Skip to main content

पॉर्नची गरज आहे का?

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 25/01/2016 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
पॉर्नची गरज आहे का? या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे. पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे. संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे. काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही. सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे. बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते? पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते. त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते. अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे. म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते. मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.) काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती. आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते. या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात. नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे. अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात. बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते. उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते. एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो. ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका" असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो. प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील. १००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे. परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते. हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.

वाचने 120493
प्रतिक्रिया 292

प्रतिक्रिया

In reply to by विवेक ठाकूर

ओके. धन्यवाद! अति होतंय. सांभाळा स्वतःला. गेट वेल सून.

In reply to by विवेक ठाकूर

बाप रे किती ते शब्दछल. तुम्हाला बाकीच्यांचेच बरोबर असूच शकत नाही आणि आपण म्हणतो तेच खरे आहे असे वाटते असा माझा समज झाला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे हे मान्य करणे इतका का अवघड वाटते? ह्यातुन सध्या काय होतंय हे कळत नाहीये. उलट प्रतिसाद वाचून उलट विषय उगाचच ताण्यलासारखा वातातोय. तुम्हाला वाटत असलेले अगदी बरोबर आहे पण हे फार आयडियल आहे. किंवा तुमच्या जवळ खरच जुळवून घेणे किंवा आहे त्या परिस्थितीला बरोबर सामावून घेवून आनंद शोधणे आणि आनंदी राहणे हि फार मोठी देण आहे. पण दुर्दैवाने असे विचार किंवा इतके ठाम विचार बहुतांश लोकांचे नसतात. ते असायला पाहिजेल पण ते होत नाही. इतके मान्य करण्यात तुम्हाला का त्रास होतो हे जरा मला समजायला कठीण जातंय. असो.

In reply to by चैतन्य ईन्या

म्हणजे कमाल आहे. त्यावर पुन्हा : तुम्हाला बाकीच्यांचेच बरोबर असूच शकत नाही आणि आपण म्हणतो तेच खरे आहे असे वाटते असा माझा समज झाला आहे हा निष्कर्श कुठून काढला? मी फक्त त्यांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो, विषय ताणण्यात मला अजिबात रस नाही. प्रतिसादात उपस्थित केलेला प्रश्न, वैवाहिक जीवनातला खरोखर केंद्रिय मुद्दा आहे.

In reply to by विवेक ठाकूर

तुम्ही तर निष्कर्श काढयाच्या आधीच त्याला निरुपयोगी ठरवुन टाकले आहे. त्याबद्द्ल काहिच म्हणत नाही आपण?

In reply to by विवेक ठाकूर

तिसादात उपस्थित केलेला प्रश्न, वैवाहिक जीवनातला खरोखर केंद्रिय मुद्दा आहे.>> ह्याच मुद्यावर मी पण म्हणतो आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळालेला जोडीदार आहे तसा स्वीकारून आनंदात राहता यायला पाहिजेल हे तुमचे मान्य आहे. फक्त प्रत्यक्ष जीवनात तसे घडत नाही. इतकेच मान्य करणे तुम्हाला अवघड जातंय असे तुमच्या प्रतिसादावरून वाटते आहे. म्हणून निष्कर्ष तुमच्या प्रतिसादावरून वाटतोय असे म्हटले आहे हो. जरा समजून घ्या. तुमचे बरोबर आहे असेच म्हणत आहे पण तेच बरोबर आहे असा तुमचा आग्रह आहे हे जाणवत राहते. त्यातून बाकीची वेगळी बाजू असू शकते हे तुम्हाला मान्य होताना दिसत नाहीये.

जयकांत शिक्रे तुम्हे मै नहि तुम्हारा अहंकार हि मारेगा :))

सरांचे नेहमीप्रमाणेच सुंदर प्रतिसाद परत एकदा पाहून आमचे ड्वाल्ले पाणावले. (फीलींग नॉस्टॅल्जिक्क)

मी वरची चर्चा वाचलेली नाही कारण त्याने अजुन प्रचंड गोंधळच उडण्याची शक्यता आहे. डॉ. खरेंना मला दोन प्रश्न विचारायचे आहेत १. तुम्ही ह्या लेखात मुख्यतः स्त्रियांच्या स्थुलतेमुळे किंवा उत्सुक नसल्यामुळे पुरुषांना उत्तेजित होणे अवघड असते ह्या प्रकारची उदाहरणे दिली आहेत. तर पुरुषांमुळे स्त्रियांमध्येही उदासिनता येण्याचे अनुभव तुम्हाला असतीलच. जसे की टक्कल, सुटलेले पोट, तोंडाचा वास इ मुळे स्त्रियांना प्रणयात उदासिनता येणे. तर अशा वेळेस स्त्रियांच्या आनंदाचा विचार करुन काही उपाययोजना केल्या असे अनुभव आहेत का? तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे संबंध येणे हे मुख्यतः पुरुषाच्या उत्तेजित असण्यावर अवलंबुन आहे, तेव्हा त्यासाठी पुरुषाचा विचार आधी केला जात असेल. पण संबंध येऊनही त्यातुन स्त्रिला कोणताच आनंद न मिळणे अगदी शक्य आहे. तर स्त्रियांचा "Orgasm" ह्या विषयावर पुरुषांचे समुपदेशन कधी केले आहे का? केले असल्यास, त्यातील मुद्दे काय? २. एखाद्या केस मध्ये कधी स्त्रीला पॉर्न बघण्यास सांगितले आहे का? ते शिष्टाचाराला धरुन नसेल, पण तिच्या नवर्‍याला तसे सुचवले आहे का? विचारण्याचा मुद्दा हा की ज्या संबंधात रस उरलेला नाही तिथे स्त्रियांचा पॉर्नचा वापर असतो का? साधारणपणे स्त्रियांना ह्या गोष्टी किळसवाण्या वाटतात. तेव्हा मुख्यतः त्या ते पहात नसतील असाच समज असावा. (अदितीच्या सर्वेचे निष्कर्ष इथे विदा देतीलच.) तर अगदी किळसवाणे पॉर्न नाही तरी सॉफ्ट पॉर्न जिथे केवळ उत्तेजन आणण्यापुरत्या गोष्टींचा समावेश असेल. अनेक पोर्न समर्थक इथे "तुम्ही चांगले पॉर्न पाहिलेच नाही" असा दावा करताना दिसतात. त्यात कदाचित ह्या गोष्टींचा समावेश असावा. तुमच्या एवढ्या अनुभवात कोण्या स्त्रीने असा पॉर्नचा वापर केलेला माहिती आहे का? किंवा स्त्रिया आणि पॉर्न ह्या विषयावर आपला अनुभव एक डॉक्टर म्हणुन काय आहे?

In reply to by पिलीयन रायडर

+ १, या व्यतिरिक्त अजुन काही प्रश्न मनात आहेत. १. बायकांच्या थंड रीस्पॉन्स साठी काही जीवशास्त्रीय कारणं पण असू शकतील ना? म्हणजे एखाद्या हार्मोन चा गेलेला तोल, त्याने इच्छा कमी होणं वगैरे ? व्हॅजिनिस्मस ने सुद्धा अनेकदा त्रासाच्या कल्पनेनेच संबंध टाळणं वगैरे? २.
बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर). बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
तुम्ही असं ही लिहिलंय की महिला सुंदर असेल तर नवरा जास्त प्रयत्न करुन तिला "सुखात" ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग सुंदर बायकांचा उत्साह संबंधाच्या बाबतीत नेहमीच चांगला असतो असा काहीसा सूर वाटतोय.सुंदर पण थंड बायकांच्या नवर्‍यांचे अनुभव काय असतात? यावर थोडा खुलासा कराल का? सुंदर कपल्स ना पण फर्टिलिटी इशुज अस्तात च. रुप बघुन शरीर बंड पुकारत नाही. त्या ही जोडप्यांना यांत्रिक रित्या सांगितलेल्या वेळेत संबंध ठेवणं फ्रस्ट्रेटिंग च होत असणार. मुळात च कितीही आवडतं काम असलं तरी करायला भाग पाडलं की मन का कु करतं, त्यात बायकोच्या जाड/ बारीक असण्याचा संबंध किती आणि फर्टिलिटी च्या स्ट्रेस चा किती? ३. तुम्ही जी वर टक्के वरी दिलेली आहे १०० %, ९० % ती वंध्यत्व असणार्‍या जोडप्यांमधल्या ९० - १०० % बायका अशा पाहिल्यात अशी आहे का? ४. आणखीन एक मला अधोरेखित करावंसं वाटतं , ते म्हणजे, मला एक जेनुईनली प्रश्न पडलाय. माझा, धाग्याचं शिर्षक आणि सुरुवातीचे परिच्छेद वाचुन असा समज झालाय की "पॉर्न चा असा ही उपयोग " हा त्याचा आत्ताच्या (अदितीच्या सर्व्हे च्या) संदर्भात आणि मर्यादित स्वरुपातला विषय आहे. पण पुढची तुमची कारण मीमांसा वाचुन नेमक्या कुठल्या बायकांच्या गटाबद्दल ही निरीक्षणं आहेत हे कळेनासं झालंय म्हणुन प्रश्न क्रमांक ३.

In reply to by स्रुजा

सुबोधजींचा आभ्यास वंध्यत्त्वावर आहे, त्यामुळे नॉर्मल जोडपी, विवाहित स्त्रीया आणि पॉर्न या विषयावर त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहातोयं. दोघींनी नाण्याची दुसरी बाजू यथार्थपणे मांडली आहे. आणि माझ्या मते चर्चा आता, सर्वांना उपयोगी होईल अशा वळणावर आहे. विशेषतः हे मुद्दे सॉलीड आहेत : संबंध येणे हे मुख्यतः पुरुषाच्या उत्तेजित असण्यावर अवलंबुन आहे, तेव्हा त्यासाठी पुरुषाचा विचार आधी केला जात असेल. पण संबंध येऊनही त्यातुन स्त्रिला कोणताच आनंद न मिळणे अगदी शक्य आहे. तर स्त्रियांचा "Orgasm" ह्या विषयावर पुरुषांचे समुपदेशन कधी केले आहे का? केले असल्यास, त्यातील मुद्दे काय? ज्या संबंधात रस उरलेला नाही तिथे स्त्रियांचा पॉर्नचा वापर असतो का? साधारणपणे स्त्रियांना ह्या गोष्टी किळसवाण्या वाटतात. तेव्हा मुख्यतः त्या ते पहात नसतील असाच समज असावा. तुमच्या एवढ्या अनुभवात कोण्या स्त्रीने असा पॉर्नचा वापर केलेला माहिती आहे का? किंवा स्त्रिया आणि पॉर्न ह्या विषयावर आपला अनुभव एक डॉक्टर म्हणुन काय आहे? सुंदर कपल्स ना पण फर्टिलिटी इशुज अस्तातच. रुप बघुन शरीर बंड पुकारत नाही. त्या ही जोडप्यांना यांत्रिक रित्या सांगितलेल्या वेळेत संबंध ठेवणं फ्रस्ट्रेटिंग च होत असणार. मुळातच कितीही आवडतं काम असलं तरी करायला भाग पाडलं की मन का कु करतं, त्यात बायकोच्या जाड/ बारीक असण्याचा संबंध किती आणि फर्टिलिटीच्या स्ट्रेसचा किती?

In reply to by स्रुजा

स्रुजा ताई बायकांच्या थंड रीस्पॉन्स साठी काही जीवशास्त्रीय कारणं पण असू शकतील ना? म्हणजे एखाद्या हार्मोन चा गेलेला तोल, त्याने इच्छा कमी होणं वगैरे ? व्हॅजिनिस्मस ने सुद्धा अनेकदा त्रासाच्या कल्पनेनेच संबंध टाळणं वगैरे? हि तर नेहेमीचीच करणे आहेत. पाळीच्या अगोदर काही दिवस विशेषतः ज्यांना PMS (PRE MENSTRUAL SYNDROME) असतो त्यांना संबंध नकोसा वाटतो. योनीमार्गाचा दाह, जननेन्द्रियाचा जंतुसंसर्ग यामुळे पण स्त्रियांना संबंद नकोसा वाटतो. प्रसुतीनंतर येणारे नैराश्य( POST NATAL DEPRESSION) यात स्त्रीला संबंध नकोसा वाटतो आणी नवर्याने त्यात जबरदस्ती केली तर प्रश्न अधिकच जटील होतो. माझ्या माहितीतील एका स्त्रीरोग तज्ञ बाईनी यामुळे आत्महत्या केलेली आहे. महिला सुंदर असेल म्हणून त्यांचे संबंध सुंदर असतात याला कोणताही आधार नाही. या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध अजिबात नाही( MUTUALLY EXCLUSIVE). एक म्हण आहे कि दुसर्याच्या नव्या बूटांचा हेवा करू नका कारण ते कुठे चावत आहेत ते तुम्हाला कुठे माहित आहे ? या म्हणीला मी पुरवणी जोडतो ती अशी दुसर्याचा "सुंदर बायको" असल्याबद्दल हेवा करू नका कारण बेडरूम मध्ये ती कशी आहे ते तुम्हाला कुठे माहित आहे? Never envy someone’s new shoes because you don’t know where they pinch Never envy someone’s beautiful wife because you don’t know how she is in bedroom. स्त्रीच्या सौंदर्याचा आणि तिच्या जडण घडणीचा किंवा मानसिक स्थितीचा काहीही संबंध नाही. आदिवासी किंवा उलट बर्याच वेळेस आडमुठ्या बायका आपल्या सौंदर्याचा विपरीत उपयोग करून घेताना आढळतात. वंध्यत्व आणि सौंदर्य याचाहि काही संबंध नाही. तुम्ही असं ही लिहिलंय की महिला सुंदर असेल तर नवरा जास्त प्रयत्न करुन तिला "सुखात" ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आपण केलेले विधान मधला संदर्भ गाळल्याने झाले आहे. बायको सुंदर असेल तर ती "बाहेर" सुख पाहू नये म्हणून नवरा तिला "सुखात" ठेवण्याचा प्रयत्न करतो. बायको जर अतिविशाल असेल तर सहसा "तिच्या" कडे कोणी पाहणार नाही. या विचाराने नवरा आश्वस्त असतो. "जोडप्यांना यांत्रिक रित्या सांगितलेल्या वेळेत संबंध ठेवणं फ्रस्ट्रेटिंग च होत असणार." हि मात्र वस्तुस्थिती आहे. मग ते जोडपे सुंदर असो वा नसो किंवा आपसातील सामंजस्य कितीही असो. म्हणून मी बहुतांश जोडप्यांना एक गोष्ट सांगतो कि जर स्त्रीपुरुष संबंधांची गरज फक्त पुनरुत्पादनासाठी असती तर स्त्री गरोदर राहिली तर संबंधांची गरज राहणार नाही. निसर्गाने असे केलेलं नाही. तेंव्हा तुमच्या संबंधात "प्रणयरम्यता "(ROMANCE) असलं पाहिजे आणि हे तुमच्या आपसातील नात्यासाठी फार महत्त्वाचे आहे. शारीरिक जवळीक हि मानसिक जवळीकीस मदत करते. नेमक्या कुठल्या बायकांच्या गटाबद्दल ही निरीक्षणं आहेत हे कळेनासं झालंय. बहुसंख्य बायका या कल्पनाविलासात( FANTASY) रमतात हि गोष्ट सर्व साधारण बायकान्बद्दल आहे. लग्न पूर्वी बायका आपल्या सुखी संसाराचे चित्र मनात रंगवत असतात. आपल्या जोडीदाराबद्दल कल्पनाविलासात( FANTASY) रमतात.लग्नानंतर नवर्याने आपल्याला असे फुलवावे असे चिडवावे आणी यानंतर आपण त्याच्या मिठीत विरघळून जावे ई सर्व कल्पना विलासात बहुसंख्य (कदाचित १००%) बायका रमतात.

In reply to by पिलीयन रायडर

पि रा ताई पुरुषांमुळे स्त्रियांमध्येही उदासिनता येण्याचे अनुभव हे तर रोजचेच आहेत.अगदी देव आनंद सारखा नवरा असेल आणि सिगारेट दारू पिउन आरडा ओरडा करत निद्रघरात आला तर कोणती स्त्री उमलून येईल? वंध्यत्वाच्या उपचारात एका ठराविक दिवशी संबंध येणे आवश्यक असते त्यावेळची गोष्ट वेगळी आहे. तेंव्हा स्त्रीच्या मनात नसले तरी संबंध ठेवणे आवश्यक ठरते कारण निसर्ग आपले काम करतोच. हि गोष्ट वेगळी आहे. नवरे दारू पिउन आले कि तोंडाचा वास हा स्त्रियांना नकोसाच असतो.हीच गोष्ट सिगारेटचीही आहे. मग नवरा पान किंवा हॉल्स खाउन आला तरीही. नवर्याच्या अंगाचा/ घामाचा वास आला तरी तो स्त्रियांच्या आनंदात मिठाचा खडा टाकणारा असतो. दुर्दैवाने स्त्रियांना आपल्या समाजात गृहीतच(taken for granted) धरले जाते आणि तिच्या सुखाचा विचार हा बहुतांश पुरुषांच्या खिजगणतीत नसतो. स्त्रियांना सुद्धा नवर्याच्या सुखातच आपले सुख असते हे "बाळकडू" पाजलेले असते त्यामुळे त्यासुद्धा स्वतःच्या सुखाचा फार विचार करीत नाहीत. कारण असा विचार करून त्यांना अधिकच त्रास होतो. अनेक वेळेस संबंधाला नकार दिला तर नवरा आक्रस्ताळेपण करतो हे समजून आल्याने त्या संबंधास समती देतात. कारण पाच मिनिटे शांतपणे "पडून" राहिल्यास पुढचे काही तास/ दिवस शांततेत जातात. शिवाय एकदा नवरा "शांत"झाला कि आपल्या मनासारख्या बर्याच गोष्टी नवर्याकडून करून घेता येतात हे त्यांना अनुभवाने समजलेले असते. "हे" अगदी ग्राम्य पातळीवरील असले तरीही सत्य आहे. तुम्ही जसा मनाविरुद्ध टोल नाक्यावर टोल भरता तशीच हि परिस्थिती आहे. हा "टोल" भरला कि नवरा घरात आपल्या मनाप्रमाणे वागू देतो हे त्यांना अनुभवाने समजलेले असते. राहिली गोष्ट समुपदेशनाची-- बहुसंख्य बायका आपल्या सुखाबद्दल प्रत्यक्ष तक्रार करीत नाहीत. हि तक्रार नवर्यामार्फतच येते. म्हणजे नवरेच येतात. "कमजोरी" आहे. वीर्यस्खलनच होते इ. बायकोला संबंधात रसच राहिलेला नाही हि तर फारच कॉमन तक्रार आहे. दुर्दैवाने काही स्त्रियांची "आता कुठे असतं का" "दोन मुलं झाली" अशी मनोवृत्ती तिशी पस्तीशीलाच होते. कित्येक स्त्रिया संभोगातून स्त्रीने सुख मिळवणे हे काहीतरी गुन्हा असल्या सारखे मानतात. काही स्त्रिया संबंध हे फक्त मुले होण्यासाठी असतात अशा गैरसमजुती घेऊन आलेल्या असतात.एक स्त्री तर फक्त साडी वर करत असे आणि नवर्याला "उरकून घ्या" सांगत असे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांची मानसिक जडण घडण काय आहे हे पाहावे लागते. यानंतर जेंव्हा बायकांना थेट प्रश्न ते सुद्धा खोदून विचारावे तेंव्हाच त्यांचे प्रश्न पुढे येतात.बर्याच बायका नवर्या बद्दल बोलायला नकार देतात. कारण नवरा बायकोतील गोष्टी बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत हि माहेरची शिकवण (किंवा संस्कृती) घेऊन आलेल्या असतात. या सगळ्या गोष्टी हिशेबात धरल्यानंतर दोघांचे समुपदेशन करावे लागते. मुळात स्त्रियांची वासाची आणि दृष्टीची संवेदनशीलता पुरुषापेक्षा जास्त असते.त्यामुळे स्त्रीला उद्दीपित करण्यासाठी मंद सुगंध, मंद संगीत आणि मंद प्रकाश याचा जास्त चांगला उपयोग होतो. यात त्यांच्या भावना सहज प्रदीप्त होतात. हे वर्णन मी माझ्या एका धाग्यात आरोग्य पंचविशी -२ -- गंधार-पुढे http://www.misalpav.com/node/25466 केलेले आहे. स्त्रियांना उत्फुल्लित करण्यासाठी पॉर्न ची गरज लागत नाही. तिला समजून घेणारा नवरा असेल तर तेवढेही बर्याच बायकांना पुरते. दुर्दैवाने बरेचासे पुरुष हे स्त्रियांना समजून घेण्याऐवजी गृहीत धरतात. एक गोष्ट म्हणजे बर्याचशा बायकांनी नवर्याला पडलेले टक्कल स्वीकारलेले असते ( ते नवर्याचा हातात नसते म्हणून हि असेल). परंतु नवर्याचे "थोडेसे सुटलेले" पोट सुद्धा स्त्रियांना चालते. (कदाचित यात कुठेतरी तिच्या सुगरणपणाची पावती असते यामुळेही असेल) पण नवर्याच्या अंगाचा/ तोंडाचा वास मात्र बहुतांश स्त्रियांना अजिबात आवडत नाही. बहुतांश स्त्रियांची परिस्थिती "तरुण आहे रात्र अजुनी" या गाण्याप्रमाणे असते. कारण नवरा चार पाच मिनिटात आपले "काम" उरून झोपी गेलेले आढळतात( विशेषतः दारू प्यायल्यावर) . हे गाणे "या संदर्भात" परत ऐकून पहा तुम्हाला त्याचा अर्थ नव्याने जाणवेल. समुपदेशन करताना काही वेळेस स्त्रीपुरुषाना एकत्र सॉफ्ट पॉर्न पाहायला सांगितले जाते. या तर्हेच्या पॉर्नमध्ये शरीराचा कोणताही अवयव पूर्ण अनावृत्त न करता दाखवलेला असतो ( स्त्रिया अंगावर बिकिनी घालून असतात) आणि यात बर्याच गोष्टी प्रत्यक्ष न दाखवता सुचित केलेल्या असतात. अशा तर्हेचे पॉर्न स्त्रियांना जास्त आवडते. आणि अशा चित्रफिती पाहून स्त्रिया जास्त उत्तेजित होतात आणि संबंधात जास्त उत्कटता येते असे बर्याच पुरुषांनी सुचविलेले आहे. मी परत एकाच उद्धृत करू इच्छितो कि पॉर्न पाहावे कि नाही हा पूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचा निर्णय हा प्रत्येक व्यक्तीने स्वतः घ्यायचा आहे. मी पॉर्न चांगले आहे किंवा तुम्ही पहा असे कोणत्याही तर्हेने सुचित करू इच्छित नाही. मुळात कायद्याप्रमाणे कोणती गोष्ट पॉर्न आहे आणि कशावर बंदी आहे हेहि अजून नक्की झालेले नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद आवडला. तुम्ही म्हणताय ते मुद्दे नक्कीच आहेतच. आपल्या समाजात स्त्रियांची मानसिक जडणघडणच तशी मुद्दाम करतात. ह्या विषयावर तर कुणी बोलतच नाही. आपली संस्कृती पुरुष प्रधान आहेच. दुर्दैवाने त्यामध्ये स्त्री भरडली जाते अनेकदा. (पुरुषांना समजाकडुन आपले स्वतंत्र त्रास असतीलच.. पण तो सध्या माझा विषय नाहीये..) तर स्त्रिया आणि पॉर्न मध्ये सॉफ्ट पॉर्नने स्त्रिया उत्तेजित होतात आणि त्याची संबंधाना मदत होऊ शकते हा मुद्दा पटला आणि मान्य. पण एकंदरीतच पुरुषांना स्त्री च्या आनंदाची (Orgasm) कितपत जाणीव असते? अनेकांना नसावीच असा मझा कयास आहे.. पण त्यातही सुशिक्षित जनतेला तरी असते का? त्यासाठी पुरुष प्रयत्न करतात का? की त्यांनाही स्वतःचे उत्सर्जन करुन क्रिया संपवणे इतक्याच गोष्टीत रस असतो? तुम्ही लेखात म्हणलाय त्याप्रमाणे दोन्ही इंजिन्सच वेगवेगळी आहेत. स्त्रियांना तापायला वेळ लागतोच. पण हा मुद्दा किती पुरुष लक्षात घेत असावेत? मला तरी बहुदा घेत नसावेत असंच वाटतय.. तर ह्यावर समुपदेशन होते का? म्हणजे तुम्ही म्हणताय तसं एखादी बाई "उरकुन घ्या" म्हणत असेल तर तिथे कदाचित पुरुषाचीही काही चुक असेल ज्यामुळे तिला त्यात रस नाही. तर इथे पुरुषाचेही समुपदेशन होते का? की जो आनंद तिला मिळतच नाही, त्यासाठी ती उत्सुक कशी असेल? बाळ होण्यासाठी एका विशिष्ट दिवशी संबंध येणे आवश्यक आहे आणि तेव्हा बाकी मुद्दे गैरलागु असतील. पण इतर वेळी स्त्री पुरुषांचे संबंध सुधारण्यासाठी असे समुपदेशन होत असेलच ना?

In reply to by सुबोध खरे

धाग्याचं तुम्ही निवडलेलं शीर्षक आहे :`पॉर्नची गरज आहे का?' आणि नेमक्या प्रश्नावरच तुम्ही संपूर्ण तटस्थतेनं म्हणतायं : मी परत एकाच उद्धृत करू इच्छितो कि पॉर्न पाहावे कि नाही हा पूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचा निर्णय हा प्रत्येक व्यक्तीने स्वतः घ्यायचा आहे. मी पॉर्न चांगले आहे किंवा तुम्ही पहा असे कोणत्याही तर्हेने सुचित करू इच्छित नाही. त्यामुळे मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहातो. थोडक्यात वी आर बॅक टू स्क्वेअर वन. आणि खरा प्रश्न तोच आहे, नॉर्मल जोडप्यांना `पॉर्नची गरज आहे का?

In reply to by विवेक ठाकूर

साहेब हा विषय काथ्याकुट मध्ये टाकलेला आहे आणी मी काही सर्वज्ञ नाही कि या विषयावरील अधिकारीहि नाही कि मी यात अंतिम मत द्यावे. प्रत्येकाने आपल्या क्षमते प्रमाणे, ज्ञान आणी अनुभव या प्रमाणे याचा अर्थ लावावा. चार बुकं वाचली आणी चार रुग्ण पहिले म्हणून मला या विषयाचे सखोल ज्ञान आहे असे मुळीच नाही. स्त्रीपुरुष संबंध हा विषय प्रचंड खोल लांब आणी रुंद आहे. समुद्र किनार्यावर वाळू असते त्या वाळूतील एका कणाएवढे ज्ञान( कदाचित माहितीच) माझ्याजवळ आहे. तेंव्हा या ( किंवा कोणत्याही विषयावर) अंतिम मत द्यावे अशी माझी काय लायकी आहे?

In reply to by विवेक ठाकूर

विठा.. नॉर्मल जोडप्यांना (ज्यांचे बाळ होणे ते संबंध ठेवण्याचे ध्येय नाही) "गरज" फक्त इच्छेची आहे. एकदा ती असली मग कशाला अजुन काही हवे. पण मुळात एका टप्प्यानंतर इच्छाच अनेक कारणांनी कमी होते. त्याला शाररिक, मानसिक, सामाजिक कितीही कारणं असतील.. एक तोच तोच पणाही आलेला असतो.. तेव्हा अनेक जोडपे प्रयोग करुन पहातात, नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. ह्यात पॉर्नचा "उपयोग" होऊ शकतो. पण पुन्हा एकदा.. ती "गरज" कशी असेल? पॉर्न शिवाय संबंध होतच नाहीत असं थोडीच आहे? मला वाटतं म्हणुनच खर्‍यांनी अशी उदाहरणे दिली आहेत जिथे पॉर्न केवळ एक साधन न रहाता, संबंध घडवायला आवश्यक गोष्ट = गरज होऊन जाते. पण अर्थातच ही जोडपी उपचार घेत आहेत. बाळासाठी प्रयत्न करत आहेत. * - माझा अनुभव अगदीच तोकडा आहे. मी फार लोकांशी ह्यावर कधी चर्चा केलेली नाही. समुपदेशन वगैरे तर नाहीच नाही. शिवाय मी सामान्य लोक बघते ज्यांना कधी कधी कंटाळा वगैरे येतो एकमेकांचा.. मदन आणि रतीच्या अवतारांबद्दल मी बोलतच नाहीये.

In reply to by पिलीयन रायडर

पि रा ताई बरीच जोडपी एकत्रपणे आणी त्याहून बरेच जास्त पुरुष एकटे पॉर्न पाहतात. यातून बर्याच लोकांना वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणी त्या प्रत्यक्षात आणून लोक आपल्या प्रणयी आयुष्यात "विविधता" आणण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा प्राचीन भारतात संभोगाची विविध आसने असणारी पुस्तके किंवा खजुराहो सारख्या ठिकाणच्या मूर्ती अथवा कामसूत्र "सारखे" ग्रंथ( मी कामसूत्र वाचलेले नाही तेंव्हा त्यात काय आहे हे मला माहिती नाही) हे ग्रंथ कशासाठी निर्माण झाले आहेत/ असावेत. अर्थात या गोष्टी अत्यावश्यक आहेत का? हा प्रश्न मिसळ किंवा मिरचीचा ठेचा खाणे अत्यावश्यक आहे का याच पातळीवरचा आहे. ज्याने त्याने आपापले उत्तर शोधावे.

In reply to by सुबोध खरे

तेच तर.. नॉर्मल जोडप्यांचा प्रणय हा त्यांनीच ठरवायचा विषय आहे. इथे गुद्दागुद्दी करुन काय होणारे..?

In reply to by पिलीयन रायडर

१) पण एकंदरीतच पुरुषांना स्त्री च्या आनंदाची (Orgasm) कितपत जाणीव असते? अनेकांना नसावीच असा मझा कयास आहे.. पण त्यातही सुशिक्षित जनतेला तरी असते का? त्यासाठी पुरुष प्रयत्न करतात का? की त्यांनाही स्वतःचे उत्सर्जन करुन क्रिया संपवणे इतक्याच गोष्टीत रस असतो? २) तुम्ही लेखात म्हणलाय त्याप्रमाणे दोन्ही इंजिन्सच वेगवेगळी आहेत. स्त्रियांना तापायला वेळ लागतोच. पण हा मुद्दा किती पुरुष लक्षात घेत असावेत? मला तरी बहुदा घेत नसावेत असंच वाटतय.. तर ह्यावर समुपदेशन होते का? ३) म्हणजे तुम्ही म्हणताय तसं एखादी बाई "उरकुन घ्या" म्हणत असेल तर तिथे कदाचित पुरुषाचीही काही चुक असेल ज्यामुळे तिला त्यात रस नाही. तर इथे पुरुषाचेही समुपदेशन होते का? की जो आनंद तिला मिळतच नाही, त्यासाठी ती उत्सुक कशी असेल? आणि तुम्हाला त्यांचीच तर उत्तरं इथे हवी आहेत.

In reply to by विवेक ठाकूर

अहो.. पण ही शेवटी चर्चा आहे. साधारण ट्रेन्ड काय हे समजुन घेण्याची. अदिती तेच तर करतेय ना. उपयोग नक्की कशाचा होणार? पॉर्न हवं की नको? ह्याचे के ठाम उत्तर कसे असेल? शेवटी ते त्या जोडप्याने ठरवायचे ना? मग तुम्ही काय ते एकच उत्तर सांगा असा आग्रह का करताय? असं एक उत्तर नसतंच..

In reply to by पिलीयन रायडर

आणि त्याच्या अनुषंगानं सर्व चर्चा चालली आहे, तस्मात `ज्याचा त्यानी निर्णय घ्यावा' हे कन्क्लुजन असेल तर काय उपयोग? ते तर प्रत्येक जण करतो आहेच. त्यामुळे मी त्याविषयी आग्रह सोडला आहे. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावर काय चर्चा होते ते पाहू.

In reply to by विवेक ठाकूर

अत्त्युच्च आनंद(orgasm) या बदल स्त्रीरोग शास्त्राच्या पुस्तकातील काही उतारे जसेच्या तसे देत आहे. (टंकाळा) Only about a third of women experience orgasm regularly during intercourse. Another third can reach orgasm with intercourse but need extra stimulation. A third never achieve orgasm during intercourse but can by manual and oral stimulation. Having orgasms by means other than intercourse is a normal variation of female sexuality. In the past, people thought that “mature” women had their orgasms with intercourse; you will sometimes run across an older book that has this view. However, laboratory studies in the 1960’s showed that an orgasm is an orgasm no matter which way you obtain it. How a woman reaches an orgasm has nothing to do with her mental health or emotional maturity. "Women who have never had an orgasm may never have learned what type and duration of stimulation they need." While there are many ways a loving partner can help a woman reach orgasm, in the end, a woman is responsible for her own sexual pleasure. That does not mean her partner should not be involved. Communication between partners is very important. It is up to the woman to inform her partner her likes and dislikes in their love making. A woman has to have an orgasm in order to enjoy sex. This myth seems to be more common among men than among women. Many women enjoy the closeness and physical intimacy of sex and are satisfied even if they do not, or do not always, have an orgasm. An orgasm is always an earth-moving experience and there is something wrong with a woman if she is unable to reach orgasm."This is myth." The fact is some women have orgasms and don’t know it. Some women do not experience orgasm in the sense of feeling their pelvic floor muscles contract. They do however reach a peak of arousal after which they feel very relaxed and contented, the same feelings other women experience after orgasm. By contrast, women who get very aroused and do not experience orgasm will sometimes feel “nervous” or “edgy” or even an aching discomfort in their pelvis. What can you do? Relax-- It is possible to try too hard. Focus on enjoying the process, not on whether or not you will have an orgasm. Communicate-- Communicate with your partner your preferences when it comes to sex. Your partner cannot read your mind. Encourage--If you or your partner are doing something pleasurable, encourage your mate to continue. Enjoy--Learn to enjoy and feel comfortable with your sexuality. Your current inability to have an orgasm is not a reflection of your femininity, your psychological or emotional health. Putting yourself down just makes it that much more difficult. Fantasize--Some women have trouble concentrating during sex. If that is the case, you may wish to fantasize, i.e., thinking about something sexual may excite you and may reduce negative emotions. If you feel that you are very close to achieving an orgasm, alternate tightening and relaxing your pelvic floor muscles. This may sometimes trigger a real orgasm. Arouse--For some couples, love making ends once the man ejaculates. Often, at this point the woman is very aroused. If this is the case, you might ask your partner to continue stimulating you with his hands or his mouth once he is finished. Some women feel uncomfortable doing this, thinking that this would be selfish or that their partner would be bored. In fact, your partner may enjoy giving you pleasure. Rather than being selfish, you are giving your partner the chance to please you.

In reply to by सुबोध खरे

चांगली माहिती आहे. फक्त पुरुषांचे एकंदरित ह्याबद्दल मत काय किंवा त्यांच्या जाणीवा किती समृद्ध हे मात्र अजुनही अनुत्तरितच आहे.. विठाकाका.. तुमचे काय मत ह्या विषयावर?

In reply to by पिलीयन रायडर

आणि सुबोधजींनी दिलेल्या उतार्‍यात काँट्राडिक्शन्स आहेत. पण ती उत्तरं म्हणजे माझा `व्यक्तिगत आणि सीमित अनुभव' `अहंकाराचं प्रदर्शन' `जगाला शहाणपण शिकवणं' `आउटलायर्स' या सदरात येतील तस्मात, सध्या तरी तुमचं चालू द्या.

In reply to by विवेक ठाकूर

ओके! माझंही बोलुन झालय.. प्रश्न मी मांडले आहेत. ज्यांच्याकडे उत्तरं असतील त्यांनी द्यावीत.. धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई दुर्दैवाने स्त्रियांच्या लैंगिक गरजेबद्दल पुरुषांची जाणीव हि फारच कमी आणि अर्धवट ज्ञानावर आधारित असते आणि त्यातून पिवळी पुस्तके आणि विकृत पॉर्न पाहिल्याने मिळणारे ज्ञान हे अधिकच तिरपे असते. आपल्या शिक्षणात कोणत्याच पद्धतीचे लैंगिक शिक्षण दिले जात नाही त्यातून मागची पिढीच्या "आमचे काय वाईट झाले" किंवा "पाण्यात पडल्यावर पोहता येतेच". हि सगळी थेरं आहेत अशा मनोवृत्तीमुळे ते शास्त्रीय पद्धतीने किंवा तज्ञ माणसाकडून मिळवणे हे अशक्य आहे. त्यामुळे तरी बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांबद्दल तुटपुंजी माहिती असते. त्यातून शिलाजित, स्टे ऑन एनर्जी फोर्ट सारख्या "शक्ती"वर्धक द्रव्याच्या जाहिराती आणि तशा तर्हेचे साहित्य हे गोंधळात अधिकच भर टाकतात. बायकोचे ऐकणारा नवरा म्हणजे मेषपात्र असे आपल्या समाजात काही गटात समजले जाते. यामुळे बायकोशी अशा संवेदनशील विषयावर बोलायचे म्हणजे कठीणच. असे असूनही लग्न झाल्यावर ज्यांनी मनाची कवडे उघडी ठेवली आहेत त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते. एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि हि तीन पायांची शर्यत आहे आणि यात दोघात समन्वय असेल तर हि शर्यत धावणे सुद्धा आनंद दायक होते अन्यथा एकाची फरफट होते आणि दुसर्यावर त्याचा ताण आपोआप येतो

In reply to by बॅटमॅन

ब्याटमनराव आल्या आल्या षटकार ?, आपल्या प्रतिसादाबद्दल जराशी साशंकता वाटते आहे, आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते जरा इस्कटून सांगण्याची विनंती आहे.

In reply to by माहितगार

सरळ अर्थः पार्टनर नसेल तर इमॅजिनेशनसाठी पोर्न आवश्यक. त्याहीपुढे जाऊन आता वर्चुअल रिअ‍ॅलिटीमधे अनेक प्रयोग होत आहेत. पार्टनरची गरजच पडू नये. स्वतःला वाटेल तेव्हा वाटेल त्या वेळेस, अत्युच्च आनंद मिळवण्यासाठी रोबोचा वापर वाढेल. तेव्हा अशा रोबोंची गरज आहे काय? असे धागे निघतील. अल्मोस्ट हुमन ह्या अमेरिकन टीवी सीरीजमध्ये एक एपिसोड अगदी मनुष्य दिसणार्‍या, अस्णार्‍या सेक्स डॉल्स वर होता.

In reply to by तर्राट जोकर

सरळ अर्थः पार्टनर नसेल तर इमॅजिनेशनसाठी पोर्न आवश्यक.
ऊपयूक्त आणि आवश्यक या शब्दांमध्ये काही फरक असतो का ? मराठी शब्दबांधात 'आवश्यक' शब्दाची एक अर्थछटा 'ज्याच्या नसल्याने साधारणतः काम होत नाही असा' पोर्न नसल्यामुळे (कामुकतेच्या) इमॅजिनेशनचे काम थांबते असे आपण आणि बॅटमन यांना म्हणावयाचे आहे काय ?

In reply to by माहितगार

इमॅजिनेशनचे काम थांबते का? ज्यांना संभोगासाठी पार्टनर मिळत नाही. त्यांना हस्तमैथुनाद्वारे मोकळे व्हावे लागते. हस्तमैथुनासाठी सामान्यपणे ट्रीगर लागतो. पार्टनर प्रत्यक्ष समोर असेल तर व्यवहारातून ट्रीगर मिळतो. ऑर्गॅझमसाठी अत्युच्च भावनेपर्यंत पोचायला मानसिक, शारिरिक एकाग्रता लागते. ती एकाग्रता स्टीमुलेट करायला कुठल्याच प्रकारचे साहित्य (यात शब्दसाहित्यापासून सेक्सडॉलपर्यंत) काहीच नसतांना हस्तमैथुन शक्य होईल. पण सतत एकाच प्रकारच्या इमॅजिनेशनने भागत नसतं. म्हणून पोर्न बघणारे सतत एकच क्लिप बघू शकत नाहीत. त्यातही कायम वैविध्य लागतंच. आवश्यकता इमॅजिनेशनच्या वैविध्याची आहे. इमॅजिनेशन ट्रीगर करणार्‍या वस्तूंची आहे. म्हणजेच इमॅजिनेशनची आहे. इमॅजिनेशन मूळ प्रेरणा आहे. इमॅजिनेशन चा शत्रू रिपीटेशन. इमॅजिनेशनचा मित्र इनोवेशन. सतत एकाच प्रकारच्या साधनाने उद्दिपन शक्य होत नाही. म्हणून पार्टनरसोबतच्या संभोगातही वैविध्य आणावे लागते. मग पार्टनर नसतांनी तर वैविध्य आवश्यक आहे. हे वैविध्य आवश्यक. 'पॉर्न' हे एकमेव आवश्यक नाही. पॉर्नमधून मिळणारे वैविध्य आवश्यक. एकट्या व्यक्तिसाठी असे वैविध्य पुरवणारी सर्व साधने 'आवश्यक' ह्याच सदरात येतील. फक्त पॉर्न नाही. हे सामान्यांसाठी. विकृत लोक पायाची नखे बघून, अंतर्वस्त्रे बघूनही उद्दिपित होतात. तो भाग वेगळा.

In reply to by तर्राट जोकर

आधीचे विवरण झेपले
विकृत लोक पायाची नखे बघून, अंतर्वस्त्रे बघूनही उद्दिपित होतात. तो भाग वेगळा.
आपल्या विकृत आणि सुकृत शब्दांच्या व्याख्या काय आहेत ? काही लोकांच्या इमॅजिनेशन्स, फँटसी वेगळ्या असतील; कोणत्याही अबकड अथवा हळक्षज्ञ इमॅजिनेशन, फँटसीवरून कुणालाही विकृत का ठरवले जावे ?

In reply to by माहितगार

फँटसी व विकृती यात फरक आहे. वरची दोन उदाहरणे सौम्य विकृतीची आहेत. विकीवर ह्यासंबंधी जास्त माहिती उपलब्ध आहे. https://en.wikipedia.org/wiki/Paraphilia In 1981, an article published in American Journal of Psychiatry described paraphilia as "recurrent, intense sexually arousing fantasies, sexual urges, or behaviors generally involving:[19] >Non-human objects >The suffering or humiliation of oneself or one's partner >Children >Non-consenting persons https://en.wikipedia.org/wiki/Sexual_addiction#Borderline_personality_d… Individuals with borderline personality disorder (emotionally unstable personality disorder or impulsive personality disorder) not only are prone to promiscuity, but in many cases, co-morbid paraphilias and fetishistic behaviour are commonly associated with their sexual behaviours. Common paraphilic compulsions among individuals with this diagnosis include urolagnia ("golden showers"), sadomasochism, voyeurism autassassinophilia, partialism, biastophilia, and in some cases paraphilic drives may be more extreme and dangerous – such as erotophonophilia, necrophilia, pedophilia, and even anthropophagy. Both males and females with this personality disorder often have a strong desire and compulsion to get involved in illicit sex, affairs, and relationships with married or otherwise pre-attached individuals. Consequently, individuals with borderline personality disorder often experience love and sexuality in perverse and violent qualities which they cannot integrate with the tender, intimate side of relationships.

पोर्नची गरज आहे का वरून हा धागा हळूहळू पॉपकॉर्नची गरज आहे कडे जातोय बहुतेक!

या धाग्याचंच ते एक्स्टेन्शन आहे.येतेस का? वरच्या फांदीवर बसलेय बघ ;)

In reply to by अजया

आलेच थंब्स अप घेऊन!

इतके वाचल्यावर प्रश्न पडलाय...स्त्रीया म्हणतात बहुतांश पुरुषांना काय करावे/कसे करावे/कधी करावे याबाबत माहिती नसते/योग्य ज्ञान नसते...मला अश्या टाईपमध्ये नसेल जायचे तर व्यवस्थीत माहिती कुठे मिळेल??? आणि माहिती मिळालीच तरी similar sex drive असणारी जोडिदारीण कशी शोधावी? After all it's one of important factor which resembles "Schrödinger's cat"

In reply to by टवाळ कार्टा

स्त्रीया म्हणतात बहुतांश पुरुषांना काय करावे/कसे करावे/कधी करावे याबाबत माहिती नसते/योग्य ज्ञान नसते...मला अश्या टाईपमध्ये नसेल जायचे तर व्यवस्थीत माहिती कुठे मिळेल??? आणि माहिती मिळालीच तरी similar sex drive असणारी जोडिदारीण कशी शोधावी >> टिपिकल पुरुषांसारखा विचार कराल तर ती माहिती कुठेच मिळणार नाही. ती माहिती हवी असेल तर जोडिदारणीलाच विचारावे. 'सिमिलर सेक्स ड्राईव असणारी जोडीदारिन' वैगरे कवीकल्पना आहेत.

In reply to by संदीप डांगे

याच्यासाठी चांगला संवाद व रॅपो (जो पुन्हा संवादतूनच येतो) अत्यावश्यक आहे.

मिपावर सगळेच अभ्यासू.
मी काही सर्वज्ञ नाही कि या विषयावरील अधिकारीहि नाही कि मी यात अंतिम मत द्यावे. प्रत्येकाने आपल्या क्षमते प्रमाणे, ज्ञान आणी अनुभव या प्रमाणे याचा अर्थ लावावा.
पण इतका काथ्या कुटून झाल्यवर ही कबुली म्हणजे नवल म्हणावे की काय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमारे दोनशे प्रतिसाद आणि निष्कर्षः जो जे वांछिल तो ते लाहो आणि ला हौल वा ला कुव्वता इल्ला बी अल्लाह

अतिशय उत्तम लेख, आणि अत्यंत सम्रपक चर्चा. अवांतर >> तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे काय साहेब मुंबई दिनांक मधला अय्य्र विसरलात काय ? ह.घ्या.

अगरबत्ती प्रणयवादींच्या मते पॉर्नची गरज शुन्य आहे. मात्र हे ज्यांना मान्य नाही त्यांना पटवुन देण्याची अप्रवादींची गरज १०० % आहे असे दिसते. गंमत म्हणजे अप्रवादीच धागा चिवटपणे खेचत आहेत. ज्यांना शुन्य गरज आहे त्यांना चर्चेत इतका "रस" ? यामागे काय कारण असावे एक कुतुह्ल वाटतय. मी नाही त्यातला कोंडा लावा आतला अस काही आहे का ? चलने दो हे घ्या एक कॉकटेल दिल के बहलानेके लिए ये खयाल अच्छा है. ना तजुर्बाकारी से वाइज के ये बाते है. इस रंग को क्या जाने ?

२०० वा प्रतिसाद. द्विशतकाबद्दल डॉकना एक पॉ...पॉपकॉर्नची बकेट देउन सत्कार करणेत येत आहे (अखिल मिपा शतकसत्कारसमिती फरारजेपी संचालित सत्कारसमिती)

खर्‍या शरीरसंबंधात असमाधानी असणार्‍या मात्र पोर्नोग्राफीने समाधान मिळवणार्‍या माणसाच्या कथेवर आधारीत डॉन जॉन नावाचा एक इंग्रजी सिनेमा आहे. चित्रपट "प्रौढांसाठी" प्रकारातला असून आपापल्या जबाबदारीवर पहावा. :)

स्त्रीयांना सेक्स ड्राईव्ह असतो हा फार मोठा गैरसमज आहे, असा गैरसमज सत्तरच्या दशकातल्या अमेरीकन स्त्रीवादी महीलांनी पसरवला आहे.जर पुरुषांना सेक्स ड्राईव्ह असतो तर आम्हाला का नाही ?या इर्षेतून हा प्रकार घडला आहे.कारण काय तर पुरुषांची बरोबरी करणे. स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा.याचे कारण कामवासनेला कारणीभूत ठरणारं हॉर्मोन टेस्टोस्टीरॉन स्त्रीयांच्या शरीरात अगदी नगण्य प्रमाणात तयार होते. याउलट तरुण पुरुषांच्या शरीरात फार मोठ्या प्रमाणात टेस्टोस्टीरॉन तयार होत असते ,त्यामुळे त्यांचा सेक्स ड्राईव्ह स्त्रीच्या तुलनेत शंभरपटीने जास्त असतो,त्यामुळे पुरुष(नर) नेहमीच् कामोत्सुक असतात, तर स्त्रीया(मादी) रिल्कटंट. मग स्त्री कामोत्सुक होणार कशी!!!!!!! इथेच निसर्गाने चुंबनाचा मार्ग विकसीत केला आहे,पुरुष आपल्याला व आपल्या अपत्याला प्रोव्हाईड करु रु शकतो या आमिषाने स्त्री पुरुषाकडे अप्रोच होते,नको वाटणारा प्रणय ती सहन करते,प्रणयात जेव्हा पुरुष स्त्रीयांचे प्रदिर्घ चुंबन घेतात तेव्हा त्यांच्या लाळेतील टेस्टोस्टीरॉन हे स्त्रीच्या लाळेत मिसळते व तिथून ते तिच्या रक्तात उतरते व काही काळासाठी वाढलेल्या टेस्टोस्टीरॉन च्या पातळीने ती समागमापुरती तयार होते .ईतर कोणत्याह्ही वेळी स्त्री कामोत्सुक नसते. त्यामुळे स्त्रीयांची लैंगिकता या भ्रामक समजूती पासून बाहेर् येणे गरजेचे आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

ठ्ठो =))))))))) प्रतिसाद आॅफ द मिलेनियम. या शोधाचे पेटंट घेऊन ठेवा काका.नोबेलच्या वेळी कामाला येईल. अाता टकाचे कसे होणार या चिंतेत =)))

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, इतक्या वर्षांची प्रॅक्टीस वाया गेली बघा. तुम्ही लावले का असले शोध? नाही ना? बघाच आता. अब आपका बचना मुष्किलही नहीं नामुमकिन है. मा.डॉ.श्रीश्रीश्री.१००८.ग्रेटथिंकर यांचे आम्ही फ्यान झालो बुवा. तुमचा पत्ता कट.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब काकासाहेबांची या मुलभूत संशोधनासाठी टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे(TIFR) मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक व्हावी अशी शिफारस करण्यात येत आहे.