Skip to main content

पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 03/12/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.

वाचने 45498
प्रतिक्रिया 224

प्रतिक्रिया

ऑ......... आजच्या स्त्री प्रधान जगात व्यक्त होण्यासाठी पुरुषाना हक्काचे मिळायला हवे या चळवळीचे जनक म्ह्णून तुमचीच वर्णी नक्की आहे सर. भाषेचे सुद्धा बघा ना सगळे चांगले शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि वैट्ट शब्द पुल्लिंगी आहेत. उदा : ती माया , ती थंडी ,ती झोप , ती हौस, ती मौज आणि तो राग , तो उक्काडा ,तो आळस , तो कंटाळा कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर.

In reply to by विजुभाऊ

आपलं काय ठरलंय. शुद्धलेखन, भाषा, व्याकरण यावर मिपावर काहीच आणि कधीच चर्चा करायची नाही. शुद्धलेखनावर तात्याने लै ठोकलंय मला. त्यामुळे तो विषय बंद. बाकी, दालन असावं की नसावं ? -दिलीप बिरुटे

In reply to by विजुभाऊ

बापरे... कधी विचारच केला नव्हता.... किती हा अन्याय??? असली भाषा नक्किच कोणत्या तरी स्त्रीनेच बनवली असेल.... कित्ती कित्ती अन्याय हा पुरुषांवर....

मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा, दालन म्हणा पण पुरुषांसाठी वेगळ्या भागाची आवश्यकता आहे. काही आरोग्यविषयक बाबी अ‍ॅनॉनिमसली विचारता येतील व त्याबद्दल इथले जाणकार-डॉक्टर काही सल्ले देतील अशीही व्यवस्था करता येईल. कुठल्या कंपनीचे रबर चांगले याबद्दल चर्चा मेनबोर्डावर करता येतील असे वाटत नाही. ह्या आणि इतर अनेक खर्‍याखुर्‍या समस्या ज्या इतरांना आंबटशौकिन वा चावट वाटू शकतात त्या मेनबोर्डावर शक्य असतील तर मग वेगळ्या दालनाची गरज नाही.

In reply to by संदीप डांगे

मेन बोर्डावर लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.
कुठल्या कंपनीचे रबर चांगले...
याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. पुन्हा एकदा प्रतिसाद लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

@याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. >> आणि जर तिथे ही गोष्ट बोलायची तयारी होत नसेल..बाईची किंवा बाप्याची ! तर काय करावे ब्रे!?

In reply to by प्रचेतस

राईट..ते घेता येतच. पण एकाच विषयावर जेंव्हा त्यातुन गेलेले अनेकजण अनुभवसिद्ध मत मांडतात.. तेंव्हा त्यातुन मिळणारी माहिती ही सरळ मदत करणारी ठरते..तेंव्हा अशी चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत..म्हणूनच वेगळा विभाग..

In reply to by अत्रुप्त आत्मा

>> चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत..
त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं. "आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते. कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही. (माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

@त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं.>> हा भावी पिढ्यांसाठिचा आदर्शवाद झाला हो बाई. अत्ताच्या पिढीनीपण हे शिक्षण आधी घ्यावं,लगेच पचवावं..आणि अश्या चर्चांची गरज निर्माणच होऊ देऊ नये..असं काही आपलं म्हणणं आहे का? @"आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते.>> सहमत आहे.. पण सध्या इथे किंवा आणखिही कुठे अशी चर्चा होऊ शकत नाही..कारण अत्ताचे सगळे लोक तुमच्या इतके पुढारलेले नाहीत..त्याचं काय करायचं? ते बोला. @कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. >>> ते इथे उघड साध्य होणे शक्य नाही.. हेच सध्याचे वास्तव आहे.. हे विसरून कसे चालेल??? का ते लक्षातच घ्यायच नाही..आणि आदर्शवादाच्या हिंदोळ्यांनवर झुलत रहायचे? माझ्या म्हणण्याचा हेतू इतकाच की जेंव्हा समान समस्या असलेली लोकं त्याच्या निवारणासाठी स्वमदतगट तयार करतात..तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा,समुपदेशनाच्या डोसांपेक्षा वेगळा आणि सरळ मदत करणारा असतो.. मी अन्य समस्यांबाबत सध्या (भारतात/जगात) चालू असलेल्या अश्या काहि स्वमदतगटसंस्थांचा लाभार्थी सभासद आहे.. त्या प्रत्यक्षफायद्याच्या आधारावरच मी हे मत मांडतो आहे. @तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही.>> झालं तर. मग त्याच्या बाजुनी अथवा विरोधात मतप्रदर्शनही करु नका ना! @(माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.) >> मला तसा तो आधिही वाटलेला नव्हता..अताही वाटत नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@तेंव्हा त्याचा उपयोग पुसकी ज्ञानसंपादनापेक्षा >> तेंव्हा त्याचा उपयोग पुस्तकी ज्ञानसंपादनापेक्षा, ..असे वाचावे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रा.डॉ. आणि समविचारी पुरुषांचा कोणत्याही कोनाड्याला सतत विरोधच राहीला आहे. मुख्य बोर्डावर कोणत्याही विषयावर कोणालाही लिहायला बंदी नाही, इतकं सर्वांना माहितीच आहे. बाकी, मिपावर लिहायला येत जा अदिती, मला आपले प्रतिसाद खुप खुप आवडतात. :) अवांतर : अदिती आकाश निरीक्षण, तारे शोधणे, वगैरे काय चालु आहे सध्या ? एखादा नवीन तारा जर तुम्हाला सापडला तर त्या तार्‍याला प्रा.डॉ अन सोनचाफा असं नाव दे हं प्लीज. :) -दिलीप बिरुटे (अदितीच्या लेखनाचा फ्यान) :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते.
त्याचबरोबर...... charcha

In reply to by पगला गजोधर

पग, ते दोन गुढघ्यात काय दाबून धरलंय? चर्चेच्या नोंदी की काय? बाई जय्यत तयारीने आलेल्या दिसतात चर्चेसाठी! ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा.
पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद! चर्चा कुठे करायची आणि कृती कुठे हे आम्हांला चांगलं माहिती आहे याबद्दल खात्री बाळगा. एक फुकटचा सल्ला: विषय कळण्याची शून्य क्षमता असलेल्यांनी नको तिथे नाक खुपसून आपली शोभा(डे) करून घेऊ नये.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे,
>> पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद!
स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ का कायतरी म्हणतात ते हेच का? ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

शोभा डे यांचा अपमान केल्याबद्दल आपणास कारणे दाखवा नोटिस देण्यात येत आहे. - शोभा डे यांच्या प्रसिद्धीलोलुपतेची चीड़ असूनही 'आत्ता' त्यांच्यासाठी शानिभुति वाटणारा.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा, नटराज कंपनी ची पेन्सिल असली तर त्याच कंपनीचं 'लब्बर' वापरा की! पेनासाठी पण काही 'लब्बर' असतात. जास्त घासून चालत नाही पण. कागद फाटतो. नैतर मग व्हाइटनर वापरायचं. दिसतो वापरलेला पण ठीक ना! आणि लब्बर धुवावा मधे मधे. काळेपणा जातो. -इयत्ता 8 वी क -

हा सर्वस्वी मिपा मालकांचा आणि चालकांचा प्रश्न(पक्षी विषय) आहे. पण जस्म इतर कोनाड्यात कायं चालतं याची चर्चा करण्यात इथे हशील नाही तशीच या कल्पनेतील (भावी) कोनाड्याबदाल येथे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही... हे वैयक्तीक मत.. सांघीक मत : कोनाडा असल्याने का नसल्याने कुचंबणा आहे काय याचा कंपूच्या कंपूशी कंपूने चर्चा करून उत्तर देऊ शकेन. कोपच्यात गेलेला पण कोनाड्यात नसलेला नाखु

भारतात प्रत्येक ९ मिनिटाला एक विवाहीत पुरुष आत्महत्या करत असतो , त्याबद्दल चर्चा करता येइल भारतीय पुरुष लिंगभेदाला बळी पडतात (त्यांना ऑफिसमध्ये स्त्री सहकार्‍यांचा त्रास असू शकतो ) ४९८ अ सारख्या कायद्या विरूद्ध चर्चा करता येतील. सर्व काका लोकांसाठी मिड लाईफ क्रायसिस चर्चा करता येइल पुरुष पालकांसाठी वयात येणार्या मुलांसोबत कसे वागावे याबद्दल मुलांकडून सल्ले दिले जातील.

In reply to by पगला गजोधर

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही.
तर मग, हे तर मिपा वर चालूच आहे, इथेच मग यथेच्च चर्चा व्हाव्यात नं तुम्ही देलेल्या उदा-मधल्या.
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य.....
मग अश्या चर्चांमध्ये कोणी नाकं मुरुडू नये, अश्लील वै. म्हणून… आणि शेप्रेट कोनाडा कशला हवाय मग ?

का असू नये? जर मिपावर स्त्रीयांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळं दालन द्यायचं कौतुकास्पद कार्य होऊ शकतं, तर पुरुषांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी वेगळे दालन का नसावे? कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात. काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक. दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.

In reply to by आदिजोशी

कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात. काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक.
>> ++++++++++१११११११११११११ जोरदार हाणुमोदण्ण! हम इस प्रस्ताव का केवल इसी कारण से जोरदार समर्थन करते है।

In reply to by आदिजोशी

दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.
असच म्हणतो. जर त्रासच अधिक होऊ लागला, तर दंगेखोर आयडीवर बडतर्फाची कारवाही पण करता येईल आणि 'पावित्र्य' टिकवून ठेवता येईल.

In reply to by आदिजोशी

+१ काही चांगला उपयोग होत असला तर नक्कीच असावा असं वाटतं.

१) टारगटपणा करण्यासाठी काही मिपाकरांचे गुप्त कट्टे हत असतात.त्याचे सभासद वयानुरूप असतात.त्याचे पांढय्रावर काळे करायचे आहे का? २) बरेचजण TMC मध्ये असतील ( ताटाखालचे मांजर क्लब )त्यांच्या दु:खाला वाचा फोडायची आहे का? ३) सड्डेनाडवाल्यांची ऐश वेगळी TMC वाल्यांची वेगळी ४) सहन होत नाही आणि सांगताही येत नाही हे मुद्दे वेगवेगळे असतात. ५) बाकी टकलावर केस कसे आणावेत अशाप्रकारचे प्रश्न फक्त पुरुषांचेच असले तरी त्याची चर्चा करण्यासाठी AC कोनाडाच हवा असं काही नाही. ६) कोनाडा ठेवलाच तर जरा उंच ठेवा ,कोणाचे मखर मुकुट वरती थटायला नको.

>>> फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय. आपण म्हणजे कोण?

In reply to by pacificready

>>>> लिंगाधारित भेदभाव निर्माण करणारं वाक्य वाटु शकतंय स्त्री आणि पुरुष यांना इथे विनाअट आणि लिंगभेदाचा विचार न करता मिपावर प्रवेश दिला जातो, असे माझा अनुभव सांगतो. सर्वांना मिपावर सहज प्रवेश आहे. असा तो अर्थ घ्यावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे.
तुम्ही लिव्हा, वाचताव आम्ही हाव तोपर्यंत. . अ‍ॅडव्हान्समदी तिळगूळ घ्या, गोड बोला.

In reply to by अभ्या..

नो नाय नेव्हर. असं पळायचं नाही. वेगळं दालन असावं की नसावं इतकंच सांगा. असेल तर काय असेल नसेल तर का नसावं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता पळायचं नाय म्हणता तर आयका.

न सा वं

कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. ज्यांना करायच्यात प्रायव्हेट चर्चा त्यांनी व्हाटसप, जीटॉक, मेल, फोन, व्यनि अशा ईतर सुविधा वापराव्यात. ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी. एवढे बस्स का साह्यबा? मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)

In reply to by अभ्या..

तुम्ही जे बोलताय ते धाग्यातल्या विषयाला धरून नाही. स्त्रियांना अनाहिता आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा. निदान मला तरी असंच वाटतं. कंपूबाजीच करायची तर त्यासाठी तुम्ही प्रतिसादात दिलेल्या गोष्टी वापरून आताही केली जाऊ शकते.

In reply to by संदीप डांगे

>>>>> स्त्रियांना XXXX आहे म्हणून पुरुषांनाही तसंच काही पाहिजे हे जुळ्याचं दुखणं टैप मुद्दा नसावा. करेक्ट. धन्स. -दिलीप बिरुटे

In reply to by संदीप डांगे

विषयाला कसं धरुन नाही अण्णा? पुरुषांना का वेगळे दालन तर त्यांना स्त्रियासमोर ऑकवर्ड वाटते म्हणून. हो ना? वाइसवर्सा तेच. मग इथे सगळेच येतात. म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल? आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का? . बाकी संघटीत कंपूबाजी बद्दल पूर्णपणे सहमत.

In reply to by अभ्या..

आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?
काही हरकत नाही. फोटोशॉपची व्हर्जन केवढ्याला मिळते, उत्तम रंग कुठे मिळतात किंवा या प्रकारचे प्रश्न सेप्रेट दालनात विचारले तर नेमके उत्तर येण्याची प्रोब्याबिलिटी अजून वाढेल नै का? मायबोलीवर ही सिस्टिम अगोदरच आहे आणि त्यामुळे तिथे नुकसान झालेय असे कै दिसत नै. जन्रल बोर्डावरचे टॉपिक वेगळे, आपापल्या ग्रूपमधले वेगळे. इथला टॉपिक तिथं किंवा तिथला इथं आला तरी चालेल. पण मुळात वर्गीकरण इटसेल्फ चूक आहे असं तर काय नै वाटत बे अभ्या.

In reply to by अभ्या..

म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल? स्त्री आणि पुरुष हा अगदी बेसिक लेवलचा फरक आहे. आज जो तरूण आहे उद्या तो म्हातारा होणारच. पण आज जो पुरुष आहे तो वय वाढल्याने बाई होणार नाही. वाइसवर्सा. त्यामुळे, आर्टीस्ट असलेल्या/नसलेल्यांसाठी, डायबिटिज असलेल्या/नसलेल्यांसाठी, चष्मा असलेल्या/नसलेल्यांसाठी, बद्धकोष्ठ असलेल्या/नसलेल्यांसाठी, असं म्हणून चर्चा भरकटवू नये.

In reply to by अभ्या..

गल्लत होत नै ना नक्की? कारण तुमचं म्हणण मान्य केलं तर कोणत्याच ऑकवर्ड वाटणार्‍या गोष्टींची मिपावर चर्चा होणार नाही. जसे मी वर म्हटले की कोणत्या कंपनीचे रबर चांगले. दुसर्‍या स्पष्ट शब्दात कुठल्या कंपनीचे कंडोम्स चांगले असा धागा मेनबोर्डावर येणार नाहीच. एक आठवत असेल सर्व पुरुषांना. शाळेत असतांना, आठवीत वैगेरे मुलींसाठी एक खास वर्ग (लेक्चर-पीरीयड) घेतला जायचा, अजूनही होत असेल. तिथे त्यांना पाळी येणे व इतर संबंधीत समस्यांबद्दल कोणीतरी स्त्री-रोग तज्ञ येऊन माहिती देत असे. आपण पोरं एकटेच वर्गात बसून टिवल्या-बावल्या करत खास मुलींना कुठे घेऊन गेले, काय चालू असेल याचे ठोकताळे लावत असू. मला नाही वाटत आजवर कुणी वयात येणार्‍या मुलांसाठी खास वेगळ्या वर्गाची - पीरीयडची गरज आहे असे समजून तो आयोजित केला असेल. हे तेव्हापासून दुर्लक्षीत आहे. आताही असेच राहावे असे वाटते का? पुरूष मुळातच आपल्या व्यक्तिगत समस्या मोकळेपणाने चर्चीत नाहीत. मेनबोर्ड तर सोडूनच द्या. बर्‍याच तरुणांना खास पुरुषांचेच असे काही प्रश्न असू शकतात ज्याची उत्तरे इथले जाणकार देऊ शकतात. ते प्रश्न मेनबोर्डावर टाकू शकत नाहीत. दुसरं असं की आमच्या जे जे होस्टेलात कंप्युटर लावण्याबद्दल बंदी होती. (२००३-०४ चा काळ, स्मार्ट्फोन-लॅप्टोप नव्हते) मुलांच्या तर्फे मी जेव्हा संचालकांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी विरोधासाठी मुले फक्त पोर्नच बघत बसतील असा शेरा मारला. हा शेरा मारणार्‍या त्या संचालकांच्या मनात जी भावना मुलांबद्दल तेव्हा होती तीच अशा दालनाला विरोध करणार्‍यांची असेल असे मला वाटते. तुमचे काय म्हणणे आहे?

In reply to by अभ्या..

आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?
>>> नै चालणार. कारण हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमन्स ला लागू होत नाही.. (तो तुमचामाझा आर्टिस्ट लोकांचा खाजगी मामला आहे)यापेक्षा वर आदि वगैरेंनी दिलेले वेगळे पणाचे मुद्दे सरसकट सर्व पुरुष जातीला लागू होतात. ते मिपाहाऊस ऑफ कॉमन्स'चे आहेत.आणि म्हणून त्या दृष्टीनं ते बरोबर आहेत.

In reply to by अभ्या..

>>>> मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;) छ्या. मिपावर जगणे आणि मिपावर मरणे, मिपा माझी प्रेयसी आहे. पहिलं प्रेम. :) (आता मिपा स्त्रीलिंगी की पुल्लिंगी म्हणु नका) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

ती होयसळांची? टीशर्टवरली?

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्या बिचार्‍या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला मार पडण्याच्या नुसत्या शक्यतेनेही बुवांना नेहमी उकळ्या का फुटतात हास्यानंदाच्या?