पुस्तके…
पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत
आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात
न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे
नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात
अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी
एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते
आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता
अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात
आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते
आतल्या आतच फुलणारे ते झाड आनंदाने मोहरते
ज्यांच्या मातीत आपण रुजलो, ज्यांच्या पानांवर आपण पोसलो
ती पुस्तकांची पाळेमुळे किती खोलवर रुजलीत हे उमगते
पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते!
~ मनिष (१/१/२०१६)
सुर्रेख! पोचली अगदी!
सुंदर लिहिलेय.
चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे
अप्रतिम.
छान लिहिले आहे!!
सर्वच प्रतिसादकर्त्यांना
ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली
सुंदर कविता.. चित्रही झक्कास
भा.पो. :) आवडेश!! राघव
अतिशय आवडली.
अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी
सुंदर कविता. आवडली.
खूप्प
मी पण! पिंचिच्या सासंमध्ये
होय
हो!!!
मस्तय
@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी
+१
+१
कविता भावली
खूप छान!
आभार!
फारच सुरेख कविता.
अशीच वर काढतोय - जागतिक