Skip to main content

कविता कुणाची? - एक जोड - बेजोड प्रयोग

लेखक निनाव यांनी सोमवार, 21/12/2015 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी. कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून. हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी. विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :) कविता कुणाची कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून अमृत स्वरूपात आलेली ती कविता कुणाची? त्या कवीची ? कि त्या बोरू ची ? कि असेल ती त्या कागदाची ? कि त्या वेड्या कला प्रेमीची जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो प्रेम करतो - निरागस - स्वैर कविता कुणाची ?
लेखनविषय:

वाचने 2062
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

तुमची ही कविता माझ्या नावावर प्रसिद्ध केली आणि जनतेला ती आवडून मला साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यावर लताबाईंनी, आशादिदींनी गाणे बिणे गाऊन मला तहहयात रॉयल्टी मिळायला लागली तर तुम्हाला आक्षेप नसावा. काय म्हणता?

कविता आहे लाडांची कविता आहे कृष्णमूर्तींची कविता आहे शेजारच्या गोडबोले काकांची सुध्दा (कविताप्रेमी) पैजारबुवा,

:)