✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

स
सतिश गावडे यांनी
Mon, 02/22/2016 - 00:44  ·  लेख
लेख
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे. तुम्ही काय मानता हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच (ज्याला आपण नेहमीच्या भाषेत पिंड म्हणू शकतो) आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती यावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. ते हो, नाही, काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही यापैकी काहीही असू शकते. शिवाय हे प्रमाणही व्यक्तीगणिक वेगळे असू शकते.
1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...
असं अमेरीकेच्या घटनाकारांचं मानणं आहे. हे एक प्रकारचे तत्वज्ञान आहे. मानवी मन (खरं तर मानवी मेंदू) उत्क्रांत होत असताना ज्या नैतिकतेच्या कल्पना तयार होत गेल्या त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी, समाज गुण्यागोविंदाने नांदावा म्हणून हे असं "मानण्यात" आलं. हेच कुठल्याही लोकशाही देशाच्या घटनेला लागू होईल. किंबहूना हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये नागरीकांसाठी जी काही नियमावली असेल त्यातही असे काही तरी "मानलेले" असेल आणि त्या देशाच्या नागरीकांना ते बंधनकारक असेल.
2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .
"आपण सारे गुलाम आहोत का?" या मुख्य प्रश्नाचे उत्तर इथेही लागू होते. "नाही" या उत्तराचा विचार करता पैशाची गुलामगिरी झिडकारून जंगलात झोपडी बांधून नैसर्गिक अन्नावर जिवंत राहण्याचा पर्याय आपल्या प्रत्येकाकडे आहे. मात्र ते आदिमानवाचं जगणं होईल. किंबहूना आपला उत्क्रांत मेंदू आपल्याला ते पाऊल उचलूच देणार नाही. तसे नसते तर कुंभमेळ्याला आलेल्या साधूंकडे मोबाईल आणि लॅपटॉप दिसले नसते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर खुपच कमी लोक "नाही" असे देतील. हो आणि नाही च्या मधले बरेच जण असतील. पुण्यात पाच खोल्याच्या घराच्या कर्जाचे हप्ते भरणारी मंडळी या प्रश्नाचे उत्तर "हो" असे देतील.
3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .
ही काळाच्या ओघात उत्क्रांत झालेल्या मानवी मेंदूची करामत आहे. एका प्रतिसादात डॉ. सुहास म्हात्रे म्हणाले होते की "उत्क्रांत मेंदू" हा माणूस या प्राण्याचा आजार आहे. ते तंतोतंत पटते. प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला. १. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्‍या प्राण्यांचा मेंदू २. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले. ३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या मानवाला योगायोगाने शेतीचा शोध लागला. मुबलक पीक येऊ लागल्याने अन्नाची ददात मिटली. स्वतःची अन्नाची गरज भागवून झाल्यानंतर धान्य उरू लागल्याने हे धान्य इतरांना देता येऊ लागले. त्यामुळे काही लोक शेती न करता ईतर गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. यातून उद्योगधंदे विकसित झाले. एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आली. पुढे काळाच्या ओघात "श्रमाच्या बदल्यात श्रम" ही संकल्पना नष्ट होऊन "पैसे" नावाच्या गोष्टीचा माणसाने शोध लावला. आणि ओघानेच पैसा असेल तरच माणसाला सेवा "विकत" मिळू लागल्या. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या माणसाला तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आणून सोडले ते त्याच्या मेंदूच्या सर्वात वरच्या थराने. अर्थात निओ कॉर्टेक्सने. इतर प्राण्यांमध्ये ही निओ कॉर्टेक्सची भानगड नाही. नाही म्हणायला कपी वर्गाच्या ईतर प्राण्यांमध्ये अतिशय प्राथमिक स्वरूपाचा निओ कॉर्टेक्स असतो. तो मानवाईतका प्रगत नसल्याने ते माणसांच्या भानगडीतून सुटले.
4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल 5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .
अशी काही उदाहरणे आपल्या पाहण्यात येत असली तरीही हे सरसकट म्हणता येत नाही. प्रेमापोटी आपल्या सधन, उच्च सामाजिक स्तर असलेल्या आई वडीलांच्या विरोधाला न जुमानता आपल्यापेक्षा कनिष्ठ आर्थिक आणि सामाजिक स्तर असलेल्या तरूणाबरोबर लग्न करणार्‍या मुली आपण आजूबाजूला पाहतो. सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे पैसा हा एकमेव घटक जोडीदार निवडताना नक्कीच नसतो.
6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .
अध्यात्म कळायला खुप सोपं आहे. आचरणात आणणे महाकठीण. वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत. काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले. माणूस आपल्या शरीराबद्दल, त्याच्या अवयवांबद्दल उल्लेख करताना "माझे शरीर, माझे हात, माझे पाय" असा करतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराहून वेगळे आहोत ही जाणिव माणसाला झाली. मी म्हणजे माझे शरीर नाही तर मग मी कोण? शारीरीक वेदनांच्या पलीकडेही दु:ख म्हणून काहीतरी आहे. माझ्या शरीराला वेदना होतात आणि मी दु:खी होतो. म्हणजेच मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व". दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत माणसाचे एकंदरीत निसर्गनियमांचे आकलन मर्यादीत होते. त्याला कळत नव्हते हा सभोवतालचा निसर्ग, पशू, पक्षी आणि तो स्वतः कसा तयार झाला. दिवसा प्रकाश देणारा सूर्य नामक आगीचा गोळा, रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र, ढगांचा गडगडाट, विजांचे चमकणे, पाऊस पडणे हे सारे त्याच्या डोक्याच्या वर असणार्‍या "आकाशात" घडत होते. त्यामुळे त्या विशाल आकाशात हे सर्व घडवणारी कुणीतरी शक्ती राहत असावी असा त्याचा ग्रह झाला. आपल्या अस्तित्वाला माणसाने "आत्मा" असे नाव देऊन आकाशातील शक्तीला "परमात्मा" असे नाव दिले. आत्म्याची परमात्म्याशी सांगड घातली. आता आपण विसाव्या शतकात येऊ या. माणसाने मेंदूत कोणत्याही प्रकारचे उपकरण किंवा हत्यार न खुपसता मेंदूत घडणार्‍या हालचाली पाहण्याचे तंत्र (noninvasive imaging techniques) विकसित केले. माणसाचे मन हा त्याच्या मेंदूने शरीरांतर्गत तसेच बाह्य उत्तेजक संवेदनांना (stimuli) दिलेला प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले. किंबहूना माणसाची सारी सुख दु:खं हा त्याच्या मेंदूतील चेताप्रक्षेपकांचा कल्लोळ आहे हे कळू लागले. अगदी कालपरवापर्यंत माणूस ज्याला "स्व" किंवा "अस्तित्व" म्हणत होता तीसुद्धा मेंदूचीच करामत असावी असा कयास त्याने बांधला. आजही या जाणीवेचे मेंदूतील स्थान किंवा जाणीव (consciousness) मेंदूत कशी तयार होते यावर संशोधन चालू आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. जियुलिओ टोनोनी (Giulio Tononi) यांनी जाणीवेसंदर्भात "एकत्रित माहिती सिद्धांत" (Integrated Information Theory) मांडला. मेंदूच्या विविध भागातून माहिती एकत्र येऊन त्याची सलग अशी जाणिव तयार होते अशा अर्थाचा तो सिद्धांत आहे. यात "स्व" ची जाणीवही आलीच. अर्थात हा सिद्धांत विज्ञान जगताने स्विकारलेला नसून यावर अधिक संशोधन चालू आहे. ही सारी माहिती घेतल्यानंतर आपण पुन्हा आपल्या "ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे" या मुळ मुद्दयाकडे वळू या. आज होमो सेपियन्स हा प्राणी काळाच्या अशा टप्प्यावर उभा आहे की जिथे पैसा नसेल तर त्याचे आयुष्य भयावह बनेल. जगण्यासाठी माफक प्रमाणात का होईना, पण पैसा हवाच. पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल. Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते) थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12272 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

तुम्हाला स्व गवसलेला आहे का?

मोदक
Tue, 02/23/2016 - 19:13 नवीन
तुम्हाला स्व गवसलेला आहे का? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

Elementary, my dear मोदक ;)

होबासराव
Tue, 02/23/2016 - 19:24 नवीन
Elementary, my dear मोदक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एक वेगळा विचार मांडल्याबद्दल

सतिश गावडे
Tue, 02/23/2016 - 22:47 नवीन
एक वेगळा विचार मांडल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला पडलेल्या जगण्याच्या प्रश्नापेक्षा दुसरा एक प्रश्न मूलभूत स्वरूपाचा आहे. तो म्हणजे आपण जन्म का घेतो. जन्म आपल्या हातात नसतो असं म्हणतात. ते एका अर्थी बरोबरही आहे. पण या जन्माच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर त्याची मदत जगण्याच्या प्रश्नाचा अन्वयार्थ लावण्यात होईल.
सहमत. "आपण जन्म का घेतो?" या प्रश्नाचं सोपं उत्तर "माहीती नाही" हे आहे. :)
आपण जन्म घेतो ते अमर होण्यासाठी. अमर होणे म्हणजे काळावर विजय मिळवणे. काळ सर्वभक्षक आहे. त्याच्या पल्याड मी कुठे आहे याचा शोध घ्यायची इच्छा प्रत्येक माणसाला असते. ही भुकेसारखी आहे. भूक सगळ्यांना लागते, पण तिचं शब्दांत वर्णन करून सांगता येत नाही.
हा विचार समर्थांच्या "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या वचनाच्या जवळ जाणारा वाटतो. आणि असा अमर झालेला कोण तर माझ्या नजरेसमोर ज्ञानियांचा राजा उभा राहतो.
माणूस जसा अमर होण्यासाठी जन्म घेतो तसं इतर प्राण्यांचं नाही. माणसाकडे क्रियमाण म्हणजे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. ही सुविधा प्राण्यांना उपलब्ध नाही. म्हणून मनुष्यजन्म प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ( अर्थात, माणूस जर हातचं क्रियमाण सोडून प्राण्यासारखा वागू लागला तर ती अधोगती झाली ! )
Thanks to neocortex !!
आता तुमची विचारप्रक्रिया ज्यातून सुरू झाली त्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे आपण गुलाम आहोत का! उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. जर हातचं क्रियमाण सोडलं तर आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम बनतो. अन्यथा नाही.
काहीसा असहमत. "हातचं क्रियमाण सोडणं किंवा न सोडणं" हे पुर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुन्हा त्याच चुका !

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 23:41 नवीन
"आपण जन्म का घेतो?" या प्रश्नाचं सोपं उत्तर "माहीती नाही" हे आहे. देह जन्म घेतो. स्व नाही. हा विचार समर्थांच्या "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या वचनाच्या जवळ जाणारा वाटतो. जो जन्मच घेत नाही त्याला मृत्यू नाही. हातचं क्रियमाण सोडणं किंवा न सोडणं हे पुर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही स्व कायम अकर्ता आहे. क्रिया केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर घडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही सर, तुम्ही गाईड होऊ नका.

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 00:00 नवीन
नाही सर, तुम्ही गाईड होऊ नका. मला एकाला अर्जंट मानसिक उपचारासाठी वेड्यांच्या हॉस्पीटलला न्यायचे आहे, तुम्हाला येरवडा जवळ पडेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

हातचं क्रियमाण घालवणे म्हणजे साधना न करणे

गामा पैलवान
Wed, 02/24/2016 - 02:58 नवीन
सतिश गावडे, अमर होणे म्हणजे आपली स्वची जाणीव देहापल्याड नेणे. त्याकरिता साधना करावी लागते. हातचं क्रियमाण घालवणे म्हणजे साधना न करणे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

देहा पल्याड काहीच नाही,

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/24/2016 - 07:34 नवीन
देहा पल्याड काहीच नाही, आणि यांना अ'मर व्हायची घाई! Image removed. ------------------- देहाचा हाची आत्मा! तेथेचि मुक्ती लढवा किती युक्ती टनाटनी पणाची !!! ..... देहात्मवादीछन्द :- आत्म-बंध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुन्हा अज्ञानमूलक प्रतिसादाचं प्रदर्शन !

विवेक ठाकूर
Wed, 02/24/2016 - 13:46 नवीन
देहा पल्याड काहीच नाही प्रतिसाद देण्यापूर्वी लेखकानं काय लिहीलंय ते पाहा : मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व". देहाचा हाची आत्मा! तेथेचि मुक्ती लढवा किती युक्ती टनाटनी पणाची !!! बालीश काव्य रचून `देह म्हणजे आत्मा' सांगायचा प्रयत्न ! आत्मा अमर आहे म्हणून तर सूज्ञ अमृताचा शोध घेतो. लेख कळायला इतपत प्राथमिक वाचन तरी करायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तीव्र तीव्र सहमत. तुम्ही

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 14:06 नवीन
तीव्र तीव्र सहमत. तुम्ही सोडुन मिसळपाववर कुणीच काहीच कधीच लिहायला नाय पाय्जेल. फारच लिहायची खाज असेल तर तुमच्याकडून आधी प्रमाणपत्र घ्यायला पायजेल. रच्याकने, जे लिहिलंय ते वाचायचं असतं, पाहायचं नसतं हे ज्या सर्वज्ञाला कळत नाही त्याला इतरांना होबासक्या शिकवायचा काय अधिकार असा प्रश्न मी निराकार गाढवाला विचारू म्हणतो तर ते बेणं कुठी गायपलं -अस्तित्व- जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

त्याला इतरांना होबासक्या

होबासराव
Wed, 02/24/2016 - 14:12 नवीन
त्याला इतरांना होबासक्या शिकवायचा काय अधिकार असा प्रश्न मी निराकार गाढवाला विचारू म्हणतो तर ते बेणं कुठी गायपलं -अस्तित्व- जाणे खिक्क ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काहीच न लिहिता पिवळा प्रतिसाद

नाव आडनाव
Wed, 02/24/2016 - 14:41 नवीन
काहीच न लिहिता पिवळा प्रतिसाद ("पिवळ्या पुस्तका" सारखा वाटतोय शब्द :) ) देता येतोय का हे चेक करतोय. राग मानू ने. मला कधीतरी ८०-८५ ओळिंचा प्रतिसाद लिहायचाय असं माझं स्वप्न आहे. हम होंगे कामयाब एक दिन ( हे पण पिवळं होइल का ?). ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ........................................................................... ...........................................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अगदी !!

नीलमोहर
Wed, 02/24/2016 - 16:30 नवीन
आधी वाटलं एवढं 'येल्लो येल्लो डर्‍र्टी फेल्लो' मलाच दिसतंय की काय ;) या निमित्ताने पहिल्यांदाच चेक करून बघितलं हायलाईट कसं करतात, थँक्स हं. वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत. काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले. - माझ्याकडे अशा प्रश्नांची मोठी यादी आहे, नक्की कुठल्या रस्त्याने पोहोचायचं या उत्तरांपर्यंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

तुम्ही येल्लो हायलाइटपर्यंत

तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 16:40 नवीन
तुम्ही येल्लो हायलाइटपर्यंत पोचले ना? योग्य रस्त्यावर आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

बुवा आता प्लीजच.... आवरा.

अभ्या..
Fri, 02/26/2016 - 15:26 नवीन
बुवा आता प्लीजच.... आवरा. टू मच. शब्दाला शब्द वाढवण्यात अर्थ नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नायतर काय.

प्रचेतस
Fri, 02/26/2016 - 15:29 नवीन
नायतर काय. दोघांच्या भांडणात मिपाकर फुकट हसू हसू / चिडू चिडू राह्यले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@फुकट हसू हसू / चिडू चिडू

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/26/2016 - 16:00 नवीन
@फुकट हसू हसू / चिडू चिडू राह्यले. >> माझ्यावरती हसू हसू,अन त्याच्यावरती चिडू चिडू अस जर का खरच असेल,तर कशाला मी होऊ कडू Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगागागागा

प्रचेतस
Fri, 02/26/2016 - 16:03 नवीन
अगागागागा यमक्या वामनानंतर तुम्हीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तरी तुमच्यापेक्षा कमीच!

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/26/2016 - 16:54 नवीन
तरी तुमच्यापेक्षा कमीच! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ठीक आहे..मी थांबतो

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/26/2016 - 15:56 नवीन
ठीक आहे..मी थांबतो फक्त उत्तर दे एक तू जो मला प्रथम छळतो त्याला का मारत नाही तू!? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

किती हा यमकांचा सोस =))

प्रचेतस
Fri, 02/26/2016 - 15:59 नवीन
किती हा यमकांचा सोस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/26/2016 - 16:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किती हा यमकांचा सोस =))

गौरी लेले
Wed, 03/02/2016 - 17:49 नवीन
किती हा यमकांचा सोस =))
ते यमकांचे गुलाम असावेत बहुधा ! (पण यमक न वापरता लिहिलेले त्यांचे भावविश्व मात्र खरेच सुरेख आहे ह्यात शंका नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुवा

नाखु
Fri, 02/26/2016 - 16:01 नवीन
शांत व्हा तोपर्यंत हे वाचा नेम धरून आणि हो सही वाचायला विसरू नका सही अगदी सही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

प्राण्यांचा मेंदू तीन

होबासराव
Tue, 02/23/2016 - 14:36 नवीन
प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला. १. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्‍या प्राण्यांचा मेंदू २. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले. ३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत. सगा लेख छानच झालाय.
  • Log in or register to post comments

पण इतरेजनांच्या लेखातून,

होबासराव
Tue, 02/23/2016 - 18:02 नवीन
पण इतरेजनांच्या लेखातून, प्रतिसादातून आणि विचारातून ते आपोआप चूक ठरतात. स्व गवसलेलेल्या त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

आवडली

सुमीत भातखंडे
Tue, 02/23/2016 - 19:45 नवीन
उत्तरं आवडली.
  • Log in or register to post comments

अनेक आभार

उडन खटोला
Tue, 02/23/2016 - 20:40 नवीन
विठा जी यान्चे अनेक आभार् व धन्यवाद ,,,, मला माझ्या धाग्यात जे म्हणायचे होते ,ते तुम्ही पर्फेक्टली सान्गितलंत सतीश जी आपणास माझ्या धाग्यावरुन प्रेरणा मिळाली हे पाहुन आनन्द झाला असो ... रोचक चर्चा .............चालुद्या
  • Log in or register to post comments

तुम्हाला उपयोग झाला , आनंद आहे .

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 21:05 नवीन
बाकीच्या उथळ कमेंटसवर घालवायला वेळ नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

धन्यवाद उडन खटोला. विवेक

सतिश गावडे
Tue, 02/23/2016 - 21:26 नवीन
धन्यवाद उडन खटोला. विवेक ठाकुर यांच्या उत्तरांनी तुमचे शंका समाधान झाले हे उत्तम झाले. राहीली गोष्ट या धाग्यावरील चर्चेची. मी तुमच्या प्रश्नांचा धागा पकडून मी माझे या विषयाचे आकलन मांडले. ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

सत्य एकच आहे

विवेक ठाकूर
Tue, 02/23/2016 - 22:26 नवीन
त्यामुळे ते अंतिम आहे . अर्थात , सत्य काय आहे ह न समजल्याचा, हा पुन्हा एकदा पुरावा दिला गेलायं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

इरीटेट करण्यात मला पीएचडी

तर्राट जोकर
Tue, 02/23/2016 - 22:33 नवीन
इरीटेट करण्यात मला पीएचडी करायची आहे, माझे गाईड व्हाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

पीएचडी कशाला होताय?

गामा पैलवान
Fri, 02/26/2016 - 13:30 नवीन
तजो, इरिटेट करण्यासाठी पिण्यासाठी हपापलेला दारुड्या व्हायची गरज नाही. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ते अंतिम सत्य आहे असा माझा

होबासराव
Tue, 02/23/2016 - 21:58 नवीन
ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ. बाडिस सगा सर ;)
  • Log in or register to post comments

षोडशोपचार पूजा नीट क्रमवार

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/23/2016 - 23:44 नवीन
षोडशोपचार पूजा नीट क्रमवार सांगुन शेवटी आरती मंत्रपुष्पाचे सूर मनाला समाधान देत जावेत तसा काहिसा फील लेख वाचताना येत गेला.. आणि शेवटी या तीर्थ प्रसादाने @
थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
@ पूजेची सांगता उत्तम जाहली आहे.. :) आता हा लेख मी (आपल्या नावासह..) प्रसाद म्हणून इथपर्यंत पोहोचलेल्यांना द्यायला मोकळा. ;) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एकदा कॉलेज ला असतांना एक

होबासराव
Wed, 02/24/2016 - 20:39 नवीन
एकदा कॉलेज ला असतांना एक रामकृष्ण मिशन चा कार्यक्रम अटेंड करावा लागला होता, वक्ता मुंडण केलेला, मिशन चे लोक घालतात तसला भगवा ड्रेस्...वक्त्याने लोकांना प्रश्न केला. मि म्हणजे काय ? हा माझा हात आहे, म्हणजे मि नव्हे. हे माझे डोके आहे म्हणजे मि नव्हे. असे सगळे मानवि अवयव मोजुन झाले, आत्मा सुद्धा झाला.... माझा आत्मा..म्हणजे मि नव्हे. नंतर त्यांनि मि म्हणजे काय वर एक छान छोटेखानि प्रवचन दिल, काहि कारणाने पण त्या वेळेस मि तिथे नव्हतो. मिस्ड दॅट्...पण जेव्हा पुन्हा परतलो तेव्हा वक्ता कॉलेज च्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर अगदि हसतमुखाने ओघवत्या भाषेत आणि तरिहि घास कोंबुन खाउ घातल्यासारखे न करता देत होता. आमच्या ग्रुप मध्ये मुस्लिम मुले-मुलि हि होत्या स्वेच्छेने आलेल्या. कोंबुन खाउ घालणे:- फोर्सफुली आपले मत पटवुन देणे
  • Log in or register to post comments

गावडे सर, अगदी नेमके लिहिलेत.

बॅटमॅन
Wed, 03/02/2016 - 17:58 नवीन
गावडे सर, अगदी नेमके लिहिलेत. जड पण प्रॅक्टिकलसुद्धा.
  • Log in or register to post comments

आवडले...

निशांत_खाडे
Wed, 03/02/2016 - 18:28 नवीन
सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही. अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट लेख.आपणाकडून असेच दर्जेदार वाचायला मिळावे हि अपेक्षा. लिहित रहा, गावडे सर.
  • Log in or register to post comments

"उत्क्रांत मेंदू" हा माणूस या प्राण्याचा आजार आहे.

नन्द्या
Wed, 03/02/2016 - 21:00 नवीन
हे विधान, तसेच निओ कॉर्टेक्स मुळे प्रश्न उद्भवले हे विचार निराशावादी वाटतात. खरे तर उत्क्रान्त मेन्दू वा निओकॉर्टेक्स चा वापर कसा करायचा हे त्या दोन गोष्टीन्मुळेच कळते. शिवाय नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करणे, जंगली, हिम्सक विचारानच्या ऐवजी दया क्षमा शान्ति हे कसे चान्गले हे सगळे उत्क्रान्त मेन्दू मुळेच कळले. अणुशास्त्र शिकल्यावर त्यापासून बाँब बनवणे वा उर्जा उत्पन्न करणे हे दोन्हीहि त्या उत्क्रान्त मेन्दूमुळेच शक्य आहे. तर या उत्क्रान्त मेन्दूला शाप, प्रष्नमूलक समजावे की त्यापासून विधायक कार्य कसे करता येईल याचा विचार महत्वाचा. व तो करायलाहि योग्य मार्गाने विचार्‍ करणारा उत्क्रान्त मेन्दूच पाहिजे. यासाठी उत्क्रान्त मेन्दूचा वापर करून धर्म नावाची कल्पना काढून त्यात निरनिराळ्या विद्वानान्नी जगाला मार्गदर्शन केले. पण त्याचा विपरित अर्थ करून जगणे म्हणजे शाप - अनेक प्रश्न हे सगळे दिसते. म्हणून मग शाप प्रष्न असे निराशावादी विचार. आशा आहे की हेच विचारवन्त पुढे जाऊन त्यातून मार्गहि काढतील नि उत्क्रान्त मेन्दू हा केव्हढा वर आहे हे दाखवून देतील.
  • Log in or register to post comments

हे पहावे...

निशांत_खाडे
Fri, 03/04/2016 - 00:48 नवीन
जॉर्ज कार्लीन यांचा हा विडीओ जरूर पाहावा..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा