Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

च
चिन्या१९८५ यांनी
गुरुवार, 01/08/2009 - 03:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15825 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 18:42 नवीन
'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती. बापरे त्यांनी शिवाजी आणि इतरांना वाटचुकलेले म्हटले आहे? बरं ! एकदम हेच दिसले ठळक असल्याने. आता लेख वाचतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 18:52 नवीन
लिखाळ्,त्यांनी म्हटल होत की 'जर मी या लोकांच्या काळात जन्म घेतला असता तर त्यांना मी मिसगाईडेड पॅट्रीऑट्सच म्हटले असते.पण माझी इतिहासाकडे बघण्याची पध्दत वेगळी आहे.मी माझे निष्कर्ष मांडतो' असेही ते पुढे म्हणतात. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 20:03 नवीन
असूदे. मी एक वाक्य वाचून माझे मत बनवणार नाही. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 12:23 नवीन
चिन्मय, आपला सविस्तर लेख शांतपणे वाचला. फार छान आहे. बर्‍याच बाजूंची मते विचार घेऊन त्यांचा आपण उल्लेख केला आहे. तसेच शेवटच्या परिच्छेदातले प्रश्न चांगले आणि मह्त्त्वाचे आहेत. समारोपात तुम्ही तुमची मतेही मांडली आहेत. अश्या विवाद्य विषयावरचा चांगला लेख वाचून आनंद झाला. आपले अभिनंदन. स्वरक्षणासाठी प्रतिकारासाठी हिंसा मान्य हे मत मलाही योग्य वाटते. 'नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी' हे नाव तेच सुचवत असावे. गांधी बरोबर की सशस्त्र क्रांतीकारक बरोबर हे ठरवण्यासाठी १.गांधींची मते-त्यांची योजना-त्यांचा प्रभाव याचबरोबर २.सशस्त्र क्रांतीकारकांची मते-त्यांची स्वातंत्र्य मिळवण्याची योजना- स्वातंत्र्यानंतर राज्य चालवण्याबाबतची योजना - त्यांचा त्याकाळच्या जनमानसावरील पकड आणि प्रभाव या बाजूंची माहिती मिळवणे गरजेचे आहे. जे मी स्वतः केलेले नाही. नुसता तर्क या ठिकाणी काम करणार नाही तर अभ्यास करणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे या बद्दल माझे काही स्पष्ट मत नाही. लो. टिळक, सुभाषचंद्र, योगी अरविंद, सावरकर असे लोकमान्य प्रसिद्ध विचारवंत सशस्त्र क्रांतीच्या बाजूने होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या राज्य चालवण्याच्या योजने बाबत काही विचार नक्कीच त्यांचेकडे असतील. ते विचार स्वातंत्र्यानंतरच्या प्रसिद्धीतंत्रज्ञांनी बाजूला सारले असतील. पण याचा अर्थ त्यांची मते अभ्यासण्यासाठी उपलब्धच नाहित असे नसावे. कोणी अभ्यासकाने याबद्दल लेख लिहिला तर वाचायला आवडेल. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Fri, 01/09/2009 - 17:07 नवीन
लिखाळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सावरकरांनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्य कसे असावे यावर खुप विचार केला होता.त्यांनी सर्व गोष्टी लिहुन ठेवलेल्या आहेत्.आपण 'अप्-टु-डेट' असल पाहीजे.आपले लष्कर सक्षम असले पाहीजे,अंधश्रध्दांचे निर्मुलन झाले पाहि़जे या सर्वांवर त्यांनी विचार केला होता बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विसुनाना Fri, 01/09/2009 - 13:56 नवीन
गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले. या वाक्यांचा संदर्भ लेखकाकडून मिळू शकेल काय? स्वतः गांधीजींनी जर तसे कोठे म्हटले असेल तर - 'नवर्‍याला बायकोने केलेला मूक विरोध आणि त्यातून होणारे नवर्‍याचे परिवर्तन' हे चित्र आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू करता येते असे मानावे लागेल.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Fri, 01/09/2009 - 17:10 नवीन
विसुनाना गांधीजी स्वतःच तसे लिहिले आहे 'माझे सत्याचे प्रयोग 'मधे.शिवाय तुम्ही खालची लिंक बघु शकता- http://mkgandhi.org/nonviolence/index.htm 'नवर्‍याला बायकोने केलेला मूक विरोध आणि त्यातून होणारे नवर्‍याचे परिवर्तन' हे चित्र आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू करता येते असे मानावे लागेल. हे तुम्ही उपहासानी लिहिलेय का खरेच तुम्हाला तसे वाटते???कारण गांधीजींना तसे वाटत होते बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विसुनाना Sat, 01/10/2009 - 11:44 नवीन
गांधीजींनी स्वतःच्या आत्मचरित्रात तसे म्हटले असेल तर प्रश्नच मिटला. त्यांना असे का वाटले त्याचा शोध घेतला पाहिजे. वाचन केले पाहिजे. मूलतः प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो यावर त्यांचा विश्वास असावा. त्यामुळे अहिंसात्मक मार्गाने केलेल्या विरोधावर तो अंतर्मुख होऊन विचार करतो आणि त्याचे मन बदलते असे त्यांना म्हणायचे असावे. याचा कौटुंबिक व्यत्यास म्हणजे - प्रत्येक पतीचे त्याच्या पत्नीवर प्रेम असते. या प्रेमापोटी पत्नीने केलेला मूक विरोध त्याला असहनीय वाटतो आणि त्याचे मन परिवर्तित होते. परंतु जिथे माणसातील सारासार विचारशक्तीच नाहीशी झाली आहे तिथे असा अहिंसात्मक विरोध काय करू शकेल? उदा. हिटलरला गांधीजींनी लिहिलेल्या पत्रांमुळे हिटलरने महायुद्ध थांबवले काय?ते थांबवण्यासाठी त्याच्याशी युद्धच करावे लागले. किंवा कुटुंबात - मद्यपी नवर्‍याच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा वध केल्याच्या घटना वाचनात येतात. या कारणांमुळे अहिंसात्मक विरोध हा केवळ मुळात सद्सदविवेकबुद्धी असणार्‍या आणि दुसर्‍या पक्षाच्या म्हणण्याचा विचार करू शकणार्‍या माणसांचे मतपरिवर्तन करण्यासाठी होऊ शकतो. अन्यथा त्याला हिंसात्मक विरोध करून आपले म्हणणे पटवून द्यावे लागते.(जर्मनी/जपान/मद्यपी हे वेगळ्या स्तरांवर)...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
ब
बट्टू Fri, 01/09/2009 - 17:16 नवीन
मध्येही असे म्हटले आहे पण तो चित्रपट हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
म
मिहिर Wed, 05/13/2009 - 19:23 नवीन
शिवाजी महाराज मिसगाइडेड पेट्रिऑट याला पूर्णतः असहमत. लो. टिळकांचे मत होते की जोपर्यन्त क्रांतीला समाजाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. त्यामुळे ते क्रांतिकारकांना सबुरिचा सल्ला देत होते.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sun, 06/07/2009 - 14:03 नवीन
शिवाजी महाराज मिसगाइडेड पेट्रिऑट याला पूर्णतः असहमत. ते मत चुकीचेच आहे पण गांधीजींनी त्यांच्या तत्वाशी प्रामाणिकता ठेवली हे ही न थोडके. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा