✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाप्पाला स्वेटर

द
दिपक यांनी
Wed, 01/07/2009 - 12:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26501 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 18:29 नवीन

सहमत आहे

तात्या तुमच्या मतांशी सहमत आहे. तसेच बरेचसे प्रतिसाद वाचुन आमच्या बाप्पाची खिल्ली उडविली आहे असेही वाटले हे ही नमुद करु इच्छितो. - (मिपावरील मर्यादित व्यक्तिस्वातंत्र्याचे मोल जाणणारा) आनंदयात्री सदस्य मिसळपाव डॉट कॉम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धम्मकलाडू Wed, 01/07/2009 - 18:17 नवीन

उन्हाळ्यात काय घालतात? बर्मुडा का?

धन्य जाहलो‍. हिवाळ्यात स्वेटर तर उन्हाळ्यात काय घालतात? बर्मुडा का? (कुणालातरी आता अर्धी चड्डीचा उल्लेख होईल असे वाटले ना? खरंय की नाई मंडळी...आं आं आं....) बाप्पा माफ करायचं बरं का.... () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 04:35 नवीन

हरकत काय आहे?

देवानेसुद्धा काळाबरोबर बदलले तर बिघडले कुठे? उलट बदललेच पाहिजे! - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
ब
बट्टू Wed, 01/07/2009 - 18:34 नवीन

बाप्पाच्या बड्डेला

स्वेटर देशी असतो की विदेशी हो. विदेशी म्हणला जावा कारण त्याचे नाव स्वेटर आहे. ;-) मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का? सगुण भक्तीचा हॅप्पी बड्डे!
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 04:42 नवीन

एकच अडचण

मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का?
कापूया की! फक्त एकच अडचण आहे - केकवर मेणबत्त्या किती लावायच्या त्याचा नक्की आकडा कोणी देऊ शकेल काय? (एवढ्या मेणबत्त्या लावल्यावर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किती भर पडेल हा स्वतंत्र चर्चेचा / अभ्यासाचा विषय होईल.) - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्टू
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 18:38 नवीन

सगुणोपासन

सगुणोपासना मानुन कुणाला जर त्या मुर्तीला चंदन, स्वेटर वगैरे घालावेसे वाटत असेल आणि ते स्वतःच्या पैशाने करत असतील तर त्यांना तो अधिकार आहे आणि असावा. आपल्या पैशांचा उपयोग कुणी कसा करावा हे आपण कसे सांगणार? तो व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होईल आणि त्यातही तशी समाजोपयोगी कामे करुन वर मुर्तीसाठी कुणी काही करत असेल तर त्याला करु द्यावे. पण एखाद्याने समाजकार्यच करावे, असे सांगुन त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीचे उत्तरदायित्वाचा ठेका घेवु नये. तेव्हा मला असे वाटते की आपण त्या व्यक्ती अथवा संस्थांच्या निर्णयात जर पटत नसेल तर सहभाग घेवु नये, आपल्याला पटत नसेल तर सगुणोपासना करु नये पण त्यांनी काय करावे हे सुचवण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण ते चुक आहेत असे अजुन सिद्ध झालेले नाही. त्याचबरोबर आपणच बरोबर आहोत हे ही सिद्ध झाले नाही. कारण सगुणोपासना मानणारे व त्याकरता त्यांच्या मनाला रुचेल ते करणारे ते जगातील शेवटचे मानव नसतील हे नक्की. तेव्हा त्यांनी सगुणोपासना करु नये, अगर करायची असेल तर अमुकच करावे, तमुकच करावे असे सुचवणे हे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करणारे ठरेल. जे घटनेनुसार चुक आहे. अर्थात आपण सगळे घटनेचा आदर करतो असेच मी समजतो. आता ज्यांना यात लुबाडणे वगैरे आहे असे वाटते त्यांनी कृपया सत्यम च्या राजुने तसेच इतर कंपन्यांनी लावलेले दिवे पहावे. माझ्यामते तथाकथित भोंदु बाबा आणि कॉरपोरेट लिडर आणि कंपन्या ह्या तत्वतः एकाच पातळीवर आहेत. हे माझे वैयक्तिक मत आहे तसेच याला वैयक्तिक घेवु नये. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 01/07/2009 - 18:39 नवीन

सहमत आहे

सहमत आहे नाना. छान प्रतिसाद. कौतुक वाटले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 18:58 नवीन

उदात्तीकरण का?

तो व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होईल आणि त्यातही तशी समाजोपयोगी कामे करुन वर मुर्तीसाठी कुणी काही करत असेल तर त्याला करु द्यावे. कुणाला काही करायचं असेल तर थांबवत नाही आहे कुणीही, पण एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे. आणि असा प्रयत्न करणार्‍यांना चुकीचं म्हणताना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं नाव काढणं हा तर चक्क दुतोंडीपणा वाटतो. सगुणोपासना करणे ही व्यक्तिगत बाब असेल पण ती चारचौघांसमोर करताना ती चारचौघं कसा विचार करतात, त्या चारचौघांची परिस्थिती काय आहे याचाही विचार व्हावा. आणि तो होत नसेल तर धार्मिक बाबी व्यक्तिगत रहात नाहीत. शेतं पाण्याअभावी वाळून जात आहेत, तोंडात टाकायला पाण्यासाठी चारचार मैल रपेटी कराव्या लागत आहेत पण सगुणोपासना करण्यासाठी आम्ही शहरात स्वच्छ, नळाचं, पाणी वापरणार, जे शेवटी समुद्रात, अर्थात वाया जाणार, यात भारतीयाला घटनेने दिलेल्या समानत्त्वाचा लोप होत नाही का? आता ज्यांना यात लुबाडणे वगैरे आहे असे वाटते त्यांनी कृपया सत्यम च्या राजुने तसेच इतर कंपन्यांनी लावलेले दिवे पहावे. माझ्यामते तथाकथित भोंदु बाबा आणि कॉरपोरेट लिडर आणि कंपन्या ह्या तत्वतः एकाच पातळीवर आहेत. त्यात किमान धर्माच्या नावाखाली उदात्तीकरणतरी होत नाही. तत्त्वत: विचार करतासुद्धा या दोन गोष्टी एका पातळीवर दिसत नाहीत. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 19:54 नवीन

कुणाला

कुणाला काही करायचं असेल तर थांबवत नाही आहे कुणीही, पण एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे. आणि असा प्रयत्न करणार्‍यांना चुकीचं म्हणताना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं नाव काढणं हा तर चक्क दुतोंडीपणा वाटतो. यात कुठलाही दुतोंडीपणा नाही हे प्रथमतः सांगुन माझा प्रश्न हा की आपण जे म्हणता की एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे तर ही गोष्ट चुक आहे हे ठरवण्याचा अधिकार कुणी कुणाला कसा दिला? कधी दिला? आपण आपले मत मांडले हे क्षणभर जर गृहित धरले तर त्याचप्रमाणे मी पण माझे मत मांडले यात दुतोंडीपणाचा प्रश्न येतच नाही. सगुणोपासना करणे ही व्यक्तिगत बाब असेल पण ती चारचौघांसमोर करताना ती चारचौघं कसा विचार करतात, त्या चारचौघांची परिस्थिती काय आहे याचाही विचार व्हावा. आणि तो होत नसेल तर धार्मिक बाबी व्यक्तिगत रहात नाहीत. धर्माचरण हे जितके व्यक्तिगत आहे तितकेच ते सामाजिक पण आहे. देवळात चार मंडळी एकत्र जमुन काही गोष्टी करत असतील तर ते व्यक्तिगत रहात नाही. सामाजिक अभिसरणाचे एक प्रमुख अंग म्हणुनच देव आणि देवळांचा उपयोग झाला आहे, होत आहे आणि होणार आहे. त्यामुळे इथे व्यक्तिपेक्षा समाजाचाच विचार करणे गरजेचे आहे. शेतं पाण्याअभावी वाळून जात आहेत, तोंडात टाकायला पाण्यासाठी चारचार मैल रपेटी कराव्या लागत आहेत पण सगुणोपासना करण्यासाठी आम्ही शहरात स्वच्छ, नळाचं, पाणी वापरणार, जे शेवटी समुद्रात, अर्थात वाया जाणार, यात भारतीयाला घटनेने दिलेल्या समानत्त्वाचा लोप होत नाही का? हे केवळ वड्याची साल वांग्याला लावण्याचा प्रकार आहे. समुद्राला सगुणोपासनेमुळे तीर्थ बनुन (वाया या शब्दाला आक्षेप) जावुन मिळणा-या पाण्याचा एकुण वाटा किती? अगदी क्षुल्लक ! मोजण्याचा खर्चच अधिक येणार!! त्यात किमान धर्माच्या नावाखाली उदात्तीकरणतरी होत नाही. तत्त्वत: विचार करतासुद्धा या दोन गोष्टी एका पातळीवर दिसत नाहीत. या दोन गोष्टी एका पातळीवर समजण्याचे स्पष्टीकरण - वरती डॉन म्हणतात सगुण उपासना जर म्हणत असाल तर पंढरपुरला देवाच्या उपरणे, रुक्मीणीच्या साड्या, कोल्हापुरात देवीच्या साड्या ह्या "हजारो रुपयांच्या" किमतीने नंतर विकल्या जाणे हे कशाचे लक्षण आहे ? आम्हाला ह्यात स्पष्त लोकांच्या भावनांशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध श्रद्धांचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच. याच चालीवर खोटे आकडे दाखवुन जनतेच्या डोळ्यात (गुंतवणूकदारांच्या) धुळ फेकुन शेअर्सच्या किंमती वाढवणे हे कशाचे लक्षण आहे ‍? आम्हाला ह्यात स्पष्ट लोकांच्या विश्वासाशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध विश्वासाचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच. आता बघा आले तत्वतः एकाच पातळीवर? बर आपले धर्माच्या उदात्तीकरणाविषयी तर माझे म्हणणे असे की जर कुणाला देवीला नेसलेली साडी आपल्या घरात असावी असे वाटले आणि ती त्याने स्वतःच्या पैशाने खरेदी केली आणि घरी ठेवली तर आपले काय नुकसान आहे ? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 18:59 नवीन

प्रतिक्रिया

फोटो पाहिला. अम्मळ गंमत वाटली. छोटा डॉन यांची प्रतिक्रिया वाचली. त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा रोख पटला. "माणसात देवाला शोधा", "सर्व्हीस टू म्यान इज सर्व्हीस टू गॉड" हे सर्व पटण्यासारखेच. पण प्रस्तुत प्रसंगीचा त्यांचा उद्रेक मला अनाठायी वाटला , अस्थानी वाटला. मूर्तीला स्वेटर घालणे अतार्किक आहे का ? हो. त्यामुळे प्रचंड नासाडी झाली का ? नाही. कुणाचे नुकसान ? कोट्यावधींचा चुराडा ? कुणाला कसला त्रास ? करदात्यांच्या पैशाचा अपव्यय ? नाही. मग नक्की काय टोचते आहे ? गरीबांबद्दलची कणव अगदी योग्य , पैसा-धान्य-ऊर्जा-वेळ यांची नासाडी होत असेल तर त्याचा निषेध योग्य. भावनेखातर कुणी काही छोटेसे केले तर त्याबद्द्लचा तीव्र निषेध अयोग्य. पुन्हा एकदा लिहितो : मला डॉन यांच्या विचारांचा रोख पटला ; परंतु त्यांनी वापरलेले शस्त्र म्हणजे घरच्या म्हातारीला काळ झाल्यासारखे असे मला वाटले.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/07/2009 - 20:37 नवीन

+१ आणि अधिक...

मला डॉन यांच्या विचारांचा रोख पटला ; परंतु त्यांनी वापरलेले शस्त्र म्हणजे घरच्या म्हातारीला काळ झाल्यासारखे असे मला वाटले. मुक्तसुनीत आणि तत्सम इतर प्रतिसादांशी (लिखाळ, आनंदयात्री, सुनील वगैरेंशी) सहमत. गणपती हे असे एक दैवत आहे ज्याला अनेक रुपाने आणि अनेक पद्धतीने सजवायला तमाम भाविकांना आवडते. म्हणूनच गणपती अनेक पद्धतींनी आणि अनेक प्रकारात चित्रीत केलेला दिसतो आणि तेच त्याच्या मुर्तीसंबंधात आहे. तसेच कुणाला तरी वाटले की त्याला स्वेटर घालावा. आणि नेहमीप्रमाणे त्यातही गणपती गोंडसच दिसतो असे मला आणि इतर अनेकांना वाटते. आता त्याला स्वेटर घालण्याऐवजी ते पैसे रस्त्यावरील भिकार्‍याला देणे योग्य झाले असते असे म्हणणे यात एक कुठल्याही बाजूने माहीती नसताना असा कारण नसताना गैरसमज करून तेच बरोबर समजून त्यावर टिका करणे हे न पटण्याजोगे आहे. म्हणजे असे की जर तो स्वेटर एखाद्या व्यक्तीने (भक्ताने) दिला असला तर तो/ती भक्त एरव्ही काही दानधर्म करतच नाहीत असे यात विनाआधार गृहीत आहे. तसेच जर तो स्वेटर सारसबाग गणपती देवस्थान संस्थांनाने घातला असला तर देव्स्थान फक्त इतकेच करते असे त्यात गृहीत आहे. आता, मला व्यक्तीबद्दल माहीत नाही पण ते येथील कोणाबद्दलच माहीत नाही की कोण नक्की भिकार्‍याला अथवा इतर संस्थांना दान करते ते, स्वता:ची ऐहीक जीवनपद्धती काय ठेवते ते आणि कर देण्यापासून सर्व नियम न चुकवता/लपवता पाळते ते... :-) मात्र उत्सुकते पोटी मी (थँक्स टू गुगल!) जालावर शोधले तर, सारसबाग देवस्थान ट्रस्ट चे संकेतस्थळ मिळाले त्यातील काही माहीती देतो. देवस्थान हे सार्वजनीक असल्याने आणि तसेच पुण्याचा कलेक्टर हा पदसिद्ध ट्रस्टी असल्याने (पहा, आता कलेक्टर कोणत्याही धर्माचा असू शकतो. असे इतर धर्मीयांच्या देवस्थानांसंदर्भात होऊ शकेल असे वाटते का?) त्यांचे व्यवहार आधीपण जाहीर होतेच आणि माहीती हक्काने अधिक आणि सविस्तर माहीती मिळू शकेल ती गोष्ट वेगळीचः
The trust has been permitted to run educational institutions, propagate Sanskrit and Hindu knowledge, establish hospitals, community centres, libraries, give educational and medical aid to the needy, make donations, establish Yoga learning centres, run orphanages etc.
थोडक्यात या एका स्वेटरसंदर्भात चालू केलेली टिका अनाठायी वाटते. मग तसे दारीद्र्य काढायचेच असेल तर साम्यावादातील तत्वे "खर्‍या अर्थाने" आमलात आणली तरच होऊ शकेल. म्हणजे अर्थातच प्रत्येकाला समान जीवनपद्धतीच स्विकारावी लागेल मग सर्व साधनसंपत्ती समान वाटता येईल. तो पर्यंत तुम्हाला कशात आनंद वाटतो ते करणे पण अयोग्य. मग तो गणपतीला स्वेटर घालणे असोत अथवा स्वतःला बर्म्युडा घालणे असोत... कोणाची तयारी आहे या साठी? साम्यवाद्यांचीपण नसते तर तुम्ही आम्ही काय... असो. अवांतर - जाता जाता एक विनोद आठवला तो सांगतो: यात सिगरेट ओढणार्‍यांचे एका अर्थी समर्थन आहे. मी स्वतः सिगरेट ओढत नाही आणि त्याचे समर्थन कधी करावे असे वाटत नाही. तेंव्हा माझ्या लेखी केवळ या वादातील विषयाशी कुठेतरी साम्य वाटले म्हणून लिहीलेला केवळ विनोद म्हणून धरावा (आणि सिगरेटी फुकत बसू नये! ;) ) - दोन लहानपणचे मित्र अनेक वर्षांनी एका मोठ्या हॉटेलच्या पुढच्या प्रशस्त आवारात भेटतात. खूप वर्षांनी भेटल्यामुळे शाळेतील, लहानपणच्या आठवणींवर बोलणे सुरू होते. मजा आठवायला लागतात. त्यात एकाच्या लक्षात येते की दुसरा अगदी "चेनस्मोकर" झाला आहे. तसे त्याला लहानपणीच व्यसन लागले होते... म्हणून तो मित्रत्वाच्या नात्याने त्याला विचारतो की अरे लहानपणी लागलेले व्यसन अजून सोडवत नाही का? हा मित्र उत्तरतो, "नाही!" मग बिनस्मोकर त्याला उपदेशाचे डोस पाजतो की, " जर तू अमुक वयापासून आत्तापर्यंत, इतक्या सिगरेटी ओढल्यास, त्यात इतके पैसे, कदाचीत थोडेफार आजारपणात पैसे खर्च केले असशील, ते सर्व वाचून, बचतीत घालून त्या व्याज आणी मुद्दलातून तुला एखादे घर बांधता आले असते..." आमचा चेन स्मोकर मित्र आणि त्याचे मग खालील संवाद होतातः "तू कधी कुठले व्यसन केलेस का?" "नाही" "तुझे मग इतके पैसे वाचून, तुझे पण तू म्हणतो तसे घर झाले असेल..." "अरे नाही रे, तसे थोडेच शक्य आहे... मी आपले एक उदाहरण म्हणून म्हणत होतो." "मग किमान तिथे उभी असलेली गाडी तरी तू घेतली असशील" "नाही रे..." "ज्या हॉटेलच्या आवारात आपण उभे आहोत ते कोणाचे आहे माहीत आहे का?" "नाही..." "त्या हॉटेलचा मी मालक आहे, अर्थात ते माझे आहे. आणि हो, ती गाडी पण माझीच आहे" :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धम्मकलाडू गुरुवार, 01/08/2009 - 04:18 नवीन

हास्यास्पद गृहीतक

तसेच जर तो स्वेटर सारसबाग गणपती देवस्थान संस्थांनाने घातला असला तर देव्स्थान फक्त इतकेच करते असे त्यात गृहीत आहे.
हे गृहीतक तुम्ही कसे काय गृहीत धरले? हे म्हणजे संघवाले अर्धी चड्डी घालतात म्हणून ते फक्त इतकेच करतात असे गृहीत धरल्यासारखे आहे. सारसबागेचा गणपती सार्वजनिक आहे. मिसळपाव हे संकेतस्थळदेखील बहुधा सार्वजनिकच आहे. त्यामुळे ज्यांना हा मुद्दा गंभीर वाटतो त्यांच्यासाठी ही सार्वजनिक चर्चा मुळीच अनाठायी नाही. बाकी तुमचे चालू द्या. बाय द वे तुमचा प्रतिसाद ६०५ शब्दांचा आहे. हघ्या बरं का. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 22:23 नवीन

प्रति-प्रतिक्रीया

सर्वात प्रथम आमचे "मुद्द्याचे" मुद्दे पटले हे कळावल्याबद्दल आभार. बाकी आमच्या अनाठायी उद्रेक वाटणार्‍या भाषेबद्दल म्हणाल तर महाराष्ट्रातल्या एका अतिप्रसिद्ध तिर्थक्षेत्री आयुष्यातल्या काळापैकी जवळपास ७० % काळ आम्ही घालवला असल्याने व आमच्या डोळ्याला दिसणार्‍या "भावनेच्या बाजाराचा" परिणाम म्हणुन हा प्रतिसाद एवढा "कडक" झाला असावा असा एक अंदाज आहे. बाकी आम्ही जी काही "भक्तीच्या नावखाली ढोंगे" पाहिली आहेत ते आठवुन आपला देश व धर्म नक्की कुठे चालला आहे असे वाटुन कधीकधी खिन्न व्हायला होते. असो. तो इथे "महत्वाचा" मुद्दा नाही.
त्यामुळे प्रचंड नासाडी झाली का ? नाही.
बरोबर, "प्रचंड" नासाडी नाहीच झाली पण होणारच नाही असे नाही. उद्या हेच फॅड जर महाराष्ट्रातल्या / देशातल्या कानाकोपर्‍यातल्या गावागावात पसरलेल व सर्व जण हीच कॄती करु लागले तर आपण काय म्हणाल ? आम्हाला नेमकी हीच त्याची "प्रातीनिधीक सुरवात" वाटली. ह्या देव आणि श्रद्धांशी निगडीत गोष्टी चटकन पसरतात व माणसे डोळे झाकुन त्याचे अंधानुकरण करतात म्हणुन हा कंठशोष. उदा : गणपतीने दुध पिल्याचे उदाहरण डोळ्यासमोर नाही का ? इथे खरचं "नासाडी" झाली हे मान्य नाही का ?
कुणाचे नुकसान ? कोट्यावधींचा चुराडा ? कुणाला कसला त्रास ? करदात्यांच्या पैशाचा अपव्यय ? नाही. मग नक्की काय टोचते आहे ?
बर्‍यापैकी ह्या प्रश्नांचे वरील काही प्रतिसादात उत्तर दिले आहे. नुकसान : गरिब पोटावर हात असणार्‍या सामान्य माणसाचे. कोट्यावधींचा चुराडा : सध्या नाही पण भविष्यात जरुर शक्य आहे. त्रास : शक्य आहे ( गावोगावी जेव्हा सिंहासने अथवा मंदिराला कळस लावण्यासाठी सक्तीच्या वर्गण्या काढल्या जातात तेव्हा त्रास जरुर होतो.) आता नक्की काय टोचते आहे ? ह्याचे उत्तर ही एका परंपरेची "प्रातिनीधीक सुरवात" तर नाही ही शंका टोचते. आज साधा स्वेटर घातला आहे, उद्या भावना भानवा म्हणुन रत्नजडीत सोन्याच्या स्वेटरची टुम येणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ? आपल्याला मी सोन्याच्या अथवा त्याचा समावेश असलेल्या वस्त्रांची व ती देवाला अर्पण केले असल्याची किती उदाहरणे दाखवु ? अगदीच ह्यासारखे ऐकले नाही असेही नाही, आपण सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे ऐकले नाही काय ? बरं, आता हा साधा स्वेटर आहे म्हणुन ठीक आहे, उद्या टुम निघाल्यावर बडेजावासाठी सोन्याचा स्वेटर असावा म्हणुन "सक्तीची वर्गणी" काढली जाणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ? वर्गणी न दिल्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित असावे अशी अपेक्षा आहे. हेच टोचते आहे.
भावनेखातर कुणी काही छोटेसे केले तर त्याबद्द्लचा तीव्र निषेध अयोग्य.
आम्ही आधीच पहिल्या प्रतिसादात "आम्हाला श्रद्धा व भावना ह्याचा आदर आहे" हे मान्य केले आहे. पण भावनेच्या नावाखाली अशा गोष्टी कितपत योग्य आहेत ? उद्या कुणी "कोहीनुर हिरा जडावलेला सोन्याचा स्वेटर" वहायचे ठरवले तर ते भावनेच्या नावाखाली "योग्यच" ठरते का ? हे अनाठायी नाही का ? ही कल्पनाच आहे पण असे होणारच "नाही" ह्याची छातीठोक खात्री आपण देऊ शकता का ? बाकी "श्रद्धा आणि भावना ह्यांचा आदर आहेच" आम्हाला ... जाता जाता : बप्पा फारच सुंदर दिसत आहे, मात्र तो स्वेटर अनाठायी व अनावश्यक वाटला. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 22:38 नवीन

भविष्यात ...

भविष्यात कोट्यावधींचा चुराडा होईल , "कोहीनुर हिरा जडावलेला सोन्याचा स्वेटर , सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे " वगैरे गोष्टी ऐकून करमणूक झाली. हे सर्व जेव्हा होईल किंवा याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्याचा निषेध योग्य ठरेल. आजसुद्धा तुम्ही अन्य देवस्थानाच्या बाबतीतल्या बाजाराबद्दल , भपका/पैशाचा अपव्यय वगैरे गोष्टींबद्दल लिहिणे अगदी योग्यच ठरले असते. तुमचा सगळा निषेध (आणि आता ज्याला "थोडा अभिनिवेश" असे म्हणावे लागते) हा अस्थानी ठरतो हेच मला पुन्हा म्हणावेसे वाटते. बाय द वे , देवाला वेगवेगळी वस्त्रे घालणे , त्याच्यावर दुधा-दह्या-तुपाचा अभिषेक करणे वगैरे वगैरे अपव्ययवजा गोष्टी आजही हजारो देवस्थानांमधे होतातच. हे सर्व पैशाच्या अपव्ययाच्या , गरीबांऐवजी दगडाच्या देवाला देण्याच्या खात्यावर जमा होते हे वेगळे सांगायला नकोच. एका छोट्याशा स्वेटरला सुळी चढवणे थोडे अतार्किक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/07/2009 - 22:41 नवीन

+१

सहमत आहे! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
छ
छोटा डॉन Wed, 01/07/2009 - 22:50 नवीन

सद्यस्थीतीच आहे ...

मुसुशेठ, कोहीनुरचे सोडा कारण मी ते आतिशयोक्ती म्हणुन लिहले आहे व तसे मी तिथेच स्पष्ट केले आहे. पण तुम्हाला "सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे " ह्याची किती उदाहरणे दाखवु ? अगदीच ही माहिती आपल्यासाठी नवीन आहे का ? मग आपण कमीत कमी सोन्याचे कळस / सिंहासन / पायर्‍या ह्याबद्दल ऐकले असेलच ना ? असो. हा "मुद्दा" चर्चा भरकटवणारा आहे अशी मला शंका येते आहे. बाकी आमचे लिहणे आता ( समोरच्याच्या नजरेत ) "अभिनिवेशपुर्ण" वाटत असल्याने आम्ही आता ( तात्पुरते ) थांबतो.
आजसुद्धा तुम्ही अन्य देवस्थानाच्या बाबतीतल्या बाजाराबद्दल , भपका/पैशाचा अपव्यय वगैरे गोष्टींबद्दल लिहिणे अगदी योग्यच ठरले असते.
+++++१, सहमत आहे. असा किडा काही तासांपुर्वी डोक्यात आला होता. पण भावीकांच्या श्रद्धास्थानाला बसणारे संभाव्य धक्के, होणारा विरोध व आधीच ठरलेला "निष्कर्ष" ह्याचा विचार करुन मी हे लिहणार नाही ... बोलण्यासारखे बरेच आहे, आत्ताच एका मिपाकराशी ह्याबद्दल २ तास चर्चा करुन आलो. सध्यातरी हे "न पेलणारे / भडक / अभिनीवेशपुर्ण" होईल असे वाटते म्हणुन थांबतो, भविष्यात पाहु ... बाकी आता आमची "मनापासुन विनाउपचार गणपतीची प्रार्थना " करुन झोपायची वेळ झाली आहे. उद्या अजुन मुद्दे लिहीन. गणपती बाप्पा मोरया ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 22:54 नवीन

युद्धविराम (हघ्या! )

छोटा डॉन , व्यक्तिगत रोख टाळूनसुद्धा अगदी खडाजंगी चर्चा घडू शकते हे आपण सिद्ध केले. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/08/2009 - 10:28 नवीन

मुळात

मुळात डॉनरावांनी स्वेटर घालण्याची तुलना गणपती दूध पिऊ लागला या घटनेशी केली हे काही पटत नाही. मूर्तीने दूध पिण्याच्या बातम्या पसरवून चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासली जाते, ते निश्चितच चूक आहे. पण देवाच्या मूर्तीला एरवी वस्त्रे चढवतातच त्यात वर स्वेटर घातला तर एवढा गहजब करण्यामागचे कारण लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
र
राघव Wed, 01/07/2009 - 19:09 नवीन

:)

दुसर्‍यांनी काय करावे अन् काय नको हे स्वत:हून सांगणारे आपण कोण? आपण त्यांचे गुरुत्व कसे घेऊ शकतो? ज्याचा त्याचा आपापला मार्ग असतो. हां जर कुणी स्वत:हून विचारण्यास आला तर त्याला आपल्याला योग्य वाटते ते सांगण्याचा आपला अधिकार असेल. अर्थात् त्यातही आपण आग्रही असू शकत नाहीच!! :) माझी स्वत:ची पद्धत अशी की आराध्य दैवताचीही सेवा करावी अन् लोकांचीही सेवा करावी. कुणी मदत मागण्यास आला तर अव्यवहारीपणा न करता जेवढी शक्य तेवढी करावी. त्यातही मी अशी मदत केली हे लोकांस सांगण्याचा भाव नसावा. असे समजावे की जी काही मदत (पैशा अडक्याच्या स्वरूपात) माझ्या हातून होतेय ती मुळात माझी नाहीच. ज्याला ते दिल्या गेले अथवा ज्याला मदत झाली त्याचेच ते होते. मी फक्त पोस्टमनचे काम करतोय. "दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम"!! माझे काम फक्त पोचवण्याचे. बाकी समाजसेवा, ते करणार्‍या संस्था यांच्याकडे जाण्यापेक्षा जे आपल्याकडून होते ते करण्याच्या मताचा मी आहे. मनस्तापाचा प्रकार स्वत:च कमी होतो असा स्वानुभव आहे! असो. बाप्पा खरंच अतिशय गोड दिसतोय हे मात्र अगदी खरं! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/07/2009 - 19:13 नवीन

बाप्पा

बाप्पा दिसतोय खरा अगदी गोड! :)
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/07/2009 - 21:22 नवीन

१+

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
रेवती Wed, 01/07/2009 - 19:24 नवीन

फारच गोड

फारच गोड दिसतायत बाप्पा! मजा वाटली बघून. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/07/2009 - 20:20 नवीन

फोटो पाहिला आणि हसू आलं..

डॉन्याची प्रतिक्रिया बोलकी आहे. आज स्वेटर घातला आहे.. उद्या आणखी काहीतरी करतील. कदाचीत उन्हाळ्यात देवाला पोहायची इच्छा झालीये असे म्हणत स्विमिंग सूट घालतील.. देवाला ताप आला आहे असे म्हणून डॉक्टर बोलावून क्रोसिनचा नैवेद्य दाखवतील. झोपलेल्याला जागं करता येतं पण ढोंग करणार्‍याला कसं जागं करणार?? आपण नक्की कुठे चाललो आहोत?? हा प्रश्न यावेळी सतावतो आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 01/07/2009 - 21:01 नवीन

कळले नाही

मूर्तीला स्वेटर घालावा का नाही - कदाचित घालू नये. गरिबांना दान द्यावा. पण मला वाटते बर्‍याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही. बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्‍यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे? माझ्या भारतीय डोळ्यांना सवय झालेली असते, म्हणून असेल, पण मला देवळात गेले की प्रसन्न, छान वाटते नीट नटवलेल्या मूर्तीकडे पाहून. आमच्याकडच्या लक्ष्मीच्या देवळात तिला खूपच सुंदर साडी नेसवतात, गणपतीला छान पितांबर नेसवतात, बाकीही सजावट करतात आणि ते बघायला आवडते, प्रसन्न वाटते म्हणून कधीतरी देवळात जाते. भारतात असताना जाते तेव्हा देवळाबाहेरची भिकार्‍यांची रांग पाहून तितकेच वाईट वाटते. पण भिकार्‍यांना पैसे द्यावेत की नाहीत, का अन्न धान्याची मदत करावी, ह्याबद्दल चर्चा झडू शकतात. पण आपल्यापैकी कितीजण ते मनापासून देतात? दिले तर भिकार्‍याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का? आपल्या आजूबाजूच्या गरिबांना (भिकार्‍यांना म्हणत नाही) त्या खाईत पडून राहावे लागू नये म्हणून आपण किती वेळा हस्तक्षेप करतो? बर्‍याचदा विरोध हा देवळातील निर्जीव मूर्तींच्या उपासनेत तासनतास आणि पैसे घालवणार्‍या पब्लिकला असतो. असा वेळ घालवावा असे मला व्यक्तीशः वाटत नाही. पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्‍यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे. नसल्यास त्यांना ह्या वाचलेल्या वेळाचा वापर करून किती नव्या कला येतात, किती अधिक पुस्तकांचे वाचन झाले आहे, किंवा त्यांचे रोजचे काम अधिक सुंदर, सफाईदार किंवा अधिक पैसे मिळवून देणारे झाले आहे, मनाच्या शांतीसाठी ते काय करतात हेही सांगावे. वाचवलेले पैसे कसे वापरतात हे सांगावे. जर मूर्ती/देवाचे काहीही न करण्यात भले असले तर ते का आहे हे तर कळले पाहिजे असे वाटते. तसेच ह्याआधी भिकार्‍यांना आपण (मी धरून) याआधी वर्षभरात किती वेळा कपडे दान केले आहेत तेही लिहावे. (यावर्षी भिकार्‍यांना नाही, पण भारतातून आलेल्या काही गरजू लोकांना आमच्या जवळील एका संस्थेने थंडीसाठी जॅकेटस पुरवण्याचा घाट घातला, व्यक्तीशः त्यात मीही काही थंडीचे कपडे, कोट दिले.) हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये. हेतू एवढाच आहे की केवळ फॅशन आहे म्हणून एका प्रकारच्या जीवनशैलीला किंवा वागण्यास विरोध करू नये एवढे सांगावे. जर फारच वाटले तर देवळात साड्या घेऊन जाणार्‍यांना व्यक्तीशः विनंती करावी की त्या अमूक एका गरीब बाईला द्याव्यात. भाविक लोकांना किंवा देवळातील अधिकार्‍यांना हसून किंवा तुच्छ लेखून काही साध्य होणार नाही. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास काढून टाकला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 21:03 नवीन

+१

संयत आणि समतोल प्रतिसादाचे एक उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
र
रेवती Wed, 01/07/2009 - 21:40 नवीन

चित्राताई

चित्राताईशी सहमत. असे आपण किती गोष्टींवर लक्ष ठेवतो? बाजारात गेल्यावर (किंवा मॉलमध्ये) सहज आवडले म्हणून कापडे घेतले, किंवा कुठलीही वस्तू घेतली तर (आजकाल हे सर्रास होताना आपण सगळेच जण पाहतो.) कितीवेळा स्वतःला प्रश्न विचारला जातो? मी ही वस्तू का घेतलीये? माझ्याकडे आधीचे पाच शर्टस् असताना सहावा आवडला म्हणून घेतलाय तर आता हा बाहेरच्या गरीबाला द्यायला हवा असा विचार आपण का करत नाही? कारण प्रत्येक गोष्टीत असा विचार शक्य नसतो. तसं म्हणायचं झालं तर पाण्याशिवाय पेयांचे अनेक प्रकार पिणार्‍यांनी पैसे वाचवले तर एका गरीबाचं जेवण होईल की. त्या स्वेटरमुळे इतका गहजब करण्याचे काहीही कारण नाही. माझ्या बघण्यात दोन आज्ज्या अश्या आहेत (वय ७५ व ८०) त्यांचे सतत विणकाम चाललेले असते. मग देवाला कपडे करतील तर कधी मोलकरणीच्या मुलाला स्वेटर विणतील. ह्या वयात (आणि आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर) त्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? कित्येक वयस्कर लोकांचा देवाशी संवाद चालू असलेला आपण बघतो, त्यावेळी आपण म्हणतो का की हे असं कुठेतरी बघून बोलण्यापेक्षा बाहेरचे जे एकटे लोक आहेत त्यांच्याशी जाऊन बोला. नेहमीची भाजी घेऊन झाल्यावरही," अरेच्च्या आज कोथिंबीर ताजी छान दिसतीये, वड्या करूया" म्हणून ज्यादा घेतली जाते. माझ्या मोलकरणीला त्या कोथिंबीरीचा उपयोग ज्यास्त होणार आहे तीला देवूया असा विचार मी तरी करत नाही. कोणी भक्तानी प्रेमानं काही केलं (श्रीमंत देवस्थानांबद्दल माझं काही म्हणणं नाही) तर काही होत नाही. मला तर ह्या नव्या वेषातले बाप्पा खूप आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
य
यशोधरा Wed, 01/07/2009 - 22:08 नवीन

मस्त

चित्राताई, मस्त प्रतिसाद, आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ब
बट्टू Wed, 01/07/2009 - 22:32 नवीन

हे कळेल का

मला वाटते बर्‍याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही. इथे विषय इतर बर्‍याच देवळांमधल्या मुर्तींचा चाललेला नाही. स्वेटर घालणार्‍या बाप्पांचा आहे. चर्चा निघाली म्हणून लोक बोलले असे वाटले. डॉनने चर्चा सुरु केलेली नाही. जर चर्चा रोज बदलल्या जाणार्‍या कपड्यांवर असती तरीही डॉनचा प्रतीसाद तसाच असता ना. बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्‍यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे? इथे आपण घरात काय करतो त्याचा विचार चाललेला नसून सार्वजनिक ठिकाणी गणपतीला काय घातले हा विषय आहे. देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा. भिकार्‍याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का? इथे भिकार्‍यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे. पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्‍यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे. कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी. हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये. म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्‍या गोष्तीवर असतो तसं ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा गुरुवार, 01/08/2009 - 00:15 नवीन

अवांतर

डॉनने चर्चा सुरु केलेली नाही. चर्चा डॉनरावांनी केली असली नसली, त्यांनी एक मत मांडले. बाप्पा क्यूट दिसतो आहे, या प्रस्तावकाच्या मताला त्यांनी त्यांना वाटते ते मत प्रदर्शित केले. मी त्या मताच्या थोडी विरोधी भूमिका घेतली. यात प्रतिसादाला उपप्रतिसाद असा मुद्दा येतो. उपप्रतिसाद द्यायचा नाही, तर तुमचा हा प्रतिसाद काढून टाकायचा का? देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा. शब्द बर्‍यापैकी जहरी वाटले. इथे भिकार्‍यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे. पहिले म्हणजे "स्वेटर देशी असतो की विदेशी हो. विदेशी म्हणला जावा कारण त्याचे नाव स्वेटर आहे. " हे, आणि मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का? हे, आणि सगुण भक्तीचा हॅप्पी बड्डे! हेही चर्चेचे विषय नाहीत. आणि तसेच तुम्ही म्हणता तो विषय कसा आहे, हे माझ्या मंदमतीला कळले नाही. चर्चा काही डॉनसाहेबांनी सुरू केली नाही असे तुमचेच वरचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉनसाहेबांचा विषय नसला तर कुडकुडणार्‍या भिकार्‍याचा विषय रद्दबातल ठरतो. आणि देवळातील अधिकार्‍यांना भिकारी दिसत नसतीलच हे तुम्हाला कसे ठाऊक? कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी. विषय नक्कीच आहे हे माझे मत. बापा क्यूट दिसतो, या चर्चाप्रस्तावकाच्या स्फुटाला धरून लोकांनी आपापल्या मनात आलेले विचार लिहीले आहेत, त्यामुळे विषय म्हणजे यावरून काय विचार मनात आले ते मांडणे असा बाकीचे लोक घेऊ शकतात. त्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. एकदा विचार मांडल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचेही स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते घेताच आहात नाही का? म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्‍या गोष्तीवर असतो तसं ना. तुमचा विश्वास बसत नसला तर माझा नाईलाज आहे. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास इतर संपादकांनी उडवून लावावा, माझी हरकत नाही. धन्यवाद. या विषयावर अधिक वेळ वाया दवडू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्टू
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/07/2009 - 21:13 नवीन

देवा यांना क्षमा कर !

देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय ! विज्ञानाचा कितीही विकास झाला असला तरी ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद पुराव्यानिशी आज तरी सिद्ध करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते ! -दिलीप बिरुटे (श्रद्धाळू )
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 22:39 नवीन

सर, देव आणि

सर, देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय ! मला नाही वाटत कुणी इथे टिंगल केली आहे. विरुद्ध मत म्हणजे टिंगलटवाळी नव्हे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/07/2009 - 22:55 नवीन

इथे नव्हे हो !

सामान्यपणे देव-धर्माला न मानणारे जे लोक आहेत, त्या लोकांचे एक सामान्य मत मांडले हो ! भारतातील देव दुध पीतो....वगैरेचा विचारांच्या अंगाने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 01/08/2009 - 00:24 नवीन

कारण, हे

कारण, हे लोक (टीका करणारे) खुप हुशार असतात. (हा उपहास नाही) त्यांना त्यांच्या बुद्धिच्या सहाय्याने देवाची कृत्रिमता समजलेली असते. पण होते काय की, सर्वसामान्य माणसांना भावलेल्या देवाची कल्पना ते आपल्या तर्कदुष्टतेने खोडुन काढतात. ज्यात सामान्य माणसाला तो आपल्यावरचा वैयक्तिक हल्ला वाटतो, त्यामुळे दोघांचे जमत नाही. त्यामुळे श्रद्धांना हळुहळु उन्नत करायचे असते हा साधा विचार टिकाकारांच्या लक्षात येत नाही, कारण तर्क आणि कारणमिमांसा त्यांना येवढी अंगवळणी पडली असते, की इतर कोणी त्याच्याशिवाय जगत असतील हे त्यांना माहितच नसते. एक कदम तुम चलो, एक कदम हम चले असे झाले तर खरे अध्यात्म लोकांना कळेल. असो. (भाविक अद्वैतवादी) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/08/2009 - 04:32 नवीन

सोक्षमोक्ष

दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते !
ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का? फारसे अवघड काम नसावे हे. थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/08/2009 - 12:20 नवीन

देवाला रिटायर करा ?

ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का? ईश्वराच्या असण्या-नसण्याचा सोक्षमोक्ष कायमचा लावता येणारा नाही. हजारोवर्षापासून ते प्रयत्न चालू आहेत, पुढे हजारो वर्ष त्यावर प्रयोग चालतील. फार तर देवाला रिटायर करता येऊ शकेल असे वाटते ! ;) थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे. आमचे प्रयोग आपल्यापर्यंत पोहचलेत, आम्ही धन्य झालो !!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमाक्ष
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 21:46 नवीन

बाप्पा गोड दिसताहेत!

बाप्पांना स्वेटर घातल्याने भावनांचा एवढा क्षोभ होत असेल तर तो आपला दोष आहे असे मला वाटते. गणपती दूध पितो, रडतो असल्या भाकडकथा/अंधश्रद्धा आणि स्वेटर घालणे ह्यात फरक आहे. एक उदाहरण देतो - निरांजनात किंवा समईत एकच वात लावू नये दोन वाती लावाव्यात असे म्हणतात. आता असे का म्हणतात? हे कुणी ठरवले? ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा वाद आपण आपल्या आजीबरोबर किंवा घरातल्या कोणा वडिलधार्‍या बरोबर घालून त्यांना पटवून दिले की एकच वात लावण्याने काही बिघडत नाही तर ते चूक का बरोबर? माझ्यामते चूक. कारण ह्या ठिकाणी भावनांचा प्रश्न आहे आणि दुसर्‍या कोणाचे नुकसान नाहीये. एका ऐवजी दोन वाती लावून त्यांना समाधान मिळत असेल आणि श्रद्धेला तडा जात नसेल तर ते गैर नाही. पण ह्याच आजीने जर खूप रडणार्‍या छोट्या बाळाला फक्त देवाचा अंगारा लाव, रामरक्षा म्हण आणि डॉक्टरकडे नेऊ नकोस असे सांगितले तर मात्र आपल्याला रामरक्षा म्हणून, अंगारा लावून झाल्यावर आजीची समजूत काढावी लागेल की डॉक्टरांकडे नेणे कसे गरजेचे आहे. हा तोल साधणे हेच अवघड असते. लोकांना नादाला लावून त्यांच्याकडून पैसे उकळणे, फसवाफसवी, बुवाबाजी असले प्रकार हे गैरच. स्वेटर खेरीज अन्य कपडेही का घालावेत मग बाप्पाला? तेही कापड दान करा की. पण अशा गोष्टीने प्रश्न सुटत नाहीत. भारतासारख्या गरीब देशाला अवकाशसंशोधन आणि उपग्रह सोडण्याचे खर्च परवडतात का? त्याऐवजी शेतीत, जलसंधारणातच का खर्च करत नाहीत असे म्हणण्यासारखे आहे. दोन्ही गोष्टींचे महत्त्व आहे त्या परस्परपूरक आहेत. एक थांबवून दुसर्‍याचे भले होणार नाही. तारतम्य मात्र गरजेचे आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 01/07/2009 - 22:01 नवीन

मुर्तीबद्

मुर्तीबद्दल विचाराल तर कै खास वाटलं णाही .. पण प्रतिक्रीया वाचूणच अंमळ करमणून झाली ... काय काय डेंजर प्रतिक्रिया आहेत .. आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली .. चालू द्या भो .. - टारझन उर्फ गणेश
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 22:07 नवीन

प्रश्न मूळ

प्रश्न मूळ प्रस्तावाच्या लांबीचा नसून तत्त्वाचा आहे. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बट्टू Wed, 01/07/2009 - 22:10 नवीन

हो रे!

एक एक डेंजर प्रतिक्रिया पाहिल्या आणि टरकलोच. साम्यवाद काय, सगुण भक्ती काय, बाप्पा! लोकांना कामाला लाव रे. एखाद्या बंडल विषयावर पानभर प्रतिसाद देण्याचा वेळ का देतोस यांना. काही नसेल तर स्वेटर तरी विणायला लाव रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धम्मकलाडू गुरुवार, 01/08/2009 - 04:23 नवीन

कधी ६४० शब्द, कधी ६०५ शब्द

आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली .. अगदी सहमत! कधी ६४० शब्द. कधी ६०५ शब्द :):) () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 22:58 नवीन

आवाहन

यशोधरा , बट्टू , आता पुरे. ले ईट ऑफ !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 01/07/2009 - 23:03 नवीन

बापरे,

बापरे, किती गहजब एवढ्याश्या स्वेटर वरून.. ! पूर्वी उन्हाळ्यात चंदन लावायचे मुर्तीला, तेव्हा असा विरोध कधीच ऐकला नव्हता..! लोकर नक्कीच चंदनापेक्षा स्वस्त असेल.. मला व्यक्तिश: डॉन आणि तशी भुमिका घेणार्‍यांचे सर्व मुद्दे पटले, पण इथे नाहीत.. इथे त्याचा काहीच संबंध नाहीए असं वाटलं... मुक्तसुनित, चित्रा यांचे प्रतिसाद पटले,आवडले.. (आणि थंडीमधे स्वेटर तर उन्हाळ्यात स्विमिंग सूट, बर्म्युडा का? किंवा सोन्याचा स्वेटर इत्यादी गोष्टी प्रामाणिकपणे बोलायचं तर हास्यास्पद वाटल्या!) बाप्पा गोड दिसतोय.. गणपतीचे कुठलेही रूप लोभसवाणे वाटतेच.. बाकी चालूदे.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/07/2009 - 23:05 नवीन

मुक्तसुनी

मुक्तसुनीतजी, मी प्रथम प्रतिसाद गमतीतच लिहिला होता, त्यावर तुमच्या मापाचा स्वेटर विणू का हे लिहायची काही गरज होती असे वाटत नाही - उद्धट आणि उर्मट वाटले, म्हणून पुढचे उत्तर गेले. मघाशी जेह्वा तो प्रतिसाद आला तेहवच तुम्ही टोकायला हवे होतेत, असे वाटते. तुम्हाला व्यनि केलेला आहेच.
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Wed, 01/07/2009 - 23:10 नवीन

ताई, माई, आक्का

मी पण तुम्हाला अगदी गमतीतच म्हटले होते. तुमची मापे काढण्याचा माझा काहीही हेतू नव्हता. माझ्याकडून चूकिचा शब्द गेला असेल तर माफी मगतो पण तुम्ही उगीच माझ्यामागे लागला नसता तर मि तुम्हाला ऊत्तर लिहीलं नसतं आणि मला का टोकायचं, मी नवा आहे म्हणुन? तुमचा प्रतिसाद मला दिलेला चालतो. माझा चालत नाही. मला स्वप्नात वाटलं नव्हतं की आधी कळ काढून तुम्ही वर माझीच तक्रार कराल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 23:10 नवीन

नाइलाज

मला यशोधरा आणि बट्टु यांचे काही प्रतिसाद उडवावे लागले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ए
एकलव्य Wed, 01/07/2009 - 23:08 नवीन

गणपती बाप्पा मोरया!

आमच्या घरी कृष्णबाप्पा स्विमिंग सूट घालतो, छान छान कंफर्टर्स ओढतो आणि टाय घालून सिंड्रेलाच्या डान्सपार्टीलाही जातो. आता स्वेटरपण घालायला लागेल. - गदाधर एकलव्य
  • Log in or register to post comments
क
केदार गुरुवार, 01/08/2009 - 03:25 नवीन

अरेरे

गणपतीला गुलाबी स्वेटर बघुन कसेसेच वाटले. निदान निळा तरी घालायचा. :) तसा बाप्पा कश्यातही गोड दिसतो पण दुध, तुपाने अभिषेक करने आणी स्वेटर घालने ह्यात फरक आहे. न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति शुध्दं परमात्मरुपम निदान ह्याचा तरी विचार व्ह्यायला हवा होता.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 01/08/2009 - 11:35 नवीन

झेपला नाय

न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति शुध्दं परमात्मरुपम मले काय सूदिक कळले नाय (प्राकृत) अभिरत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार
द
दिपक गुरुवार, 01/08/2009 - 09:38 नवीन

बापरे

बाप्पारे बरीच चर्चा झालेली दिसते. :) बाप्पा सर्व मिपांकराना सु़ख आणि समृध्दी दे . गणपती बाप्पा मोरया
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 01/08/2009 - 11:24 नवीन

वरील सर्वाशी सहमत

भिकार्‍याना भिक दिली तर भिकार्‍याची संख्या कमी होईल का?त्याच्यात आर्थिक सुधारणा घडुन येईल का? किमान गणपतीला स्वेटर कसा दिसतो हे बघायला येणार्‍या वर्दळीमुळे भिकार्‍यांच्या कमाईत वाढ झाली असावी. गणपतीबाप्पा मोरया. वेताळ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा