✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मामलेदार मिसळ पंढरी

म
मीउमेश यांनी
Tue, 02/09/2016 - 13:00  ·  लेख
लेख
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
33890 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ

शान्तिप्रिय
Tue, 02/09/2016 - 14:45 नवीन
भावना कल्लोळ ठाणे रेल्वे स्टेशन पासुन अगदी चालत्या अंतरावर आहे. कोणालाही विचारा दुकानापर्यंत आणून सोडतील. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

मामिचा पत्ता

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/09/2016 - 14:48 नवीन
बाजारपेठ ठाणे, जिल्हा परीषद कार्यालयासमोर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:49 नवीन
ठाणे पश्चिम स्टेशन जवळच चालत ५-७ मिनिट अंतरावर आहे मामलेदार हाच मोठा लेन्दमार्क आहे मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर ? : अवांतर : हा अपमान आहे , ठाण्यात कुणालाही विचार नेउन सोडेल तिकडे…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 14:34 नवीन
मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी सगळ्या मिसळ बळेबळेच्या कॉप्या... त्याही धड नाही. ;-) खालील उतारा मी लिहिला नाही पण महाराष्ट्रात धा ठिकाणी खाल्ल्यावर हे खूपच पटलं: नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया ऐवजी मिसळ कॅपिटल ऑफ द वर्ल्ड घोषित करावे अशी माझी सरकार कडे मागणी आहे ,आणि नाशिककरना वाईन पेक्षा मिसळ जास्त भारी बनवता येते यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरात मिसळ बनते पण त्यानी मिसळ कशी बनवावी हे नाशिकला येउन शिकून घ्यायला हवे . पुण्यात मला एकदा मिसळ मध्ये बेदाणा लागला होता , कडेलोटाची शिक्षा असती तर मी त्या हॉटेल मालकाला लोटून दिला असता . फरसाण आणि कांद्याचा चिखल उसळीत कालवण्याला काही शहरात मिसळ म्हणतात ,त्यांची मला दया येते. डायट मिसळ नावाचा एक बोगस पदार्थ मी एकदा खाल्ला होता हे मी मान खाली घालून कबूल करतो , परत हा गुन्हा मी करणार नाही , क्यालरी मोजून घाबरत घाबरत खायचा हा पदार्थच नाही . मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे , ही असली तर्री आपण खाल्ली तर काय परिणाम होईल असले भेकड विचार ज्यांच्या मनात येतात त्यांनी दह्यात बुडवून ढोकळा खावा, मिसळ नाही . छोट्या वाटीत वेगळी “तर्री ” देतो तो मुरलेला नाशिककर मिसळवाला नाही, खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो . तर्री वाढण्यात कंजूसपणा करणारा आणि त्याचे extra पैसे मागणारा हा नीच माणूस असतो , तो नाशिककर असू शकत नाही …. रस्सा आणि तर्री यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांना नाशिकचे रेशन कार्ड मिळत नाही . मिसळ ही नाशिकची कुंभमेळ्या पेक्षा जास्त उदात्त ओळख असायला खरतर काहीच हरकत नाही पण मिसळीसाठी केंद्राचा निधी येत नाही आणि कुंभमेळ्यासाठी येतो म्हणून ठेकेदार आजही नाशिकला “मिसळ ग्राम” ऐवजी कुंभग्राम म्हणतात . नाशिकचा विकास आराखडा बनवताना Special Economic Zone (SEZ ) सारखे Special Misal Zone (SMZ ) सरकारने बनवायला हवेत . Readymix , Precook मिसळीच्या निर्यातीसाठी विशेष चालना द्यायला हवी . जगभरात राहणार्या भारतीयांची मोठीच सोय त्यामुळे होईल . Global Misal Festival नाशिक मध्ये साजरा केला जायला हवा . देखण्या models आपल्या हाताने मिसळीसाठी भराभर कांदा कापताहेत आणि त्यातल्या काही प्रेमाने तर्री वाढताहेत असले काहीतरी त्या फेस्टीवल असायला काहीच हरकत नाही . शालेय पोषण आहारात बेचव खिचडी ऐवजी मिसळ पाव दिला तर पोर जास्त आनंदाने शाळेत जातील आणि खातील , फक्त मिसळ नाशिकची हवी .अमुक एक गुन्हा केला तर आयुष्यभर मिसळ खाता येणार नाही अशी जर शिक्षा ठेवली तर नाशिककर तो गुन्हा कधीच करणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे . अनेक भुक्कड लोकांना पद्म पुरस्कार मिळताना मी पाहतो , मिसळ बनवण्याची अभिजात कला ज्यांनी टीकवून ठेवली आहे त्या एकाही नाशिककर मिसळवाल्याला अद्याप पद्मश्री मिळू नये याची मला खंत आहे . (मंदार भरडे -की भारदे?- यांच्या ब्लॉगपोस्टवरुन साभार)
  • Log in or register to post comments

अर्थात अण्णा! १०१% सहमत!

बोका-ए-आझम
Tue, 02/09/2016 - 14:46 नवीन
मखमलाबादची रामभाऊ पिंगळ्यांची काळा मसालावाली झणझणीत मिसळ आणि नदीजवळची समर्थ कोल्ड्रिंक्सजवळची एक मिसळ (नाव विसरलो. मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत)या दोन्हीही अफाट. मामलेदार असते झणझणीत पण कधीकधी नुसताच तिखटपणा असतो असं वाटतं. पु.लं. कडून वाक्य उधार घेऊन म्हणतो - या मिसळींनी नाशिकच्या वाईनला जी झणझणीत साथ दिली ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या आसमानात पोचवून आली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मिसळ जबराट असल्यामुळे नाव

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 15:11 नवीन
मिसळ जबराट असल्यामुळे नाव वगैरे फालतू तपशील लक्षात राहात नाहीत >> अगदी अगदी. माझाही हाच प्रॉब्लेम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

वावी

पगला गजोधर
Tue, 02/09/2016 - 17:22 नवीन
नाशिककडून सिन्नरमार्गे शिर्डीकडे जाताना कदाचित, वावी इथे बाजारपेठेतील टपरीवर, श्याम्पल रस्सा शेव पाव मिसळ खाल्ली, अतिशय शिम्पल पण तरीही चविष्ट होती…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

राम भाऊ ची मिसळ.... नाव

रषातु
Sat, 02/13/2016 - 13:09 नवीन
राम भाऊ ची मिसळ.... नाव आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

राम भाऊ ची मिसळ.... नाव

रषातु
Sat, 02/13/2016 - 13:10 नवीन
राम भाऊ ची मिसळ.... नाव आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप

मृत्युन्जय
Tue, 02/09/2016 - 14:48 नवीन
ते म्मिसळीच प्रॉपर हॉटेल टाइप काहितरी आहे ना नाशकात? तिथे मिसळीबरोबर पापड वगैरे असा सरंजाम असतो आणि मिसळ काहितरी ९० का १०० रुपयाला आहे. कुठले हॉटेले ते? बादवे एका दर्दी मिसळप्रेमीने सांगितल्याप्रमाणे एकदा खाण्यासाठी नाशकातली मिसळ चांगली वाटते पण काही खास असे नाही. सांगणारा पुणेकर होता आणि बेडेकरच्या प्रेमात आहे हे नमूद केले पाहिजे. याच माणसाने हे पण मान्य केले की बेडेकर पुणेकरांना सोडुन इतरांना आवडत नाही तसेच असावे हे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अशी बरीच हॉटेलं आहेत.

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 15:22 नवीन
अशी बरीच हॉटेलं आहेत. मिसळीबरोबर नागली-नाचणीचा पापड, तर्री, मिसळ वेगवेगळी एक्स्ट्रा... मिसळीत घटक पदार्थपण इतके की बास... बाकी बेडेकर प्रेमींबद्दल आणि पुणेकरांबद्दल बरोबरच आहे. आमच्या अकोलेकरांनाही पानीपुरी आणि बर्फाचा गोळा अकोल्यातल्याशिवाय कोणाचाच चांगला वाटत नाही. नॉस्टेल्जिक टैप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बर्फाचा गोळा

होबासराव
Tue, 02/09/2016 - 15:26 नवीन
रंग्गीन गोला :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बावा आम्ही नवा मोबाइल घेतला

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 17:51 नवीन
बावा आम्ही नवा मोबाइल घेतला होता ११०० नोकियाचा तवा जब जब नंबरं जमा करत जाओ!! आमचा एक गोलेवाला होता "टोपी" ओरिजिनल जौनपुर चा मुसलमान त्याले बी देल्ता नंबर!! गड़ी जवा जवा फोन करत जाय मस्त स्क्रीन वर "गोलेवाला कॉलिंग" दिसे!! अजुनगी हाय वाटते जित्ता थो!! आम्ही यक रुपयांचा गोला खात जाओ अन इतर कारमेल मधील मारवाड्याईचे लेकरं दहा दहा च्या आइस डिस खात बापा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

आकोलेकी पाणीपुरी

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/09/2016 - 16:21 नवीन
आकोलेकी पाणीपुरी बोलेतो एक नंबर भो …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बास बास. एकदम!

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 16:37 नवीन
बास बास. एकदम! फक्त एक करा पावनेबॉ (पंत या अर्थाने), ते पाणीपुरी नाही, पा'नी'पुरीच म्हणायचं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

पावनेबॉ (पंत या अर्थाने)

होबासराव
Tue, 02/09/2016 - 16:40 नवीन
सोयरे-धायरेच हाव ना हो आपन सारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बापुसायेब सांगत होते ना हो की

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 16:41 नवीन
बापुसायेब सांगत होते ना हो की अनिरुद्धबॉची सासुरवाळी हाये आकोल्याले... मंग आपले पावनेबॉ नैत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

आत्ता हाय मि बि थेच त म्हनुन राय्ल्तो

होबासराव
Tue, 02/09/2016 - 16:46 नवीन
सांगा मंग पावनेबॉ (अनिरुध्दराव)* कई हाय नेक्श्ट अकोला वारी ? * आम्च्या अथि जावयाले राव लावाच लागते, आन अहो-काहो कराच लागते...जावयाले अरे कारे हे नागपुर फॅशन होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

स्वारी बर

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/09/2016 - 17:33 नवीन
अर्र स्वारी बरका … आतापासन पानीपुरीस. मार्चमध्ये चक्कर होईल मोस्टली. पन राव नका लाउ भो … आपन पयले मिपावाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

आता नाशकात आलो की...

मुक्त विहारि
Tue, 02/09/2016 - 14:52 नवीन
मिपा कट्टा, नाशकातल्या मिसळी बरोबर करू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कधीपासून वाट बघतोय तुमची

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 15:11 नवीन
कधीपासून वाट बघतोय तुमची कृपादृष्टी नाशिककडे वळण्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

माफ करा

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:56 नवीन
मी जिकडे जातो तिकडची मिसळ हमखास खातोच बर्याच ठिकाणी शहरात, गावा - खेड्यातली मिसळ खाल्ली आहे नाशिक ची मिसळ इतकीशी नाही आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कुठे आणि कधी खाल्ली ते

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 15:09 नवीन
कुठे आणि कधी खाल्ली ते महत्त्वाचे. आजकाल मिसळीच्या नावावर कोणीही सोम्यागोम्या दुकानं टाकायला लागलेत. असे झटके मीही सुरुवातीला खाल्ले. माझेही हेच मत होते. माझा मेहुणा एवढा का तुड तुड उडतो नाशिकच्या मिसळीवर ते मला काही कळेना. नंतर चित्र बदलले! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

हे वाचा. मग नाशिकची मिसळ असं का म्हणतात ते कळेल!

बोका-ए-आझम
Tue, 02/09/2016 - 15:40 नवीन
http://www.misalpav.com/node/20565
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

आठवणिंनी मन भरुन आलं.

भुमन्यु
Tue, 02/09/2016 - 21:45 नवीन
आठवणिंनी मन भरुन आलं. पोटापाण्यासाठी नासिक सुटलं आणि चांगल्या मिसळ पण. कॉलेजात असतांना सकाळी ७ - ७३० ला पण विहार किंवा श्यामसुंदर ला हजेरी लावायचो. नाही तर एच.पी.टी. च्या हिरव्या कँटीनला (२००२-०७) (जिमखान्या जवळ) रतीब लावलेलाच होता. पॉकेट मनी कमी असायमग, मग ३ मिसळ मागऊन त्यात ५ जण तृप्त होईपर्यंत पाव आणि तर्री मागवायचो. आता साधनाच्या चुलिवरच्या मिसळीबद्दल ऐकलंय. बघु कधी जम्तंय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+++११११

अभिदेश
Tue, 02/09/2016 - 23:21 नवीन
नाशिकला विन्जिनीरिन्गला असताना सकाळि तुशार (college road) आणि सन्ध्याकाळी अम्बिका (पन्चवटी)हा ठरलेला कार्यक्रम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लढ बाप्पू

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:34 नवीन
लढ बाप्पू
  • Log in or register to post comments

मामलेदार ची मिसळ नंबर १.

शान्तिप्रिय
Tue, 02/09/2016 - 14:35 नवीन
मामलेदार ची मिसळ नंबर १. जगात भारी मामलेदारची मिसळ ठाणेरी! (जगात भारी कोल्हापुरी (अख्खा मसुर) च्या तालावर!)
  • Log in or register to post comments

मापं हे आमचे खास मित्र असले

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 14:56 नवीन
मापं हे आमचे खास मित्र असले तरी मामलेदाराची मिसळ तेवढी खास नै. दोनतीन वेळा शनिवार असलेने खायचा योग हुकलेला पण एकदा खाल्लीच. अगदी बोगस म्हणले तरी चालेल. जेवढे कौतुक ऐकले होते त्याच्या १० टक्के सुध्दा भारीपणा आढळला नाही. कोल्हापूरची फडतरे तर लै वेळेला चाखलेली. ती एक वेळ भारी म्हणता येईल. जस्ट २ दिवसापूर्वी पंढरपूरला जाताना सोलापूरच्याच हद्दीत हायवेवर चटणीवाल्या ठेंगीलचीच ही मिसळ. Image removed. सोलापूरात तसे मिसळीचे जास्त प्रस्थ नाही. लाईन लावून हॉटेलात थांबणे हे धंदे पुणेमुंबईकरच करु जाणे. त्यामुळे मिसळीचे असे खास ठिकाण सोलापुरात नसले तरी ही मिसळ टेस्ट आणि झणझणीतपणात मामलेदाराच्या कीतीतरी उजवी होती. शिवाय आमचे सोलापुराचे स्पेशल रेट. मग काय....हाणली दाबून प्लस लिटरभर ताक. आहाहाहाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

हायला....ऐकावं ते नवलच....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 02/09/2016 - 15:35 नवीन
थोडाफार दर्जा बदलला असेल पण मामलेदारला पर्याय नाही... माझ्या मताचा फेरविचार मी करावा असं वाटत असेल तर मला इतर ठिकाणं नेऊन दाखवा.... अवांतर .....आम्ही तुमच्या सोलापूरच्या शेंगाचटणी ,दहीआणि भाकरीवर लय मरतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मापंदादा एक ठिकाण तर वर

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 15:40 नवीन
मापंदादा एक ठिकाण तर वर दाखवलेलं हाय. त्यासाठी मात्र सोलापुरात यावं लागेल. या महिन्यात निमंत्रितांच्या कट्ट्याचा प्लान चालूय. तुम्हीबी या. दुपारी दहीचटणीभाकरी नंतर संध्याकाळी मिसळ खाऊ. कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

भाक-या ज्वारीच्याच ना भाऊ?

बोका-ए-आझम
Tue, 02/09/2016 - 15:47 नवीन
नरीबाला का असंच काहीतरी नाव असतं ना त्या ज्वारीचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नरीबाला हे काय एकलेले नाय

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 15:51 नवीन
नरीबाला हे काय एकलेले नाय ब्वा. आमच्या इथल्या ज्वारीला दगडी शाळू म्हणतात. पांढर्‍या शुभ्र अन पातळ भाकर्‍या होतात एवडे माहीत. आता कडक ५/१० भाकर्‍यांचे पाकीट पण मिळते. महिनाभर टिकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

निमंत्रितांच्या ??

कपिलमुनी
Tue, 02/09/2016 - 17:00 नवीन
बॉर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माजघरातल्यांचा आहे का कट्टा?

टवाळ कार्टा
Tue, 02/09/2016 - 17:33 नवीन
माजघरातल्यांचा आहे का कट्टा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हम्म. म्हणू शकतोस. सगळे

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 17:36 नवीन
हम्म. म्हणू शकतोस. सगळे माजलेलेच हायेत. तुझा शिल्लक राहिला असेल थोडासा तर ये तू बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

:)

चांदणे संदीप
Tue, 02/09/2016 - 17:43 नवीन
निमंत्रितांच्या
मोठ्ठा ब्बोर्र!! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 23:24 नवीन
घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा ठेवायची नसती सॅन्डीबाबा. नीट पंगत वाढायला घ्यायची असती. वेगळे सांगायचे का तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मिसळ वर तर्री ओतून घेणे हे

होबासराव
Tue, 02/09/2016 - 14:44 नवीन
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे....जबरा खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो .. ह्याचा फायदा घेतलाय सप्तश्रुंगि ला...आन तर्रि आन रे बावा..वेटर कंटाळला होता.
  • Log in or register to post comments

मिसळ-पाव म्हणजे नाशिक

होबासराव
Tue, 02/09/2016 - 14:46 नवीन
मिसळ-पाव म्हणजे नाशिक पन गिल्लि-मिसळ अकोलाच.
  • Log in or register to post comments

हाव, आन पानीपुरी

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 15:24 नवीन
हाव, आन पानीपुरी जव्हारनगरचौकातली. आता सोन्याबापुंची राउतवाडी फेमस व्हयेल हाय 'पानीपुरीबाजा'इसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 17:55 नवीन
अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक प्रेमळ शब्द "फुग्गे" (फुगे नाही फुग्गेच) इचीभन काय पोट्टे हात राजेहो तुम्ही!! सायची आता मधुची गिल्ली मिसळ संग छटाकभर कलाकंद कुकुन आना अटीसा!! हट्ट बटे!! बेकार हाय हे!! डांगेब्वा, फुग्गे तर सर्व्यात ख़ास भेटते राजेश्वर मंदिरा म्हावरे, भीकमचंद खंडेलवालच्या कोपर्यावर एक निरानाम कयकला फुगेवाला सकाऊन हुबा राह्यत जाय, पका भाऊ म्हणत त्याले सारे! सायचा वल्ला लसुन अन अदरकचं पानी बनवे! लोकाइले त्याचं एडिक्शन झालतं माणसे सकायटायमाले पैले तोंडी ब्रस धरून तटी येत फुगे खात मंग प्रेशर आलं का घरी पयत जात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फुग्गेच! :))

संदीप डांगे
Tue, 02/09/2016 - 20:06 नवीन
फुग्गेच! :)) आमी नाय बॉ गेलो कंदी इतल्यादूर. राजेश्वर मंदिराजोळची किर्ती आयकेल हाय फकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 14:51 नवीन
मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही ? काही कमी प्रसिद्ध ठिकाणे - लोहगावला "राहुल" म्हणून एक हॉटेल आहे. इथली मिसळ एक वेगळंच प्रकरण आहे. केवळ तिखट सॕंपल आणी जाड शेव- पापडी ! सोबत पाव . पहिलाच घास घ्याल अन् नाका तोंडातून पाणी गॕरंटिड! चव प्रत्येकाला आवडेलच असं नाही. पण पट्टीच्या मिसळभोक्त्याला आवडणारच. बाकी इथला चहा पण मस्त असतो. लोहगावातच थोड पुढे एक "तुकाराम" नावाची साधी खानावळ आहे तिथेही मिसळ चांगली असते. पण तेथील वडा सॕंपल मिसळपेक्षा भारी. सांगवीत "निसर्ग"ची एक शाखा आहे गजानन महाराज मंदिराच्या बाजूला तिथली मिसळ पण मस्त आहे. डेक्कन चे "काटाकिर्र" तर प्रसिद्धच आहे. अजूनही भरपूर आहेत वेळ मिळाला की टंकतो.
  • Log in or register to post comments

धानोरीला जकात नाक्याजवळ

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 15:09 नवीन
धानोरीला जकात नाक्याजवळ "साईतिर्थ" या नावाचे एक हॉटेल आहे. इथली मिसळ म्हणजे एका मोठ्या जेवायला असते तशा ताटात असते. त्यात एक मिसळचा बाऊल , एक तर्री कम सॕंपलची वाटी, एक दह्याची छोटी वाटी, पाव ,कांदा वगैरे सरंजाम असतो. चव पण मस्त पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पाव छान मऊ लुसलुशीत असतात.

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 15:12 नवीन
पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
लुसलुशीत ताज्या पावापेक्षा जर्रा कडक झालेले थोडेसे क्रीस्पी कडा असलेले पाव ट्राय करा मिसळीसोबत. ती मज्जा अल्लगच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

तसे पाव पण ट्राय केले (करावे

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 15:45 नवीन
तसे पाव पण ट्राय केले (करावे लागले ) पण माझी आवड म्हणजे ताजे पावच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुण्यातली मिसळ

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/09/2016 - 14:52 नवीन
आयला!! अजुन पुण्यातील काटाकिर्र्,रामनाथ पभ्रुतींची आठवण कोणी काढली नाही या धाग्यावर?? छे: पुर्वीचे मिपा राहीले नाही.
  • Log in or register to post comments

अगदी हेच लिहायचे होते.

भक्त प्रल्हाद
Tue, 02/09/2016 - 15:07 नवीन
अगदी हेच लिहायचे होते. त्यातल्या त्यात रामनाथ चा उल्लेख तरी हवाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

पुण्यातील रामनाथची मिसळ

सूक्ष्मजीव
Tue, 02/16/2016 - 18:12 नवीन
पुण्यातील रामनाथची मिसळ खाल्ली..... हॉटेलमागच्या पायरीवर भर दुपारी पन्नास मिनिटापेक्षा जास्त उभा होतो, मग नंबर लागला. वरच्या मजल्यावर गेल्यावर ऑर्डर दिली पण सगळ्यांनी ऑर्डर दिल्याशिवाय वेटर खाली गेला नाही. मग साधारण दहा मिनिटांनी खालून मिसळ वरती आली. भरीस भर म्हणून. पावांऐवजी ब्रेडच्या स्लाईस समोर आल्या. यावर अजून वरताण म्हणून समोरच्या बोर्डवर कांदा आणि सँपल चे वेगळे पैसे लागतील अशी पाटी होती. पुन्हा पाव मागवले तर ते आलेच नाहीत शेवटी कंटाळून ताक नावाचे पांढरे पाणी पिऊन परतलो. पिंपरीतली दे धक्का रामनाथपेक्षा शंभरपट भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भक्त प्रल्हाद
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा