जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारत दौऱ्यात कालच ९८,८०५ कोटी रूपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधायच्या करारावर सही झाली. ९८,८०५ कोटी रूपये म्हणजे सध्याच्या भावाने सुमारे १५ बिलिअन डॉलर होतात. अन्य एका बातमीप्रमाणे बुलेट ट्रेनचा खर्च १५ बिलिअन डॉलर आहे. त्यापैकी ८०% म्हणजे १२ बिलिअन डॉलरचे कर्ज जपानची Japan International Co-operation Agency देणार आहे अशी बातमी आहे. हे कर्ज ०.१% व्याजाच्या दराने ५० वर्षे मुदतीचे असेल आणि मुद्दलाची परतफेड १५ वर्षांनंतर सुरू होणार अशी बातमी आहे.
भारत सरकारला २०% म्हणजे सुमारे २० हजार कोटी रूपये या प्रकल्पात टाकावे लागतील आणि उरलेले सुमारे ८० हजार कोटी कर्जाऊ असतील. या कर्जाचे व्याज ०.१% आहे. सरकारच्या इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०.१% इतका कमी नक्कीच नसेल विशेषत: भारत सरकारच्या बॉंडवर ७-८% व्याजाचा दर आहे हे लक्षात घेता. तरीही आकडेमोडीच्या सोयीसाठी इक्विटीवरील रेट ऑफ रिटर्न ०% आहे आणि व्याजाचा दर ०.१% आहे असे समजू.
या बातम्या वाचून काही प्रश्न माझ्यापुढे पडले आहेत.
१. सुरवातीचे १५ वर्ष ८० हजार कोटींवरील व्याज म्हणजे ८० हजार कोटी गुणिले ०.१% = ८० कोटी रूपये द्यावे लागेल. ती रक्कम विशेष मोठी नाही. त्यानंतर कर्जाची एकूण ३५ वर्षात परतफेड करायची आहे. अशा पायाभूत सोयींसाठीच्या प्रकल्पावरील कर्जाची परतफेड बहुतांश वेळा बलूनिंग (सुरवातीला कमी आणि जशी वर्षे जातात त्याप्रमाणे जास्त) असते. या परतफेडीचे आकडे याक्षणी माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी ३५ वार्षिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड होईल असे गृहित धरू. वार्षिक हप्ता सुमारे २,३२७ कोटी रूपये इतका येईल. प्रत्यक्ष हप्ता सुरवातीला २,३२७ कोटींपेक्षा कमी आणि नंतर जास्त असेल. म्हणजे बुलेट ट्रेनचे उत्पन्न दिवसाला २,३२७ कोटी भागिले ३६५ बरोबर ६.३८ कोटी रूपये असेल आणि बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तरच बुलेट ट्रेन वार्षिक हत्प्याला लागतील तितके पैसे उभे करू शकेल.
२. आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुमारे २५ रेल्वेगाड्या दररोज धावतात. यात अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या आणि अहमदाबादमार्गे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रवासाला आज ८-९ तास लागतात. तर त्याच प्रवासाला विमान सव्वा तास (आणि चेकीन टाईम इत्यादी धरून २ तास घेते). जर बुलेट ट्रेन दोन तासात अहमदाबादला पोहोचवणार असेल तर त्या ट्रेनचा Target Group सध्या विमानाने प्रवास करणारे प्रवासीच असतील-- सध्या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी नव्हे.
सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर २१ विनाथांबा विमाने दररोज उडतात. एका विमानात २०० प्रवासी असे धरले तर सगळी विमाने १००% भरली तर ४,२०० प्रवासी दररोज विमानाने मुंबई ते अहमदाबाद प्रवास करतात. अर्थातच दररोज सगळी विमाने १००% भरत नसतात. त्यामुळे आकडेमोडीच्या सोयीसाठी दररोज ४,००० प्रवासी प्रवास करतात असे समजू. इथे समजते की २०११-१२ ते २०१२-१३ या काळात देशातील सर्व विमानतळावर मिळून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४% ने घट झाली होती. AAI च्या संकेतस्थळावर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही मिळतील. ते करायला याक्षणी वेळ नाही. चर्चेत इतर मुद्दे आले आणि त्यामुळे गरज लागली तर अहमदाबाद विमानतळावरील आकडेही तपासून सांगतो. संपूर्ण देशात त्या एका वर्षात डोमेस्टिक प्रवाशांच्या संख्येत ४% घट झाली असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा कमी असेल तर काही मार्गांवर घट त्यापेक्षा जास्त असेल. उदाहरणाच्या सोयीसाठी आपण असे समजू की पुढील १५ वर्षात मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट होईल-- म्हणजे दर वर्षी सुमारे ४.७३% ने प्रवासी संख्या वाढेल. म्हणजे १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद प्रवास करू इच्छिणारे दररोज ८००० प्रवासी असतील. तितकेच प्रवासी उलट दिशेनेही प्रवास करतील असे गृहित धरू. म्हणजे दररोज १६,००० प्रवासी मुंबई-अहमदाबाद मार्गावर विमानाने प्रवास करू इच्छितील असे गृहित धरू.
३. आज प्रवासाच्या एक दिवस आधी विमानाचे तिकिट विकत घेतले तर ते ४,००० रूपयांपासून उपलब्ध आहे. पुढील १५ वर्षे दरवर्षी सुमारे ७.५% ने तिकिटांचे दर वाढतील असे गृहित धरले तर आणखी १५ वर्षांनी ते तिप्पट म्हणजे १२,००० रूपयांपासून तिकिटे उपलब्ध होतील. आणि अर्थातच तिकिटे १०-१५ दिवस आधी विकत घेतल्यास ती आणखी स्वस्तही मिळतीलच. आज १५ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास ते २,००० रूपयांना उपलब्ध आहे. म्हणजे १ दिवस आधी तिकिट विकत घेतल्यास जितके पैसे मोजावे लागतील त्याच्या अर्धी रक्कम!! हेच गुणोत्तर १५ वर्षांनीही राहिल असे गृहित धरले तर तिकिटे ६ ते १२ हजार रूपयांमध्ये मिळतील. सरासरी तिकिटाची किंमत १० हजार रूपये समजू.
म्हणजेच आणखी १५ वर्षांनंतर मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासासाठी सर्व प्रवासी दररोज १६ हजार गुणिले १० हजार बरोबर १६ कोटी रूपये खर्च करतील. यातही किती गृहितके आहेत हे वर आपण बघितलेच. बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य रूपये असेल तर वार्षिक हप्त्याला लागतील तितके पैसे उभे करायला दररोज ६.३८ कोटी रूपये इतके उत्पन्न बुलेट ट्रेनला मिळायला हवे. आणि अर्थातच बुलेट ट्रेनची Operating Cost शून्य नक्कीच नसणार. बुलेट ट्रेनला अगदी ४०% फायदा होणार (तिकिटांमधून मिळणारे उत्पन्न वजा Operating Costs) असे धरले तरी बुलेट ट्रेनचे दररोजचे उत्पन्न ६.३८ भागिले ४०% बरोबर १५.९५ कोटी रूपये हवे.
याचाच अर्थ अन्यथा विमानाने प्रवास केला असता त्या सगळ्या प्रवाशांना बुलेट ट्रेनने आपल्याकडे आकर्षित करायला हवे. विमानापेक्षा जास्त तिकिट बुलेट ट्रेन ठेऊही शकणार नाही. आणि बुलेट ट्रेनला अंडरकट करायला विमानकंपन्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर तिकिट कमी ठेऊन प्रवासी बुलेट ट्रेनकडे वळणार नाहीत याची काळजी घेतीलच.
या सगळ्या गणितामागे किती liberal गृहितके घेतली आहेत हे समजून येईलच. एक तर दरवर्षी ४.७३% ने पुढील १५ वर्षे प्रवासीसंख्या वाढेल हे प्रचंड धाडसी गृहितक आहे. तसेच प्रत्येक विमानात ४०००/४२०० = ९५% प्रवासी भरलेले असतात हे गृहित धरलेले आहे. प्रत्यक्षात हा आकडा सरासरी ८०% च्या आसपास असतो. आणि मुख्य म्हणजे Return on Equity ०% धरला आहे. प्रत्यक्षात तो ७-८% असेल. तेव्हा ही बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती तर होणार नाही ही शंका वाटते.
अशाप्रकारच्या प्रकल्पात अनेक प्रकारचे इतर फायदे (externalities) असतात. प्रदूषण कदाचित काही प्रमाणात कमी होईल.त्या व्यतिरिक्त आणखी कुठले फायदे बुलेट ट्रेनने होतील यावर बराच विचार केला. पण ते फायदे सापडले नाहीत.
मला वाटते की बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा प्राधान्याने हाती घेण्याजोगे इतर अनेक पायाभूत प्रकल्प आहेत. ५०० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १ लाख कोटी म्हणजे किलोमीटरला २०० कोटी इतका प्रचंड खर्च या प्रकल्पात आहे. त्यामानाने रस्ते दर किलोमीटरमागे ६ ते ६.५ कोटी (आणि डोंगरदऱ्या असतील तर थोडे अधिक-- मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तोपण प्रश्न नाही) इतका खर्च येतो. प्रवासासाठी वेळेची बचत म्हणाल तर ती पण फार होताना दिसत नाही. कदाचित विमानप्रवासाला लागणारा वेळ आणि बुलेट ट्रेनला लागणारा वेळ यात विशेष फरक असेल असे दिसतही नाही. वर्तमानपत्रातील सर्व बातम्या तरी मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तास होईल असेच म्हणत आहेत. विमानालाही (चेकीन टाईम वगैरे धरून) तितकाच वेळ लागतो की.
बुलेट ट्रेनचा अट्टाहास का लावला जात आहे हेच अजून मला तरी समजलेले नाही. ज्या बी.के.सी मध्ये बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असे म्हटले जात आहे त्या बी.के.सी मध्येच संध्याकाळी वाहतुकीची किती कोंडी होते हे त्या भागात दररोज ऑफिसला जाणारा कोणीही सांगू शकेल. मग या समस्या आधी सोडविल्या जाणे अधिक महत्वाचे नाही का? मुंबईतील बंदरे (मुंबई आणि उरण) येथून मालगाड्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांमुळे बाजूला टाकले जाते आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी मालगाड्यांना काही दिवस लागतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली या मार्गावर केवळ मालगाड्याच जाऊ शकतील असा Dedicated Freight Corridor करणे, Delhi-Mumbai Indistrial Corridor वगैरे कामांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेनचा मुद्दा ऐरणीवर का आणला जात आहे हे समजण्यापलीकडचे आहे.
माझ्या हातून काही मुद्दे निसटत आहेत का? या विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी-- विशेषत: मोदीभक्त विरूध्द मोदीद्वेष्टे असे स्वरूप या चर्चेला न आले तर फारच उत्तम. मिपावरील जाणकारांचे याविषयी काय मत आहे?
वर्गीकरण
वाचने
116564
प्रतिक्रिया
254
मिसळपाव
प्रतिक्रिया
कर्ज देतंय कोण?
In reply to काही बिन्दू by लॉरी टांगटूंगकर
डेफिसीट कव्हर करायला बहुतांश
In reply to कर्ज देतंय कोण? by स्वधर्म
बुलेट ट्रेन चे पर्याय ह्या
मला लोकांना एकाच सांगावेसे
+१००
In reply to मला लोकांना एकाच सांगावेसे by सुबोध खरे
तेंव्हा पैशाचे मुल्य कमी होते हे लक्षात असावेजी माणसे व राष्ट्रे ही "टाईम व्हॅल्यु ऑफ मनी" संकल्पना जाणून त्यावर आपले निर्णय घेतात, तीच सधन बनतात असा इतिहास आहे.आणखी एक अॅन्करींग पॉईंट
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
मस्त . सुंदर उत्तर. याच्या
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असते
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
हा प्रतिसाद क्लिंटन यांच्या
In reply to तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असते by डॉ सुहास म्हात्रे
हो तुमच्या प्रतिसादालाही
In reply to हा प्रतिसाद क्लिंटन यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
आकडे मोडीची सोय
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
काही मुद्दे
In reply to आकडे मोडीची सोय by मैत्र
ट्रुमन साहेब मी अभियंता नाही
In reply to आणखी एक अॅन्करींग पॉईंट by गॅरी ट्रुमन
१) जपान आपल्याला कर्ज सध्याची
In reply to ट्रुमन साहेब मी अभियंता नाही by सुबोध खरे
भारतात २०१३ साली एक कॉन्फरन्स
लोकलची व्हेंटिलेटर्स बंद ,
लातुर -मुंबई (व्हाया पुणे)
जोपर्यंत
या सगळ्यापेक्षा
In reply to जोपर्यंत by तुषार काळभोर
नाही पैलवान - असे कहिही म्हणे
In reply to जोपर्यंत by तुषार काळभोर
साहेब
In reply to नाही पैलवान - असे कहिही म्हणे by अभिजित - १
कर्ज घ्यायची जबरदस्ती नाही न
In reply to साहेब by सुबोध खरे
गुवाहाटी-आग्रा
In reply to साहेब by सुबोध खरे
९८००० आणि ७५०
In reply to गुवाहाटी-आग्रा by गॅरी ट्रुमन
आधी म्हणायचे कि इतर कशाला
In reply to ९८००० आणि ७५० by मैत्र
जाता जाता -- हीच परिस्थिती
In reply to आधी म्हणायचे कि इतर कशाला by अभिजित - १
बुलेट ट्रेन
मला वाटतय कि बरेच जण बुलेट
In reply to बुलेट ट्रेन by कानडा
रोचक चर्चा... :)
आणखी किती वर्ष आपण पायाभूत सुविधांसाठी रडत बसणार?
बुलेट ट्रेनचे तिकीट २८००/- आहे.
मार्वल
In reply to बुलेट ट्रेनचे तिकीट २८००/- आहे. by मोग्याम्बो
कॉमिक्स बुकचे चाहते खूप कमी आहेत हो
In reply to मार्वल by कपिलमुनी
कॉमिक्स बुकचे चाहते खूप कमी
In reply to कॉमिक्स बुकचे चाहते खूप कमी आहेत हो by मोग्याम्बो
हा आकडा आला कुठून ? मन कि बात
In reply to बुलेट ट्रेनचे तिकीट २८००/- आहे. by मोग्याम्बो
त्या पेक्षा हा बुलेट ट्रेन
आणखी काही..
मला प्रश्न पडला आहे कि बुलेट
In reply to आणखी काही.. by राही
ठाणे पर्यंत underground
In reply to मला प्रश्न पडला आहे कि बुलेट by सतीश कुडतरकर
च्यायला, ठाण्यापर्यंत भुयारी
In reply to ठाणे पर्यंत underground by अभिजित - १
मला प्रश्न पडला आहे कि बुलेट
In reply to आणखी काही.. by राही
त्यांच्या पुनर्वसनाची किंमत
In reply to मला प्रश्न पडला आहे कि बुलेट by सतीश कुडतरकर
मजा आहे ना सरकारी जमिनींवर
In reply to त्यांच्या पुनर्वसनाची किंमत by अनुप ढेरे
ही बातमी वाचा
गरीब मुलगा
http://www.dnaindia.com/money
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोबत
जपानी माध्यमांच्या नजरेतून
बुलेट ट्रेन सध्या नको,
रिअल इस्टेट मात्र वरती येईल
हे कुणी सांगितल हि नेहमीची
In reply to रिअल इस्टेट मात्र वरती येईल by अभिजित - १
मग कायमचे तिकडे जा ना . इथे
In reply to हे कुणी सांगितल हि नेहमीची by धनावडे
बळी ???
In reply to मग कायमचे तिकडे जा ना . इथे by अभिजित - १
अर्धवट राव तुमच्या आकलन
In reply to बळी ??? by अर्धवटराव
अहो हात वर करायचा ना
In reply to अर्धवट राव तुमच्या आकलन by अभिजित - १
श्रीधरन आणि १०००० कोटी
एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन
In reply to श्रीधरन आणि १०००० कोटी by मैत्र
पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये करायचे स्वप्न आहे मोदी साहेबांचे.
In reply to एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन by अभिजित - १
बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच
In reply to पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये करायचे स्वप्न आहे मोदी साहेबांचे. by अर्धवटराव
कसे काय ??
In reply to बुलेट ट्रेन प्रॉजेक्टचा झालाच by नाना स्कॉच
पण बुलेट ट्रेन मुंबई मध्ये
In reply to एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन by अभिजित - १
यातले रुळ ओलांडताना
In reply to एकदम मान्य. पण बुलेट ट्रेन by अभिजित - १
२४ तासांत १७ लोकल प्रवाशांचा
बातमी अपूर्ण आहे का?
In reply to २४ तासांत १७ लोकल प्रवाशांचा by अभिजित - १
बुलेट ट्रेन मधे बसून प्रतिसाद
http://www.loksatta.com/desh
१५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० रूपये
In reply to http://www.loksatta.com/desh by अभिजित - १
१५ वर्षांनी तिकीटाचा दर १५००
In reply to १५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० रूपये by मराठी कथालेखक
.. सहमत
In reply to १५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० by रॉजरमूर
मोगा खान
In reply to .. सहमत by mugdhagode