Skip to main content

मामलेदार मिसळ पंढरी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 09/02/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34050
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान असणे हा इतका काळ पुण्याचा युएस्पी होता. आता अभिमानाच्या ठिणग्या गावोगावी पडायला लागलेल्या दिसत आहेत.

In reply to by मृत्युन्जय

ठिणग्या
?? वणवाच पेटलाय उद्या चार शेवेच्या कांड्या टाकून लाल तिखटाच पाणी दिले तरी लोक जाज्वल्य अभिमानाने मिटक्या मारत खातील

In reply to by मृत्युन्जय

हा हा, असं नै हो ते. गावोगावी ज्वालामुखी असतातच, तिथून उडून आजकाल पुण्यात ठिणग्या पडायला लागल्याने पुणेकरांना कळले की पुण्याच्या बाहेरही जग आहे. ;-) प्रत्येक शहरात जाऊन मी हा पेटंट ड्वायलाक ऐकलायः "जो इथल्या भयानक ट्रॅफिकमधे गाडी चालवील तो जगाच्या पाठिवर कुठेही बिन्दास चालवू शकतो". बोलणार्‍याने गावाच्या बाहेर कधीच पाऊल टाकलेलं नसतं हे अगदी नक्की!

In reply to by संदीप डांगे

पुणेकरांना कळले की पुण्याच्या बाहेरही जग आहे अस्सल पुणेकर नदीबाहेर पुणे मानत नाही तर पुण्याबाहेरचे जग मानेल की नाही कुणास ठाऊक. पुण्याबाहेरच्या द्विपाद प्राण्याला माणूस म्हणणे पण पुणेकरांना अवघड जाते. बात करता है ;)

मिसळ म्हणजे मा मि.. हे समीकरण इतकं पक्कं आहे.. की जाउदे.. आता ठाणेवारीची वाट पाहणे आले.. स्वाती

पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व मिसळ ट्राय कराव्या वाटालय , आमच्य कॉलेजातल्या ऊडाप्यानं मिसळीत तर्रीच्या ऐवजी सांबार नावाचा आंबट पदार्थ दिलेला, त्यावेळी जवळजवळ त्याचा खुन करायचीच ईच्छा झाली होती.

In reply to by भीमराव

करायचा किनै मग. तेवढाच पुणेकरांना सांगायला अजून एक किस्सा झाला असता. "आमच्यात किनई एकाने कटाएवजी सांबार घातले म्हणून भोसकले चक्क. ते पण उडप्याला. समजलेस काय"

In reply to by अभ्या..

अभ्या... कधी सोलापूरात आलो तर तिकडची मिसळ नक्कीच चापेन ! :) फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटले. :) बाकी पुणेकरांच्या किस्स्यात "शँपलचा" उल्लेख मात्र करायला विसरु नका ! मिसळीचे इतके पांचटीकरण फक्त पुण्यातच होउ शकते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch

In reply to by मदनबाण

येच बाणा. कॅमेरा तेवढा घेऊन ये. अजून जळवू आपण. साला आमाला फोटॉग्राफी येत नाही मग चांगला कॅमेरा कोण हाताळू देणार ;) हाय त्या मोबाईल कॅमेर्‍याने काढलेला फोटो तो. ताकाची बाटली पण दिसतीया थोडीशी बघ. ;)

ईथे एखादा वडापाव आणि मिसळीचा जॉईंट सुरु केला तर चालेल (आय मीन धंदा चालेल) का हो? साला सगळीकडे नुसते पंजाबी खायला मिळते ईंडियनच्या नावाखाली..नाहीतर डोसे/ बिसे कॉलिंग पेठकरकाका....

माझा प्राधान्यक्रमः १.पुर्वीची जनता मिसळ (पिंपरी वाघेरे ) आता बंद आणि बाद आहे कारण पहिल्यांदा माल्काने भाड्याच्या जागेतुन बाहेर काढले नंतर दुसर्या मिसळवाल्याने (आचारी/कामगार) पळवला. २.दीप्ती मिसळ्,निसर्ग मिसळ (पिंपरी पुलाजवळ गावठाण) आणि मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन) समान दुस्र्या क्रमांकावर ३.जयश्री (आकुर्डी गावठाण बजाज अ‍ॅटोसमोर)/अरिहंत (चिंचव्ड गाव ते काळेवाडी रस्त्यावरच) ४.नेवाळे (५-६ वर्षांपुर्वी पर्यंत आब राखून होती ती तोपर्यंत सुमारे १०-१२ वर्षे नियमीत खाल्ली आहे) शेवटी तिथे खाऊनही सुमारे ४-५ वर्षे झाली आहेत सध्याचे (दर्जाबाबत) माहीत नाही. पण मित्रांच्या अनुभवातून कळाले की तिखट वाढत गेले आणि रश्याचा मसाला+मटकी कमी होत गेली. त्यामुळे चवही अगदी फाफलली आहे. स्थळ गांधीपेठ चिंच्वडगाव. बाकी कोल्हापुरच्या नावाखाली पाट्या लावलेल्या खोपटांमध्ये कधी गेलो नाही जाईल असे वाटत नाही .
वरील श्रेणी ही वैयक्तीक आहे अशीच आवडली पाहिजे असा आग्रह नाही आणि जगात प्रत्येकाला भारी वाटणारी मिसळ त्याच्या त्याच्या गावातच असते.

रच्याकाने : जळगावात मामा चौकाजवळ सुमारे १८ वर्षांपुर्वी खालेल्या शेव्+ चव्दार तिखट रस्सा आणि पाव याची अजून आठवण येते खरी.

मिसळपाव्वाला वारकरी नाखुस.

In reply to by नाखु

बाकी कोल्हापुरच्या नावाखाली पाट्या लावलेल्या खोपटांमध्ये कधी गेलो नाही जाईल असे वाटत नाही .
याबद्दल तीव्र सहमती!!!

In reply to by नाखु

डी.वाय. जवळ जे निसर्ग आहे ती यांचीच शाखा का? रच्याकने, मयुरची तिसरी शाखा तिथेच समोर सुरू झालीये.

In reply to by नाखु

मोरया मंदिराजवळ बालाजी मिसळ ती पण मस्त असते. मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन)एकदा गेलो होतो पण काही खास नाही वाटली.

माझी आजी मिसळीला आंबोण म्हणायची. (प्रतिक्रिया वाचायला थांबत नाहीये. गेले पळून.)

मिसळ नामक पदार्थ ज्यात फरसाणावर तिखट पाणी टाकातात. लोक ते का खातात ते कळत नाही? लै तर वड्यावर सांबर टाकुन खावे.. असो हा प्रकार कै आवडत नाही.. रच्याकने 100 री झाली. अभिनंदन

In reply to by जेपी

जेपीभौ संभालके ! मिसळपावला नाव ठेवताल तर निषेध सभा, निषेध मोर्चे निघतील . उगाच भावी संपादक पद धोक्यात यायचं तुमचं ! हघ्या हेवेसांनलगे ;-) रच्याकने वड्यावर (बटाटा वडा, वडापाव मधे असतो तो) सांबर टाकून कसं खातात लोक काय माहीत ? सांबर सोबत खायचा तर उडीदवडा आहे ना ! अन् बटाटा वड्यावर घ्यायला सॕंपल (कट, रस्सा,तिखट पाण,) आहे ना.

In reply to by उगा काहितरीच

बटाटा वड्या सोबत सांबर अप्रतिम लागत, कुठल्याही उडपी हॉटेलात खा.. कट वड्याची वेगळी मजा असते, कधी तुळजापुरला गेलात तर खा!

१. पिंपळे गुरव बस स्टॉप कडून दापोडीकडे यायच्या रस्यावर (जगतापांच्या ओफ्फिस नन्तर) एक मिसळ वाला आहे. तो लई भारी (खुप छान हे विषेशण मिसळिला शोभत नाही ;) ) मिसळ बनवतो. २. आमच्या तळेगावात आणी गावाजवळ ३ मिसळ्वाले पण झक्कास मिसळ बनवतात. कधीतरी या, खाऊया.

In reply to by मोहनराव

बाबौ इंदोरी मधे समाधानला रस्सा वाट्या रिचवायच्या पैजा लागत आमच्या!!, त्या शिवाय थंडया मामल्यात सब्जी लसूनी!! अहाहा गेले ते दिवस

In reply to by मोहनराव

  1. पालथा
  2. चन्दू
  3. आता एक नविन कोहिनूर म्हणुन झालय भंडारा डोंगराजवळ, ते पण छान आहे.
ईकडे आलास की घेऊन जाईन.

नाव माहित नाही पण माळशेज घाट उतरताना सुरुवातीला एठ ढाबा आहे एसटी बस पण थांबतात तिथे मिसळ छान मिळते तिथे आणि आमच्या वाईमध्ये जॅाली मिसळ मस्त मिळते

मिसळभक्तांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या गावांमधील मिसळवारी जियो मिपावर आणावी असं आवाहन करतो. म्हणजे प्रवासादरम्यान इतर भाविकांनाही भेटी देता येतील. मी उदाहरण म्हणून मामलेदार मिसळ या ठिकाणाचा झेंडा पश्चिम ठाण्यात (अंदाजे) लावलेला आहे. याच (brown) रंगाचा झेंडा वापरावा म्हणजे मिसळवारी इतर स्थानांपेक्षा वेगळी उठून दिसेल. आधिक माहितीसाठी हा मूळ लेख वाचू शकाल.

मायला इतक्या ठिकाणच्या मिसळींचे उल्लेख होऊनही आख्ख्या व्होल मिपावर फेमस असलेल्या मामा मिसळीचा उल्लेख कुणी कसा नाही काढला? ह्या मिसळीचे ख़ास वैशिष्ट्य म्हणजे ती मिसळ खाण्याआधी रश्श्याच्या पातेल्यात डोकावून बघावे लागते. एखादा पट्टीचा खवय्या नुसत्या त्या डोकावण्यावरुनच मिसळ कशी आहे ते सांगू शकतो.

मा मि. ची मिसळ खाणे हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. ह्या मिसळीच्या तिखटपणाला कोणी कितीही नाव ठेवले तरी बाकीच्या मिसळी तिच्यासमोर फिक्याच . गिरगावला एका हॉटेलमध्ये मिसळीत चक्क वालाची उसळ होती,अगदीच मिळमिळीत होती चवीला. कोल्हापुरला महाल़़क्ष्मी मंदीराच्या एका गल्लीत मिसळ खाल्ली,चव शेवेच्या आमटीसारखी वाटली. मिसळीची चेष्टा करावी ती नाशिककरांनीच , पंचवटीत (नाव विसरलो) मुठभर कांदेपोहे टाकलेली मिसळ घशाखाली उतरत नव्हती. आणि हो ठाण्यातील 'आमंत्रण'मध्ये मिसळ खाण्यासाठी जाणार असाल तर एकदा तेथील 'मशरूम मसाला' टेस्ट करा. मुंबई ठाण्यात कुठेही इतका चवदार 'मशरूम मसाला' मला तरी सापडला नाही.

मिसळीचा भ्रष्ट अवतार इकडे सिंगापुरात पेशवाई मध्ये मिळतो. पण तो खाण्यापेक्षा भारतभेटीची वाट पाहाण जास्त चांगलं :(

In reply to by सर्वसामान्य

मुंबई मकान म्हणायचे आहे का तुम्हाला, पाव सोडला तर मिसळ तशी बरी असते आणि नेहमीचे पब्लिक असले कि ती अजून जबरदस्त बनते :)

महाड मध्ये बाजारपेठे येथे फडके (बहुधा तेच नाव आहे. भरपुर वेळ झाला नाही गेलो)मिसळ मीळते. मस्त असते. रात्रपाळी करुन घरी जाताना तीथे मिसळ खायची आणि घरी जाउन मस्त ताणुन द्यायचे.

इथं सातारचे इतके लोक्स असूनही कोणी अजून "माधवराव"चं नाव कसं काढलं नै हो ? अख्ख्या सातार्‍यात एकच.. फुल फेमस. गेल्या पंधरा एक वर्षात आहे तेवढाच सेटप आणि चव देखील बर्‍यापैकी तशीच आहे आणि अजूनही स्वतः माधवराव मिसळ बनवत बसलेले असतात. एक मिसळ आणि वरुन एक चहा नाहीतर लिंबू सरबत. बास्स.. :)

आयला, मिसळ पाहिली की नाशिककरांच्या तोंडाला पाणी सुटते... कधी या आमच्या नाशिकला, कौतुक करून थकाल.. आणि हो, एखाद्या हॉटेलाचं नाव सांगून आमच्या मिसळचा अपमान करणार नाही... प्रत्येक मिसळचा वेगळा ठसका आहे...

In reply to by पी महेश००७

नाशिकला आमची फेवरिट म्हणजे अंबिका मिसळ, सुरतीची कढी भेळ, शौकीनची झटका पाणीपुरी, सायंताराचे साबुदाणावडे, राउतचा डबल जीरा सोडा आणि पांडेची लस्सी. अकबर सोडा पण बरा आहे तसा.

In reply to by प्रचेतस

अकबरचा मसाला सोडा मस्त असतो. बाकी 'अंबिका'मधली मिसळ एकदाच खाल्ली आहे. मिसळीसोबत तळलेला पापड नाशकातच मिळतो बहुतेक. इतर कुठे पाहिला नाही. शाळेत असताना एकदा रविवार कारंज्यावर एका गाडीवर मिसळ खाल्ली होती. ती झकास चव अजून आठवते.

मिसळ कोल्हापुरलाच खावी, मामलेदार फामलेदार,बेडेकर येडेकर खुळचट पुणेरी व मुबंईच्या यड्याचे वाढवलेले प्रस्थ आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

मी काय म्हणतो काका; कोल्हापूरची चांगली असतेच. पण म्हणून बाकी वाईट होत नाहीत ना? मिसळ ही एक पवित्र पाककृती आहे. असं बघा, कुणाला सिद्धिविनायक पावतो, कुणाला दत्तगुरू पावतात कुणाला आणि कुणी. पण वाईट कुणीच कुणाला म्हणत नाही ना? तसंय ते. एकेकाची आवड.

नका हो नका ! नोस्टेलॅजीक का काय म्हणतात ते व्ह्यायला झालेय. तुम्ही जीथं कार पार्कींग केलीत तीथं आमचा जल्म झाला. आनि मामलेदारची मिसळ खात ल्हानाचा मोटा झालोय.. त्यामुळे आता मिसळ न खाता डोळे पाणावले.

खर्या मिसळीचे कॅरॅक्टर वेगळे असते, आजकाल लाल तिखट घालून दिलेलीइ तर्री खाउन अनेकांचा असा गैरसमज झाला आहे की मिसळ खाल्ल्याने तोंडाची आग झालीच पाहीजे.खरी मिसळ तीच जिचा तिखटपणा हवाहवासा वाटतो,तोंड भाजण्याऐवजी कानशिलं उबदार वाटायला लागतात ,डोळे धुंधावतात,प्रत्येक पुढचा घास ही अनुभूती आणखी वाढवतो.अशि अनुभूती देणारी मिसळ मी फक्त कोल्हापुरलाच खाल्ली आहे .

आज इकडचे वाचून मामलेदार ला जुनाच आलो . मिसळ चांगली होती पण इकडे सांगितली तेवढी पण जगावेगळी नव्हती ! 1 2 3 5 7

कोल्हापूर बावडा मिसळ पाव आणि चहा अतिशय उत्कृष्ट. मी पुण्याचा असूनही पुण्यातील काटाकीर , बेडेकर मिसळ विशेष आवडत नाही.

इतक्या लोकांचे मिसळपुराण वाचले.प्रत्येक टिकाणच्या मिसळीची स्वत:ची अशी खासियत असते. तशीच आमची भिवंडीची 'कंपनीची मिसळ' जुन्या अस्सल भिवंडीकरांना ही मिसळ खाल्ल्याशिवाय न्याहारी झाली असे वाटतच नसे.जोडीला दुधीहलवा आणि पुरी खाल्ले की त्रुप्त झाले. मात्र त्यासाठी सकाळी लवकर जावे लागते. सकाळी नऊ नंतर मिसळ संपलेली असते.सकाळी मित्रांबरोबर गप्पा मारत कंपनीची मिसळ खायची आणि रात्री 'निशान'मध्ये बसून चहा पित दिवसभरच्या घडामोडींवर चर्चा करणे हा भिवंडीकरांचा दिनक्रम आहे. आता भिवंडीत अनेक ठिकाणचे लोक कामासाठी आले आहेत.त्यामध्ये अस्सल भिवंडीकरांची संख्या कमी होत चालली आहे..त्यामुळे ही मिसळीची महती सांगणारे कमी होत चालले आहेत.

मुंबईत असताना मी एकदा मिसळ खाण्यासाठी म्हणून ठाण्याला गेलो होतो, भरीस भर म्हणून पुण्याहून एका मित्राला खास मिसळ खाण्यासाठी ठाण्याला बोलावले होते. त्यादिवशी नेमका रविवार होता व हॉटेल बंद होते. तेंव्हा तिथल्या काही दुकानवाल्यांनी एका हॉटेलचे (आमंत्रण की काहीतरी) नाव सांगितले, व तिथे हीच मिसळ मिळते असे सांगितले. तिथे जाऊन मिसळ खाल्ली पण आवडली नाही. :-( मालालेदार मिसळवाल्यांचे असे एखादे हॉटेल ठाण्यात आहे का? बाकी चिंचवडमधल्या नेवाळे मिसळ बद्दल कुणीच बोलले नाही........