Skip to main content

लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 11/01/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात. पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात. अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो. इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात. उपाययोजना: कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात. मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही. स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा. बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत. तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत. थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.

वाचने 106832
प्रतिक्रिया 217

प्रतिक्रिया

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. हे समजले नाही, काय केले नेमके सोशल नेटवर्किंग ने?

In reply to by विजुभाऊ

नाही पटले तरी रिकामी ओझी वाहावी लागतात हो. एका जबाबदारीतून दुसर्‍या जबाबदार्‍या वाढलेल्या असतात. भावनिक रित्या अडकून पडतो माणुस उदा. मुले त्यांचे शिक्षण, संगोपन.

यावर मूवी यांचा ऐतिहासिक हजारी धागा झालेला आहे.. आता परत नको... :) आभार ...

आपल्या मराठीतील तु ही रे ह्या सिनेमात सई ताम्हणकरच एक वाक्य आहे त्यात ति असे म्हणते की , "नवरा हा प्रसादाच्या शिरा सारखा असतो त्यात तुप किती आहे बेदाणे किती आहेत तो गोड असतो का नाही हे विचारायच नसते जसा आहे तसा खायचा " आपल्या आई वडिलांनी ही संसार केलाच की होता आणि टिकवून ही दाखवला . माझ्या मते नात्यांची खरी मजा ही त्यांना उलगडण्यात आहे

लाटकर काकांनी मिपाची वैचारिक पातळी उंचावण्याचा आणि प्रबोधन करण्याचा निर्धारच केलेला दिसतोय. काय भारी भारी विषय काढताहेत चर्चेसाठी. तुमच्या प्रयत्नात सुयश लाभो.

हेला काकानां किति विषयात गती आहे नाही !! अगदी अथ पासुन इति पर्यंत्....आपली तर मती कुंठित होते बॉ. कॉलिंग णिसो सर....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हां तुम्हाले समजल बाकी कोनाले नका सांगु :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एका शब्दावर जर सात उपप्रतिसाद होत असतील तर अर्थ कळायला हवा, निदान व्यनित तरी!! ;)

In reply to by सूड

सोन्याबाप्पु - मी गमतीत लिहीले होते. पण सुड साहेब म्हणतात त्याप्रमाणे अर्थ सांगायला पाहिजे. हेला काकांना पण कळेल ना त्यांच्या नावाचा अर्थ.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गाववाले तुम्ही "हेला" "हेला" करू नोका
बालीश विनोद. येथे हेला म्हणजे हेमंत लाटकर. तुम्हाला काय म्हणायचे ते मला कळले.

In reply to by हेमंत लाटकर

असो! विनोद होता इतके समजून घेतलेत ते खुप झाले काका! माफ़ी मागतो तुमची! जरा अस्थानी पण परिस्थितीजन्य विनोद केल्या बद्दल !!

There are three stages of Marriage namely MAD for each other / MADE for each other / MAD because of each other. ------- आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन. "Argument is bad but Discussion is good, Because Argument is to find out WHO is right.. & Discussion is to find out WHAT is right.." ---------- नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम - खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून. ------------ खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. ---------- चांगुलपणा बरोबर unpredictable पणा जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात . ------------ ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही -------------------- नवरा - बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या. ------------------- आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती - कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते. सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा. प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होत नाही कारण निर्णय बरेच वेळा फक्त चांगल्या बाजूचा विचार करून, बेनिफिट ऑफ doubt देऊन घेतलेला असतो. प्रेम जरी आंधळे असले तरी लग्नाचा निर्णय घेताना बुद्धी आंधळी होणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या. जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.

In reply to by सुधीर वैद्य

हे असलं की मग स्वीकार अस्वीकार असे प्रश्नच उरत नाहीत. A women you love is a part of you, she is not separate. So it is impossible to say that I accept this in her & reject that of her. Her company is a magic your life & your company is romance for her.

त्यापेक्षा लग्नच न केलेलं किती सोप्पं.. आधी लग्नालायक माणुस मिळवा.. त्यालाही आपण लग्नालायक वाटलो पाहिजे असं बघा.. मग हे घरच्यांनाही पटलं पाहिजे, ते जमवा.. मग भरपुर पैसे खर्च करुन लग्न करा.. आणि मग तडजोडी करत ते टिकवा.. त्यापेक्षा लग्नच करु नका.. माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खुपच आनंदात दिसतात ते..!

In reply to by पिलीयन रायडर

+१.. अगदी बरोबर!! लग्न होतं हेच प्रमुख कारण असलं पाहिजे लग्न न टिकण्याचं!! लग्नच झालं नाही, तर न टिकण्याचा प्रश्नच नाही!!

In reply to by पिलीयन रायडर

त्यापेक्षा लग्नच न केलेलं किती सोप्पं.. आधी लग्नालायक माणुस मिळवा.. त्यालाही आपण लग्नालायक वाटलो पाहिजे असं बघा.. मग हे घरच्यांनाही पटलं पाहिजे, ते जमवा.. मग भरपुर पैसे खर्च करुन लग्न करा.. आणि मग तडजोडी करत ते टिकवा..
अगदी हेच लिहायला आलो होतो, पण म्हटलं जाऊ देत.

In reply to by पिलीयन रायडर

बहुदा अजून १०-१२ वर्षात हीच परिस्थिती येणार आहे. फुकटच्या गोष्टी कशाला अडकून ठेवा. आपण तर पोरांना सरळ सांगणार आहोत. अजिबात लग्नाच्या भानगडीत पडू नका. काही बिघडत नाही. जन्मभर वैताग करण्यापेक्षा सरळ सोपे वेगळे राहिलेले बरे. नाहीतरी लई जनता आहे कि जी पोरे जन्माला घालतेच त्यामुळे उलट लोकसंख्या कमी झाली तर जरा जीवन सुसह्य होइल

In reply to by जिन्क्स

अजिबात नाही.. अगदी सरळ स्वच्छ आणि निर्मळ मनाने लिहीले आहे.. लग्न हे नसत्या कटकटींना आमंत्रण असते हे माझे अगदी ठाम मत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

खरय. मला तरी सर्क्यासटीक टोन वाटला नाही. खूप कमी जोडपी असतात जी मेड फॉर असतात. बाकी सगळे ओझ्याची बैलच असतात. आणि आपली संस्कृति नावाची गोष्ट प्रचंड दांभिक आहे. खरे बोलायची चोरी आहे आणि सतत बाकीचे काय म्हणतील ह्या नावाखाली भरपूर जबरदस्ती होती. मला सगळ्यात गम्मत आई- बापांची वाटते. आपले पोरगा/पोरगी ह्यांना लग्न ह्या वर ते काहीही सांगत नाहीत. फारच कमी लोक सांगतात असा माझा तरी अनुभव आहे. फुकट आह्मी असे सहन केले अहामी कसे adjust झालो वगैर ऐकवत राहायचे. त्याने कोणाच फायदा होतो काय माहिती. त्यापेक्षा आपल्या चुका नक्की कोठे आपण आणि आपली बायको/नवरा कमी पडलो हे सांगायला धजावत नाही. असो.

In reply to by चैतन्य ईन्या

जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर किंवा मोल्ड फॉर.. एच अदर.. असुन काही फायदा नाही. आख्खेच्या आख्खे खानदान एकमेकांसाठी मेड फॉर असेल तर कदाचित लग्न फार आनंददायी गोष्ट असु शकेल.. मी आणि माझा नवरा अगदी मेड फॉर आहोत.. तरीही लग्न का केलं असा प्रश्न आम्हाला पडतोच. लग्न.. संसार.. नातेवाईक.. त्यामुळे येणारे (थोडेसे) चांगले (बरेचसे) वाईट प्रसंग.. छळवाद असतो नुसता.. कसं असतं की नुसए दोघं एकमेकांच्या प्रेमात असतात तोवर ठिके.. बाकीच्यांची जशी एंट्री होते तशी गाडी घसरायला लागते. मुळात भारतात लोक दुसर्‍याच्या संसारात फारच लुडबुड करतात म्हणुन हा सगळा वैताग आहे. आपण बरं आपलं काम बरं असा विचार लोकांनी केला तर कदाचित इतका त्रास होणार नाही.. आता मुळात एखाद्याला पार्टनरच भिकार मिळाला तर मात्र आयुष्य फार फार वैतागवाडी होऊ शकतं..

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई.. तुझा हा प्रतिसाद म्हणजे प्रत्येक विवाहित(मेड फोर एअच अदर इ.) जोड्प्याची सध्य परिस्थिती दर्शवतो..

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई - मेड फॉर इच अदर जोडप्यांची ही परिस्थिती तर तसे नसलेल्यांचे काय हाल होत असतील

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसाद आवडला. >>>>बाकीच्यांची जशी एंट्री होते तशी गाडी घसरायला लागते. मुळात भारतात लोक दुसर्‍याच्या संसारात फारच लुडबुड करतात म्हणुन हा सगळा वैताग आहे. अगदी खरं आहे. -दिलीप

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खुपच आनंदात दिसतात ते..! हाय भारतात परवानगी नव्हती ना ! तरिहि बराय

स्त्रियांनी खालील वाक्याचा मनापासून विचार करावा हि विनंती . A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth….

लैंगिकता हा मध्यवर्ती घटक आही विवाहसंस्थेचा. लगिकता टाळुन हा विषय कसा पुढे जाऊ शकतो. अर्थात इतर ही घटक आहेतच मला वाटत एक जे सर्वाधिक महत्वाच कारण असत ते एकाच व्यक्तीला सोर्स सर्व गरजांचा सोर्स बनवंण वा शेअरींग चा सोर्स बनवण म्हणजे सुख दु:ख आनंद सेक्स आवड निवड छंद करीयर शिक्षण सर्व सर्व महत्वाचे घटक एकाच ठीकाणी शेअर वापर करण्याची सक्ती कालांतराने बोअरडम निर्माण करत असावी. म्हणजे जे काय आता आहे ते हा कींवा ही यांजकडेच मागा दया शेअर करा. समवेत भोगा. मग माणुस मुळात अस होत की ठीक आहे माझा नवरा आहे पण आता याच्याबरोबर माझ उदा. गाणं आहे समजा एक उदा. काय शेअर करणार तो समजा त्यात शुन्य आहे किंवा रस नाही म्हणा त्याला काही इतर बाबीत असेल तर नाही आता सक्ती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तोच तो तेच ते तेच ते एक कविता नाही का ? शॅलो पिपल डिमांड्स व्हरायटी असा आक्षेप चुकीचा होतो. एक यांत्रिकता नात्या मध्ये येते. ही यांत्रिकता भयावह असते कधी जाणवली तर. निरीक्षण करुन बघितल तर लक्षात येत. जोडप्य्यांची रोमँटीक होण्याची ठराविक ठिकाणी ठराविक संवाद मग तोच क्रम सर्व म्हणजे जोडपी एकमेकांचा इतका जबरदस्त सराव होतो. इतका प्रेडीक्टेबल नवरा वा बायको होऊन जातात मग एक यांत्रिकतेमुळे तेच ते तेच ते मुळे बोअरडम निर्माण होतच. मग स्पाइस अप करण्याचे प्रयत्न होतात पुन्हा जव़ळीक काही का़ळाने स्पाइस अप पण प्रेडीक्टेबल होऊन जात. त्यात पण यांत्रिकता. लग्न केवळ ओढल फरफटत नेतात लोक वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष मध्ये काहीतरी मुल समाज नोकरी सेक्स छंद रुटीन काहीतरी टाकुन दोन गडी मध्ये काहीतरी रुमाल टाकुन वर्षानुवर्ष खेळ सांभा़ळुन ठेवतात सो कॉल्ड विवाह सुरुच राहतो प्रत्येक मनुष्याची उर्मी संवेदना वेग़ळी शिवाय ती सतत बदलत राहते त्यात अशी सक्ती विवाहसंस्था एक जोक आहे असो

In reply to by मारवा

वा एकदम योग्य विश्लेषण. इथेच आपले लोक मार खातात. फुकाच्या चांगुलपणा आणि उगाचच एक पती/पत्नीव्रता वगैरे गोष्टी डोक्यात ठासून भारावेलेल्या आहे. अर्थात त्यात मुलांचा फायदा असतो. कारण त्यांना दोघांची गरज असते आणि मग होतो तो सगळा मुलांसाठीचा खेळ. ते लोढणे ओढत राहणे हेच जीवन बनून राहते.

In reply to by मारवा

वैवाहिक प्रणय हा नुसता शरीर संबंध नाही. कदाचित तुम्हाला सार्थक प्रणयाची कल्पना दिसत नाही. सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत. एक, पारस्पारिक अनुबंध, दोन, अपराध शून्य चित्तदशा आणि तीन, समय शून्यता. हे तीन पैलू एकत्र येणं हा अत्यंत दुर्लभ योग आहे आणि तो केवळ वैवाहिक संबंधातच येणं शक्य आहे. एकमेकात बेतहाशा प्रेम असेल तर प्रणायात घेण्याऐवजी देण्याची कृतार्थता येते आणि ती प्रणयाची खरी खुमारी आहे. अपराधशून्य चित्तदशा केवळ वैवाहिक प्रणयातच असू शकते ही उघड गोष्ट आहे. आणि समयशून्यता म्हणजे दोघांच्याही मनावर वेळेचं कुठलंही दडपण नको. या तीन गोष्टी सिद्ध झाल्या तर आणि तरच.... प्रथम स्त्री तृप्त होते आणि मग पुरुष तृप्त होतो. या तृप्तीचं नांव सार्थक प्रणय आहे. अशा सार्थक प्रणयानंतर स्त्रीला पहिल्यांदा आपल्या स्त्री देहाचा अभिमान वाटू लागतो, ती परी होते. आणि पुरुषाला पत्नीबद्दल कृतज्ञता वाटू लागते. ते एकरुप होतात. आणि मग प्रत्येक प्रणय हा वेगळा रंग होतो, त्यात कधीच तोचतोपणा येत नाही. या एकरुपतेतून मग वैवाहिक जीवन खुलत जातं. किरकोळ मतभेद, भिन्न आवडीनिवडी, एवढच काय पण पराकोटीला गेलेले कलह सुद्धा मग एकमेकांना दुरावू शकत नाही.

In reply to by सूड

सूड राव ते ठाकूर साहेब फार सुंदर भाषेत लिहितात. तशी भाषा मला येत नाही पण त्यांनी जे काही लिहिले आहे ते सत्य आहे. साधे तुम्ही जर एक पेटी आणि एक तबला घेऊन गायला बसलात आणि तुमचे सूर जुळले तर मैफिलीत स्वर्ग उभा करू शकता. तेच एक जण बेसूर असेल तरी मैफिलीचा बेरंग होतो. तुमचा साथीदार अल्लारखा किंवा गोविंदराव पटवर्धन नसतो पण त्याची गरज नसते. आपल्याला येणारे रागच किंवा तालच वाजवायचे असतात आणि मैफिलीचा आनंद लुटायचा असतो.

In reply to by सुबोध खरे

एकदम बरोबर! :) (लग्गीतला जाकिटहुसेन्)रंगा

In reply to by विवेक ठाकूर

लग्ना करुन ठेवलेले शाररिक संबंधच फक्त नैतिक दॄष्ट्या योग्य आहेत, आणि म्हणुन त्याच संबंधात "अपराधभाव" नसतो हे चुक आहे. तुमची नीतीमत्ता तसं सांगते म्हणुन तुमच्या मेंदुपुरतं ते योग्य आहे. पण मुळात ज्यांना हे मान्य नाही ते लग्ना बाहेरही तुम्ही म्हणताय तसा प्रणय अनुभवु शकतात. सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..

In reply to by पिलीयन रायडर

सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..
लग्न न करता पार्टनरकडून जे मिळते त्यात समाधान नसते. त्यात एकमेकाकडून फक्त सुख घेणेच असते. त्या सनीबाईंना विचारा ती जे करत होती त्यातून खरेच सुख मिळत होते का? तर मग तिने लग्न का केले.

In reply to by पिलीयन रायडर

गंमतीचा भाग म्हणजे सनीबाईंनी ज्याच्यासोबत अधिक "व्यवसाय" केला त्याच्याशीच लग्न केलं.
सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..
लाख वेळा सहमत. अर्थात विवाह म्हणजे "पवित्र बंधन" असं मत असणार्‍यांना ते पटणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पि रा ताई सगळा मेंदूचाच खेळ आहे. भरपूर पैसे खाऊनहि लोक उजळ माथ्याने आणी निलाजरेपणाने वावरतातच कि. त्यांना त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही असं थोडीच आहे? मुलं जन्माला येतातच, औरसत्व महत्त्वाचं असतं. एकदा तेच अमान्य केलं कि प्रश्नच मिटला. रांगेत उभा राहून तिकीट घेतलं काय कि मागच्या बाजूने खिडकीतून एक नोट सरकवून घेतलं काय? सिनेमा तोच असतो.

In reply to by सुबोध खरे

मुलं जन्माला येतातच, औरसत्व महत्त्वाचं असतं. एकदा तेच अमान्य केलं कि प्रश्नच मिटला.
मुलांचं औरसत्व ठरून आपली संपत्ती आपल्याच अपत्याकडे जावी म्हणून तर विवाहसंस्था स्विकारली गेली. अर्थात ती फुलप्रुफ नाहीच. ;)

In reply to by DEADPOOL

त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला लव, सेक्स अन् एन्जॉयमेंट ह्या तिन्हीबद्दल पुरेशी अनुभूती नाही असे दिसते...

काही लग्न बिग्न नको. पार्टनर बरा नसेल तर नात्यातून बाहेर पडणे चांगले पण एकूणच एक जोडपे, एक संसार करायचा असे साधे सरळ गणित कुठे असते? संसाराचा भरपूर पसारा असतो. तो मांडायचा, चालू ठेवायचा व वृद्धत्व आलेतरी चालूच ठेवायचा. आपल्याबरोबर संसार संपतो. ज्या महिलांना/पुरुषांना काही कारणाने एकट्याला गाडा ओढावा लागतो त्यांची दमछाक होतेच पण अगदी एकोप्यानं संसार करणार्‍यांचीही होते. लग्न केलं म्हणून घर घ्या/ रेंट करा मग मुलेबाळे, त्यांच्या शाळा, आपल्या नोकर्‍या, म्हातारपणाची सोय. वाहने, कपडे, फर्निचर, स्वयंपाकघराचे सामान, हौसमौज, अपेक्षा/ अपेक्षाभंग, आजारपणे यासगळ्यात भोवंडून गेला नाही असा संसार नसेल. थोडे कमीजास्त असेल तेवढेच! मी पुढीलजन्मी माझ्याच नवर्‍याबरोबर लिव्ह इन रिलेशिपमध्ये मुलाबरोबर राहणार. ;)

In reply to by रेवती

मुलेबाळे, त्यांच्या शाळा, आपल्या नोकर्‍या, म्हातारपणाची सोय. वाहने, कपडे, फर्निचर, स्वयंपाकघराचे सामान, हौसमौज, अपेक्षा/ अपेक्षाभंग, आजारपणे
रेवाक्का, लिव्ह इन रिलेशिपमध्ये हे सगळं नसतं ? म्हातारपणाची सोय ऑपॉप होते की काय ?

In reply to by रेवती

सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.
=)) =)) =)) अता चिंग्याच्या किंवा तत्सम टिनेजांच्या मस्तीच्या तक्रारी करणार नै म्हणजे तुम्ही? =)) चिंग्याला नक्की दाखवा हा प्रतिसाद. =)) =)) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

असं कसं चिमणेश! तक्रारी करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. टीनएजरांच्या तक्रारींचं काही सांगू नकोस. लग्गेच सुरु करीन पण हा धाग्याचा विषय नै ना!

In reply to by रेवती

असं कसं? काढाचं ओ तुम्ही धागा. किंवा लट्टुकाकांना सांगु हाँ आपण काढायला. टिनेजरांच्या वैट्टं सवयी आणि देशहित वगैरे वगैरे. सखोल अभ्यास आहे त्यांचा ते टिनेजर असल्यापासुन.

आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
पूर्वी कित्ती कित्ती छान होतं नै, मुली शिक्षितच नव्हत्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीच नव्हत्या. त्यामुळे नवऱ्याने कसंही वागवलं तरी झक मारत त्यांना लग्न टिकवून ठेवावंच लागायचं. न ठेवून सांगतात कुणाला? त्यामुळे खरं तर मुली शिकल्या आणि नवऱ्याची एकाधिकारशाही संपली ही खरी जाचणारी कारणं दिसताहेत... एके काळी मिपावर ज्या पाशवी शक्ती होत्या त्यांनी या वाक्यांबद्दल फाडून खाल्लं असतं... गेले ते दिवस. आणि हो, लग्न ही टिकवून ठेवण्याजोगी गोष्ट का आहे हे सांगितलेलंच नाही. एक अमेरिकन म्हण आहे - डोंट व्हॉट एयंट ब्रोकन. कदाचित पूर्वीच्या काळी चुकीच्या कारणांसाठी लग्नं टिकून राहायची. आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्यामुळे कोणी त्याबद्दल बोलायचंही नाही. आता तो प्रश्न सुटून कदाचित चांगली परिस्थिती आली आहे. मग जे सुधारलंय ते का बदला?

भारतात अमेरिकन संस्कृती येत आहे. नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे. तरूणपणी हे सर्व चांगले वाटते परंतू वयाच्या एका टप्प्यावर याचाही कंटाळा येतोच. जे लग्न करत नाहीत ते सुखी आहेत हे कसे काय कळते. सुखी सदरा ही कथा सर्वांना माहितच असेल.

In reply to by हेमंत लाटकर

मुळात "अमेरिकन संस्कृती" भारतात येत आहे हाच गैरसमज आहे. अमेरिकेत काही सगळे जिकडेतिकडे लिव इन मध्ये असतात असा तुमचा समज आहे की काय? अहो हेलाकाका, व्यवस्थित २०-२०, २५-२५ वर्षे संसारी लोक सगळीकडेच असतात. मुलं बाळं, नातवंडं, त्यांची अंगडी टोपडी सगळं सगळं "भारतीय संस्कृतीप्रमाणे" करणारे लोक इथे ढिगाने आहेत. मुळात कोणत्याही मनुष्याला नैसर्गिकरीत्या काही स्थैर्य आवश्यक असतेच, अगदीच भटकणारे असतात परंतु ते अपवादच, त्यासाठी संसाराची जबाबदारी तुम्हाला अँकर करते.

In reply to by चतुरंग

लट्टू काका , तुम्ही टनाटन संघटनेत जा! एकंदरीत छान जमेल तुमच तिथे. एष धर्म: टन्ना टन्न: टनाटन फ्राय!