :- सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस माझी रेल्वे यात्रा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
18597 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

ओ मालक,

सस्नेह
Fri, 02/26/2016 - 16:21 नवीन
रेल्वेवाले तिकीट काढल्याशिवाय गाडीत चढू देत नाहीत. गल्लीनं दोन महिने बिलं भरली नसतील ना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

@ मार्मिक गोडसे आणि

मदनबाण
Fri, 02/26/2016 - 16:28 नवीन
@ मार्मिक गोडसे आणि स्नेहांकिता डॉकनी अत्यंत योग्य शब्दात या गाडीचे वर्णन केले आहे, माझ्या नजेरत आलेल्या नुसार ३ बर्थवर हा उपद्रव होता. बहुतेक पँट्री या बोगीला लागुन असल्यानेच तसे जास्त झाले असण्याची शक्यता वाटते. पँट्री स्वच्छ दिसत आहे ती तितकी नाही.पँट्री चे पहिले २ फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येइल की कढई त्याच्या खाली गॅस आहे आणि गॅसच्या खालीच जमिनीवर स्लाईस्ड ब्रेडचा खच पडलेला दिसेल.सर्व बनवणारे जाणारे खाध्य पदार्थ कुठेही कसेही उघडे ठेवलेले दिसतील. असो यात देखील सुधारणा होइल अशी आपण अपेक्षा ठेवुया. शहाण्या माणसाने तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करू नये अशी परिस्थिती आहे. डॉकच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे, काही कारणामुळे मूळ दौर्‍याच्या वेळापत्रकात बदल करावा लागल्याने जी गाडी मिळेल त्यात आरक्षण करणे हाच पर्यात त्यावेळी तिर्थरुपांकडे होता त्यामुळेच तोपोवनाचा "ताप" घडला. @वेल्लाभट जे आपण करु इच्छिता त्याला पूर्णपणे माझे अनुमोदन आहे,सरकारच्या सकारात्मक बाजुची देखील दखल घेतली पाहिजे आणि त्याची प्रसिद्धी सुद्धा. :) @सोन्याबापू आपणही यात भर घातली याचा आनंद वाटला. @ सर्व प्रतिसादकांना धन्स.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हाच धागा

तिमा
Fri, 02/26/2016 - 16:36 नवीन
हाच धागा विचारवंतांच्या संस्थळावर टाकला (आहे) तर एवढे प्रतिसाद येणार नाहीत आणि आले तरी त्यांत कुत्सितपणा ठासून भरला असेल. चांगल्या कामाला चांगले म्हणायलाही मोठे मन लागते.
  • Log in or register to post comments

एक अपडेट

मदनबाण
Fri, 02/26/2016 - 17:38 नवीन
आज रेल्वेकडुन फिडबॅक घेण्यासाठी एसएमएस आला, ज्यात फिडबॅक देण्यासाठीची लिंक होती. मी Excellent या पर्यायावर क्लिक करुन माझा प्रतिसाद नोंदवला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments

बाण राव

सुबोध खरे
Fri, 02/26/2016 - 17:53 नवीन
बाण राव त्या प्यांट्री बद्दल हि लिहायला हवे. म्हणजे त्या लोकांना आपण काय करतो आहोत ते हि समजेल. तुम्ही नुसती हूल दिलीत पण नक्की काय करायला हवे आहे हे त्यांना कदाचित समजले नसेल. उदा. एच आय व्ही च्या प्रादुर्भावाचे वेळेस सर्व सलून मालक आणि नोकर यांना वस्तरे डेटॉलने धुवून घ्या आणि प्रत्येक ग्राहकासाठी नवी ब्लेड का वापरा हे NACO( NATIONAL AIDS CONTROL ORGANISATION)द्वारा समजावून सांगितले गेले यामुळे त्यांना कळले कि त्याच ब्लेड मुळे विषाणू संसर्ग का आणि कसा होतो. बहुतेक वेळेस अज्ञानामुळे या लोकांना स्वच्छता म्हणजे काय आणि कशी ठेवायची ते समजत नाही. ते अस्वच्छ मुद्दाम राहतात असेच नाही. मग ते सलून आले असोत किंवा आचारी वाढपी. नौदलात आम्ही( डॉक्टर) त्या लोकांना महिन्यात एकदा व्याख्यान देऊन या गोष्टी शिकवत असू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाण राव त्या प्यांट्री बद्दल

मदनबाण
Fri, 02/26/2016 - 18:09 नवीन
बाण राव त्या प्यांट्री बद्दल हि लिहायला हवे. डॉक, फिडबॅकच्या दुव्यावर लिखाणासाठी काही जागा नव्हती. फक्त क्लिक करण्याचाच पर्याय होता. @ मोदकराव हा नक्की सत्कारच आहे ना ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्धशतकाबद्दल झुरळ निर्दालक

मोदक
Fri, 02/26/2016 - 17:53 नवीन
अर्धशतकाबद्दल झुरळ निर्दालक बाणरावांचा हिट चे सगळे प्रकार देवून सत्कार करण्यात येत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/26/2016 - 19:10 नवीन
तपोवन घाणेरडी गाडी आहे आणि त्यात घाण करणारे अजुन घाणेरडे. बाकी, बाणा आपल्या कामाचं आणि तत्पर सेवा देना-यांचही कौतुक वाटलं. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खूप चांगला अनुभव बाणराव !!

खटपट्या
Sun, 02/28/2016 - 05:05 नवीन
खूप चांगला अनुभव बाणराव !! लेखही खूप चांगला आहे.
  • Log in or register to post comments

सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत

सुहास झेले
Sun, 02/28/2016 - 10:20 नवीन
सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने, काम तत्परतेने झाल्यावर त्यातून मिळणारा आनंद निव्वळ अवर्णनीय ;-) प्यांट्रीचे फोटो सुरेश प्रभूंना tweet कर. सुरेश प्रभूंच्या रेल्वे प्रशासनाने चांगले काम करण्याचा निश्चय केलेला दिसतो. मुंबई लोकल स्टेशन्सचा अभूतपूर्व कायापालट गेल्या ४-५ महिन्यात होतोय.
  • Log in or register to post comments

बोरिवली स्टेशनबद्दल विशेष

अनुप ढेरे
Sun, 02/28/2016 - 10:49 नवीन
बोरिवली स्टेशनबद्दल विशेष कौतुक ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

हो.. आमचे होम ग्राउंड ;-)

सुहास झेले
Sun, 02/28/2016 - 13:10 नवीन
हो.. आमचे होम ग्राउंड ;-) काही फोटो.. गुगलकडून साभार Image removed. Image removed. --- Image removed. --- Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

काय मस्त दिसतय. मजा आली.

प्रसाद१९७१
Mon, 02/29/2016 - 15:26 नवीन
काय मस्त दिसतय. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

पुणे स्टेशनवरपण असच केलय.

अनुप ढेरे
Mon, 02/29/2016 - 16:25 नवीन
पुणे स्टेशनवरपण असच केलय. Image removed.
Image removed.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

हे करणा-या संघटनेशी मी संपर्क

वेल्लाभट
Mon, 02/29/2016 - 16:27 नवीन
हे करणा-या संघटनेशी मी संपर्क साधला आहे. पुढील प्रकल्पात सहभागी होण्याची, योगदान देण्याची माझी तयारी असल्याचे कळवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

वा वा!

सर्वसाक्षी
Sun, 02/28/2016 - 12:21 नवीन
बाणा, अभिनंदन आणि कौतुक. पाठपुरावा केलास तर परि़णाम होतो हे समजले. दिवसाला कोट्यावधी प्रवासी वाहणार्‍या रेल्वेकडुन असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष कारवाई हा निश्चित आश्वासक असा सुखद अनुभव आहे मी १ जानेवारीला पारपत्र नूतनीकरणासाठी ठरल्या वेळेस पारपत्र कचेरीत गेलो, अर्ज 'तात्काळ' सदरात केला होता. सुमारे एका तासात काम संपवून साडे अकराच्या सुमारास बाहेर पडलो. दोन जानेवारीला दुपारी १ वाजता जलद ट्पालाने नवे पारपत्र घरपोच आले.
  • Log in or register to post comments

सक्रिय लोकशाही

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/28/2016 - 16:41 नवीन
मदनबाणराव, अभिनंदन तुमचे आणि रेल्वे प्रशासनाचे ! तुम्ही "होता है, चलता है" असे म्हणत केवळ सरकारला दुषणे देत न बसता तक्रार केलीत म्हणून ! आणि तिच्या निवारणाबाबतची बातमी इथे टाकलीत त्याबद्दलही ! कारण तक्रारी करायला सगळेच पुढे असतात, पण चांगली गोष्ट लिहायला बर्‍याचदा हात आखडता घेतला जातो ! रेल्वे प्रशासनाने त्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन तुमच्या त्याच प्रवासातच शक्य ती कारवाई केली म्हणून रेल्वे प्रशानचेही कौतूक करायला हवे... त्यांनी ते काम केले म्हणून नाही (ते काम करणे तर त्यांचे कर्तव्यच आहे), पण इतक्या वर्षांच्या अंगवळणी पडलेल्या सवयीनंतर/अनुभवानंतर त्यांनी काही सकारात्मक सुरुवात केली आहे, त्याचा आनंद आहे म्हणून ! या अनुभवातून एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत झाली आहे... प्रशासनाने उत्तम काम करावे हे नि:संशय. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात प्रशासनाला सामान्य जनतेच्या हातभाराची नक्कीच गरज असते. इतर काही केले नाही तरी कामातल्या/सेवेतल्या तृटी कळवण्याइतकी मदत तरी सर्व जनता करू शकते, करावी. सहभागी लोकशाही (पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी) हा जरी फार मोठा शब्द व संकल्पना वाटत असली तरी, "सेवेच्या तक्रारी/सूचना करण्याची सोय प्रशासनाने करावी आणि त्या सोईचा फायदा घेऊन त्याद्वारे प्रशासनाला कर्मचार्‍यांवर नजर ठेवायला मदत करून जनतेने सेवेची प्रत वाढवून घ्यावी", इतका सोपा मूलभूत अर्थ त्यामागे आहे. असे छोटे छोटे प्रकल्पच जनतेच्या रोजच्या जीवनातील सोयीसुविधांची प्रत वाढवतात. याबाबत प्रभूंनी उचलेल्या पावलांबद्दल ऐकून होतो. पण तुमच्या लेखामुळे खुद्द मिपाकराच्या मुखाने आणि कॅमेर्‍याने त्याबद्दल वाचायला/पहायला मिळाले. आशा आहे की अश्या अनेक तक्रारी आल्या की त्या निवारत बसण्यापेक्षा अगोदरच "कीटकनाश" करणे जास्त बरे पडते अशी सुबुद्धी स्थानिक रेल्वे प्रशासनाला सुचेल. जनतेच्या कृपेने (सामानातून) रेल्वेत प्रवेश करणारे कीटक बंद व्हायला जरा जास्त काळ लागेल म्हणा :( पण एक मात्र खरे की, अश्या तक्रारी करून शासनाला सेवा सुधारायला मदत करणे व चांगल्या अनुभवांना प्रसिद्धी देऊन सरकारी कर्मचार्‍यांचे कौतूक करून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविणे, यात सर्वात नागरिकांचा सहभाग स्वागतार्ह आणि आवश्यक आहे. ====== या निमित्ताने, काही प्रतिसादांत रेल्वेचे इतर ठिकाणचे चांगले कामही समोर आले आहे... मुंबईच्या स्थानकांची चित्रे कायप्पावर पाहिली होती, पण सोन्याबापूंनी टाकलेला पटना जंक्शनचा फोटो डोळ्यांवर विश्वास बसू नये असाच आहे ! माध्यमांना अश्या बर्‍याचश्या सकारात्मक बातम्यात (टीआरपीमूल्य नसल्याने) रस नसतो. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामन्य जनतेनेच याची जाहिरात करणे जरूर आहे... कारण लोकशाहीत जनतेला त्यांच्या लायकीचे सरकार मिळते असेच नाही तर सरकारी सेवा व त्यांची प्रतही लोकांच्या आग्रहाच्या प्रमाणातच मिळतात.
  • Log in or register to post comments

माध्यमांना अश्या बर्‍याचश्या

सुबोध खरे
Sun, 02/28/2016 - 19:14 नवीन
माध्यमांना अश्या बर्‍याचश्या सकारात्मक बातम्यात (टीआरपीमूल्य नसल्याने) रस नसतो. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामन्य जनतेनेच याची जाहिरात करणे जरूर आहे.. एक्का साहेब सोळा आणे सही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच छान अनुभव.शेअर करावा

भाग्यश्री कुलकर्णी
Sun, 02/28/2016 - 20:19 नवीन
नक्कीच छान अनुभव.शेअर करावा वाटतोय
  • Log in or register to post comments

आश्वासक अनुभव

आतिवास
Sun, 02/28/2016 - 21:23 नवीन
वाचून छान वाटलं.
  • Log in or register to post comments

छान वाटलं वाचून . धन्यवाद इथे

उगा काहितरीच
Sun, 02/28/2016 - 22:10 नवीन
छान वाटलं वाचून . धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल .
  • Log in or register to post comments

छान अनुभव. शेअर केल्याबदद्ल

पद्मावति
Mon, 02/29/2016 - 15:17 नवीन
छान अनुभव. शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हा अनुभव आम्ही चेपूवर शेयर

भिंगरी
Mon, 02/29/2016 - 16:22 नवीन
हा अनुभव आम्ही चेपूवर शेयर करू शकतो का?
  • Log in or register to post comments

छान अनुभव.

पिशी अबोली
Mon, 02/29/2016 - 16:46 नवीन
छान अनुभव. मागच्या आठवड्यात पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसने प्रवास करताना स्वच्छता अतिशय चांगली होती. या ट्रेनमधे ती सुरू झाल्यापासून खूप उंदिर असायचे. पण यावेळी उंदिर नव्हते.
  • Log in or register to post comments

फारच छान.

एस
Mon, 02/29/2016 - 18:15 नवीन
फारच छान.
  • Log in or register to post comments

लेख आणि प्रतिसाद बघून मस्त

मधुरा देशपांडे
Mon, 02/29/2016 - 18:18 नवीन
लेख आणि प्रतिसाद बघून मस्त वाटलं. पूर्वी अशा पोस्टवर विश्वास नव्हता, आता खात्री पटली.
  • Log in or register to post comments

@ असंका

मदनबाण
Mon, 02/29/2016 - 18:52 नवीन
@ असंका वरती एका प्रतिसादात याचे उत्तर मी दिले आहे. @ भिंगरी हो, नक्की शेअर करा. हा अनुभव ज्यांना ज्यांना जिथे कुठे शेअर करावयाचा असेल त्यांनी तो जरुर करावा. :) सर्व प्रतिसाद देण्यार्‍या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anari
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

छान वाटल वाचून

जगप्रवासी
Mon, 02/29/2016 - 19:18 नवीन
कसाऱ्या वरून मुंबईला येताना लोकल ट्रेन मध्ये भेळ खाल्ल्यावर कागद माझा कागद मी माझ्या खिशात ठेवला. समोर तीन चार मुल होती, भेळ खाऊन झाल्यावर ते कागद बाहेर फेकण्याच्या तयारीत होते तेव्हढ्यात मी त्यांच्याकडून ते कागद मागून माझ्या खिशात ठेवले. त्यामुळे त्यांना जरा लाज वाटली असावी, त्यांनी ते कागद माझ्याकडे परत मागितले आणि स्वतःच्या खिशात ठेवले. या छोट्याशा गोष्टीने त्यांच्याशी गट्टी जमली आणि मुंबई पर्यंतचा प्रवास एकदम मजेत आणि साफ सुथरा गेला. आणि हो त्यांचं आणि माझ वागण बघून बऱ्याच जणांनी कचरा बाहेर न फेकता स्वतःच्या खिशात, हातात ठेवला.
  • Log in or register to post comments

बेहद्द आवडलं. __/\__ अपुनबी

तर्राट जोकर
Mon, 02/29/2016 - 21:24 नवीन
बेहद्द आवडलं. __/\__ अपुनबी ऐसेच करेगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

स्पृहणिय काम !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/29/2016 - 23:34 नवीन
स्पृहणिय काम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

नियमित ग्राहक

नमकिन
Tue, 03/01/2016 - 18:32 नवीन
रोजचा प्रवास रेलवे सरासरी ३००km (मागील १२-१५ वर्ष) असल्याने रेलवे व बस (सरकारी उपक्रम) बाबत एक आत्मीयता सतत मनात असते. दिवस रात्र आम्हा रेलवे चा प्रसंग, कामानिमित्त बहुतांश भारत भ्रमण झाले. इतक्या वर्षांत भारतवर्षातील रेलवे स्थानक, आरक्षण प्रक्रिया, वेळापत्रक, गाड्यांचा वेग, डब्यांची परिस्थिती, कर्मचारी वर्गाचा उत्साह कर्तव्य भावना व सरतेशेवटी प्रवाशांची मानसिकता यांचा रोचक अनुभव नक्कीच प्रगतिशील स्थित्यंतर दर्शवतो. मुद्दा स्वच्छता असल्याने दृष्टी आड सृष्टी असते हा भाग समजून घेतल्यास रेलवे चे (इतर कुठल्याही उपक्रमाचे) अभियान हे नक्कीच अभिमान वाटावे असेच आहे. सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय आजच्या घडीला तरी हाच एकमेव असा आहे. डॅा. भावेंचे निरीक्षण ही सद्य परिस्थिती दर्विते की रेलवे अस्वच्छ करणारे हे भारतीय जनताच आहे त्यांना "भारतीय रेल आपकी संपत्ति हैं...." हे समजते पण तिचा सर्वाना समान अधिकार आहे हे मात्र उमजत नाहीं. यासाठी नाखुभाऊंनी म्हटल्या प्रमाणे आपल्या सर्वांना अशांना वैयक्तिक मार्गदर्शन करावे लागते, त्यात अ/सुशिक्षित असे सर्व सापडतात, सामान्य डब्यांत खिडक्यांतून बहुतांश कचरा डब्याबाहेर जात असतोच अन् तरीही अस्वच्छता दिसतेच परंतु वातानुकूलित डब्यांत बहुतेक उच्च स्तर प्रवासी (यात रेलवे चे जावई पण आले) जागेवर चिकटून बसतात की सर्व बसल्या जागीच हवे असते व खाणे/पिणे संपल्यावर देखील सर्व छान रचुन (बाटली अडकविण्याच्या जाळीत) ठेवतात, प्रवास संपवताना तसेच टाकून जातात. या सर्व उष्ट्या खरकट्यांमुळे संपूर्ण डब्यात विचित्र गंध शिरताच जाणवतो. बरं सांगून सुद्धा बरेच मख्खपणे पहात बसतात. त्याहून हद्द म्हणजे जे डस्टबीन भरतात ते चालत्या गाडीतूनच पटरी वर रिते केले जातात, ते पाहून वाटते याचसाठी का केला होता सारा अट्टहास? एरवी मूळ कारण कच-याची उत्पत्ती जर कमी केली तरच हा भस्मासुर आटोक्यात येईल अन्यथा कचरा बेवारस असतोच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा