Skip to main content

मिपावरी कोनाडा असावा.....

लेखक दमामि यांनी बुधवार, 09/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण पहिली कशी मिळाली लाइन कोठे कशी क्रॅास झाली निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया मिपावरी कोनाडा असावा..... घरी सासू येणे कसे आवरावे वाचाळ पत्नी, कसे शांतवावे समस्येवरी यां चर्चा घडाया मिपावरी कोनाडा असावा..... कसा धीर गळतो, कसा त्रास होतो बिछान्यावरी का वनवास होतो उपाय त्यावर जाणून घ्याया मिपावरी कोनाडा असावा..... भविष्य मेनू आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान पंचअंग भावे पुरुषस्वभावा मिपावरी कोनाडा असावा.....
लेखनविषय:

वाचने 9301
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

वा!! निलकांत यांनी मनावर घ्यावे ही नम्र विनंती !!

दोनच मिन्टे...की अर्धा तास..? दो ईन्ची ससा की...असे अश्व खास...? जल्लां..मोक्यालाच तिचा डोका का दुखावा...? मिपावरी कोनाडा असावा..... तुम्ही सिगरेटवरच चर्चा करणार नक्की....!!! (वाईल्ड कार्ड येन्ट्री देणारे असं ऐकलं ब्वा....)

In reply to by pacificready

थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या....जबरदस्त वास्ताय आपल्याकडे..!!

In reply to by स्वप्नांची राणी

इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू कायकू आवाज लगाई

In reply to by स्वप्नांची राणी

जल्ला किती ते टंकनसुख (तोंडसुख या धर्तीवर) घेताव. वाईच हि जागा तरी सोडा की जरा.

सदर कविता "दमामी" या कवीने रचलेली असून "मिसळपाव" इथे प्रकाशीत झाली आहे. वरील कवितेत कवी कोनाडा मिळावा यासाठी आर्जवे करतांना दिसतो. याबरोबरच कोनाड्याची आवश्यकता का आहे याचेही सार्थ वर्णन करतो.सदरील कविता ही "भिंतीवरी कालनिर्णय असावे" या नितांतसुंदर जाहीरातीवरून बेतलेली आहे असा काही विद्वानांचा कयास आहे. पण काही विद्वान याकडे एक वेगळी कलाकृती म्हणून पाहण्यात यावे असा आग्रह करतात. तरी या कवितेचा व यापूर्वी विविध मान्यवरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मिसळपाव प्रशासन कोनाड्याला मान्यता देणार का ? हे पाहणे रोचक ठरेल.

छान जमतं दमामि. सूर मिले मेरा तुम्हारा फिर सूर बनोगा------- यावरही जमवा एक फक्कड. मेनबोर्डावर लेख प्रतिसादांस "संपादन" बटण लावा मग होऊ द्या कोनाड्याचे भूमिपुजन.कोनाड्यातलं तेल बाहेर सांडलं तर पुसता येईल आपल्यालाच.

पैल्याच् बॉल पासून छक्के चौके हानलेत. आवड्यास. कोनाड़ेवाले बाबा.

In reply to by टवाळ कार्टा

मी कविता लिहिली Wed, 09/12/2015 - 16:47 आणि तुमचा प्रतिसाद - Thu, 10/12/2015 - 10:04 या उशिराचे कारण काय असावे ब्रे!;))

तुमचा एक-एक कोनाडा देऊन सत्कार का करण्यात येऊ नये अशी शो काॅज नोटीस! देखते रहिये कोनाडेतक!

तुम्ही आधीच एका कोनाडयात आहात न, अजून दुसरा कशाला ? कोनाडे शोधायचा भारी सोस बाई तुम्हाला !! तिथे अंधारात कोळी बिळी लपलेले असतात हो सांभाळून र्हावा !! अन उद्या ते एल जी बी टी क्यू वाले समजा म्हणतील, आम्हालाबी मिपावर शेप्रेट कोनाडा हवा, तेव्हा त्यांच्या मागे मागे जाणार का तुम्ही.. कोनाडा शोधत.. बोलो बोलो टेल टेल ;)

In reply to by नीलमोहर

निमो ताई आणि कोळी यांच्यात निमो ताईंच्या अथक प्रयत्नांमुळे सौहार्दपूर्ण संबंध स्थापन झाल्याचे कळते, तेव्हा कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.

In reply to by दमामि

बरीच माहिती ठेवता/काढता हो, बाकी तुमच्या "वट" ची गरज नाही पडायची, मिळेल मला एंट्री (हवी असेल तर.)

In reply to by स्रुजा

द गर्ल विथ द ड्रैगन टैटू च्या पुढील लेटेस्ट भागाचे शीर्षक माहीत आहे ना ? - द गर्ल इन द स्पाइडर'स वेब ;) सगळ्या 'गर्ल्स' साठी :p

In reply to by दमामि

ती पण तुम्हाला ? काहीही हं द-मामि, 'कोनाड्यात तुमची वट लावेन म्हणतो.' - हे कोनाड्यात तुमची 'वाट' लावतो असं वाचलं, :p