पोटा पेक्षा मोठा
कसलाच नाही
गुन्हा
चिपाटा सारखी
छाति
त्यात कसला पान्हा।
भेगाळलेल्या
भुईच्या खुणा
अंगभर् वाहते
अल्बम मधली
हसरी ,लाजरी
माय कुठ राहते?
लव्हाळा सारखा
तरणा बाप
पराठी सारखा
खंजर होतो
निधड्या छातीत
आग घेऊन
डोळ्यांत डोह
दाटूंन राहतो।
नदी काठचे
अटले झरे
शिवार मरणासन्न झाले
पाहणी साठी
राजे आले
हिरवे कुरन
चरुंण गेले
तुमच्या खोलीत
गारवा आहे
बाग ही तुमचा
हिरवा आहे
आमचिच कशी
धूळ पेर झाली?
इथ्,कुणाची
माय व्याली?
भरल्या दिशी
चिंध्या खोसुन
शेतात जातात
या पोरी
आदानीच्या लेकानो
पिकुन बघा
मन भर ज्वारी
कणसा सारखी
मान मोडून
धरणीला पाय
रोऊन बसतो
पॅकेजच्या घोषणा
होतात
आमच्या छातीत
काटा धसतो।
वामनाची पिलावळ
ही
हिरव्या हिरव्या
करतात बाता
गढ़ी खोदा
मढे उकेरा
शोधा कुठ
गांव होता?
कशी झाली ,ही
माय नागडी?
कुणी ओढला
तिचा पधर?
शेतकरी
माय बाप
उगाच कशाला
दावता आदर?
बेडका सारखे
डराव डराव
माध्यमांचा
पुर लोटतो
उभ्या दारी
आब्रु काढता
मरण दारी
येऊन भेटतो?
आवळलेल्या श्वासाना
दोरिचा ही आधार वाटला
माझा राजा
मुक्त झाला
म्हणून तिचा
कंठ दाटला
भुकेल्या गिधड़ाना
नदि काठ सोपा होता
लटकलेल्या
सावली भोवती
गाड्यांचा ताफा होता।
दरिद्री हे जीन माय
नाही कधी
तुला विकल
बांधावरच
एक झाड़
पात्या सह
कस झुकल??
संतोष तांदळे
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफाट
पोटा पेक्षा मोठा
कसलाच नाही
गुन्हा
चिपाटा सारखी
छाति
त्यात कसला पान्हा।
प्रचंड ताकद आहे ह्या कवितेत शहारा येतो अंगावर
सुरुवात तर लोण्याला कापणा-या सुरीसारखी अलगद मनात घुसते
सर
In reply to अफाट by पालीचा खंडोबा १
धन्यवाद
माफ करा तुम्हाला चिपाड
माफ करा तुम्हाला चिपाड म्हणायचे आहे का ? करण चिपाट कशाला म्हणतात ते कळले नाही. सुकलेल्या कडब्याच्या कांडिला चिपाड म्हणतात ना
सर
In reply to माफ करा तुम्हाला चिपाड by पालीचा खंडोबा १
ऊसाचे चिपाट असते ना
बरोबर आहे उसाचे चिपाड तुम्ही
In reply to सर by संतोष तादंळे
बरोबर आहे उसाचे चिपाड तुम्ही चुकून चिपाट लिहिले आहे ज्यांना माहिती नसेल त्यना त्याचा अर्थ्कळ्नर नाही म्हणून सुधारणे साठी विचार आभार आहे
पुन्हा एकदा कविता खूपच प्रभावी आहे
सर
In reply to माफ करा तुम्हाला चिपाड by पालीचा खंडोबा १
उसाचे चिपाट
अर्थवाही, प्रवाही आणि भेदक!
अर्थवाही, प्रवाही आणि भेदक!
वा!!!
वा!!!
+१
In reply to वा!!! by दमामि
sahamat!
जबरदस्त
संतोष सर कविता जबरा आहे,आवडली.
-दिलीप बिरुटे
सर
In reply to जबरदस्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
जबरदस्त
एक एक कडवं भिडलं आहे!
कवितेतील भावना वेदना थेट
कवितेतील भावना वेदना थेट पोहोचल्या !
खूप छान !
छान कविता
छान कविता
नमस्कार अभारी आहे सर्वांचा
In reply to छान कविता by कविता१९७८
नमस्कार अभारी आहे सर्वांचा
भारी लिहिलं आहे.
भारी लिहिलं आहे.
प्रतीसाद
सर चिपाट हे रस काढले ल्या ऊसाचे असते
वेदनादायी
तरी परखड सत्य....
थेट टोकदार अग्दी खोल जकहम करणारी...
सर
In reply to वेदनादायी by नाखु
धन्यवाद
सणसणीत! शहारा आला वाचतांना.
सणसणीत!
शहारा आला वाचतांना.
परिणामकारक काव्य!!
परिणामकारक काव्य!!
कविता चांगली आहे
"वामनाची पिलावळ" शब्दाने मात्र जरा रसभंग झाला. खरे तर कवीला दिसते त्याहून वेगळेच काही सांगायचे आहे असे वाटले. तुम्ही अजून १९२५ च्या प्रतिमांमध्ये अडकला आहात का?
+१११
In reply to कविता चांगली आहे by पैसा
+१११
वामनाची पिलावळ ही जातीयवादी नसावी हीच अपेक्षा.
कविता आवडली
कविता आवडली
सर, कविता आवडली. जगण्याची
सर, कविता आवडली. जगण्याची धडपड अतिशय परखड शब्दात मांडलीये तुम्ही.
लिहीत रहा.
:(
:(