कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं.
त्याचं असं झालं, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ३१ जानेवारी २००२ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार होता. हरसिमरनसिंग संधू हा क्रिकेटचा जबरदस्त शौकीन! त्यामुळे त्याने लांबच लांब रांगेत उभं राहून प्रत्येकी दोन हजार रुपयांची चार तिकिटे स्वतः व आपले तीन मित्र यांच्यासाठी खरेदी केली. सामन्याच्या दिवशी प्रवेशद्वारावर प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. परंतु स्टेडियम पूर्ण भरले आहे या कारणाने संधू व त्याच्या मित्रांना प्रवेश नाकारला गेला. प्रथम आर्जव आणि मग हुज्जत घालूनही दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या मंडळीनी संधू व त्याच्या मित्रांना आत घेतले नाही. सहाजिकच संतप्त संधूने त्यानंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडे तिकिटाचे पैसे व आपल्या आवडत्या सामन्याला मुकलो म्हणून नुकसानभरपाई यांची मागणी केली. ती असोसिएशनने नाकारल्यामुळे त्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून मंचाने संधू यांची तक्रार ग्राह्य धरली. असोसिएशनने संधू यांना तिकिटाचे रु.८०००/- नऊ टक्के व्याजासह परत द्यावेत तसेच या प्रकरणी झालेल्या मानसिक क्लेशांची भरपाई म्हणून रु.४०,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.१०००/- द्यावेत, असा आदेश जिल्हा मंचाने दिला. पण पैशांच्या बळावर आपण एकट्यादुकट्या ग्राहकाला जेरीस आणू शकतो, या मस्तीत असलेल्या असोसिएशनने या निर्णयाविरुद्ध दिल्ली राज्य आयोगाकडे अपील केले. आयोगाने ते फेटाळले.
एव्हडे होऊनही शहाणपण न आल्याने असोसिएशनने राष्ट्रीय आयोगापुढे सुधारणा अर्ज दाखल केला. हा सुधारणा अर्ज फेटाळताना आयोगाने असोसिएशनच्या वतीने केलेल्या बचावावर ताशेरे ओढले. "तक्रारदारांना सामना बघण्यात खरोखर स्वारस्य असतं तर त्यांनी साडेनऊपूर्वी यावयास हवे होते. ते त्यांच्या सोयीप्रमाणे केव्हाही येऊ शकत नाहीत." हा युक्तिवाद निव्वळ चीड आणणारा आहे असा शेरा मारून, आयोगाने पुढे असेही म्हटले की "खरं तर या प्रकरणात असोसिएशनने माफी मागून तक्रारदार संधू यांचे तिकिटाचे पैसे परत करणे व प्रकरण मिटवणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता अर्जामागून अर्ज करण्यात असोसिएशनने धन्यता मानलेली दिसते. महागडी तिकिटे काढूनही क्रिकेटचा सामना बघण्यापासून वंचित झाल्यामुळे पदरी पडलेली घोर निराशा व दुःख हे त्यांना दिलेल्या नुकसानभरपाईपेक्षा जास्त असेल." जिल्हा मंच व राज्य आयोग यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत राष्ट्रीय आयोगाने एक प्रकारे, ग्राहक म्हणून आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सनदशीरपणे लढून संधूने दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या गोलंदाजीवर षटकार लगावल्याचे घोषित केले आहे.
वाह संधू, तोहरा तो जबाब नही!
संदर्भ : दिल्ली क्रिकेट असोसिएशन विरुद्ध हरसिमरनसिंग संधू आणि अन्य
सुधार अर्ज २५०२/२००३ निकालाची तारीख २७ ऑगस्ट २००३
पूर्वप्रसिद्धी - ग्राहकनामा - लेखक - अॅड. शिरीष देशपांडे
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
वाचने
3376
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
संपादक मंडळ,
केली आहे
In reply to संपादक मंडळ, by पुणे मुंग्रापं
धन्यवाद!
In reply to केली आहे by साहित्य संपादक
हे सगळे उत्तम निर्णय वाचताना
यशोधराताई,
In reply to हे सगळे उत्तम निर्णय वाचताना by यशोधरा
धन्यवाद, पुणे मुंग्रापं.
In reply to यशोधराताई, by पुणे मुंग्रापं
+११११११११११११११११११११११११११११११
In reply to हे सगळे उत्तम निर्णय वाचताना by यशोधरा
उत्तम लेख. मला कधीकधी खरंच
२००२ सालची मॅच,
In reply to उत्तम लेख. मला कधीकधी खरंच by राजेश घासकडवी
ग्राहक राजा
खरेजी,
In reply to ग्राहक राजा by सुबोध खरे
बर्याच वेळा ग्राहक
पण हे सगळं वाचून ग्राहकात
In reply to बर्याच वेळा ग्राहक by बाळ सप्रे
पण हे सगळं वाचून ग्राहकात थोडा विश्वास नक्कीच निर्माण होतो.सहमत..!!नक्कीच. ग्राहकांमध्ये असा
In reply to बर्याच वेळा ग्राहक by बाळ सप्रे
माझिया जातीचा भेटो कोणी.अशी
आपलेही अनुभव येउद्यात इथे.
In reply to माझिया जातीचा भेटो कोणी.अशी by नूतन सावंत