✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?

उ
उगा काहितरीच यांनी
गुरुवार, 01/28/2016 - 20:00  ·  लेख
लेख
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. शनीच्या चौथर्‍यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ? राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ? सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57924 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

पण त्या दिवशी तर म्हणालास

स्रुजा
Fri, 01/29/2016 - 03:46 नवीन
पण त्या दिवशी तर म्हणालास तुला सगऴ्या खबरी पोहोचत होत्या बराब्बर म्हणुन ? :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपण एकाच टिमचे ना...अस्स नै

टवाळ कार्टा
Fri, 01/29/2016 - 03:49 नवीन
आपण एकाच टिमचे ना...अस्स नै कर्यायचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हॉ ! दुसर्‍या टीम मध्ये कोण

स्रुजा
Fri, 01/29/2016 - 04:21 नवीन
हॉ ! दुसर्‍या टीम मध्ये कोण कोण आहेत ते सांग आधी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मावशे, तंबाखू थुंकून ये बरं आधी.

बोका-ए-आझम
Fri, 01/29/2016 - 14:35 नवीन
वाईट सवय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळी मावशी

मिपा बायका अशा ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/29/2016 - 10:06 नवीन
नो नाय नेव्हर ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

टक्या उभ्या लायनीतली वरुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/28/2016 - 23:03 नवीन
टक्या उभ्या लायनीतली वरुन दुसरी आणि आडव्या लैनीतली डावीकडुन पहिली. आय कॉल डिब्ज मेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हातात काठ्या कसल्या? मासे

गामा पैलवान
Fri, 01/29/2016 - 02:50 नवीन
हातात काठ्या कसल्या? मासे पकडायला झाडावर चढल्यात की काय? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बुडणार्‍या संस्कृतीला

संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 10:48 नवीन
बुडणार्‍या संस्कृतीला वाचवायला काठीचा आधार द्यायला आहेत त्या काठ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

डबा रिकामा झाला रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/28/2016 - 22:40 नवीन
Image removed. डबा रिकामा झाला रे.
  • Log in or register to post comments

तू मेल्या, कधी ही बुड हलवुन

स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 22:43 नवीन
तू मेल्या, कधी ही बुड हलवुन पॉपकॉर्न आणायला जाऊ नकोस, पाप लागेल जणु. बसल्या जागेवरुन मिपा बायकांनी आणलेले पॉपकॉर्न हादडतोस, शोभतं का तुला? मामो- विदाऊट आमचे हे - मोड ऑफ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बेअरिंग जमलं नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/28/2016 - 22:43 नवीन
बेअरिंग जमलं नाही. १० पैकी २ मार्क (प्रा. डाँचा नाठाळ इद्यार्थी) कॅजॅस्पॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मुद्दा बेअरिंग चा नाहीये..

स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 22:48 नवीन
मुद्दा बेअरिंग चा नाहीये.. मुद्दा तू आमचे पॉकॉ खाण्याचा आहे, जा दे आमचे पॉकॉ आणुन. आम्ही हालणार नाही, तेव्ढ्यात धागा उडला तर काय करा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शनीम्हाराजा ह्या पॉकॉखाउ

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/28/2016 - 23:05 नवीन
शनीम्हाराजा ह्या पॉकॉखाउ बैकांना पॉकॉ आणायची बुद्दी दे रे म्हाराजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

शनिम्हाराज आम्हाला चौथर्

स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 23:15 नवीन
शनिम्हाराज आम्हाला चौथर्‍यावरुन हटवण्यात बिझी हाईत.. ते पॉकॉ काय ते तुमचं तुम्ही सांभाळा असा निरोप धाडलाय त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

इतका इंटरेस्टींग धागा आणि

विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 22:41 नवीन
इतका इंटरेस्टींग धागा आणि स्वप्नांची राणीतै, कतार अजून कशा आल्या नाहीत. त्या आल्या तर धाग्यावर अजून जोरदार तडका पडेल...
  • Log in or register to post comments

काॅलिंग स्वरातै, कतार....

विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 22:44 नवीन
काॅलिंग स्वरातै, कतार.... आप कतार में है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

तुम्ही कोणाचा आणि कितवा

सतिश गावडे
गुरुवार, 01/28/2016 - 23:12 नवीन
तुम्ही कोणाचा आणि कितवा मिपावतार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

ओ सगादादा...

विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 23:14 नवीन
ओ सगादादा... खफ उघडून बघा की मी मांत्रिक आहे म्हणून मी कबूल केलंय की... माझा मांत्रिक हा आयडी मी ब्लाॅक केलाय स्वतःच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

खफ उघडून बघा की मी मांत्रिक

सतिश गावडे
गुरुवार, 01/28/2016 - 23:19 नवीन
खफ उघडून बघा की मी मांत्रिक आहे म्हणून मी कबूल केलंय की...
खरडफळा म्हणजे काय मिपा चित्रगुप्ताची* डायरी आहे का सगळ्या नोंदी तिथे पाहायला? :) असो, तुमचे या धाग्यावरील प्रतिसाद वाचून तुम्ही "निरागस आस्तिक" आहात की उगाच टिवल्या-बावल्या करत आहात अशा दुविधेत पडलो आहे. *हे पॅरीसवाले कालसर्पयोगवाले चित्रगुप्त काका नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अहो सगासाहेब...

विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 23:23 नवीन
अहो सगासाहेब... आस्तिक असलो तरी कधी गंमत करु नये का? आणि माझे पहिले प्रतिसाद माझे आस्तिक नेचरच दाखवतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

>> आस्तिक असलो तरी कधी गंमत

सतिश गावडे
गुरुवार, 01/28/2016 - 23:34 नवीन
>> आस्तिक असलो तरी कधी गंमत करु नये का? नाही. आस्तिकानं कसं देवासारखं शांत बसलं पाहीजे. ;) >>आणि माझे पहिले प्रतिसाद माझे आस्तिक नेचरच दाखवतात... म्हणजे तुम्ही "निरागस आस्तिक" आहात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

मी जर आस्तीक असलो तर साहजीकच

सतिश गावडे
गुरुवार, 01/28/2016 - 23:11 नवीन
मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
अगदी माझ्या मनातलं लिहीलंत. का कोण जाणे, मला अत्रेंच्या "प्रेमाचा गुलकंद" कवितेतील "तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते" ही ओळ आठवत आहे. :)
  • Log in or register to post comments

प्रश्न शनि चौथर्‍यावर जाउन

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 12:51 नवीन
प्रश्न शनि चौथर्‍यावर जाउन काय होतं अथवा होत नाही असा नसून, कुठल्यातरी थातुरमातुर कारणांनी स्त्रीयांवर निर्बंध घालण्याची प्रवृत्ती बोकाळू नये म्हणून आंदोलनाला पाठिंबा. वरील २ प्रश्नांच्या उलट पद्धतीने विचार करुन पहा. आस्तिक असल्यास.. शनिच्या कृपेपासून स्त्रीयांना का वंचित ठेवावे.. नास्तिक असल्यास.. स्त्रीयांनी तेथे गेल्याने काय कोणाचे वाकडं होतं ते बघुया ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 14:48 नवीन
बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल धन्यवाद . पण आपले मुद्दे पटले नाही.
आस्तिक असल्यास.. शनिच्या कृपेपासून स्त्रीयांना का वंचित ठेवावे..
आस्तीकासाठी:- शंकराचार्य जर म्हणत असतील तर मानण्यात अर्थ असेल ना ! शिवाय परंपरा आहेत आपल्याच तर पाळू ना. उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यातील एक गाव आहे पोखर्णी नावाचे. तिथे नृसिंहाचे जागृत देवस्थान आहे. तिथे अशी परंपरा आहे की पुरूषाने कमरेवरचे वस्त्रे काढूनच दर्शनाला जायचे (अगदी बनियनही काढावी लागते) मी जर पक्का आस्तीक असलो ना तर ही परंपरा मोडन्याचे काहीच कारण नाही.
स्त्रीयांनी तेथे गेल्याने काय कोणाचे वाकडं होतं ते बघुया ना..
हे म्हणजे "आम्ही चप्पल घालून मंदिरात जाणार ! पाहु देव आमचं काय वाकडं करतो ते असं झालं." त्यांच कदाचित काही वाकडं होणार नाही. पण जे हजारो आस्तीक ती परंपरा पाळतात त्यांच्या भावना दुखतील त्यांच काय ? शिवाय "आमचाच" शनीदेव दिसला का अंधश्रद्धा निर्मुलन करायला .अजूनही बरेच ठिकाणी स्त्रीयांना प्रवेश नाही . मग तेथून कराना सुरूवात . असो! माझे वैयक्तिक मत असे आहे की आपल्याकडे सार्वजनिक देवस्थानांचे काही सर्वमान्य नियम आहेत. जसेकी गुरूद्वार्यात जाताना डोक्यावर कपडा पाहिजे . मंदिरात जाताना चप्पल नाही पाहिजे इत्यादी . त्या नियमांचे पालन करताना कुणाला विशेष त्रास पडत नसेल, कूणाला इजा होत नसेल तर चालू ठेवन्यात प्रॉब्लेम काय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

नियम आणि discriminiation यात

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 15:02 नवीन
नियम आणि discriminiation यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण स्त्रीयांनी येउ नये हे discriminiation आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरिही मोडण्याचे कारण दिसत नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

Discrimination (भेदभाव) हा

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 15:22 नवीन
Discrimination (भेदभाव) हा स्त्री-पुरूषात राहणारच साहेब. प्रत्येक ठिकाणी समानता शक्यच नाही. हं याचा अर्थ असा नाही की पुरूष हे स्त्रीपेक्षा वरचढ वगैरे आहेत. काही बाबतीत स्त्रिया या नेहमीच पुरूषांच्या पुढे असणारच! मग काही बाबतीत पुरूष महिलांच्या पुढे (अगदी थोड्या प्रमाणात का होईना) असतील तर कुठे बिघडले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सहमत उ.का. साहेब...

विजय पुरोहित
Fri, 01/29/2016 - 15:26 नवीन
सहमत उ.का. साहेब... प्रत्येकाचे स्वतःचे + किंवा - आहेत. त्या त्या +/- ची जाणीव व आदर असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

इथे कुठल्या मायनस पॉईंटसाठी

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 15:31 नवीन
इथे कुठल्या मायनस पॉईंटसाठी स्त्रीया प्रवेशास अपात्र आहेत ते तरी समजु द्या.. पटल्यास जाणीव आदर नक्की करु :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

http://www.misalpav.com

विजय पुरोहित
Fri, 01/29/2016 - 15:38 नवीन
http://www.misalpav.com/comment/797150#comment-797150 सप्रे साहेब त्या अगोदर हा प्रतिसाद तर वाचा. विशेष म्हणजे एका स्त्री सदस्येनेच दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

ह्या प्रतिसादात माझ्या

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 15:45 नवीन
ह्या प्रतिसादात माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही.. त्यांनी वेगळा मुद्दा मांडलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

सर्वबाबतीत समानता शक्य नाही .

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 15:29 नवीन
सर्वबाबतीत समानता शक्य नाही .. ठीकाय पण इथे समानता नसायचे कारण काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

इथेच समानता करायचे कारणच काय

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 15:43 नवीन
इथेच समानता करायचे कारणच काय ? अन् तेही आत्ता ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

समानता हा घटनेने दिलेला

बाळ सप्रे
Fri, 01/29/2016 - 15:48 नवीन
समानता हा घटनेने दिलेला अधिकार आहे.. तो नाकारला जातोय विनाकारण. आतापर्यंत झालं नाही म्हणून आत्ता होउ नये असं का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

समानतेमुळे त्यांच नुकसान होत

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 16:13 नवीन
समानतेमुळे त्यांच नुकसान होत असेल तरी समानता करावी काय ? (टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील ढकलपत्र आहे त्यावर धागाकर्त्याचा विश्वास असेलच असे नाही. नोंद घ्यावी धन्यवाद ! . . सध्या वादातीत असलेल्या, महिलेने केलेल्या शनी देव मूर्ती स्पर्शाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- शनी हा देव नसून ग्रह आहे त्याला छाया ग्रह असे म्हणतात. शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, सावित्री धाम मध्ये पुरुषांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, देवीची ओटी स्त्रीया भरतात, कधी पुरुषाला ओटी भरतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे पुरुषांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. पुरुषाच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही, सृजनाचा अधिकार स्त्रींयानाच आहे, म्हणून त्या ओटी भरतात. आणि ह्या सृजन शक्तिवरच शनि ग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण विषमज्वरात ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शारीरिक क्षमतांचा होय. कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही, कारण आपले शरीर त्या वेळी तो आहार घ्यायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला तेलकट देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला तेलकट द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने सप्रेसर, तुम्ही आस्तीक का नास्तीक? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

रच्याकने सप्रेसर, तुम्ही

माहितगार
Fri, 01/29/2016 - 16:19 नवीन
रच्याकने सप्रेसर, तुम्ही आस्तीक का नास्तीक? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)
इथे उद्देश व्यक्ती लक्ष तर्कदोषाचा नाही ना ? सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो. एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३] उदाहरणे " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते." " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही." "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?" "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही." "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

इथे उद्देश व्यक्ती लक्ष

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 16:55 नवीन
इथे उद्देश व्यक्ती लक्ष तर्कदोषाचा नाही ना ?
बिलकुल नाही. त्याचं काय आहे ना , धाग्यात आस्तीक व नास्तीक असे दोन्ही मतप्रवाह मांडण्याचा प्रयत्न केलाय. सो श्री बाळ सप्रे यांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे महिलांना चौथर्यावर जाऊ देणे अपेक्षित आहे ते कळले असते तर सोयीस्कर झालं असतं. त्यांच्या चारीत्र्याविषयी काहीही वाईट गोष्ट मांडण्याची इच्छा आणी गरज दोन्हीही नाही. शिवाय एखादी व्यक्ती आस्तीक किंवा नास्तीक असणे यावरून त्या व्यक्तीचे चारीत्र्य ठरवणे हे माझ्या दृष्टीने सर्वथैव अशक्य आहे. तरी तुमचा वरील प्रतिसाद गैरलागु आहे. हे नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तस नै हो उगा सेठ एक तर निव्वळ

माहितगार
Fri, 01/29/2016 - 17:10 नवीन
तस नै हो उगा सेठ एक तर निव्वळ आस्तीक ते निव्वळ नास्तिक या शिवाय इतरही पर्याय असू शकतात आणि पार्श्वभूमी कुठल्याही विचाराची असली तरी उपस्थीत मुद्दे गैरलागू होत नसावेत. सात्विकतेने मुद्द्यांना बळ येत नाही आणि ते नास्तिक आहेत किंवा त्यांच्या इतर विचारांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांचे मुद्दे दुर्बळ ठरत नाहीत या कडे आपले लक्ष वेधायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ठीक आहे. तुमच्या भावना

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 17:28 नवीन
ठीक आहे. तुमच्या भावना पोचल्या .पण नेमकं कोणत्या कारणांमुळे जाण्याची इच्छा आहे ते कळालं तर बरं पडेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

समानतेमुळे त्यांच नुकसान होत

माहितगार
Fri, 01/29/2016 - 16:25 नवीन
समानतेमुळे त्यांच नुकसान होत असेल तरी समानता करावी काय ?.... शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

(टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 17:08 नवीन
(टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील ढकलपत्र आहे त्यावर धागाकर्त्याचा विश्वास असेलच असे नाही. नोंद घ्यावी धन्यवाद !
हे वाचा मालक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तटस्थते दाखल तुम्हाला न पटलेल

माहितगार
Fri, 01/29/2016 - 17:13 नवीन
तटस्थते दाखल तुम्हाला न पटलेल ढकलपत्र उदाहरण म्हणून ढकलल असेल तर ठिकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

होय मलाही बरचसं पटलेलं नाही

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 17:42 नवीन
होय मलाही बरचसं पटलेलं नाही ते. पण जे "आस्तीक" आहेत त्यांना कदाचित पटेल ते . किंबहुना ते पटल्यामुळेच इतकी वर्षे तिथे महिला जात नसतील. माहितगार साहेब, कसं आहे ना माझं स्वतःचे असे मत आहे की , "मंदीर तोड मस्जीद तोड लेकीन किसीका दील मत तोड" (हा माझ्या ओळी नाहीत बहुतेक कबीराच्या आहेत. नेमकं आठवत नाही.) तुम्हाला प्रबोधनच करायचे तर त्याचेही सौम्य मार्ग आहेतच की! माहित आहे की पेशंट आजारी आहे मग थोssssडं दमानं इंजेक्शन देणार की जनावराला देतात तसं देणार ? या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्या नष्ट व्हायला वेळ लागेलच नाही का ? असे आंदोलन वगैरे करून मे बी तीथे प्रवेशही मिळेल पण लोकांच्या मनात या आंदोलनकर्त्यांविषयी प्रेम, आपुलकी येईल का? बसं तुर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

आपण उपस्थित केलेल्या उपरोक्त

माहितगार
Fri, 01/29/2016 - 18:46 नवीन
आपण उपस्थित केलेल्या उपरोक्त मुद्यांची चर्चा अंशतः माझ्या मागील धागा लेखात मुद्दा क्र. ३ आणि ४ मध्ये केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

३) किंवा बर्‍याचदा असा विचार

उगा काहितरीच
Fri, 01/29/2016 - 19:03 नवीन
३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
हेच दोन मुद्दे का ? वाचले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ह्या वरून आठवले

माहितगार
Fri, 01/29/2016 - 19:05 नवीन
पंढपूरच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले, बर्‍याच सर्वोदयींनी टिका केली. कायदा करून अस्पृश्यांना मंदिर प्रवेश खुला होणारच आहे तर साने गुरुजींच्या उपोषणाचे प्रयोजन काय असा बर्‍याच सर्वोदयींचा सूर होता. केवळ कायदे करून काही प्रश्न सुटतात मुख्य म्हणजे केवळ कायदे केल्याने प्रबोधन होत नाही. सानेंनी उपोषण केले म्हणून प्र.के. अत्रें चौका चौकात उभे टाकून प्रबोधन करत निघाले. सानेंगुरुजींच्या आंदोलनाचे मुल्य आज नेमके कसे ठरवावे ? 'बगाड' परंपरेतील अंधश्रद्धेचा मुद्दा संत एकनाथ, संत तुकारामांनी उचलला पण आजही त्यात सुधारणा झालेली दिसत नाही. केवळ प्रबोधनावर काही गोष्टीत फरक पडताना दिसतो काही गोष्टीत शतके गेली तरीही फरक पडताना दिसत नाही. पंढरपूरच्याच मंदिराच्या बाबतीत केशवपन न केलेल्या स्त्रीयांना देव्हार्‍यात प्रवेशाचा काही प्रश्न होता असे चि.वि.जोशींच्या कादंबरीवरून वाटते (कादंबरीतील उल्लेख पुरावा होऊ शकत नाहीत दुजोर्‍याची आवश्यकता असावी) आंदोलनांनी लगेच प्रबोधन होत नाही म्हणून आंदोलने सहसा ताणू नयेत पण आंदोलनांनी परिवर्तनवाद्यांना मानसिक बळ मिळते ते बळ मिळाले नाहीतर निव्वळ प्रबोधनाच्या व्याख्यानांनी फरक पडेलच याची खात्रीही देता येत नाही. गंमत अशी की, प्रबोधनाचे काम आणि लढे परिवर्तनवादी करतात आणि आपला परिवर्तीत झालेला धर्मच कसा इतरांपेक्षा लवचिक आणि श्रेष्ठ आहे याची प्रौढी मिरवण्यात परंपरावादीच अधिक पुढे असतात पण पुन्हा परंपरेत बदल करण्याची वेळ आली की कर्मठपणाची भूमिका वठवण्यात पुढे असतात, आणि परिवर्तनवाद्यांना व्हिलन ठरवतात. असे का होत असावे कोण जाणे ? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ढकलपत्रातील माहिती

बाळ सप्रे
Sat, 01/30/2016 - 08:52 नवीन
ढकलपत्रातील माहिती pseudoscientific. त्या स्पंदनं वगैरे थिअरीला कुठलाही आधार नाही. बाकी मी आधीच स्पष्ट केलय या प्रकरणात आस्तिक अथवा नास्तिक पेक्षा थातुरमातुर कारणांनी स्त्रीयांवर निर्बंध घालण्याची प्रवृत्ती हा मुख्य मुद्दा आहे. आपण अथवा विजय पुरोहित यांच्याकडून या मुद्द्याला पटेल असा प्रतिवाद अजून आलेला नाही. तो आल्यास चर्चा पुढे जाउ शकते. माझ्या आस्तिक नास्तिक असण्याचा प्रश्न गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या

संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 09:33 नवीन
ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या थीअरीजमधे टनाटन वाले वस्ताद असतात. थातुरमातुर कारणांची व्याख्या नेमकी काय आहे? शब्दांच्या वापरातून कृतींचे अर्थ बदलतात हे लक्षात घेतले पाहिजे. आपण म्हणता की डीस्क्रिमिनेशन केले जाते. म्हणजे भेदभाव. स्त्रियांनी शनि-हनुमान ह्यासारख्या देवांपासून दूर राहायची रुढी समाजात आहे व त्याची कारणे माहितगार यांच्या धाग्यावर आलेली आहेत. ही कारणे सामाजिक मान्यतांमधून प्रचलित झाली आहेत. सामाजिक मान्यतांना वैज्ञानिक आधार असेलच असे नसते. कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी प्रचलित होत असेल तर त्यामागे कुणाचा तरी अवमान करणे, किंवा गैरफायदा घेणे हीच कारणे असतात असे नसते. तुमचे प्रतिसाद ह्या परंपरेत "स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्या हेतुने प्रवेशास बंदी लादणे" हे उद्देश आहेत, ह्या अर्थाचे वाटतात. प्रथमतः जर आपण हे उद्देश सिद्ध करू शकलात तर पुढे चर्चा करु शकतो. कारण ह्या परंपरेवर आपण भेदभावाचा आरोप केला आहे जो सिद्ध करणे आधी आवश्यक आहे. यु मे प्लेज प्रोसीड नाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी

बाळ सप्रे
Sat, 01/30/2016 - 12:55 नवीन
कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी प्रचलित होत असेल तर त्यामागे कुणाचा तरी अवमान करणे, किंवा गैरफायदा घेणे हीच कारणे असतात असे नसते. तुमचे प्रतिसाद ह्या परंपरेत "स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्या हेतुने प्रवेशास बंदी लादणे" हे उद्देश आहेत, ह्या अर्थाचे वाटतात
इथे स्त्रीयांना प्रवेश का नाही हे ठामपणे कोणालाच माहीत नाही. मग काहीतरी टनाटनी थिअरीज पुढे केल्या जातात.. एखादी रुढी/ प्रथा जरी explicitly अपमान करण्यासाठी अथवा खच्चीकरणासाठी नसली तरी त्यातून एखाद्या गटावर विनाकारण निर्बंध घालण्यात काही गैर नाही ही प्रवृत्ती बोकाळते ते गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

'कोणतेही ठोस कारण उपलब्ध नाही

संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 13:16 नवीन
'कोणतेही ठोस कारण उपलब्ध नाही म्हणून जे होतंय ती बंदीच आहे, भेदभावच आहे' हे आपले मत सिद्ध करावे. जे आहे त्याचे खरे कारण शोधण्याचे कष्ट घेण्यापेक्षा असे आरोप करणं फार सोपं आहे. टनाटनी थिअरीज आणि ह्या थिअरीज मधे काही फरक दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

कसलीच थिअरी नाही यात. जे

बाळ सप्रे
Sat, 01/30/2016 - 17:26 नवीन
कसलीच थिअरी नाही यात. जे दिसतय त्यावर मत मांडलय. कमी लेखणं/ खच्चीकरण करायचं नाहिये यात अस मान्य केलं तरी न येण्याचे कारण सांगा नाहीतर ये द्या इतका सरळ प्रश्न आहे.. बाकीच्यांनी बंदीचे कारण शोधण्याचे कष्ट घेण्याचा प्रश्नच नाही. जे बंदी घालतायत (मंदीर ट्रस्ट) त्यांना याचे कारण माहीत असणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा