Skip to main content

मुली शोधाण्यातले frustration

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 30/12/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

वाचने 126760
प्रतिक्रिया 511

प्रतिक्रिया

honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker.
पुढच्या वेळी बर्वेंच्या मुक्ताबाईं च्या ऐवजी सावंतांच्या राखीताईंचे नाव घेवून पहा. हेच सगळे गुण त्यांनासुद्धा लागू होतात.

आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन शिप मध्ये काही वर्ष काढली आणि पुढे भारतात येउन लग्न केले. त्यामुळे अरेंज मेरेज चा माझा वैयक्तिक अनुभव नाही. पण त्या बद्दल चे किस्से वाचतांना जाम धमाल येते. माझ्या अनेक मित्रांचे लंडन मध्ये असतांना असेच विवाह साईट व मग लग्न जमले व आजतागायत सुरळीत चालले आहे. मात्र त्यांचे एकाच वेळी चार ते ५ मुलींना शॉर्टलिस्ट करून काही महिने चाट करणे व त्यानंतर काही महिन्यांनी वार्तालाप करून झाल्यावर ४ जणींना नाकारून एकीला हो म्हणणे असा प्रकार पहिला तेव्हा त्याची तुलना जॉब इंटरव्ह्यू ची करावीशी वाटते. म्हणजे मुलाखत देणाऱ्या कडे व घेणाऱ्या कडे भरपूर पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे नथिंग पर्सनल , हा एक बाजार आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग वर जाताच खरी गोष्ट ध्यानात आली. अभद्र लिहिण्याबद्दल क्षमा असावी.

In reply to by काळा पहाड

आंतरजालावर एकदा लिहिले कि येणाऱ्या प्रतिसादांचे मी नेहमीच स्वागत करतो. माझ्या पहिल्या वाक्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो हे मान्य ,पण दुसरे वाक्य मला अनुभव नाही ,,, ह्यातून खुलासा केला होता. पण आपण जे लिहिले आहे ते अगदी योग्य आहे. माझ्या परिचयात अनेक लिविंग जोडपी होती. त्यांचे अनेक किस्से आहेत ,त्यावर एक लेख लिहावा म्हणजे पंचतारांकित लिविंग रिलेशन शिप अशी कल्पना डोक्यात आली. प्रत्येक जोडप्याची आपलीच एक कहाणी आहे. उलट तुमच्या प्रतिसादाचे मला आभारच मानले पाहिजे त्यामुळे नववर्ष लिहिण्याचा एक विषय मिळाला. मागे मिपावर मी पंचतारांकित किस्से लिहिण्याचं ठरवले होते. ह्या निमित्ताने सुरवात करेन ,

In reply to by निनाद मुक्काम …

तुम्हाला नक्कीच विंग्रजीत लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणायचे आहे. "लिविंग रिलेशन शिप" नव्हे. होय ना?

In reply to by चित्रगुप्त

पण इथे सगळेच (काही नेहमीचे अपवाद सोडता)आयदर लग्नाळू किंवा नुकतंच लगीन लागलेले स्वप्नाळू लोकं सल्ले देताहेत त्या बिचार्‍या उनाड कार्ट्याला! हे म्हणजे उघड्याकडे नागडं गेलं अशापैकी आहे!!! तुमच्यासारख्या जुन्या आणि जाणित्या योध्याने चार युक्तीच्या गोष्टी सांगायला हव्यात बॉ त्याला!!! :)

टवाळा, कुठल्याच लग्नाळु मुलीला दुसर्‍या मुलीचा दाखला देऊन 'अशी मुलगी हवी' हे आवडणार नाही. ती खरच बोलण्यात straight forward असेल तर म्हणेल की, 'मग मुक्ता बर्वेशीच का लग्न करत नाही?'. कधीही एका स्त्रीची दुसर्‍या स्त्रीशी तुलना करु नका, विषेशतः तुम्हाला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" अशी स्त्री बायको म्हणुन हवी असेल तर. तेव्हा लग्नासाठीचे ढोबळ गुण जमले तर लग्न करुन टाका. कारण सहजीवनातली तडजोड लग्नानंतर एकमेकांच्या नकळत होतच रहाते.

कशाला एव्हड चिवडत बसतो टवाळा,जी पोरगी आवडली तिला स्पष्ट तु कसा आहेस त्याची कल्पना दे,ते तिला पसंत असेल तर हो म्हनेल्,नाही तर नाही..संपला विषय...

Thinking out of the box does not work everywhere !! वडिल धारि लोकन्चे ऐका. And follow their way. You wanted to have thrill in love / getting loved by some girl. Alas .. Time has passed.

अर्रे काय बाजार लावलाय फक्त एकीला "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" याचा अर्थ समजला नाही तर तीला'च' फक्त मु.ब. चे उ.दा. दिलेले चायला सगळे असे बोलत आहेत की जसा मी प्रत्येकीलाच सेम सांगतो :(

In reply to by टवाळ कार्टा

म्हणजे तुम्ही प्रत्येकीला वेगळ्या अपेक्षा सांगताय की काय?? त्यामुळेच त्या सगळ्या कन्फ्युज होतायत... :P

टवाळा एक सल्ला माझ्या अनेक मित्रांचे वधू संशोधन तुझ्याच मार्गाने झाले ते पाहून मला जे सुचले ते सांगतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी एकदा फक्त आभासी जगतात वार्तालाप कर. ज्यात बी युवर सेल्फ . त्यानंतर त्या मुलीला तुझ्या मध्ये रस असेल तर तुम्ही सरळ प्रत्यक्ष भेटा. आणि पहिल्यांदा त्या मुलीशी सविस्तर स्वतः विषयी बोल आणि तिला ही बोलू दे तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी म्हणून संसारात योग्य ठरेल. माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला नाकारला कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता. पुढे त्याला त्याच्या अनुरूप जोडीदार मिळाली. सध्या हे गाणे ऐक , आणि शब्दांकडे विशेष लक्ष दे आजकालच्या गाण्यात संगीत महत्त्वाचे आणि शब्द दुय्यम झाले आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

>>तुझे गुण दोष जे तुला तुझ्यात आढळतात ते तिला स्पष्ट सांग जो मुलगा ज्या वेळी इंप्रेशन पडायचे त्या वेळी स्वताचे दोष सांगतो (भले त्यामागचा हेतु चांगला असो, किंवा मुलगा कितीही चांगला असो) अशा मुलांना मुली "बावळट" समजतात >>तुझ्या गुणदोषांसहित जी तुला होकार कळवेल ती तुला खर्या अर्थाने योग्य पत्नी >>म्हणून संसारात योग्य ठरेल. अजुनपर्यंतचा (स्वताचा आणि मित्रमंडळींचा) अनुभव हाच आहे की अरेंज लग्नात मुली पैसा, स्वताचे घर असणारा, शक्यतो लहान भावंडे नसलेला (जेणेकरुन जबाबदार्या नसणारा), घरच्यांची पसंती, good looking या प्रमाणे मुलगा निवडतात...स्वभाव, आवड-निवड वगरे गोष्टी "adjustments" मधे मोडतात >>माझ्या एका चुलत भावाला अश्या प्रत्यक्ष भेटीत मुलीने लग्नानंतर तुझे पुढचे बेत काय अश्या अर्थी काही प्रश्न >>विचारले , ह्यापैकी बहुतांशी प्रश्नाची उत्तरे त्याने आई बाबांना विचारून अश्या अर्थी दिली आणि त्या मुलीने त्याला >>नाकारला >>कारण काय तर स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. >>आता माझ्या भावाच्या मते तो आई वडिलांसह कायम राहणार असल्याने एक कुटुंब म्हणून कोणताही निर्णय >>आजपर्यंत त्याने आई वडिलांसह एकत्र घेतला होता. म्हणजे त्या मुलीने नकार देताना तुझ्या भावाशी ओपनली बोलणे केले नाही...तसे झाले असते तर कदाचीत त्या दोघांना एकमेकांची बाजु समजुन घेता आली असती...पण मुलगी कितीही शिकलेली असो "हे असेच आहे"

लग्न जमण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा :) अमोल केळकर आम्हाला इथेही भेटू शकाल

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझा स्वताचा पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही (ज्यांचा आहे त्यांना माझा एकच प्रश्न...स्वताच्या मुलांना शाळेत घालताना मुहुर्त बघता का? किंवा जॉब इंटर्व्हुला जाताना , कंपनी मधे रुजु होताना मुहुर्त बघता का?) >>मुलीच्या घरच्यांनी/मुलीने पत्रिका जुळती आहे की नाही याचा आग्रह धरला तर काय करणार? माझी काहीच हरकत नाही

केळकर साहेब नुसत्या शुभेच्छा काय देता तुमच्या अनुदिनी मध्ये लग्न लवकर जमण्यासाठी स्तोत्र दिले आहे ते टवाळास द्यावे. ह्या वर्षीची आमची सकाळ तुमच्या अनुदिनी मुळे एकदम धार्मिक वातावरणात पार पडली त्याबाबतीत तुम्हाला धन्यवाद

हे एवढे सल्ले वाचल्यावर वाटलं, थोडी घाईच झाली. पण काय करणार, तेव्हा मिपा नव्ह्ते. पुढच्या जन्मासाठी सल्ले वाचून ठेवलेत.....

In reply to by जेनी...

111

(बहुतेक) वामन चोरघड्यांनी लिहीलेली एक गोष्ट आठवली ती थोडक्यात सांगतो. गावातला एक मास्तर असतो. त्याची वहाण वापरून वापरून जुनी झाली असते. शाळेबाहेरच्या चांभाराकडे खरेदी करायला जातो. मास्तराची अपेक्षा असते तशीच वहाण त्याच्याकडे असते. बरीच घासाघीस होते. भाव जमत नाही. मास्तर चांभाराला सांगतो "दुपारी तालुक्याला जातोय बघ याच भावात चांगली व्हाण घेतो की नाय" तालुक्याला गेल्यावर जी वहाण पसंत पडते ,भाव जमत नाही. दुसर्‍या दुकानात भाव बरे पण वहाण पसंत पडत नाही. दहा दुकानं फिरून मास्तर जुनीच वहाण घालून परत येतो. एश्टीतून उतरता उतरता वहाणेचा अंगठा प्राण सोडतो. आली का पंचाईत ? फिरून मास्तर शाळेबाहेरच्या चांभाराकडे येतो आणि सकाळी नाकारलेली वहाण मुकाट विकत घेतो.गोष्टीच्या शेवटी लेखकांनी एक तात्पर्य सांगीतले आहे ते असे की शंभर मुली बघणार्‍या मुलाचे लग्न शेवटी यथातथा मुलीशीच कसे होते ते आज मला कळले. यातून तुम्हाला उपदेश काहीही देत नाही पण सांगायचं इतकंच की अंगठा तुटेपर्यंत थांबू नका.

In reply to by रामदास

दिवस बदलल्याचे द्योतक म्हणजे तुमचा प्रतिसाद. ;) आज एका होऊ घातलेल्या वराला तुम्ही हे सांगताय. पूर्वी हाच सल्ला मुलींना मिळत असे. "पहिल्या वरा तूच बरा."

In reply to by रामदास

पण त्यांनी वहाण नाकारल्याचं कुठेच म्हटलं नाही. वहाणाच त्यांना आंगठा दाखवत आहेत :( बायदवे मुलींची तुलना वहाणांशी केल्याबद्दल तुमचा निषेध!! (माझ्याकडून द्विशतकासाठी मदत)

In reply to by रामदास

बायको ही नोकरीसारखी, काय समजलेत? दुसरी चांगलं प्रोफाईल देते म्हणुन पहिली सोडण्यात काहीएक अर्थ नसतो. शेवटी सगळ्या नोकर्‍या आणि सगळ्या बायका सारख्याच! काय समजलास वात्रटा?

In reply to by संजय क्षीरसागर

एकदा तुम्हाला ती आवडली की स्वतःचं सगळं मन बिनदिक्कत तिच्यासमोर उघडं कर.
ओ नका ओ, का बिचार्याची वाट लावायला निघालाय? टवाळा बाळा, असले सल्ले तू अजिबात ऐकू नको.

In reply to by काळा पहाड

मन बिन उघडं करा ते ठीक आहे, पण इथला आयडी अन पासवर्ड नका सांगु. , लग्नाआधी घरच्या संगणकाची हार्ड डिस्क स्वच्छ करुन घ्या, मोबाईलमधलं कार्ड फॉर्मट करुन घ्या. असो.

"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले.

In reply to by मराठे

"मुकेपण" हा बायकोत सगळ्यात मह्त्वाचा गुण आहे असं आमचे एक मावसआजोबा सांगायचे!!! आता गेले ते, तेंव्हा आता त्यांच्याविरूद्ध पाशवी मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही!!! :) बाकी 'वात्रट कार्ट्याला' आपण झक मारली आणि हा आयडी घेतला असं झालं असेल!! अरे तुझा तो फक्त आयडी आहे, इथे वीस हजार मिपाकर तोच गुण घेऊन मौजूद आहेत!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन ती कन्या मनातल्या मनात ' टवाळच दिसतोय कार्टा ' असं म्हणाली असेल काय.?? एक निरागस अंदाज आपला..!!

In reply to by आनन्दिता

त्याने टवाळ हा शब्द वापरला हेच चुकलं असावं... म्हणुन आम्ही वात्रट हा शब्द सुचवला.... वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं.... आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आमची ही तर आम्हाला सदैवच वात्रट म्हणते!!!!
कलियुग, दुसरं काय! 'हे' वरून 'वात्रट', किती ही अधोगती!! बर हे फक्त प्रायव्हेट मध्ये की पब्लिक मधे पण? आमचे वात्रटराव दिसले का कुठे म्हटल्यावर समोरचा आडवाच!!!

In reply to by पिवळा डांबिस

वात्रट (किंवा चावट)मुलं आवडतात कन्यांना असं आम्हाला वाटतं....
पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं? :)

In reply to by आनन्दिता

पिडां काका हे ईतकं सगळं माहित असुन तुम्ही तुमचं नाव डांबिस का ठेवुन घेतलय..? पिवळा चावट असं का नाही ठेवलं?
हॅ कैच्या कै! आम्ही जिथे चावटपणा करतो तिथे पिवळा डांबिस नांव लावत नाय काही!!!!! :) आम्ही मिपावर चावटपणा करायला येत नाही, इरसाल डांबिसपणा करायला येतो. म्हणून ते तसं नांव!! :)

In reply to by मराठे

"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" हे सगळे 'गुण' बघून लग्न केल्यानंतर हेच तुम्हाला 'अवगुण' न वाटो म्हणजे झाले. >> +१ शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्‍याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).

In reply to by पियू परी

शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्‍याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).
यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :) जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते?

In reply to by टवाळ कार्टा

ही पण नाण्याची एक बाजू आहेच टकोजी.तिने लिहिलेल्या प्रमाणे घरं मीही पाहिली आहेत.अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी.

In reply to by टवाळ कार्टा

यावर एक कच्कून वैयक्तिक प्रतिसाद मारता आला अस्ता मला :) जे तुम्च्याकडे झाले ते माझ्याकडेही होईलच असे का वाटते? >> मी माझे वैयक्तीक लिहिले आहे. तुमच्याकडेही असेच होईल असे म्हणत नाहीये. पण सासुसासरे झाल्यावर स्वतःच्याच आईवडीलांचे वागणे बघून थक्क झालेला मित्र आहे. आपले आईवडील आपल्या बायकोशी असे का वागतात हे त्यालाच कळेना झाले होते. आता तुम्ही माझा मित्रच मुर्ख होता वगैरे म्हणणार असाल तर इथेच थांबुयात. पण तुमच्या "honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker" ह्या अपेक्षा आणि तुमच्या पालकांच्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा सेम आहेत ना किंवा एकमेकांना पुरक आहेत ना हे पडताळून पाहायला सांगणे म्हणजे वैयक्तीक अपमान वगैरे होत असेल तर ___/\___ माफ करा. अगदी जाॅली वाटणारे आईबाप साबासाबु म्हणून टोटली वेगळी माणसं असू शकतात.हे तू पर्सनल लावून घेतो आहेस.पण ही पण एक नेहमी आढळणारी वस्तुस्थिती आहे.तुझ्याकडे असेल असे नाही.पण अशी माणसं असतात.डबल स्टॅन्डर्ड्स असणारी. >> अनुमोदन.

In reply to by पियू परी

बरं...मग मुलगी पहायला जाताना तिला काय विचारावे आणि मुलगी फायनल कशी करावी याबाबत सांगता का?

In reply to by टवाळ कार्टा

तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या अपेक्षा एकमेकांना पुरक आहेत का हे पडताळतांना पाहायला गेलेल्या मुलीला काय विचारणार? मी सुचवलेली चर्चा तुम्ही त्याआधीच करणे अपेक्षित आहे. तुम्ही आणि तुमच्या पालकांनी एकमेकांना लग्न होऊन घरात येणार्‍या मुलीकडून प्रत्येकाच्या काय काय अपेक्षा आहेत हे समोरासमोर बसून बोललात तर कदाचित भविष्यातले गुंतागुंतीचे प्रसंग टळतील असे सुचवायचे होते. परंतु तुम्हाला जर राग आला असेल आणि त्यामुळे तुम्ही मुद्दाम वाकड्यात शिरणार असाल तर इथेच थांबते.इतर संस्थळांप्रमाणे इथेही स्वप्रतिसाद संपादनाची सोय असती तर माझे आधीचे प्रतिसादही काढून टाकले असते. शुभेच्छा !!

In reply to by पियू परी

अर्र...तसे नाही...जर समजा माझ्या पालकांच्या अपेक्शा माझ्या अपेक्शांसारख्याच असतील तर पुढे काय असे विचारायचे होते

In reply to by टवाळ कार्टा

मुलाच्या पालकांच्या आणि मुलीच्या अपेक्षा जुळणे पण महत्त्वाचे असते! कारण लग्न एका माणसाशी झालं तरी पूर्ण परिवाराशी त्यासोबत जुळवुन घेणे महत्त्वाचे असतेच. मुलं समहाऊ अॅडजस्ट करतात.दोन्हीकडून थपडा खात! पण हे टाळायचे असेल तर तिचे करिअर,तिच्या आवडी,ती घरात काय करु शकते ,न करु शकत असल्यास जे पर्याय असतील उदा पूर्ण वेळ कामासाठी, स्वयंपाक इ साठी मदत घेणे इ निर्णय तिला घेताना सासरचे लोक किती साथ देऊ शकतात हे जमणेदेखील महत्त्वाचे आहे.नाहीतर माझ्या आईने नोकरी करुन सणवार, चारी ठाव स्वयंपाक केलाय मग हिला न जमायला काय झालं टाइप अॅटिट्युड प्राॅब्लेम घरात सुरु होऊ शकतात.याबद्दल वेळीच बोलणे इष्ट असते.लग्नानंतर मला घरकाम अजिबात आवडत नाही.मी करणार नाही असे सांगितल्यास घरात कल्चरल शाॅक बसु शकतो! तिला तिचे छंद इ जोपासायला किती प्रोत्साहन असू शकणार आहे.लग्न ठरताना आमच्याकडे सगळे ओपन माइंडेड म्हणणारे लोकच ती कुठे प्रोजेक्ट साठी,ट्रेक इ साठी निघाली की डोक्यावर आठ्या घालुन पाहू शकतात! मुलाच्या मैत्रिणीचे कौतुक असणाऱ्या आयांना सुनेचे मित्र घरी आलेले आवडत नाहीत! किती उदाहरणं इतक्या वर्षात निरनिराळ्या मैत्रिणींची पाहिली आहेत.लग्नाआधी बोलण्याच्या गोष्टी फक्त मुलीशीच नाही तर तिच्या अनुषंगाने पालकांच्या अपेक्षा जाणून घेणेही आवश्यक आहेच.प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर!!

In reply to by सूड

तू गप रे....इतके सल्ले देणार्यांपैकी कोणाला खरोखर उपयोगी माहिती देता येते का ते बघतो आहे

In reply to by टवाळ कार्टा

टका.. चार वर्ष झाले हा धागा काढून, अजून तुला मुलीला काय प्रश्न विचारायचे हे सुद्धा कळले नाही ????? तुला एक प्रेमळ सल्ला देतो..., असा समज की तू लाख चांगले प्रश्न विचारलेस आणि मुलीने तुला हवे ते उत्तर दिले जवळजवळ सगळ्याच प्रश्नांचे. पण ती धडधडीत खोटं बोलत असली तर ?? कसं ओळखणार ?? (अर्थात हे उलट पण होऊ शकते म्हणजे तू सुद्धा खोटं बोलू शकतोस. आता कोणी कशाला खोटं बोलेल असे बाळबोध प्रश्न तुला पडत नसतील अशी आशा करतो. या प्रश्नोत्तरांनी काहीही होत नाही. संवाद होणं महत्त्वाचं. अर्धा-पाऊणतास एखाद्याशी बोलल्यावर बऱ्याच गोष्टी क्लियर होतात.

In reply to by टवाळ कार्टा

तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट फीलिंग वर हे अवलंबुन असणार आहे. तू तुझ्या आई बाबांना नीट ओळखतोस. काही स्वभाव विशेष लपत नाहीत. तिला ही तूच पहिल्यांदा घरात नीट ओळखणार आहेस, सो हे तू कसं हाताळतोस त्यावर अवलंबुन राहिल. कांपोहे च्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारणार तू यावर? हे सगळं आफटर मॅथ आहे आणि ते तुझ्या आतापर्यंत च्या व्यक्तिमत्वावर आणि तिच्या ही व्यक्तिमत्वावर अवलंबुन राहणार आहे. एक मात्र सल्ला मला पटला नाही, पियु म्हणते ते खरं आहे की आई बाबांच्या अपेक्षा पण जुळल्या पाहिजेत पण ते सोयीस्कर असलं तरी रेलेव्हंट असेल च असं नाही. आज काल अनेक जण बाहेर च राहतात, नोकरी निमित्ताने देशा बाहेर किंवा शहराबाहेर वगैरे. रोजचं एकत्र राहणं नसलं की बर्‍याच गोष्टी इर-रेलेव्हंट होऊन जातात. शेवटी संसार मुला-मुलीला करायचा आहे त्यामुळे नवरा बायको ला दोघांनी नोकरी करणं गरजेचं वाटत असेल तर आईबाबांच्या विरुद्ध मताला थोडं बदलता आलं पाहिजे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुणाला घरगुती मुलगी हवी असते कुणाला बाहेर चं सगळं बरोबरीने हँडल करणारी हवी असते. मुलींच्या ही वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आणि आता लग्नाला बरीच वर्षं झाल्यावर सांगते, जोडीदाराकडुनच्या अपेक्षा बदलत राहतात. वयानुसार, परिस्थितीनुसार दोघांच्या प्राधान्यक्रमात एकत्र फरक पडु शकतो आणि कधी ते दोघं मिळुन ठरवतात की आता एकानेच नोकरी करु किंवा आता देश सोड्न बाहेर बघु नोकरी किंवा बास झालं भारतात परत जाऊ वगैरे. दोघांनी एकमेकांना ही मुभा दिली आणि कपल म्हणुन जी काही परिस्थिती आहे ती अ‍ॅड्जस्ट केली की झालं. या बाबतीत दोघांचा भावनांक सारखा हवा. आई बाबांना (दोघांच्या) तेवढं समजावुन सांगता आलं पाहिजे. आपल्या मस्ट हॅव अपेक्षा कोणत्या आणि नाईस टु हॅव कोणत्या हे कळायला पाहिजे आणि कोणत्या अपेक्षा कुठल्या विभागात टाकायच्या त्या आधी कळायला पाहिजे. आणि ते लग्न करणार्याला इतर कुणाहीपेक्षा जास्त कळतं, अगदी आपल्या पालकांपेक्षा पण.

In reply to by स्रुजा

प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला. की मुलीला पहाण्याच्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारावेत? माझ्या मते मुलगी पहाणे या कार्यक्रमात मुलगा आणि मुलगी या दोघांना स्कोप फारच कमी असतो. खरं तर हा कार्यक्रम बाकीच्या लोकांसाठीच असतो. मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे हे बाकीचे बघून घेतात. जर फीजीकल पसंती झाली असेल आणि बाकीच्या अपेक्षा जुळत असतील तर मुलगा आणि मुलीने सरळ बाहेर भेटूनच आपापसात अपेक्षांबद्द्ल चर्चा करावी. अशा बाहेरच्या भेटीत मुलगी आणि मुलगा नि:संकोचपणे बोलू शकतात. आता अशा भेटीत काय प्रश्न विचारवे असे विचाराल तर, तीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, तीच्या करीअरबद्द्ल तीचे काय विचार आहेत, वेगळे रहाण्याबद्दल काय विचार आहेत, खाण्यापिण्याच्या आवडी, तीचे मित्रमंड्ळ, तीचे आवडते विषय, आवडते कार्यक्रम, तीला फावला वेळ (तुम्ही दीलात तर) कसा घालवासा वाटतो, बाकीच्या बाबबतीच जसे की राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट जगत, सोशल मीडीया याबाबतीत तीची काही ठाम मते आहेत का, तीला वाचायला काय आवडते असे प्रश्न विचारुन तुम्ही तीच्या व्यक्तीमत्वाबद्द्ल जाणून घेउ शकता कींवा कमीतकमी अंदाज बांधू शकता. शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा प्रयत्न केलात तरी दोघांना प्रचंड अ‍ॅडजस्ट करावेच लागते हे ध्यानात असुद्या. स्वभाव रोजच्या सवयी, वैयक्तीक स्वच्छता, दैनंदीन खर्च, एकमेकांना वेळ देणे, दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर राखणे, इगो सांभाळाणे हे बाकीचे कळीचे मुद्दे असतातच. शेवटी मुलगी तीचे घर सोडून संपूर्ण अपरीचीत लोकांबरोबर रहायला येणार असते हे ध्यानात घेउन आपण अ‍ॅडजस्ट झालो तर बर्‍याच गोष्टी सुरळीत होतात.

In reply to by खटपट्या

प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला.
अजया आणि इतरांच्या सल्ल्यावर तो तपशील विचारत होता म्हणुन त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद लिहीला की या तपशीलात वेळेआधी आणि नवरा बायको सोडुन इतरांना सल्ले देणं शक्य नसतं, त्यांनी शक्य केलं तरी त्या सल्ल्याच्या मर्यादा ओळ्खुन असाव्यात नवरा बायको ने. हे एक, दुसरं असं की बघण्याच्या कार्यक्रमात समोर आलेलं फिनिश्ड प्रॉडक्ट नसतं. वेळोवेळी माणसं प्रगल्भ होत राहतात, एकमेकांच्या साथीने बदलतात , एकमेकांच्या आवडी निवडी जोपासतात, अंगीकारतात त्यामुळे त्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते व्यक्ती खुल्या मनाने बदल स्विकारु शकते का, नैतिक बैठक पक्की आहे का, वैचारीक बैठक पक्की आहे का आणि आहेत ते गुण आपल्याला पुरक आहेत का हे नीट बघुन घ्यावं. बाकी शिक्षण, जात-पात, रंग- रुप, वय, कौटुंबिक जडण घडण हे आधी बघुन च पुढे पाऊल टाकलेले असते त्यामुळे पुढच्या गोष्टी महत्त्वाच्या.