Skip to main content

मुली शोधाण्यातले frustration

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 30/12/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

वाचने 126760
प्रतिक्रिया 511

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... reasons for past breakups >> म्हणजे तुम्ही पुर्वी मुली पटवलेल्यात तर! तेंव्हा काय केलेलेत ते आठवा. ते पुन्हा करुन लगेच मागणी घाला.

(१) "rose with rose"... जरा अतिच वाटते. माफ करा पण आपली कमेंट मला दवणीय आणि 'डेस्पो" वाटली. (२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले. ___________ मला वाटते "मा फलेषु कदाचन" भावनेतून जरा "गो स्लो". मुलीदेखील अतिचिकीत्सक असतात हे बाकी मान्य. माझी रुममेट मुलं पाहते आहे. तिला जी मुले आवडत नाहीत किंबहुना अगदी टाकाऊ वाटतात तीच मुलं मला विवाहोत्सुक आणि फ्रेश (प्रॉमिसींग) वाटतात. तिने थोड्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले तर तिला नकी पटू शकेल मी काय म्हणते ते. पण तारुण्यातले स्वभावाचे धारदार कंगोरे मला वाटतं इतक्या सहजासहजी "मेलो" होत नाहीत.

In reply to by शुचि

(१)"rose with rose"...आधी टायटानिकवरुन बोलणे झालेले...त्यासंदर्भात ती ओळ होती तिने चॅट बंद केले कारण ओपनली कमेंट लिहिणे आवडले नाही...का ते मला तरी अजुन समजलेले नाही (२) अपेक्षा "फिल्मी" असण्याबद्दल मुलीचे अ‍ॅलर्ट होणे मला पटले. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे... मी "character" बद्दल बोलत होतो... (आणि मुक्ता बर्वेबद्दल नाही...का आत आता हे सुद्धा सविस्तर सांगावे लागेल :) )

In reply to by टवाळ कार्टा

कमेंट बद्दल मी देखील सहमत आहे. मला ती कमेंट "जरा जास्तच सलगीपूर्ण" वाटते. माहीत नाही का पण वाटते. मी त्या मुलीशी बाडीस आहे. मुक्ता बर्वेबद्दल नाही हे कळले होते. पण अपेक्षा जरा फिल्मीच वाटते. ______________ दोन्ही मुलींशी मी बाडीस आहे. :(

In reply to by शुचि

"जरा जास्तच सलगीपूर्ण" यापेक्शा जास्त सलगीपुर्ण वाक्ये आधी दुसर्यांनी लिहिली होती...मला त्या वाक्यात काहिही वावगे वाटले नाही...it was just a complement that comment is not even a flirt comment, if some1 thinks so...then i will say that's ok...it's ur opinion

In reply to by टवाळ कार्टा

बेस्ट कॉम्प्लिमेंट नजरेतून दिली जाते अशा टाईपची काव्यमय (दवणीय किंवा कसेही) मुलगी असेल तर तिला ती कॉम्प्लिमेंट "ऑव्हर्ट" वाटू शकते. :) अशा मुली असतात. ती तशीच असेल मग असा माझा कयास आहे. ____________ एक शंका - यापेक्षा सलगीपूर्ण कमेंट जी अन्य कोणी दिलेली, ती तिने "लाईक" केली होती का? प्रॉबेबली नॉट.

In reply to by शुचि

अपेक्शा I think a relationship requires loyalty, understanding, care and support from both sides. I hate liars and selfish people. And yes... I know that adjustments are part of life. My partner should be honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker. In my partner preference anybody can observe that any community, cast is acceptable... that's correct. For me if a girl has above mentioned qualities then I don't mind overlooking community or cast.

In reply to by टवाळ कार्टा

a relationship requires - अ लॉट ऑफ लाफ्टर, फ्रेन्ड्शिप अँड सनशाईन ऑफ फन. मी माझ्या मुलीला नेहमी सांगते जी व्यक्ती तुला हसवू शकते, तुझी चांगला मित्र आहे अशा व्यक्तीशी लग्न कर. :) ....... एव्ह्रीथिंग एल्स विल फॉल इन राईट प्लेस. असो. धागा मस्त आहे. आपल्याला वधू निवडण्यास शुभेच्छा.

संस्थळांवर तुमचे जमेल असे वाटत नाही. पारंपारिक पर्याय जवळ करा. स्वभाव जुळण्याला महत्व तुम्ही द्या. छान मुलगी मिळेल :) शुभेच्छा !

In reply to by टवाळ कार्टा

माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
जे तुम्हाला अपेक्षित आहेत तेच !

In reply to by टवाळ कार्टा

काय अनपेक्षीत होत्?तुमचा हेतु १०० प्रतिक्रीया(ज्यात तुमच्याच जास्त असाव्यात) गाठण्याचा होता हे ढळढळीत सत्य आहे का?असेही असे धागे पुष्कळसे येउन गेलेत् तुम्ही मनमोकळे रहा ,पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

"पैका जवळ ठेवा,दिपिका चे लग्न पुढच्या वर्षी असावे असा माझा कयास आहे." _/|\_ ;)

"दिवसाला ५० धागे येतात, कुणाकुणाला प्रतिक्रिया देणार?" असं म्हणत नाहीये!!! :) पण लेख क्रमशः करून अजून अनुभव लिहा तुमचे, इथेच थांबू नका... वाचायला सॉलिड मजा येतेय, हे सगळं सुरस आणि रोचक वाटतंय!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

+१ धागा मलाही फार आवडला. खरच खुसखुशीत अनुभव आहे.

तुमच्या मनात नसलं तरी तुम्ही स्वतःला थोडे उथळ प्रोजेक्ट करत आहात. फारशी ओळख नसलेल्या मुलीला फेसबुकवर कमेंटा टाकणे, टीव्ही सिरियलमधल्या कॅरॅक्टर्सारखी मुलगी पाहिजे सांगणे यावरून तुमच्याबद्दल एक अपरिपक्व इमेज बनते आहे. 'मला शारुकसारखा नवरा पाहिजे' असं एखाद्या मुलीने म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय राहील? मला मॅट्रिमोनी साईट्सचा अनुभव नाही पण एवढंच म्हणेन की मुलींच्या मनात तुमच्या बद्दल आश्वासक भावना निर्माण झाली पाहिजे. उतावीळ होऊ नका. बायदवे शतकी धाग्यासाठी शुभेच्छा! ;)

In reply to by खान

परत एकदा... "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker

In reply to by टवाळ कार्टा

प्रामाणिक, स्पष्टवक्ती, बहिर्मुख, सुशिक्षित, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र विचारांची. मग एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला? एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे यावर मला फक्त हसू येतंय. कारण प्रत्यक्षात आपल्याला ८ तास नोकरी करावी लागते. त्यासाठी ४ तास प्रवास करावा लागतो. महिन्याचे बजेट करावं लागतं. छान साड्या, दागिने आणि कपडे घालून सासू/सुनेविरुद्ध कट करत आयुष्य चालवता येत नाही. प्रेम, रॉमंटिक वागणे वगैरे स्वप्नं प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर दाणकन जमिनीवर येतात. मग घरातल्या कामांची वाटणी वगैरे जास्त महत्त्वाचे ठरते. हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. मला विचाराल तर कोणतेही लग्न, मग ते प्रेमविवाह असो की ठरवून केलेले, हे लग्नच असते. घरोघरी मातीच्याच चुली. माझा फुकटचा सल्ला हाच की आतापर्यंत तुम्हाला जर प्रेमात पडून लग्न करणे शक्य झाले नसेल तर घरच्यांनी ठरवलेल्या आणि जी तुम्हाला कांदेपोहे खाताना आवडेल अशा मुलीशी सरळ लग्न करा. पश्चात्ताप होणार नाही.

In reply to by पैसा

"एखाद्या सीरियलमधले कॅरेक्टर प्रत्यक्षात अपेक्षिणे" इथेच तर समजण्यात चुक झाली ना...मी फक्त उदहरण दिलेले..."तश्शीच" असवी अशी अपेक्शा कधीही नाही

In reply to by पैसा

"एखाद्या मुलीने स्पष्टपणे सांगितलं तर रागावताय कशाला?" ??? हाच तर प्रॉब्लेम आहे ना...कोणीच स्पष्टपणे सांगितले नाही तोच तर लेखाचा विषय आहे आणि जर कोणि स्पष्टपणे सांगत असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही

In reply to by पैसा

पैसाताइंशी सहमत. हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत//////१००%

In reply to by michmadhura

हे मने जुळणे वगैरे याला फार अर्थ नसतो. कारण कोणत्याही २ व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात. एखाद्याच्या गुणदोषांसकट आपले म्हणायची तयारी आणि तडजोड हे लग्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत
इतकी उमज येईपर्यंत थांबलात तर उशीरातल्या तिशीत वा लवकरातल्या चाळीशीत लग्न पटकन जमून जाईल

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कुळकर्णी आणि कुलकर्णी यात फरक काय आहे? आमच्या वर्गात एक मुलगी कुलकर्णी म्हटले असताना कु"ळ"कर्णी असे सुदाह्रून घेण्याचा आग्रह करत असे यावरून विचारत आहे. (थट्टेने नव्हे)

In reply to by सुबोध खरे

कुळकर्णी हा हुद्दा आहे. जमिनी वगैरेंचे दफ्तर सांभाळणारे ते कुळकर्णी असे वाचल्याचे आठवते.

In reply to by यशोधरा

पण व्यंकटेश माडगुळकरांच्या सर्व पुस्तकात हीच कामे सांभाळणारे "कुलकर्णी" म्हणून लिहिले आहे. खरं तर बर्याच देशस्थ ब्राम्हणान्मध्ये कुलकर्णी हे आडनाव त्या पदवीवरून आलेले आहे असे समजते. जसे मराठा समाजात "पाटील" हि पदवी समजली जाते जी बरेच लोक नंतर आडनाव म्हणून वापरतात. उदा शंकरराव कोल्हे -पाटील, शंकरराव काळे - पाटील

In reply to by सुबोध खरे

मूळ हुद्दा कुळकरणी असा होता. त्यातही देशावरील कारभारचा हिशोब सांभाळणं, दफ्तरखाना इत्यादी. त्यामुळे देशकुळकरणी असेही म्हणत. कोकणात काय पद्धत होती नेमके माहीत नाही. अपभ्रंश होत होत पदवीबरुन कुलकर्णी हेच नाव झाले.

In reply to by प्रचेतस

कोकणात कुलकर्णी नाव ऐकले नाही. मुळात कोकणात शेतीच किती आहे/ होती? दीड एकरानंतर डोंगरच चालू होतो

In reply to by अभ्या..

मुद्दा टक्या फर्सट्रेशन मध्ये हाय. >>> २०१२पासून? तुम्ही सगळे मित्तर मदत करा की. असले कसले मित्तर? एक वहिनी शोधता यीना!

In reply to by टवाळ कार्टा

एवढ्या एका डॉयलॉग साठी तु भित्रा, पळपुटा अन शेंदाडशिपाई आहेस असे आगामी आरोप मागे घेण्यात येत आहेत. ;) तू शूर मावळा हायेस टक्या. उचल ढाल तरवार आण म्हण हरहर म्हादेव.........

In reply to by सुबोध खरे

दोन फरक असू शकतात. विदर्भ व विदर्भाला लागून असणार्‍या खानदेशाच्या व मराठवाड्याच्या भागांत कुळकर्णी हेच आडनाव आढळतं कुलकर्णी अगदीच अपवादात्मक. याउलट राज्याच्या इतर भागांत कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कुळकर्णी आडनाव कायस्थांचे असते. हायला कायस्थात पण कुळकर्णी असतात काय? आम्ही आपला राजे प्रधान वगैरे ऐकले होते. लैच अज्ञान आहे आमचं. महाराष्ट्राच्या बाहेर फिरून न घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे खरी.

In reply to by सुबोध खरे

माझ्या माहितीप्रमाणे अभिनेत्री नीना कुळकर्णी या कायस्थ आहेत. (चुभुदेघे). टक्या - माफी असावी, तुझ्या धाग्यावर विषय सोडून प्रतिसाद देतोय.

In reply to by पैसा

ज्योती कामत ह्यांनी दिलेला सल्ला बेस्ट आहे. जमीनीवर रहाणे म्हनतात ते ह्याला.

एक सांगू? स्वतःला काय हवे आहे यापेक्षा किंचित जास्त आपण इतरांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. आख्खं आयुष्यच अर्थपूर्ण होईन. :)

नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?

In reply to by दादा कोंडके

"तुम्ही वाट बघता म्हणजे नक्की काय करता? त्या मुलीचा (पहिल्याच केलेल्या requestला) reply येइल म्हणून इतर मुलींना contact करणं बंद करता का?" आधी वाट बघायचो (१०-१५ दिवस)...पण नंतर अनुभवातुन शहाणा झालो आणि वाट बघणे सोडले "म्हणजे का? इतर जातीतले ही असली अट ठेवायला eligible नाहीत का?" मला प्रश्न समजला नाही ... मी "(तरी मी so called उच्च जातीतला आहे)" हे फक्त एव्हड्यासठीच लिहिले कारण माझा अजुन्पर्यंत समज हाच होता की भारतात आंतर्जातीय विवाह करताना फक्त "so called" (sarcasm expected here) उच्च-कनिष्ठ जातींमधेच तणाव असतो... आणि दोन "so called" (sarcasm expected here) उच्च जातींसाठी तरी काहीच हरकत नसावी... DISCLAIMER - FOR ME, CASTE/RELIGIONS DON'T HAVE ANY PRECEDENCE NOR THEY ACT AS ANY CRITERIA FOR SHORTLISTING GIRL

सिरियसली.... "rose with rose", "मुक्ता बर्वे टाईप.." वगैरे नंतर तुम्हाला रिप्लाईज येतिल, अशी अपेक्षा होती तुमची ?! :))

मला या प्रकारातला फारसा अनुभव नाही पण मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ या दोन्ही नंतर मीही अगदी दुसर्‍या क्षणानंतर संवाद बंद केला असता. पैसाताईशी सहमत. नव्या प्रकारे लग्न जमत नसेल तर कांदेपोहे कार्यक्रम करून लग्न करायला काहीच हरकत नाही. मुक्ता बर्वेची जी मालिका थोडीफार पाहिली आणि त्यातली तिची भूमिका लिहिणारा प्राणी कन्फ्युज्ड असावा किंवा त्याला प्रेक्षकांना कन्फ्यूज करणे जमले असे म्हणीन. तुम्हाला लवकरच मुलगी पसंत पडो, तिलाही तुम्ही पसंत पडो आणि आम्हाला लाडू मिळोत अशी इच्छा!

In reply to by रेवती

हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम आहे का?? मी ती कमेंट लिहिलेली कारण... १.आमाची आमचे १५-१६ वेळा online chat (every time atleast for 20 minutes) झालेले आणि आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups, expectations from each other 2.ज्या मुलीच्या फोटोवर "ती" कमेंट लिहिलेली ती २ वर्षे परदेशात राहुन आलेली... त्यामुळे माझ्यामते तरी तिला "ती" कमेंट बरिच सोज्वळ वटायला वाटायला काहीच हरकत नव्हती आणि सगळ्यात महत्वाचे...इतके सगळे जण हा लेख वाचत आहेत...एकालाही असे वाटु नये की त्या मुलीला जर मझी कमेंट आवडली नाही तर तसे सरळ्पणे सांगायला हवे होते...का सगळ्यांचे असेच मानणे आहे की "मुली अश्याच वागतात"???

In reply to by टवाळ कार्टा

आहे हे असे आहे. त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघायचे का हे तुम्ही ठरवा. जर प्राथमिक संवादात हा प्रॉब्लेम वाटत असेल तर पिक्चर अभी बाकी है मेरे भाय. लग्नाच्या बाबत शेवटचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार. आईवडीलही चहा पोहे झाल्यावर "बघ बाबा आता, आम्हाला स्थळ बरं वाटतय, तुला आवडली मुलगी तर हो म्हण." असंच म्हणतात. कोणत्याही मुलीला दुसर्‍या मुलीचे उदाहरण देऊन तू तशी असायला हवीस असे म्हणणे आवडत नाही (मुलांचेही असेच असावे असा अंदाज). ती मुलगी किंवा आणखी कोणी परदेशात राहू दे नाहीतर परग्रहावर, लग्नासारख्या गोष्टींमध्ये बहुतेकवेळा तुमचे संस्कार जसे असतील तसे वागले जाते (हे सकारात्मक दृष्टीने वाचणे) कारण ते सुरक्षित वाटते (म्हणून आईबाबांकडे धाव घ्यावीशी वाटते). मुलीने कोणती गोष्ट सरळपणे सांगायला हवी हे तुम्ही ठरवू शकत नाही, निदान लग्नाच्या बाबतीत तरी. तुम्ही तिला टर्न ऑफ केलेत की संपले. हे मुलांच्या बाबतीतही आहे. फक्त तसा अनुभव तुम्हाला अजून आला नसेल. वाट बघा. आपल्या अपेक्षा सटासट् कधी कमी होतात ते समजत नाही. ही जर तडजोड वाटत असेल तर संसार करताना त्याच्या कितीतरी पट तडजोड करण्याचे गणित (मनातल्या मनात) मांडा.

In reply to by रेवती

"आहे हे असे आहे" आहे हे असे आहे म्हणजेच भले जे आहे ते चुकीचे असेल पण ते तसेच चालणार कदाचीत त्यामुळेच असेल...पण आजकाल कोणतीही मुलगी जर स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलु लागली तर असेच वाटते की पुरुषांच्या जागी स्त्री असती आणि स्त्री च्या जागी पुरुष असते तर स्त्रीयासुद्धा अशाच वागल्या असत्या... माझ्याबाबत तरी मुलींबद्दल माझा रिस्पेक्ट फार कमी झाला आहे (हे वाक्य फार वादग्रस्त ठरु शकते याची जाणिव आहे पण परदेशात राहील्यावर लग्नाबद्दल बोलण्यात जो मोकळेपणा दिसतो तसा जर खरोखर आचरणात आणला तर अरेंज लग्नानंतर्च्या बर्याच 'तडजोडी' कमी होतील...)

In reply to by टवाळ कार्टा

'आहे हे असं आहे' याचा अर्थ म्हणजे जगातल्या सगळ्या बायकांचा तो स्वभाव आहे (उगाच का बायको माहेरी गेल्यावर बरेचजण आनंदी राहतात?) ;). आणि बुवा, परदेशातल्या दोन वर्षांत विचारात बदल वगैरे फारसा घडत नाही. रिस्पेक्ट कमी झालाय का तरी? ओक्के. तुम्ही अजून लग्नासाठी तयार नाही असंच दिसतय. विचार करा थोडे दिवस. अस्संच हवं नी तस्संच हवं असं फार चिवडू नका (शेवटी अपर्णा म्हणाली त्याच शब्दापर्यंत आले मी).

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही बर्याच विषयांवर मोकळेपणाने बोललेलो... अगदी each other's ex, reasons for past breakups >> तेंव्हा एक्ष कशी पटविली होती ते आठवा तेच पुन्हा करुन लगेच मुलीला मागणी घाला.

In reply to by टवाळ कार्टा

त्च्च् .... छ्या ! नै रे ... मुली अश्या नसतात . :) झालं कै असेल मैते का ... तिच्या नव्या मित्राने ओब्जेक्शन घेतलं असणारे ... त्यामुळे तिने तुला उडवला असणारे .., एवडं कै मनाला लाउन घेतो ... ती नै त कुइ उर सै असा विचार करुन जगायचं अस्तय रे ;)

प्रेमात पडुन करा, चॅट करुन करा, वा कांदा पोहे खाउन करा, पण लग्न म्हणजे वर्षानु वर्षाची बांधणुक असते. अन मग ते तुम्ही कितीही ठरवलात तरी शेवटी तडजोडीनेच टिकते. आता स्वभावात फारच फरक असेल तर वेगळी गोष्ट पण साधारण आवडी निवडी शिक्षण अन बॅकग्राउंड जमत असेल तर झटक्यात करुन टाका. ट्रस्ट मी फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.

In reply to by स्पंदना

फार चिवडाल तर हाताला गाळ येइल.
+१००००००००००००००००० लै चाफीत बसला तर चिंगळ्याच हातात येतील...... =)) त्यामुळे फार अपेक्षा न ठेवता करुन टाक झटपट...

मुलींच्या अपेक्षा आणि पेट्रोलचे भाव कधीही खाली येत नाहीत हे वैश्विक सत्य आहे.

पैसा रेवती अपर्णा यांच्याशी सहमत आहे. टवाळाला कार्येषु मंत्री करुणेषु| दासी भोजनेषु माता शयनेषु रंभा || अशी बायको पाहिजे. प्रत्येक पुरुषाला असेच वाटत असते असो