✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

च
चिन्या१९८५ यांनी
गुरुवार, 01/08/2009 - 08:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15830 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

ए
एकलव्य गुरुवार, 01/08/2009 - 08:20 नवीन

अहिंसेची मक्तेदारी

म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात. हे विधान थोडे ताणल्यासारखे वाटते... आणि आकसही दाखविते असे आम्हाला वाटते. अहिंसेची मक्तेदारी फक्त गांधीवादाची नाही. गांधीजींचेही तसे म्हणणे नव्हते. भगतसिंग, सावरकर यांचा अहिंसेला विरोध नव्हता... भाबड्या अहिंसेला होता. (अर्थात चिन्यासाहेबांनी इतरत्र क्रांतिकारकांनी अहिंसेच्या केलेल्या प्रयोगांचे दाखलेही दिलेले आहेत हे मान्य आहे.) आग्रह सत्याचा आहे की नाही ही काय ती कसोटी. हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते. - एकलव्य (दुवे शोधत बसलो नाही... हवे असल्यास सवडीने देईन. तोवर हवेत विधाने केली आहेत असा सोयीस्कर तर्क कोणाला काढायचा असेल तर खुशाल काढावा.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/08/2009 - 10:56 नवीन

अभ्यासपूर्ण लेख

चिन्यासाहेब, आत्ता वेळ कमी असल्यामुळे वरवर लेख चाळला. पण नीट लक्ष देऊन लेख वाचायला लागेल एवढा गृहपाठ करून तुम्ही (बर्‍याच दिवसांनी मिपावर अवतरून) लिहिलं आहेत, त्याबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 01/08/2009 - 12:44 नवीन

+१

+१. नीट लक्ष देऊन किमान २ वेळातरी वाचावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कोलबेर गुरुवार, 01/08/2009 - 21:20 नवीन

+२

अभ्यासपूर्ण लेख. आत्ता वेळ कमी असल्यामुळे वरवर लेख चाळला. पण नीट लक्ष देऊन लेख वाचायला लागेल .
असेच म्हणतो. अवांतर: गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुनील गुरुवार, 01/08/2009 - 21:23 नवीन

+१

गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख. सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चेतन Fri, 01/09/2009 - 11:38 नवीन

उत्तम लेख

चिन्मय एक संयमीत आणी उत्तम लेख झालाय. गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख. हे उलटेही लागु होते. गांधिजींचा स्वातंत्र्य मिळवण्यात खूप मोठा वाटा होता पण त्यामुळे क्रांतिकार्‍यांचा मार्ग चुकीचा होता व त्यांना कमी लेखावे असे नाही. जर गांधीजी क्रांतिकार्‍यांवर टिका करु शकतात तर इतरांनी गांधीवर टिका केली तर काय बिघडते. मी गांधी विरोधी बिलकुल नाही पण मी क्रांतिकार्‍यांचाही तेव्हढाच आदर करतो. गांधीजी हयात असतानाही भारत पाकिस्तान फाळणी झाली हे सत्य आहे आणि गांधी फाळणी टाळु शकले नाहित. त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्‍या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात. नाइलाज म्हणुन. क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल. माझे काही प्रश्नः मुंबई मधील ताजमध्ये घुसलेल्या किंवा छत्रपती शिवाजी टर्मीनन्स वर गोळीबार करणार्‍या अतिरेक्याविरुध्द अहिंसा कशी उपयुक्त ठरली असती हे मला तरी समजत नाही. पाकिस्तानचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न भारताने कितिवेळा केला आणि त्याचा काय फायदा झाला. चिनने किंवा पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला तेव्हा आहिंसेने हा प्रश्न कसा सोडवता आला असता? चेतन अवांतरः गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा. पण त्यानेच द्वेष वाढत जातो. अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 01/09/2009 - 12:49 नवीन

+१ / -१

अवांतरः गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा. पण त्यानेच द्वेष वाढत जातो. सहमत. अगदी हेच म्हणतो. अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का? इथे प्रश्न किंचित चुकला! ह्याचे कारण क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे लिखाण मी अद्यापतरी येथे वाचले नाही. गांघींची हेटाळणी करणारे लिखाण मात्र मुबलक आहे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चेतन Fri, 01/09/2009 - 14:11 नवीन

+२ /-२

सहमत. अगदी हेच म्हणतो. +२ अतिअवांतरः गांधिवाद्यांना वरिल फॉर्म्युला मान्य आहे का? इथे प्रश्न किंचित चुकला! ह्याचे कारण क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे लिखाण मी अद्यापतरी येथे वाचले नाही. गांघींची हेटाळणी करणारे लिखाण मात्र मुबलक आहे!! -२ क्रांतीकारकांची हेटाळणी करणारे प्रतिसाद मी मात्र येथेच बरेच वाचलेत. (१४ वर्षाचा अतिरेकी वगैरे) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 01/09/2009 - 14:23 नवीन

हेटाळणी?

त्यात क्रांतीकारकांची नक्की काय हेटाळणी होती? त्यांच्या मार्गाविषयी दुमत व्यक्त झाले असेल फार तर. पण गांधींच्याबाबत???? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चिन्या१९८५ Fri, 01/09/2009 - 15:40 नवीन

धन्यवाद

धन्यवाद चेतन!! नाइलाज म्हणुन. क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल. बरोबर आहे.पण मला त्यात विरोधाभास दिसतो. मुंबई मधील ताजमध्ये घुसलेल्या किंवा छत्रपती शिवाजी टर्मीनन्स वर गोळीबार करणार्‍या अतिरेक्याविरुध्द अहिंसा कशी उपयुक्त ठरली असती हे मला तरी समजत नाही. अशा वेळेला तेथील जनतेने पॅसिव्ह रेसिस्टंस करायला हवा होता असे गांधीवादी म्हणतील. पाकिस्तानचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न भारताने कितिवेळा केला आणि त्याचा काय फायदा झाला.चिनने किंवा पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला तेव्हा आहिंसेने हा प्रश्न कसा सोडवता आला असता? माझे मत आहे की अहिंसेचा इथे फारसा उपयोग झाला नसता. गांधीना मोठे करण्यासाठी क्रांतिकार्‍यांची हेटाळणी करायची आणी क्रांतिकार्‍यांना मोठे करण्यासाठी गांधीची हेटाळणी करायची हा यशस्वी लेखाचा फॉर्म्युला असावा. हे माझ्या लेखाबद्दल आहे का?? बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
ब
बट्टू Fri, 01/09/2009 - 19:45 नवीन

गांधीजी आणि क्रांतिकारक

गांधिजींचा स्वातंत्र्य मिळवण्यात खूप मोठा वाटा होता पण त्यामुळे क्रांतिकार्‍यांचा मार्ग चुकीचा होता व त्यांना कमी लेखावे असे नाही. जर गांधीजी क्रांतिकार्‍यांवर टिका करु शकतात तर इतरांनी गांधीवर टिका केली तर काय बिघडते. गांधीजींनी क्रांतिकारकांवर टिका केली असेल तर क्रांतिकारकांनी गांधीजींवर टिका करायची. इतरांनी उठसूठ कशाला तारे तोडायचे? गांधीजी हयात असतानाही भारत पाकिस्तान फाळणी झाली हे सत्य आहे आणि गांधी फाळणी टाळु शकले नाहित. तेव्हा क्रांतिकारकांनी टाळायची ना. क्रांतिकार्‍यांना कोणत्याही प्रकाराचि अलर्जी नव्हती असेही म्हणता येइल. जर क्रांतिकारकांना ऍलर्जी नव्हती तर बाकीच्यांना इतकी ऍलर्जी का? उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात लोक. प्रतिकार आणि हिंसा यांतला फरकही कळत नाही लोकांना की मुद्दाम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
क
क्लिंटन Fri, 01/09/2009 - 16:08 नवीन

तळपायाची आग

हा लेख अभ्यासू आणि मिसळपाववरील मी वाचलेल्या लेखांपैकी सर्वोत्तम लेखांमध्ये एक आहे. असा लेख लिहिल्याबद्दल चिन्यासाहेबांचे आभारी आहोत. >>गांधीजींचे नाव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाणार्‍यांसाठी उत्तम लेख गांधी महान होते याविषयी वाद नाही. किंबहुना खुद्द नथुराम गोडसेने सुध्दा गांधीजींची महानता मान्य केली आहे. तरी तळपायाची आग मस्तकात का जाते यामागची कारणे (जी पूर्वी लिहिली नव्हती) इथे विषद करत आहे. १) मी ad nauseam मांडलेला मुद्दा म्हणजे १९४६ च्या निवडणुका. त्या निवडणुका मुस्लीम लीगने पाकिस्तान या एक कलमी कार्यक्रमावर लढविल्या होत्या. त्यात अगदी दक्षिणेतील मद्रास प्रांतातूनही (जो पाकिस्तानात सामील व्हायची जराही शक्यता नव्हती) मुस्लीमांसाठी राखून ठेवलेल्या जागांमधून काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून लीगचे उमेदवार का निवडुन यावेत? (संदर्भः रामचंद्र गुहांचे 'India After Gandhi' हे पुस्तक) याचा अर्थ तेथील मुस्लिमांनी लीगला (म्हणजे भारताच्या फाळणीला) समर्थन दिले असा होत नाही का? आणि तसे असेल तर ज्यांनी लीगला मते दिली त्यांना त्यांच्या देशात हाकलून द्यावे अशी मागणी करण्यात चूक काय? आणि तरीही गांधींनी त्यांच्याविरूध्द चकार शब्द न उच्चारता हिंदूंना शांततेचे डोस पाजत राहणे कसे समर्थनीय ठरते? २) गांधींनी कलकत्यातील लीगच्या प्रत्यक्ष कृती दिनात हिंदूंची कत्तल झाल्यावर फारसे काही न बोलणारे गांधी हिंदू प्रत्युत्तर द्यायला लागल्यावर उपोषणाला का बसले? सुर्‍हावर्दींनी हिंदूंच्या प्रत्युत्तरापासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी गांधींची मदत मागितली आणि ती गांधींनी दिली. ते का? ३) ५५ कोटींच्या मुद्द्याबद्दल तर काय बोलावे? भारत सरकार पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देणे लागत होते हे सत्य आहे. पण त्यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरवरील आक्रमण मागे घ्यावे असे भारत सरकारचे म्हणणे होते. पाकिस्तानला दक्षिणा देऊन त्यांचे मनपरिवर्तन करता येईल अशी अत्यंत भाबडी आशा बाळगून गांधी उपोषणाला बसले आणि त्यांनी भारत सरकारला झुकायला भाग पाडले. पुढे ५५ कोटींचा उपयोग भारताविरूध्दच्या आक्रमणात झाला पाकिस्तानातील विकासकार्यांसाठी नाही! मग शत्रूला बलिष्ठ करून आपल्या देशाच्या हितसंबंधांचे नुकसान करण्यात गांधींनी महत्वाची भूमिका बजावली असे म्हटले तर त्यात चूक काय? बरं मुस्लिमांचे इतके लांगूलचालन करून ते त्यांना आपले मानत होते का? तर तसेही नाही. गांधीहत्येनंतर जीनांची प्रतिक्रिया काय तर हिंदूंचा महत्वाचा नेता गेला आणि त्या समाजाचे नुकसान झाले (संदर्भः परत एकदा रामचंद्र गुहांचे वर उल्लेख केलेले पुस्तक) गांधींची तत्वनिष्ठा आणि त्यांनी सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे माझे तरी मत आहे की गांधींनी भाबडा विश्वास दाखवला, जनतेतील आपल्या स्थानाचा वापर केला आणि उपोषणे करून देशाच्या हितसंबंधांविरूध्द भूमिका घ्यायला भाग पाडले. आणि म्हणून गांधींचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याविषयी मला जराही खेद वाटत नाही. अवांतरः अहिंसा हे एक महान तत्व आहे. प्रतिसादांमध्ये उल्लेख केलेले अहिंसेचे फायदे १००% मान्य. पण आपला शत्रू थोडातरी सुसंस्कृत असेल तरच त्या अहिंसेचा उपयोग असतो. इंग्रज राज्यकर्त्यांनी जालियनवाला बागेत शेकडो भारतीयांची कत्तल केली, भारतीय कुटिरोद्योगाचे प्रचंड नुकसान केले आणि इतर अनेक दुष्परिणाम इंग्रज राजवटीमुळे भारताला सहन करावे लागले. पण तरीही इंग्रज हिटलर, तालिबान किंवा अल-कायदापेक्षा अनंत पटींनी सुसंस्कृत होते.इंग्रजांऐवजी तालिबानी किंवा गझनीच्या महंमदाची राजवट असेल तर सरसहा कत्तली हा एकच न्याय आणि हा एकच पुरावा असेल. अशा ठिकाणी अहिंसेचा काय उपयोग झाला असता? ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Fri, 01/09/2009 - 20:53 नवीन

५५ कोटी

५५ कोटींच्या मुद्द्याबद्दल तर काय बोलावे?
ज्याची त्याची विचारसरणी. उद्या समजा माझ्या मित्राचे माझ्याकडे उसने घेतलेले १००० रुपये आहेत, आणि त्याचे माझे भांडण झाले. तर निदान मी तरी आधी त्याचे १००० रुपये तोंडावर फेकेन आणि मग वाट्टेल तितके भांडेन. त्याचवेळेस अजुन कुणाला 'नाहीतरी भांडण झालेच आहे कशाला द्या त्याचे पैसे परत' असा विचार देखिल येऊ शकतो. ज्याची त्याची विचारसरणी. पाकिस्तानने (उघड उघड)कळ काढली तर त्याचे उत्तर द्यायला भारत समर्थ होता/आहे. त्यामुळे त्यांचे ५५ कोटी आधी तोंडावर फेकुन मगच त्यांना जवाब द्यावा, ह्यात मला तरी काही गैर वाटले नाही . शत्रुला बलवान केले वगैरे तर अजीबात वाटले नाही. उलट माझ्या देशाने कुणाचे (विशेष्तः भांडकुदळ शेजार्‍याचे) नस्ते देणे ठेवले नाही ह्याचा अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/09/2009 - 20:56 नवीन

बाचाबाची

बाचाबाची होत असेल तर मी ही तसेच करेन. पण मारामारी करायला आला तर त्याला मी नक्की असे सांगेन अंगाला हात नाय लावायचा नायतर तुझी असली तरी फुटकी कवडी सुधा नाही देणार परत. असो ज्याची त्याची विचारसरणी. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Fri, 01/09/2009 - 21:09 नवीन

चालायचंच!

चालायचंच! मी तरी त्याला 'आधी तुझे हजार रुपये उचल आणि मग अंगाला हात लावुन दाखव!' असंच म्हणेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ब
बट्टू Fri, 01/09/2009 - 21:02 नवीन

मी पण

त्याचे पैसे त्याच्या तोंडावर फेकेन आणि मग त्याला हाकलेन. बरोबर बोललात कोलबेर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चिन्या१९८५ Fri, 01/09/2009 - 21:32 नवीन

धन्यवाद

धन्यवाद क्लिंटन!!! गांधीजींनी मुस्लिमांचे तुष्टीकरण केले हे मात्र नक्की.त्याच्याबद्दल त्यांना हिंदुंनी नक्कीच दोष द्यावा.पण मुस्लिमच काय कुणाबरोबरही गांधीजींनी तेच वर्तन केले असते.गांधीजींचा मनपरीवर्तनावर विश्वास होता.जीना बदलतील असे त्यांना अनेक वर्ष वाटत होते.गांधीजी हिंदु नसते तर त्यांनी मुस्लिमांबरोबर केले तसेच वर्तन हिंदुंबरोबर केले असते असे मला तरी वाटते. पण गांधीजी आजच्या सेक्युलर लोकांपेक्षा १००%पटीने बरे होते कारण 'मी हिंदु आहे ,त्याचा मला अभिमान' आहे असे ते सरळसरळ म्हणत्. हिंदु धर्माने मला अहिंसा शिकवली हे ही ते म्हणत्.आजच्या सेक्युलर्सप्रमाणे 'हिंदु' शब्दाची त्यांना ऍलर्जी नव्हती.बाकी मुस्लिमांसाठी इतके करुनही त्यांनी गांधीजींना महत्व दिल नाही.बहुतेक गांधीजींची महानता समजण्याची त्यांची क्षमताच नाही.दोन वर्षापुर्वी गुलाम नबी आझाद यांनी लहान मुलांना काश्मिरमध्ये 'गांधीजींच्या शिकवणीवर चाला' असे गांधी जयंतीला सांगितले.तर मुस्लिम धर्मगुरुंनी त्याचा निषेद केला.म्हणे असे करणे इस्लामच्या विरुध्द आहे.माझ्या मनात आल अरे ते (गांधीजी ) नसते तर तुमच्यातला एक तरी जिवंत राहिला असता का काय इस्लामिक आहे आणि काय अनैस्लामिक आहे हे ठरवायला??? बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रियाली गुरुवार, 01/08/2009 - 21:47 नवीन

+३

वरील प्रतिसादांशी सहमत आहे. गांधीजींनी सामान्य जनतेला ज्या प्रकारे मुख्य प्रवाहात सामील करून घेतले तसे क्रांतीकार्याला जमणे कठिण आहे. जी कामे/ गुन्हे लपून छपून चालतात तिथेच फंदफितुरी, गद्दारी संभवते आणि याचा परिणाम त्या संघटनेला भोगावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 22:01 नवीन

कोलबेर्,सु

कोलबेर्,सुनिल्,प्रियाली आपल्या सविस्तर प्रतिसादांची अपेक्षा आहे बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 16:20 नवीन

धन्यवाद

धन्यवाद एकलव्य.मला नाही वाटत की त्या वाक्यात काही आकस आहे.मी गांधीजी आणि क्रांतिकार्यापैकी क्रांतिकार्याचाच स्विकार केला असता.त्यामुळे त्यांच्याबद्दल कणभरही आकस नाही.माझे म्हणने इतकेच आहे की उपासानी काही होणार नाही म्हणनारेच नंतर उपासही करु लागले हा नक्कीच विरोधाभास आहे.याचा अर्थ त्यांछे म्हणने चुक होते असा होत नाही.बाकि हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते. या वाक्याचा अर्थ मला कळला नाही.कृपया याबद्द्ल अजुन सांगा. अदिती आणि मी,आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 01/08/2009 - 23:02 नवीन

खुलासा

माझे म्हणने इतकेच आहे की उपासानी काही होणार नाही म्हणनारेच नंतर उपासही करु लागले हा नक्कीच विरोधाभास आहे. माझे म्हणणे आहे की नंतर उपास करू लागले असे ज्या क्रांतिकारकांविषयी आपण म्हणता आहात ते उपासानी काही होणार असे म्हणत होते असे नाही. फक्त उपासानी काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. तसेच नंतर उपास करू लागले हेही पूर्वग्रहदूषित आहे. बरेचसे (सगळे कदाचित नसावेत) क्रांतिकारक आधी उपासाने आणि निदर्शनांनी काही साध्य होईल यासाठी स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. भ्रमनिरासानंतर त्यांनी शस्त्र किंवा जहाल वाटही चोखाळली. बाकि हा आग्रह अहिंसेच्याच मार्गाने धरायचा हा हट्टाग्रह आणि सत्याचा आग्रह तरी का धरायचा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी भगसिंग प्रभृतीची भूमिका होती असे दिसते. सवडीने लिहिन... होऊ घातलेल्या विलंबाबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 23:19 नवीन

फक्त

फक्त उपासानी काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण नंतर त्यांनीही फक्त उपासच केला होता ना????नंतर याचा अर्थ आहे की विरोध केल्यानंतर. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 19:47 नवीन

मी

मी गांधींच्या अहिंसेचा समर्थक आहे (म्हणजे क्रान्तिकारकान्च्या मार्गाने स्वातन्त्र्य मिळाले असते असे मला वाटत नाही. गांधींनी चळ्वळ केली नसती तरी स्वातंत्र्य मिळाले असते असे अनेकांचे मत असेल त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.) परंतु सशस्त्र लढ्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नसते यात मला काही शंका नाही. कारण अश्या मार्गाने कोणत्याही देशाला (की राष्ट्राला) स्वातन्त्र्य मिळाल्याचे उदाहरण मला ज्ञात नाही. जेव्हा दुसर्‍या देशाचा सशस्त्र पाठिंबा असेल तरच ते शक्य असते (उदा. इस्रायल, बांगला देश ). सशस्त्र क्रान्तीला मोठ्या प्रमाणात समाजाचा पाठिंबा मिळणे अवघड असते. स्वातन्त्र्याची सार्वत्रिक आस गांधींच्या चळवळीमुळे निर्माण झाली. ब्रिटिश साम्राज्य कमकुवत तर झालेच होते. परंतु अशा मोबिलाइज्ड समाजाकडून असलेली हिंसेची गर्भित धमकी नाविकांच्य बंडाच्या स्वरूपात प्रत्यक्षात येवू लागल्याचे ब्रिटिशांनी ओळखले. ही गर्भित धमकी निर्माण करण्याचे काम गांधींच्या चळवळीने झाले असे मी मानतो. गांधींची इतर मते मला मान्य नाहीत (ब्रह्मचर्य, निसर्गोपचार वगैरे). परंतु त्यामुळे माझ त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 01/08/2009 - 20:01 नवीन

विचार करावयाला हवा असा लेख.

सर्वसाधारणपणे असे म्हट्ले जाते की १९३० ते १९७० च्या दरम्यान जवळ जवळ ७५ देशांना स्वातंत्र्य मिळाले. ( ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या साम्राज्यातून हे देश स्वतंत्र झाले.). गांधी नसतेच तर स्वांतत्र्य लांबले असते अथवा कोणीतरी दुसरा नेता झाला असता. फारतर असे म्हणता भारतीयांच्या आणि तत्कालिन सर्वच घटकांना गांधींनी आपल्या परीने विचार करण्यास आणि कृती करण्यास भाग पाडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 21:12 नवीन

ब्रिटिश

ब्रिटिश राज्य कमकुवत झाले होते म्हणून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे हे ही पूर्ण खरे नाही. भारत स्वतंत्र झाल्यावरही कित्येक वर्षे पुष्कळ देश पारतंत्र्यातच होते. गांधींच्या आधीही स्वातन्त्र्य चळवळ होतीच परंतु, तिला सार्वत्रिक करण्याचे मुख्य काम गांधींनी केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कोलबेर गुरुवार, 01/08/2009 - 21:17 नवीन

+१

प्रतिसाद आवडला. थत्ते साहेबांच्या सर्वच मुद्यांशी सहमत. विशेषतः
गांधींची इतर मते मला मान्य नाहीत (ब्रह्मचर्य, निसर्गोपचार वगैरे). परंतु त्यामुळे माझ त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चापलूस Fri, 01/09/2009 - 12:30 नवीन

महान प्रतिसाद

थत्ते महान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 20:07 नवीन

थोडे विषयांतर

विषयांतराबद्दल माफ करा पण चिन्या१९८५ यांच्या ब्लॉगवर जात्युच्छेदन आणि शिवसेना यांबद्दल एक लेख वाचला. तो लेख मिपावर दिसला नाही म्हणून येथे प्रतिसाद लिहित आहे. त्या लेखात शिवसेनेने जात्युच्छेदनाचे कार्य पुढे चालवले आहे असा सूर दिसला. मात्र मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळची शिवसेनेची भूमिका (जी जात्युच्छेदनाऐवजी जातिवाल्यांचेच उच्छेदन करणारी होती) आणि मुंबईतील पोलीस चाळींमध्ये दलितांवर महिनोंन्महिने फरशी, विटा अशी दगडफेक करणारे शिवसैनिक (ज्याचा विस्तार व अंगावर काटा आणणारे वर्णन अवचटांच्या एका पुस्तकात वाचता येईल. त्याचे नाव हवे असल्यास मी मिळवू शकतो.) याबाबत लेखकाने लिहावे असे सुचवावेसे वाटते. आपला (पददलित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 22:09 नवीन

आजानुकर्ण

आजानुकर्ण तो लेख मी येथे परत काही दिवसांनी टाकीन्.मग त्यावर चर्चा करु.बाकी तो लेख जात्युच्छेदन व हिंदुत्व असा होता,शिवसेना हा त्यातला एक भाग होता.तोपर्यण्त उत्तर असे की मला ती कृती जातीभेद वाढीस लावणारी आहे असे वाटत नाही.माझा वैयक्तिकरीत्या नामांतराला पाठीम्बा आहे पण तरीही नामांतराला विरोध केला याचा अर्थ लगेच ते जातिवादी झाले असा अर्थ नाही.शिवसेनेची कार्यपध्दती बघितल्यास तिथे जातपात चालत नाही हे तुम्हाला कळुन येईलंआहीतर फुले,आंबेडकरांचे नाव घेणार्‍या राष्ट्रवादीत जातीभेद सर्वात जास्त आहे.शिवसेनेचा आर्थिक मागासांना आरक्षण हा मुद्दा होता त्यामुळे त्यांनी काही काळ विरोधाचे धोरण ठेवले होते.बाकी ही चर्चा आपण माझ्या खरडफळ्ञावर करु अथवा इथे लेख टाकल्यावर करु बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 20:13 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद नितिन आणि कलंबी!! माझ्यामते सशस्त्र क्रांत्या अमेरिका,फ्रान्स्,रशिया व इतर ठिकाणी झालेल्या आहेत्.त्यामुळे अशा पध्दतीने स्वातंत्र्य मिळवणे नक्कीच शक्य होते.भारतातही शक्य होते.फक्त गांधीजींसआरखा लोकप्रिय नेता त्या काळात निर्मान झाला नाही. बघा- http://gandharvablog.blog
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/08/2009 - 20:17 नवीन

फरक

माझ्यामते सशस्त्र क्रांत्या अमेरिका,फ्रान्स्,रशिया व इतर ठिकाणी झालेल्या आहेत् फ्रान्स आणि रशियात परकीय सत्ता नव्हती आणि अमेरिकेला फ्रान्सची सक्रीय मदत मिळाली होती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 22:14 नवीन

बरोबर

बरोबर आहे.पण त्याने फारसा फरक पडत नाही. regime change करण्याबाबत मी बोलत होतो.शिवाय independence आणि freedom यात फरक आहे काय्??मला वाटते की क्रांतिकारकांच्या मार्गानी ब्रिटीशांपासुन मुक्तता झाली असती पण तरीही व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली असती कारण त्यांना कम्युनिस्ट क्रांती अपेक्षित होती. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 21:26 नवीन

अहिंसेची दुसरी देणगी

गांधीप्रणित अहिंसक चळवळीची अजून एक चांगली बाजू : जेव्हा चळवळ (किंवा लढा) समाप्त होतो तेव्हा लढ्यातील सैनिक मोकळे होतात त्यावेळी त्यांचे काय करायचे हा प्रश्न सोडवावा लागतो. नाहीतर ते तालिबान्यांप्रमाणे उच्छाद मांडू शकतात. सशस्त्र लढ्यातील सैनिकांकडे शस्त्रास्त्रे ही असतात. हा प्रश्न अहिंसक लढ्यातून निर्माण होत नाही. तसेच कार्यकर्त्यांना (बिपिन कार्यकर्ते नव्हे) विधायक कार्यात गुंतवून गांधींनी उरला सुरला प्रश्न ही सोडवायचा मार्ग शोधला होता.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 01/08/2009 - 21:37 नवीन

न संपणारा लढा.

आपला हाही प्रतिसाद महत्त्वाचाच आहे. गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना खर्‍या अर्थाने कामाला लावले होते. दारुबंदी, हिंदू-मुस्लिम ऐक्य, खादी, खेड्याकडे चला, ग्रामस्वराज्य, हरिजन मुक्ति, प्रभातफेरी अश्या एकापेक्षा एक योजना त्यांनी मांडल्या होत्या. एकतर तुरुंगात जायचे अथवा अशा विधायक कामात गुंतवुन घ्यायचे असा सक्रिय कार्यक्रम असताना कोणता कार्यकर्ता मोकळा राहील आणि सैतानाला आपल्या मनात मुक्काम करायला परवानगी देईल. गांधींनी खर्‍याअर्थाने महासभेला प्रत्येक घरात नेले होते. कधी कधी एक शंका मनात येते की गांधींचा खरा प्रभाव भारतात कोठे कोठे पडला होता? आजच्या पाकिस्तानात त्यांचे काही कार्यकर्ते होते काय? खर्‍या अर्थाने गांधी भारताचे नेते होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 22:22 नवीन

नितिन्,तुम

नितिन्,तुम्ही मांडलेला मुद्दा गांधीजींनीही मांडला होता.त्यांनी म्हटले होते की ही क्रांती मासेस नी केलेली नसेल त्यामुळे मासेससाठी क्रांती फारस काही देउ शकणार नाही.त्यामुळे या क्रांतीने देशात अराजक माजेल व ब्रिटीश जाउन एक दुसरी अन्याय करणारी राज्यव्यवस्था येईल अशी भिती गांधीजींना होती.बाकी मनुष्यपरीवर्तनाच्या मुद्द्यावर तर अहिंसेचा पुर्ण डोलारा उभा आहे.तुम्हाला अहिंसेचा मार्ग मान्य आहे पण मनुष्यपरीवर्तन मान्य नाही हे आश्चर्यच आहे. कलंबी,गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ खर्‍या अर्थाने मास मुव्हमेंट बनवली.ती चळवळ अतिशय सोपी बनवली.तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
प
प्रियाली गुरुवार, 01/08/2009 - 22:31 नवीन

कष्ट, टेन्शन्स

तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते.
खरं आहे पण जरा आणखी चांगल्या शब्दांत यायला हवे. गांधींच्या धोरणांनुसार ८-१० वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंत सर्व सहज चालू शकत होते. त्यांचा लढा हा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अतिरिक्त कौशल्यांखेरीज लढता येण्यासारखा होता. बंदुका चालवणे, बॉम्ब बनवणे, वेषांतर करणे, भूमिगत होणे, कट रचणे, तो अंमलात आणणे, मरण स्वीकारणे वगैरे गोष्टींची आवश्यकता नव्हती. घरसंसार सांभाळणारी एखादी सामान्य व्यक्तिही या लढ्यात सामील होऊ शकत होती. म्हणूनच गांधीजी सामान्यांपर्यंत पोहोचू शकले. स्वदेशी, खादी, उपास, जाहीर सभा अशा सर्व कार्यक्रमांतून ते राज्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत बिनदिक्कत पोहोचू शकले. तूर्तास इतकेच. घाईत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 23:10 नवीन

गांधींच्य

गांधींच्या धोरणांनुसार ८-१० वर्षांच्या मुलापासून ८० वर्षांच्या म्हातार्‍यांपर्यंत सर्व सहज चालू शकत होते. हम्म .. सशस्त्र क्रांतीमध्ये १४ वर्षांच्या मुलांचा सहभाग तालीबानी वाटतो तो ब्रेनवॉशिंग या धोरणाने. तर इथे सुद्धा तसेच नाही का? हा प्रतिसाद विषयांतर करणारा असेल तर खव मध्ये बोलू. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 01/08/2009 - 23:21 नवीन

वेड पांघरून पेडगावला

जाण्याचा प्रयत्न तर नाही ना. तिकिट काढून देते हवं तर पेडगावचं. :) लहान मुले खादी वापरणे, चरखा चालवणे शिकणे, झालंच तर शेळीच्या पायाला पाला लावणे करू शकत होती. ;) गांधी त्यांना फार वेगळे करायला सांगत नव्हते. गुन्हेच करायला हवेत असे सांगत नव्हते. त्या पोरांनी हातात बंदुका धरत नव्हती की लाठीही आणि चरखा किंवा तिरंगा पकडणे हा गुन्हा नव्हे. खरडवहीत कशाला इथेच सांगते प्रतिसादातील मुख्य वाक्य त्यांचा लढा हा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अतिरिक्त कौशल्यांखेरीज लढता येण्यासारखा होता. हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 23:55 नवीन

तिकीट...

तिकिट काढून देते हवं तर पेडगावचं.
ते शक्य नाही. तिकीट कंदाहारपर्यंतचेच मिळू शकते. तेथून पुढील प्रवास उंटावरून करावा लागतो. उंटाचे आगाऊ तिकीट मिळत नाही. उंटवाल्याला आयत्या वेळी पटवावे लागते. पांघरण्यासाठी लागणारी वस्तू बरोबर आणण्याची जबाबदारी सर्वस्वी प्रवाशांची आहे. ती पुरवण्यास प्रवासएजंट अथवा उंटवाला बांधील नाही. टीप: उंटाऐवजी जुने रशियन रणगाडे मिळू शकतात असे वाटते. प्रवाशांनी अधिक माहिती स्वतःच्या जबाबदारीवर काढावी. (ऐकीव माहितीवरून.) - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 00:32 नवीन

नको तिकिट

नको तिकिट नको. उलट नव्या वर्षाचा काही संकल्प करावा म्हणतो :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 22:39 नवीन

हे तर गांधींचे सरलीकरण

१. त्यांचे नांव कलंबी नसून कलंत्री (कलन्त्री) आहे. २. तु लाठ्या खा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,जेलमध्ये जा की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्,चरखा चालव की झाला तु स्वातंत्र्यसैनिक्.इथे मरेंगे,मारेंगे ,मग त्याच्यासाठी कष्ट ,टेन्शन्स वगैरे नव्हते. हे अगदीच काहीतरी. सत्याग्रहात भाग घेताना अनेक लोकांनी आपापले व्यवसाय / शिक्षण सोडले होते. त्यातून होणारा त्रास भोगलाच होता. सत्याग्रहात भाग घेतल्यावर मारेंगे नसले तरी मरेंगे हे होतेच. लाठ्या खाल्ल्यावर स्वातंत्र्यसैनिक .... वगैरे स्वातन्त्र्यानंतर उपटलेल्या संधीसाधू गोष्टी आहेत. चरखा चालवण्याचे महत्त्व माझ्या आधीच्या एका प्रतिसादात सांगितले आहेच. मनुष्यपरिवर्तन मान्य आहे. माणसाचा आजार बरा होतो हे मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 22:51 नवीन

प्रियाली,ब

प्रियाली,बरोबर आहे. थत्ते,ते वाक्य गांधीजींनी लढ्याचे सरलीकरण केले हे सांगण्यासाठी केले होते.त्रास भोगावा लागला नाही असे मी म्हटलेले नाहीये.पण क्रांतिकारकांचा त्रास याहुन नक्कीच जास्त होता.शिवाय त्यांचा मार्गही अवघड होता.माणसाचा आजार बरा होतो म्हणजे शारीरीक आजार नाही तर हिंसा ,अन्याय करण्याचा 'आजार' बरा होतो बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 22:43 नवीन

गोंधळ होतो

कलंत्री, तुम्ही काँग्रेसला महासभा म्हणू नका बुवा. आमचा पामरांचा नामसाधर्म्यामुळे गोन्धळ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
घ
घाटावरचे भट Fri, 01/09/2009 - 07:39 नवीन

सशस्त्र

सशस्त्र लढ्यातील सैनिकांकडे शस्त्रास्त्रे ही असतात. हा प्रश्न अहिंसक लढ्यातून निर्माण होत नाही.
बरोबर आहे. फक्त, स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींच्या विचाराने चालणार्‍या तथाकथित अनुयायांनी गांधीजींचे कार्य आणि विचाराची पर्वा न करता सत्तेच्या रिंगणात उड्या घेतल्या आणि आजकाल जो भ्रष्टाचार बोकाळलाय वगैरे म्हणतात ना त्याला जन्म दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रियाली Fri, 01/09/2009 - 16:17 नवीन

भ्रष्टाचार

स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींच्या विचाराने चालणार्‍या तथाकथित अनुयायांनी गांधीजींचे कार्य आणि विचाराची पर्वा न करता सत्तेच्या रिंगणात उड्या घेतल्या आणि आजकाल जो भ्रष्टाचार बोकाळलाय वगैरे म्हणतात ना त्याला जन्म दिला.
वाक्यात चुकीचे काहीच नाही पण हे सर्व आफ्टरमॅथ आहे. केवळ बंदुकीच्या तालावर स्वातंत्र्य मिळत असेल तर सर्व आलबेल होतं अशी खात्री देता आली असती तर उपयोगाचे नाहीतर अहिंसेने भ्रष्टाचार आला तसाच सशस्त्र क्रांतीने भारतातही हिटलर तयार झाला असता असे विधान कोणी केले तर वावगे ठरू नये. कोणताही धर्म, संस्था हे त्याचे संस्थापक असताना जे कार्य करतात त्याच्या विपरित कार्य बरेचदा अनुयायांकडून होते हे सर्वत्रच पाहिले गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/08/2009 - 21:28 नवीन

अहिंसेने

अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार बरा होतो हे मात्र मान्य नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग गुरुवार, 01/08/2009 - 22:54 नवीन

अभ्यासानंतर

या विशयावर प्रतिक्रिया देण्यासाठी अभ्यासाची गरज आहे जो व्यासंग आमचा नाही एक नजर टाकल्यावर लेख चांगला वाटला शुभेच्छा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 23:20 नवीन

धन्यवाद

धन्यवाद विनायक!!!!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/08/2009 - 22:49 नवीन

लेख चाळला

गांधीजी कोणालाच कळले नाही म्हणतात, अतिशय चतरा माणूस. गांधीजी, गांधीजींना तरी कळले होते का ? त्यांचे अहिंसा, ब्रम्हचर्य या प्रयोगाची तर लैच गम्मत वाटते. (माझे वयक्तिक मत आहे ) असो,लेखातील गांधीजींचे अहिंसेबद्दलचे मते निवांत वाचून प्रतिक्रिया लिहिन. अहिंसेने 'मनुष्याचा आजार बरा होतो ' हे काहीच्या काही वाटले. अवांतर : असे म्हणतात की, गांधीजींनी मनात आणले असते तर स्वातंत्र्यविरांना फाशीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले नसते. त्याबद्दल गांधीजींचे काय धोरण असावे बरे ?
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 01/08/2009 - 23:27 नवीन

गांधीजींच

गांधीजींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाबद्दल मलाही आश्चर्यच वाटले.अस म्हणतात की त्यांचे ब्रह्मचर्यही त्या काळात अहिंसेनंतर सगळ्यात जास्त चर्चिले गेले होते.मला तरी तो भाग विचित्रच वाटतो.ब्रह्मचर्याचे पालन जसे संन्यासी करतात तसे करण्याचे सोडुन गांधीजींनी वेगळाच मार्ग घेतला.मनुष्याच्या मनातील हिंसा करण्याचा अथवा अन्याय करण्याचा आजार बरा होतो असा अर्थ घ्यावा.बाकी भगतसिंगची फाशी गांधीजींना वाचवता आली असती असे म्हणतात पण मला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा