✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले

म
मदनबाण यांनी
Fri, 02/26/2016 - 00:06  ·  लेख
लेख
माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे. प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता. जालना स्टेशनवर तपोवन मधे सहकुटुंब चढलो ते मुंबइच्या परतीच्या प्रवासासाठी,आरक्षित केलेल्या जागी काही मंडळी आधीच ठाण मांडुन बसली होती ! त्यांना उठवण्याचे अवघड सोपस्कार सुरु करावे लागले,आमची आसन व्यवस्था दरवाजाला लागुन असलेल्या बर्थपासुनच होती, त्यामुळे आमच्या मागुन चढणार्‍यांचा देखील खोलंबा होत चालला होता. एक बाई मोबल्यावर बोलत होती,आम्ही तिला ही आमची आरक्षित जागा आहे ते वारंवार सांगुन देखील ती बाई फोनवर बिजी होती, शेवटी एकदाची ती तोंड वाकडं करुन हलली. पण त्या नंतर जो प्रकार पाहिला आणि अनुभवला तो किळसवाणा आणि घाण वाटणारा होता. आमच्या सिटवर आणि आजुबाजुच्या सीटवर मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी झुरळे फिरुन होती ! एखाध्या मुंगांच्या वारुळात काडी फिरवुन ते विस्कटावे व त्यानंतर चवताळलेल्या मुंग्या जश्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याच प्रमाणे अनेक झुरळे तिथे फिरत होती,फक्त ती आरामात फिरत होती हाच काय तो फरक असावा ! आमच्या आधी आमच्या आरक्षित बर्थवर लोक या अवस्थेत कसे काय बसुन होते ? याचे मला नवल वाटले आणि किळस सुद्धा.... मग मी, माझे तिर्थरुप कसे बसे आधीच्या लोकांना उठवुन सामान ठेवुन तिथे बसावे कसे या विवंचनेत पडलो... सामान लावे पर्यंत मी हातात चप्पल घालुन किमान १०-१२ झुरळे तरी मारली असावीत. मी, माझे तिर्थरुप, माझी बायडी मिळुन बर्थवर बसता यावे म्हणुन झुरळे मारत होतो आणि बोगीतली माणंस हा चाललेला तमाशा आवडीने पाहत होती. क्षणभर असे वाटले की झालं आता एक पण झुरळ यायचे नाही म्हणुन बर्थवर बसलो... काही क्षणातच माझी नजर माझ्या पिल्लाकडे गेली, तर तिच्या कानात झुरळ जाईल इतपत ते तिच्या अंगावर चढले,तर तेव्हढ्यात माझ्या मातोश्रींच्या साडीवर ही एक मिशीदार प्राणी वळवळ करताना दिसला आणि माझा संताप ! संताप ! झाला... आता पुढचा प्रवास कसा करावा ? काय करावे ? स्वतःच्याच आरक्षित बर्थ असुन त्यावर बुड टेकवण्याचे सुद्धा वांदे झाले होते ! तेव्हढ्यात माझ्या तिर्थरुपांना आधी प्रवास केलेल्या ट्रेन मधली कुठलीशी जाहिरात आठवली, जिच्यावर कुठलासा नंबर लिहिला होता...इथे ट्रेन धावर होती पण आम्हाला आमच्याच सीटवर बसता येइना, वडिलांना तो त्यांनी पाहिलेला नंबर आठवेना ! शेवटी मी मोबल्यावरुन माहिती शोधण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला. http://www.coms.indianrailways.gov.in/criscm/common/complaint_registration.seam ही लिंक सापडली आणि त्यावर विचारलेली माहिती दिली आणि फॉर्म सेव्ह केला.अजुन काय करता येइल ? असे विचार करुन चालत्या ट्रेन मधे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा सुद्धा भरवसा नव्हता, तिथे अजुन हाती काही लागते का ? याचा शोध सुरु ठेवला... आणि 8121281212 हा नंबर जालावर सापडला , मग मी माझ्या मोबाईलवरुन आणि तिर्थरुपांच्या मोबाईल वरुन या नंबरवर मेसेज केला. एका ओळीत कसा बसा त्या गर्दीत उभे राहुन मेसेज केला आणि हा घटनाक्रम कायअप्पावर ग्रुप मध्ये कळवला, मला काही घडेल याची काडीमात्र अपेक्षा नव्हती. माज्या मेसेजचा रिप्लाय म्हणुन इन इनव्हिस्टीगेशन असा रिप्लाय आला जो बउधा ऑटोमेटेड असावा. पण काही वेळातच माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि तो रेल्वेकडुनच होता. नक्की काय झाल असा दाक्षिणात्य टोन मधुन हिंदीतुन विचारणा केली गेली, मी जमेल तसे सांगितले...माझ्या पिल्लाच्या कानात जाईल इतपर झुरळे आहेत असे सांगितल्यावर अय्ययो असा काळजी युक्त स्वर ऐकायला मला मिळाला. { या बाईचे नाव मी विचारले होते, पण आता विसरलो आहे.} माझे नाव इतर माहिती आणि पुढे औरंगाबाद { संभाजीनगर } येणार आहे असे तिला कळवले. ठीक आहे माणसे येतील असे तिने मला कळवले आणि कोण आले नाही तर याच नंबरवर कॉल करा { ज्या नंबर वरुन मला फोन आला होता त्या} असे त्या महिलेने सांगितले. काही काळाने औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन आले,आणि गाणी थांबताच आमच्या खिडकी समोर माणुस उभा ठाकला ! P1 चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले P2 विचार करु लागला... मग... P3 स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला. p4 P5 P6 स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले ! - - - - - - काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्‍याने कैद केले ! P7 P8 P9 P10 P11 P12 हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो.... रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते... संदर्भ धागे :- सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस माझी रेल्वे यात्रा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
18597 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

अरे वा! छान वाटलं!

रातराणी
Fri, 02/26/2016 - 00:14 नवीन
अरे वा! छान वाटलं!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Fri, 02/26/2016 - 00:14 नवीन
नव्या जमान्याच्या भारतीय रेल्वेच्या उत्तम दर्जाच्या ग्राहक सेवेचा अनुभव मिळाल्याबद्दल अभिनंदन. हे सर्व इथे लिहिल्याबद्दल आभार. रेल्वेच्या खानपान सेवेतही आमुलाग्र बदल (सुधारणा या अर्थाने) होत / होणार आहेत असे बातम्यांत वाचले होते. सध्या होत असणारे सकारात्मक बदल पाहता हे बदलही होतील असा विश्वास वाटतो.
  • Log in or register to post comments

खूप चांगले वाटले. योग्य माणसे

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 00:39 नवीन
खूप चांगले वाटले. योग्य माणसे योग्य ठिकाणी असली की कामे होतातच. सफरपे जाओ, प्रभुगुण गाओ!
  • Log in or register to post comments

परवा अमच्या सोलापुरच्या

अभ्या..
Fri, 02/26/2016 - 00:44 नवीन
परवा अमच्या सोलापुरच्या सिध्देश्वर एक्स्प्रेसला आरक्षित डब्यात मवाल्यानी केलेला गोंधळ प्रभूकृपेने १० मिनिटात निस्तरला गेला. ट्वीटर हॅण्डेलवर एका प्रवाशाने ट्वीट केलेले. बाकी पॅन्ट्री व्हॅन अपेक्षेपेक्षा बरीच साफ दिसतेय ;)
  • Log in or register to post comments

पॅन्ट्री>> तेच म्हणणार होतो.

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 00:57 नवीन
पॅन्ट्री>> तेच म्हणणार होतो. वाटलं मदनबाणसाहेब स्वच्छतेबद्दल सांगतायत का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

तुषार काळभोर
Fri, 02/26/2016 - 14:08 नवीन
मलाही तेच वाटलं फोटो बघून. हे 'स्वच्छ' पॅण्ट्री व्हॅनचे फोटो आहेत. (मी २००८ मध्ये पुणे-चेन्नई प्रवासात पॅण्ट्री कार पाहिली होती. आता मी स्वच्छ पॅण्ट्री कारमधलेही काही खाऊ शकत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

+१..

असंका
Sun, 02/28/2016 - 13:16 नवीन
+१.. नक्की काय खटकलं तेही सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वाचून बरं वाटायला लागलं

रेवती
Fri, 02/26/2016 - 01:32 नवीन
वाचून बरं वाटायला लागलं म्हणतानाच पॅन्ट्रीचा फोटू पाहिला. तरी, जे चाललय ते ठीकच म्हणते.
  • Log in or register to post comments

फारच उत्तम अनुभव. अश्या

प्रसाद१९७१
Fri, 02/26/2016 - 09:03 नवीन
फारच उत्तम अनुभव. अश्या पॉझीटीव्ह न्युज वाचल्या की बरे वाटते. पँट्री खरचं बरी होती. कुठल्याही हॉटेल मधे ह्या पेक्षा स्वच्छ नसेल.
  • Log in or register to post comments

अरे व्वा. झक्कास धागा..

मोदक
Fri, 02/26/2016 - 09:31 नवीन
अरे व्वा. झक्कास धागा.. हा आमचा कायप्पा वृत्तांत. गेले कांही दिवस बाणरावांच्या दौर्‍याचे फोटो आणि अपडेट्स आम्हाला लाईव्ह मिळत होते. त्यावरून त्यांची खेचणेही सुरू होतेच. अचानक बाणरावांनी बाँब टाकला **दुपारी २ वाजून ३० मिनीटे** "आत्ता तपोवन एक्प्रेसनी मुंबईला परत येतोय, गाडीत प्रचंड झुरळे आहेत, मी आत्तापर्यंत १० झुरळे मारली, बसणे कठीण आहे :(" यावर उत्तर म्हणून एक नतद्रष्ट "हिहिहिहि" असा हसला. पण लगेचच सर्वजण सक्रिय झाले आणि सूचनांचा पाऊस पडला. - रेल्वे मिनीस्टरला ट्वीट करा, लगेच हिट घेवून येतील. - फोटो पण टाका बाणरावांनी लगेच सांगीतले. **दुपारी २ वाजून ३१ मिनीटे** "मेसेज केला, पोर्टलवर तक्रार केली" **दुपारी २ वाजून ३८ मिनीटे** मी विचारले - रेल्वे हेल्पलाईनकडून कॉल आला का? बाणराव **दुपारी २ वाजून ४० मिनीटे** "कॉल नाही, फक्त मेसेज आला, जाँच सुरू आहे म्हणे" आणि त्यांनी रेल्वेचा मेसेजही चिकटवला Indian Railways-CD: Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. -"नीट कार्यवाही झाली तर मिपावर धागा टाकायला विसरू नका" असे सांगून मी एका धाग्याची सोय करून घेतली :D बाणराव - अर्थातच.. पण शक्यता कमी वाटते. असा सावध पवित्रा घेतला. नंतर अवांतर चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात बाणरावांचा अपडेट आला **दुपारी २ वाजून ५३ मिनीटे** "आत्ताच रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले". एवढ्यावरच कपिलमुनींनी टाळ्या पिटून जल्लोश सुरू केला. मुनींच्या उत्साहावर बाणरावांनी "कोणी येऊन तर दे आधी" असे लिहून पाणी ओतले. -आत्ता 100 झुरळे आहेत, हिट मारलं तर लपलेली 1000 बाहेर पडतील. असाही एक सल्ला आला. **दुपारी २ वाजून ५७ मिनीटे** "रेल्वेचा माणूस आला". अशी घोषणा बाणरावांनी केली. आणि पुराव्यादाखल त्याचे सात आठ फोटो टाकले. बाणरावांच्या समस्येचे इतक्या लगेच निराकरण झाले हे बघून सर्वांनाच आनंद झाला. - नमो प्रभुजी - माझा स्वतःच विश्वास बसत नाही. (हे खुद्द बाणराव) - टाळ्या टाळ्या टाळ्या - आयला भारी आहे खरच आपण भारतात राहतो ? - नक्की Indian Railway?? - अच्छे दिन कुठेतरी येतायत रे - जबरदस्त, याला म्हणतात अच्छे दिन - बाणराव मान गएं..! - It's impressive, Too Good (हे लिहिणार्‍याने "टू गुड" लिहून त्या खाली एका नटीचा (सभ्य) फोटो टाकल्याने "टू गुड" नक्की कशासाठी लिहिले आहे यावर एक छोटासा उद्बोधक परिसंवाद घडला. ;) ..आणि आम्ही सर्वांनी ही घटना आणि फोटो बाकीच्या ग्रूप्सवरती चिकटवायला सुरूवात केली. माझ्या एका काकाने अरे ते डासांचे हिट आहे अशी शंका काढली, मी ती शंका पुन्हा मिपा ग्रूपवर विचारताच Mosquito hit also works on cockroaches.It contains d allethrin. असा खुद्द डॉक्टर खरेंचा रिप्लाय आला. ऑथॉरिटी कडून सर्टिफिकेट मिळाल्याने शंकानिरसन झाले. एका उत्साही मिपाकराने लगेच खालचा मेसेज लिहून व्हायरल केला. ********************** अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे. हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला. मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31 Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40 रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53 रेल्वेचा माणूस आला: 14:57 थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल ;) **********************
  • Log in or register to post comments

मोदका

नाखु
Fri, 02/26/2016 - 10:02 नवीन
किती धोतरे/पँटी फेडशील रे जरा वाच आजची मुक्ताफळे नाही नारोबा नाही जरा शिकलेला माणुस काय म्हणतो ते ! रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प होता की घोषणापत्र, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्याच योजना नव्या रूपात मांडण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या शिवसेनेच्या सुरेश प्रभूंना भाजपच्या कोट्यातून रेल्वे मंत्री केल्याने त्यांच्याकडून काही तरी चांगली कामगिरी होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस रेल्वे अर्थसंकल्प हा करेंगे, देखेंगे, सोचेंगे प्रकारचा पूर्णपणे दिशाहीन असून, सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री नसून ‘हाउस किपिंग मंत्री’ आहेत. रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नसली, तरी अर्थसंकल्पाशिवाय वर्षभर कोणत्या न कोणत्या छुप्या मार्गाने भाडेवाढ करण्याची भाजप सरकारला सवय आहे. - नवाब मलिक, प्रवक्‍ता, राष्ट्रवादी काँग्रेस

वस्तुस्थीती

मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला ४७६८ कोटी रुपयांचा निधी आला आहे. गेल्या अनेक वर्षांत राज्याला रेल्वे अर्थसंकल्पात मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे. त्यामुळे राज्यावर प्रभू कृपा झाली असल्याचे म्हणता येईल. राज्यात सात नवीन सर्वेक्षणे, अकरा नवीन मार्गांचे काम व सहा विद्युतीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय राज्यात एकतीस रोड ओव्हर ब्रीज व पस्तीस रोड अंडर ब्रीज बांधण्यात येणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नटीचा (सभ्य) फोटो

कपिलमुनी
Fri, 02/26/2016 - 10:24 नवीन
आधीचा मिपा असता कर आधी फोटो मागितला असता . बाकी काही तथाकथित नमोविरोधक पण खुश होते असा ऐकण्यात आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

समस्येचे एवढ्या लवकर निराकरण

बाळ सप्रे
Fri, 02/26/2016 - 15:13 नवीन
समस्येचे एवढ्या लवकर निराकरण झालेले ऐकुन खूपच छान वाटले .. इथे प्रभूंचे कौतुक करायला हवेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अभिनंदन बाणराव..

मोदक
Fri, 02/26/2016 - 09:39 नवीन
अभिनंदन बाणराव.. दररोज सुमारे दोन कोटी तीस लाख प्रवासी भारतभर रेल्वेतून प्रवास करत असताना तुमच्या शंकेचे केवळ २७ मिनीटात निराकरण झाले हे बघून खरंच आनंद वाटला. (अगदी ०.०१% लोक्स तक्रारी करतात असे गृहीत धरले तरी दिवसाच्या २३००० तक्रारी झाल्या!!) या आधी सुषमा स्वराज, सुरेश प्रभु यांची ट्विटरची कामगिरी वाचली होती मात्र असे काहीतरी "लाईव्ह" पाहण्याची पहिलीच वेळ. खूप खूप भारी वाटले.
  • Log in or register to post comments

मोदकराव सविस्तर प्रतिसादासाठी

मदनबाण
Fri, 02/26/2016 - 10:03 नवीन
मोदकराव सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद ! :) प्रभुजींचा रेल्वे बजेट सादर करण्याचा दिवस आणि मला रेल्वेच्या रॅपिड अ‍ॅक्शनचा अनुभव त्याच दिवशी यावा हा मोठा योगा-योगच म्हणावा लागेल ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रभुजींचा रेल्वे बजेट सादर

प्रसाद१९७१
Fri, 02/26/2016 - 10:10 नवीन
प्रभुजींचा रेल्वे बजेट सादर करण्याचा दिवस आणि मला रेल्वेच्या रॅपिड अ‍ॅक्शनचा अनुभव त्याच दिवशी यावा हा मोठा योगा-योगच म्हणावा लागेल ! :)
बजेट च्या धामधुमीत ही रेल्वे चे अधिकारी त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन होते हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाणा, हे पँट्रीचे फोटोही

यशोधरा
Fri, 02/26/2016 - 09:55 नवीन
बाणा, हे पँट्रीचे फोटोही पाठवून दे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

जेपी
Fri, 02/26/2016 - 10:26 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

रोचक. पेप्रात रेग्य्लरली

अनुप ढेरे
Fri, 02/26/2016 - 10:31 नवीन
रोचक. पेप्रात रेग्य्लरली बातम्या वाचतो. ते खरच घडतं हे पाहून आनंद वाटला. धाग्या टाकल्याबद्दल धन्यवाद. फॉरवर्ड करत आहे लिंक.
  • Log in or register to post comments

अत्यंत कार्यक्षम

राही
Fri, 02/26/2016 - 10:57 नवीन
श्री. सुरेश प्रभु हे सध्याच्या मंत्रीमंडळातील सर्वांत कार्यक्षम आणि सर्वांत लोकाभिमुख मंत्री आहेत. त्यांना कार्यक्षमतेत प्रथम क्रमांक दिल्यास प्रथम आणि द्वितीय क्रमांकांत फार मोठे अंतर असेल, इतके ते कार्यक्षमतेत पुढे आहेत. आणि ही त्यांची कार्यक्षमता आजची नाही. म्हणून त्यांच्याकडे निवेदने पाठवावीशी वाटतात. (गुरुदास कामतांचाही चांगला अनुभव आला होता.)
  • Log in or register to post comments

(गुरुदास कामतांचाही चांगला

प्रसाद१९७१
Fri, 02/26/2016 - 12:25 नवीन
(गुरुदास कामतांचाही चांगला अनुभव आला होता.)
तुमच्या तेलाच्या विहीरी असतील म्हणुन तुम्हाला चांगला अनुभव आला असेल, किंवा तुम्ही काकांच्या नातेवाईक असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

कार्यक्षम मंत्री .

रॉजरमूर
Sun, 03/06/2016 - 11:47 नवीन
कार्यक्षम मंत्री . छान वाटले . हेच नितीन गडकरी यांच्याविषयीही ऐकून आहे . त्यांच्याही कामाचा उरक प्रचंड आहे. रस्तेबांधणीचा कि.मी./दिवस वेग विलक्षण वाढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

क्या बात! भारी.

नाव आडनाव
Fri, 02/26/2016 - 10:58 नवीन
क्या बात! भारी.
  • Log in or register to post comments

बातमी वाचून आनंद वाटला.गेले

अजया
Fri, 02/26/2016 - 11:05 नवीन
बातमी वाचून आनंद वाटला.गेले तीन दिवस अच्छे दिन आल्यासारखे वाटते आहे.अनुराग ठाकूर,इराणी बाईंचे भाषण,रेल्वे अर्थसंकल्प आणि तुमची आजची खबर! यापूर्वी असे वाचून मला खोटा प्रचार वाटत असे.आता एका मिपाकराने अनुभवले आहे म्हंटल्यावर खात्री पटली!
  • Log in or register to post comments

यापूर्वी असे वाचून मला खोटा

भिंगरी
Sun, 02/28/2016 - 15:19 नवीन
यापूर्वी असे वाचून मला खोटा प्रचार वाटत असे.आता एका मिपाकराने अनुभवले आहे म्हंटल्यावर खात्री पटली! मलाही अगदी असेच वाटायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बाणा लय भारी काम केलेस गड्या.

प्रमोद देर्देकर
Fri, 02/26/2016 - 11:16 नवीन
बाणा लय भारी काम केलेस गड्या. ये हितस , ये मोगा येऽ रे ये. बघ हे नमो नमः काम बघ.
  • Log in or register to post comments

असे अनुभव वाचले की बरे वाटते

मार्मिक गोडसे
Fri, 02/26/2016 - 11:22 नवीन
असे अनुभव वाचले की बरे वाटते. प्रत्येक मिपाकरानी वाचावा व प्रतिसाद द्यावी असा हा धागा आहे. स्प्रेपूर्वी व स्प्रेनंतरचे झुरळांचे फोटो द्यायला हवे होते. एक शंका बहुतेक ही झुरळे तुमची जागा अडवून बसलेल्या लोकांच्या सामानातून आली असतील. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात झुरळे डब्यात एकाच ठिकाणी मर्यादीत राहू शकत नाही, सपुर्ण डबा झुरळांनी 'आरक्षीत' केला असता.
  • Log in or register to post comments

झुरळांची हत्या

कपिलमुनी
Fri, 02/26/2016 - 12:41 नवीन
झुरळांच्या हत्येवर रागां यांनी निषेध व्यक्त केला असून हे सरकार पिछडे हुये झुरळोंके विरोधात असल्याची टीका केली आहे. डाव्या पक्षांनी या विरोधात हीट चे डबे( रिकामे) पेटवून मोर्चा काढला. बाकी बातम्या लौकरच...
  • Log in or register to post comments

छान रे बाणा

मन१
Fri, 02/26/2016 - 12:47 नवीन
बरं वाटलं ऐकून. खानपान सेवाही जरा सुधारेल , स्वच्छ होइल लहोइल; अशी आशा करतो. . . बादवे, महिन्या दीड महिन्याखाली प्रधानमंत्री सडक योजना की काहीतरी तिची सकाळमध्ये जाहिरात होती. रस्त्यात खड्डे असतील; तर फोटो काढा आणि पुढील यु आर एल वर अपलोड करा म्हणून. ती जाहिरात सापडत नाहिये. कुणाला आठवते आहे का ?
  • Log in or register to post comments

तपोवन एक्स्प्रेस हि दिवसभर

सुबोध खरे
Fri, 02/26/2016 - 12:48 नवीन
तपोवन एक्स्प्रेस हि दिवसभर चालणारी फक्त बसायची सोय असलेली गाडी आहे आणी त्यात आरक्षित प्रवाशांच्या तिप्पट माणसे नेहेमीच प्रवास करताना आढळतात. या गाडीचे डबे जुने आहेत आणी रचना जुन्या पद्धतीची आहे ज्यात हार्डनर शीट बाजूला प्यानेल म्हणून लावलेली आहेत. या शीटच्या मध्ये मोठ्या भेगा आहेत त्यात झुरळे जाऊन बसतात. आपल्या जनतेच्या स्वच्छतेबद्दल न बोलणेच श्रेयस्कर आहे. हि गाडी आपण मुंबई सी एस ती ला किंवा नांदेडला पहिलीत तर स्वच्छ असते पण पुढच्या दोन तासात म्हणजे कसाऱ्याच्या पुढे किंवा परत येताना परभणीच्या पुढे अतिशय अस्वच्छ् आढळते. खावे तेथे हगावे या वृत्तीचे आपण लोक आहोत.खालील दुवा आपण मुद्दाम उघडून पाहावा. http://www.scoopwhoop.com/Mahanama-Express-Dirty/ त्यामुळे शेंगांची साले, वड्याचे /पावाचे तुकडे, बिस्किटाचे तुकडे इतस्ततः पसरलेले आढळतात. याच्यावर हि झुरळे पोसली जातात. पान खाऊन न रंगलेला कोपरा तर शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. रेल्वेत कचरा केला तर तत्काळ शंभर रुपये दंड अन्यथा सात दिवस तुरुंगवास अशी शिक्षा कठोरपणे एक वर्ष राबविली तरच रेल्वे स्वच्छ राहील अशी परिस्थिती आहे. शहाण्या माणसाने तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करू नये अशी परिस्थिती आहे. आपल्याला आरक्षित जागेवर बसू देतात हेच उपकार आहेत अशी परिस्थिती आहे. जन्शताब्दीची परिस्थिती बरी आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

रंगासेठ
Fri, 02/26/2016 - 13:25 नवीन
सहमत. पब्लिकला फुकट सोयी हव्यात पण स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. कारवाई होतेय असं लक्षात आल्यावरच अशा गोष्टींना काही प्रमाणात आळा बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लै भारी वाटलं राव ऐकून. असे

बॅटमॅन
Fri, 02/26/2016 - 12:51 नवीन
लै भारी वाटलं राव ऐकून. असे काही पाहिल्यावरती अच्छे दिन म्हणजे फक्त फेकूगिरी नव्हे असे वाटते.
  • Log in or register to post comments

संताप याचा वाटतो कि जे करायचे

सुबोध खरे
Fri, 02/26/2016 - 12:52 नवीन
संताप याचा वाटतो कि जे करायचे ते सरकारनेच हि वृत्ती आहे.मी घाण केली तर काय जाते? माझ्या सारखा एखादा माणूस कोणाला कचरा करतो म्हणून बोलला तर तुमच्या बापाची गाडी आहे का? असे उत्तर मिळते. लष्करात असताना आणी तरुण होतो तेंव्हा भांडण करत असे. शेवटी माणसांची वृत्ती बदलत नसल्याने आता तोंडची वाफ दवडणे आता सोडून दिले आहे. जिथे तिथे घाण करायलाच आपल्याला लोकशाही हवी आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

+११

नाखु
Fri, 02/26/2016 - 13:13 नवीन
पूणे बससेवेत असे सांगीतल्यावर इतर प्रवाश्यांनी साथ द्यायय्ची सोडून जाऊद्या (येडाच) दिसतोय असा अविर्भाव अनुभव्लाय. आणि त्यानंतर पानवाल्याने जोमाने सीट्खालची जागा रंगकाम चालू ठेवले.. घरचे सोबत असले की (माझ्यामुळे) त्यांची कुचंबणा होते असे वारंवार झालेला नाखु. इथे अवांतर वाटेल असा किस्सा. सुमारे १ १/२ वर्षांपुर्वी पुण्यात सायन्स एक्स्प्रेस आली होती.केंद्रीय मंत्री श्रीमान जावडेकर आले होते (खडकी रेल्वे स्टेशन वर) एक चांगल्या (उच्च शिक्षीत) घरातील तरूण दोन तीन लहान मुलांसोबत्,व तीन ललनांना थोडे दूर उभे करून (नंतर बोलावणार्च होता) रांगेत घुसू पहात होता. सुमारे ८०० पेक्षा जास्त लोकांची रांग (आणी सतत वाढतच होती कारण तो शेवटचा दिवस होता प्रदरशन यात्रेचा) माझ्या पुढे किमान ३००-४०० जण . हा इसम इकडे तिकडे मुलांना चित्र दाखवतो असे भासवून माझ्या पुढे येऊन उभा राहिला . माझ्या मुलाने व मुलीने (वय ८) लगेच मला तो घुसल्याचे दाखवले. (तो पर्यंत सोबतच्या ललनांना तुम्ही समांतर चालत रहा मी कोपर्यावर युम्हाला रांगेत घेतो अश्या खाणाखुणा चालूच होत्या) मी जोरदार आक्षेप घेतला. माझ्या मुलानेही तुम्ही रांगेत नव्हता आत्ता घुसला असे मोठ्याने सांगीतले. रेल्वे सुऱ़क्शा रक्षक येताना पाहुन तो म्हणाला तुम्च्या मागे थांबतो तुम्ही पुढे व्हा मग तर झाले. (पण ललनांना इंग्र्जी मध्ये तारे तोडताना काही तरी बुल शीट असे आमच्या कडे बोट दाखवून म्हणाल्याचे मीच ऐकले) मग मी माझ्या मागच्यांनाही विचारले (मारवाडी १५-२० कुटुंब काबीला मुलांसमवेत होता) तुमच्या पुढे हे घुसून आलेले आहेत थांबले तर चालेल का असे मागच्या किमान १०-१२ लोकांना विचारले. सगळ्यांनी जोरदार हरकत घेतली आणि एका सरदारजीने उद्धार केल्यावर तो ललनांसमवेत गायब झाला. मुलगा म्हणाला बाबा आपण जाताना तो आपल्याशी नक्की भांडेल (कारण ललनांबरोबर दोन तीन कॉलेज युवकही होते वाटते) पण मी म्हटले अत्ता प्रदर्शन पाहू पुढचे पुढे. प्रदशन पाहून आलो तर रांगेच्या शेवटी (मुलांच्या अट्टाहासाने उभा राहिलेला दिसला , आधिच थांबला असता रांगेत तर किमान २०० एक नी नंबर पुढे मिळाला असता ( रांग वेगाने पुढे सरकत होती) मुलाच्या धारिष्ट्याचे मला कौतुक वाटले. (त्याने थेट जावडेकरांशी हस्तांदोलन केले मी फोटोही घेऊ शकलो नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चांगला बदल होतोय...

सतिश पाटील
Fri, 02/26/2016 - 13:16 नवीन
चांगला बदल होतोय... आधी मला वाटले कि तुम्ही त्या प्यानट्रीच्या स्वच्छतेबद्दल बोलाल. तुम्ही पहिली ती प्यानट्री बऱ्यापैकी साफ स्वच आहे.
  • Log in or register to post comments

जिथे तिथे पसरवा हा चांगला

वेल्लाभट
Fri, 02/26/2016 - 13:20 नवीन
जिथे तिथे पसरवा हा चांगला-वाईट अनुभव. प्रभूंचं हँडल ट्वीटला आवर्जून प्रतिसाद देतं. तेंव्हा ट्वीट करा. चेपुवर टाका. आणि इथे सादर केल्याबद्दल आभार. मी पसरवू का? काही लिंक वगैरे असल्यास द्या नाहीतर मिपा धाग्याची लिंकच पसरवतो.
  • Log in or register to post comments

छान अनुभव!

पैसा
Fri, 02/26/2016 - 13:24 नवीन
असे अनुभव सगळीकडेच अपवाद न रहाता नियम व्हावेत ही इच्छा आहे! पँट्रीच्या लोकांची स्वच्छता आणि डॉ खरे यांनी लिहिलेले लोकांच्या स्वच्छतेच्या सेन्सबद्दल अगदी १००% पटणारे. प्लॅस्टिक कचरा टाकायला लांब अंतराच्या गाड्यांत कचराकुंडी सदृश काहीतरी बेसिनच्या खाली असते. असा सगळा कचरा निदान एखाद्या कागदी/प्लॅस्टिक पिशवीत जमा करून त्याची नीट विल्हेवाट लावता येईल. पण रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर घाण टाकणे हे अगदी कॉमन आहे. दूधसागरच्या जंगलात रूळाच्या दोन्ही बाजूंना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि त्यात अन्न शोधणारी माकडे बघून कसनुसे झाले होते.
  • Log in or register to post comments

एक किस्सा सकाळी खफवर टाकला

कंजूस
Fri, 02/26/2016 - 13:29 नवीन
एक किस्सा सकाळी खफवर टाकला होता.
  • Log in or register to post comments

मदनबाण सर

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 02/26/2016 - 13:43 नवीन
तुर्तास मिपावर फ़क्त वचनमात्र आहे तरीही हा धागा पाहून राहावले नाही म्हणून कॉमेंट प्रपंच, बिहार मधे आमचे एडम (प्रशासकीय) ऑफिस आहे तिकडे बरेच वेळा काही कागदपत्रे पूर्तता करायला जाणे असते किंवा निवडणुकीच्या वेळी लागलेली ड्यूटी निमित्त सुद्धा बिहार जवळून पाहता आला दोन हजार अकरा पासुन सतत पाहतो आहेच बिहार तसा रेलवे स्टेशन पाहता, हा पुर्ण भाग ईस्ट सेंट्रल रेलवे उर्फ़ ईसीआर मधे पडतो एक अतिशय अंडरपरफ़ॉर्मर रेलवे डिवीज़न आहे हा,पण प्रभु आल्या पासुन (अन रेलवे राज्य मंत्री मनोज सिन्हा इकडील असल्यामुळे) विलक्षण फरक पडला आहे सकाळी आठ वाजता रेलवे प्लॅटफॉर्म धुवून लख्ख केलेले मी पाहिले आहेत हल्लीच बरं ते फ़क्त पटना नाही तर इतरही स्टेशन्सवर दिसते, एकदा समस्तीपुर स्टेशनवर एका सफाई कामगाराला पाहिले तो सकाळी सहा ला ट्रॅक धुवत होता एकदम तल्लीन होऊन त्याला बोलवले त्याच्याशी गप्पा केल्या कौतुक केले तर एकदम खुश झाला म्हणाला "सर अब और जोर से काम करेंगे हम सुबह सुबह तारीफ अच्छा लगता है" नुसते प्लॅटफॉर्म नाही तर ट्रॅक सुद्धा धुवून स्वच्छ केलेल्या असतात हल्ली हा पटना जंक्शन चा फोटो पाहून कल्पना यावी ह्या स्वच्छतेची स्वच्छ भारत + प्रभुंची कार्यकुशलता marvellous आहे अगदी Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात है सोन्याबापु. अजुन

प्रसाद१९७१
Fri, 02/26/2016 - 13:59 नवीन
क्या बात है सोन्याबापु. अजुन एक चांगली बातमी दिलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आयला बिहारात हे असे तर खरेच

बॅटमॅन
Fri, 02/26/2016 - 15:30 नवीन
आयला बिहारात हे असे तर खरेच सुधारणेची लै आशा आहे मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

धन्य्वाद

नाखु
Fri, 02/26/2016 - 15:44 नवीन
म्हणजे जिथे राज्य सरकार भाजपेयींचे नाही तिथे केंद्र सरकार काहीच काम करीत नाही हा आरोप बुद्ध्याच बोगस आणि बिनबुडाचा आहे तर !!!! प्रभु की लीला अपरंपार सेनेला अजूनही प्रभु आपले वाटत नाहीत (उद्धवा अजब तुझे सरकार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नाखुकाका...

मोदक
Fri, 02/26/2016 - 15:48 नवीन
नाखुकाका... रेल्वे केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने रेल्वे स्टेशन हा छोटासा केंद्रशासीत प्रदेश असल्यासारखा प्रकार असावा त्यामुळे येथे राज्यसरकार, केंद्रसरकार मुद्दा लागू नसावा - चुकीचे असल्यास तज्ञांनी दुरूस्त करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाही नाही

नाखु
Fri, 02/26/2016 - 15:55 नवीन
नांदेडकर आज सकाळीच ओरडत होते म्हणून म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नाय नाय मोदक शेठ एकदम बरोबर

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 02/26/2016 - 16:08 नवीन
नाय नाय मोदक शेठ एकदम बरोबर आहे हे! ह्याच केंद्रसरकारच्या मालकीच्या असलेल्या जागेच्या रक्षणार्थ आरपीएफ उर्फ़ रेलवे प्रोटेक्शन फोर्स हे डेडिकेटेड बल सुद्धा आहे एक Image removed. (हा त्यांचा फ्लॅग)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बॅटमॅन भाई,

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 02/26/2016 - 16:19 नवीन
बॅटमॅन भाई, नुसते इतकेच नाही तर अगदी बिहार च्या बिहारात धावणाऱ्या इंटरसिटी ने ३ तासाचा प्रवास केला तरी बरोबर प्रवास संपत आला की रेलवे कस्टमर केअरचा (१३९) चा कॉल येतो अन व्यवस्थित एक व्यक्ति (IVRS नाही) फीडबॅक घेतो/ते त्यात प्रवासाचा एकंदरित दर्जा , स्वच्छता, केटरिंग, एसी किंवा आसनव्यवस्था ह्यांच्याबद्दल फीडबॅक घेतला जातो अन त्याचा एक रेफेरेंस नंबर दिला जातो, एकदा सहज रेलवे मधे आलेल्या विक्रेत्याने कुरकुरे चे पॅकेट थोड़े महाग दिले म्हणून फीडबॅक दिला होता (२०१४ नोवेंबर) ते परतीच्या प्रवासात तोच गड़ी बाकायदा खाकी डगला घालुन (विक्रेत्यांचा) एमआरपी वर सामान देत होता. सहज चौकशी करता टीटीई म्हणाला की मागच्या वेळी कोण्या पॅसेंजर न कंप्लेंट केली (बहुतेक मीच) तर त्याला घालवुन दिला होता पण नंतर त्यांना अगदी नाममात्र रॉयल्टी अन लाइसेंस फी वर परवाने दिले आहेत आम्ही, म्हणजे त्यांच्या पोटावर लाथ ही नाही अन रेलवे ला सुद्धा इनकम एक खारीचा वाटा. अन हे सगळे मी सांगितल्या प्रमाणे ईस्ट सेंट्रल रेलवे मधे, बिहार मधे आधी वैक्युम करणे किंवा चेनपुलिंग भरपुर होत असे आता आरपीएफ वाल्यांना फाइबर ची दांडकी दिली आहेत वट्ट हाणतात एक एक नग धरुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मलाही बिहारचा चांगला अनुभव

मोदक
Fri, 02/26/2016 - 17:14 नवीन
मलाही बिहारचा चांगला अनुभव आहे. कलकत्त्याला जाताना खालच्या बर्थवरचा माणूस एकसुरात आणि लै मोठ्या आवाजात घोरत होता. ती रात्र जागून काढली. दुसर्‍या रात्रीच्या प्रवासात त्रास होवू नये म्हणून एका बिहारच्या स्टेशनवर उतरलो. गार्डाच्या डब्यात जावून त्या बाबाला म्हणालो "कापूस आहे का?" गार्ड : "हमारे पास नहीं है. पिलाटफॉर्म से लेके आईये" मी : टाईम लगेला. रहने दो. (..आणि मी निघायच्या तयारीत.) गार्ड : सुनीये.. आप लेके आईये, मै ट्रेन रूकवाता हूं. आणि मला त्याने "पटरीसे जाओ.. मै देख रहा हूं" असाही सल्ला दिला. अक्षरशः पाचव्या मिनीटाला मी माझ्यासाठी आणि सहप्रवाशांसाठी कापसाचे बंडल घेवून जागेवर बसलो होतो. ट्रेन खरोखरीच थांबवली की मी वेळेत परत आलो माहिती नाही पण त्याने आश्वस्त केले आणि खरोखरी थांबला होता. (हा प्रकार UPA 2 च्या काळात झालेला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है बापूसाहेब!

बॅटमॅन
Sun, 02/28/2016 - 15:25 नवीन
क्या बात है बापूसाहेब! बिहारमध्ये काही चांगलेही होऊ शकते तर. मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

औघड आहे.

सस्नेह
Fri, 02/26/2016 - 15:00 नवीन
तुमच्या एकाच सीटमधे झुरळे होती आणि अलिकडे पलिकडे नाही हे कसे ?
  • Log in or register to post comments

ते असते ना.. गल्लीतल्या एकाच

मोदक
Fri, 02/26/2016 - 16:06 नवीन
ते असते ना.. गल्लीतल्या एकाच बाजूची लाईट जाते कधी कधी.. आणि दुसरी बाजू फुल्ल लाईटमध्ये दिवाळी साजरी करत असते.. तसे काहीसे असेल. लै शंका राव तुम्हाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा