✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तके…

म — मनिष, Sat, 01/02/2016 - 14:38
Pustake पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते आतल्या आतच फुलणारे ते झाड आनंदाने मोहरते ज्यांच्या मातीत आपण रुजलो, ज्यांच्या पानांवर आपण पोसलो ती पुस्तकांची पाळेमुळे किती खोलवर रुजलीत हे उमगते पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते! ~ मनिष (१/१/२०१६)

प्रतिक्रिया द्या
11821 वाचन

💬 प्रतिसाद (25)

सुर्रेख! पोचली अगदी!

यशोधरा
Sat, 01/02/2016 - 14:43 नवीन
सुर्रेख! पोचली अगदी!
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलेय.

पद्मावति
Sat, 01/02/2016 - 15:01 नवीन
सुंदर लिहिलेय.
  • Log in or register to post comments

चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे

मनिष
Sat, 01/02/2016 - 15:41 नवीन
चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे, कोणी संपादक कृपया दुसरी कविता काढून टाकेल का?
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

प्रचेतस
Sat, 01/02/2016 - 17:17 नवीन
अप्रतिम. तुझ्या पुस्तकांच्या नादाविषयी माहिती आहेच.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे!!

शार्दुल_हातोळकर
Sat, 01/02/2016 - 19:22 नवीन
पुस्तक.... जीव की प्राण.....
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिसादकर्त्यांना

मनिष
Mon, 01/04/2016 - 12:29 नवीन
सर्वच प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली

विशाल कुलकर्णी
Mon, 01/04/2016 - 12:39 नवीन
ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली
  • Log in or register to post comments

सुंदर कविता.. चित्रही झक्कास

मोदक
Mon, 01/04/2016 - 13:39 नवीन
सुंदर कविता.. चित्रही झक्कास आहे..!!!
  • Log in or register to post comments

भा.पो. :) आवडेश!! राघव

राघव
Tue, 01/26/2016 - 18:20 नवीन
भा.पो. :) आवडेश!! राघव
  • Log in or register to post comments

अतिशय आवडली.

प्राची अश्विनी
Wed, 01/27/2016 - 08:03 नवीन
अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी

अजया
Wed, 01/27/2016 - 08:08 नवीन
अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी कविता.अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता. आवडली.

सतिश गावडे
Wed, 01/27/2016 - 08:32 नवीन
सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

खूप्प

नाखु
Wed, 01/27/2016 - 11:57 नवीन
आवाली . वाखु साठवली आहे
  • Log in or register to post comments

मी पण! पिंचिच्या सासंमध्ये

यशोधरा
Wed, 01/27/2016 - 21:38 नवीन
मी पण! पिंचिच्या सासंमध्ये पुप्रसाठी लावायला हवी होती ही मोठ्ठं होर्डिंग करुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

होय

नाखु
Sat, 01/30/2016 - 12:30 नवीन
फक्त उडणार्या पत्र्यांपासून जरा लांब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो!!!

यशोधरा
Sat, 01/30/2016 - 12:33 नवीन
हो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्तय

एक एकटा एकटाच
Wed, 01/27/2016 - 21:37 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments

@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/28/2016 - 08:24 नवीन
@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते! >> लाजव्वाब!
  • Log in or register to post comments

+१

संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 11:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

चाणक्य
गुरुवार, 01/28/2016 - 10:42 नवीन
आवडली. छान आहे.
  • Log in or register to post comments

कविता भावली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/28/2016 - 22:05 नवीन
ही कविता खूप भावली. कवितेबरोबर टाकलेले चित्रही खासंच आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान!

पैसा
गुरुवार, 01/28/2016 - 22:59 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments

आभार!

मनिष
Sat, 01/30/2016 - 11:55 नवीन
सर्वच प्रतिसादकर्त्यांचे आभार! खूप दिवसांनी ही वर काढल्याबद्द्ल राघवला धन्यवाद!:-) चित्र नेटवर मिळाले (Book iPad wallpaper) आणि समर्पक वाटले म्हणून वापरले, त्याचा उल्लेख राहून गेला. एका मैत्रिणीच्या फेसबुक स्टेटसवरून ही कविता सुचली. कधीतरी खूप आधी वाचलेली गुलजा़र ह्यांची ही कविताही डोक्यात होती - http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82_/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%B0
  • Log in or register to post comments

फारच सुरेख कविता.

सस्नेह
Sat, 01/30/2016 - 12:49 नवीन
फारच सुरेख कविता. ...पुस्तकप्रेमी
  • Log in or register to post comments

अशीच वर काढतोय - जागतिक

मनिष
Sat, 04/23/2022 - 15:33 नवीन
अशीच वर काढतोय - जागतिक पुस्तक दिनानिमित्त!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा