डॉन्याची प्रतिक्रिया बोलकी आहे.
आज स्वेटर घातला आहे.. उद्या आणखी काहीतरी करतील. कदाचीत उन्हाळ्यात देवाला पोहायची इच्छा झालीये असे म्हणत स्विमिंग सूट घालतील.. देवाला ताप आला आहे असे म्हणून डॉक्टर बोलावून क्रोसिनचा नैवेद्य दाखवतील. झोपलेल्याला जागं करता येतं पण ढोंग करणार्याला कसं जागं करणार??
आपण नक्की कुठे चाललो आहोत?? हा प्रश्न यावेळी सतावतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मूर्तीला स्वेटर घालावा का नाही - कदाचित घालू नये. गरिबांना दान द्यावा. पण मला वाटते बर्याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही. बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे?
माझ्या भारतीय डोळ्यांना सवय झालेली असते, म्हणून असेल, पण मला देवळात गेले की प्रसन्न, छान वाटते नीट नटवलेल्या मूर्तीकडे पाहून. आमच्याकडच्या लक्ष्मीच्या देवळात तिला खूपच सुंदर साडी नेसवतात, गणपतीला छान पितांबर नेसवतात, बाकीही सजावट करतात आणि ते बघायला आवडते, प्रसन्न वाटते म्हणून कधीतरी देवळात जाते. भारतात असताना जाते तेव्हा देवळाबाहेरची भिकार्यांची रांग पाहून तितकेच वाईट वाटते. पण भिकार्यांना पैसे द्यावेत की नाहीत, का अन्न धान्याची मदत करावी, ह्याबद्दल चर्चा झडू शकतात. पण आपल्यापैकी कितीजण ते मनापासून देतात? दिले तर भिकार्याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का? आपल्या आजूबाजूच्या गरिबांना (भिकार्यांना म्हणत नाही) त्या खाईत पडून राहावे लागू नये म्हणून आपण किती वेळा हस्तक्षेप करतो?
बर्याचदा विरोध हा देवळातील निर्जीव मूर्तींच्या उपासनेत तासनतास आणि पैसे घालवणार्या पब्लिकला असतो. असा वेळ घालवावा असे मला व्यक्तीशः वाटत नाही. पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे. नसल्यास त्यांना ह्या वाचलेल्या वेळाचा वापर करून किती नव्या कला येतात, किती अधिक पुस्तकांचे वाचन झाले आहे, किंवा त्यांचे रोजचे काम अधिक सुंदर, सफाईदार किंवा अधिक पैसे मिळवून देणारे झाले आहे, मनाच्या शांतीसाठी ते काय करतात हेही सांगावे. वाचवलेले पैसे कसे वापरतात हे सांगावे. जर मूर्ती/देवाचे काहीही न करण्यात भले असले तर ते का आहे हे तर कळले पाहिजे असे वाटते. तसेच ह्याआधी भिकार्यांना आपण (मी धरून) याआधी वर्षभरात किती वेळा कपडे दान केले आहेत तेही लिहावे. (यावर्षी भिकार्यांना नाही, पण भारतातून आलेल्या काही गरजू लोकांना आमच्या जवळील एका संस्थेने थंडीसाठी जॅकेटस पुरवण्याचा घाट घातला, व्यक्तीशः त्यात मीही काही थंडीचे कपडे, कोट दिले.)
हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये. हेतू एवढाच आहे की केवळ फॅशन आहे म्हणून एका प्रकारच्या जीवनशैलीला किंवा वागण्यास विरोध करू नये एवढे सांगावे. जर फारच वाटले तर देवळात साड्या घेऊन जाणार्यांना व्यक्तीशः विनंती करावी की त्या अमूक एका गरीब बाईला द्याव्यात. भाविक लोकांना किंवा देवळातील अधिकार्यांना हसून किंवा तुच्छ लेखून काही साध्य होणार नाही. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास काढून टाकला तरी चालेल.
चित्राताईशी सहमत.
असे आपण किती गोष्टींवर लक्ष ठेवतो? बाजारात गेल्यावर (किंवा मॉलमध्ये) सहज आवडले म्हणून कापडे घेतले, किंवा कुठलीही वस्तू घेतली तर
(आजकाल हे सर्रास होताना आपण सगळेच जण पाहतो.) कितीवेळा स्वतःला प्रश्न विचारला जातो? मी ही वस्तू का घेतलीये? माझ्याकडे आधीचे पाच शर्टस् असताना सहावा आवडला म्हणून घेतलाय तर आता हा बाहेरच्या गरीबाला द्यायला हवा असा विचार आपण का करत नाही? कारण प्रत्येक गोष्टीत असा विचार शक्य नसतो. तसं म्हणायचं झालं तर पाण्याशिवाय पेयांचे अनेक प्रकार पिणार्यांनी
पैसे वाचवले तर एका गरीबाचं जेवण होईल की.
त्या स्वेटरमुळे इतका गहजब करण्याचे काहीही कारण नाही. माझ्या बघण्यात दोन आज्ज्या अश्या आहेत (वय ७५ व ८०) त्यांचे सतत विणकाम चाललेले असते. मग देवाला कपडे करतील तर कधी मोलकरणीच्या मुलाला स्वेटर विणतील. ह्या वयात (आणि आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर) त्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? कित्येक वयस्कर लोकांचा देवाशी संवाद चालू असलेला आपण बघतो, त्यावेळी आपण म्हणतो का की हे असं कुठेतरी बघून बोलण्यापेक्षा बाहेरचे जे एकटे लोक आहेत त्यांच्याशी जाऊन बोला.
नेहमीची भाजी घेऊन झाल्यावरही," अरेच्च्या आज कोथिंबीर ताजी छान दिसतीये, वड्या करूया" म्हणून ज्यादा घेतली जाते. माझ्या मोलकरणीला त्या कोथिंबीरीचा उपयोग ज्यास्त होणार आहे तीला देवूया असा विचार मी तरी करत नाही. कोणी भक्तानी प्रेमानं काही केलं (श्रीमंत देवस्थानांबद्दल माझं काही म्हणणं नाही) तर काही होत नाही. मला तर ह्या नव्या वेषातले बाप्पा खूप आवडले.
रेवती
मला वाटते बर्याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही.
इथे विषय इतर बर्याच देवळांमधल्या मुर्तींचा चाललेला नाही. स्वेटर घालणार्या बाप्पांचा आहे. चर्चा निघाली म्हणून लोक बोलले असे वाटले. डॉनने चर्चा सुरु केलेली नाही. जर चर्चा रोज बदलल्या जाणार्या कपड्यांवर असती तरीही डॉनचा प्रतीसाद तसाच असता ना.
बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे?
इथे आपण घरात काय करतो त्याचा विचार चाललेला नसून सार्वजनिक ठिकाणी गणपतीला काय घातले हा विषय आहे. देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा.
भिकार्याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का?
इथे भिकार्यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे.
पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे.
कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी.
हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये.
म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्या गोष्तीवर असतो तसं ना. ;)
डॉनने चर्चा सुरु केलेली नाही.
चर्चा डॉनरावांनी केली असली नसली, त्यांनी एक मत मांडले. बाप्पा क्यूट दिसतो आहे, या प्रस्तावकाच्या मताला त्यांनी त्यांना वाटते ते मत प्रदर्शित केले. मी त्या मताच्या थोडी विरोधी भूमिका घेतली. यात प्रतिसादाला उपप्रतिसाद असा मुद्दा येतो. उपप्रतिसाद द्यायचा नाही, तर तुमचा हा प्रतिसाद काढून टाकायचा का?
देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा.
शब्द बर्यापैकी जहरी वाटले.
इथे भिकार्यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे.
पहिले म्हणजे "स्वेटर देशी असतो की विदेशी हो. विदेशी म्हणला जावा कारण त्याचे नाव स्वेटर आहे. " हे, आणि मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का? हे, आणि सगुण भक्तीचा हॅप्पी बड्डे! हेही चर्चेचे विषय नाहीत.
आणि तसेच तुम्ही म्हणता तो विषय कसा आहे, हे माझ्या मंदमतीला कळले नाही. चर्चा काही डॉनसाहेबांनी सुरू केली नाही असे तुमचेच वरचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉनसाहेबांचा विषय नसला तर कुडकुडणार्या भिकार्याचा विषय रद्दबातल ठरतो.
आणि देवळातील अधिकार्यांना भिकारी दिसत नसतीलच हे तुम्हाला कसे ठाऊक?
कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी.
विषय नक्कीच आहे हे माझे मत. बापा क्यूट दिसतो, या चर्चाप्रस्तावकाच्या स्फुटाला धरून लोकांनी आपापल्या मनात आलेले विचार लिहीले आहेत, त्यामुळे विषय म्हणजे यावरून काय विचार मनात आले ते मांडणे असा बाकीचे लोक घेऊ शकतात. त्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. एकदा विचार मांडल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचेही स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते घेताच आहात नाही का?
म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्या गोष्तीवर असतो तसं ना.
तुमचा विश्वास बसत नसला तर माझा नाईलाज आहे. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास इतर संपादकांनी उडवून लावावा, माझी हरकत नाही.
धन्यवाद. या विषयावर अधिक वेळ वाया दवडू इच्छित नाही.
देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय !
विज्ञानाचा कितीही विकास झाला असला तरी ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद पुराव्यानिशी आज तरी सिद्ध करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते !
-दिलीप बिरुटे
(श्रद्धाळू )
सर,
देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय !
मला नाही वाटत कुणी इथे टिंगल केली आहे. विरुद्ध मत म्हणजे टिंगलटवाळी नव्हे.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
कारण, हे लोक (टीका करणारे) खुप हुशार असतात. (हा उपहास नाही) त्यांना त्यांच्या बुद्धिच्या सहाय्याने देवाची कृत्रिमता समजलेली असते. पण होते काय की, सर्वसामान्य माणसांना भावलेल्या देवाची कल्पना ते आपल्या तर्कदुष्टतेने खोडुन काढतात. ज्यात सामान्य माणसाला तो आपल्यावरचा वैयक्तिक हल्ला वाटतो, त्यामुळे दोघांचे जमत नाही. त्यामुळे श्रद्धांना हळुहळु उन्नत करायचे असते हा साधा विचार टिकाकारांच्या लक्षात येत नाही, कारण तर्क आणि कारणमिमांसा त्यांना येवढी अंगवळणी पडली असते, की इतर कोणी त्याच्याशिवाय जगत असतील हे त्यांना माहितच नसते.
एक कदम तुम चलो, एक कदम हम चले असे झाले तर खरे अध्यात्म लोकांना कळेल. असो.
(भाविक अद्वैतवादी) अवलिया
अवलियाची अनुदिनी
In reply to सोक्षमोक्ष by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का?
ईश्वराच्या असण्या-नसण्याचा सोक्षमोक्ष कायमचा लावता येणारा नाही. हजारोवर्षापासून ते प्रयत्न चालू आहेत, पुढे हजारो वर्ष त्यावर प्रयोग चालतील. फार तर देवाला रिटायर करता येऊ शकेल असे वाटते ! ;)
थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे.
आमचे प्रयोग आपल्यापर्यंत पोहचलेत, आम्ही धन्य झालो !!! :)
-दिलीप बिरुटे
बाप्पांना स्वेटर घातल्याने भावनांचा एवढा क्षोभ होत असेल तर तो आपला दोष आहे असे मला वाटते. गणपती दूध पितो, रडतो असल्या भाकडकथा/अंधश्रद्धा आणि स्वेटर घालणे ह्यात फरक आहे.
एक उदाहरण देतो - निरांजनात किंवा समईत एकच वात लावू नये दोन वाती लावाव्यात असे म्हणतात. आता असे का म्हणतात? हे कुणी ठरवले? ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा वाद आपण आपल्या आजीबरोबर किंवा घरातल्या कोणा वडिलधार्या बरोबर घालून त्यांना पटवून दिले की एकच वात लावण्याने काही बिघडत नाही तर ते चूक का बरोबर? माझ्यामते चूक. कारण ह्या ठिकाणी भावनांचा प्रश्न आहे आणि दुसर्या कोणाचे नुकसान नाहीये. एका ऐवजी दोन वाती लावून त्यांना समाधान मिळत असेल आणि श्रद्धेला तडा जात नसेल तर ते गैर नाही.
पण ह्याच आजीने जर खूप रडणार्या छोट्या बाळाला फक्त देवाचा अंगारा लाव, रामरक्षा म्हण आणि डॉक्टरकडे नेऊ नकोस असे सांगितले तर मात्र आपल्याला रामरक्षा म्हणून, अंगारा लावून झाल्यावर आजीची समजूत काढावी लागेल की डॉक्टरांकडे नेणे कसे गरजेचे आहे.
हा तोल साधणे हेच अवघड असते.
लोकांना नादाला लावून त्यांच्याकडून पैसे उकळणे, फसवाफसवी, बुवाबाजी असले प्रकार हे गैरच. स्वेटर खेरीज अन्य कपडेही का घालावेत मग बाप्पाला? तेही कापड दान करा की. पण अशा गोष्टीने प्रश्न सुटत नाहीत.
भारतासारख्या गरीब देशाला अवकाशसंशोधन आणि उपग्रह सोडण्याचे खर्च परवडतात का? त्याऐवजी शेतीत, जलसंधारणातच का खर्च करत नाहीत असे म्हणण्यासारखे आहे. दोन्ही गोष्टींचे महत्त्व आहे त्या परस्परपूरक आहेत. एक थांबवून दुसर्याचे भले होणार नाही. तारतम्य मात्र गरजेचे आहे.
चतुरंग
मुर्तीबद्दल विचाराल तर कै खास वाटलं णाही ..
पण प्रतिक्रीया वाचूणच अंमळ करमणून झाली ... काय काय डेंजर प्रतिक्रिया आहेत .. आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली ..
चालू द्या भो ..
- टारझन उर्फ गणेश
एक एक डेंजर प्रतिक्रिया पाहिल्या आणि टरकलोच. साम्यवाद काय, सगुण भक्ती काय, बाप्पा! लोकांना कामाला लाव रे. एखाद्या बंडल विषयावर पानभर प्रतिसाद देण्याचा वेळ का देतोस यांना. काही नसेल तर स्वेटर तरी विणायला लाव रे.
आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली ..
अगदी सहमत! कधी ६४० शब्द. कधी ६०५ शब्द :):)
() धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बापरे, किती गहजब एवढ्याश्या स्वेटर वरून.. !
पूर्वी उन्हाळ्यात चंदन लावायचे मुर्तीला, तेव्हा असा विरोध कधीच ऐकला नव्हता..! लोकर नक्कीच चंदनापेक्षा स्वस्त असेल..
मला व्यक्तिश: डॉन आणि तशी भुमिका घेणार्यांचे सर्व मुद्दे पटले, पण इथे नाहीत.. इथे त्याचा काहीच संबंध नाहीए असं वाटलं...
मुक्तसुनित, चित्रा यांचे प्रतिसाद पटले,आवडले..
(आणि थंडीमधे स्वेटर तर उन्हाळ्यात स्विमिंग सूट, बर्म्युडा का? किंवा सोन्याचा स्वेटर इत्यादी गोष्टी प्रामाणिकपणे बोलायचं तर हास्यास्पद वाटल्या!)
बाप्पा गोड दिसतोय.. गणपतीचे कुठलेही रूप लोभसवाणे वाटतेच..
बाकी चालूदे..
http://bhagyashreee.blogspot.com/
मुक्तसुनीतजी, मी प्रथम प्रतिसाद गमतीतच लिहिला होता, त्यावर तुमच्या मापाचा स्वेटर विणू का हे लिहायची काही गरज होती असे वाटत नाही - उद्धट आणि उर्मट वाटले, म्हणून पुढचे उत्तर गेले. मघाशी जेह्वा तो प्रतिसाद आला तेहवच तुम्ही टोकायला हवे होतेत, असे वाटते. तुम्हाला व्यनि केलेला आहेच.
मी पण तुम्हाला अगदी गमतीतच म्हटले होते. तुमची मापे काढण्याचा माझा काहीही हेतू नव्हता. माझ्याकडून चूकिचा शब्द गेला असेल तर माफी मगतो पण तुम्ही उगीच माझ्यामागे लागला नसता तर मि तुम्हाला ऊत्तर लिहीलं नसतं आणि मला का टोकायचं, मी नवा आहे म्हणुन? तुमचा प्रतिसाद मला दिलेला चालतो. माझा चालत नाही. मला स्वप्नात वाटलं नव्हतं की आधी कळ काढून तुम्ही वर माझीच तक्रार कराल.
आमच्या घरी कृष्णबाप्पा स्विमिंग सूट घालतो, छान छान कंफर्टर्स ओढतो आणि टाय घालून सिंड्रेलाच्या डान्सपार्टीलाही जातो. आता स्वेटरपण घालायला लागेल.
- गदाधर एकलव्य
गणपतीला गुलाबी स्वेटर बघुन कसेसेच वाटले. निदान निळा तरी घालायचा. :) तसा बाप्पा कश्यातही गोड दिसतो पण दुध, तुपाने अभिषेक करने आणी स्वेटर घालने ह्यात फरक आहे.
न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च
एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम
समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति
शुध्दं परमात्मरुपम
निदान ह्याचा तरी विचार व्ह्यायला हवा होता.
न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च
एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम
समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति
शुध्दं परमात्मरुपम
मले काय सूदिक कळले नाय
(प्राकृत) अभिरत
भिकार्याना भिक दिली तर भिकार्याची संख्या कमी होईल का?त्याच्यात आर्थिक सुधारणा घडुन येईल का? किमान गणपतीला स्वेटर कसा दिसतो हे बघायला येणार्या वर्दळीमुळे भिकार्यांच्या कमाईत वाढ झाली असावी.
गणपतीबाप्पा मोरया.
वेताळ
या गणपति स्वेटर आणी समाजोद्धाराएक सान्गावेसे वाटले.
हैदराबाद जवळ असलेल्या चिल्कुर बालाजि मन्दिरामधे दर शुक्रवारि आणी शनिवारि भक्तानि खादिचे कपडे घालणे मन्दिर विश्वस्तानि जरुरि केले. त्यामागे कारण म्हणजे खादि कामागाराना काम मिळावे हा हेतु. याला म्हणतात भक्तिचा योग्य ऊपयोग.
-पहाटवारा
प्रतिक्रिया
१+
In reply to बाप्पा by यशोधरा
फारच गोड
फोटो पाहिला आणि हसू आलं..
कळले नाही
+१
In reply to कळले नाही by चित्रा
चित्राताई
In reply to कळले नाही by चित्रा
मस्त
In reply to कळले नाही by चित्रा
हे कळेल का
In reply to कळले नाही by चित्रा
अवांतर
In reply to हे कळेल का by बट्टू
देवा यांना क्षमा कर !
सर, देव आणि
In reply to देवा यांना क्षमा कर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथे नव्हे हो !
In reply to सर, देव आणि by अवलिया
कारण, हे
In reply to इथे नव्हे हो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोक्षमोक्ष
In reply to देवा यांना क्षमा कर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवाला रिटायर करा ?
In reply to सोक्षमोक्ष by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
बाप्पा गोड दिसताहेत!
मुर्तीबद्
प्रश्न मूळ
In reply to मुर्तीबद् by टारझन
हो रे!
In reply to मुर्तीबद् by टारझन
कधी ६४० शब्द, कधी ६०५ शब्द
In reply to मुर्तीबद् by टारझन
आवाहन
बापरे,
मुक्तसुनी
ताई, माई, आक्का
In reply to मुक्तसुनी by यशोधरा
नाइलाज
In reply to मुक्तसुनी by यशोधरा
गणपती बाप्पा मोरया!
अरेरे
झेपला नाय
In reply to अरेरे by केदार
बापरे
वरील सर्वाशी सहमत
भक्ति आणी समाजसेवा