Skip to main content

मला कुठे मरायचं आहे?

मला कुठे मरायचं आहे?

Published on 14/02/2016 - 07:08 प्रकाशित मुखपृष्ठ
मला कुठे मरायचं आहे? जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला. आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत. मी असेच गेले काही वर्ष ती शांती ज्यात अनंताच समाधान दडलाय, तिचा शोधत बराच फिरलो. मंदिर, मस्जीदी, गिरिजाघर, डोंगर, दर्या , नदीतीरी तर कधी समुद्र किनारी... पण एका छोट्याशा जागेने माझा मन हेरलं... रामेश्वरम... जिथे रामाचा महादेव राहतो... रामेश्वरम, एक छोटासा गाव, 100 उंबर्यांच पण नसाव, पण तिथे गेल्या पासून एक वेगळीच शांतात मनाला लाभली आहे. तिथले राहणीमान, सागर किनारा, मंदिरे, इतकाच काय तर धनुष्कोडीचे निर्जन भग्न अवशेष देखील एका शांततेची आणि निर्मलतेची जाणीव करून देतात. तिथल्या वातावरणात एक तृप्ती, एक संपूर्णता, एक समाधान आहे. उंच उंच नारळाची झाडे आणि सोबतीला काही रानातली छोटी झुडपे. पक्ष्यांचा किल-किलट. मंदिरातल्या घंटांचा नाद आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला समुद्राचा अखंड खळ्खळाट. तिथे जेव्हा जेव्हा मी गेलो, प्रत्येक वेळी मला समाधानाची अनुभूती मिळाली. असा वाटला कि जर मला कुठे आराम मिळेल, समाधान मिळेल तर ते इथेच. तिथे गेल्यापासून सारखा तिथे जाण्याची एक ओढ लागली आहे. त्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात शेवटचा श्वास घ्यावा अशी इच्छा आहे. जन्म आणि मृत्यू जरी माझा हातात नसले तरी पण कुठे मरावं हे माझा हातात आहे. माझा समाधान आणि समाधी रामेश्वरमला असावी हिच इच्छा आहे. तुमचं समाधान कुठे आहे?
लेखनप्रकार

याद्या 4375
प्रतिक्रिया 21
मृत्यू हे एका अटळ सत्य आहे. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्युला सामोरे जायचे आहेच. मृत्यू म्हणजे विनाश की मृत्यू म्हणजे नवजीवन या बद्दल अनेक प्रवाद ऐकायला मिळतात. पण त्या वादात पाडण्यात काही अर्थ नाही. अमुक एक जागा सुंदर आहे किंवा अमुक एक जागा फारच घाणेरडी आहे असे वाटणे मनाच्या त्या त्या वेळेच्या आवस्थेवर अवलंबुन असते. आज मला जे सुरेख सुंदर वाटते ते उद्या वाटेलच याची कोणतीही शाश्वती नाही. लान्स नायक हनुमंतप्पांचे ९ साथीदार सियाचीनच्या बर्फात शहिद झाले. पण हनुमंतप्पांवर मात्र दिल्लीमध्ये मृत्यूने झडप घातली. कुठे आणि कसे मरण यावं हे खरोखर आपल्या हातात नसते याची मला पूर्ण जाणीव आहे. पण जेव्हा केव्हा मला मरण येईल तेव्हा मला हसतमुखाने, निर्भयपणे, शांतचित्ताने त्याला सामोरे जाता यावे हीच एक इच्छा आहे. तो रावडी राठोड मधला अक्षय कुमार म्हणतो ना तसे काहीतरी. मृत्यू कधी येईल याची शाश्र्वती नसल्याने येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा प्रयत्न करत रहाणे एवढेच आपल्या हातात असते. (अर्थात असे करणे मला पूर्णपणे जमलेले नाही हे देखिल मी कबुल करतो. पण मरायच्या आधी क्षणभर का होईना असे जगता यावे ही माझी अतीव इच्छा आहे.) (प्रत्येक क्षणी मृत्यूच्या अधिक जवळ जाणारा) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पक्षीराज गरूडाने एकदा एका चिमणीच्या छोट्या पिल्लाला थरथर कापताना पाहिलं. त्या पिल्लाला अक्राळविक्राळ यमदूतांची भीती वाटत होती. त्याची दया येऊन गरूडाने त्याला हिमालयात नेऊन ठेवलं. " हे एक बरं झालं पक्षीराज, " यम म्हणाला, " त्या पिल्लाचा मृत्यू हिमालयात लिहिलेला होता. ते तिथं कसं जाणार हीच मला चिंता होती.

माझ्या या कवितेची आठवण झाली ............ फ़क्त गाडी ती बदलीत या गाडीतून त्या गाडित पुन्हा एकदा तोच प्रवास तोच मार्ग शोधण्याचा ........................मृत्युस.

स्कायफॉल मधे बॉण्डचा बंगला दाखवलाय बघा त्याच नावाचा, स्कॉटिश हायलँड मधे, तश्या ठिकाणी हातात स्कॉच असताना मरण आलेले आवडेल. किंवा लॉर्ड ऑफ़ दी रिंग्स मधे शायर आहे तसल्या एखाद्या ठिकाणी "A mug of beer inside this tool" गाता गाताच मरण आलेले आवडेल

नवरा,मुलगा आणि बहीण सोबत असताना.. कुणालाही आर्थिक ,शाररिक आणि मानसिक ताण न देता.. शांतपणे.. हे असेल तर "कुठे"ला महत्व रहात नाही.

In reply to by पिलीयन रायडर

खालच्या आणि इतर संस्थळांवरून माहिती घेऊन (नुसती माहिती वाचून नाही तर त्यांच्याकडून सर्व शंकांचे निरसन करून घेऊन मगच) योग्य तो निर्णय घ्यावा... http://timesofindia.indiatimes.com/aboutorgandonation.cms http://donatelifeindia.org/ http://www.organindia.org/ अजूनही बरीच संस्थळे आहेत. पण यांच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. नाव नोंदणी शक्यतो आपल्या राहत्या ठिकाणाजवळील केंद्रात करावी. याशिवाय दात्याच्या मृत्युच्या वेळी जवळ असू शकणार्‍या सर्व नातेवाईकांना अवयव/शरीरदानाच्या नोंदणीची व कोणाला संपर्क करावा याची माहिती असावी, म्हणजे ते त्वरीत जवळच्या केंद्राशी संपर्क करू शकतील. कारण मृत्युनंतर जितक्या लवकर अवयव काढून साठवले जातील तितकी त्यांच्या वापराची शक्यता जास्त असते. उशीर झाल्यास शरीर/अवयवदान शक्य होत नाही (उपयोगी नसते). इतर सखोल माहिती नाव नोंदण्याच्या अगोदर केंद्रातील तज्ञ देतीलच.

सुरवातीच्या परिच्छेदात मरायचे की मारायचे याचा टंकीय घोटाळा झाला आहे, पण तो सर्वांनी समजून घेतला आहे, तसेच चिरशांती च्या बाबतीतही कोणीही चिर्र केलं नाहीये, कारण विषयच गंभीर आहे. माझं ऐकाल तर, मरणाचा विचार डोक्यांतून काढून टाका. ते यायचं तेंव्हा मांजराच्या पावलाने येईल. या सुंदर वसुंधरेवर, तुम्हाला जिथे शांत वाटेल तिथे रहा आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवा, आपोआपच चिरविश्रांती मिळेल. मला कुठे मरायचं आहे याचा शोध घेण्यापेक्षा, मला कुठे मरायचं आहे, मला तर जगायचं आहे, असे मनावर ठसवा.

एनिग्मा, असं बघा की आपला देह चालू आहे तो चयापचय क्रियेमुळे. या क्रियांमुळे शरीराचं ज्वलन होतं. तुम्हाला भूक लागते ती शरीराचा काही भाग जळून गेल्यामुळेच. ही जी ज्वलनप्रक्रिया आहे ती चालवणारा नियंता म्हणजे मृत्यू. तर मृत्यू म्हणजे शरीरास प्राप्त होणारी कसलीशी भविष्यकालीन परकी अवस्था नसून क्षणोक्षणी आपल्या अगदी सोबत राहणारा आहे. या मृत्यूमुळेच आपल्याला जीवन जगता येतं. तर मग याच संदर्भात तुमच्या अनुभवाचा विचार करून पाहतो. तुम्हाला रामेश्वरम आणि धनुष्कोटीत जी शांतीतृप्ती सापडते ती तुम्हाला बसल्याजागी मिळाली तर काय वाईट आहे? तसंही पाहता जो अनुभव जिवंतपणी येतोय तो मेल्यावर येईलच याची खात्री नाही. आ.न., -गा.पै.