Skip to main content

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 04/12/2015 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963… मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

वाचने 66781
प्रतिक्रिया 384

प्रतिक्रिया

In reply to by राही

महाराष्ट्राने त्यात पडू नये
असे परत परत का सांगितले जात आहे. मी वर एका प्रतिसादात स्पष्टीकरण दिले आहेच ते पुन्हा देतो. महाराष्ट्रीय लोक आधी भारतीय आहेत. गोवा भारतातच आहे आणि भारतीयेतरांचे खासकरून जुलमी राजवटीचे प्रतिक असलेले नाव नको म्हणण्याचा इतर भारतीयांनाही पूर्ण नैतीक अधिकार असावा असे वाटते. बदललेले नवे नाव काय असावे हे ठरवण्याचा गोयंकरांचे मत जरुर विचारात घ्यावे. अर्थात त्याच वेळी पै तैंनी दिलेल्या माहितीनुसार परकीय राजवटीपासून गोवा मुक्ततेचा पहिले प्रयत्न शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर ऐतिहासीक दस्तएवजांनुसार जात असतील तर त्याचे सुयोग्य क्रेडीट गोव्याच्या जनतेने त्यांना स्वतःहून बहाल करावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

महाराष्ट्राने त्यात पडू नये या संदर्भात अजून एक म्हणावेसे वाटते: व्यक्तीने म्हणणे म्हणजे ती व्यक्ती ज्या राज्यातली आहे त्या राज्याने अधिकृतपणे म्हणणे असे होते का? म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो. माझे गोव्या बद्दलच कशाला गुजरात बद्दलचे अमुक-तमुक मत मी व्यक्त केले, तर ते काय महाराष्ट्राचे मत होते का? हे म्हणजे, एकाने अतिरेकी हल्ला केला म्हणून त्या अतिरेक्याच्या धर्मालाच अतिरेकी म्हणण्यासारखे झाले, नाही का? ;) मुंबईबद्दल उचलली जीभ करत उठसूठ कोणी काही बोलत असतो. मग हा नियम तेथे पण लागू करायचा का? महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारने कधी काय म्हणले आहे? जे बोरकरांबरोबर झाले ते (नुसते चूकच नाही तर) अक्षम्यच होते. पण ते परत त्यावेळच्या बुद्धीवाद्यांमुळे झाले असे म्हणावे लागेल. (अनलेस तो निर्णय सरकारने घेतलेला असला तर. मला त्याची कल्पना नाही). बर गोवामुक्तीनंतर जर गोवा कर्नाटकाच्या जवळ होते तर १९६१ साली, नेहरूंनी गोव्याला कर्नाटकाच्या ऐवजी महाराष्ट्राच्या जवळ प्रशासकीय कारणांवरून का नेले? उदा. गोवा इंजिनिअरींग कॉलेज हे मुंबई विद्यापिठाचा भाग होते, मुंबई हायकोर्टांतर्गत गोवा येत होते (अजून आहे का माहीत नाही). वास्तवीक १९६० च्या राजकीय पराभवानंतर, पक्षी: मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागल्यानंतर नेहरूंना तसे करणे अधिक आवडू शकले असते असे वाटते... शेवटी हा निर्णय केंद्राचाच होता, यशवंतरावांनी मुख्यमंत्री म्हणून घेतला नव्हता. असो.

In reply to by विकास

महाराष्ट्र ऐवजी महाराष्ट्रीय लोक असा शब्द हवा होता. महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते. मते तर असतातच आणि व्यक्तही होतात. पण अन्य राज्याच्या अंतर्गत प्रश्नाविषयी अशा प्रचारमोहीम टाइप माध्यम मोहिमा निघू नयेत असे वाटते. संकटकाळ असेल, पूर वादळ अशी आपत्ती असेल तर ठीक आहे. पण नामांतरासारख्या प्रश्नावर असे होऊ नये. अशाने त्या राज्याविषयी (राज्यातील लोकांविषयी) तिरस्कार वाढीला लागतो आणि दुरावा वाढतो. आधीच बिग ब्रदर वृत्तीचे बीज रोवले गेलेय, आणखी नको असे वाटते. त्यांचे त्यांना ठरवू दे कोणते नाव ठेवायचे ते. हा सल्ला नाही, वैयक्तिक मत आहे. आणि तेसुद्धा दोन राज्यांत सलोखा असावा ह्या हेतूने आहे. महाराष्ट्राविषयी शेजारच्या किमान दोन राज्यांत दबक्या किंवा उघड शत्रूत्वाची भावना दिसते तशी दिसू नये असे वाटते.

In reply to by राही

महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते. अंशतः सहमत. (तरी देखील "असहमत" अजिबातच नाही). अंशतः अशा साठी करण आदर्श समाजात तसे होईल. पण व्यावहारीक जगात तसे होईलच असे नाही... नाहीतर बाँबेचे मुंबई करण्यावरून किती महाराष्ट्रीय नसलेल्यांनी आवाज केला? आजही करतात? तेच इतर अनेक ठिकाणी म्हणता येईल.

In reply to by विकास

प्रशासकीय मुद्द्यांविषयी अगदी अचूक माहिती सध्या मला सहज उपलब्ध दिसत नाही. पण एक सांगता येईल. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कोंकण विभागाचे शैक्षणिक आणि न्यायविषयक अ‍ॅफिलिएशन मुंबई विद्यापीठ आणि मुंबई उच्चन्यायालय यांच्याशी होते. (काही काळ पुणे विद्यापीठाशीही संलग्नता होती असे वाटते.) गोव्याला मैसूर, धारवाड आणि बंगळुरु ही ठिकाणे प्रशासकीय दृष्ट्या दूर पडली असती. आजही बीएसएनएल टेलिफोन्सचे गोवा सर्कल हे महाराष्ट्राशी जोडलेले आहे. ह्या काही अ‍ॅड्मिनिस्ट्रेटिव कम्पल्शन्स असू शकतात. माहीतगारांनी याविषयी अचूक माहिती इथे लिहावी अशी आग्रहाची विनंती. आणखी म्हणजे भाषावार राज्यनिर्मिती होण्यापूर्वी सध्याच्या कर्नाटकातले बेळगाव, कारवार (ह्याचे आता विभाजन आणि जोड-मोड झाली आहे.) विजापूर, धारवाड हे जिल्हे जुन्या बाँबे प्रेसिडेन्सीमध्ये होते. त्यामुळे हा सर्व टापू प्रशासकीय दृष्ट्या मुंबईवर अवलंबून होता. अर्थात १९४९ साली धारवाड-कर्नाटक युनिवर्सिटी झाल्यानंतर चारपाच वर्षांत हे जिल्हे शैक्षणिक बाबतीत धारवाडशी जोडले गेले. पण बाकी कारभार मुंबईशी जोडलेला होता. हळूहळू इतर ठिकाणी हायकोर्टे, विद्यापीठे स्थापन झाली आणि मुंबईवरचे अवलंबित्व संपले.

In reply to by राही

खेरीज, गोवा मुक्त झाल्यानंतर तेथिल प्रशासन सांभाळण्यासाठी अधिकार्‍यांची पहिली फळी महाराष्ट्रातूनच डेप्यूट झाली होती (मधु मंगेश कर्णिक हे एक नाव चटकन आठवले). पुढे ८० च्या दशकात गोवा हे राज्य बनल्यानंतरही बरीच वर्षे गोव्यासाठी IAS अधिकार्‍यांचे वेगळे केडर नव्हते. महाराष्ट्र केडरचेच अधिकारी तिथे नेमले जात.

In reply to by सुनील

गोवा हा दीव, दमण, दादरा आणि नगरहवेलीसह केंद्रशासित प्रदेश असताना केंद्रातून बरेच महाराष्ट्रीय अधिकारी तिकडे पाठवले गेले. श्री. ज्यूलिओ रिबेरो यांनाही गोव्याचे पोलिसप्रमुख म्हणून नेमणुकीबद्दल विचारणा झाली होती (हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेले ऐकले आहे.) ती त्यांनी नाकारली. १९८७मध्ये स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर प्रशासकीय बाबीत केंद्राचा हस्तक्षेप कमी झाला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रभाव उतरणीस लागला. गोव्याची स्वतंत्र अस्मिता फुलू लागली. गोवा कलाअकादमीचीही स्थापना झाली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रभाव ओसरू लागला. माधव गडकरी यांनीदेखील एके काळी गोव्यातली पत्रकारिता गाजवली होती. धन्यवाद

In reply to by राही

वरील माहिती व उहापोह दोन्ही चांगली आहेत. पण त्यातून ह्या धाग्याच्या संदर्भातील सर्वात महत्वाची बाब सुटली आहे, ती म्हणजे गोवन कॅथॉलिकांचा (विशेष करून, आणि खरे तर, सर्वच भारतीय कॅथॉलिकांचा) स्वतःस, इतर नेटिव्हांपेक्षा आपण काहीतरी खास आहोत, ही सर्व इतर भारतीय जनता uncouth आहे असा स्वतःविषयीचा गैरसमज, व त्यातून येणारे त्यांचे उद्द्दाम वागणे. धागालेखकाने त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि सदर नामांकरणाला होणारा तीव्र विरोध त्यांच्या ह्याच अ‍ॅटिट्यूडमधून आलेला आहे.

In reply to by प्रदीप

हॉटेल व्यवस्थापनाचे धडे मुंबईत गिरवले असल्याने गोवानीज खिस्ती लोकांशी परिचय आला. माझे अनेक चांगले मित्र आहेत मात्र चुकूनही हिंदू देवळात येत नाहीत मात्र अनेक हिंदू मुंबईकर माहिमचा चर्च व वांद्र्याच्या माउंट मेरी च्या जत्रेत भक्तिभावाने सहभागी होतात. आपला असलेला नसलेला पोर्तुगीज वारसा मिरवायचा प्रयत्न करतात,

In reply to by निनाद मुक्काम …

तुम्हाला चर्चमध्ये नसेल जायचे तर जाऊ नका. इतरांच्या जाण्यावर तुमचा आक्षेप का ? ( आमची बायकू प्रेग्नंट असताना रोज कृष्णाच्या फोटोपुढ मागत होती ... मुलगा पाहिजे ! मला हवी होती .. मुलगी. मी निराश मनाने सर्व हिंदु देवांकडे बghat होतो. अचानक चमत्कार झाला. एका मित्राने माउंट्मेरी चर्चजवळ सहज भेटायला बोलावलं .... ...... आता मी व माझी पाच वर्षाची मुलगी अधुनमधुन चर्चमध्ये जातो.)

In reply to by मोगा

गर्व से कहो हम जिहादी है ! गर्व से कहो हमारी बेटी पोर्तुगीज है !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून होणार आहेत असंच ऐकतोय. बहुतेक घाबरत असतील. न जाणो चुकीचे दिशेने वाकून नमाज पढायला गेलो आणि समजलं अल्लाहच्या अपमानात मान गमावली आहे ते....

In reply to by निनाद मुक्काम …

बहुजनसमाजातले हिंदू हे निदान मंबईतल्या जुन्या चर्चेसमध्ये अजूनही जातात हे खरेच आहे. त्याची दोन तीन कारणे आहेत. एक तर हिंदूंना त्यात काही वावगे वाटत नाही आणि आता त्यामुळे त्यांना बाटगेपणा येत नाही. २) चर्च अथॉरिटी अन्य धर्मीयांच्या येण्यास प्रोत्साहन देते आणि चर्च कड्याकुलुपात, सोवळ्या-ओवळ्यात ठेवीत नाही. (हे अन्य धर्मीयांना धर्मबदलासाठी प्रलोभनही होते.) तिसरे म्हणजे ज्या कोळी-आगरी-भंडारी यांच्यातल्या धर्मांतरितांसाठी ही चर्चेस बांधली गेली (हे अर्थात मुंबईच्या संदर्भात,) त्यांच्या धर्म न बदललेल्या जातभाईंसाठी ही नवी सुघटित स्वच्छ देवळेच बनली. त्यांनी मालपादेवी-भाटलादेवी-घोल्पादेवी-जाखाई-मरीआई यासोबतीने मेरी हीसुद्धा आणखी एक देवी मानून या देवळांत जाणे सुरू केले. ही हिंदू बहुजनांची आश्चर्यकारक समावेशकता. यावरून मला अमीबा या एकपेशीयाचे उदाहरण आठवते. हा जीव आपल्या छद्मपादांद्वारे भक्ष्यकणाला विळखा घालतो, आपलेसे करतो आणि आत्मसात करतो. भक्ष्याच्या पोषणावर स्वतः वाढतो. ४) काही केसेसमध्ये या चर्चेसच्या ठिकाणी किंवा परिसरात हिंदू बहुजनांची गावदेवळे होती आणि तिथे पूजा करण्याची प्रथा नव्या पूजापद्ध्तीने चालू राहिली. पण गंमत अशी की या सर्व खटाटोपात चर्चचे देखील मराठीकरण, हिंदवीकरण झाले. या अन्यधर्मीय भक्तगणांच्या सोयीसाठी त्यांच्या सर्विसेस मराठी, कोंकणी, गुजरातीत होऊ लागल्या. मराठीतल्या बायबलची भाषा हिंदवी झाली. हिंदू थव्यामुळे चर्चबाहेरील उत्सवातल्या यात्रांचे स्वरूप बदलले. तिथेही आपल्याकडच्या देवीच्या देवळाबाहेर दिसणारे चणे-फुटाणे, फुले हार अशी दुकाने दिसू लागली. चांगली गोष्ट अशी की आता खूपश्या हिंदूंना स्वतःच्या धर्मबदलाचे भय वाटत नाही. ते मोकळेपणाने कुठेही (पर्मिटेड ठिकाणी) जाऊन तिथे आपल्या संस्कृतीची छाप पाडू शकतात, पाडतात. भारतात क्रिस्टिअन धर्माधिकार्‍यांना त्यांच्या अनुयायांबद्दल असा विश्वास वाटत नाही. ते लोक हिंदू स्थानांवर गेले तर न जाणो पुन्हा हिंदू धर्माच्या प्रभावाखाली येतील अशी असुरक्षितता त्यांना वाटते म्हणून हिंदू मंदिरांत जाण्याविषयीचे त्यांचे नियम काहीसे कडक आहेत.

In reply to by राही

माझ्या लहानपणी आम्ही सर्व कुटुंबिय तसेच आसपासचे नातेवाईकही, नित्यनेमाने मोतमाऊलीच्या जत्रेस जात असूं. (आणि आम्ही बहुजनसमाजातील नाही आहोत). असेच आम्ही कधीही जवळच्याच डॉनबॉस्कोच्या चर्चमधेही जात असूं. आता मी रहातो तेथेही अशी भव्य चर्चेस आहेत. अशाच एका चर्चमधे आमच्या ओळखीची एक हिंदू स्त्री अधूनमधून नित्यनेमाने जायची. अर्थात काही दिवस असे तिला तेथे पाहिल्यावर धर्मबदलाबदल रीतसर विचारणा तेथे झालीच. गोव्यात मात्र देवळांतून अनेक क्रिस्टियन्सनाही येतांना व देवाला कौल लावतांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तिथे हे सरमिसळ बर्‍यापैकी होत असावी.

In reply to by प्रदीप

मलाही असे मंदिर, मशीद, चर्चेस, अगदी सिनेगॉग्मध्येही जायला आवडते. मुंबईतील पारश्यांच्या ठराविक तीन अथवा पाच देवळांच्या भेटी आपल्या अष्टविनायक अथवा गणेशोत्सवात किमान पंचगणपतिदर्शन याप्रमाणे पवित्र आणि कार्य (करण्याजोगे) मानल्या जातात. त्या केल्या आहेत. त्यांच्या डुंगरवाडीला जिथपर्यंत जाऊ देतात तिथेही जाऊन तिथला वटवृक्षाचा विशाल पसारा पाहिला आहे. कलकत्त्याच्या बोटानिकल गार्डनमधल्या वडपारंब्यांची मिनि आवृत्ती. अफ्घान चर्चच्या आवारातल्या जुनाट आणि करकचून विळखा घालणार्‍या वेली आणि गूढ वातावरण अनुभवले आहे. जकारिया मशीदीत बाह्यमंडपात जाऊन पाहिले आहे. काही किल्ल्यांमध्ये वापरात नसलेल्या मशिदी असतात, त्या पाहता येतातच पण नळदुर्गात, परांद्यात वापरात असलेल्या मशिदी आहेत. तिथेही आत जाऊन पाहिले आहे. असो. विशेष म्हणजे माहीमचर्चमध्ये नऊ बुधवारी उपस्थित राहाण्याच्या 'नवीनाज़' ही कुतूहल म्हणून केल्या आहेत. एरंगळ, मढ, ईरले, वळणै(ओरलेम्), माढवे, गोराई-धारावें,आगशें(अक्सा), वसई, निर्मळ, भुइंज, मुळगाव(आणि अनेक) इथल्या देवींच्या यात्रा, लोकसमुदाय, भक्ती, भाषा (विशेषकरून जुनी अपरान्ती मराठी, जिचे यादवकालीन मराठीशी थोडेफार साधर्म्य अजूनही आहे))यांचे निरीक्षण केले आहे. अर्थात कट्टर हिंदू असतानाही धर्मबदलाचे किंवा ब्रेन-वॉशिंगचे भय वाटले नाही आणि आता अज्ञेयवादी अवस्थेत तर नाहीच नाही. पण यामुळे अगणित भिन्नमतांचे, धर्माचे लोक भेटले, मित्र झाले.लग्न,सणसमारंभांची आमंत्रणे येऊ लागली. बोहरा लग्नात अप्रतिम आणि उच्चप्रतीच्या अन्नाचा खास शाकाहारी काऊंटर मांडलेला बघितला. त्यांचे नम्र आगतस्वागत, सरबराई, गुजराती सुपर-रिच (मुंबईतले एक मोठे नाव) उद्योगपतीच्या लग्नात कंबरेपर्यंत लवून स्वागत करणार्‍या यजमानस्त्रिया बघितल्या. दाऊदीबोहरा लोकांचे त्यांच्या धर्मगुरूविरुद् छुपे बंड आणि सुधारणाचळवळ सुरू होती तेव्हा काही तरुण कुजबुजत्या स्वरात सगळ्या बातम्या देत, बाहेरच्यांची प्रतिक्रिया विचारत, इथल्या विचारवंतांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवत असत. (ती छुप्या मार्गाने पुरी होत असे.) या सगळ्यामुळे आयुष्य समृद्ध झाले असे वाटते. मीही गोव्यातल्या देवळांबद्दल असे ऐकले आहे की तिथल्या उत्सवात कुठल्यातरी एक दिवसाच्या पूजा आराधनेच्या सामग्रीची, म्हणजे फुले वगैरेची जबाबदारी अथवा मान क्रिस्तिअनांकडे असतो आणि ते लोकही अगदी प्रेमाने आणि पवित्र भावनेने ती पार पाडतात. आपल्या प्रतिसादावर लिहिता लिहिता खूपच अवांतर झाले. पण 'मन की बातां' लिहायला मिळाल्या हेही नसे थोडके.

उद्या मिसळपावचे नाव बदलायचे ठरवले तरी लोकं विरोधाला उभे राहतील शेकड्यानी. उगा आपले कैतरी. त्यापेक्षा गोव्याचे नाव आज ज्यामुळे हवेहवेसे वाटते त्या मद्यांची नावे प्रत्येक शहराला देऊन टाका. विषयच कट भेंडी!! (साला मिसळपावचे नाव पण 'बुधवार रात्र' करून टाका)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गोव्याचे नाव आज ज्यामुळे हवेहवेसे वाटते त्या मद्यांची नावे प्रत्येक शहराला देऊन टाका. विषयच कट भेंडी
खटक्यावर बोट जागेवर पलटी

चित्रपटः अंदाज अपना अपना परेश रावल उर्फ तेजा: ('सर ये वास्को द गामा की गन है' असे सांगितल्यावर) किसके मामा की गन है? या जगप्रसिद्ध (आणि आता ऐतिहासिकही) वाक्याच्या आधारे 'वास्को-द-गामा' शहराचे नामकरण 'किसका मामा' असे करावे असा प्रस्ताव या ठिकाणी मांडत आहे.

In reply to by घाटावरचे भट

राही-विकास-प्रदीप, बॅटमॅन-गॅरी ट्रुमन यांच्या उपचर्चेतले प्रतिसाद आवडले. बाकी घाटावरच्या भटांच्या प्रस्तावाला अनुमोदन!

In reply to by नंदन

सगळ्या प्रतिसादांना सोडून नंदनरावांना आमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यावा वाटला, म्हणजे आमचे ग्रह नक्कीच उच्चीचे असावेत आज. बाकी,
राही-विकास-प्रदीप, बॅटमॅन-गॅरी ट्रुमन यांच्या उपचर्चेतले प्रतिसाद आवडले.
याच्याशी सहमत.

मला जरा एक पॅरलल मुद्दा मांडावासा वाटतोय. गोव्याचा विलिनीकरणाचा आसपासच हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची अखेर निजामसंस्थानाच्या शेवटाशी झाली. दोन्ही आंदोलनातले साम्य पाहता बळाचा वापर केला गेला, नागरिकांची साथ मिळाली, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही आंदोलनात मराठी नेते अग्रगण्य होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा फक्त मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम नव्हता. निजामाची राजवट बराचसा आंध्र, थोडा कर्नाटक अन मराठवाडाभर पसरलेली असता मराठी नेत्यांचे योगदान या मुक्तीसंग्रामात उल्लेखनीय होते. हैद्राबाद ह्या जुलमी राजवटीतून मुक्त होताना सध्या रामानंदतीर्थासारख्या मराठी नेत्यांची किती आठवण आंध्र प्रदेशाने अथवा सध्याच्या तेलंगणाने ठेवलीय हे पाहणे रोचक ठरेल. रामानंदतीर्थांचे नाव शेवटी महाराश्ट्रातच मराठवाडा विद्यापीठातून बाहेर पडलेल्या नांदेड विद्यापीठाला द्यावे लागले.

In reply to by अभ्या..

रामानंदतीर्थांची स्मारके आंध्र-तेलंगणात नक्कीच आहेत. नलगोंडा येथे मला वाटते कॉलेज किंवा युनिवर्सिटी आहे. शिवाय मुख्य म्हणजे खुद्द कै.श्री पी.वी.नरसिंह राव हे त्यांचे प्रमुख शिष्य होते असल्याने त्यांच्या पुढाकाराने 'स्वामी रामानंद तीर्थ स्मारक समिती' स्थापन झालेली असून या समितीतर्फे अनेक समाजोपयोगी अशी बहुविध कामे चालतात. याशिवायही त्यांची काही स्मारके आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद येथे हैदराबाद खालोखाल मुक्तिसंग्रामाची तीव्रता होती आणि त्यात तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या मराठवाड्यातल्या लोकांचा सहभाग होता. म्हणजे त्यावेळी हे लोक बहुतांशी हैदराबादीच होते. नंतर राज्यविभागणीपश्चात हा सर्व प्रदेश महाराष्ट्रात आला. आपल्याला मराठवाड्याचा लढा माहीत आहे पण आंध्र-तेलंगणाने केलेला मुक्तिसंग्राम फारसा माहीत नाही. त्यामुळे असा समज होऊ शकतो. फार काय, गोविंदभाई श्रॉफ, मुकुंदराव पेडगावकर्,श्रीनिवास बोरीकर, प्रभाकर वाईकर, विजयेंद्र काबरा, अनेक नावे आज कोणाला आठवतात? तरी त्यातल्या त्यात मराठी नावे आठवतात पण तेलुगु, कन्नडभाषक मुक्तिसैनिकांची नावे आपल्याला ठाऊक असणे शक्य नाही. गोव्याच्या मुक्तिलढ्यातसुद्धा तेलो मॅस्करेन्हास, लुइ मेनेझिस ब्रगान्झा, विश्वनाथ लवंदे, प्रकाशचंद्र शिरोडकर, भेंब्रो, काकोडकर अश्या अनेक गोमंतकीयांचा सशक्त सहभाग होता. जगन्नाथराव जोशी हेही प्रमुख होते. सत्याग्रही आंदोलन मुख्यतः राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली चालले. त्यात महाराष्ट्राचा भरीव वाटा होता हे खरे पण गुजरात, उत्तरप्रदेश येथील सत्याग्रहीसुद्धा लक्षणीय होते. शिवाय मुंबईतून गोव्याचे परागंदा नेते आंदोलन चालवीत असत. स्थानिकांचा सहभाग असल्याखेरीज कोणतेही बाहेरील आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. मग ते लादलेले आंदोलन बनते.

In reply to by बॅटमॅन

कै.अनंतराव भालेराव-दै.मराठवाड्याचे नामवंत संपादक, लेखक, पत्रकार आणि मुक्तिसंग्रामसैनिक यांनी यावर खूप लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी यांच्या लेखनातूनही पुष्कळ माहिती मिळते. शिवाय अगणित संदर्भ अधेमधे सापडत राहातात. अवांतर- (माझे प्रतिसाद अवांतरावाचून मलाच ओकेबोके वाटू लागले आहेत आताशी!) प्रांतिक अस्मिता फार ताणण्यात अर्थ नसतो. 'आपला' प्रांत हा काल आणि उद्या आपलाच होता/असेल असे नाही. उद्या तेलंगणासारखे विदर्भ आणि कोंकण वेगळे झाले तर आपल्या अस्मितेचे काय होईल? देशासाठीसुद्धा हा मुद्दा लागू आहे. पूर्व बंगाली लोकांच्या निष्ठा एका पिढीत तीनदा बदलल्या. यूरपमध्ये तर प्रचंड भूराजकीय उलथापालथ होत आलेली आहे. पाकिस्तानसुद्धा फुटू शकले असते. स्कॉट्लंड, आयर्लंड मध्येही हेच. उद्या मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनचा दिल्लीसारखा वेगळा प्रदेश झाला, आणि काही काळाने त्याचे राज्य बनले तर? आपल्याकडे सी.पी.अँड बेरार होते तेव्हापासून (किंवा त्याही आधीपासून) वैदर्भीयांना मध्यप्रदेशाविषयी आपुलकी आहे. अमेरिकेत टेक्सासमधल्या मेहीकन लोकांना मेहीकोविषयी ओढ वाटणारच. आणखी पुढे म्हणजे समजा सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही प्रदेशावर प्राचीन काली राज्य केलेल्या एखाद्या कर्तबगार राजघराण्याची राजभाषा कन्नड होती, तर त्या घराण्याचा सद्यस्थितीत (कर्नाटकाशी आपला वैरभाव असताना) 'आपले' म्हणून अभिमान बाळगायचा की नाही? तात्पर्य : आवेशात्मक अस्मिता सकारात्मक नसू शकते.

In reply to by राही

सेतुमाधवराव पगडी यांच्या लेखनातूनही पुष्कळ माहिती मिळते.
सहमत, जीवनसेतू या अप्रतिम आत्मचरित्रात याबद्दल खूप माहिती आलेली आहे.
उद्या तेलंगणासारखे विदर्भ आणि कोंकण वेगळे झाले तर आपल्या अस्मितेचे काय होईल?
काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.
आणखी पुढे म्हणजे समजा सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही प्रदेशावर प्राचीन काली राज्य केलेल्या एखाद्या कर्तबगार राजघराण्याची राजभाषा कन्नड होती, तर त्या घराण्याचा सद्यस्थितीत (कर्नाटकाशी आपला वैरभाव असताना) 'आपले' म्हणून अभिमान बाळगायचा की नाही?
=)) अहो, तुम्ही कुणाचाही अभिमान बाळगला तरी फरक पडणार नाही. म्हणजे सामान्य माणूस वगैरे मुद्दा नाही, तर हादेखील इतिहासच होता हेच लोकांना झेपणार नाही. "असं होय? बरं बरं" म्हणतील अन सोडून देतील. महाराष्ट्राच्या इतिहासात तसेही सध्या दोनच कालखंड मानले जातात- एक पांडवकाल आणि दुसरा शिवकाल =)) बाकी कर्नाटकाशी वैरभाव म्हणजे काय? बेळगाव भागाबद्दलचे दुखणे ना? बाकी काय आहे घाऊक द्वेष करण्यासारखे?

In reply to by बॅटमॅन

काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.
सहमत आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य सामान्यांच्या दृष्टीकोनातून अस्मितेचा नाश वगैरे गोष्टी लिहिल्या आहेत असे वाटत नाही. कदाचित राजकारण्यांच्या (आणि राजकारणी कोंबड्या झुंझवतात त्याप्रमाणे डोलणार्‍या काही सामान्यांच्याही) दृष्टीकोनातून अस्मितेचे काय होणार वगैरे गोष्टी लिहिल्या असाव्यात असे वाटते. विदर्भ वेगळा करायची भाषा जरी केली तरी जणू काही भारत-पाकिस्तानसारखी फाळणी होणार आहे अशा प्रकारचे चित्र ते कलानगरचे आणि दादरचे साहेब उभे करतील आणि गुरगुरत अंगावर येतील!! असे काही राजकारणी लोक आणि त्यांच्या तालावर नाचणारे लोक सोडले तर इतरांना महाराष्ट्रातून विदर्भ किंवा अन्य कोणताही भाग वेगळा केला तरी संस्कृतीच्या/ अस्मितेच्या दृष्टीने शष्प फरक पडू नये.

In reply to by बॅटमॅन

कल्याण, चेऊल, सोपारे, कान्हेरी, जंजिरा, सिंधुदुर्ग वगैरेचे जाऊच दे पण उद्या कोंकण वेगळे झाले तर रत्नागिरीचे काय? रत्नागिरीच्या सगळ्या सुपुत्रांवर कोंकणवासीय दावा नाही का सांगणार? भारतीय वंशाच्या, पण आता दोन-तीन पिढ्या अमेरिकेत असलेल्या कर्तबगार लोकांवर आपण सांगतो तसा? (हे विनोदाने घ्यावे.) शिवाय सध्याची महाराष्ट्री अस्मिता म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्री अस्मिता का? मराठवाडा आपला तोंडी लावण्यापुरता,? हो, आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास हे देखील विनोदाने मान्यच. आता गंभीरपणे, पण होय, तसे पाहाता बहुसंख्य सामान्यजनांना काहीच फरक पडत नाही हे खरेच. त्यांचे गाव, त्यांची ग्रामदेवता, तिचे उत्सव, तिचा महिमा, तिथले पीकपाणी यातच ते रमलेले असतात आणि तीच त्यांची अस्मिता.

In reply to by राही

या संदर्भात मला वाटते संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि नंतरची प्रादेशिक अस्मिता का झाली हे लक्षात घेतले पाहीजे... त्या वेळेस आंध्रचे भाषावार प्रांतरचनेत सर्वप्रथम राज्य झाले. नंतर एका अर्थाने जे करायची इच्छा नव्हती ते नेहरूंनी मान्य करून भाषावार प्रांतरचनेस हिरवा दिवा दाखवला. पण तो दिवा त्यांना महाराष्ट्रास दाखवण्याची तयारी नव्हती. त्यातून मोरारजी आणि सका पाटील अजूनच तेल ओतत होते... त्याही पुढे असा एक विचारप्रवाह देखील आहे (मला वाटते मिपावर पण या संदर्भात चर्चा झाली आहे) की यात मुंबई आणि महाराष्ट्र समाजवादी-साम्यवादी विचारसरणीच्या अख्त्यारीत आणणार्‍यांतला देखील हा लढा होता. त्यामुळे अस्मिता एकीकडे आणि धोरणात्मकरीत्या स्वतःची अंतस्थ विचारसरणी पुढे करणे दुसरीकडे असा देखील लढा होताच. त्यात भर म्हणून नंतर "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" हे धोरण अमराठींकडून काही प्रमाणात का होईना नक्की राबवले गेले. त्याचा परीणाम म्हणून आवडो - न आवडो शिवसेना मोठी होत गेली. काही अंशाने सामान्य मराठी माणसास नक्की फायदा झाला. पण आज मराठी माणसास झालेला फायदा हा त्याच्या कुठल्याही प्रकारच्या उद्योग धंद्यातील लाज सोडून कष्टाने मोठे होण्यामुळे झालेला आहे, असे वाटते. तरी देखील अजून सगळे चांगले आहे असे नाही. पण तो (अजूनच) वेगळा विषय आहे. गेल्या पन्नास वर्षात भले अनेक नकारात्मक काय घडले हे सप्रमाण बोलता आले तरी एक गोष्ट विशेष करून राव-सिंग साहेबांच्या काळानंतर झाली ती म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था... आज त्याचा परीणाम म्हणून बर्‍यापैकी देश हा भाषा-संस्कॄतीतले फरक असूनही एकत्र झाला आहे. त्यामुळेच जनतेला बिहार, उत्तर प्रदेश यांचे विघटन चालले. इतकेच कशाला जो आंध्र पहील्यांदा झाला त्याचे देखील विघटन तिथल्या जनतेने "बर्‍यापैकी" सहज मान्य केले. उद्या विदर्भाचे देखील तसे झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. पण वैदर्भियांना, त्यामुळे अच्छे दिन येतील का, हा मात्र तुर्तास वादाचाच मुद्दा आहे. मात्र मुंबईचे वेगळे प्रशासन करणे तुर्तास जमणार नाही. त्यासाठी त्यांना तोच न्याय इतर मेट्रो शहरांना लावावा लागेल. हे सरकार यामधे पडेल असे आत्ता तरी वाटत नाही...

In reply to by विकास

चांगला प्रतिसाद, पण तपशिलाच्या काही चुका आहेत. एक तर भाषावार प्रांतरचना व्हावी असे तत्कालीन नेत्यांना वाटत नव्हते, कारण त्यामुळे प्रांतिक अस्मिता वाढीस लागून थोडाफार कलह निर्माण होईल अशी भीती होती, जी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी खरी झाल्यासारखे वाटू लागण्याइतपत परिस्थिती होती. दुसरे म्हणजे भाषावार प्रांतरचना ही लोकांची मागणी होती. स्वतंत्र आंध्रासाठी पोट्टी श्रीरामलु यांनी आत्मदहन केल्यावर ही चळवळ मोठ्या प्रमाणावर हिंसक बनली आणि तेलुगुभाषिक आंध्रप्रदेश वेगळा निर्माण करावा लागला. एकदा पायंडा पडल्यावर इतरांना थांबवणे कठिण होते. हैदराबाद विलीनीकरणानंतर तेलुगुभाषकांनी वेगळे राज्य मागितल्यावर हैदराबाद राज्यातल्या उरलेल्या मराठी आणि कन्नडभाषकांची व्यवस्था लावणे ओघानेच आले. मैसुर संस्थान, मुंबई इलाक्यातले चार जिल्हे आणि हैदराबाद संस्थानातला कन्नड प्रदेश एकत्र करून कर्नाटका होऊ शकत होते. प्रश्न फक्त मुंबईचा होता. तेव्हा मुंबई प्रेसिडेन्सीचा उरलेला भाग, कच्छ-सौराष्ट्रातली संस्थाने व त्यातला ब्रिटिश भाग तसेच मराठवादा आणि विदर्भ यांचे मिळून एक महाद्वैभाषिक बनवण्यात आले. पण हा निर्णय लोकांना पसंत नव्हता. समाजवादी आणि डाव्या पक्षांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आंदोलन केले आणि त्याला लोकांचा उत्स्फूर्त असा जोरदार पाठिंबा मिळाला. पण बोन ऑव्ह कंटेन्शन मुंबई शहर होते, जिथे गुजराती उद्योगपतींचे हितसंबंध किंबहुना देशाचेच आर्थिक हितसंबंध गुंतले होते. तेव्हाच्या काँग्रेसमधल्या कट्टर उजव्या गटाने म्हणजे स.का.पाटील, मोरारजीभाई (स. का. पाटील हे सरदार वल्लभभाईंचे उजवे हात होते आणि वल्लभभाईंपश्चात त्यांना आंतरराष्ट्रीय उजव्या फळीचा-पक्षी अमेरिकेचा जोरदार पाठिंबा होता. याविषयी बरेच लिहिता येईल. पुढे शिवसेनेचा उदय हाही यात येऊ शकेल) वगैरेंनी मुंबई स्वतंत्र राखावी असा प्रस्ताव मांडून बघितला. नेहरूही विरुद्ध गेले पण लोकमताच्या रेट्यापुढे त्यांना नमावेच लागले. मुंबईसह महाराष्ट्र आणि महागुजरात अशी दोन राज्ये स्थापन झाली. नंतरची राज्यविभाजने ही भाषिक तत्त्वावर फारशी न होता कारभाराच्या सोयीसाठी आणि दुर्गम प्रदेशाच्या विकासासाठी छोटी राज्ये असावीत यासाठी झाली. त्यामुळे अर्थात फारशी खळखळ झाली नाही. भाषा-संस्कृतीत फरक असूनही मुक्त व्यवस्थेमुळे देश एकत्र झाला हे विधान थोडे फार-फेच्ड वाटते. विविधतेतून एकता हे तत्कालीन सूत्र होते आणि ते बर्‍यापैकी अस्तित्व राखून होते. मुक्त व्यवस्थेतून माध्यम क्रांती आणि त्यातून एकता असा क्रम लावता येईल पण तो तितकासा बरोबर ठरणार नाही. जलदगती माध्यमे ही दुधारी असतात. ती त्वरित जोडतात तितकीच तोडतातही. बाकी प्रतिसाद आवडला.

In reply to by राही

भाषावार राज्य रचना करण्याचे मुख्य कारण प्रशासनास आणि जनतेस सोयीची एक भाषा वापरणे सोपे जाते. एकाच राज्याच्या तीन भाषा असल्यास सामान्य जनता कारभारापासून दुरावते हे सत्य आहे. आज कितीही झाले तरी मराठी माणसाला गुजराती, तेलुगु किंवा कानडी भाषा व्यवहाराला कठीण गेल्या असत्या. सीमा भागात ती भाषा बोलू शकणारे अनेक लोक आहेत पण त्यातील किती लोक त्या भाषा लिहू वाचू शकतात? पोलिस पंचनामा, शासकीय पत्रके,आरोग्य विषयक धोरणे, शेतकीचे ज्ञान, न्यायालयांची कामे हि स्थानिक भाषात झाल्यामुळे सामान्य आणि अर्ध शिक्षित लोकांचा नक्कीच फायदा झाला. विविधतेत एकता हे जरी बरोबर असले तरी स्थानिक पातळीवर खतांचे बियाण्याचे ज्ञान तेलुगूत दिले तर सीमावर्ती भागातील किती शेतकर्यांना ते समजेल. गुजराती तेलुगु( कन्नड) या लिप्या अगदी भिन्न आहेत. साधे तांबीची निरोधची जाहिरात त्या भाषात दिल्यास चौथी पास महिलांना किती समजेल? किंवा तेलंगणात राहणाऱ्या मराठी भाषिकास तेलुगूत आलेले सरकारी पत्रक समजेल काय? तेंव्हा भाषावार प्रांत रचना प्रांतवादास खात पाणी घालते हे अर्ध सत्य आहे. आज तेलंगण हे आंध्र पासून किंवा झारखंड बिहारपासून भाषा एक असतानाही वेगळे झाले याचे कारण स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न भाषा नसून वेगळे होते.भाषेमुळे प्रांतीक अस्मिता वाढीस लागते हे पूर्ण सत्य नाही.

In reply to by राही

धन्यवाद राहीताई मला अगदी १०० टक्के ग्यारंटी होती की या विषयाव्रर राहीताईंचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद येणारच. प्रतिसादातल्या माहीतीबद्दल धन्यवाद. अनंत भालेराव आणि मराठवाडातील लेखाशिवाय हा इतिहास समजणे मुश्कील इतके त्यांचे महत्व आहे. गोविंदभाई श्रॉफ सुध्दा लोकमत मध्ये आठवणींच्या स्वरुपात लिहित असत. स्व. पी. व्ही. नरसिंहरावांच्या शिष्यत्वाबद्दल माहीती होतीच. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेला सुध्दा त्यांनी भेटी दिल्या होत्या. ती शाळा अद्याप चालू आहे. त्यांचे शिष्यत्व कश्या प्रकारचे (राजकीय, आध्यात्मिक अथवा शैक्षणिक) स्वरुपाचे होते याविषयी मात्र माहिती नाही मला जास्त. थोडेसे अवांतरः स्वामी रामानंदतीर्थांचे संन्यासपूर्व नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. अन ते माझे नात्यातील. त्यांची थोडी कुलशा़खा सोलापूर येथे पण आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडून जास्त माहीती मिळत नाहीये पण काही दुर्मिळ पुस्तकातून मिळतेय. काही संदर्भ सुचवल्यास आभारी राहीन. आपल्या बॅटोबाकडेही रामतीर्थांवरील एक पुस्तक पाहण्यात आले. धन्यवाद.

२५०+ प्रतिसाद .... उडन खटोलाजीचे विमान हवेत फार उन्च उडत आहे हबिनंदन ! रच्याकने - उडन खटोला म्हणजे विमानच ना ?

In reply to by मंदार कात्रे

+१०००० आणि त्यातले किमान दोनशे तरी प्रतिसाद वाचनिय आहेत.

वाल्गुदेय आणि ट्रुमन साहेबांची चर्चा अतिशय परस्पर पूरक आहे. तंत्रज्ञान अस्तित्वात येण्याकरिता अनेक ज्ञानशाखांचे coordination लागते. त्यासाठी ज्ञानाची सुलभ उपलब्धी आणि देवाणघेवाण करता येणे आवश्यक आहे. भारतात लोकांनी उत्तम काम केले होते. परंतु क्लिष्ट पद्य सादरीकरण आणि युरोप प्रमाणे journals किंवा Royal Society सारख्या मंचाचा अभाव (किंवा कमतरता) असल्यामुळे आपल्यायेथे असलेले ज्ञान पुढे नेणे किंवा विविध ज्ञानशाखांची सांगड घालणे ह्यासाठी लागणारे framework चांगले नव्हते. असे framework असते तर वाल्गुदाचार्यांनी उल्लेख केलेल्या केरळी गणितींचे काम कोणीतरी पुढे घेऊन जाणे शक्य झाले असते. चांगला राजाश्रय मिळाला असता तरी थोडा फरक पडला असता. पेशवे रमणा भरवीत. हा एक प्रकारचा conference सारखा platform होता जेथे देशभरातून विद्वान येत. त्याचा उत्तम उपयोग करून घेत आला असता. परन्तु त्यात वैज्ञानिक चर्चा झाल्याचे माहितीत नाही. मला चर्चा भरकटवायची नाही. मी पगारे ह्यांचा डू आयडी सुद्धा नहि. परंतु जातिव्यवस्थेमुळे समाजातील एक मोठा भाग लेखन, वाचन आणि formal शिक्षणा पासून वंचित राहणे हे ही भारतातील वैज्ञानिक संशोधन आणि त्याचा प्रसार ह्याला मारक ठरले असावे.

In reply to by अगम्य

सहमत आहे. जातिव्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा तोटा आहे. गणिती लोकांनी गणिताचा अभ्यास केला, लोहारांनी उत्तम तलवारी बनवल्या आणि प्रत्येक जातीने आपापले काम अगदी मोठ्या कौशल्याने केले. पण सांगड घालणे काही जमू शकले नाही. किमान लेट मध्ययुगात तर नाहीच नाही. बाकी केरळी गणितपरंपरेचे वैशिष्ट्य म्ह. त्या परंपरेत दोन ब्राह्मणेतर आचार्यही आहेत-जे आजवर अख्ख्या भारतात अश्रुतपूर्व म्हटले तरी चालेल. गुप्तोत्तर काळात ब्राह्मण-क्षत्रियेतर लोकांचा संस्कृत विद्येशी संपर्क ना के बराबर असतानाही त्या आचार्यांनी बाकी जातींना अंशतः सामावून घेतले हे विशेषच म्हटले पाहिजे. पण केरळ म्हणजे भारत नव्हे. तिथली समाजव्यवस्था कैक अंशी अपवादात्मक होती. असो.

In reply to by बॅटमॅन

जातिव्यवस्था मजबूत होणे हे कारण आहेच, पण माझ्या मते एक कॉमन अशी संपर्कभाषा न उरणे हे देखील एक कारण असू शकेल. मौर्य आणि अशोककाळात प्राकृत भाषा थोड्याफार फरकाने सर्वांना समजू शकत होत्या, गुप्त-अर्लीगुप्तोत्तरकाळात संस्कृत ही राजभाषा आणि संपर्कभाषा होती. पण यानंतर प्राकृतांचे स्थित्यन्तर होत असताना भाषांचे प्रांतिकीकरण-रीजनलाय्ज़ेशन झाले. म्हणजे तुलनात्मक छोट्या प्रदेशांत वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या. भाषांची घडण नव्याने होत असताना सार्थशब्दसंपत्तीच्या, कठिण संकल्पनांच्या शब्दाभिव्यक्तीच्या मर्यादा आलेल्या असू शकतात. इसवी सनाच्या दुसर्‍या सहस्रकाच्या आधीची आणि सुरुवातीची दोनदोन अशी चार शतके हा काळ भारतीय उपखंडासाठी संक्रमणाचा आणि खळबळीचा,जडणघडणीपेक्षा मोडतोडीचा काळ होता असे वाटते. शंकराचार्यांचा उदय, बौद्धमताची संपूर्ण पीछेहाट, ऐहिकतेकडून-भौतिकतेकडून आधिभौतिकतेकडे आणि त्यातून पुन्हा धार्मिकतेकडे व कर्मकांडाकडे प्रवास असा एक मोठा टप्पा डोळ्यांसमोर येतो. भक्तिपंथ, इस्लाम आगमन, नंतर वसाहतींची सुरुवात असा एक घटना क्रम यानंतर दिसतो जो देशी ज्ञानाला कदाचित मारक ठरलेला असू शकतो.

उदंड प्रतिसाद आणि समग्र चर्चेबद्दल आभार व धन्यवाद ... पैसा ताई यांच्या सविस्तर प्रतिसादाची अपेक्षा होती ... असो

३००

हे घ्या लेखाच्या मूळ विषयाशी संबंधित काही. १) वास्को द गामाबद्दल २)इन्क्विझिशन ३) मराठ्यांचे गोव्याच्या इतिहासात योगदान आणि त्यातील संभाजी राजांचा सहभाग पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.
छत्रपति संभाजी महाराज राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले. वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं. शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती. दुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं. इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता! आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही.
यानंतरच्या काळात सावंत आणि सौंदेकर यानी पोर्तुगीजांविरुद्ध एक पाऊल पुढे २ पावले मागे करत लढा सुरूच ठेवला. त्यानंतर बाजीरावाच्या काळात पुढीलप्रमाणे घटना घडल्या.
इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं. इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला. अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.
संपूर्ण गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता १७८८ नंतर प्रस्थापित झाली. या नंतरच्या काळात मराठी इतिहास संपूर्ण पुसून टाकायचा पद्धतशीर प्रयत्न झाला. इथपर्यंत की कार्निव्हालच्या मिरवणुकीत शिवाजी आणि संभाजी यांची सोंगे आणून ते कसे हरले हे खोटेच दाखवण्यात यायचे. तसेच स्थानिक लोकांवर धर्मांतराची जबरदस्ती वगैरे प्रकार बंद झाले. गुन्हेगारांना कठोर शिक्षा असल्याने तेव्हाची राजवट सामान्य लोकांना चांगली वाटू लागली.
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
हे सरसकट नाहीये. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्‍या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही. कानडी आणि केरळी लोकांच्या बाबत मात्र थोडा भेदभाव, आकस दिसतो. पण आंदोलने वगैरे होतील असा नाही. काही लोक जे तुम्ही म्हणताय तसे बोलतात किंवा पोर्तुगीज पासपोर्ट बाळगतात त्यांना "पोर्तुगालला चालते व्हा" म्हणून सांगितले जातेच!

In reply to by पैसा

महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्‍या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही.
बाकी सगळी उत्तम माहिती पण महाराष्ट्राबाबतची टिप्पणी अनावश्यक वाटली. मी आणि माझे कुटुंबिय मूळ गोव्यातीलच आहोत आणि आज अनेक वर्षे महाराष्ट्रात अतिशय आनंदात आहोत. गोव्याबाबत जितकी आपुलकी, माया वाटते तितकेच प्रेम आम्हांला महाराष्ट्राबद्दलही वाटते. महाराष्ट्रातही सहसा बाहेरुन येणार्‍यांना कोणी हिणवत वगैरे नाही. तुला असा काही वैयक्तिक अनुभव आहे का?

In reply to by यशोधरा

बिहारी वगैरेंबद्दल तर सर्वत्रच तिरस्कार आहे पण गोवेकरांबद्दल महाराष्ट्रात कधी आकस पाहिला नाय बा.

In reply to by यशोधरा

वैयक्तिक अनुभव नाही. मी स्वतःच महाराष्ट्रीय असल्याने मला कोण हिणवणार? उलट मलाच दाक्षिणात्य आणि बांगला देशी येऊन मुंबईत दादागिरी करतात ते आवडत नाही. पण मुंबईत आणि इतरत्र गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य किंवा उत्तर भारतीय लोकांनी येऊ नये म्हणून आंदोलने होतात. शिवसेनेची स्थापनाच त्या उद्देशाने झाली आहे. आपल्याकडे या परप्रांतीयांना वेगवेगळी नावे दिली जातात, हिणवले जाते. गोव्यात असे आंदोलन कधी झाले नाही.

In reply to by पैसा

पैतै, काहीही हां! मुंबईत सरसकट अशी आंदोलने कधी झाली नाहीत. येणारी व्यक्ती केवळ अमराठी आहे ह्यासाठी झालेली ती आंदोलने नव्हती. जर बाहेरुन एखादी व्यक्ती एखाद्या राज्यात येत असेल तर त्या राज्याचे कायदे कानून, वागण्याच्या पद्धती त्या व्यक्तीने आत्मसात करायला हव्यात. तसे न होता, जर बाहेरुन आलेली व्यक्ती स्थानिकांची गळचेपी करु पाहात असेल तर त्यासंबंधित असंतोष बाहेर पडेलच ना कधी ना कधी? राजकीय पक्ष त्यावर आपली पोळी भाजतात ते बाजूला ठेव, ते तर सगळीकडेच चालते, अगदी गोव्यात सुद्धा. पण इतकी frivolous अशी ही आंदोलने नक्कीच नव्हती. मुंबईसारखे cosmopolitan शहर नसेल.

In reply to by यशोधरा

आंदोलने योग्य अयोग्य यात मी पडत नाही. पण फॅक्ट काय आहे? मुंबईत पूर्वी अशी आंदोलने झालेली आहेत. आणि गोव्यात झालेली नाहीत इतकेच.

In reply to by पैसा

जोक्स अपार्ट, माझा दंग्याबाबत सांगण्यामागे उद्देश्य हा होता की कधी ना कधी उद्रेक बाहेर पडतो. अगदी गोव्यातही तो होतो. जातीय काय आणि प्रांतीय काय. गोव्यात प्रांतीय दंगे काय करणार? मुंबईत ज्या आणि जितक्या संधी आहेत तितक्या गोव्यात आहेत का? गोव्यातील कोणते शहर मुंबईसारखे आहे? मुंबईमध्ये जसे सगळीकडून जितके आणि ज्या प्रमाणात लोक येतात तसे गोव्यात येतात का? मुंबईच्या व्यवस्थेवर जसा आणि जितक्या प्रमाणात ताण पडला आहे तसा गोव्यावर पडला आहे का? नाही म्हणायला रशियन अड्डे झालेत खरे.

In reply to by यशोधरा

सगळे बारीक विक्रेते, फार काय मासेवाले, बस कंडक्टर, सगळे भय्ये आहेत आणि लहान धंदेवाले केरळी. २०३१ च्या जनगणेत खरे गोंयकर मायनॉरिटीत जातील असा अंदाज आहे. तरी हे शांतच! मला सुरुवातीपासून भयंकर आश्चर्य वाटतं खरं तर!

In reply to by पैसा

अगं, ते शांत म्हणजे मुळात सुशेगाद रहायचा आणि अ‍ॅडजस्ट करायचा स्वभाव. त्यात अजून त्यांना म्हणावी तशी झळ बसलेली नाही. अजूनही सगळ्यांना हात पाय पसरण्याइतकी स्पेस उपलब्ध आहे, पण लवकरच दुर्दैवाने तशी वेळ येईल.

In reply to by प्रदीप

Cool! एकदम मस्त फोटो आहेत. बघा बघा चर्चेकर्‍यांनो! नाहीतर तुम्ही, गोव्याचा विषय आल्यावर सुशेगाद सोडून दंगा करताहात ते! ;) run