पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.
पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.
वाचने
120493
प्रतिक्रिया
292
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचे या प्रस्तावास दाबून
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
आशा करूयात
In reply to आमचे या प्रस्तावास दाबून by संदीप डांगे
त्यामुळे स्त्रीयांची लैंगिकता
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
काकाजी स्त्रीयांना सेक्स ड्राइव नसतो ही चूकीची समजूत आहे
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का?
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
हा प्रश्न आधी काकासाहेबना
In reply to तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का? by नूतन सावंत
तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का?
In reply to हा प्रश्न आधी काकासाहेबना by नूतन सावंत
काका माझ्या प्रश्नाचे उत्तर
In reply to तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट आहात का? by विवेक ठाकूर
इथे लिहिले असते पण ते अस्थानी
In reply to काका माझ्या प्रश्नाचे उत्तर by नूतन सावंत
सुरंगीजी,
In reply to काका माझ्या प्रश्नाचे उत्तर by नूतन सावंत
कळ्यांचे निःश्वास लिहिणाऱ्या
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
जोरजोरने हसतेय
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
हंगाशी! आत्ता कसं कामाचं काय
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
(No subject)
संपादक मंडळास नम्र नम्र
टका.. ज्ञानामृत मिळवण्यासाठी
माझा प्रतिसाद उपरोक्त
अगदी अगदी, पूर्ण सहमत. हे
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
ओ ते ठिक आहे हो.. पण मुळात
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
++++++१
In reply to ओ ते ठिक आहे हो.. पण मुळात by पिलीयन रायडर
काकाश्री,
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
काकासाहेब
In reply to माझा प्रतिसाद उपरोक्त by काकासाहेब केंजळे
@ सुबोध् खरे, buccal
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
चुंबनामुळे स्त्रियांना उत्तेजना येते हे निर्विवाद आहे
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
शिवाय,
In reply to चुंबनामुळे स्त्रियांना उत्तेजना येते हे निर्विवाद आहे by विवेक ठाकूर
आणि
In reply to शिवाय, by विवेक ठाकूर
@ सुबोध् खरे, buccal
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
नक्की कोण, कोणाला प्रतिसाद
In reply to @ सुबोध् खरे, buccal by सुबोध खरे
काकासाहेब
In reply to @ सुबोध् खरे, buccal by काकासाहेब केंजळे
१० लिटर लाळ उत्पन्न करेस्तोवर
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
सम्जा
In reply to १० लिटर लाळ उत्पन्न करेस्तोवर by अजया
डॉक्टरांनी अगदी लाळच आयमिन
In reply to काकासाहेब by सुबोध खरे
+१११११११११
In reply to डॉक्टरांनी अगदी लाळच आयमिन by संदीप डांगे
पुरुष आपल्याला व आपल्या
In reply to +१११११११११ by बोका-ए-आझम
थेरॉटीकली हे खरं आहे
In reply to पुरुष आपल्याला व आपल्या by संदीप डांगे
स्त्री किंवा मादी समुच्चयास
ते तर सोडाच बापू
In reply to स्त्री किंवा मादी समुच्चयास by कैलासवासी सोन्याबापु
अहो भ्रम आहेत ते सगळे भ्रम...
In reply to ते तर सोडाच बापू by बोका-ए-आझम
आता फक्त त्या पुरुषाला किस
In reply to अहो भ्रम आहेत ते सगळे भ्रम... by पिलीयन रायडर
पण मग ते सोलह साल की उमरका
In reply to आता फक्त त्या पुरुषाला किस by काकासाहेब केंजळे
काहीही!
In reply to पण मग ते सोलह साल की उमरका by पिलीयन रायडर
पिराताई ,या हो बाहेर
In reply to पण मग ते सोलह साल की उमरका by पिलीयन रायडर
काका,
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
छानच बेअरिंग घेतलय हां काका!!
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
मिपावरच्या कुणीही माझा मुद्दा
In reply to पिराताई ,या हो बाहेर by काकासाहेब केंजळे
ओके.काका म्हणतात तेच खरं :)
हाच तर त्या अमेरिकनानांचा डाव
In reply to ओके.काका म्हणतात तेच खरं :) by अजया
हा मुद्दा ३ वेळा टायपुन खोडला
In reply to ओके.काका म्हणतात तेच खरं :) by अजया
अगदी.निरूत्तर केलं =))उद्या
चांगल्या धाग्याचा कचरा
+१
In reply to चांगल्या धाग्याचा कचरा by संदीप डांगे
.
अगदी अगदी. ज्या मिपाचे सदस्य
In reply to . by कवितानागेश
लाळ :):) .. गडाबडा लोळून लोल
सेक्स नको पण लाळ आवर!
अगदी..
In reply to सेक्स नको पण लाळ आवर! by साती
अर्रर्र काय हे
In reply to अगदी.. by ब़जरबट्टू
अरे काय चाललं ?
In reply to अगदी.. by ब़जरबट्टू
चर्चा चुकीच्या वळणावर गेली
आणि त्यामुळेच वारांगना चुंबन घेऊ देत नाहीत
In reply to चर्चा चुकीच्या वळणावर गेली by विवेक ठाकूर
गुड ज्योक
In reply to आणि त्यामुळेच वारांगना चुंबन घेऊ देत नाहीत by तुषार काळभोर
हार्मोन्स्/न्यूरोट्रान्समीटर्स!
In reply to गुड ज्योक by विवेक ठाकूर
ओ, ,थँक्स !
In reply to हार्मोन्स्/न्यूरोट्रान्समीटर्स! by साती
तुमचे बरेचसे प्रतिसाद!
In reply to ओ, ,थँक्स ! by विवेक ठाकूर
पुनश्च आभार!
In reply to तुमचे बरेचसे प्रतिसाद! by साती
एक चांगली चर्चा भरकटवली आहे.
In reply to पुनश्च आभार! by विवेक ठाकूर
इतकं मनाला लावून घेऊ नका हो
In reply to पुनश्च आभार! by विवेक ठाकूर
तुम्ही तर मला
In reply to इतकं मनाला लावून घेऊ नका हो by संदीप डांगे
ते वेगळ्या कारणासाठी आहे. मला
In reply to तुम्ही तर मला by विवेक ठाकूर
मी मुद्दा लादला नव्हता
In reply to ते वेगळ्या कारणासाठी आहे. मला by संदीप डांगे