Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

लेखक तुषार काळभोर यांनी शनिवार, 12/12/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र. (स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल. धन्यवाद!

वाचने 54368
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

माझा बी १ प्रश्न हाय, दखल मधले सगळे जुने लेख कुठे वाचायला मिळतील?

पूर्वी CNBC वर GE corporation ची tion असलेल्या भरपूर शब्दांचा गाण्यात वापर करुन बनवलेली एक जाहिरात लागायची ती कोणती? त्याची लिंक मिळेल का? किंवा पूर्ण गाणे कोठे मिळेल?

शहरात न जाताही पोहोचु शकता bright land हॉटेल च्या वळणावरुन. पुण्यात बुकींग होते. एकदम शांत जागा आहे. मुख्य म्हणजे पोट-माळा असलेल्या रूम आहेत, मुलांना मजा येते जिन्यावरून ये-जा करायला.

In reply to by gogglya

लोकेशन जबरा आहे. पण.. बजेटच्या थोडं बाहेर आहे. :) २ रात्रींचे २२,००० होतात. माझं बजेट अंदाजे ३०००-३५०० रुपये प्रतिरात्र आहे. (विथ ऑर विदाउट फूड)

वाटाण्याच्या अक्षता या वाकप्रचाराची व्युत्पत्ती कुणी सांगू शकेल काय? हा धागा सुरू करण्याबद्दल धन्यवाद पैलवानसाहेब.

In reply to by श्रीरंग_जोशी

अक्षत-कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध. वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें.वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून.

'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का? ऑनलाईन कुठे दिसत नाही. (आख्ख्या इंटरनेटवर सुद्धा कसलाही उल्लेख नाहीये भाषांतराचा). कुणी पाहिलंय/ऐकलंय का मराठी भाषांतराविषयी?

माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे, अतिशय चांगल्या कंडिशन मधे ! कमीतकमी ७०-८० वर्षांपूर्वीची. त्यावर मधल्या काळात कुणीतरी रेड अॉक्साईड नाहीतर अॉइल पेंट मारला होता. त्यामुळे त्याचे लाकूड झाकल्या गेले . काल तो कलर काढण्यासाठी abrasive paper चा वापर केला असता थोडा ओरीजनल लाकडी भाग दिसला जो की अतिशय सुंदर आहे. आता प्रश्न असा आहे की त्या लाकडावरील red oxide कसे काढावे? Abrasive paper ने काढणे अतिशय मेहनतीचे व वेळखाऊ काम आहे. यापेक्षा काही सोपा उपाय करता आला तर मदत होईल .

In reply to by उगा काहितरीच

"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते ते थोड्या भागावर वापरून बघा. मात्र त्याचा लाकडावर काही परिणाम होणार का याची कल्पना नाही.

In reply to by उगा काहितरीच

वेळखाऊ असले तरी अब्रेझिव पेपरनेच काढा. पेंट रीमूवरने एका दिवसात काम होईल पण लाकूड डॅमेज होइल. त्यापेक्षा महिना गेला तरी पेपरने घासून काढा. चांगल्या लाकडाची काळजी घ्यायलाच पाहिजे. चांदवडच्या होळकर महालाच्या कलाकुसरीवरचं आधीचं रंगकाम घासूनच काढलंय. किती पेशन्स असावे याचा उत्तम नमुना, तुम्हालाही प्रेरणा मिळेल. cc

In reply to by आदिजोशी

पेंट म्हणजे काहीतरी काळ्या रंगाचं उपयुक्त रसायन होतं. रिनोवेशनची प्रक्रिया सुरू असल्याने सर्व खरवडून काढलंय. पुन्हा कुठलंतरी रसायन लावणार आहेत. त्याचा काय रंग असेल देवजाणे.

In reply to by संदीप डांगे

दंडवत पेशन्सला ! कारण कुठल्याही प्रकारची कलाकुसर नसलेल्या लाकडावरचा रंग काढायला किती मेहनत लागते हे अनुभवतो आहे कालपासुन.

In reply to by पिलीयन रायडर

१. सध्याच्या सीझनमधे करणार असाल तर उत्तम सीझन आहे. २. वैविध्यपूर्ण डास असतात , त्याचा उपाय स्वतः करून जाणे. ३. गोठवणारी थंडी असते. ४.२-३ कपड्याचे एक्स्ट्रा सेट न्या . जंगल ट्रेल असेल तर खरब होतात. ५. अगदी बियास नदीचा फील नसला तरी मजा येते.

In reply to by पिलीयन रायडर

Kundalika River Rafting यांचा अनुभव चांगला आहे.(काही वर्षांपूर्वीचा , सध्या रीव्हू वाचून जाणे) कँपिगमधे तंबू मिळाल्यास मजा येते पण त्रास ( डास , थंडी ) सहन करायची तयारी ठेवा .

In reply to by कपिलमुनी

धन्यवाद! पुढच्या एक दोन आठवड्यातच करायचे आहे. कँपिंगचे माहित नाही पण राफ्टींग तरी करुच. http://koladrafting.co.in/ ही साईट चांगली वाटत आहे. रेट्स पुष्कळ आहेत. पण ठिके..

In reply to by पिलीयन रायडर

बर्‍याचदा फसवतात. धरणातुन पाणी सोडले तरच राफ्टींग होऊ शकते. मागच्या वर्षी आमच्या ऑफिसची ट्रीप गेली होती २-३ तास सगळे लाईफ जॅकेट घालून पाणी येण्याची वाट बघत होते. शेवटी पोपट होऊन परतले.

#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. भारतात अल्कोहोलमध्ये लाख मिसळून लुकण लावणे बहुतेक पोतृगिजांच्या अगोदर नव्हते. होड्यांच्या लाकडांना काजूचं तेल लावतात ते काळं दिसतं आणि लाकूड सडू देत नाही.तेपण नंतरचंच असावं.

In reply to by कंजूस

#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. >>> हे बरोबर आहे काका, तिथल्या माणसाने हेच मिश्रण सांगितलं होतं बहुतेक. रिनोवेशन पूर्ण पेशवेकालिन पद्धतींनीच होत असल्याने बर्‍याच असंबंधित वस्तूंची मिश्रणे, त्यांची नावे कानावर पडत असल्याने नेमकं लक्षात राहिलं नाही.

DEADPOOL यांना त्यांच्या जन्या लेखाची लिंक द्यायची आहे ते असे करता येईल. तुमच्या "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ "या लेखाची लिंक अशी देता येते- घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ याचे टेम्प्लेट:- <a href="***" target="_blank" >???</a> वरील टेम्प्लेटात *** च्या जागी लेखाची अॅड्रेसबारमधली लिंक कॅापी पेस्ट करायची, ??? च्या जागी लेखाचे नाव वगैरे जे लिहाल त्यामागे लेखाची दडलेली लिंक असते ती क्लिक करता येते. वरच्या उदाहरणात *** = http://www.misalpav.com/node/34204 ??? = घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

In reply to by पिशी अबोली

भांड्यांच्या बदल्यात घेतलेले, लोकांनी टाकून दिलेले, भिकार्यांनी विकलेले आणि रिजेक्ट झालेले असे सगळेच असतात...

In reply to by खेडूत

आल्याची सालं काढून घेतात. मग ते तुकडे एकदोन दिवस चुन्यात भिजवतात (म्हणजे चुन्याच्या पाण्यात - हे बहुतेक दुकानात मिळतं.) त्या आल्याच्या शिरा दिसायला लागतात. मग ते आलं सावलीत वाळवतात. झाली सुंठ.

टीव्ही वर लागणार्‍या फॅशन शो मधे घालतात तसे चित्रविचित्र कपडे खरं कोणी घालत नसेल. अश्या फॅशन शो साठी कपडे "डिजाईन" करणार्‍यांना काय फायदा - म्हणजे जर कोणी ते विकत घेणारंच नसेल तर? काही तरी कारण असणार, पण ते मला समजत नाहीय, म्हणून इथे विचारतोय.

In reply to by नाव आडनाव

फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले असते ते विकल्या जातं. घातलेले कपडे नाही. (तेही विकल्या जातात खरे तर) कपड्यांचा पोत, प्रकार, त्यावरचे रंगसंगती, आकार-रेषा, कट्स, इत्यादी बरंच काही असतं. जे नाविन्यपूर्ण आणि बाजारात चालण्यासारखं आहे असे व्यापार्‍यांना वाटतं ते तेवढं उचलून घेतात. त्याबद्दल फॅ-डी शी करार केला जातो. नंतर मार्केटप्रमाणे कपड्यांचे साईझेस तयार करून बाजारात येतात. सविस्तर नंतर लिहिन. ही थंडी हात गोठवून टाकतेय राव!!!

एखाद्या धागाकर्त्याचे लेखन कसे शोधावे? जसे राजघराणं यांचे 'विज्ञानाच्या चष्म्यातून जाती'हा लेख शोधायचा असल्यास कसा शोधावा?

त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद Primary tabs द्रश्य(active tab) What links here प्रेषक, राजघराणं, Tue, 22/05/2012 - 21:08 यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 ********************************************* http://www.misalpav.com/node/21729

kindle paper white घ्यायच आहे.. त्याअनुषंगाने प्रश्न- यावर किती मराठी पुस्तक उपलब्ध आहेत ?किती भारतीय भाषातील पुस्तक उपलब्ध आहेत? इतर ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात का (उदा.bookganga.com,इसाहित्य.कॉम)?

In reply to by जेपी

किंडलवर मराठी पुस्तकं फारशी पाहिली नाहीत. किंडलचे दोन फाईल फॉरमॅट आहेत - .mobi आणि .azw३. त्यात फक्त azw३ मध्ये देवनागरी फॉन्ट रेंडरिंग होतं. आपण आपली पुस्तकं azw३ मध्ये रूपांतरित करून किंडलवर वाचू शकतो. उदा० मी स्पार्टाकस यांची ट्रॅप केली होती. "काही कारणांनी" वैतागून ती डिलिट केली ते सोडा. मिपावरच्या मोठ्या मालिका याप्रकारे किंडलवर वाचण्याचा विचार आहे. माझं किंडल पेपरव्हाईट नसल्याने त्यात इतर सॉफ्टवेअर आणता येत नाहीत.

बहुतेक आहारतज्ञ अंडी खायला सांगताना अंडयाचा केवळ पांढरा भाग खायला सांगतात. मग अंडयातल्या पिवळा बलकाचे काय करायचे? फेकुन द्यायचा का तो? अंडयातल्या पिवळा बलक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतो का? संपुर्ण अंडे खाल्ले तर काय फरक पडतो?

In reply to by भाते

माझ्या मते एखादे पिवळे बलक खाण्यास काही हरकत नसावी, पिवळ्या भागात जास्त कोलेस्त्रोल असते, त्यामुळे ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. पांढऱ्या भागात जास्त प्रोटीन असते.

In reply to by सतिश पाटील

मधे कदाचित मिपावर च एक लिन्क मिळाली होती. आता बर्‍याच तज्ञ लोकांचे असे मत झाले आहे की खाण्यातुन कोलेस्ट्रोल जास्त गेले किंवा कमी गेले तरी शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वर परीणाम होत नाही. जरी कोलेस्ट्रोल कमी खाल्ले तरी शरीर मोठ्याप्रमाणावर कोलेस्ट्रोल बनवतच असते. Cholesterol is no longer a villain. The 2010 guidelines suggested we should limit cholesterol from foods to no more than 300 milligrams daily. (A large egg has about 186 mg of cholesterol.) Experts now say cholesterol is ''not a nutrient of concern," because cholesterol from foods doesn't cause higher blood cholesterol levels.

रिव्हर राफ्टींग केलय मजा येते खास करुन पावसाळ्यात जेव्हा कुंडलिका प्रचंड वेगाने वहाते. मी १५ ऑगस्ट २०१५ ला केले आहे. राफ्ट आपोआपच पुढे जात असतो. फक्त दिशा देणे इतकाच भाग रहातो. हिवाळ्यात महत्वाचे चार " रॅपीड " ( जिथे राफ्ट पलटी होण्याची शक्यता असते असा प्रवाह ) असेल की नाही माहीत नाही. माझ्या मते मुक्कामाची आवश्यकता असली तरी तो ह्या अ‍ॅडव्हेचरचा भाग नाही. इंटरनेटवर रिव्हर राफ्टींग चे बुकिंग करुन आपण कोलाडच्या जवळ कुठेही राहु शकता. जय कुंडलिका !

तुमच बजेट चांगल्या हॉटेल्साठी कमी आहे. तुम्ही एयर बीएन्बी ची साईट चेक करा. कदाचित चांगले पर्याय ऊपलब्ध असतील. आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वर या मध्ये असलेल्या एका बंगल्यात राहीलो होतो (६ जण). ऊत्तम अनुभव होता.

१. मिपावर नवीन धागा कसा सुरु करायचा? २. त्या धाग्यादरम्यान अन्य वेबसाईटींच्या लिंका कश्या द्यायच्या? ३. त्या धाग्यात आंतरजालावरील चित्र कसे अपलोडवावे.

माझा सॅमसंग नोट तीस तारखेला बंद पडला. ऑन करायला गेल्यावर फक्त सुरुवातीचे सॅमसंग नाव दिसतं पण पुढे काही घडत नाही. रीपेअरवाल्याकडे नेला असता तो म्हणाला की सेम केस तीन-चार झाल्यात, त्या दोन दिवसात. माझ्या मेहूण्याचाही फोन असाच बंद पडला. सॅमसंग स्मार्टफोन्ससोबत अजून कोणाला असे अनुभव आले आहेत काय एवढ्यात...?

In reply to by संदीप डांगे

माझ्या फोन ला सुद्धा काही प्रोब्लेम अले होते. पण मी ब्याटरी बदलल्यावर चालु झाला. तुमचा फोन अजुनही चालु नसेल तर दुसरी ब्याटरी टाकुन चालु होतो का ते पहा.

In reply to by संदीप डांगे

असे आहे होय... म्हणजे सध्या फक्त प्रार्थना करणे आपल्या हातात आहे म्हणा. फक्त त्याला रिपेअरिंगची किंमत काम करण्याआधी सांगायला लावा.

तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय.
महाबळेश्वरमध्य राहण्यासाठी एमटीडीसी ची निवास व्यवस्था आहे. बाजारपेठेपासून थोडी लांब व शांत ठिकाणी आहे. फक्त निवासाची व्यवस्था आहे. जेवण्याची नाही. अत्यंत माफक दर आहेत. खोल्या बर्‍या आहेत. टीव्ही, फ्रीज वगैरे नाही. एमटीडीसी च्या संकेतस्थळावरून बुकिंग होऊ शकते.

तुम्ही जाउन आला असाल तरी पण इतर कोणी शोधत असेल तर माहिती देत आहे :) वेस्ट हिल रिसोर्ट मध्ये एकदा राहून आलोय. नवीन(गेल्या वर्षभरात) सुरुवात झाल्यामुळे कदाचित पण अजून चांगले आहे. हे पहा.

इराक व सिरिया येथील इस्लामिक स्टेटमध्ये १०० हून अधिक देशांचे लोक अतिरेकी कारवायांसाठी सामिल झाले आहेत. इस्लामिक स्टेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषा कोणत्या?

कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली. त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल. इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

ऋ, तृ, कृ या अक्षरांचे हिंदीतले उच्चार री, त्री, क्री असे का असतात? उदा. संस्कृतला संस्क्रीत असं म्हणावं लागतं, तसेच तृप्त ऐवजी त्रीप्त अन मृग ऐवजी म्रीग. म्हणजे एकाच उच्चारासाठी दोन वेगवेगळे लिहिण्याची अक्षरे आहेत. मराठीप्रमाणे उच्चारही वेगळे का नाहीत?

In reply to by श्रीरंग_जोशी

लिखित भाषा आणि बोली यातील फरकामुळे हे घडते. मुळात वरील तिन्ही अक्षरांमधे ध्वनि 'ऋ' हाच अपेक्षित आहे. आणि हा ऋ स्वर आहे. त्याच्या सगळ्यात जवळचा स्वर 'इ' असल्याने अनेक नवीन इंडोआर्यन भाषांमधे उच्चार करताना संस्कृतात जिथे ऋ ची अपेक्षा असती, त्या जागी 'री' आलेला दिसतो. पण बोलीमधे बदल घडला, तरी लिखित भाषा काही बदलत नाही. तिच्यात संस्कृतोद्भव शब्दांमधे अजूनही ऋ वापरला जातो. मराठीत ऋचा उच्चार बऱ्याच ठिकाणी 'रु' होतो. अगदी उच्चरांच्या बाबतीत काटेकोर असणारे लोक संस्कृतयोग्य उच्चार करतात.

Doctors, friends ; I need advice. Just now an NGO approache me to collect my cheek sample for HLA ( Human Leukocyte Antigen ). If it matches with some patient , i wil b donor for "Blood Stem Cell Transplant" . The patient of Leukemia , Lymphoma , Thalasemmia cn thus be "cured". While idea is great humanitarian step; i hv doubt abt the process. They said donor will b subjected to Filgrastim innjections for 5 days ; to mobilise the stem cells frm bone marrow into blood. This will cause three to five fold increase in WBC count. This is the part i m concerned abt. They said no extra precautions as such are reqd for this . Is this correct ? I m happy to help in saving a life; bt nt sure of consequences. Filgrastim is a GCSF (Granulocyte Colony - Stimulating Factor ) btw, cant type marathi frm mobile. so writing everything in english.

In reply to by मन१

स्टेम सेल्स दान करण्यासंबधीचा हा लेख वाचा, यात ही How peripheral blood stem cells are collected या विभागात फिल्ग्रास्टिम विषयी थोडी माहिती आहे. या औषधाच्या side-effects विषयी आधिक माहिती इथे आणि इथे मिळेल. थोडक्यात, थोड्या काळासाठी पाठदुखी, हाड किंवा स्नायू दुखी, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, निद्रानाश किंवा थकवा हे प्रमुख side effects आहेत, आणि काही अ‍ॅलर्जी असतील तर हे औषध टाळलेलं बरं. ही माहिती दिल्यानंतर थोडंसं अवांतरः १. तुम्ही चीक स्वॅब देतांना अनाहुतपणे तुमचं डीएनए सँपलही देणार आहात, म्हणजे potentially, तुमची genetic fingerprint दिली जाते आहे, त्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यालच. २. तुम्हाला हे लागू नाही, पण गर्भवती स्त्रियांना 'भविष्याची भीती' वगैरे दाखवून भारतात "कॉर्ड ब्लड स्टेम सेल बँकिंग" हा एक हजारो रुपये किंमतीचा अवैध बाजार बोकाळतो आहे. त्याविषयी कुणीतरी लिहायला हवं.