पोटा पेक्षा मोठा
कसलाच नाही
गुन्हा
चिपाटा सारखी
छाति
त्यात कसला पान्हा।
भेगाळलेल्या
भुईच्या खुणा
अंगभर् वाहते
अल्बम मधली
हसरी ,लाजरी
माय कुठ राहते?
लव्हाळा सारखा
तरणा बाप
पराठी सारखा
खंजर होतो
निधड्या छातीत
आग घेऊन
डोळ्यांत डोह
दाटूंन राहतो।
नदी काठचे
अटले झरे
शिवार मरणासन्न झाले
पाहणी साठी
राजे आले
हिरवे कुरन
चरुंण गेले
तुमच्या खोलीत
गारवा आहे
बाग ही तुमचा
हिरवा आहे
आमचिच कशी
धूळ पेर झाली?
इथ्,कुणाची
माय व्याली?
भरल्या दिशी
चिंध्या खोसुन
शेतात जातात
या पोरी
आदानीच्या लेकानो
पिकुन बघा
मन भर ज्वारी
कणसा सारखी
मान मोडून
धरणीला पाय
रोऊन बसतो
पॅकेजच्या घोषणा
होतात
आमच्या छातीत
काटा धसतो।
वामनाची पिलावळ
ही
हिरव्या हिरव्या
करतात बाता
गढ़ी खोदा
मढे उकेरा
शोधा कुठ
गांव होता?
कशी झाली ,ही
माय नागडी?
कुणी ओढला
तिचा पधर?
शेतकरी
माय बाप
उगाच कशाला
दावता आदर?
बेडका सारखे
डराव डराव
माध्यमांचा
पुर लोटतो
उभ्या दारी
आब्रु काढता
मरण दारी
येऊन भेटतो?
आवळलेल्या श्वासाना
दोरिचा ही आधार वाटला
माझा राजा
मुक्त झाला
म्हणून तिचा
कंठ दाटला
भुकेल्या गिधड़ाना
नदि काठ सोपा होता
लटकलेल्या
सावली भोवती
गाड्यांचा ताफा होता।
दरिद्री हे जीन माय
नाही कधी
तुला विकल
बांधावरच
एक झाड़
पात्या सह
कस झुकल??
संतोष तांदळे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4509
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफाट
सर
In reply to अफाट by पालीचा खंडोबा १
माफ करा तुम्हाला चिपाड
सर
In reply to माफ करा तुम्हाला चिपाड by पालीचा खंडोबा १
बरोबर आहे उसाचे चिपाड तुम्ही
In reply to सर by संतोष तादंळे
सर
In reply to माफ करा तुम्हाला चिपाड by पालीचा खंडोबा १
अर्थवाही, प्रवाही आणि भेदक!
वा!!!
+१
In reply to वा!!! by दमामि
जबरदस्त
सर
In reply to जबरदस्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरदस्त
कवितेतील भावना वेदना थेट
छान कविता
नमस्कार अभारी आहे सर्वांचा
In reply to छान कविता by कविता१९७८
भारी लिहिलं आहे.
प्रतीसाद
वेदनादायी
सर
In reply to वेदनादायी by नाखु
सणसणीत! शहारा आला वाचतांना.
परिणामकारक काव्य!!
कविता चांगली आहे
+१११
In reply to कविता चांगली आहे by पैसा
कविता आवडली
सर, कविता आवडली. जगण्याची
:(