चार दिवस पुरणारे अत्तर असते
प्रेम तसे मग बाकी खडतर असते
सुटकेचा आयास निरर्थक असतो
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते
आपण अपुली सांभाळावी दुनिया
सूख जरासे दु:ख निरंतर असते
आकाशाला हातच पोचत नाही
नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते
प्रश्न तुला मी तोच कितीदा केला
तुझे आपले एकच उत्तर असते
कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
2232
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुटकेचा आयास निरर्थक असतो
दिगंतरच !
In reply to सुटकेचा आयास निरर्थक असतो by गवि
नेहमी इतकी परिणाम-कारक नाही
@गवि ,आत्मबंध धन्यवाद !
@गवि ,आत्मबंध धन्यवाद !
कुठून कोठेतरी जायचे नुसते..