पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.
पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.
वाचने
120493
प्रतिक्रिया
292
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके. धन्यवाद! अति होतंय.
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
बाप रे शब्दछल
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही
In reply to बाप रे शब्दछल by चैतन्य ईन्या
हा निष्कर्श कुठून काढला?
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
निष्कर्ष
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
जयकांत शिक्रे
सरांचे नेहमीप्रमाणेच सुंदर
भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न
लोकांना बाकीची पण कामं आहेत,
In reply to भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न by टवाळ कार्टा
तू गप्रांव
In reply to लोकांना बाकीची पण कामं आहेत, by सूड
ए ते 'ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ'
In reply to तू गप्रांव by टवाळ कार्टा
काय अश्लील आहे त्यात?
In reply to ए ते 'ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ' by सूड
मी वरची चर्चा वाचलेली नाही
+ १, या व्यतिरिक्त अजुन काही
In reply to मी वरची चर्चा वाचलेली नाही by पिलीयन रायडर
दोघींचे प्रतिसाद आवडले.
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
नॉर्मल जोडपी, विवाहित स्त्रीया आणि पॉर्न
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
माझा प्रतिसाद लिहून प्रकाशित होईपर्यंत सुबोधजींचा प्रतिसाद आला
In reply to नॉर्मल जोडपी, विवाहित स्त्रीया आणि पॉर्न by विवेक ठाकूर
स्रुजा ताई
In reply to + १, या व्यतिरिक्त अजुन काही by स्रुजा
पि रा ताई
In reply to मी वरची चर्चा वाचलेली नाही by पिलीयन रायडर
प्रतिसाद आवडला.
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
सुबोधजी, एकदम मॅटर ऑफ फॅक्ट प्रतिसाद!
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
साहेब
In reply to सुबोधजी, एकदम मॅटर ऑफ फॅक्ट प्रतिसाद! by विवेक ठाकूर
विठा..
In reply to सुबोधजी, एकदम मॅटर ऑफ फॅक्ट प्रतिसाद! by विवेक ठाकूर
पि रा ताई
In reply to विठा.. by पिलीयन रायडर
तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
पण मग हे प्रश्न नॉर्मल जोडप्यांचेच आहेत ना !
In reply to तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा by पिलीयन रायडर
अहो.. पण ही शेवटी चर्चा आहे.
In reply to पण मग हे प्रश्न नॉर्मल जोडप्यांचेच आहेत ना ! by विवेक ठाकूर
पॉर्न हे उत्तेजनांच्या अनेक पैकी केवळ एक साधन आहे
In reply to अहो.. पण ही शेवटी चर्चा आहे. by पिलीयन रायडर
अत्त्युच्च आनंद(orgasm) या
In reply to पण मग हे प्रश्न नॉर्मल जोडप्यांचेच आहेत ना ! by विवेक ठाकूर
चांगली माहिती आहे.
In reply to अत्त्युच्च आनंद(orgasm) या by सुबोध खरे
माझ्याकडे उत्तरं आहेत
In reply to चांगली माहिती आहे. by पिलीयन रायडर
ओके!
In reply to माझ्याकडे उत्तरं आहेत by विवेक ठाकूर
पिरा ताई
In reply to चांगली माहिती आहे. by पिलीयन रायडर
=)))काहीच नाही!!!
In reply to तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा by पिलीयन रायडर
लेख आवडला , संभोग करावयास न
स्वागत.
In reply to लेख आवडला , संभोग करावयास न by बॅटमॅन
ब्याटमनराव आल्या आल्या षटकार
In reply to लेख आवडला , संभोग करावयास न by बॅटमॅन
सरळ अर्थः पार्टनर नसेल तर
In reply to ब्याटमनराव आल्या आल्या षटकार by माहितगार
सरळ अर्थः पार्टनर नसेल तर
In reply to सरळ अर्थः पार्टनर नसेल तर by तर्राट जोकर
इमॅजिनेशनचे काम थांबते का?
In reply to सरळ अर्थः पार्टनर नसेल तर by माहितगार
आधीचे विवरण झेपले
In reply to इमॅजिनेशनचे काम थांबते का? by तर्राट जोकर
फँटसी व विकृती यात फरक आहे.
In reply to आधीचे विवरण झेपले by माहितगार
टेक केअर!
=))
आलेच!
In reply to =)) by अजया
तब्येत सांभाळ आधी पैसा काकू
In reply to आलेच! by पैसा
ओक्के
In reply to तब्येत सांभाळ आधी पैसा काकू by स्पा
इतके वाचल्यावर प्रश्न पडलाय..
स्त्रीया म्हणतात बहुतांश
In reply to इतके वाचल्यावर प्रश्न पडलाय.. by टवाळ कार्टा
गलत जवाब :)
In reply to स्त्रीया म्हणतात बहुतांश by संदीप डांगे
प्लिज एक्स्प्लेन हाऊ?
In reply to गलत जवाब :) by टवाळ कार्टा
+१ ती माहिती हवी असेल तर जोडिदारणीलाच विचारावे.
In reply to स्त्रीया म्हणतात बहुतांश by संदीप डांगे
खरे काका खुप छान लेख
डॉक्टर साहेबांचे शास्त्रीय
मिपावर सगळेच अभ्यासू.
काय ठरलं शेवटी
सुमारे दोनशे प्रतिसाद आणि
In reply to काय ठरलं शेवटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय उत्तम लेख, आणि अत्यंत
काय गंमत आहे मला वाटल होत चर्चा एव्हाना संपली असेल.
२०० वा प्रतिसाद.
खर्या शरीरसंबंधात असमाधानी
स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह
Mala kunich sangitla nahi he!
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
पिराताई ,अमेरीकन
In reply to Mala kunich sangitla nahi he! by पिलीयन रायडर
अर्रर्रर्र..... देवा! नको ना
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
ठ्ठो =)))))))))
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
अजयातै चुकताय तुम्ही.
In reply to ठ्ठो =))))))))) by अजया
काका (पासून) मला वाचवा
In reply to स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह by काकासाहेब केंजळे
डॉक्टरसाहेब, इतक्या वर्षांची
In reply to काका (पासून) मला वाचवा by सुबोध खरे
डांगे साहेब
In reply to डॉक्टरसाहेब, इतक्या वर्षांची by संदीप डांगे