Skip to main content

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 04/12/2015 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963… मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

वाचने 66781
प्रतिक्रिया 384

प्रतिक्रिया

गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ज्यांचे या देशवर प्रेम नाही त्यांचा विचार कशाला करता. जाउ द्या त्यांना.

In reply to by चिंतामणी

वर्तमान पत्रात खालिल लेख वाचण्यात आला, वाचा व विचार करा...... जिथं गर्वाला घर नाही... इतिहासात दालनं नसतात. आपण उट्टं काढण्यासाठी इतिहासातल्या कोणत्या वर्षावर रेघ मारायची व त्या वर्षाआधी झाला तो अन्याय असं समजायचं? आणि किती रेघा मारायच्या? प्रत्येक दोन रेघांमध्ये एक इतिहासाचं दालन मनातच बांधलं, तर ते काही खरं नसतं. आपण रेघा मारतो व आपणच दालन ठरवतो. सोईप्रमाणे रेघा बदलतो. नवीन दालनं मनात तयार करतो. जिथं गर्वाचं वास्तव्य नसतं, तिथं निर्मिती मुक्काम करते. जिथं गर्व नाही, तिथं द्वेष व तिरस्कार यालाही थारा नाही. आपण स्वतःला कुणी महान लोक समजून पूर्वी झालेल्या अन्यायाचा वचपा काढायचं ठरवलं, तर हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही. गेल्या पाच हजार वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला, तर एक सत्य दृष्टीस पडतं. जेव्हा जेव्हा एखाद्या समाजातले लोक धर्म, राज्य, राष्ट्र याविषयीचा अहंकार सोडून गुण्यागोविंदानं राहतात, तिथं लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदतात. जिथं गर्व, दंभ व अहंकार आणि पर्यायाने द्वेष व तिरस्कार खासगी आयुष्यापलीकडं जाऊन सामाजिक रूप धारण करतो, तिथं कलह माजतो. धर्माधर्मांतला संघर्ष, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांबरोबर युद्ध अशा ठिकाणी होणं साहजिक असतं. गेल्या एक हजार वर्षांत हे युरोपमध्ये झालं. सध्या ते पश्‍चिम आशियात आणि आफ्रिकेत पाहायला मिळतं. उद्या हे विष कुठं पसरेल, याचं भाकीत कोण करू शकेल?

In reply to by पगला गजोधर

हे आदर्शवादी तत्वज्ञान आहे. प्रुथ्वीराज चौहानने १६ वेळा आक्रमण करणाऱ्या अल्लाउद्दिन खिलजीला सोडून दिले आणि सतराव्यांदा काय झालं हा इतिहास आपण विसरलात काय? चहुबाजुना शांतता नांदत असेल तर आपले उच्च आदर्शवादी तत्वज्ञान डोक्यावर घेऊन नाचू. देश स्वतंत्र झाल्यापासून आपला शेजारी आपली कुरापत काढतो आहे. त्यांच्याशी प्रेमाने वागायचे प्रयत्न आपण काय कमी केले आहेत हो ? एक देश मुसलमानांसाठी देऊनही आपण आज निधर्मीच आहोत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करून सर्व मुसलमानांना हाकलून दिलेले नाही ना? हे आदर्शवादी तत्वज्ञान पुस्तकात लिहायला आणि बुद्धिवादी लोकांच्यात उभे राहून भाषण करून टाळ्या मिळवायला ठीक आहे.

सुलभीकरण करणे फार सोपे आहे. वस्तुस्थीती जाणून ती पचवणे अवघड आहे. गोव्यात आज (आणि गेली अनेक दशके) दोन प्रकारच्या संस्कृती नांदत आहेत. जे पोर्तुगीजांद्वारे बळजबरीने किंवा स्वेच्छेने (सवर्ण हिंदूंच्या छळाला कंटाळून!) ख्रिस्ती झाले ते आणि उरलेले हिंन्दू. त्यापैकी ख्रिस्ती हे दक्षिण गोव्यात जास्त आहेत जिथे वास्को हे शहर आहे. हिंदू हे उत्तर गोव्यात जास्त आहेत. संभाजी महाराजांनी जरी गोव्यावर स्वार्‍या केल्या असल्या तरी त्यांनी वास्को शहर जिंकल्याचं मी तरी कुठेही वाचलेलं नाही. तेंव्हा त्या शहराला संभाजी महाराजांचं नांव द्यायचं हयामागे निव्वळ खोडसाळ्पणाखेरीज अन्य काही उद्देश्य असेल असं वाटत नाही. जर संभाजी महाराजांचं नांवच द्यायचं असेल तर उत्तर गोव्यात बांदा, म्हापसा, फोंडा अशी अनेक शहरं आहेत त्यांना द्यावं की! उगाच आपण आधी कळ काढायची आणी मग विरोध झाला तर फुकटचा कांगावा करायचा याला काय अर्थ आहे?

In reply to by पिवळा डांबिस

पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
याबद्दल आपले काय म्हणने आहे डाम्बिस म्हाराज ?

In reply to by उडन खटोला

का? ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले? एवढ्या मिर्च्या का झोम्बतात नाकास?

In reply to by उडन खटोला

ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले?
हा खोडसाळपणा आहे इतकंच माझं मत. आधी आपण खोडी काढायची आणि मग विरोध झाला तर साळसूदपणाचा आव आणून बोंबा मारायच्या हे कशाला?

In reply to by पिवळा डांबिस

आचार्य अत्र्यंच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'हजारो वर्षांपूर्वी' देण्यात आलेले आहे. व ते मगोपने दिले असावे (बांदोडकरांच्या काळात). आणि हे कुणीहे केले असले तरी त्यात नक्की खोडी काय आहे आणि ती कुणाची आहे, हे समजले नाही. जागांची प्रचलीत नावे बदलू नयेत, इतपत मान्य आहे. पण एका पोर्तुगीजाचे नाव काढून त्याच्याऐवजी एका हिंदू राजाचे ठेवले, तर नक्की कुणाची खोडी काढली गेली इथे? जाता जाता, वास्को, गोव्याच्या दक्षिणेस नसून, ते पश्चिमेस आहे, पणजीच्या थोडे दक्षिणेस. जुलुमी पोर्तुगीजांचे जबरदस्तीने धर्मांतराचे तडाखे ह्याच भागातून सुरू झाले. त्यामुळे त्या भागात असलेली मुळची हिंदू देवळे तेथून हलवून पोंडा महालात, सुरक्षित ठिकाणी न्यावी लागली. तेव्हा एकार्थी वास्को परिसराचा, व पोर्तुगीजांच्या जुलूमी राजवटीचा निकटचा संबंध आहे.

In reply to by प्रदीप

आचार्य अत्र्यंच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'हजारो वर्षांपूर्वी' देण्यात आलेले आहे. व ते मगोपने दिले असावे (बांदोडकरांच्या काळात).
ह्याला काय प्रतिसाद द्यावा हेच कळलेले नाही. अवांतर म्हणुन सोडून देण्यात आले आहे...
आणि हे कुणीहे केले असले तरी त्यात नक्की खोडी काय आहे आणि ती कुणाची आहे, हे समजले नाही. जागांची प्रचलीत नावे बदलू नयेत, इतपत मान्य आहे. पण एका पोर्तुगीजाचे नाव काढून त्याच्याऐवजी एका हिंदू राजाचे ठेवले, तर नक्की कुणाची खोडी काढली गेली इथे?
अभ्यास वाढवावा हीच विनंती. नांव बदलायचेच असेल तर गोव्याबाहेरच्या हिदू माणसाचे नांव उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यामधे ठेवण्यामधेच खोडसाळपणा आहे हे कळत नसल्यास बुद्धिमत्तेची कीव करण्याखेरीज आमच्या हाती काही नाही. ज्यांचा गोव्याच्या संस्कृतीचा काही अभ्यास नाही त्यांना उत्तर द्यायला आम्ही बांधलेले नाही!!
वास्को, गोव्याच्या दक्षिणेस नसून, ते पश्चिमेस आहे, पणजीच्या थोडे दक्षिणेस.
वा रे गोवा माहितगार! वास्को हे बंदर आहे. ते पश्चिमेसच असणार ना! गोव्याचे महाल कोणते, त्यातले उत्तर गोव्यातले कोणते आणि दक्षिण गोव्यातले कोणते, त्यांच्या संस्कृतीत काय फरक आहे, याची काहीही माहिती नसतां उगाच काहीतरी लिहिण्यात आपण आपले अज्ञानच जाहीर करतोय हे लोकांना कधी कळणार?

In reply to by पिवळा डांबिस

गोव्याबाहेरच्या हिदू माणसाचे नांव उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यामधे ठेवण्यामधेच खोडसाळपणा आहे हे कळत नसल्यास बुद्धिमत्तेची कीव करण्याखेरीज आमच्या हाती काही नाही.
पिडांकाकाही इतरांच्या बुध्दीमत्तेची कीव करण्याच्या ब्रिगेडमध्ये सामील होतील असे वाटले नव्हते. एकूणच हा प्रतिवाद अत्यंत डिसअपॉईंटिंग वाटला.

In reply to by गॅरी ट्रुमन

पिडांकाकाही इतरांच्या बुध्दीमत्तेची कीव करण्याच्या ब्रिगेडमध्ये सामील होतील असे वाटले नव्हते.
ब्रिगेड की सेना की संघी हा तुमचा दृष्टीकोन! गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा हे तुम्हाला योग्य वाटतं याचंच आश्चर्य वाटतं.
एकूणच हा प्रतिवाद अत्यंत डिसअपॉईंटिंग वाटला
समज आपली आपली!

In reply to by पिवळा डांबिस

गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा
गोवा भारतातच आहे आणि भारतीयेतरांचे खासकरून जुलमी राजवटीचे प्रतिक असलेले नाव नको म्हणण्याचा इतर भारतीयांनाही पूर्ण नैतीक अधिकार असावा असे वाटते. बदललेले नवे नाव काय असावे हे ठरवण्याचा गोयंकरांचे मत जरुर विचारात घ्यावे. अर्थात त्याच वेळी पै तैंनी दिलेल्या माहितीनुसार परकीय राजवटीपासून गोवा मुक्ततेचा पहिले प्रयत्न शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर ऐतिहासीक दस्तएवजांनुसार जात असतील तर त्याचे सुयोग्य क्रेडीट गोव्याच्या जनतेने त्यांना स्वतःहून बहाल करावयास हवे असे वाटते.

In reply to by पिवळा डांबिस

अवांतर म्हणुन सोडून देण्यात आले आहे... असे म्हणून पुन्हा पुढील प्रतिसादात गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा हे तुम्हाला योग्य वाटतं याचंच आश्चर्य वाटतं. हे तुम्हीच लिहीता आहात. माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. मगोपाचा मी त्यात उल्लेख केला होता. खाली पिशी अबोली ह्यांनी १९९८ च्या रीडिफच्या एका वृत्ताचा दुवा दिलेला आहे, जो माझे म्हणणे, की (१) हे नामकरण आता कुणी घडवून आणत नाही, तर ते अगोदरच, म्हणजे १९९८ साली इनिशेअ‍ॅट केले गेलेले आहे आणि (२) ते मगोप (महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ह्यांनी केले होते, ह्या विधानांना दुजोरा देतो. आता ह्यापुढे तुमचे समज गैरसमज दूर करण्याच्या फंदात मी पडणार नाही. गोव्याचे महाल वगैरे सर्वकाही ठीकठाक मला माहिती आहे, असा मी दावा केलेला नाही. मात्र आपण स्वतःच गुगल मॅप उघडून वास्को गोव्याच्या पश्चिमेस आहे, की दक्षिणेस ह्याचा एकदा शोध घ्यावा. (बहुतेक तुमच्याप्रमाणेच) मीही मुळचा गोंयकार आहे, तेथे वर्षां- दोन वर्षांकाठी देवाला म्हणून जाणे होतेच. असो. ह्यापुढील प्रतिसाद द्यायचा झालाच तर रॅटल न होता द्यावा !

In reply to by प्रदीप

अँ! अशें कितें उलैतारे? सामको मारे तू? :) गोव्याविषयी काही लिहितांना भावनाशून्य होणे (तुमच्या भाषेत रॅटल न होणे!) मला तरी शक्य नाही. आतड्यात गुंतलेला विषय आहे तो माझ्यासाठी. मगोपा जरी मराठी लोकांना जिव्हाळ्याची असली तरी ती सर्व गोवेकरांचं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून तर ती गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचं मतदान हरली.... त्यामुळे लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री!!! :) --------------------------- अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनावीण काळ घालवू नको रे || -सोयरोबा

In reply to by उडन खटोला

तुम्हाला प्रतिवाद करणं जमलं नाही इतकाच त्याचा अर्थ. मी असतो तर सांगितलं असतं की, "बाबांनो, पोर्तुगीजांनी गोव्यावर म्हणजे भारतातल्या चिमूटभर भागावर सत्ता गाजवली. असं असतांना त्यांनी बाकी खंडप्राय भारतातल्या सगळ्या इंडियन्सना/भारतीयांना सिव्हिलाईझ्ड बनवले हे म्हणणं मूर्खपणाचं आहे!!"

In reply to by पिवळा डांबिस

मान्य. पण मग वास्को डि गामा चे गोव्याच्या प्रगतीतील योगदान काय? केवळ तो ख्रिस्ती होता म्हणुन गोव्यातील ख्रिस्ती बांधवांनी त्याची कड घ्यावी काय? दुसरी गोष्ट म्हणके गोव्यातील पोर्तुगीज राजवट आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा मुख्यत्वेकरुन बळजबरीनेच झाला आहे हे अमान्य करता येइल काय? गोव्याकडे पोर्तुगीज ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची एक जागा म्हणुन पाहत होते हे देखील करेच नाही काय? गोव्याचा विकास आणि एकुणच एतद्देशीय जनतेची भलाई या उद्देशाने काही पोर्तुगीज गोव्यात आले नव्हते. असे असताना एका पोर्तुगीजाच्या नावाच्या जागी एखाद्या एतद्देशीय राजाचे नाव दिल्यास त्यात नक्की काय चुकीचे आहे. कातडीबचावु धोरण अंगिकारुन भाजपाने हे नामांतरण टाळलेच असते तर ते त्यांच्यासाठी बरेच झाले असते. असेही इतक्या वर्षांनंतर आता त्याचे नाव संभाजीनगर केले जरी तरी आपल्या हयातीत त्याला कोणी संभाजीनगर म्हणेल असे वाटत नाही. पण पारतंत्र्याच्या खुणा आपण अंगावर शोभेने मिरवल्याच पाहिजेत का हे ही आपल्याला एकदाच ठरवलेच पाहिजे.

In reply to by मृत्युन्जय

ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले?
तुम्हीही महाराष्ट्रीय चश्म्यातून गोव्याकडे पहाताय. ज्या शहराशी संभाजीमहाराजांचा काहीही संबंध आला नव्हता (नसावा) त्या शहराला त्यांचं नांव देणं (संभाजीमहाराज आपल्याला कितीही वंदनीय असले तरीही) आणि ते ही स्थानिक लोकांच्या इच्छेला न जुमानता, ह्यात तुम्हाला काही खोडसाळपणा दिसत नाही? आणि ह्यांना एखाद्या हिन्दू राजाचं नांव सुचवायचंच होतं तर मग गोव्याचं स्थानिक कदंब राजघराणं काय ओस पडलं होतं? पण नाही, ते हे लोक सुचवणार नाहीत कारण गोव्याची मूळ संस्कृती काय, कदंब राजे कोण याची ह्यांना काहीही माहिती नाही. माहीती करून घ्यायची इच्छा नाही. ह्यांना फक्त वाद निर्माण करून जिथे भांडण नाही तिथे भांडण निर्माण करायचंय!!! म्हणून माझा विरोध!!

In reply to by संदीप डांगे

जर स्थानिकांना पसंत पडलं तर आपणहुन बदलतीलच की ते! मार्मागोवाचं मुरगांव नाही केलं? हे बाहेरचे लोकं कोण जबरदस्ती करणार? आज वास्कोचं संभाजीनगर कराल, उद्या दोना पावलाचं चिमाजीआप्पानगर कराल! सांगितला कुणी ह्यांना हा उद्योग? आणि मग स्थानिकांनी विरोध केला की हे देशभक्तीच्या दांभिक आरोळ्या मारायला तयार!!!

In reply to by पिवळा डांबिस

बाकी कै असलं तरी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बससेवेला कदंबा नाव आहेच, त्याप्रमाणे कदंबपूर वगैरे नाव ठेवता आले असते. पण हे लोकही येडेच आहेत. जरा थोडेसे होमवर्क करावे ते नाही. अशाने काही साधत नाही. बायदवे संभाजीराजे गोव्यात नक्की कुठपर्यंत आले होते हे पाहणे रोचक ठरेल.

In reply to by बॅटमॅन

बायदवे संभाजीराजे गोव्यात नक्की कुठपर्यंत आले होते हे पाहणे रोचक ठरेल.
इतिहासकार तुम्ही आहांत. तुम्ही शोधा, आम्हालाही शिकवा. आम्ही नाय कुठं म्हणतोय. आम्ही तर म्हणतो की सुरतेला शिवाजीनगर असे नांव का देऊ नये? महाराजांनी एकदा नाही दोनदा लुटली तिला!! पुराव्याने शाबीत गोष्ट आहे!!! जा, आधी ते नामकरण करा आणि मग या गोव्यात नवी नांवं सुचवायला!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

खी खी खी, पिडां जस्ट चिल! बाकी महाराष्ट्रातच औरंगाबादेचे संभाजीनगर करणे ज्यांना जमले नाही, इस्लामपूर बसस्ट्यांडनजीकच्या रिक्षास्ट्यांडावर फक्त "शाखा ईश्वरपूर" असे लिहून जे मोठा तीर मारलाय अशा आविर्भावात असतात ते घंटा काय करणारेत?

In reply to by पिवळा डांबिस

ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले? काय पिडांकाका तुम्ही पण दुसर्‍या कोणाची तरी विधाने माझ्या नावावर चिकटवुन मला दूषणे देत आहात होय? मी कुठे ख्रिश्चन बहुल शहरांना हिंदु राजांची नावे देण्याबद्दल बोललो? मी पोर्तुगीज लोकांऐवजी एतद्देशीय व्यक्तींची नावे देण्याबद्दल प्रतिवाद केला होता. वास्को डि गामा पोर्तुगीज नसून स्थानिक राजा असला असता तर कदाचित मी हा प्रतिवाद लिहिला देखील नसता? माझ्या एतद्देशीय भूमिकेमध्ये कदंब राजे देखील येतात. त्यांचे नाव जरी दिले वास्को ला तरी काहिच हरकत नाही. किंबहुना या भूमीत राहुन, धर्मांचा किंतु मनात न ठेवता, या भूमीतील जनतेच्या कल्याणासाठी झटलेला एखादा पोर्तुगीज राजा अथवा गव्हर्नर असेल तर त्याचेही नाव वास्कोला देण्यात काहिच हरकत नाही. वास्को डि गामाचे नाव देण्यामागची भूमिका कदाचित मला नीट कळालेली नाही. ती नीट कळाली आणि पटली तर वास्को हे नाव असण्यालादेखील माझा विरोध नाही. असो. माझ्या मनात ख्रिश्चनाचे नाव काढुन हिंदुचे नाव द्यावे असा काहिही विचार नाही. हे नामांतर करताना त्या माणसाचा धर्म बघु नये असे माझे मत आहे. गोव्यातील एतद्देशीय जनतेच्या आर्थिक आणि / अथवा शारिरीक आणि / अथवा सांस्कृतिक आणि / अथवा बौद्धिक विकासात त्यांचा धर्म न बघता हातभार लावणार्‍या कुठल्याही माणसाचे नाव त्या शहराला दिले तर काहिच हरकत नाही.

In reply to by मृत्युन्जय

एका पोर्तुगीजाच्या नावाच्या जागी एखाद्या एतद्देशीय राजाचे नाव दिल्यास त्यात नक्की काय चुकीचे आहे.
मला तुमच्या प्रतिसादातलं हे वाक्य कॉपी/पेस्ट करायचं होतं पण चुकून आधीच्या प्रतिक्रियेतलंच वाक्य पुन्हा पेस्ट झालं.... आय बेग फॉर युवर फरगिव्हनेस.

In reply to by मृत्युन्जय

वास्को डि गामा चे गोव्याच्या प्रगतीतील योगदान काय?
प्रगतीचे काय ठाउक नाही पण गोवाच कशाला पण संपूर्ण भारताने 'वदनी कवळ घेता' त्याचे नाव नक्कीच घ्यावे; विशेषतः उपासाच्या दिवशी!!!

In reply to by सुनील

यु मीन बटाटा..? तुम्ही बटाटा आणी उपास यांचा उल्लेख केला. चला यानिमित्ताने "हिंदू उपासाच्या दिवशी पोर्तुगीज बटाटा कसा काय चालतो" याचे विश्लेषणही देऊन टाकावे, बरेच लोक हिणवतांना बघितलेत. बटाटा हे जमिनीखाली येणारे कंदमूळ वर्गीय वनस्पती आहे. तसेच बीट, रताळे आणि टॅपियोकाही. साबुदाणा आणि बटाटा ह्या दोन्ही उपासाच्या सामग्री हिंदूंच्या शास्त्रात (कुठल्या?) सांगितलेल्या उपवासाच्या पदार्थांमधे कंदमूळ ह्या वर्गात समाविष्ट होतात. कंदमूळ व फळे खाऊन उपवास करणे हे हिंदू संस्कृतीत शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्यात पोर्तुगीजांनी बटाटा आणला म्हणून शास्त्रबाह्य होत नाही. बाकी, 'उपवासाला चालतं' ह्या नावाखाली काहीच्या काही खातांना लोकांना बघितलंय हे वेगळे, अजून कोणाला काही माहिती असेल तर जरूर देणे.

In reply to by संदीप डांगे

यु मीन बटाटा..?
फक्त बटाटाच नव्हे तर कोलंबियन एक्स्चेंज अंतर्गत येणारे बहुतेक सर्व काही!
चला यानिमित्ताने "हिंदू उपासाच्या दिवशी पोर्तुगीज बटाटा कसा काय चालतो" याचे विश्लेषणही देऊन टाकावे, बरेच लोक हिणवतांना बघितलेत.
आँ? मी कुठे हिणवलय? माझ्या प्रतिसादात तसे काही दिसतय तरी का? मला म्हणायचे ते एवढेच की, आमच्या आजच्या खाद्यजीवनातील बरेच महत्त्वाचे पदार्थ पोर्तुगिजांमार्फत आपल्यापर्यंत पोचले!

In reply to by सुनील

अहो, ते तुम्हाला नाही. बरेच लोक हिणवतात ते यानिमित्ताने आठवले असे म्हणायचे आहे. गैरसमज नको.

In reply to by पिवळा डांबिस

(प्रतिसाद खाली मुद्दामून घुसून वर दिसण्यासाठी म्हणून येथे देत आहे. केवळ पिडांसाठीच नाही आहे!) खाली जो मुद्दा लिहीत आहे तो आधी आला आहे का हे पाहील आणि दिसला नसल्याने इथे लिहीत आहे. पण तरी देखील चुकून माझ्याकडून नजरचूक झाली असेल तर क्षमस्व. ही चर्चा वाचून मला, "अरे देवा तुझी मुले अशी (न शोधता/वाचता) का रे भांडतात असे म्हणावेसे वाटले... अर्थात तो चर्चेकर्‍यांचा पूर्ण दोष देखील नाही. हं तर मुद्दा आहे: "तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले." हे वाक्य. मला खात्री आहे की हे असले काही घडले असते आणि विशेष करून या सरकारने चुपचुपके केले असते तर मोदी सरकारचे "माध्यम मित्र" गप्प बसले नसते. दुसरा लॉजिकल मुद्दा: भाजपाचे सरकार गोव्यात मोदी सरकार येण्याआधीपासूनच होते. जर नाव बदलायचेच असते तर त्यावेळेस बदलून राजकीय हवा तापवता आली असती... पण तसे तर झालेले नाही... म्हणून या संदर्भात जरा शोधायचा प्रयत्न केला. तर चर्चा प्रस्तावाच्या सुरवातीसच असलेया या बातमी नुसार, "छत्रपती संभाजीनगर " असे काही नाव झालेले नसावे हे लक्षात आले. आता ती बातमी काही भाजपा सरकारच्या बाजूची नाही. तरी देखील त्यात असे म्हणलेले आहे की वास्को मधील काही भागातील रेशनकार्डावर भागाचे नाव संभाजी असे लिहीलेले असून कंसात वॉस्को-द-गामा असे म्हणलेले आहे. त्याचे कारण, “per government records which show that certain pockets in Vasco were named as Sambhaji in 1971”. म्हणजे वॉस्को मधील एका भागाचे (jurisdiction) नाव "संभाजी" आहे. पण ते आधी कधी वापरलेले नव्हते. मग त्या बातमीत म्हणले गेले आहे की ते जर खरे असेल तर ते कसे कुणाला माहीत नाही? आता जर सरकारी अधिकार्‍यांनीच ते वापरले नसेल तर ते इतरांना कशाला माहीत असणार? आणि माहीत नाही म्हणून कायदेशीर नाव न वापरणारे मधल्या काळातले सरकारी अधिकारी बरोबर का आत्ता ज्याने (कदाचीत खोडसाळपणाने पण असेल, हू नोज!) दुरूस्ती करून नाव वापरले ते बरोबर? आता तुम्ही म्हणालं की हे कशावरून बरोबर म्हणून... परत मला त्या साठी कॅलीफोर्नियातील उपक्रमाने मदत केली. ;) आय मिन गुगलने मदत केली... goaprintingpress.gov.in (सरकारी छापखान्याच्या) संस्थळावर मला गोवा, दमण, दिव लँड रेवेन्यू कोडचा हा खजीना मिळाला. (पिडीएफ फाईल असल्याने ती डाऊन्लोड होईल). तर या माहीतीपत्रकाच्या पृष्ठक्रमांक २६९ वर २४ वी ओळ जी आहे त्यात लिहील्या प्रमाणे मोर्मुगाव (मार्मागोवा) मधील एका भागाचे नाव "संभाजी" आहे. त्याला जो संदर्भ दिला आहे तो Jurisdiction in the circle as constituted under Order No. RDB/REV/3/1970 dated 30-7-71 असा आहे. आता वॉस्को-द-गामा गाव हे मार्मागोवा तालुक्याच्या अंतर्गत म्हणजे ज्या मधे संभाजी नामक सरकारी "सर्कल" आहे, त्याच भागात येते. आता सर्कल, गाव, तालुका वगैरे मधील मला फरक समजत नाही... पण हे सगळे वेगळे सरकारी परीपत्रकात किमान १९७१ पासून आहे. कदाचीत आता पद्धत अजून डिटेल केली असेल अथवा वर म्हणल्याप्रमाणे खोडसाळपण असेल... मात्र आपण येथे आणि पब्लीक इतरत्र वाद घालत बसलो आहोत...असो. चालायचचं! :) ___________________ अजून एक भरः http://inngoa.com/category/cities/ या संस्थळावर म्हणल्याप्रमाणे: " As the name suggests, Vasco-da-Gama city inherited its name from the Portuguese explorer and the former viceroy, Vasco-da-Gama and is locally known as Vasco. Located at close proximity to Mormugao harbor and Zuari River, the city was originally called Sambhaji. This coastal town came under Portuguese rule in 1543 A.D. and evolved as a leading export-import trade center for India on a global platform. The city was founded in 1543 and remained in Portuguese hands until 1961, when Goa was annexed by India. " म्हणजे, असे दिसतयं की पोर्तुगिजांनी संभाजी हे नाव बदलून १५४३ साली वास्को-द-गामा हे नाव केले. (वरील संस्थळ हे देखील भाजपा अथवा संघपरीवाराचे नाही! ;) त्यांनी ही बातमी वास्को बद्दल लिहीत असताना इतिहास म्हणून लिहीली आहे. आता इथले जाणकार गोवेकर उरलेले संशोधन करतील अशी आशा करून, मी माझे दोन शब्द संपवतो! ;)

In reply to by विकास

आत्ताच टाईम्स मधे आलेली बातमी... Carlos faults previous govt for ‘renaming error’ चर्चेच्या संदर्भात खालील काही भाग... In an attempt to turn the tables in the alleged renaming of Vasco issue, Vasco MLA Carlos Almeida (BJP), alleged that it was the earlier government's failure to make the corrections that resulted in the new food security card error which displays the name 'Sambhaji nagar' in the address on several ration cards. Almeida said, "In 2011, a notification in the government of Goa's official gazette displays Sambhaji (Vasco-da-Gama). This was recorded then and the MLA of the day and former revenue minister Jose Philip D'Souza overlooked this mistake. Tension prevails in Vasco as he failed to notice the error or purposely overlooked it." The notification dated March 17, 2011, under serial Number 8, refers to 'Sambhaji' (Vasco-da-Gama). (माझा मुद्दा: तरीपण १९७१ पासून होते ते काय होते?)

In reply to by विकास

अरे देवा! कुणाला कशाचं आणि विकासला फक्त भाजपाचं!!!! :) मी इथे भाजपाचं नांव तरी घेतलंय का? धार्मिक कळा काढायला माणसं काय फक्त भाजपाची कार्ड कॅरियरिंग मेंबरं असायला लागतात का? :) माझा मुद्दा इतकाच की हे गोव्याबाहेरचे लोक हिंदूबहुल उत्तर गोव्यात नामांतर न करता (अनेक उमेदवार आहेत नांवं बदलण्यासारखे, बांदा, म्हापसा, फोंडा वगैरे!!) मुद्दाम ख्रिस्तीबहुल दक्षिण गोव्यातल्या गावांची नांवे बदल करून ती ही गोव्याबाहेरच्या राज्यकर्त्यांची ठेवायला बघताहेत. त्यांना विरोध केला तर काय चुकलं? इतकी हौसच असेल तर डोंबिवलीचं नांव बदला आणि ठेवा छत्रपती संभाजीनगर! त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे!!!!

In reply to by पिवळा डांबिस

मी इथे भाजपाचं नांव तरी घेतलंय का? अहो, माझे वरच्या पहील्या प्रतिसादातले, पहीले वाक्य वाचलेत का? प्रतिसाद खाली मुद्दामून घुसून वर दिसण्यासाठी म्हणून येथे देत आहे. केवळ पिडांसाठीच नाही आहे! संपूर्ण चर्चेत भाजपा हे काही मी नाही आणले. तसे कोणी मुद्दामून आणले असे देखील म्हणलेले नाही. पण पब्लीकने या चर्चेत दोन गोष्टी गॄहीत धरल्या होत्या असे वाटले: (१) वास्को द गामा हे नाव बदलले आणि (२) ते जर आत्ता बदलले तर असले तर ते भाजपानेच बदलले असणार. आता यातील #२ गृहीतक हे #१ वर अवलंबून आहे. त्या संदर्भात मी जी मुद्याची गोष्ट सांगितली, त्या बद्दल आपले काय मत आहे? संभाजी हे नामकरण वास्को चे नसून त्यातील एका भागाचे १९७१ पासून आहे. दुसर्‍या प्रतिसादात मी टाईम्स मधली बातमी देखील दिली आहे ज्यानुसार हे परत सिस्टीम मधे २०११ सालीच आले आहे. आता माझे किंचीत तांत्रिक लॉजिक असे सांगते आहे की जेंव्हा सिस्टीम्स अधुनिक केल्या जात असतात आणि त्यात जर जी आय एस वापरले जात असेल तर प्रत्येक पॉइंट हा वेगवेगळ्या संदर्भाने डिफाईन केलेला असू शकतो. त्यामुळे देखील तसे २०११ साली केले असेल. कारण काहीही असेल पण आता कोणीतरी राजकीय फायदा उठवायला ही बातमी तयार केली आणि आपण तुरी बाजारात पण नसताना वाद घालत बसलो आहोत. म्हणून म्हणतो, माध्यमातील बातम्यांवर ज्वलंत विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री करून घेणे महत्वाचे असते. आणि माध्यमातील कोणत्याही (आपल्याला आवडू अथवा नावडू शकतील अशा काहीही) बातम्यांवरून कुठलेही मत तयार करण्याच्या आधी अधिक माहिती काढणे इष्ट!

In reply to by विकास

मूळ धाग्याच्या प्रस्तावातच आहे: मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले.

In reply to by पिवळा डांबिस

सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात शहरात तुम्ही राहता त्या शहराच्या नावाशी तुमची एक आत्मीयता असते ओळख असते ती आपली कानावर तेच पडलेलं असत भले हि ते कुणाचंही असो ! कुठल हि असो आता आमचं अहमदनगर बघा मुस्लिम राजाने वसवलेल शहर ,पण अहमदनगर म्हटल कि कस आपलं आपलं वाटत भले हि मी मुस्लिम नाही पण त्याच नाव बदलायचं ठरलं तर मला वाईट वाटणारच कारण माझ्या जन्मापासूनची सोबत आहे या गावाशी उद्या त्याच नाव कुंणी बदलावे अस म्हटलं तरी मला वाईट वाटण साहजिकच तसच काहीस झालं असणारे वास्को च्या बाबतीत वास्को आला गेला, काय केलं? काय नाय केलं हे सगल्याच आताच्या पिढीला काय घेणं असेल ? किंवा नसेल पण जर त्यांच्या गावाच नाव त्यांची ओळख त्यांना आवडत असेल तर का बदलाव? ज्याचं त्याच गावाच नाव लाडक असत त्याची नाळ जोडलेली असते इतिहास काय सांगतो न का सांगतो ते सगळं राहू द्या पुस्तकात ! नाव बदलून वास्कोच वाशिंगटन नाही होणार ;)

In reply to by पियुशा

पिवशे, अहमदनगराचं मूळचं नाव भृगुनगर- भिनगर- भिंगार असे होते. अहमदशाहने जरी हे शहर वसवले(वाढवले) होते तरी हे नगर त्याआधीपासून अस्तित्वात होतेच. 'नगर' हा मूळ संस्कृत शब्द त्याचा अजूनही प्रत्यय देतोच.

In reply to by बॅटमॅन

वल्ली रोचक माहिती बर झालं तू लिहिलंस हे :) बघ आता मलाच माझ्या गावाचा इतिहास नीट माहीत नाहीं तरी मला हे नाव आवडतच :) नाव that 's the point तेच सांगायचय मला वल्ली तुझ्यामुळे माझा मुद्दा उदाहरण देऊन क्लीअर करता आला मला :) समजलं कां ब्याट्या ;)

In reply to by बॅटमॅन

हो. पण ते नगरपासून जेमतेम ४/५ किमीवर आहे. मला वाटतं नगरचा मिलिट्री क्याम्प तिथे आहे. अहमदशहाने सीना नदी जवळ वस्ती वाढवली असावी. खुद्द नगर शहरात इस्लामपूर्व काळातील काही अवशेष आहेत का ते पाहायला पाहिजे.

In reply to by प्रचेतस

प्रचेतस नगरच्या बाबतीत लिहीतात त्याच न्यायाने औरंगाबादचे नाव देवगिरी ठेवायला काय हरकत आहे ? हे लवकर केले पाहिजे. नाहीतर संभाजी नगर चा कॉपी राईट गेल्यामुळे औरंगाबादला आता बाळ ठाकरे नगर असे नाव देण्यासाठी उधोजीराव आणि त्यांचे मावळे चळवळ सुरु करतील .

सगळीकडेच शिवाजी किंवा संभाजी. जरा दुसरी नावे तरी येऊ देत की. महाराष्ट्रात आधीच एक संभाजी नगर आहे. गोव्याच्या मातीत कोणी नाव देण्यासारखा माणुस जन्माला आलाच नाही का?

In reply to by प्रसाद१९७१

गोव्याच्या मातीत कोणी नाव देण्यासारखा माणुस जन्माला आलाच नाही का?
आले की. गोव्याची माती काय वांझ आहे का? पण ती नांवं देऊन मग वाद कसा निर्माण करता येणार? मी वर म्हंटल्याप्रमणे ह्या लोकांना हिंदूबहुल उत्तर गोव्यात नामबदल करायचे नाहीत. मुद्दाम ख्रिस्तीबहुल दक्षिण गोव्यात जाउन काड्या करायच्यात! ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!! अन्यथा मला ह्यात पडायची गरज नव्हती....

In reply to by पिवळा डांबिस

ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!! ह्याविषयी वर माझा प्रतिसाद दिलेला आहे. हे नामकरण कुठल्याही भाजपा सरकारने केलेले नाही. सदर नाव मी अनेक वर्षे ऐकत आलोय, त्या नावाच्या पाट्ञा तेथे पहात आलोय. हे नामांतर तेथीलच मगोपाने केले असावे असे मला वाटते.

In reply to by पिवळा डांबिस

ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!! पि डां साहेब याच्याशी मी थोडा असहमत आहे. मी स्वतः साडे चार वर्षे प्रत्यक्ष वास्को मध्ये राहिलो आहे. आजही दक्षिण गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यात आपण म्हणता तितके सख्य नाही. याचे कारण तेथील अर्थ सत्ता ख्रिश्चन लोकांच्या हातात आहे. हि अर्थ सत्ता दोन तर्हेची आहे. हि अर्थ सत्ता टिकवण्यासाठी तेथील ख्रिश्चन नेते आणी त्यांची पिलावळ आपला सवता सुभा सोडायला सहज तयार होणार नाही. यातून स्थानिक लोकांची सुटका नाही. स्थानीक १) तस्करीतून निर्माण झालेला पैसा -- तस्करी करण्यात बरेच ख्रिस्ती बांधव जे मरीन इंजिनियरिंग किंवा बोटीवर असलेले दर्यावर्दी होते त्यांचा हात होता. सध्या तस्करी तशी थंडावली आहे पण उत्तर गोव्यात येणाऱ्या अमली पदार्थांमध्ये याच लोकांचा मोठ्या प्रमाणावर हात आहे. उदा. आज ही दक्षिण गोव्यात बाणावली ई परिसरात किंवा क्लब महिंद्र च्या वरका येथे तुम्ही तेथील स्थानिक लोकांकडूनच कार भाड्याने घेणे आवश्यक आहे. एक तर तुमची स्वतःची गाडी असली पाहिजे किंवा त्यांच्या कडूनच त्यांनी सांगितलेल्या दरानेच घेतली पाहिजे. गोव्यातील पणजी किंवा फोंडा येथून गाडी भाड्याने घेऊन येणे शक्य नाही. स्वतंत्र भारतात हा दहशतवाद त्यांनी धर्माच्या नावावर चालू ठेवला आहे. क्लब महिंद्रचा वेबसाईट वरहि पहा. २) वाहतूकदार-- बस मोटार ई यांची गोव्यातील मक्तेदारी कोकण रेल्वेने बर्यापैकी मोडीत काढली. त्याला त्यांनी जीवापाड विरोध केला.(मुंबई पुणे येथून चालणार्या बससेवा आणी त्यातून बाहेर होणारी दारूची "तस्करी" यातून ते भरपूर मलिदा खात होते.) इतका विरोध केला कि कोकण रेल्वेचा मार्ग मापसा आणी पणजी जवळून जाणार होता तो कोकण रेल्वेच्या "साडे तीन इंजिनांनी" आमच्या पौराणिक चर्चवर परिणाम होईल म्हणून धर्माचा आधार घेऊन आंदोलन केले. त्यावेळचे कोकण रेल्वेचे महा व्यवस्थापक इ श्रीधरन हे खमके होते त्यांनी त्याचा पर्यायी मार्ग शोधून त्याचे सर्वेक्षण एक वर्षात करून कोकण रेल्वे रुळावर आणली . परंतु आजही पणजी किंवा मापसा येथे जाण्यासाठी स्थानिक किंवा प्रवासी माणसाना सुकर अशी बससेवा उपलब्ध होऊ दिली जात नाही.कोकण कन्या महाराष्ट्रात जेथेजेथे थांबते तेथून तिच्या वेळेवर स्थानकातून सुटणाऱ्या एस टी बसेस उपलब्ध आहेत पण अशी सुविधा गोव्यात उपलब्ध करून दिली जात नाही. आजही बाकी गोव्यात बस सेवा यथा तथाच आहे. तिसरी गोष्ट गोव्यात बरीच सरकारी कंत्राटे श्री मनोहर पर्रीकर येण्याच्या अगोदर या लोकांनी आपल्या हातात ठेवली होती आणी सरकार पाडू या धमकी वर ते वाटेल तेवढा मलिदा खात होते( १९९० ते २००० या दहा वर्षात गोव्यात १२ मुख्यमंत्री (आणी दोन वेळेस राष्ट्रपती राजवट) झाले म्हणजे सरकारे काय स्थितीत होती). इतका कि गोवा राज्य होण्यापेक्षा केंद्रशासीत प्रदेशच बरा होता असे बरेच दिवस तेथील लोक बोलत. एक उदाहरण. गोव्याला साळावली धरणातून पाणीपुरवठा करण्याची पाईप लाईन दर वर्षी "फुटत"असे आणी दक्षिण गोव्यात आणी पणजीत चार दिवस पाणी नसे. तातडीने" ती दुरुस्त करण्यासाठी सरकार भरपूर पैसे खर्च करत असे. पर्रीकर साहेबांनी आल्यानंतर त्या कंत्राटदाराला सज्जड दम दिल्यानंतर गेल्या कित्येक वर्षात ती पाईप लाईन "फुटलेली" नाही. अशा धार्मिक गुंडगिरीविरुद्ध लोकांचा आवाज दाबून ठेवलेला होता तो बाहेर पडू लागला आहे. बाकी वास्कोचे नामकरण स्थानिक गोवेकरचे नाव उदा बाकीबाब बोरकर, शणाय गोंयबाब किंवा एखाद्या ख्रिश्चन माणसाचे उदा चार्लस कोरिया https://en.wikipedia.org/wiki/Charles_Correa देऊन केले असते तर हि गुलामगिरीची खुणहि पुसली गेली असती आणी या वादाला धार्मिक वळण देण्याचे गोव्यातील राजकारण्याचे मनसुबे फोल ठरले असते.

In reply to by सुबोध खरे

आज ही दक्षिण गोव्यात बाणावली ई परिसरात किंवा क्लब महिंद्र च्या वरका येथे तुम्ही तेथील स्थानिक लोकांकडूनच कार भाड्याने घेणे आवश्यक आहे.
हा अनुभव मी वारका येथे घेतला आहे. मी आणि हिलरी क्लब महिंद्रच्या शेजारीच असलेल्या वारका पाम बीच रिझॉर्ट मध्ये राहिलो होतो. बाहेर कुठेही जायचे असेल तर या रिझॉर्टवाल्यांकरवीच गाड्या बुक कराव्या लागत होत्या. आणि गाड्यांचे दर प्रचंड महाग होते. आम्हाला काही करून मडगावला जायचे होते.तेव्हा रिझॉर्टबाहेर येऊन अडीच-तीन किलोमीटर चालल्यावर एक रिक्षा मिळाली. परत येताना तो रिक्षावाला रिझॉर्टपर्यंत यायला तयार नव्हता.याचे कारण रिझॉर्टच्या जवळपास तिथले लोक इतर वाहनांना फिरकू देत नाहीत.त्यामुळे परत येतानाही रिझॉर्टपासून एखाद किलोमीटर दूर त्याने आम्हाला सोडले होते.

In reply to by सुबोध खरे

कोकण रेल्वेमुळे गोव्यातील चर्चच्या शांततेचा भंग होतो म्हणून १९९३ मध्ये कोकण रेल्वेचे काम थांबवावे असा प्रचंड दबाव तिथल्या लॉबीने आणला होता. नरसिंह राव सरकारने हे काम काही महिने थांबविलेही होते आणि निवृत्त न्यायमूर्ती ओझा यांच्या अध्यक्षतेखाली याचा अभ्यास करायला समिती नेमली होती. न्या. ओझांनी असे काम थांबवायची मागणी करायला काहीही आधार नाही असा निवाडा दिला आणि त्यानंतर हे काम परत सुरू झाले होते.

In reply to by सुबोध खरे

हिंदु बहुल ( किंवा इतर कोणेही बहुसंख्य असलेल्या ) भागातही अशा स्वार्थी टोळ्या असतात ना ? हे कारण दाखवून तिथल्या भागातही नामांतर करणार का ?

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा ड्यानिएल काकांशी सहमत !!!!

In reply to by पक्षी

Sorry...गलती से mistake हो गया.. ड्यानिएल एवजी डांबिस असे वाचावे .

In reply to by पक्षी

अगर आप ड्यानियल बोलताय तो ड्यानियल!!! कब्बीसे हमारी मारिया बोल रह्येली हय की ये 'डांबिस, डांबिस, अच्चा नई दिखताय, नाम बदलो!" अब्बी तुम ड्यानियल सुझाया तो ड्यानियल!!! हाकानाका!!! :)

आपल्याला हा नामकरण प्रकारच पटत नाय बॉ. वीटीचे सीएसटी केले, अजून कशाचे काय केले. उगाच? नवीनच स्टेशन बांधले असते इंग्रजांनी बांधलेल्या स्टेशनापेक्षा दहा पट मोठे तर जास्त योग्य वाटले असते. नवीन जागा, इमारती, संस्था, ज्या भारतीयांनी बनवल्या त्यांना द्या भारतीय नावे. जर आधीची विदेशी नावे खटकत असतील तर काही निधर्मी नावे द्या. उगा ज्याला त्याला धार्मिक जातीय तेढीत ओढून नसते वाद निर्माण करायचे. औरंगाबाद हे शहर औरंगजेबाने वसविले, त्या नावाला विरोध असणार्‍यांनी नवे शहर वसवावे त्याला संभाजीनगर नाव द्यावे. एवढं करणं कठिण आहे फारच औरंगजेबाच नाव अडकतं तोंडात तर सरळ ओंबाद असं काहीतरी करायचं. उगाच वेळ जात नाही म्हणून रिकामपणाचे उद्योग करत बसतात लोक. शहर राहतंय तसंच बकाल, पाण्याची बोंब दरवर्षी, यांना काळजी नाव बदलायची. काय म्हणून काय लाज नाही लोकांना. वास्कोचं नाव बदलायच्या वादाबद्दल पिडांकाकांची भूमिका पटते.

In reply to by संदीप डांगे

वीटीचे सीएसटी केले, अजून कशाचे काय केले. उगाच?
नायतर काय? जे मुंबई मुळात इंग्रजांनी वसवलं. जिथे मराठ्यांचं राज्य कधीही नव्हतं, तिथल्या इंग्रजांनीच बांधलेल्या व्हीटीला छत्रपती शिवाजी टर्मिनस नामकरण करून काय मोठा पराक्रम केला? बरं त्याचा उल्लेख करतांना 'छशिट' असा करतात. हा काय शिवाजी महाराजांचा विशेष सन्मान आहे? त्याहून पुढे म्हणजे विमानतळाला शिवाजीमहारांजं नांव दिलं. काय संबंध? त्यापेक्षा मुंबई विमानतळाला जेआरडी टाटांचं नांव देणं अधिक समर्पक ठरलं नसतं? भारतीय विमानकलेचा उद्गाता तो! की जेआरडी भारताचे सुपुत्रच नव्हते?