✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जर्जरी वार्धक्य माझे

त — तिमा, Sun, 02/07/2016 - 19:53
जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

प्रतिक्रिया द्या
6282 वाचन

💬 प्रतिसाद (21)

वाह, विडंबन पण म्हणता येईल

विजय पुरोहित
Sun, 02/07/2016 - 20:35 नवीन
वाह, विडंबन पण म्हणता येईल आणि व्यथा पण... जबर कल्पना...
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Sun, 02/07/2016 - 22:11 नवीन
एकदा वाचून गेले. काही लिहायचा धीर झाला नाही. स्वतःची अशा वयात कल्पनाही करावी असे वाटत नाही. :(
  • Log in or register to post comments

असंच काहीसं

श्रीरंग_जोशी
Sun, 02/07/2016 - 22:51 नवीन
असंच काहीसं मलाही वाटलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कविता आवडली

कविता१९७८
Sun, 02/07/2016 - 22:18 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

मस्त आहे.

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/08/2016 - 09:35 नवीन
मस्त आहे. वाचताना बोरकरांची संधिप्रकाशात आठवली, तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची तूच ओढलेले त्यासवें दे पाणी, थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल; भुलीतली भूल शेवटली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

!! ही कविताही आवडली.

खेडूत
Mon, 02/08/2016 - 11:22 नवीन
!! ही कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

...

मोगा
Mon, 02/08/2016 - 11:12 नवीन
मस्त .
  • Log in or register to post comments

स्वाल्लिड हो !

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/08/2016 - 11:37 नवीन
स्वाल्लिड हो !
  • Log in or register to post comments

कविता आवडली

विवेकपटाईत
Mon, 02/08/2016 - 11:39 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

:( विंडंबन+विराणी+भाव कविता

माहितगार
Mon, 02/08/2016 - 14:41 नवीन
:( विंडंबन+विराणी+भाव कविता पोचलीही आणि भावलीही. मागे केव्हातरी राजन खान यांचा खर्‍या प्रेमाची प्रचिती वार्धक्यातच येते अशा स्वरुपाचा लेख दैनिक सकाळच्या पुरवणीत वाचलेला तुमच्या कवितेवरून परत एकदा आठवला. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

........

बॅटमॅन
Mon, 02/08/2016 - 15:14 नवीन
........
  • Log in or register to post comments

:( कविता आवडलीच.

अजया
Mon, 02/08/2016 - 17:28 नवीन
:( कविता आवडलीच.
  • Log in or register to post comments

कविता आवडली .

उगा काहितरीच
Mon, 02/08/2016 - 18:11 नवीन
कविता आवडली .
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

प्राची अश्विनी
Mon, 02/08/2016 - 18:22 नवीन
विडंबन असूनही स्वतंत्र ताकदीची कविता. कतिल शिफाई यांची गझल आठवली आखरी हिचकी तेरे जानों पा आये, मौत भी में शायराना चाहता हूँ।
  • Log in or register to post comments

ह्म्म..

यशोधरा
Mon, 02/08/2016 - 18:33 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments

मस्त आहे

एक एकटा एकटाच
Mon, 02/08/2016 - 19:28 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

पद्मावति
Mon, 02/08/2016 - 19:40 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

रूपाने विडंबन

देशपांडे विनायक
Tue, 02/09/2016 - 10:31 नवीन
रूपाने विडंबन अर्थाने विराणी असलेली आपली भावकविता माझ्यासाठी फार मोठी GIFT आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments

जमली आहे. एक अटळ वास्तव..

आतिवास
Tue, 02/09/2016 - 11:03 नवीन
जमली आहे. एक अटळ वास्तव..
  • Log in or register to post comments

कुठून वाचली असं झालं!

बहुगुणी
Tue, 02/23/2016 - 22:39 नवीन
कुठून वाचली असं झालं, तिमा साहेब! इतकं जळजळीत वास्तव माझंच काय कुणाचंच नसावं अशी सदिच्छा, पण खूप नेमकं लिहिलं आहे!
  • Log in or register to post comments

:(

प्रीत-मोहर
Wed, 02/24/2016 - 09:39 नवीन
:(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा