Skip to main content

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

लेखक गणेश उमाजी पाजवे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं ..................................... जगाच्या पोशिंद्याचं दुःख आभाळाला खेटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतीच्या समोर तुम्ही नाचवता बायका शेतकऱ्याला द्यायला नाही म्हणता पैका शेतकरी झालं उध्वस्त ते आयुष्यातून उठलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं उद्योगपतींना खुशाल देता मोठमोठ्या संधी कांद्याचे जरा भाव वाढले की निर्यातीवर बंदी असं दुटप्पी वागणं कसं तुम्हालाच पटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं मेक इन इंडियाचा केवढा मोठा बोलबाला तिकडे शेतकरी मात्र नुसते कष्ट करून मेला उद्योगपतीची वाढते ढेरी अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं नफेखोर उद्योगपतीसाठी केवढा तुमचा आटापिटा जगाला जगविणारा मात्र मुदलामध्ये सोसतो तोटा किती मांडू हिशेब सारा मन पार विटलं शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं - शामसुंदर महाराज सोन्नर

वाचने 15178
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

अप्रतिम कविता आहे. मी फेसबुक वर शेर केली होती, पण कवी माहित नव्हते. माहितीसाठी आभारी आहे.

कविता म्हणून जमलीय कविता.. पण त्यातल्या भावाशी आणि आशयाशी सहमत नाहीये.. उगाच शेतकर्‍यांचा कैवार घेणे हे सोशलमिडीयावर 'अपमार्केट' आहे म्हणून लिहील्यासारखी वाटतेय.. बाकी साला ह्या 'लहानपण, गुरुजनांची/आईवडीलांची थोरवी/ गरिबीच कशी ग्रेट/ गावाकडची माती/शेतकरी' वाल्या व्हॉट्सॅपी/फेसबुकी उमाळ्यांनी उबग आणलाय आता..

मागच्या सरकारच्या कार्यकाळात बुलढाण्याचे कॉंग्रेस चे आमदार दिलीप सानंदा ह्यांच्यावर अवैध सावकारी मध्ये शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याचा आरोप झाला होता।विलासराव मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला नकार दिल होता।हायकोर्टाने दटया दिल्यावर कार्यवाही झाली होती ,वर 2लाख दंडहि ठोठावला होता।तेव्हा कोणत्याही वामपंथी खान्ग्रेसी राष्ट्रवादी सेक्युलर कविने अशी कविता लिहिली नव्हती

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तेव्हां तर अगदी "राम राज्य " होते हो ! लोक्सत्तावरची (ई आवृत्तीतली)बातमीच गायब केली गेली आहे जाणत्या राजाचे विखारी विचार "महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री होणे परवडणारे /योग्य नाही" म्हणून. बरेच दिवस शोधतोय कुणाला मिळाला तर देणे दुवा(=संदर्भ) मी त्याला दुवा(=धन्यवाद) देईन

संपूर्ण गिरणगाव उध्वस्त झालं. लोकांच्या नोक-या गेल्या, लोक अक्षरशः रस्त्यावर आले. एक आख्खी पिढी बरबाद झाली. पण त्यामध्ये पोळलेल्या कुणीही आत्महत्या केल्याचं ऐकिवात नाही आणि केल्या असतील तर त्याचं कुणीही उदात्तीकरणही केलं नाही.असो. हे सगळं सुरु झालं पी. साईनाथ यांच्यामुळे. साईनाथ स्वतः एक उत्कृष्ट पत्रकार आणि लेखक. डाव्या विचारांचे असले तरी ज्यांच्या लेखनाविषयी सर्वांना आदर आहे अशा काही मोजक्या लोकांपैकी एक. २००१-०२ मध्ये त्यांनी या आत्महत्यांबद्दल - विशेषतः आंध्र, तामिळनाडू, ओरिसा आणि महाराष्ट्रातील विदर्भ - लिहायला सुरूवात केली आणि त्यावर लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण केली. तेव्हा भाजपचं सरकार होतं हा योगायोग नजरेआड करता येण्यासारखा नाहीये. नंतर २००४ ते २०१४ - साईनाथांनी लिखाण केलं पण त्यात २००१-०२ सारखा अावेश नव्हता. आता २०१४ नंतर परत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय पुढे येतोय. जणू मधल्या काळात सगळं आलबेल होतं. हा bias अत्यंत धोकादायक आहे कारण त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता तर कमी झाली आहेच आणि शिवाय सारख्या अशा बातम्यांचा भडिमार होत असल्याने समाज मानसिकदृष्ट्या बधिर होण्याच्या मार्गावर चाललेला आहे.

कवी जो कोणी आहे. पागल झालेला आहे. राजकिय मानसिकता आहे. कुठल्या चिंधी कुठे आनुन पेटवतो आहे. १५ लख कोटींचे व्यवहार झालेत, पुढे या फायदा घ्या. मेक इन इंडिय म्हणजे काय फक्त कारखानदारीच आहे, असे काही नाही. शेतकार्‍यांचे किती पार्टीशिपेशन आहे ते बोला ह्यात. उगा फासाला लटकत मुर्खासारखे आत्महत्या कर्णार. व्यवसाय करणार्‍आंअन बोल लावण्याआढी एक पानटपरी चालवून दाखवावी हरामखोरांनी. सरकारच्या जीवावर शेती करायला काय सरकार आमंत्रण देत नाय.