21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
वाचने
106832
प्रतिक्रिया
217
मिसळपाव
प्रतिक्रिया
बदलती जीवनशैली : सोशल
लग्नं टिकले नाही तर इतका काय
हे काळावर पण अवलंबून आहे
In reply to लग्नं टिकले नाही तर इतका काय by विजुभाऊ
+१
In reply to लग्नं टिकले नाही तर इतका काय by विजुभाऊ
अजून एक सल्ला - स्वानुभवावरून
माघार...
पारस्पारिक प्रेम हा एकमेव घटक विवाहचं नातं कायम ठेवतो.
नवरा
लाटकर काकांनी मिपाची वैचारिक
हेला काकानां
कॉलिंग णिसो सर....
In reply to हेला काकानां by होबासराव
गाववाले तुम्ही "हेला" "हेला"
In reply to हेला काकानां by होबासराव
गाववाले तुम्ही "हेला" "हेला" करू नोका राजेहो लैच हसं येते गळ्या!
In reply to गाववाले तुम्ही "हेला" "हेला" by कैलासवासी सोन्याबापु
असं कोणाच्या नावाला हसणे
In reply to गाववाले तुम्ही "हेला" "हेला" by कैलासवासी सोन्याबापु
प्रसाद साहेब
In reply to असं कोणाच्या नावाला हसणे by प्रसाद१९७१
भाऊ तुम्ही नका टेंशन घेऊ,
In reply to असं कोणाच्या नावाला हसणे by प्रसाद१९७१
कॉमेंट प्रसाद१९७१ साहेब
In reply to भाऊ तुम्ही नका टेंशन घेऊ, by कैलासवासी सोन्याबापु
राजा बाप्पु
In reply to भाऊ तुम्ही नका टेंशन घेऊ, by कैलासवासी सोन्याबापु
अरे हाव! तुमाले थोड़ीच काही
In reply to राजा बाप्पु by होबासराव
एका शब्दावर जर सात उपप्रतिसाद
In reply to अरे हाव! तुमाले थोड़ीच काही by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबाप्पु - मी गमतीत
In reply to एका शब्दावर जर सात उपप्रतिसाद by सूड
=))
In reply to गाववाले तुम्ही "हेला" "हेला" by कैलासवासी सोन्याबापु
गाववाले तुम्ही "हेला" "हेला"
In reply to गाववाले तुम्ही "हेला" "हेला" by कैलासवासी सोन्याबापु
असो! विनोद होता इतके समजून
In reply to गाववाले तुम्ही "हेला" "हेला" by हेमंत लाटकर
स्पंदने आणि कवडसे - वैवाहिक आयुष्य:
MAD for each other !
In reply to स्पंदने आणि कवडसे - वैवाहिक आयुष्य: by सुधीर वैद्य
Her company is a magic of your life &
In reply to MAD for each other ! by विवेक ठाकूर
हे फारचं पुस्तकी झालं हो.
In reply to Her company is a magic of your life & by विवेक ठाकूर
मला इतरांचं माहिती नाही
In reply to हे फारचं पुस्तकी झालं हो. by जिन्क्स
त्यापेक्षा लग्नच न केलेलं
+१..
In reply to त्यापेक्षा लग्नच न केलेलं by पिलीयन रायडर
त्यापेक्षा लग्नच न केलेलं
In reply to त्यापेक्षा लग्नच न केलेलं by पिलीयन रायडर
+१०००
In reply to त्यापेक्षा लग्नच न केलेलं by पिलीयन रायडर
मला वाटतं तै नी ते उपरोधाने
In reply to +१००० by चैतन्य ईन्या
अजिबात नाही..
In reply to मला वाटतं तै नी ते उपरोधाने by जिन्क्स
खरय. मला तरी सर्क्यासटीक टोन वाटला नाही
In reply to अजिबात नाही.. by पिलीयन रायडर
जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर
In reply to खरय. मला तरी सर्क्यासटीक टोन वाटला नाही by चैतन्य ईन्या
+१
In reply to जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर by पिलीयन रायडर
पिराताई - मेड फॉर इच अदर
In reply to जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर by पिलीयन रायडर
सौ सुनार की...
In reply to जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर by पिलीयन रायडर
माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खु
In reply to त्यापेक्षा लग्नच न केलेलं by पिलीयन रायडर
Ha ha ha..
In reply to माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खु by ईश्वरसर्वसाक्षी
स्त्री शक्ती
विवाह हा जीवनातल्या स्वास्थ्याचा किंवा अस्वास्थ्याचा
लैंगिकता हा विवाहाचा मुलाधार आहे त्यावर छान मौन बा़ळगलय
वा एकदम योग्य विश्लेषण
In reply to लैंगिकता हा विवाहाचा मुलाधार आहे त्यावर छान मौन बा़ळगलय by मारवा
आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून लिहीतो
In reply to लैंगिकता हा विवाहाचा मुलाधार आहे त्यावर छान मौन बा़ळगलय by मारवा
लिहायला फार सुंदर आहे हे!!
In reply to आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून लिहीतो by विवेक ठाकूर
सूड राव
In reply to लिहायला फार सुंदर आहे हे!! by सूड
+१
In reply to सूड राव by सुबोध खरे
लग्ना करुन ठेवलेले शाररिक
In reply to आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून लिहीतो by विवेक ठाकूर
सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी
In reply to लग्ना करुन ठेवलेले शाररिक by पिलीयन रायडर
काका.. सनीबाइ जे करत होत्या
In reply to सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी by हेमंत लाटकर
गंमतीचा भाग म्हणजे सनीबाईंनी
In reply to काका.. सनीबाइ जे करत होत्या by पिलीयन रायडर
पि रा ताई
In reply to लग्ना करुन ठेवलेले शाररिक by पिलीयन रायडर
मुलं जन्माला येतातच, औरसत्व
In reply to पि रा ताई by सुबोध खरे
एका इंग्रजी पुस्तकात वाचलं
In reply to आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून लिहीतो by विवेक ठाकूर
त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला
In reply to एका इंग्रजी पुस्तकात वाचलं by DEADPOOL
माझ्या मते
In reply to त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला by संदीप डांगे
काही लग्न बिग्न नको. पार्टनर
मुलेबाळे, त्यांच्या शाळा,
In reply to काही लग्न बिग्न नको. पार्टनर by रेवती
सांगायचा उद्देश हा की ह्योच
In reply to मुलेबाळे, त्यांच्या शाळा, by सस्नेह
सांगायचा उद्देश हा की ह्योच
In reply to सांगायचा उद्देश हा की ह्योच by रेवती
मस्त ज्योक आहे !
In reply to सांगायचा उद्देश हा की ह्योच by कॅप्टन जॅक स्पॅरो
असं कसं चिमणेश! तक्रारी करणे
In reply to सांगायचा उद्देश हा की ह्योच by कॅप्टन जॅक स्पॅरो
असं कसं? काढाचं ओ तुम्ही धागा
In reply to असं कसं चिमणेश! तक्रारी करणे by रेवती
आज मुली उच्चशिक्षित आणि
भारतात अमेरिकन संस्कृती येत
-१०००
In reply to भारतात अमेरिकन संस्कृती येत by हेमंत लाटकर
लट्टू काका , तुम्ही टनाटन
In reply to -१००० by चतुरंग