✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाप्पाला स्वेटर

द
दिपक यांनी
Wed, 01/07/2009 - 12:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26501 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Wed, 01/07/2009 - 13:14 नवीन

गणपती

गणपती बाप्पा मोरया ! रोज नवीन स्वेटर घातला जातो असे ही ऐकले . ( धन्य ते पुणेकर . काय काय करतील काही सांगता येत नाही ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 05:37 नवीन

बाय द वे

सेव्टर म्हणजे काय? आपला (गोंधळित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 13:15 नवीन

गणपती

गणपती बाप्पा मोरया ! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Wed, 01/07/2009 - 13:17 नवीन

बाप्पाला स्वेटर

खरच छान.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 13:38 नवीन

कठिण आहे ...

लोकांच्या भक्ती आणि श्रद्धा याविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. पण हे मात्र जरा आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. आता हेच पहाणे बाकी होते. असो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील धुसर सीमारेषा हळुहळु मिटत चालली आहे याचे वाईट वाटते. दररोज नवा स्वेटर हे तर अजुन आश्चर्य. त्यालाही पर्याय नाही. अजुन एकदा असो. जाता जाता : बाय द वे, त्या शिवाजीनगरात, स्वारगेटच्या जवळ, स्टेशनजवळच्या पुलावर, मंडईत व इतर अनेक ठिकाणी जीवघेण्या थंडीत कुडकुडत झोपणार्‍या "गरिब, दरिद्री , रस्त्यावर झोपणार्‍या जनतेला" स्वेटर सोडा खाली टाकायला फडके तरी मिळते का ? त्यांना सकाळी कोणी भुतदया म्हणुन कमीत कमी एक कप चहा तरी फुकट पाजते का ? "माणसात देव पहा " असे म्हणतात , आपण नक्की कधी पाहणार ? असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 01/07/2009 - 15:54 नवीन

सहमत आहे

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. बाप्पांना स्वेटर घालण्याऐवजी सारसबागेजवळील भिकार्‍यांना ते दान केले असते तर समजण्यासारखे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/07/2009 - 15:58 नवीन

निगेटीव्ह....

त्यालाही एक निगेटीव्ह कोपरा आहे. असे स्वेटर वाटताहेच असे कळले की पुण्यात भिकारी वाढतील. (इतर राज्यातून येतील) जसे मोफत घरांची घोषणा शिवसेनेने केली आणि मुंबईतील झोपडपट्टी झपाट्याने वाढली. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
आ
आजानुकर्ण Wed, 01/07/2009 - 23:41 नवीन

मोठ्या माणसांची भातुकली

अरे मित्रा, मागे साईबाबांना सोन्याचे सिंहासन झाले. तेव्हाही अनेक लोक वैतागले होते. काय झाले पुढे त्याचे. लहानपणी बाहुली बाहुली खेळताना, तू तुझ्या बाहुलीला नवे कपडे घातले असतीलच ना. तशीच ही मोठ्या माणसांची भातुकली. ज्यांना खेळायचं ते खेळणारच. वैतागून काय फायदा. आपला (खेळाडू) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
कोलबेर गुरुवार, 01/08/2009 - 00:07 नवीन

बाहुली बाहुली

लहानपणी बाहुली बाहुली खेळताना, तू तुझ्या बाहुलीला नवे कपडे घातले असतीलच ना.
नाही बॉ! आम्ही नाही कधी बाहुली बाहुली खेळलो. आम्ही बंदुका/गाड्या असले खेळायचो. शेजार पाजारच्या मुली मात्र बाहुली बाहुली खेळायच्या असं आठवत! :) अवांतर : प्रभु रामचंद्र वनवासात थंडीपासुन संरक्षण करण्यासाठी स्वेटर घालत असावेत का? असा एखादा काथाकुट टाकण्याच्या विचारात आहे. सुवर्णमृगाचे डिझाइन असलेला विंटर कोट तर सितामाईंना नव्हता ना हवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 00:55 नवीन

खरे

शेजार पाजारच्या मुली मात्र बाहुली बाहुली खेळायच्या असं आठवत अच्छा. हेही खरंच. कदाचित मुलींबरोबर खेळायची संधी मिळेल असे वाटल्याने आम्हीही बाहुली बाहुली खेळत असू. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे कोलबेरपंत, लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळाले नाही की मोठेपणी ह्या बाहुल्या लागतात. आपला (मनोवैज्ञानिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 04:13 नवीन

असंच नाही काही...

लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळाले नाही की मोठेपणी ह्या बाहुल्या लागतात.
लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळालं नाही म्हणून काय झालं? आम्ही लहानपणी मुलींबरोबर बाहुली-बाहुली खेळताना अनेकदा बाहुला-बाहुलीचं लगीनही लावून दिलं, पण म्हणून काय पुढे आयुष्यभर ब्रह्मचारी नाही राहिलो. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 04:51 नवीन

उलटा तर्क

झुरळशेठ, तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. इथे गृहितक असे आहे की लहानपणी खेळायला मिळाले नाही म्हणून मोठेपणी बाहुल्या लागतात. पण याचा व्यत्यास योग्य आहे असे कुठे म्हटलेले नाही. योग्य तर्क असा होईल की लहानपणी मुलींबरोबर बाहुला बाहुलीचं लगीन न लावून दिल्यामुळे आता लग्न केले. मात्र लहानपणी बाहुलाबाहुलीचं लगीन लावून दिल्याने आता ब्रह्मचारी राहावे लागले हे मानणे चुकीचे आहे. यामागील कार्यकारणभाव असा की, तर्कविधानांतील पहिला भाग हा होकारार्थी नसून नकारार्थी आहे. त्यामुळे एक नकारात्मक मानसिकता तयार होते आणि त्याचा विस्फोट पुढील आयुष्यात होऊ शकतो. आपला (तार्किक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 05:02 नवीन

बारीक चूक

झुरळशेठ,
'झुरळशेठ' नव्हे. 'क्षत्रियशेठ'. बाकी सहमत. - (De'bug'ger) झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 05:05 नवीन

मला वाटले

आमचे बापूस आम्हाला नेहमी हाणायचे त्यामुळे मारणारा हे वडलांचे नाव आणि क्षत्रिय हे आडनाव वाटले. म्हणून पहिल्या नावाने हाक मारली. येक डाव माफी असावी. आपला (वैश्य) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 06:37 नवीन

तर्क...

आमचे बापूस आम्हाला नेहमी हाणायचे त्यामुळे मारणारा हे वडलांचे नाव
तर्क सही आहे! :D - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 23:44 नवीन

पण हे

पण हे मात्र जरा आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे अहो पण मुळात त्या गणपतीला स्वेटर घालणार्‍याने तुम्हाआम्हाला तो घालू का, अथवा नको, हे विचारलेलेच नाही! तो स्वेटर घालून केव्हाच मोकळा झाला आहे! :) आणि आपण मंडळी मात्र उगाचंच त्यावर काहिबाही इंटिलिजंट ट्यँव ट्यँव करत अहोत हे पाहून गंमत वाटली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 18:48 नवीन

दृष्टिकोन...

भावना, भक्ती, श्रद्धा, अंधश्रद्धा, उदात्तीकरण वगैरे गोष्टी मध्ये न आणता केवळ एक थोडीशी गंमत म्हणून, कदाचित एक कल्पक सजावट म्हणून याकडे पाहणे शक्य नाही का? आणि 'गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेली जनता' दर वेळी मध्ये आणलीच पाहिजे का? लाखो-करोडोंचा अपव्यय होत असेल तर भावना समजण्यासारखी आहे, नव्हे नक्कीच समर्थनीय आहे. पण थोडे स्वेटर आणले आणि घातले बाप्पाला, तर असा किती खर्च झाला आणि बिघडले कुठे? सार्वजनिक गणपतीत, दहीहंडीला वगैरे किती सजावट किंवा कल्पक देखावे वगैरे करतात. म्हटले तर पैशाचा अपव्याय आहे पण त्यातून जनतेचे मनोरंजन होते आणि थोडी क्रिएटिव्हिटी कामी येते. का बंद करायची? तसेच म्हटले तर एवढे मोठे मंदिर चालवणे हासुद्धा पैशाचा अपव्ययच आहे. मंदिराचीच खरे तर गरज काय? स्वेटरचे काय घेऊन बसलात? मी तर म्हणतो मंदिरच पाडून टाकले तर रोजचा केवढा खर्च वाचेल आणि गरीब, दरिद्री आणि रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी उपयोगी होऊ शकेल! मंदिराबरोबर सारसबागही काढून टाकू. जागेचा केवढा अपव्यय आहे तो! किती गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेच्या निवार्‍यासाठी जागा मोकळी होईल. (मात्र तशी सारसबाग अगदीच निरुपयोगी नाही म्हणा. सारसबागेच्या उपयोगांविषयी पुणेकर जाणकारांना तरी अधिक सांगण्याची गरज नाही - समझनेवाले को इशारा काफी! ;-) ) किंवा असे करू. प्रभादेवीचा सिद्धिविनायक तर अगदी प्राइम लोक्यालिटीत आहे. पर स्क्वेअर फूट भाव काय मिळेल! किती मौल्यवान जागा अडकून राहिली आहे अधिक भक्तीच्या नावाखाली रोजचा पैशाचा अपव्यय होतो आहे! पाडून टाकू! आणि मग ती जागा विकून टाकू. त्या पैशात किती गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेचा अन्नवस्त्रनिवार्‍याचा प्रश्न कायमचा सुटेल! देवळेच तोडायला निघालोय तर सर्वधर्मसमभाव म्हणून ताजमहालसुद्धा (आगर्‍याचा!) पाडून टाकू! (या प्रस्तावाला भरपूर अनुमोदक मिळतील याची खात्री आहे. कदाचित बाप्पाला एवढे मोदक नाही मिळणार!) काय उपयोग आहे त्याचा? भरपूर जागा मोकळी होईल गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी. (तसा मुंबईचा ताजमहालसुद्धा प्राइम लोक्यालिटीत बर्‍यापैकी स्क्वेअर फूटेज खातो म्हणा, पण ती खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे तो मालकाचा प्रश्न आहे. ही बाकीची स्थळे सार्वजनिक असल्यामुळे त्यांना पाडण्याच्या प्रस्तावाची चर्चा मुळीच अनाठायी नाही.) किंवा दिल्लीचे राष्ट्रपतीभवन. जगातला सगळ्यात मोठा अध्यक्षनिवास आहे म्हणतात. तिथल्या ३४० खोल्यांपैकी किती खोल्या कोणत्याही राष्ट्रपतीच्या आख्ख्या कारकीर्दीत वापरल्या जात असतील, शंकाच आहे. करायच्यात काय? कशासाठी लागतात? शिवाय आजूबाजूचे प्रांगण - किती जागा वाया जाते! पाडून टाकूया, राष्ट्रपतींसाठी एखादी छोटीशी जागा बांधून त्यांना तिथे हलवूया आणि एवढी मोठी जागा गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी मोकळी करू या. बराच फायदा होईल. (जाता जाता एकच प्रश्न / Endgame: Exactly at which point does this whole argument start becoming ridiculous?) - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सुनील Wed, 01/07/2009 - 14:00 नवीन

काय गैर आहे?

थंडी गेल्यावर त्या स्वेटरांचा लिलाव करून पैसे उभारावेत आणि ते लोकोपयोगी कार्यासाठी वापरावेत. यात गैर ते काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/07/2009 - 14:23 नवीन

श्रद्धा????

अशा श्रद्धेपायी उद्या एखादा, रोज रोज मोदक, पेढे इत्यादी खाणार्‍या गजाननाचा डायबेटीससुद्धा चेक करुया म्हणेल. गजानना तुच बुद्धी दे तुझ्या भक्तांना.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 14:25 नवीन

+१,

असेच म्हणतो ... लोकांची अंधश्रद्धेवर फारच श्रद्धा आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे सध्या. ( च्यामायला, काय टाळ्या घेणारे वाक्य तयार झाले. है शाब्बास ;) ) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 14:47 नवीन

+२

पेठकर काका आणि डॉनशी सहमत. आता स्वेटर घालत आहेत, उकाड्यात, तापमान गेलं ३५ अंश से.च्यावर की मग काय हो करणार असा एक प्रश्नही डोकावून गेला. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शेखर Wed, 01/07/2009 - 14:59 नवीन

तापमान

>>तापमान गेलं ३५ अंश से.च्यावर की मग काय हो करणार त्या साठी मधु सप्रे शी कन्सल्ट करणार आहेत :) शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विनायक प्रभू Wed, 01/07/2009 - 16:53 नवीन

मधु

माझ्या माहिती नुसार सप्र्यांच्या मधुला थंडीचा त्रास नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
क
कोलबेर गुरुवार, 01/08/2009 - 04:54 नवीन

बाप्पा आणि मधुमेह

अशा श्रद्धेपायी उद्या एखादा, रोज रोज मोदक, पेढे इत्यादी खाणार्‍या गजाननाचा डायबेटीससुद्धा चेक करुया म्हणेल.
मोदक पेढे फक्त स्वीट डिश (डिझर्ट) म्हणून खातात बाप्पा. त्यांचा मूख्य आहार अतीशय सात्विक असा दुर्वांचा आहे. रोज जेवणात फक्त गवत खाल्ल्यानंतर कितीही मोदक पेढे खा तुम्हालाही मधुमेहाचा त्रास होणार नाही. 'बाकी हे लोक उद्या बाप्पाचे वजन वाढले म्हणुन ट्रेडमिल आणायला देखिल कमी करणार नाहीत' असे म्हंटले तर मात्र पटेल बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आजानुकर्ण गुरुवार, 01/08/2009 - 05:00 नवीन

बॉडी मास इंडेक्स

बाप्पाचा बॉडी मास इंडेक्सही तसा धोकादायक असावा. विशेषतः लंबोदर वगैरे असल्यामुळे अधिकच. विनोदाची बाब अशी की गणपती आणि आमीर खान दोघांकडेही आदराने पाहिले जाते. हे वैचारिक गोंधळाचे लक्षण मानावे लागेल. आपला (८ प्याक) गझनी आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर गुरुवार, 01/08/2009 - 05:06 नवीन

गणपती आणि आमीर खान

अरे हो की.. चला ह्यावर्षी गणेश उत्सवात कुठल्यातरी मंडळाने २१ प्याक वाला गझनी रुपातील बाप्पा बसवला नाही म्हणजे मिळवली. (सुनील गावसकर रुपातील ब्याट हातात घेतलेली बाप्पाची क्यूट मुर्ती बघीतलेला) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ए
एकलव्य गुरुवार, 01/08/2009 - 05:38 नवीन

दहा मिळतील

चला ह्यावर्षी गणेश उत्सवात कुठल्यातरी मंडळाने २१ प्याक वाला गझनी रुपातील बाप्पा बसवला नाही म्हणजे मिळवली. गझनीच्या रूपातील १० गणपती मिळाले नाही तर सांगा... उघडाबंब गणपती आवडणारा - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सुनील मोहन Wed, 01/07/2009 - 14:49 नवीन

पेठकर आणि छोटा डॉन यांच्याशी सहमत.

आता उद्याचा फोटो "गणरायांना थंडीमुळे सांधे आखडल्याने महानारायण तेल चोळताना" असा येऊ नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 01/07/2009 - 16:32 नवीन

"माणसात

"माणसात देव पहा " हे फक्त म्हणायचे असते.प्रत्यक्ष कोणीही पुढे येत नाही.एखाद्याला मदत करणे हे त्याच्या मनातही येत नाही. देवावर श्रद्धा असावी. पण अंधश्रद्धा नसावी Image removed.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 16:39 नवीन

मूर्तीपुज

मूर्तीपुजे मध्ये मूर्तीमध्ये देव आहे असे मानतात. अनेक भक्तांची अशी श्रद्धा असते. लोक देवाला नैवेद्य दाखवतात तो याचसाठी. कोणी देवाशी बोलते तर कुणी त्याने नैवेद्य खावा म्हणून हटून बसते. देवाच्या मूर्तीला रिज चांगले कपडे घातले जातात. उत्सवाच्या काळात भरजरी कपडे कौतूकाने घालतात. माझ्या ओळखीतल्या एक आजी खूप श्रद्धाळू आहेत. त्या सुद्धा थंडीमध्ये त्यांच्या देवघरातल्या देवासाठी लहान लहान कपडे शिवतात. ही सर्व भक्तीची अभिव्यक्ती आहे. तीच्याशी आपण स्वतःला सहानुभूत करुन घेऊ शकलो नाही तर नाही. सगुण उपासनेतली ही फार मोठी मौज आहे. आणि सगुण उपासक ती मौज भोगतात. समाज सेवेची अपेक्षा मोठ्या संस्थांकडून ठेवावीच. आणि त्यांनी समाजसेवा कराविच. पण स्वेटरचा आणि त्या सेवेचा तत्काळ संबंध जोडू नये असे मला वाटले. समाजातल्या काही रूढी ज्यांचा वास्तविक समाजाला उपयोग होणे आपेक्षित आहे पण तो होत नाही, त्याबद्दल एक कविता. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 16:57 नवीन

सगुण उपासना ...

उपासनेतले "सगुण उपासनेचे" स्थान नि:संशय महत्वाचे आहे, हा वादाचा विषय नाहीच. पण ह्या सगुण उपासनेच्या नावाखाली कोणकोणते अंधश्रद्धाळु न पटणारे प्रकार ( वास्तवीक पाहता मला इथे "चाळे" हा शब्द वापरायची फार इच्छा होते आहे, पण असो.) चालणार हे तर जरा कळुदेत. देवाच्या मुर्तीलाही भावना असतात हे मानुन त्याची मनोभावे पुजा करुन त्याच्या पाठिंब्याच्या विश्वासावर आपले कार्य करत राहणे ही "श्रद्धा" पण त्याच देवाच्या मुर्तीला कुठे दुध पाजणे, स्वेटर घालणे, थंडाव्यासाठी चंदनलेप चढवणे, रक्त येत असल्याची बोंबाबोंब करणे, मुर्ती रडत असल्याच्या बाता मारणे ह्याला स्पष्ट "अंधश्रद्धा" म्हणायला हवे. जर हे प्रकार जाणुनबुजुन माहिती असताना उघड्या डोळ्याने घडात असतील तर ह्याला "ढोंगीपणा" म्हटले तर चुक ते काय ??? स्वतःला देवाचे अवतार मानणारे बुवा, बाबा, अम्मा, संत, बापु व इतर जे असतील ते जेवढे आमच्या डोक्यात जातात तेवढेच मुर्तीला असले "भोग" चढवणारे आमच्या डोक्यात जातात, किंबहुना थोडे जास्तच. सगुण उपासना जर म्हणत असाल तर पंढरपुरला देवाच्या उपरणे, रुक्मीणीच्या साड्या, कोल्हापुरात देवीच्या साड्या ह्या "हजारो रुपयांच्या" किमतीने नंतर विकल्या जाणे हे कशाचे लक्षण आहे ? आम्हाला ह्यात स्पष्त लोकांच्या भावनांशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध श्रद्धांचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच. असो. आमचा परमेश्वर काहीही न मागणारा तो जगनियंता, व त्याचे दुत सरळ साधे "संत गाडगेबाबा" , बाकी सगळा ढोंगाचा बाजार हो ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 17:02 नवीन

'भावनांचा

'भावनांचा बाजार' हा विरोध करण्यातला मुद्दा योग्य आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
द
दिपक Wed, 01/07/2009 - 16:43 नवीन

हो

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील धुसर सीमारेषा हळुहळु मिटत चालली आहे याचे वाईट वाटते. सहमत! पण विजय श्रध्देचाच होतो बहुतेक. मागे शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन द्यावे ह्यावरही अनेंकानी प्रश्न उपस्थित केले होते. पण सिहांसन आलेच. मलातरी देवाला २०-२५ रुपयांचे फुल नारळाचे ताट दाखवण्यापेक्षा देवळाच्या बाहेर बसलेल्या एखाद्या गरिब भिकाऱ्याला ५ रुपये देण्यात धन्यता वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/07/2009 - 16:54 नवीन

सगुण उपासना...

सगुण उपासनेत निर्गुण ईश्वराला मुर्तीच्या रुपात पाहणं/शोधणं ह्यात काहीच गैर नाही. तसेच, तुम्ही दिलेल्या उदाहरणातील आजींची श्रद्धा/अंधश्रद्धा त्यांच्या पुरतीच सिमित आहे. इथे, सारस बागेतील गणपतीला मानवी पातळीवर आणून, त्याला नसलेल्या ऐहिक गरजा अधोरेखित करून, त्या पुरविण्याचे कोडकौतुक, अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू भक्तांना आयुष्यातील मूलभूत परिपक्वतेपासून दूर लोटणार्‍या ठरतात आणि मलातरी वाटते हे पाप आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 17:05 नवीन

त्या

त्या पुरविण्याचे कोडकौतुक, अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू भक्तांना आयुष्यातील मूलभूत परिपक्वतेपासून दूर लोटणार्‍या ठरतात आणि मलातरी वाटते हे पाप आहे. छान शब्दांत आपण विरोधामागचे कारण दिलेत. मी आपल्याशी सहमत आहे. लोकांना भक्त बनवणारे संत आणि भक्तिभावाचा बाजार करणारे लोक यातला हा फरक आहे. आपले म्हणणे बरोबर. सारसबागेतल्या या उदाहरणाने विषय निघाला या गणपतीबाबतचे सारसबाग संस्थेचा असा उद्देश नसेल तर चांगले होईल. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण Wed, 01/07/2009 - 17:05 नवीन

गणपती बाप्पा मोरया !!!

अरे व्वा..गणपती बाप्पाला स्वेटर ..बाप्पा अगदी मस्त दिसतो.,,,जेव्हा गणेश उत्सवात गणपती आणतात तेव्हा त्याला फेटा,,अंगावर शाल(किंवा एखादे रेशमी वस्त्र) घालुन आणतात..असेही प्रकार मला फार आवडतात.. भक्ताच्या भक्तीला कुठलीच सिमा नसते..ज्या प्रमाणे आपण आपली काळजी घेतो त्या प्रमाणेच आपण आपल्या देवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे... (गजाननाचा दास) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 17:13 नवीन

आनंद आहे ...

मलासुद्धा या प्रकारांना शक्य तसा, शक्य तितका, शक्य तिथे "विरोध" करायला फार आवडते. इनफॅक्ट गणपतीच मला अशी बुद्धी देतो अशी माझी "श्रद्धा ( शब्द फार महत्वाचा आहे )" आहे. असो. भक्ताच्या भक्तीला कुठलीच सिमा नसते..ज्या प्रमाणे आपण आपल्या देवाची काळजी घेतो त्या प्रमाणेच आपण आपल्या आसपासच्या खरचं गरजु असलेल्या जनतेची अथवा मुक्या जीवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 17:15 नवीन

आपण आपल्या

आपण आपल्या आसपासच्या खरचं गरजु असलेल्या जनतेची अथवा मुक्या जीवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे... ११०% सहमत. माणसातलाच देव बघायला शिकवतात, सांगतात त्यातून काहीतरी बोध घेतला आपण तरी उत्तम. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/07/2009 - 17:34 नवीन

काहीही असो,

आमचे बाप्पा अंमळ गोंडस दिसतायेत हेच खरे! :) गणपती बाप्पा मोरया! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 18:27 नवीन

सहमत आहे

फार सुरेख दिसतोय !! त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार मिळेल असा माझा दुर्दम्य विश्वास आहे. आणी मी दिलेल्या टॅक्सच्या पैश्यातुन तो स्वेटर आलेला नाही हेही मला माहित आहे. गणेशोत्सवात तर याहुन कितीतरी पट खर्च होतो, तो ही बंद करावा काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/07/2009 - 18:35 नवीन

सहमत आहे!

परंतु, त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार कसा मिळेल हे मात्र कळले नाही! असो, (आयुष्यात प्रथमच आनंदयात्रीशी सहमत असणारा) टिंग्या! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 18:38 नवीन

चुक

लिहण्यात चुक झाली .. भावनावेगात नीट टंकले गेले नाही. दुसर्‍यांना सल्ले देण्यापेक्षा २ सिगारेटी कमी ओढुन ते पैसे समाजकार्यासाठी वापरावे असे म्हणायचे होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 22:02 नवीन

गल्लत होते आहे.

माननीय आनंदयात्रींनी इथे उपस्थीत केलेला मुद्दा अप्रस्तुत आहे, काय संबध त्याचा ह्याच्याशी ? हे पहा गणपतीला स्वेटर घालणे ही क्रीया एका मोठ्ठ्या जनसमुदायाला "प्रेरीत" करते असे आमचे मत आहे आणि त्यात आत्तापर्यंतच्या आमच्या उण्यापुर्‍या पुर्वायुष्यातुन जे काही पाहिले/ वाचले त्याच्या बेसीसवर ही क्रीया पार शहरापासुन ते लहानतल्या लहान गावापर्यंत अनाठायी पसरु शकते असा आमचा अंदाज आहे. जेव्हा कुठल्या प्रसिद्ध मंदीरात / धर्मस्थळात एखादी गोष्ट "भावना" ह्या नावाखाली केली जाते तेव्हा त्याच्य देवाच्या इतर लहान लहान गावात असणार्‍या मंदिरातसुद्धा ह्याच कॄतीची लगेच कॉपी करुन तसेच वागण्याचा प्रयत्न अनेकदा दिसला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर जर कुठल्या प्रसिद्ध मंदिरात देवाला एखादे सोन्याचे सिंहासन अथवा रत्नजडीत मुकुट केला गेला व त्याची अशीच प्रसिद्धी केली गेली तर त्याचाच परिणाम म्हणुन गावोगावी तुम्हाला मंदीरात तशीच सिंहासने आपापल्या शक्तीनुसार मग सोन्याचे जमत नसेल तर चंदनाचे का होईना करुन वाहिलेले दिसते. मुकुट / हाराच्या बाबत तेच आहे, अगदी रत्नजडीत नसला तरी कमीत कमी चांदीचा तरी केला जातोच. मग ह्या अनाठायी हट्टापायी अनेक वेळा "सक्तीची वर्गणी" काढली जाते .... मी म्हणातो ते खोटे आहे का ? किती उदाहरणे दाखवु तुम्हाला ? ह्या सोन्याच्या सिंहासनाने अथवा रत्नजडीत हाराने/मुकुटाने देव खुष होतो अशी तुमची भावना आहे का ? आमचे म्हणणे एकच, भावनांचे "अवडंबर" नका माजवु, जे आहे ते मनापासुन करा, थाटाची गरज नाही, ते देवापर्यंत जरुर पोहचेल .... सिगारेटचे म्हणाल तर तुमची किंवा आमची ही कृती कुणाला "प्रेरीत" करण्याची शक्यता तशी कमीच आहे. हा मुद्दाच वेगळा आहे. मग ह्या "सिगारेटी" स्वतःच्या पैशातुन येवो अथवा आपल्या भरलेल्या करातुन येवो. मला फक्त एवढेच सांगा की जर आपल्या २ सिगारेटी कमी / जास्त ओढण्याची अशीच प्रसिद्धी केली तर किती लहान लहान गावातील तरुण "प्रेरीत" होऊन त्याच्यासारखीच कॄती करतील ? तसेही खरचं ह्या २ सिगारेटींचा पैसा "गरिबांपर्यंत" पोहचणार असेल अशी तुम्हाला खात्री असेल व तसे तुम्ही आम्हाला आश्वासन देत असाल तर आम्ही वचन देतो की "दरमहा तेवढा किंवा त्यापेक्षा थोडा जास्तच पैसा" आम्ही जरुर तुमच्याकडे पोहचवु, त्याची योग्य विल्हेवाट आपण लाऊ शकाल अशी आपल्याला खात्री आहे काय ? प्रश्न एका "मोठ्ठ्या जनसमुदायाला प्रेरीत करणार्‍या गोष्टी" चाच आहे. फक्त ह्या मुद्द्यासाठीच आम्ही विरोध करत आहोत. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/07/2009 - 22:14 नवीन

गल्लत होते आहे.

माझ्यामते प्रस्तुत चर्चासत्राचा विषय हा सोन्याचे सिंहासन वा रत्नजडीत हारासंबंधी नसुन स्वेटर घालण्याबद्दल आहे असे वाटते! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 22:27 नवीन

नीट वाचा ...

आम्ही एक "प्रक्रीया" सांगितली. जे मागे "सिंहासन / हारासंबंधी" घडले ते आज "स्वेटर" बद्दल घडु शकते अशी आम्हाला भिती वाटते. बाकी, १-२ ओळीत काहीही विचारुन चर्चेचा रोख बदलु नये ही विनंती. मुद्द्याचे व मुद्देसुद लिहल्यास आनंद होईल. उगाच २ ओळीत काहीतरी "विसंगत" बोलुन रोख बदलु नका ... माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर वरील प्रश्न आपल्याला पडला नसता ही खात्री आहे. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/07/2009 - 22:37 नवीन

अस्सं!

आपल्या प्रतिक्रियेत ५०%पेक्षा जास्त मुद्दे "सिंहासन / हारासंबंधी" असल्याने आमची गल्लत झाली असावी बहुदा! ;) एनीवे, स्वेटरची फॅशन निघाली तरी चांगलच आहे की......त्या कारणाने भारतातील लोकरी व्यवसायाला अन् पर्यायाने वस्त्रोद्योगाला, मेंढपाळांना, विणकरांना चांगले दिवस येतील्..... आणि विशेषत: लोकर ही सोन्याएवढी महाग नसल्याने स्वेटर विणण्याचा खर्च कमीत कमी येईल अन् त्यायोगे सामान्य जनतेच्या पाठी लागलेल्या सक्तीच्या वर्गणीचा ससेमिरा कमी/बंद होईल! आहे की नाही नामी युक्ती? - (युक्तीबाज) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/07/2009 - 22:46 नवीन

आणि

आणि विशेषत: लोकर ही सोन्याएवढी महाग नसल्याने स्वेटर विणण्याचा खर्च कमीत कमी येईल अन् त्यायोगे सामान्य जनतेच्या पाठी लागलेल्या सक्तीच्या वर्गणीचा ससेमिरा कमी/बंद होईल! कदाचित मंदीने त्रस्त लोकांना स्वेटर विणण्याचे काम मिळेल. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/07/2009 - 22:27 नवीन

सहमत ---- सखा

सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/08/2009 - 10:34 नवीन

व्यक्तिगत

व्यक्तिगत आरोप झाल्यामुळे प्रतिक्रिया देत आहे. माफ करा संपुर्ण प्रतिक्रिया वाचु शकलो नाही, पण पहिल्या ओळीत माझे नाव वाचल्याने उत्तर देत आहे. >>त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार मिळेल असा माझा दुर्दम्य विश्वास आहे. हे मी माझ्याबद्दल बोलत होतो, आपणाबद्दल नाही, गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 17:54 नवीन

स्वेटर

स्वेटर घालून बाप्पा मोठा गोड दिसतो आहे! :) लालबागच्या राजाचा विजय असो..! तात्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा