✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125475 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

लेखातले इंग्रजी शब्द कमी केले

किसन शिंदे
Sun, 12/30/2012 - 20:33 नवीन
लेखातले इंग्रजी शब्द कमी केले असते तर एक सुंदर लेख तयार झाला असता. ;)
  • Log in or register to post comments

सवय झालिये त्या शब्दांची..

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 20:40 नवीन
सवय झालिये त्या शब्दांची...सुटायला वेळ लागेल :) आणि "सुंदर"??? थान्कु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आम्ही बर्याच विषयांवर

तथागत
गुरुवार, 01/03/2013 - 03:47 नवीन
आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... reasons for past breakups >> म्हणजे तुम्ही पुर्वी मुली पटवलेल्यात तर! तेंव्हा काय केलेलेत ते आठवा. ते पुन्हा करुन लगेच मागणी घाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(१) "rose with rose"... जरा

शुचि
Sun, 12/30/2012 - 20:41 नवीन
(१) "rose with rose"... जरा अतिच वाटते. माफ करा पण आपली कमेंट मला दवणीय आणि 'डेस्पो" वाटली. (२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले. ___________ मला वाटते "मा फलेषु कदाचन" भावनेतून जरा "गो स्लो". मुलीदेखील अतिचिकीत्सक असतात हे बाकी मान्य. माझी रुममेट मुलं पाहते आहे. तिला जी मुले आवडत नाहीत किंबहुना अगदी टाकाऊ वाटतात तीच मुलं मला विवाहोत्सुक आणि फ्रेश (प्रॉमिसींग) वाटतात. तिने थोड्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले तर तिला नकी पटू शकेल मी काय म्हणते ते. पण तारुण्यातले स्वभावाचे धारदार कंगोरे मला वाटतं इतक्या सहजासहजी "मेलो" होत नाहीत.
  • Log in or register to post comments

(१)"rose with rose"...आधी

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 20:56 नवीन
(१)"rose with rose"...आधी टायटानिकवरुन बोलणे झालेले...त्यासंदर्भात ती ओळ होती तिने चॅट बंद केले कारण ओपनली कमेंट लिहिणे आवडले नाही...का ते मला तरी अजुन समजलेले नाही (२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे... मी "character" बद्दल बोलत होतो... (आणि मुक्ता बर्वेबद्दल नाही...का आत आता हे सुद्धा सविस्तर सांगावे लागेल :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे

शुचि
Sun, 12/30/2012 - 21:03 नवीन
कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे. मला ती कमेंट "जरा जास्तच सलगीपूर्ण" वाटते. माहीत नाही का पण वाटते. मी त्या मुलीशी बाडीस आहे. मुक्ता बर्वेबद्दल नाही हे कळले होते. पण अपेक्षा जरा फिल्मीच वाटते. ______________ दोन्ही मुलींशी मी बाडीस आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"जरा जास्तच सलगीपूर्ण"

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 21:17 नवीन
"जरा जास्तच सलगीपूर्ण" यापेक्शा जास्त सलगीपुर्ण वाक्ये आधी दुसर्यांनी लिहिली होती...मला त्या वाक्यात काहिही वावगे वाटले नाही...it was just a complement that comment is not even a flirt comment, if some1 thinks so...then i will say that's ok...it's ur opinion
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून

शुचि
Sun, 12/30/2012 - 21:22 नवीन
बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून दिली जाते अशा टाईपची काव्यमय (दवणीय किंवा कसेही) मुलगी असेल तर तिला ती कॉम्प्लिमेंट "ऑव्हर्ट" वाटू शकते. :) अशा मुली असतात. ती तशीच असेल मग असा माझा कयास आहे. ____________ एक शंका - यापेक्षा सलगीपूर्ण कमेंट जी अन्य कोणी दिलेली, ती तिने "लाईक" केली होती का? प्रॉबेबली नॉट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"लाईक" केली होती

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 21:23 नवीन
"लाईक" केली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अपेक्शा

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 21:23 नवीन
अपेक्शा I think a relationship requires loyalty, understanding, care and support from both sides. I hate liars and selfish people. And yes... I know that adjustments are part of life. My partner should be honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker. In my partner preference anybody can observe that any community, cast is acceptable... that's correct. For me if a girl has above mentioned qualities then I don't mind overlooking community or cast.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

a relationship requires - अ

शुचि
Sun, 12/30/2012 - 21:40 नवीन
a relationship requires - अ लॉट ऑफ लाफ्टर, फ्रेन्ड्शिप अँड सनशाईन ऑफ फन. मी माझ्या मुलीला नेहमी सांगते जी व्यक्ती तुला हसवू शकते, तुझी चांगला मित्र आहे अशा व्यक्तीशी लग्न कर. :) ....... एव्ह्रीथिंग एल्स विल फॉल इन राईट प्लेस. असो. धागा मस्त आहे. आपल्याला वधू निवडण्यास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माफ करा पण

इष्टुर फाकडा
Sun, 12/30/2012 - 21:04 नवीन
संस्थळांवर तुमचे जमेल असे वाटत नाही. पारंपारिक पर्याय जवळ करा. स्वभाव जुळण्याला महत्व तुम्ही द्या. छान मुलगी मिळेल :) शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

"पारंपारिक पर्याय जवळ करा"

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 21:11 नवीन
"पारंपारिक पर्याय जवळ करा" म्हणजे कोणते??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

...

इष्टुर फाकडा
Sun, 12/30/2012 - 22:19 नवीन
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
जे तुम्हाला अपेक्षित आहेत तेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्हाला ढिगभर फोटो हवे आहेत

श्री गावसेना प्रमुख
Tue, 01/01/2013 - 14:32 नवीन
तुम्हाला ढिगभर फोटो हवे आहेत का?चॉइस करा,शिनेमातल्या हिरोसारख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

century

टवाळ कार्टा
Tue, 01/01/2013 - 14:48 नवीन
:D century \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हेच अपेक्षीत होत का?

श्री गावसेना प्रमुख
Tue, 01/01/2013 - 15:26 नवीन
हेच अपेक्षीत होत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाही नाही हे अनपेक्शीत होते

टवाळ कार्टा
Tue, 01/01/2013 - 15:31 नवीन
नाही नाही हे अनपेक्शीत होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु

श्री गावसेना प्रमुख
Tue, 01/01/2013 - 16:00 नवीन
काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु १०० प्रतिक्रीया(ज्यात तुमच्याच जास्त असाव्यात) गाठण्याचाच होता हे ढळढळीत सत्य आहे का?असेही असे धागे पुष्कळसे येउन गेलेत् तुम्ही मनमोकळे रहा ,पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न

टवाळ कार्टा
Tue, 01/01/2013 - 16:06 नवीन
"पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे." _/|\_ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

+१

पिवळा डांबिस
Sun, 12/30/2012 - 21:07 नवीन
"दिवसाला ५० धागे येतात, कुणाकुणाला प्रतिक्रिया देणार?" असं म्हणत नाहीये!!! :) पण लेख क्रमशः करून अजून अनुभव लिहा तुमचे, इथेच थांबू नका... वाचायला सॉलिड मजा येतेय, हे सगळं सुरस आणि रोचक वाटतंय!!!! :)
  • Log in or register to post comments

हाहाहा

शुचि
Sun, 12/30/2012 - 21:10 नवीन
+१ धागा मलाही फार आवडला. खरच खुसखुशीत अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही

खान
Sun, 12/30/2012 - 21:18 नवीन
तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही स्वतःला थोडे उथळ प्रोजेक्ट करत आहात. फारशी ओळख नसलेल्या मुलीला फेसबुकवर कमेंटा टाकणे, टीव्ही सिरियलमधल्या कॅरॅक्टर्सारखी मुलगी पाहिजे सांगणे यावरून तुमच्याबद्दल एक अपरिपक्व इमेज बनते आहे. 'मला शारुकसारखा नवरा पाहिजे' असं एखाद्या मुलीने म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय राहील? मला मॅट्रिमोनी साईट्सचा अनुभव नाही पण एवढंच म्हणेन की मुलींच्या मनात तुमच्या बद्दल आश्वासक भावना निर्माण झाली पाहिजे. उतावीळ होऊ नका. बायदवे शतकी धाग्यासाठी शुभेच्छा! ;)
  • Log in or register to post comments

परत एकदा...

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 21:25 नवीन
परत एकदा... "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खान

म्हणजे

पैसा
Sun, 12/30/2012 - 21:42 नवीन
प्रामाणिक, स्पष्टवक्ती, बहिर्मुख, सुशिक्षित, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र विचारांची. मग एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला? एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे यावर मला फक्त हसू येतंय. कारण प्रत्यक्षात आपल्याला ८ तास नोकरी करावी लागते. त्यासाठी ४ तास प्रवास करावा लागतो. महिन्याचे बजेट करावं लागतं. छान साड्या, दागिने आणि कपडे घालून सासू/सुनेविरुद्ध कट करत आयुष्य चालवता येत नाही. प्रेम, रॉमंटिक वागणे वगैरे स्वप्नं प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर दाणकन जमिनीवर येतात. मग घरातल्या कामांची वाटणी वगैरे जास्त महत्त्वाचे ठरते. हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. मला विचाराल तर कोणतेही लग्न, मग ते प्रेमविवाह असो की ठरवून केलेले, हे लग्नच असते. घरोघरी मातीच्याच चुली. माझा फुकटचा सल्ला हाच की आतापर्यंत तुम्हाला जर प्रेमात पडून लग्न करणे शक्य झाले नसेल तर घरच्यांनी ठरवलेल्या आणि जी तुम्हाला कांदेपोहे खाताना आवडेल अशा मुलीशी सरळ लग्न करा. पश्चात्ताप होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 22:37 नवीन
"एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे" इथेच तर समजण्यात चुक झाली ना...मी फक्त उदहरण दिलेले..."तश्शीच" असवी अशी अपेक्शा कधीही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

"एखाद्या मुलीने स्पष्टपणे

टवाळ कार्टा
Sun, 12/30/2012 - 22:43 नवीन
"एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला?" ??? हाच तर प्रॉब्लेम आहे ना...कोणीच स्पष्टपणे सांगितले नाही तोच तर लेखाचा विषय आहे आणि जर कोणि स्पष्टपणे सांगत असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आणि जी तुम्हाला कांदेपोहे

आदूबाळ
Mon, 12/31/2012 - 00:08 नवीन
आणि जी तुम्हाला कांदेपोहे खाताना आवडेल अशा मुलीशी सरळ लग्न करा
कांदेपोहे सुद्धा आवडले तर फारच उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१११११

michmadhura
Mon, 12/31/2012 - 12:23 नवीन
पैसाताइंशी सहमत. हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत//////१००%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे मने जुळणे वगैरे याला फार

आनंदी गोपाळ
Tue, 01/01/2013 - 21:18 नवीन
हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत
इतकी उमज येईपर्यंत थांबलात तर उशीरातल्या तिशीत वा लवकरातल्या चाळीशीत लग्न पटकन जमून जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

+१

अत्रन्गि पाउस
Sat, 02/06/2016 - 08:36 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अगदि खर !! १००% सहमत !!

क्श्मा कुल्कर्नि
Wed, 01/09/2013 - 11:44 नवीन
अगदि खर !! १००% सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नावाचं स्पेलींग बदलून घ्या हो

खटपट्या
Fri, 02/19/2016 - 01:13 नवीन
नावाचं स्पेलींग बदलून घ्या हो. "क्षमा कुळकर्णी" असं करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्श्मा कुल्कर्नि

आणि त्या कुळकर्णी नसुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/19/2016 - 09:00 नवीन
आणि त्या कुळकर्णी नसुन कुलकर्णी असतील तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

कुळकर्णी आणि कुलकर्णी

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:41 नवीन
कुळकर्णी आणि कुलकर्णी यात फरक काय आहे? आमच्या वर्गात एक मुलगी कुलकर्णी म्हटले असताना कु"ळ"कर्णी असे सुदाह्रून घेण्याचा आग्रह करत असे यावरून विचारत आहे. (थट्टेने नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी

यशोधरा
Fri, 02/19/2016 - 09:46 नवीन
कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी वगैरेंचे दफ्तर सांभाळणारे ते कुळकर्णी असे वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण व्यंकटेश माडगुळकरांच्या

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:51 नवीन
पण व्यंकटेश माडगुळकरांच्या सर्व पुस्तकात हीच कामे सांभाळणारे "कुलकर्णी" म्हणून लिहिले आहे. खरं तर बर्याच देशस्थ ब्राम्हणान्मध्ये कुलकर्णी हे आडनाव त्या पदवीवरून आलेले आहे असे समजते. जसे मराठा समाजात "पाटील" हि पदवी समजली जाते जी बरेच लोक नंतर आडनाव म्हणून वापरतात. उदा शंकरराव कोल्हे -पाटील, शंकरराव काळे - पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मूळ हुद्दा कुळकरणी असा होता.

प्रचेतस
Fri, 02/19/2016 - 09:56 नवीन
मूळ हुद्दा कुळकरणी असा होता. त्यातही देशावरील कारभारचा हिशोब सांभाळणं, दफ्तरखाना इत्यादी. त्यामुळे देशकुळकरणी असेही म्हणत. कोकणात काय पद्धत होती नेमके माहीत नाही. अपभ्रंश होत होत पदवीबरुन कुलकर्णी हेच नाव झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोकणात कुलकर्णी नाव ऐकले नाही

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:59 नवीन
कोकणात कुलकर्णी नाव ऐकले नाही. मुळात कोकणात शेतीच किती आहे/ होती? दीड एकरानंतर डोंगरच चालू होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 09:51 नवीन
अरे मुद्दा बघा रे, हुद्याच्या काय मागे लागला. मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हे तर खरं च

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:54 नवीन
हे तर खरं च आय माय स्वारी बरं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये

यशोधरा
Fri, 02/19/2016 - 09:58 नवीन
मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये हाय. >>> २०१२पासून? तुम्ही सगळे मित्तर मदत करा की. असले कसले मित्तर? एक वहिनी शोधता यीना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मित्रांनी सांगितले नव्हते

टवाळ कार्टा
Fri, 02/19/2016 - 12:16 नवीन
मित्रांनी सांगितले नव्हते आम्ही शोधू म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

एवढ्या एका डॉयलॉग साठी तु

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 12:57 नवीन
एवढ्या एका डॉयलॉग साठी तु भित्रा, पळपुटा अन शेंदाडशिपाई आहेस असे आगामी आरोप मागे घेण्यात येत आहेत. ;) तू शूर मावळा हायेस टक्या. उचल ढाल तरवार आण म्हण हरहर म्हादेव.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

;)

टवाळ कार्टा
Fri, 02/19/2016 - 13:10 नवीन
;) और तुम कम से कम कपडा तो संभालो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दोन फरक

श्रीरंग_जोशी
Fri, 02/19/2016 - 09:52 नवीन
दोन फरक असू शकतात. विदर्भ व विदर्भाला लागून असणार्‍या खानदेशाच्या व मराठवाड्याच्या भागांत कुळकर्णी हेच आडनाव आढळतं कुलकर्णी अगदीच अपवादात्मक. याउलट राज्याच्या इतर भागांत कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कुळकर्णी आडनाव कायस्थांचे

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 09:56 नवीन
कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते. हायला कायस्थात पण कुळकर्णी असतात काय? आम्ही आपला राजे प्रधान वगैरे ऐकले होते. लैच अज्ञान आहे आमचं. महाराष्ट्राच्या बाहेर फिरून न घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे खरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नीना कुळकर्णी

श्रीरंग_जोशी
Fri, 02/19/2016 - 09:59 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे अभिनेत्री नीना कुळकर्णी या कायस्थ आहेत. (चुभुदेघे). टक्या - माफी असावी, तुझ्या धाग्यावर विषय सोडून प्रतिसाद देतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परफेक्ट

स्वलेकर
गुरुवार, 02/14/2013 - 18:31 नवीन
एकदम परफेक्ट! पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बेस्ट सल्ला

मनोरा
Sun, 02/17/2013 - 07:34 नवीन
ज्योती कामत ह्यांनी दिलेला सल्ला बेस्ट आहे. जमीनीवर रहाणे म्हनतात ते ह्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा