
पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत
आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात
न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे
नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात
अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी
एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते
आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता
अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात
आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते
आतल्या आतच फुलणारे ते झाड आनंदाने मोहरते
ज्यांच्या मातीत आपण रुजलो, ज्यांच्या पानांवर आपण पोसलो
ती पुस्तकांची पाळेमुळे किती खोलवर रुजलीत हे उमगते
पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते!
~ मनिष (१/१/२०१६)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11895
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुर्रेख! पोचली अगदी!
सुर्रेख! पोचली अगदी!
सुंदर लिहिलेय.
सुंदर लिहिलेय.
चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे
चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे, कोणी संपादक कृपया दुसरी कविता काढून टाकेल का?
अप्रतिम.
अप्रतिम.
तुझ्या पुस्तकांच्या नादाविषयी माहिती आहेच.
छान लिहिले आहे!!
पुस्तक.... जीव की प्राण.....
सर्वच प्रतिसादकर्त्यांना
सर्वच प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! :-)
ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली
ज्जे ब्बात ! मस्तच. आवडली
सुंदर कविता.. चित्रही झक्कास
सुंदर कविता.. चित्रही झक्कास आहे..!!!
भा.पो. :) आवडेश!! राघव
भा.पो. :)
आवडेश!!
राघव
अतिशय आवडली.
अतिशय आवडली.
अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी
अप्रतिम. अगदी मनातलं बोलणारी कविता.अतिशय आवडली.
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
खूप्प
आवाली . वाखु साठवली आहे
मी पण! पिंचिच्या सासंमध्ये
In reply to खूप्प by नाखु
मी पण! पिंचिच्या सासंमध्ये पुप्रसाठी लावायला हवी होती ही मोठ्ठं होर्डिंग करुन!
होय
In reply to मी पण! पिंचिच्या सासंमध्ये by यशोधरा
फक्त उडणार्या पत्र्यांपासून जरा लांब.
हो!!!
In reply to होय by नाखु
हो!!!
मस्तय
मस्तय
@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी
@पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते! >> लाजव्वाब!
+१
In reply to @पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी by अत्रुप्त आत्मा
+१
+१
आवडली. छान आहे.
कविता भावली
ही कविता खूप भावली.
कवितेबरोबर टाकलेले चित्रही खासंच आहे.
खूप छान!
खूप छान!
आभार!
सर्वच प्रतिसादकर्त्यांचे आभार! खूप दिवसांनी ही वर काढल्याबद्द्ल राघवला धन्यवाद!:-)
चित्र नेटवर मिळाले (Book iPad wallpaper) आणि समर्पक वाटले म्हणून वापरले, त्याचा उल्लेख राहून गेला.
एका मैत्रिणीच्या फेसबुक स्टेटसवरून ही कविता सुचली. कधीतरी खूप आधी वाचलेली गुलजा़र ह्यांची ही कविताही डोक्यात होती - https://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A…
फारच सुरेख कविता.
फारच सुरेख कविता.
...पुस्तकप्रेमी
अशीच वर काढतोय - जागतिक
अशीच वर काढतोय - जागतिक पुस्तक दिनानिमित्त!