बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल. 'स्पेक्टर' ची सुरवात होते ती मेक्सिको सिटी मध्ये बॉण्ड थंड डोक्याने समोरच्याला मारत असलेल्या दृश्याने, त्यावेळी त्याच्या डोळ्यात असलेला थंडपणा अगदी पाहण्यासारखाच. अाधीच्या दोन खलनायकांच्या मानाने यावेळेस जेम्सच्या विरुद्ध असलेला शत्रु Blofeld (ख्रिस्तोफ वॉल्ट्झ) अत्यंत बलवान आणि शांत आहे. त्याचामुळे यावेळेस MI6 च भविष्य टांगणीला लागलेलं आहे. त्याच्याकडे अत्यंत प्रगत असे तंत्र आहे, त्याउलट बॉण्ड ची MI6 बरखास्त झाली असून त्याच्या कड़े फ़क्त पारंपारिक अशी हत्यार याशिवाय काहीच नाही. तरीही बॉण्ड नेहमीप्रमाणेच त्याच्याशी लढून MI6 आणि त्याची प्रेयसी दोघांनाही वाचवतो. या बॉण्डपटात गॅझेटची रेलचेल नसली तरी बॉण्ड स्पेशल असलेली Aston Martin DB10 आणि OMEGA Seamaster 300 दोन गॅझेटस् मन मोहवून टाकतात.
'स्पेक्टर' ची खासियत म्हणावे तर त्याचे संवाद जसे की…
Ralph Fiennes अर्थात नविन 'M' च्या तोंडी बॉण्डसाठी असलेला
"A license to kill is also a license not to kill."
क्लिनिक बार मधे :
James Bond: Vodka martini. Shaken, not stirred.
Clinic Barman: I'm sorry, we don't serve alcohol.
James Bond: I'm already starting to love this place...
(कितीतरी दिवसांनी हा बॉण्ड सिग्नेचर डायलॉग ऐकायला मिळाला आणि सोत्रींच्या रेसिपीची आठवण झाली ).
मोनिका बेलुची सोबतचा: ( ही चित्रपटात का होती हां अजूनही पडलेला प्रश्न आहे )
Lucia Sciarra: If you don't leave now, we'll die together.
James Bond: I can think of worse ways to go.
Lucia Sciarra: Then you're obviously crazy, Mr...
James Bond: Bond. James Bond.
रेल्वेमधला :
Madeleine Swann: You shouldn't stare.
James Bond: Well, you shouldn't look like that.
बॉण्डगर्ल म्हणून Madeleine Swann अर्थात Léa Seydoux. ( तीच मिशन इम्पॉसिबल- घोस्ट प्रोटोकॉल मधली नटी ) अत्यंत सुंदरपणे शोभली आहे, आह.....काय सुंदर दिसते ती महाराजा. विशेषतः तिचं रेल्वे मधलं पार्टी गाउन घालून चालण्याची अदा घायाळ करणारी आहे.
सरतेशेवटी तांत्रिकदृष्टया उच्च नसला तरी संवादानी सावरून 'स्पेक्टर' ला एका वेगळ्याच उंचीवार नेउन ठेवलय. 'डॅनियल क्रेग' वर अनेक लोकांनी हा बॉण्ड शोभत नाही वगैरे वगैरे टिका केली आहे. आधीचे 'रॉजर मुर', 'पिअर्स ब्रॉसनन' हे कसले भारी होते या बद्दल मी जास्त लिहिणार णार नाही, पण माझ्या जनरेशनला थोडासा थंड डोक्याने खून करणारा पण आपल्या प्रेयसीबद्दल हळवा झालेला निळ्या डोळ्यांचा बॉण्ड नक्कीच आवडतो. या बाबतीत तरी हा बॉण्ड म्हणून 'डॅनियल क्रेग' शोभतोच. माझ्या आवडत्या बॉण्डला सलाम.
वाचने
7308
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
Madeleine Swann: You shouldn
एक दुरुस्ती-
धन्यवाद
In reply to एक दुरुस्ती- by जेपी
मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत
सरस बॉंड
In reply to मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत by इस्पिक राजा
म्युनिक मध्ये पण तो नव्हता
In reply to मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत by इस्पिक राजा
म्युनिक मध्ये होता की क्रेग.
In reply to म्युनिक मध्ये पण तो नव्हता by रामदास
आधीचे बॉण्ड सुपरमॅन होते,
जबरी
In reply to आधीचे बॉण्ड सुपरमॅन होते, by संदीप डांगे
मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते
In reply to जबरी by महासंग्राम
डॅनियेल
In reply to मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते by संदीप डांगे
एवढे मात्र खरे की जेम्स
In reply to मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते by संदीप डांगे
डांगे साहेब.. कशाला उगीचच
In reply to मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते by संदीप डांगे
हे हे, ;-) धन्यवाद! जरूर लिहू
In reply to डांगे साहेब.. कशाला उगीचच by संपत
डॅनियल क्रेग हा बॉन्ड पेक्षा
नमस्कार विजु भाऊ , कसे आहात ?
In reply to डॅनियल क्रेग हा बॉन्ड पेक्षा by विजुभाऊ
हा बाँडपट फारसा नाही आवडला.
स्पेक्टर पाहिलाय,आवडला.
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा
In reply to क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा by प्रसाद१९७१
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहेपण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा
In reply to क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा by महासंग्राम
टायटल मध्ये आधी 'इन' लावले
मस्तं परीक्षण. स्पेक्टर
सहमत
In reply to मस्तं परीक्षण. स्पेक्टर by पद्मावति
क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो
In reply to सहमत by निनाद मुक्काम …
हे जेम्स बाँड च्या कॅरेक्टर
असचं
क्रेग चा बाँड
क्रेग
५ बॉंडपट
In reply to क्रेग by घाटावरचे भट
इद्रीस एल्बा
In reply to क्रेग by घाटावरचे भट
काय सुंदर दिसते ती महाराजा.