✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मामलेदार मिसळ पंढरी

म
मीउमेश यांनी
Tue, 02/09/2016 - 13:00  ·  लेख
लेख
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
33890 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व

भीमराव
Tue, 02/09/2016 - 16:31 नवीन
पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व मिसळ ट्राय कराव्या वाटालय , आमच्य कॉलेजातल्या ऊडाप्यानं मिसळीत तर्रीच्या ऐवजी सांबार नावाचा आंबट पदार्थ दिलेला, त्यावेळी जवळजवळ त्याचा खुन करायचीच ईच्छा झाली होती.
  • Log in or register to post comments

करायचा किनै मग.

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 16:38 नवीन
करायचा किनै मग. तेवढाच पुणेकरांना सांगायला अजून एक किस्सा झाला असता. "आमच्यात किनई एकाने कटाएवजी सांबार घातले म्हणून भोसकले चक्क. ते पण उडप्याला. समजलेस काय"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

अभ्या... कधी सोलापूरात आलो तर

मदनबाण
Tue, 02/09/2016 - 18:18 नवीन
अभ्या... कधी सोलापूरात आलो तर तिकडची मिसळ नक्कीच चापेन ! :) फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटले. :) बाकी पुणेकरांच्या किस्स्यात "शँपलचा" उल्लेख मात्र करायला विसरु नका ! मिसळीचे इतके पांचटीकरण फक्त पुण्यातच होउ शकते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

येच बाणा. कॅमेरा तेवढा घेऊन

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 20:19 नवीन
येच बाणा. कॅमेरा तेवढा घेऊन ये. अजून जळवू आपण. साला आमाला फोटॉग्राफी येत नाही मग चांगला कॅमेरा कोण हाताळू देणार ;) हाय त्या मोबाईल कॅमेर्‍याने काढलेला फोटो तो. ताकाची बाटली पण दिसतीया थोडीशी बघ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बर्लिन किंवा टोरोंटो/न्युयॉर्क/लंडन

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/09/2016 - 16:34 नवीन
ईथे एखादा वडापाव आणि मिसळीचा जॉईंट सुरु केला तर चालेल (आय मीन धंदा चालेल) का हो? साला सगळीकडे नुसते पंजाबी खायला मिळते ईंडियनच्या नावाखाली..नाहीतर डोसे/ बिसे कॉलिंग पेठकरकाका....
  • Log in or register to post comments

अ‍ॅमस्टरडॅम लिहायचे राहिलेच

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/09/2016 - 16:35 नवीन
अ‍ॅमस्टरडॅम लिहायचे राहिलेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

कुणी व्हिजा देत असेल तर मी

वेल्लाभट
Tue, 02/09/2016 - 17:41 नवीन
कुणी व्हिजा देत असेल तर मी तयार आहे म्यानेज करायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

पिंचि परीसरातील

नाखु
Tue, 02/09/2016 - 16:39 नवीन
माझा प्राधान्यक्रमः १.पुर्वीची जनता मिसळ (पिंपरी वाघेरे ) आता बंद आणि बाद आहे कारण पहिल्यांदा माल्काने भाड्याच्या जागेतुन बाहेर काढले नंतर दुसर्या मिसळवाल्याने (आचारी/कामगार) पळवला. २.दीप्ती मिसळ्,निसर्ग मिसळ (पिंपरी पुलाजवळ गावठाण) आणि मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन) समान दुस्र्या क्रमांकावर ३.जयश्री (आकुर्डी गावठाण बजाज अ‍ॅटोसमोर)/अरिहंत (चिंचव्ड गाव ते काळेवाडी रस्त्यावरच) ४.नेवाळे (५-६ वर्षांपुर्वी पर्यंत आब राखून होती ती तोपर्यंत सुमारे १०-१२ वर्षे नियमीत खाल्ली आहे) शेवटी तिथे खाऊनही सुमारे ४-५ वर्षे झाली आहेत सध्याचे (दर्जाबाबत) माहीत नाही. पण मित्रांच्या अनुभवातून कळाले की तिखट वाढत गेले आणि रश्याचा मसाला+मटकी कमी होत गेली. त्यामुळे चवही अगदी फाफलली आहे. स्थळ गांधीपेठ चिंच्वडगाव. बाकी कोल्हापुरच्या नावाखाली पाट्या लावलेल्या खोपटांमध्ये कधी गेलो नाही जाईल असे वाटत नाही .
वरील श्रेणी ही वैयक्तीक आहे अशीच आवडली पाहिजे असा आग्रह नाही आणि जगात प्रत्येकाला भारी वाटणारी मिसळ त्याच्या त्याच्या गावातच असते.

रच्याकाने : जळगावात मामा चौकाजवळ सुमारे १८ वर्षांपुर्वी खालेल्या शेव्+ चव्दार तिखट रस्सा आणि पाव याची अजून आठवण येते खरी.

मिसळपाव्वाला वारकरी नाखुस.
  • Log in or register to post comments

बाकी कोल्हापुरच्या नावाखाली

असंका
Tue, 02/09/2016 - 17:19 नवीन
बाकी कोल्हापुरच्या नावाखाली पाट्या लावलेल्या खोपटांमध्ये कधी गेलो नाही जाईल असे वाटत नाही .
याबद्दल तीव्र सहमती!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

निसर्ग

चाणक्य
Tue, 02/09/2016 - 23:36 नवीन
डी.वाय. जवळ जे निसर्ग आहे ती यांचीच शाखा का? रच्याकने, मयुरची तिसरी शाखा तिथेच समोर सुरू झालीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बालाजी मिसळ मोरया मंदिराजवळ

असा मी असामी
Wed, 02/10/2016 - 10:44 नवीन
मोरया मंदिराजवळ बालाजी मिसळ ती पण मस्त असते. मयुर मिसळ (चिंचवड स्टेशन)एकदा गेलो होतो पण काही खास नाही वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

या गावची न त्या गावची

पैसा
Tue, 02/09/2016 - 17:03 नवीन
माझी आजी मिसळीला आंबोण म्हणायची. (प्रतिक्रिया वाचायला थांबत नाहीये. गेले पळून.)
  • Log in or register to post comments

शिळी भजी नसतील तर मिसळ मिसळच

असंका
Tue, 02/09/2016 - 17:21 नवीन
शिळी भजी नसतील तर मिसळ मिसळच नाही!! एकदम करेक्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिसळ नामक पदार्थ ज्यात

जेपी
Tue, 02/09/2016 - 18:50 नवीन
मिसळ नामक पदार्थ ज्यात फरसाणावर तिखट पाणी टाकातात. लोक ते का खातात ते कळत नाही? लै तर वड्यावर सांबर टाकुन खावे.. असो हा प्रकार कै आवडत नाही.. रच्याकने 100 री झाली. अभिनंदन
  • Log in or register to post comments

सहमत.

एस
Tue, 02/09/2016 - 19:26 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जेपीभौ संभालके ! मिसळपावला

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 19:39 नवीन
जेपीभौ संभालके ! मिसळपावला नाव ठेवताल तर निषेध सभा, निषेध मोर्चे निघतील . उगाच भावी संपादक पद धोक्यात यायचं तुमचं ! हघ्या हेवेसांनलगे ;-) रच्याकने वड्यावर (बटाटा वडा, वडापाव मधे असतो तो) सांबर टाकून कसं खातात लोक काय माहीत ? सांबर सोबत खायचा तर उडीदवडा आहे ना ! अन् बटाटा वड्यावर घ्यायला सॕंपल (कट, रस्सा,तिखट पाण,) आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बटाटा वड्या सोबत सांबर

जेपी
Tue, 02/09/2016 - 21:14 नवीन
बटाटा वड्या सोबत सांबर अप्रतिम लागत, कुठल्याही उडपी हॉटेलात खा.. कट वड्याची वेगळी मजा असते, कधी तुळजापुरला गेलात तर खा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

कड्ड्ड्ड्डक लागतं. मी आवर्जून

वेल्लाभट
Wed, 02/10/2016 - 11:13 नवीन
कड्ड्ड्ड्डक लागतं. मी आवर्जून मागून घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

माझे पण २ पर्याय

मी-सौरभ
Tue, 02/09/2016 - 18:56 नवीन
१. पिंपळे गुरव बस स्टॉप कडून दापोडीकडे यायच्या रस्यावर (जगतापांच्या ओफ्फिस नन्तर) एक मिसळ वाला आहे. तो लई भारी (खुप छान हे विषेशण मिसळिला शोभत नाही ;) ) मिसळ बनवतो. २. आमच्या तळेगावात आणी गावाजवळ ३ मिसळ्वाले पण झक्कास मिसळ बनवतात. कधीतरी या, खाऊया.
  • Log in or register to post comments

इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे

मोहनराव
Tue, 02/09/2016 - 19:56 नवीन
इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे का या गावाजवळच्या ३ मिसळवाल्यात? एक तळेगावकर मिसळप्रेमी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

बाबौ इंदोरी मधे समाधानला

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 21:25 नवीन
बाबौ इंदोरी मधे समाधानला रस्सा वाट्या रिचवायच्या पैजा लागत आमच्या!!, त्या शिवाय थंडया मामल्यात सब्जी लसूनी!! अहाहा गेले ते दिवस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आहे!! आहे!! मो रा

मी-सौरभ
Wed, 02/10/2016 - 17:45 नवीन
  1. पालथा
  2. चन्दू
  3. आता एक नविन कोहिनूर म्हणुन झालय भंडारा डोंगराजवळ, ते पण छान आहे.
ईकडे आलास की घेऊन जाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

माउली मिसळ, घरगुती चव........

सूक्ष्मजीव
Tue, 02/16/2016 - 18:27 नवीन
माउली मिसळ, घरगुती चव..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

पिंपळे गुरव मधली माउली मिसळ

सूक्ष्मजीव
Wed, 02/17/2016 - 00:50 नवीन
पिंपळे गुरव मधली माउली मिसळ मस्त घरगुती चव............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आमचीही मामलेदार मिसळ! :)

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/09/2016 - 19:30 नवीन
http://www.misalpav.com/node/3343 आमचीही मामलेदार मिसळ! :)
  • Log in or register to post comments

नाव माहित नाही पण माळशेज घाट

धनावडे
Tue, 02/09/2016 - 21:38 नवीन
नाव माहित नाही पण माळशेज घाट उतरताना सुरुवातीला एठ ढाबा आहे एसटी बस पण थांबतात तिथे मिसळ छान मिळते तिथे आणि आमच्या वाईमध्ये जॅाली मिसळ मस्त मिळते
  • Log in or register to post comments

एक*

धनावडे
Tue, 02/09/2016 - 21:45 नवीन
एक*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

जियो मिपावर मिसळवारी आणा

बहुगुणी
Tue, 02/09/2016 - 21:56 नवीन
मिसळभक्तांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या गावांमधील मिसळवारी जियो मिपावर आणावी असं आवाहन करतो. म्हणजे प्रवासादरम्यान इतर भाविकांनाही भेटी देता येतील. मी उदाहरण म्हणून मामलेदार मिसळ या ठिकाणाचा झेंडा पश्चिम ठाण्यात (अंदाजे) लावलेला आहे. याच (brown) रंगाचा झेंडा वापरावा म्हणजे मिसळवारी इतर स्थानांपेक्षा वेगळी उठून दिसेल. आधिक माहितीसाठी हा मूळ लेख वाचू शकाल.
  • Log in or register to post comments

मायला इतक्या ठिकाणच्या

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 22:06 नवीन
मायला इतक्या ठिकाणच्या मिसळींचे उल्लेख होऊनही आख्ख्या व्होल मिपावर फेमस असलेल्या मामा मिसळीचा उल्लेख कुणी कसा नाही काढला? ह्या मिसळीचे ख़ास वैशिष्ट्य म्हणजे ती मिसळ खाण्याआधी रश्श्याच्या पातेल्यात डोकावून बघावे लागते. एखादा पट्टीचा खवय्या नुसत्या त्या डोकावण्यावरुनच मिसळ कशी आहे ते सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

मामा मिसळीचा उल्लेख कुणी कसा नाही काढला?

होबासराव
Tue, 02/09/2016 - 22:18 नवीन
कॉलिंग आत्मुस बाबा
  • Log in or register to post comments

खुपच प्रसिद्ध आहे इथली मिसळ.

सही रे सई
Wed, 02/10/2016 - 01:03 नवीन
खुपच प्रसिद्ध आहे इथली मिसळ. एकदा खायची आहे. बघु कधि जमतय ते.
  • Log in or register to post comments

मा मि. ची मिसळ खाणे हे येर्

मार्मिक गोडसे
Wed, 02/10/2016 - 01:05 नवीन
मा मि. ची मिसळ खाणे हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. ह्या मिसळीच्या तिखटपणाला कोणी कितीही नाव ठेवले तरी बाकीच्या मिसळी तिच्यासमोर फिक्याच . गिरगावला एका हॉटेलमध्ये मिसळीत चक्क वालाची उसळ होती,अगदीच मिळमिळीत होती चवीला. कोल्हापुरला महाल़़क्ष्मी मंदीराच्या एका गल्लीत मिसळ खाल्ली,चव शेवेच्या आमटीसारखी वाटली. मिसळीची चेष्टा करावी ती नाशिककरांनीच , पंचवटीत (नाव विसरलो) मुठभर कांदेपोहे टाकलेली मिसळ घशाखाली उतरत नव्हती. आणि हो ठाण्यातील 'आमंत्रण'मध्ये मिसळ खाण्यासाठी जाणार असाल तर एकदा तेथील 'मशरूम मसाला' टेस्ट करा. मुंबई ठाण्यात कुठेही इतका चवदार 'मशरूम मसाला' मला तरी सापडला नाही.
  • Log in or register to post comments

तोंडाला पाणी सुटला न राव !!!

सर्वसामान्य
Wed, 02/10/2016 - 06:16 नवीन
मिसळीचा भ्रष्ट अवतार इकडे सिंगापुरात पेशवाई मध्ये मिळतो. पण तो खाण्यापेक्षा भारतभेटीची वाट पाहाण जास्त चांगलं :(
  • Log in or register to post comments

मुंबई मकान म्हणायचे आहे का

पप्पुपेजर
गुरुवार, 02/11/2016 - 05:42 नवीन
मुंबई मकान म्हणायचे आहे का तुम्हाला, पाव सोडला तर मिसळ तशी बरी असते आणि नेहमीचे पब्लिक असले कि ती अजून जबरदस्त बनते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसामान्य

नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती

DEADPOOL
Wed, 02/10/2016 - 08:36 नवीन
नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती! एकदम मस्त!
  • Log in or register to post comments

नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती

DEADPOOL
Wed, 02/10/2016 - 08:37 नवीन
नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती! एकदम मस्त!
  • Log in or register to post comments

कोकणात महाड ची फडके मिसळ

असा मी असामी
Wed, 02/10/2016 - 10:52 नवीन
महाड मध्ये बाजारपेठे येथे फडके (बहुधा तेच नाव आहे. भरपुर वेळ झाला नाही गेलो)मिसळ मीळते. मस्त असते. रात्रपाळी करुन घरी जाताना तीथे मिसळ खायची आणि घरी जाउन मस्त ताणुन द्यायचे.
  • Log in or register to post comments

इथं सातारचे इतके लोक्स असूनही

अस्वस्थामा
Wed, 02/10/2016 - 16:42 नवीन
इथं सातारचे इतके लोक्स असूनही कोणी अजून "माधवराव"चं नाव कसं काढलं नै हो ? अख्ख्या सातार्‍यात एकच.. फुल फेमस. गेल्या पंधरा एक वर्षात आहे तेवढाच सेटप आणि चव देखील बर्‍यापैकी तशीच आहे आणि अजूनही स्वतः माधवराव मिसळ बनवत बसलेले असतात. एक मिसळ आणि वरुन एक चहा नाहीतर लिंबू सरबत. बास्स.. :)
  • Log in or register to post comments

सुपनेकर

सिरुसेरि
गुरुवार, 02/11/2016 - 10:48 नवीन
सुपनेकर स्टॉल माहित आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

वाह... मिसळ

पी महेश००७
Wed, 02/10/2016 - 17:02 नवीन
आयला, मिसळ पाहिली की नाशिककरांच्या तोंडाला पाणी सुटते... कधी या आमच्या नाशिकला, कौतुक करून थकाल.. आणि हो, एखाद्या हॉटेलाचं नाव सांगून आमच्या मिसळचा अपमान करणार नाही... प्रत्येक मिसळचा वेगळा ठसका आहे...
  • Log in or register to post comments

नाशिकला आमची फेवरिट म्हणजे

प्रचेतस
Wed, 02/10/2016 - 21:47 नवीन
नाशिकला आमची फेवरिट म्हणजे अंबिका मिसळ, सुरतीची कढी भेळ, शौकीनची झटका पाणीपुरी, सायंताराचे साबुदाणावडे, राउतचा डबल जीरा सोडा आणि पांडेची लस्सी. अकबर सोडा पण बरा आहे तसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी महेश००७

अकबरचा मसाला सोडा मस्त असतो.

घाटावरचे भट
गुरुवार, 02/11/2016 - 15:14 नवीन
अकबरचा मसाला सोडा मस्त असतो. बाकी 'अंबिका'मधली मिसळ एकदाच खाल्ली आहे. मिसळीसोबत तळलेला पापड नाशकातच मिळतो बहुतेक. इतर कुठे पाहिला नाही. शाळेत असताना एकदा रविवार कारंज्यावर एका गाडीवर मिसळ खाल्ली होती. ती झकास चव अजून आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिसळ कोल्हापुरलाच खावी,

काकासाहेब केंजळे
Wed, 02/10/2016 - 23:07 नवीन
मिसळ कोल्हापुरलाच खावी, मामलेदार फामलेदार,बेडेकर येडेकर खुळचट पुणेरी व मुबंईच्या यड्याचे वाढवलेले प्रस्थ आहे.
  • Log in or register to post comments

:)

अजया
गुरुवार, 02/11/2016 - 12:19 नवीन
एकच काका! प्रतिसाद देतात बाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे

मी काय म्हणतो काका;

वेल्लाभट
गुरुवार, 02/11/2016 - 12:23 नवीन
मी काय म्हणतो काका; कोल्हापूरची चांगली असतेच. पण म्हणून बाकी वाईट होत नाहीत ना? मिसळ ही एक पवित्र पाककृती आहे. असं बघा, कुणाला सिद्धिविनायक पावतो, कुणाला दत्तगुरू पावतात कुणाला आणि कुणी. पण वाईट कुणीच कुणाला म्हणत नाही ना? तसंय ते. एकेकाची आवड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे

काका, तुम्ही कुठले?

बोका-ए-आझम
Fri, 02/12/2016 - 22:57 नवीन
काका, तुम्ही कुठले? येरवड्याचे वाटतं! की डायरेक्ट आग्रा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे

नका हो नका !

खटपट्या
गुरुवार, 02/11/2016 - 00:42 नवीन
नका हो नका ! नोस्टेलॅजीक का काय म्हणतात ते व्ह्यायला झालेय. तुम्ही जीथं कार पार्कींग केलीत तीथं आमचा जल्म झाला. आनि मामलेदारची मिसळ खात ल्हानाचा मोटा झालोय.. त्यामुळे आता मिसळ न खाता डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

खर्या मिसळीचे कॅरॅक्टर वेगळे

काकासाहेब केंजळे
गुरुवार, 02/11/2016 - 14:17 नवीन
खर्या मिसळीचे कॅरॅक्टर वेगळे असते, आजकाल लाल तिखट घालून दिलेलीइ तर्री खाउन अनेकांचा असा गैरसमज झाला आहे की मिसळ खाल्ल्याने तोंडाची आग झालीच पाहीजे.खरी मिसळ तीच जिचा तिखटपणा हवाहवासा वाटतो,तोंड भाजण्याऐवजी कानशिलं उबदार वाटायला लागतात ,डोळे धुंधावतात,प्रत्येक पुढचा घास ही अनुभूती आणखी वाढवतो.अशि अनुभूती देणारी मिसळ मी फक्त कोल्हापुरलाच खाल्ली आहे .
  • Log in or register to post comments

आजची भेट - मामलेदार ला

हेमन्त वाघे
Sun, 02/14/2016 - 01:07 नवीन
http://postimg.org/image/gezvuo1jl/
  • Log in or register to post comments

[url=http://postimg.org/image

हेमन्त वाघे
Sun, 02/14/2016 - 01:08 नवीन
[url=http://postimg.org/image/gezvuo1jl/full/][img]http://s8.postimg.org/8z0m8vdud/image.jpg[/img][/url] [url=http://postimage.org/]free image uploader[/url]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा