Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

लेखक तुषार काळभोर यांनी शनिवार, 12/12/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र. (स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल. धन्यवाद!

वाचने 54368
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

"कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" - तद्दन लूटारु प्रकार आहे. ह्या संबंधीत कंपनी मध्ये काम करत होतो. सगळा फालतु पणा आहे.

#ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. -माझ्या मते पंजाबीची छाप आहे.शिवाय इंग्राजांनी कृष्णाला krishna,krisna केलं.गुजराथींनी क्रश्न भगवान केलं.लीला अम्रत.ह्रदय पंजाबी-अम्रित.ह्रिदय बंगाली-रत्विक{ रात्विक}

गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकरामध्ये काही अंशी सुट मिळते असा नियम आहे. ती सूट खालील प्रकारे मिळते १. गृहकर्ज रकमेतील वर्षभरात फेडलेली मुद्दल ८० C मध्ये दाखवता येते. मर्यादा १५०००० २. गृहकर्ज रकमेवरील फेडलेले व्याज सेक्शन २४ मध्ये दाखवता येते. मर्यादा २००००० प्रश्न असा आहे… ह्या दोन्हीसाठी घराचे पझेशन मिळणे आवश्यक आहे का ? माझा एक मित्र घराचे पझेशन न मिळता मुद्दल ८० C मध्ये दाखवतो आहे. त्याच्या मते व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. मला मार्च २०१६ मध्ये पझेशन मिळणार आहे. मला ही सूट मिळेल का ? Investment प्रूफ या महिन्यात कंपनीत भरायचे आहेत. मार्गदर्शन करावे

In reply to by चिनार

पझेशन आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनी प्रुफ्स घेणार नाही. मलाही हाच प्रॉब्लेम होता. पण सीए ने कसं काय कोण जाणे नंतर ITR मधुन होम लोन क्लेम केले होते. मला आता ते नक्की आठवत नाही. तुम्हाला मार्च मध्ये पझेशन मिळाल्यास कदाचित तुम्ही सुद्धा ITR मधुन होम लोन क्लेम करु शकाल. नक्की माहित नाही.

In reply to by चिनार

मित्राचं बरोबर आहे . व्याज दाखवण्यासाठी पझेशन मिळणे आवश्यक आहे मुद्दलासाठी नाही. पझेशन मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षे (२०% दर वर्षी प्रमाणे ), मागील व्याज दाखवून त्यावर सूट घेता येते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघाच्या कपड्यांचे रंग कोण ठरवते? ICC का? भारताचा निळा, ऑस्ट्रेलियाचा पिवळा, NZ चा काळा हे कोणत्या लॉजीकने ठरवले आहे?

In reply to by मोदक

j यात काही लॉजिक असेल असे वाटत नाही. कारण सध्या अफगाणिस्तान सुद्धा निळ्या रंगाचे कपडे घालून क्रिकेट खेळतात. फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.

In reply to by कपिलमुनी

फुटबॉलमध्ये दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग वेगवेगळा असतो.>>> ती त्या खेळाची गरज आहे. अन्यथा राँग पासेस दिले जातील.

एका प्रोजेक्टसाठी मला कृत्रिम हातापध्दल (Prosthetic Hand) माहिती हवी आहे. माझ्या काही शंका / प्रश्न आहेत. वैद्यकीय / इतर क्षेत्रातल्या मिपाकरांकडुन त्याचे निरसन होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी नविन धागा काढू का इथेच माझ्या शंका / प्रश्न विचारू?

मला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचे आहे. विशेषत: केटरिंग टेक्नोलॉजी मध्ये. मी सध्या १२ वी सायन्स(पि+सी+एम) मध्ये आहे. मला यासाठी काय करावे लागेल? तसेच या क्षेत्रात पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध होतात?

लेख लिहिताना चंद्रबिंदी असणारे शब्द कसे लिहियाचे ? उदा : hack किंवा tab ?

In reply to by श्रीरंग_जोशी

परंतु मी hEka असा टंकले कि हेका असा होतंय. tEba = टेब ... मी google IME हा पर्याय वापरून लेखन करतो त्यामुळे असे होत आहे कि काय ?

In reply to by Jack_Bauer

मी जे सांगितलं ते गमभन बाबत होतं. एकदा गमभन वर हात बसला तर दुसरे पर्याय वापरावेसे वाटणार नाही याची खात्री बाळगा.

२०१३ मध्ये सॅमसंग Galaxy Grand Duos I9082 ने ज्या वेळी हा फोन लौन्च केला त्यावेळी चांगला वाटला म्हणुन घेतला पण १ वर्ष झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी परफॉरमन्स पार 'गाळपटला '. तेव्हा पासून तो तसाच पडुन आहे. त्याला काही करून(रुट वगैरे) मुख्य प्रवाहात आणता येईल काय ? मला आलेले प्रॉब्लेम्स : १. फोन वारंवार हँग होणे. २. खूप स्लो रिस्पोन्स ३. फॅक्टरी रिसेट केल्या नंतर देखील परफॉरमन्स काही फरक न पडणे ४. बॅटरी लवकर संपणे , चार्गिंग करताना गरम होणे.

In reply to by आसिफ

आसिफ, फोन रुट केल्यास तुम्हाला बरेच काही प्रयोग करता येतील. खासकरुन हँग होणे आणि स्लो परफोर्मन्स.

In reply to by सुनील

अच्छा.... आणि मग तो केशरी रंग? लेड चे दुष्परिणाम ऐकून आहे. मानवावर होणारे. दगडाच्या मूर्तींचं ठाऊक नाही.

In reply to by भुमन्यु

माझी सर्वात आवडती कार. पण तिकडे पंधरा-सोळा लाखाला मिळणारी कार इकडे पन्नास लाखाला लाँच करतात तेव्हा डोक्यात जातं. मित्सुबिशि इवो १० अशीच फ्लॉप झाली. बघूया हिची काय किंमत ठेवतात. २०१८ मध्ये एखादी सेकंडहँड मिळेलच. - (महागड्या कार्स चा सेकंड हँड चाहता -आधे पैसे में फुल्ल मजा)

In reply to by संदीप डांगे

एकदाच रेंटल कार म्हणून तीन दिवस चालवली होती काही वर्षांपूर्वी. टर्निंगवर वेगाने गेलं तरी कारचा अँगल फारसा वाकडा झाला आहे असे जाणवत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

६२००० किमी पळालेली २०१४ची सर्टिफाईड मस्टँग ( 3.7L V6 Ti-VCT 24V, 6-Speed Automatic) अंदाजे १२लाखात येते 'तिकडे'. आता इथं वर्जिनल जर ५०लाखात आली तर दीड-दोन वर्षे जुनी, ५०-६०००० किमी पळालेली (रोज ७०-१०० किमी!!!) ३० च्या पुढेच जाईल. (अवांतरः जेनुइन प्रश्नः कितना देती है?)

In reply to by तुषार काळभोर

रोज शंभर किमी व भारतात? असा वापर असेल तर घेणार नै भौ. बाकी दिड वर्षे जुन्या गाडीवर २० लाख वाचत असतील तर पुढील पाच वर्षाची ओनरशीप कॉस्ट चाळीस लाखापेक्षा जास्त जाणार नाही. फायदेका सौदा अस्तुया.... अनुभवाचे बोल.

मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो के३ नोट बद्दल एक प्रश्न विचारला होता. ह्या फोन मध्ये खुप सारे मालवेअर आणि व्हायरस आहेत. गुगलल्यावर हे सापडले http://blog.teamleadnet.com/2015/06/removing-malware-and-bloatware-from… पुण्यात हे सगळं कुठे करुन मिळेल? मी स्वतः तरी हे करु शकत नाही.. मला समजलेलंच नाहीये ते..

In reply to by टवाळ कार्टा

नको नको.. मला फार फार त्रास दिलाय ह्या वैतागवाडी फोन ने.. प्रचंड गंडलेला फोन आहे. कसं काय पण मला "रुटेड" फोन मिळाला आहे. मला अजिबात ह्यातलं काही कळत नाही पण ह्यातल्या किडा माणसाला दुरुस्त करता येईलही कदाचित हे प्रकरण. मी च विकुन टाकावा की काय ह्या विचारात आहे. बाकी कॅमेरा आणि बॅटरी चांगली आहे. (मी गेम्स खेळत नाही. )

In reply to by पिलीयन रायडर

मी तर वापरतो आहे हाच फोन जवळपास एक महिन्यापासुन विशेष त्रास नाही दिला. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता ?

In reply to by उगा काहितरीच

१. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन वरुन मागवलेला आहे. त्यात तो रुटेड आहे असं दिसतय २. ह्यात कंपनी इन्स्टॉल्ड गोष्टीच मालवेअर आहेत जसे की ट्विटर ३. त्रास असे आहेत :- आपोआप वेगवेगळे अ‍ॅप्स डालो होणे, सतत "वॉट्सअ‍ॅपने नवे अ‍ॅप रेकमंड केले आहे.. डालो करायचे का" असे पॉप अप्स येत रहातात.. सतत.. मी बरेच सेटींग्स बदलुन पाहिले.. कितीदाही.. कसेही कॉन्टॅक्ट सेव्ह केले तरी ते सेव्ह न होणे.. झालेच तर वॉट्सअ‍ॅप वर न दिसणे.. वॉट्सअ‍ॅपवर बहुदा मला लोकांचे प्रोफाइल पिक पण जुनेच दिसतात.. ते ठिक आहे.. पण अर्धी निम्मी जनता दिसतच नाही कारण कॉन्टॅक्ट सेव्हच होत नाही. कुणी मला मसेज केला, आणि मग मी तो नंबर सेव्ह केला तर थोडा वेळ वोट्सअ‍ॅपवर नंबरच्या जागी नाव दिसते. पण रात्रीतुन परत नाव गायब.. कॉन्टॅक्ट डिलीटेड.. अनेक मेसेज चायनीज मधुन येतात. अनेक अ‍ॅपची नावे चायनीज आहेत.. कॉन्टॅक्ट मध्ये यल्लो पेजेस चायनीजमध्ये आहे मला सेटींग्स - अबाऊट फोन मध्ये अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट दिसतच नाही. फोन उपडेट करायचा पर्यायच नाही. आणला तेव्हा होता हा पर्याय. एकदा पॉप आला की करयचा का अपडेट? तेव्हा शक्य नव्हते म्हणुन मी नाही म्हणले. तेव्हा पासुन तो ऑप्शनच गायब आहे.. सध्या एवढेच.. अजुन आठवुन सांगते.. माझ्या सासर्‍यांकडे हाच आहे.. त्यांना हे नाही पण अजुन वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

मी भारतातून आणी दुकानातून घेतला होता. पण मला अजूनतरी असा कोणता त्रास झाला नाही. फोन रूटेड नाहीये . बॕटरी थोडी कमी जातेय पण एकंदरीत ठीक वाटतो आहे.

In reply to by मराठी कथालेखक

Did that.. Many times Facing new issue. Tried contacting Lenovo. They do not have warranty information updated. For that they need invoice. Checked on the website from where this phone was ordered ( Gearbest ). Raised tickets but no response at all for २ weeks. Without that Lenovo not ready to update warranty and repair. Meanwhile, phone has started being slow while typing...

In reply to by पिलीयन रायडर

तुमचा बाकी अनुभव (ब्लोटवेअरचा) नाही आला. पण एस ८५० ला unfortunately contacts manager has stopped responding असा मेसेज येऊन फोन अनरिस्पॉन्सिव होऊन जातो. कालच लेनोवोला मेल टाकला योग्य आयएमईआय टाकून, तरी ते म्हणतात हा आयएमईआय त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही, इन्वॉईस कॉपी पाहिजे त्यांना.

एकसष्टी नेमकी केव्हा करतात ? ६० वर्षे पुर्ण झाल्यावर की ६१ ?

सर्व विषयांचा परामर्ष घेतला जातोय पण कालच्या मुरुड होडी दुर्घटनेचा काहीच उल्लेख झाला नाही हे फार खटकले.यात कोकण पर्यटन हा मुद्दाही आहेच. माझे दोन अनुभव- १) वापी दादरा गार्डन येथे बोटिंग करताना पाहिले. एका कुटुंबातील चौघे दुसय्रा एका पॅडल बोटीत होते.धक्क्यावरच्या मल्याळी ओपरेटरने योग्य तह्रेने चौघांना बसवले होते.नवरा बायको वजनाप्रमाणे विरुद्ध तिरके. पण या लोकांनी मध्यभागी गेल्यावर जागा बदलायचे ठरवले.मियाबिबि जवळ! बोट तिरकी होऊ लागली.तिकडून शिट्टी मार मारून ओपरेटर ओरडत होता उठू नका.नशीब त्यांना समजले. २) कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला मोठ्या बोटीतून जाताना ( २००९ साली थेक्कडीच्या दुर्घटनेनंतर ) लाइफ जॅकेट अनिवार्य केले होते.आलेल्या होडीतले उतरल्यावर जाकीटं काढून खाली जमिनीवर फेकत होते तीच जाणाय्रांनी घालायची होती चांगल्या कपड्यांवर.उगाचच नाटक केले सर्वांनी आणि जेमतेम धरल्यासारखी केली.म्हणजे काहीच उपयोग नव्हता. एकूण काय सुरक्षिततेचे नियम बनवले आणि पाळले नाहीत तर उपयोग काय? गेटवे ते मांडवा/रेवस/घारापुरी बोटसेवा कित्येक वर्षे आहे पण लाइफजाकिट सक्ती नव्हती ती आता सुरू करावी का?

सुबोध भाऊ मी जालावर पहिले आहे आधीच :) तुमचे स्वताचे अनुभव सांगा कारण आत्ता घेतला म्हणजे चार वर्ष दुसरा मोबाईल नाही

In reply to by मयुरMK

स्वानुभावावर आधारीत सल्ला हवा असल्यास ब्लॅकबेरी १० ओएस वर चालणारा फोन घ्यावा असे सुचवीन. मी जवळजवळ तीन वर्षांपासून वापरत आहे. ब्लॅकबेरी झेड १० किंवा झेड ३० हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत.

In reply to by मयुरMK

कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे म्हणजे जरा जास्तच होताएत. मोबाईलची लाईफ म्हणजे १८-२४ महिने ! त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.

In reply to by उगा काहितरीच

२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे. पुरेपूर सहमत .. मोटो g 3rd gen चा विचार करतो मग १३ हजार ला आहे बहुतेक

In reply to by मयुरMK

छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई जवळजवळ दीड वर्ष वापरला . थोडा पॉवर बटन चा प्रॉब्लेम सोडला तर चांगला होता.

In reply to by मयुरMK

माझ्याकडे xiomi redme note आहे १ वर्षापासून ९९९९/- ला घेतलेला. ५. ५ इंच HD स्क्रीन, २ GB RAM, ३००० mAH Li polymer battery आणि ४G (४ G साठीच हा घेतला). मोबाइल काम उत्तम करतो. एअरटेल ४ G चा वेगही उत्तम आहे DOWNLOAD स्पीड ६-७ MBPS प्रत्यक्ष मिळतो. आता घेताना कमीत कमी ३ GB RAM वाला फोन आणी LOLLIPOP वाला घ्या असा सल्ला मी देईन.कारण जसे जसे APP UPGRADE होतात तसे ते RAM खातात आणी फोन स्लो होतो. मला अजून तरी असा प्रश्न आलेला नाही. कोणत्याही कम्पनीचा फोन घ्या पण १५००० च्या आत घ्या एक वर्षाने फोन जुना होतोच. आपल्याला फोन "SNOB व्हाल्यू" साठी पाहिजे असेल तरच बड्या कंपनीचा घ्या उदा APPLE I PHONE ६. अन्यथा वर म्हटल्याप्रमाणेच घ्या

"त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे." -- हेच म्हणतो.

In reply to by मयुरMK

रच्याकने याच्या प्रतिक्षेत... हे मार्केट मधे आल्यावर मोबाईलचे सरासरी आयुष्य वाढेल.