गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................
जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
- शामसुंदर महाराज सोन्नर
वाचने
15178
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
In reply to १२५ मूर्ख by कपिलमुनी
अप्रतिम !!
कविता जमलीय..
ते वीर मराठे, शिवाजी महाराज
In reply to कविता जमलीय.. by चिगो
बरीच लांबलचक..
In reply to ते वीर मराठे, शिवाजी महाराज by धनावडे
मागच्या सरकारच्या कार्यकाळात
च्छ्या
In reply to मागच्या सरकारच्या कार्यकाळात by श्री गावसेना प्रमुख
दिलीप सानंदा
In reply to मागच्या सरकारच्या कार्यकाळात by श्री गावसेना प्रमुख
१९८२ मध्ये झालेल्या गिरणी संपात
कवी जो कोणी आहे. पागल झालेला
पानटपरी चालवून दाखवावी हरामखोरांनी