✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Mission भगीरथ

आ
आदित्य अनिल रुईकर यांनी
Sat, 02/27/2016 - 22:11  ·  लेख
लेख
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. त्यादृष्टीने प्रकाशकांशी बोलणे, करार इत्यादी सुरूच आहे. पण प्रत्यक्ष कादंबरी छापून विक्रीस येण्यास थोडा अवधी लागणार आहे. त्या दरम्यान माझ्या मित्रांसाठी व मराठी साहित्य प्रेमींसाठी माझी ही कादंबरी मी प्रिंट प्रत अथवा pdf प्रत या स्वरूपात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या कादंबरी चे नाव आहे.... " मिशन भगीरथ" आणि त्याचे कथानक थोडक्यात असे आहे की, 'एक कॉलेज युवक, त्याला पडत असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेत, पहिला नेपाळ आणि नंतर तिबेटमध्ये जाऊन पोहचतो. तिकडे त्याला कळते की, चिनी सैन्याचा एक गट भारताविरुद्ध खूप मोठे षडयंत्र रचत आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी भारतावर खूप मोठे संकट आणण्याचा प्रयत्नात त्यांनी कामही सुरु केलं आहे. तो युवक, त्याबद्दलचे पुरावे गोळा करतो. त्याच्या मदतीला तिबेटी योद्धे आणि छोटा कैलासवर राहणाऱ्या योगींचे काही साधक येतात. ते सर्व मिळून शौर्याची पराकाष्टा करतात. देशावर येणाऱ्या महाभयंकर संकटमधून देशाला वाचवण्यासाठी हा युवक खूप धडपड करतो. देशाचे पंतप्रधान आणि लष्कर मिळून अतिशय योजनाबद्ध आणि गुप्तपणे एक मिशन राबवतात. त्या मिशनला " मिशन भगीरथ" असे संबोधले जाते. देशावर येणाऱ्या या आपत्तीचे रूपांतर यशस्वी रित्या इष्टापत्तीमध्ये करून देशाचा फायदाच घडवला जातो. मिशन भगीरथ या कादंबरीत, अडीअडचणीवर मात करून यश मिळवलेल्या व देशाला भयंकर संकटातून वाचवण्यासाठी सर्वशक्ती पणाला लाऊन काम केलेल्या एका युवकाची रोचक कथा अपणापुढे काही भागात मांडत आहे.' धन्यवाद। ©Advocate आदित्य रुईकर.पुणे। 9823155095
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
लेख
माहिती
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2394 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

नमस्कार. काय म्हंता अ

एस
Sat, 02/27/2016 - 22:17 नवीन
नमस्कार. काय म्हंता अ‍ॅडव्हॉकेटसायेब. माफी द्या. म्या काय तुमास्नी वळखिलू नाय. कंच्या कोरटात सराव कर्ता आपन? ;-) कांदब्रीचं स्वागात हाय. यिउंद्या पटपट.
  • Log in or register to post comments

धन्यवाद....पुणे कोर्ट.

आदित्य अनिल रुईकर
Sat, 02/27/2016 - 22:19 नवीन
धन्यवाद....पुणे कोर्ट.
  • Log in or register to post comments

कादंबरीच्या प्रकाशनासाठी शुभेच्छा....

मुक्त विहारि
Sat, 02/27/2016 - 22:33 नवीन
मराठीत पुस्तक प्रकाशित करणे, हे फार कठीण काम आहे.
  • Log in or register to post comments

कठीण आहे, पण अशक्य नाही.

आदित्य अनिल रुईकर
Sun, 02/28/2016 - 12:43 नवीन
कठीण आहे, पण अशक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शुभेच्छा!

पैसा
Sat, 02/27/2016 - 23:47 नवीन
तुमच्या कादंबरीला शुभेच्छा! पण सर्वांना अशा पीडीएफ दिल्यात तर पुस्तक विक्रीवर परिणाम होईल ना!
  • Log in or register to post comments

धन्यवाद... pdf बाबत आजून

आदित्य अनिल रुईकर
Sun, 02/28/2016 - 12:44 नवीन
धन्यवाद... pdf बाबत आजून विचार चालू आहे. ते प्रकाशकांवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चांगलंय कथानक.उपक्रम आवडला

कंजूस
Sun, 02/28/2016 - 09:11 नवीन
चांगलंय कथानक.उपक्रम आवडला.दोन चार भाग इथे देऊन ---पुढील भाग कादंबरीत असंही करता येईल.पुस्तक बाजारात सहा महिने राहिल्यावर उरलेले भाग इथे पिडिएफ टाका.मिपावर संपुर्ण कादंबरी प्रकाशनाअगोदर द्याविशी वाटणे हे मिपा संस्थळ आणि लेखक वाचकांचा सन्मानच आहे आणि अभिमानास्पद आहे.तुम्हास उत्तरोत्तर लेखनाची उर्मी मिळत राहो ही सर्वांतर्फे सदिच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

आदित्य अनिल रुईकर
Sun, 02/28/2016 - 12:46 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नाही, म्हणजे मी काय म्हण्तो,

संजय पाटिल
Sun, 02/28/2016 - 11:45 नवीन
नाही, म्हणजे मी काय म्हण्तो, आता देतायत तर देवू देत ना..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा