मला कुठे मरायचं आहे?
मला कुठे मरायचं आहे?
जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला.
आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत.
मी असेच गेले काही वर्ष ती शांती ज्यात अनंताच समाधान दडलाय, तिचा शोधत बराच फिरलो. मंदिर, मस्जीदी, गिरिजाघर, डोंगर, दर्या , नदीतीरी तर कधी समुद्र किनारी... पण एका छोट्याशा जागेने माझा मन हेरलं... रामेश्वरम... जिथे रामाचा महादेव राहतो...
रामेश्वरम, एक छोटासा गाव, 100 उंबर्यांच पण नसाव, पण तिथे गेल्या पासून एक वेगळीच शांतात मनाला लाभली आहे. तिथले राहणीमान, सागर किनारा, मंदिरे, इतकाच काय तर धनुष्कोडीचे निर्जन भग्न अवशेष देखील एका शांततेची आणि निर्मलतेची जाणीव करून देतात. तिथल्या वातावरणात एक तृप्ती, एक संपूर्णता, एक समाधान आहे.
उंच उंच नारळाची झाडे आणि सोबतीला काही रानातली छोटी झुडपे. पक्ष्यांचा किल-किलट. मंदिरातल्या घंटांचा नाद आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला समुद्राचा अखंड खळ्खळाट. तिथे जेव्हा जेव्हा मी गेलो, प्रत्येक वेळी मला समाधानाची अनुभूती मिळाली. असा वाटला कि जर मला कुठे आराम मिळेल, समाधान मिळेल तर ते इथेच.
तिथे गेल्यापासून सारखा तिथे जाण्याची एक ओढ लागली आहे. त्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात शेवटचा श्वास घ्यावा अशी इच्छा आहे. जन्म आणि मृत्यू जरी माझा हातात नसले तरी पण कुठे मरावं हे माझा हातात आहे. माझा समाधान आणि समाधी रामेश्वरमला असावी हिच इच्छा आहे.
तुमचं समाधान कुठे आहे?
याद्या
4375
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
आम्हाला जगण्यातच समाधान वाटतं
ष ट कaa र
मृत्यू बद्दल चिंतन करावे तेवढे थोडेच आहे....
वाह!!!!
In reply to मृत्यू बद्दल चिंतन करावे तेवढे थोडेच आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
पक्षीराज गरूडाने एकदा एका
In reply to मृत्यू बद्दल चिंतन करावे तेवढे थोडेच आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
___/\___
In reply to पक्षीराज गरूडाने एकदा एका by बोका-ए-आझम
माझ्या या कवितेची आठवण झाली
स्कायफॉल मधे बॉण्डचा बंगला
मरायचा विचार नाहीये सध्या ,
मरायचा विचार नाहीये सध्या , पण अशा एखाद्या ठिकाणी घर बांधून भरभरून जगायला खूप आवडेल.......
हा फोटो कुठला आहे
In reply to मरायचा विचार नाहीये सध्या , by _मनश्री_
हा फोटो कुठला आहे
In reply to हा फोटो कुठला आहे by विवेक ठाकूर
Resort Ekaant The Retreat Address: Village Dasve, Post Mose Budruk, Via Panshet, Taluka Mulshi, Lavasa, Maharashtra 412112 Phone:020 6798 3000
प्रचंड धन्यवाद !
In reply to हा फोटो कुठला आहे by _मनश्री_
मरायचं कुठे हा प्रश्न दुय्यम आहे कारण ते कुठेही येऊ शकतं.
नवरा,मुलगा आणि बहीण सोबत
मी मरणारच नै ज्जा...शक्य
अरे हो..अवयव दान कसं करता
In reply to मी मरणारच नै ज्जा...शक्य by टवाळ कार्टा
डोळे, किडनी, हृदय इतके दान
In reply to अरे हो..अवयव दान कसं करता by पिलीयन रायडर
खालच्या आणि इतर संस्थळांवरून
In reply to अरे हो..अवयव दान कसं करता by पिलीयन रायडर
छान विचार.
In reply to मी मरणारच नै ज्जा...शक्य by टवाळ कार्टा
मरण
क्षणाक्षणास मरतो आपण