माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे.
प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता. जालना स्टेशनवर तपोवन मधे सहकुटुंब चढलो ते मुंबइच्या परतीच्या प्रवासासाठी,आरक्षित केलेल्या जागी काही मंडळी आधीच ठाण मांडुन बसली होती ! त्यांना उठवण्याचे अवघड सोपस्कार सुरु करावे लागले,आमची आसन व्यवस्था दरवाजाला लागुन असलेल्या बर्थपासुनच होती, त्यामुळे आमच्या मागुन चढणार्यांचा देखील खोलंबा होत चालला होता. एक बाई मोबल्यावर बोलत होती,आम्ही तिला ही आमची आरक्षित जागा आहे ते वारंवार सांगुन देखील ती बाई फोनवर बिजी होती, शेवटी एकदाची ती तोंड वाकडं करुन हलली. पण त्या नंतर जो प्रकार पाहिला आणि अनुभवला तो किळसवाणा आणि घाण वाटणारा होता. आमच्या सिटवर आणि आजुबाजुच्या सीटवर मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी झुरळे फिरुन होती ! एखाध्या मुंगांच्या वारुळात काडी फिरवुन ते विस्कटावे व त्यानंतर चवताळलेल्या मुंग्या जश्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याच प्रमाणे अनेक झुरळे तिथे फिरत होती,फक्त ती आरामात फिरत होती हाच काय तो फरक असावा !
आमच्या आधी आमच्या आरक्षित बर्थवर लोक या अवस्थेत कसे काय बसुन होते ? याचे मला नवल वाटले आणि किळस सुद्धा....
मग मी, माझे तिर्थरुप कसे बसे आधीच्या लोकांना उठवुन सामान ठेवुन तिथे बसावे कसे या विवंचनेत पडलो... सामान लावे पर्यंत मी हातात चप्पल घालुन किमान १०-१२ झुरळे तरी मारली असावीत. मी, माझे तिर्थरुप, माझी बायडी मिळुन बर्थवर बसता यावे म्हणुन झुरळे मारत होतो आणि बोगीतली माणंस हा चाललेला तमाशा आवडीने पाहत होती. क्षणभर असे वाटले की झालं आता एक पण झुरळ यायचे नाही म्हणुन बर्थवर बसलो... काही क्षणातच माझी नजर माझ्या पिल्लाकडे गेली, तर तिच्या कानात झुरळ जाईल इतपत ते तिच्या अंगावर चढले,तर तेव्हढ्यात माझ्या मातोश्रींच्या साडीवर ही एक मिशीदार प्राणी वळवळ करताना दिसला आणि माझा संताप ! संताप ! झाला... आता पुढचा प्रवास कसा करावा ? काय करावे ? स्वतःच्याच आरक्षित बर्थ असुन त्यावर बुड टेकवण्याचे सुद्धा वांदे झाले होते !
तेव्हढ्यात माझ्या तिर्थरुपांना आधी प्रवास केलेल्या ट्रेन मधली कुठलीशी जाहिरात आठवली, जिच्यावर कुठलासा नंबर लिहिला होता...इथे ट्रेन धावर होती पण आम्हाला आमच्याच सीटवर बसता येइना, वडिलांना तो त्यांनी पाहिलेला नंबर आठवेना ! शेवटी मी मोबल्यावरुन माहिती शोधण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला.
http://www.coms.indianrailways.gov.in/criscm/common/complaint_registrat…
ही लिंक सापडली आणि त्यावर विचारलेली माहिती दिली आणि फॉर्म सेव्ह केला.अजुन काय करता येइल ? असे विचार करुन चालत्या ट्रेन मधे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा सुद्धा भरवसा नव्हता, तिथे अजुन हाती काही लागते का ? याचा शोध सुरु ठेवला... आणि 8121281212 हा नंबर जालावर सापडला , मग मी माझ्या मोबाईलवरुन आणि तिर्थरुपांच्या मोबाईल वरुन या नंबरवर मेसेज केला. एका ओळीत कसा बसा त्या गर्दीत उभे राहुन मेसेज केला आणि हा घटनाक्रम कायअप्पावर ग्रुप मध्ये कळवला, मला काही घडेल याची काडीमात्र अपेक्षा नव्हती. माज्या मेसेजचा रिप्लाय म्हणुन इन इनव्हिस्टीगेशन असा रिप्लाय आला जो बउधा ऑटोमेटेड असावा. पण काही वेळातच माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि तो रेल्वेकडुनच होता. नक्की काय झाल असा दाक्षिणात्य टोन मधुन हिंदीतुन विचारणा केली गेली, मी जमेल तसे सांगितले...माझ्या पिल्लाच्या कानात जाईल इतपर झुरळे आहेत असे सांगितल्यावर अय्ययो असा काळजी युक्त स्वर ऐकायला मला मिळाला. { या बाईचे नाव मी विचारले होते, पण आता विसरलो आहे.} माझे नाव इतर माहिती आणि पुढे औरंगाबाद { संभाजीनगर } येणार आहे असे तिला कळवले. ठीक आहे माणसे येतील असे तिने मला कळवले आणि कोण आले नाही तर याच नंबरवर कॉल करा { ज्या नंबर वरुन मला फोन आला होता त्या} असे त्या महिलेने सांगितले. काही काळाने औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन आले,आणि गाणी थांबताच आमच्या खिडकी समोर माणुस उभा ठाकला !
चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले
विचार करु लागला...
मग...
स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला.
स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले !
-
-
-
-
-
-
काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्याने कैद केले !
हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो....
रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते...
संदर्भ धागे :-
सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस
माझी रेल्वे यात्रा

वाचने
18735
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! छान वाटलं!
अभिनंदन
खूप चांगले वाटले. योग्य माणसे
परवा अमच्या सोलापुरच्या
पॅन्ट्री>> तेच म्हणणार होतो.
In reply to परवा अमच्या सोलापुरच्या by अभ्या..
+१
In reply to पॅन्ट्री>> तेच म्हणणार होतो. by तर्राट जोकर
+१..
In reply to +१ by तुषार काळभोर
वाचून बरं वाटायला लागलं
फारच उत्तम अनुभव. अश्या
अरे व्वा. झक्कास धागा..
**दुपारी २ वाजून ३० मिनीटे** "आत्ता तपोवन एक्प्रेसनी मुंबईला परत येतोय, गाडीत प्रचंड झुरळे आहेत, मी आत्तापर्यंत १० झुरळे मारली, बसणे कठीण आहे :("यावर उत्तर म्हणून एक नतद्रष्ट "हिहिहिहि" असा हसला. पण लगेचच सर्वजण सक्रिय झाले आणि सूचनांचा पाऊस पडला. - रेल्वे मिनीस्टरला ट्वीट करा, लगेच हिट घेवून येतील. - फोटो पण टाका बाणरावांनी लगेच सांगीतले.**दुपारी २ वाजून ३१ मिनीटे** "मेसेज केला, पोर्टलवर तक्रार केली"**दुपारी २ वाजून ३८ मिनीटे** मी विचारले - रेल्वे हेल्पलाईनकडून कॉल आला का? बाणराव**दुपारी २ वाजून ४० मिनीटे** "कॉल नाही, फक्त मेसेज आला, जाँच सुरू आहे म्हणे" आणि त्यांनी रेल्वेचा मेसेजही चिकटवला Indian Railways-CD: Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation.-"नीट कार्यवाही झाली तर मिपावर धागा टाकायला विसरू नका" असे सांगून मी एका धाग्याची सोय करून घेतली :D बाणराव - अर्थातच.. पण शक्यता कमी वाटते. असा सावध पवित्रा घेतला. नंतर अवांतर चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात बाणरावांचा अपडेट आला**दुपारी २ वाजून ५३ मिनीटे** "आत्ताच रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले".एवढ्यावरच कपिलमुनींनी टाळ्या पिटून जल्लोश सुरू केला. मुनींच्या उत्साहावर बाणरावांनी "कोणी येऊन तर दे आधी" असे लिहून पाणी ओतले. -आत्ता 100 झुरळे आहेत, हिट मारलं तर लपलेली 1000 बाहेर पडतील. असाही एक सल्ला आला.**दुपारी २ वाजून ५७ मिनीटे** "रेल्वेचा माणूस आला".अशी घोषणा बाणरावांनी केली. आणि पुराव्यादाखल त्याचे सात आठ फोटो टाकले. बाणरावांच्या समस्येचे इतक्या लगेच निराकरण झाले हे बघून सर्वांनाच आनंद झाला. - नमो प्रभुजी - माझा स्वतःच विश्वास बसत नाही. (हे खुद्द बाणराव) - टाळ्या टाळ्या टाळ्या - आयला भारी आहे खरच आपण भारतात राहतो ? - नक्की Indian Railway?? - अच्छे दिन कुठेतरी येतायत रे - जबरदस्त, याला म्हणतात अच्छे दिन - बाणराव मान गएं..! - It's impressive, Too Good (हे लिहिणार्याने "टू गुड" लिहून त्या खाली एका नटीचा (सभ्य) फोटो टाकल्याने "टू गुड" नक्की कशासाठी लिहिले आहे यावर एक छोटासा उद्बोधक परिसंवाद घडला. ;) ..आणि आम्ही सर्वांनी ही घटना आणि फोटो बाकीच्या ग्रूप्सवरती चिकटवायला सुरूवात केली. माझ्या एका काकाने अरे ते डासांचे हिट आहे अशी शंका काढली, मी ती शंका पुन्हा मिपा ग्रूपवर विचारताच Mosquito hit also works on cockroaches.It contains d allethrin. असा खुद्द डॉक्टर खरेंचा रिप्लाय आला. ऑथॉरिटी कडून सर्टिफिकेट मिळाल्याने शंकानिरसन झाले. एका उत्साही मिपाकराने लगेच खालचा मेसेज लिहून व्हायरल केला. ********************** अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे. हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला. मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31 Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40 रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53 रेल्वेचा माणूस आला: 14:57 थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल ;) **********************मोदका
In reply to अरे व्वा. झक्कास धागा.. by मोदक
वस्तुस्थीती
नटीचा (सभ्य) फोटो
In reply to अरे व्वा. झक्कास धागा.. by मोदक
समस्येचे एवढ्या लवकर निराकरण
In reply to अरे व्वा. झक्कास धागा.. by मोदक
अभिनंदन बाणराव..
मोदकराव सविस्तर प्रतिसादासाठी
In reply to अभिनंदन बाणराव.. by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाप्रभुजींचा रेल्वे बजेट सादर
In reply to मोदकराव सविस्तर प्रतिसादासाठी by मदनबाण
बाणा, हे पँट्रीचे फोटोही
लेख आवडला.
रोचक. पेप्रात रेग्य्लरली
अत्यंत कार्यक्षम
(गुरुदास कामतांचाही चांगला
In reply to अत्यंत कार्यक्षम by राही
कार्यक्षम मंत्री .
In reply to अत्यंत कार्यक्षम by राही
क्या बात! भारी.
बातमी वाचून आनंद वाटला.गेले
यापूर्वी असे वाचून मला खोटा
In reply to बातमी वाचून आनंद वाटला.गेले by अजया
बाणा लय भारी काम केलेस गड्या.
असे अनुभव वाचले की बरे वाटते
झुरळांची हत्या
छान रे बाणा
तपोवन एक्स्प्रेस हि दिवसभर
सहमत
In reply to तपोवन एक्स्प्रेस हि दिवसभर by सुबोध खरे
लै भारी वाटलं राव ऐकून. असे
संताप याचा वाटतो कि जे करायचे
+११
In reply to संताप याचा वाटतो कि जे करायचे by सुबोध खरे
चांगला बदल होतोय...
जिथे तिथे पसरवा हा चांगला
छान अनुभव!
एक किस्सा सकाळी खफवर टाकला
मदनबाण सर
क्या बात है सोन्याबापु. अजुन
In reply to मदनबाण सर by कैलासवासी सोन्याबापु
आयला बिहारात हे असे तर खरेच
In reply to मदनबाण सर by कैलासवासी सोन्याबापु
धन्य्वाद
In reply to आयला बिहारात हे असे तर खरेच by बॅटमॅन
नाखुकाका...
In reply to धन्य्वाद by नाखु
नाही नाही
In reply to नाखुकाका... by मोदक
नाय नाय मोदक शेठ एकदम बरोबर
In reply to नाखुकाका... by मोदक
बॅटमॅन भाई,
In reply to आयला बिहारात हे असे तर खरेच by बॅटमॅन
मलाही बिहारचा चांगला अनुभव
In reply to बॅटमॅन भाई, by कैलासवासी सोन्याबापु
क्या बात है बापूसाहेब!
In reply to बॅटमॅन भाई, by कैलासवासी सोन्याबापु
औघड आहे.
ते असते ना.. गल्लीतल्या एकाच
In reply to औघड आहे. by सस्नेह
ओ मालक,
In reply to ते असते ना.. गल्लीतल्या एकाच by मोदक
@ मार्मिक गोडसे आणि
In reply to ते असते ना.. गल्लीतल्या एकाच by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाहाच धागा
एक अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाबाण राव
In reply to एक अपडेट by मदनबाण
बाण राव त्या प्यांट्री बद्दल
In reply to बाण राव by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाअर्धशतकाबद्दल झुरळ निर्दालक
छान
खूप चांगला अनुभव बाणराव !!
सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत
बोरिवली स्टेशनबद्दल विशेष
In reply to सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत by सुहास झेले
हो.. आमचे होम ग्राउंड ;-)
In reply to बोरिवली स्टेशनबद्दल विशेष by अनुप ढेरे
काय मस्त दिसतय. मजा आली.
In reply to हो.. आमचे होम ग्राउंड ;-) by सुहास झेले
पुणे स्टेशनवरपण असच केलय.
In reply to काय मस्त दिसतय. मजा आली. by प्रसाद१९७१
हे करणा-या संघटनेशी मी संपर्क
In reply to हो.. आमचे होम ग्राउंड ;-) by सुहास झेले
वा वा!
सक्रिय लोकशाही
माध्यमांना अश्या बर्याचश्या
In reply to सक्रिय लोकशाही by डॉ सुहास म्हात्रे
नक्कीच छान अनुभव.शेअर करावा
आश्वासक अनुभव