Skip to main content

पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 04/12/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
- 1 - आलास समोर | चढले खूळ | नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले | तुटले टाके | उसवले बंध | विलग होवुनी | वस्त्र फडफडले | मनात गाणी | दाटती सूर | रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा | राणीचे उसासे | रखेलीचा टाहो | निपुत्रिक राजा | चढे सरणावरी | बाटला देह | विटाळ घेवुनी | धर्माची स्थापना | कुणी करावी ? विजयकुमार......... ०७ . ०२ . २०१०, मुंबई - २ - भरल्या स्तनात | दुधाच्या गाठी | मृत गर्भाचे | काळे ओठ | भुकेल्या देहात | गर्भाची पेरणी | ठिणग्या उडवती | विझल्या चुली | ओल्या शरीरास | गर्भाची शिक्षा | कुलवंतीनीचा जार | चांडाळ ठरला | सुटता हात | तीन्हीसांजी धूळ | उष्ण शरीरास | संध्या जाळी | हुंगून वासनेस | फुल जळाले | उजवीत माड्या | पुरुष परागंदा | विजयकुमार......... ०७.०२.२०१०, मुंबई -३- डोहाचे फुगवटे | संथ नदीत | अतृप्त आत्मे | पाण्यात तरंगती | प्राशुनी वारुणी | नजरचोरटे भय | पडक्या वाड्यात | भुते चेकाळाती | बाभळीची फुले | झुलती काटे | पाशवी वासना | अंगभर दाटलेली | मायेच्या संगास | गर्भाची आण | उसळले तारुण्य | बाप देशोधडी | लावता कवाड | अंधारव्यापी पणती | फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली | विजयकुमार......... ०७.०२.२०१०, मुंबई -४- खोंडाच्या जत्रेत | एकाकी गाय | फोडती हंबरडे | पान्हा सुटलेले | पेटत्या वणव्यात | भिजते जंगल | मनाविरुध्द घडला | असंगाशी संग | टाळता नजर | उठतो विखार | फिरती रानोमाळ | विषग्रंथीविना सर्प | वाटतात सारे | कैफभिजले काटे | बृहन्नडेच्या पायी | घुंगरू रुतलेले | ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर | फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी | विजयकुमार......... ०७ . ०२ . २०१०, मुंबई -५- केसाळ नागाचा | मणी विझला | सुहासिन सांगते | बिळे लिपा | घोडेस्वार राजा | आडावारती ओलेत्या | पौगंडावस्थेतील पोरांच्या | संभोग कथा | पांघरूणातील उसासे | निजभरली पहाट | ओलेत्या अंगाचा | खडखडतो रहाट | ऋतू पाळून | श्रावण मोहरतो | उध्वस्थ घराचा | कोसळतो मांडव | मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे | मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे | विजयकुमार......... ०७. ०२. २०१०, मुंबई
लेखनविषय:

वाचने 23964
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

इथे एक चांगला मुद्दा आपण उपस्थित केलाय, त्याबद्दल सविस्तर लिहावेसे वाटते. (काय करणार, नेहमीच असा प्रसंग येत नाही) प्रतिमेच्या चपखलपणावर टिका करण्याचे रसिकाचे स्वातंत्र्य चपखलपणा हा एक विवादित भाग आहे. कारण हाच कलेचा मूळ आत्मा आहे. ते कसे? ते चित्रपट दिग्दर्शनात बरेचदा दिसते. एखादी व्यक्तिरेखा क्रूर आहे असे दाखवण्याचे प्रत्येक दिग्दर्शकाचे प्रयत्न वेगळे असू शकतात. तो प्रयत्न चपखल आहे की नाही याबद्दल खुद्द दिग्दर्शक, रसिक यांची मते आपआपल्या संस्कार मान्यतेनुसार वेगवेगळी असू शकतात. उदा. नवाजुद्दिन सिद्दिकीला मला क्रूर दाखवायचे आहे तर तो थंड चेहर्‍याने एकानंतर एक कोंबड्या कापत जात आहे असे दृश्य दाखवेल. पण रोज कोंबड्या कापणार्‍याला त्यात काही क्रौर्य आहे असे वाटणारच नाही. इथे चपखलपणाबद्दल मतभिन्नता येते. दुसरे उदा: पूर्वी नायक-नायिकांचे प्रत्यक्ष चुंबन दाखवण्याऐवजी दोन फुले एकत्र येतांना दाखवत असत. त्याकाळात तेही अमूर्त रोमांटीक असे. पण आज कुणी असा प्रयोग केला तर लोक रोमांटीक होण्याऐवजी हसतात. तीच प्रतिमा, तेच प्रतिक, तीच क्रिया काळ बदलला तर त्याचे 'चपखल असणे' सुसंगत राहत नाही. 'असे धडधड घर पेटलेले' ह्या शब्दांमधुन वाचणार्‍याच्या मनात तो ज्या घरात राहतो 'त्यासारख्या' घरांच्या जळण्याची दृश्ये उभी राहतील. दु:खद प्रसंग आठवतील. करूण रस उचंबळून येईल. पण कवीला ही प्रतिमा नकोय, त्याने स्पष्ट केले रसिकांनो मी हे निघून गेलेल्या चिमण्यांच्या जुन्या घरट्यांबद्दल बोलत होतो. तर तिथे एक भ्रमनिरास होऊ शकतो. असे का होते? मनाच्या संस्काराच्या गाभार्‍यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आजवर उपलब्ध असलेल्या प्रतिमा-भावना संकलनातून फिट बसेल अशी निवडून प्रत्येक समोर येणार्‍या वस्तूला लावली जाते, ती फिट नसेल तर एलियन समजून नाकारली जाते व तीच वस्तू एक प्रतिमा बनून मेंदूत संरक्षित केली जाते पुढच्या तशाच असणार्‍या वस्तू ओळखण्यासाठी. आंबा म्हणून कोणी लाल ज्यूस हातात देईल तर तुम्ही मानणारच नाही. कारण ते जाणीवेच्या संग्रहातल्या प्रतिमेशी जुळत नाही. ती 'चपखल' बसत नाही. मग देणारा म्हणेल अरे ह्यात मी अमुक एक रंग टाकलाय तेव्हा विशिष्ट रंगासहित आंब्याचा रस अशी नवी प्रतिमा संग्रहीत केली जाईल. पुढे कधी लाल ज्युस समोर आला तर तो आंब्याचाही असू शकतो असा विचार आपलं अंतर्मन करेल. त्यामुळे अगदी सुस्पष्ट असल्याशिवाय कवीने स्वतः प्रतिमांच्या स्पष्टीकरणाच्या फंदात पडू नये. कारण एकदा त्याची साइड ओपन झाली की सामना सुरु होतो. कविता, कवी आणि रसिक. तो टाळलेलाच बरा.

In reply to by संदीप डांगे

कवीने स्वतः प्रतिमांच्या स्पष्टीकरणाच्या फंदात पडू नये.
सहमत आहे. एक उदाहरण देतो, शीव कन्या आणि राधा-कृष्ण विषयक कवियत्रींच्या धाग्यावर मी रसग्रहण करताना शंका व्यक्त करताना खरेतर कविंचे प्रतिसाद मला अपेक्षीत नव्हतेच मला इतर वाचकांशी रसिकांशीच केवळ चर्चा करावयाची होती, या धाग्यावरील माझ्या प्रतिसादांना खरेतर मला कवि कडून उत्तरांची अपेक्षा नाहीच पण बर्‍याचदा मिपासारख्या मंचावर प्रथमच येणार्‍या कविंना कदाचित हे लक्षात न येऊन ते स्पष्टीकरण देतात आणि घोटाळा होतो. ठाकूरांसारखा प्रतिसाद आलातरी व्यक्तीगत टिकेच्या वाक्यावर अथवा कुठे व्यक्तीलक्ष्य तर्कदोष असल्यास तेवढ्यापुरते बोट ठेऊन बाकी मौन धरणे कवि म्हणून श्रेयस्कर असावे. बाकी वर आदुबाळांनी म्हटल्या प्रमाणे इतरांच्या कोणत्याही अर्थ लावण्याला /अथवा टिकेलाही खूप मर्यादा पडतात.

In reply to by संदीप डांगे

कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही. कवीच्या कविता ग्रेसच्या स्टाईलची नक्कल आहे.

In reply to by संदीप डांगे

कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही. ही कविता ग्रेसच्या स्टाईलची नक्कल आहे.

In reply to by संदीप डांगे

पण शब्दांना अर्थ असल्यामुळे अमूर्त स्वरुपाचं लेखन समजण्यात लोकांना अडचण येत असावी. बाकी गायतोंड्यांच्या चित्रांबद्दल धन्यवाद!

In reply to by बोका-ए-आझम

शब्दांनाच काय तर पंचेंद्रियांद्वारे मेंदूपर्यंत पोचणार्‍या प्रत्येक जाणीवेला अर्थ आहे. बसमधून जातांना कुण्या पुरुषाचा धक्का स्त्रीला कोणत्या स्वरुपाचा जाणवतो तेही एक कम्युनिकेशनच आहे. धक्का अमूर्त असतो पण अर्थ वेगवेगळे निघू शकतात. ;-)

In reply to by संदीप डांगे

शब्दांना एक निरपेक्ष (absolute) अर्थही असतो. तुम्ही जे म्हणताय ते interpretation च्या संदर्भात म्हणताय, म्हणजे जो अर्थ प्रत्येकजण त्याच्या समजुतीनुसार आणि प्रवृत्तीनुसार काढत असतो. मला अभिप्रेत होतं ते meaning.

In reply to by बोका-ए-आझम

येस. निरपेक्ष सर्वमान्य अर्थाबद्दल म्हणत आहात तेव्हा ते तुमचं मत बरोबर आहे. त्यामुळेच असे अमूर्त लेखन समजण्यात अडचण येते. अमुर्त लेखनास संदर्भ नसतो. संदर्भ नसेल तर सर्वमान्य अर्थ लावणे कठीणच जाते. उदा. 'तो आला, म्हणाला घरी चल' ह्या पाच शब्दांना कोण लेखक कुठे कसा वापरेल त्यावरून त्याचे अर्थ निघतील. कोठ्यात धंद्याला बसलेल्या आपल्या बहिणीला, वृद्धाश्रमात असलेल्या बापाला, अंथरुणात शेवटच्या घटका मोजणार्‍या वृद्धाला, रुसून बसलेल्या प्रेयसीला. जितके प्रसंग तितके अर्थ. प्रसंग नसतील तर साध्या शब्दांचा भुलभुलैया होतो. असो.

In reply to by संदीप डांगे

कविता झेपली नाही. पण तुमचा प्रतिसाद आवडला. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट बद्दल बर्याच कन्सेप्ट क्लियर झाल्या असं वाटतयं.

जबतक फुकट है मजे लो. प्रितमची गाणी फुकटात डाउनलोडवायची, आनंद घ्यायचा आणि वरून त्यालाच चोर म्हणायचे ह्याला काय अर्थ...?

@विवेक ठाकूर सहमत आहे . मसालेदार शब्द वापरून अर्थहीन कविता लिहिल्यासारखी वाटतेय .

ठाकुरांशी सहमत. मुक्तछंद हा काव्यप्रकार अस्तित्वात आल्यानंतर निबंधातील क्रियापदे उडवून अनेक जन कवी म्हणवून घेऊ लागले. त्याला काव्यप्रकार म्हणून मानले गेले तरी प्रत्येक मुक्तछंद कविता नसते हे पटवण्यासाठी एका मोठ्या कवीने (नाव आठवत नाही ) असेच उच्च शब्द ओतप्रोत भरीत काव्य सदर केले आणि सर्वांची वाहवा मिळविल्यानंतर सांगितले कि हे काव्य नाहीच. गेल्या पाच मिनिटात बसल्या बसल्या वर्तमान पत्रातील काही शब्द अधोरेखित करून उलट सुलट जोडले आहे. आता याला कविता म्हणावी का ?( फार पूर्वी वाचनात आलेला किस्सा ). तर मुद्दा असा कि कविता शब्दांनी बनलेली असते पण प्रत्येक शब्द बांधणीला कविता म्हणायचा अट्टाहास का ? ग्रेस यांच्या कृष्ण एकांत मध्ये रुक्मिणी सत्यभामा आणि राधा यांच्या कृष्णावरील प्रेमाची तुलना एवढे सांगितले कि पूर्ण कविता आपोआप कळते .प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा सांगायची गरज रहात नाही. कविता म्हणले कि तिला विषय असतो ती उलगडत जाते आणि तिला (कधी पूर्ण आणि कधी कधी प्रश्नात्मक असला तरी ) अंत हि असतो. या परिमाणांवर या कविता कुठेच बसत नाही. पण ज्याप्रमाणे जय मल्हार मालिके मध्ये खंडेराय आणि म्हाळसा ट्याब वर बोलतात तसा हा प्रकार असू शकतो. ग्रेस म्हणतात तसे एखादी कविता एकतर कविता असते किंवा ती नसते ….

ह्या कविता ? ह्या रटाळ ओळी इकडुन तिकडुन साभार परत आल्यावर मिपाकर्रांच्या माथी मारल्यात.