मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे.
मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही.
1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे. एक अत्यंत credible family conflict उभा करण्यात आला आहे.
2. "राऊ या कादंबरीवर आधारित" असे पडद्यावर घोषित केलेले आहे. मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा मला तरी दुसरा आठवत नाही.
3. 'पिंगा' गाण्याला तर्काधारित कल्पनाविलास करून कथारचनेत सुयोग्य स्थान दिलेले आहे. 'मल्हारी' या गाण्याला मात्र फारसा अर्थ किंवा प्रयोजन नसून ते संपूर्णपणे उडवले तरी काहीच फरक पडत नाही.
4. मस्तानीचा आणि तिच्या मुलाचा द्वेष/ विरोध हा पेशवे कुटुंबीयांनी अनेक कारणांमुळे केला. पैकी "पेशवेपदाचा वारसा" किंवा "इस्टेटीतला वाटा" हेही एक होते. पण ते अनुल्लेखाने मारण्यात आले आहे.
5. बुंदेलखंडातील मराठा-बंगश युद्धाची व्यूहरचना दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे.
6. मस्तानी बुंदेलखंडातून अनाहूत पाहुणी म्हणून शनिवारवाड्यात दाखल होते, हा सिनेमाचा भाग बखरीमध्ये एका वाक्यात लिहिल्यासारखा एका सीनमध्ये संपतो. दृश्यमाध्यमात तिचा प्रवास दाखवणे गरजेचे होते.
7. शनिवारवाड्यातला धबधबा जरूर पहा!! आता तो लुप्त झाला असावा. (शनिवारवाडाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ती गोष्ट वेगळी.)
8. मस्तानी आणि काशी या फक्त काही महिन्यांच्या अंतराने बाळंत होतात. पण नंतर नाना आणि शमशेर यांच्या वयात कित्येक वर्षांचे अंतर दिसते.
9. मस्तानीला पेशवे कुटुंबीयांनी राहत्या घरात साध्या नजरकैदेत ठेवले होते. पण सिनेमात तिला साखळदंड घालून तुरुंगात टाकतात. ही कविकल्पना आहे, पण चित्रपटाच्या विशिष्ट रचनेमुळे क्षम्य.
10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही.
11. आरसा महालातील सर्व दृश्ये विशेष काळजीपूर्वक पाहिली. पण कुठेही Equipment किंवा crew reflections आढळली नाहीत. हे प्रशंसनीय आहे. (तेवढ्यात मस्तानीचा नाच पहायचा मात्र राहून गेला)
***
एकूण पहाता, डोक्यात राख घालून घ्यावी किंवा शेपटाला आग लावून थैमान करावे असे मला या सिनेमात काहीच आढळले नाही. ब्रह्मवृंदाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
वाचने
17398
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरसा महालातील सर्व दृश्ये
हघे
In reply to आरसा महालातील सर्व दृश्ये by उगा काहितरीच
8. मस्तानी आणि काशी या फक्त
प्रकाटाआ
In reply to 8. मस्तानी आणि काशी या फक्त by सायकलस्वार
बरोबर
In reply to 8. मस्तानी आणि काशी या फक्त by सायकलस्वार
माफी
In reply to 8. मस्तानी आणि काशी या फक्त by सायकलस्वार
गोंधळ
In reply to 8. मस्तानी आणि काशी या फक्त by सायकलस्वार
रघुनाथ रावच्या बारशा आधी एका
In reply to गोंधळ by राही
मनोरंजक सेन्सॉरशिप!
तेच तर
आमचीही कॉमेंट
अगदी अगदी. पटले गजोधरभय्या.
In reply to आमचीही कॉमेंट by पगला गजोधर
सही पकडे है
In reply to आमचीही कॉमेंट by पगला गजोधर
सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही)
In reply to सही पकडे है by प्रदीप साळुंखे
+१
In reply to सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही) by पगला गजोधर
असेही सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही)
In reply to +१ by प्रदीप साळुंखे
अगदी खरं आहे.
In reply to असेही सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही) by पगला गजोधर
असेही सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही)
In reply to अगदी खरं आहे. by प्रदीप साळुंखे
पिंगा आणि मल्हारीला केलेला
In reply to असेही सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही) by पगला गजोधर
मी सांगतो
In reply to पिंगा आणि मल्हारीला केलेला by पिलीयन रायडर
पुन्हा तेच
In reply to मी सांगतो by प्रदीप साळुंखे
आणि एवढं करुन आपण जे विरोध
In reply to पुन्हा तेच by पैसा
अहो
In reply to पुन्हा तेच by पैसा
तुम्ही महान क्रांतीकारक आहात
In reply to अहो by प्रदीप साळुंखे
+११११११११
In reply to तुम्ही महान क्रांतीकारक आहात by पैसा
ठीक हाय!
In reply to तुम्ही महान क्रांतीकारक आहात by पैसा
वोक्के.
In reply to ठीक हाय! by प्रदीप साळुंखे
तुम्हाला नक्कीच चालेल. एका
In reply to अहो by प्रदीप साळुंखे
तो मी नाही.
In reply to तुम्हाला नक्कीच चालेल. एका by काळा पहाड
काय रे काळ्या पहाडा
In reply to तुम्हाला नक्कीच चालेल. एका by काळा पहाड
कृपया थांबा
In reply to काय रे काळ्या पहाडा by प्रदीप साळुंखे
प्रेमाची व्याख्या
In reply to तुम्हाला नक्कीच चालेल. एका by काळा पहाड
व्यक्तिगत मत मांडत आहे.
In reply to पुन्हा तेच by पैसा
कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती आहे का?
In reply to व्यक्तिगत मत मांडत आहे. by चलत मुसाफिर
मुद्दा राहतोच
In reply to कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती आहे का? by पैसा
कल्पनाही शक्य नाही
In reply to मुद्दा राहतोच by चलत मुसाफिर
:-)
In reply to कल्पनाही शक्य नाही by पैसा
इथे मी सहमत.
In reply to :-) by चलत मुसाफिर
गाणी
In reply to इथे मी सहमत. by भंकस बाबा
अँ???
In reply to :-) by चलत मुसाफिर
व्यक्तिगत अनुभव
In reply to अँ??? by पैसा
हा हा हा!
In reply to कल्पनाही शक्य नाही by पैसा
नक्की पोकळ गृहीतक आहे?
In reply to हा हा हा! by सोत्रि
मला वाटतं ह्या गृहितकाला
In reply to नक्की पोकळ गृहीतक आहे? by पैसा
त्यासाठीच बोलले
In reply to मला वाटतं ह्या गृहितकाला by प्रचेतस
.
In reply to त्यासाठीच बोलले by पैसा
उगाच्च,
In reply to . by मोगा
मात्र बखरीत उल्लेख असला तरी
In reply to त्यासाठीच बोलले by पैसा
अहो त्यांचे काम अंतिम निर्णय
In reply to मात्र बखरीत उल्लेख असला तरी by सोत्रि
इतिहास वाचून या
In reply to मात्र बखरीत उल्लेख असला तरी by सोत्रि
सेम हियर सोत्री
In reply to हा हा हा! by सोत्रि
आपण म्हणताय ते बरोबर आहे..पण
In reply to सेम हियर सोत्री by मालोजीराव
प्रदीप +1
In reply to मी सांगतो by प्रदीप साळुंखे
मी विचारलं की हा विरोध "जातीय
In reply to मी सांगतो by प्रदीप साळुंखे
जातीय?
In reply to मी विचारलं की हा विरोध "जातीय by पिलीयन रायडर
काय??
In reply to मी सांगतो by प्रदीप साळुंखे
बुरसटलेल्या प्रवृत्तींचे असेही सेन्सॉर!
In reply to असेही सेन्सॉर! (बुरसटलेल्या प्रवृत्तींचेही) by पगला गजोधर
मुद्द्याचे कधी बोलणार?
In reply to बुरसटलेल्या प्रवृत्तींचे असेही सेन्सॉर! by पगला गजोधर
तुमच्याच्यानी सांगणं होणार
In reply to बुरसटलेल्या प्रवृत्तींचे असेही सेन्सॉर! by पगला गजोधर
पिरा आणि पैसा तै
In reply to तुमच्याच्यानी सांगणं होणार by पिलीयन रायडर
हा हा हा!
सहमत
इतिहास म्हणावे तर दोन इतिहास
In reply to सहमत by मित्रहो
बाजीराव आपल्या कुटुंबियांच्या
In reply to सहमत by मित्रहो
काल क्रम
+१
In reply to काल क्रम by श्रीरंग_जोशी
पिंगा आणि वाट लागली
सिनेमा सुंदर आहे
चित्रपट आवडला
मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा